Punha Navyane - 4 books and stories free download online pdf in Marathi

पुन्हा नव्याने - 4

आ भाग ४
मीरा" मुलांच काय? घर कोण सांभाळेल? मी बाहेर पडले तर.

रागिणी, " मीरा मुलं आता मोठी झाली आहे त. त्यांचं त्यांच ते स्वतः हुन करु शकतात. तु मेकप आर्टिस्ट आहेस त्या दृष्टीने काहितरी कर. पण काहीतरी कर. "

मीरा, " मला जमेल का गं रागिणी? किती वर्षे झाली? घरातील कामं कशी होतील. "

रागिणी, " का नाही जमणार मीरा. घरातल्या कामांना बाई ठेव. थोडं स्ट्रॉंग बन मीरा. जेव्हा आपण पूर्ण वेळ गृहिणी असतो . तेव्हा सगळेच आपल्या वर डिपेंड असतात.
ते आपल्या ला आवडत पण असतं. पण पण मुलं जेव्हा मोठी होतात. आपापल्या विश्वात रमायला लागतात. मुलं आपल्या विश्वात नवरा आपल्या विश्वात तेव्हा ती स्त्री एकटी पडते. नवरा मुलं तुम्हाला ग्रान्टेड धरायला लागतात. प्लीज मीरा बाहेर ये ह्या सगळ्यातून आणि लाईफ एन्जॉय कर. तुझी काही च चूक नाही आहे यात. "
मीरा विचार करू लागली. तिला रागिणी च म्हणणं पटत होतं. तिने रागिणी च ऐकायचं ठरवले.

रागिणी, " चला मॅडम पिझ्झा खाऊ या ."

रागिणी ने मीरा चे डोळे पुसले तिला उठवून तोंड धुवायला लावले. पिझ्झा चा एक तुकडा तोडला आणि मिराला भरवला. टि. व्ही. लावला. टिव्ही वर हास्य जत्रा कार्यक्रम लावला. दोघींनी हसत हसत पिझ्झा खाल्ला. आईस्क्रीम खाल्ले. थोड्यावेळाने रागिणी निघून गेली.
रागिणी गेल्यावर मीरा उठली आणि आरशा समोर उभी राहिली. आपल्या स्थूल शरिराकडे बघत तीने ठरवलं की पहिलं वजन कमी करायचं. तीने स्वतः शी निश्चय केला.
माझी यात काही च चूक नसताना मी का हे सर्व सहन करु. रागिणी बरोबर बोलतेय रडून किंवा त्रागा करून काही हि साध्य होणार नाही.
तीने तिच्या एका मैत्रीणी ला फोन केला. ती जात असलेल्या जीम बद्दल चौकशी केली. सेकंड फ्लोअर वर राहणाऱ्या निकम ताईंना फोन केला. पुर्ण वेळ कामवाली बाई ठेवायची आहे तसेच मुलांच्या अभ्यासासाठीचे एखादी मुलगी किंवा बाई ठेवण्याचा तिचा विचार त्यांना सांगितला आणि कोणी असेल‌तर सांगा असं सांगितलं.
राजीव संध्याकाळी घरी आला तेव्हा घरचं वातावरण ‌नेहमीप्रमाणे बघुन आनंद झाला ‌. पण त्याला हे माहिती नव्हतं की ,ही वादळापूर्वीची शांतता आहे.
" मीरा पाणी दे गं." राजीव मीरा चा अंदाज घेण्यासाठी बोलत होता.मीरा
त्याच्या साठी पाणी घेऊन आली.

मीरा," राजीव मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे.‌"

राजीव," बोल ना काय बोलायचं आहे. "
मीरा," मी घरकामासाठी पूर्ण वेळ बाई ठेवणार आहे. मुलांचा अभ्यास घ्यायला‌ पण टिचर बघणार आहे. "
राजीव, " पण मग तू काय करणार? नाही म्हणजे तुझा वेळ कसा जाणार म्हणून म्हणालो मी? "
मीरा," माझा वेळ कसा सत्कारणी लावायचा ते मी ठरवलं आहे.‌"
राजीव ," काय ठरवलं आहेस तू. "
मीरा," माझा मेकअप आर्टिस्ट चा कोर्स झालेला आहे. मला त्याचा अनुभव पण आहे. जो गाळा मागच्या वर्षी ‌आपण विकत घेतला‌ आहे ना.‌तिथे मी माझा मेकअप स्टुडिओ‌ चालू ‌करायचं ठरवलं आहे. त्यामध्ये ‌मी बिझी होऊन जाईल म्हणून च कामाला बाई ठेवणार आहे. "
राजीव," अगं पण कशाला? मी कमावतो आहे ना ? तसं ही तो गाळा मी भाड्याने दिला आहे. ते भाडं हवं तर तू घे. "
मीरा," मला माझं स्वतःचं काहीतरी करायचं आहे. मला तिथे स्टुडिओ काढायचा आहे. हे मी करु की नको हे तुला विचारत नाही आहे.‌मी हे तुला फक्त सांगते आहे.भाड्याचं ॲग्रीमेंट कधी संपणार आहे? "
राजीव," मीरा ,आधी हे माझं स्वतःचं जे काही चाललं आहे ते बंद कर.तू बाहेर गेलीस तर मुलांकडे आणि घराकडे कोण लक्ष देईल? हे जे काही खूळ घेतलं आहेस ना डोक्यात ते काढुन‌ टाक समजलं. "
मीरा," राजीव सगळ्यात आधी तुझा आवाज कमी कर. तू खूप गुण उधळलएस आणि वर तोंड करून बोलतो आहेस. चोर तर चोर वर शिरजोर. आपलं घर आपली मुलं सांभाळायला मी इतके दिवस झटले.‌आपल्या संसारात कशाचीच कमी पडू नये म्हणून मी माझं अस्तित्व विसरून या संसारात मग्न झाले.‌आदर्श कपल म्हणून ‌ सोसायटीतले लोकं आपल्याकडे बघतात. एवढं सगळं ‌करून‌ काय मिळालं मला.‌
यापुढे मी घरी राहू शकत नाही.‌त्याचं त्याचं गोष्टींचा विचार ‌करुन‌ वेड लागायची पाळी येईल मला. कदाचित तुला तेचं हवं‌असेल. मग माझी बायको अशी वेडी आहे. तिचं संसारात लक्ष नाही सांगता दुसऱ्या बायकांची सहानुभूती मिळवायची असेल."


हा भाग तुम्हाला कसा वाटला आपल्या प्रतिक्रियेतून नक्की सांगा.आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाच्या आहेत.


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED