Punha Navyane - 7 books and stories free download online pdf in Marathi

पुन्हा नव्याने - 7

भाग ७
मीरा काही आता ऐकणार नाही हे तो जाणून होता. मीरा किती जिद्दी आहे हे तो जाणून होता. राजीव शी लग्न करण्याचा तिच्या निर्णयाला तिच्या आई वडिलांनी जेव्हा विरोध केला. तेव्हा त्याच्या शी लग्न करण्याच्या निर्णायावर ती ठाम होती. तिच्या आई वडिलांशी भांडून तीने राजीव शी लग्न केलं होतं. राजीव ला माहिती होतं की. आता ती आपलं काहीच ऐकणार नाही.
लग्न झालं तेव्हापासून येणाऱ्या प्रत्येक संकटात ती राजीव च्या पाठी ठाम उभी राहिली होती.‌राजीव ला ते आठवलं. कितीही मोठा प्रॉब्लेम आला तरी ती नेहमी मला धीर देत सगळं काही ठिक होईल अस़ं नेहमी म्हणत नेहमी मला मोटीवेट करायची.राजीव मनातल्या मनात बोलत होता . त्यामुळे त्याला हे माहिती होतं की, आता काही मीरा मागे हटणार नाही.
मीरा पण लगेचच आपल्या कामाच्या मागे लागली. मुलाने तिच्या एरियात कोणकोणत्या जीम आहेत हे गुगलवर शोधून काढले.‌तिच्याच कॉम्प्लेक्समध्ये च एक जीम होती. मीरा तिथे गेली सगळी चौकशी केली.‌ फिस किती आणि कशी भरायची ते विचारले . टाईम अॅडजस्ट करून घेतला‌. मग रागिणी ला फोन केला.

मीरा," हॅलो रागिणी, तुला वेळ आहे का ग संध्याकाळी? मला जीम साठी कपडे घ्यायचे आहेत. "

रागिणी," आज खूप काम आहे गं पण मी ट्राय करते. "

मीरा," अगं अगं मी सहजच विचारलं म्हटलं तुला वेळ असेल तर दोघी गेलो असतो . पण ठिक आहे ‌ग. मी जाऊन येईन. "

रागिणी,"सॉरी यार."

मीरा ," इटस् ओके"

ती मॉलमध्ये गेली‌. जीमचे कपडे ट्रॅक सूट ,जीमसाठी शूज खरेदी केले. का कोण जाणे पण आज तिला खूप काॅन्फिडन्ट वाटत होते. घरी येऊन तीने आणलेले कपडे घालून बघितले. जीमच्या कपड्यात ती स्थूल दिसत होती. सोसायटीतल्या बायका हसतील. असे तिला मनातल्या मनात वाटत होतं. पण बारीक व्हायचे आहे तर लाजून चालणार नाही. आता आपण ठरवलं आहे ना तर आता आपण माघार घ्यायची नाही.
कोणी कितीही बोललं,हसले तरी आपण अजिबात पाठी फिरायचे नाही.निकमताईंचा फोन आला . कामवाली बाई साठी त्यांनी फोन‌ केला होता. त्यांच्याकडे येणाऱ्या कामवाली ची बहिण होती. तिचा नवरा मेला होता. ती विनापाश बाई होती. तिला पण नोकरी ची गरज होती. उद्या ती मीराला भेटायला येणार होती. पण मीराने तिला संध्याकाळी च यायाला‌ सांगितले.
संध्याकाळी त्या आल्या. निकमताईंची कामवाली पण आली होती. मुलाने त्या दोघींना बसवले. त्या बाईंनी मीराला‌ नमस्कार केला. निकमताईंची कामवाली संध्या बोलत होती. मॅडम तुम्हांला पुर्णवेळ कामवाली हवी होती ना. निकमताईंनी पाठवलं आहे. ही माझी बहीण आहे अशा, हिलाच तुमच्या कडे कामासाठी पाठवलं आहे.

मीरा," ताई तुमचं नाव सांगाल मला? "
आशा," नमस्ते मी आशा‌ जाधव."
मीरा," मुद्दा च बोलुयात .मला पूर्णवेळ. घरकाम करण्यासाठी बाई हवी आहे.‌तुम्हाला सगळं करावं लागेल. आम्ही चौघे च असतो . जेवण,भांडी ,कपडे मशीनला लावायचे असतात ,लादी मॉपने पुसायची असते.महिन्यातून एकदा पुर्ण घराची साफसफाई असं कामं असतं. जमेल का तुम्हाला. १५ हजार पगार जेवण, राहणं सगळं इथेच चालेल‌ का?

आशा," हो चालेल मला ताई मी सगळं आपलं घर समजून करेन. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका."

आशाताई पटकन‌ हो म्हणल्या याचं खरतर मीरा ला आश्चर्य वाटले. पण त्या हो म्हणाल्या म्हणून तिचं अर्धं टेन्शन कमी झालं . मीरा ने त्यांना दुसऱ्या दिवशी पासून यायला सांगितले. येताना आधार कार्ड ची झेरॉक्स त्यांचा एक पासपोर्ट साईज फोटो , त्यांच्या बहिणीच्या आधार कार्डची झेरॉक्स, तीचा फोटो आणि नंबर आणायला सांगितले.
"चला बरं झालं दोन गोष्टी मार्गी लागल्या.‌"मीरा मनातल्या मनात म्हणाली.
आता मुलांसाठी टिचर आणि स्टुडिओ च काम बाकी होतं‌. स्टूडइआओच काम पुढच्या महिन्यात चालू होणार होतं. पण त्याची तयारी करायची होती. रागिणी च सगळं इंटिरिअर च काम बघणार होती. त्यामुळे ते टेन्शन कमी होतं. मुलं आज येणार होती. राजीव येता येता त्यांना घेऊन येणार होता‌ . मुलांसाठी तीने चीज टोस्ट ची तयारी केली. स्वतः: व्यवस्थित तयारी केली आणि मुलांची वाट बघू लागली.
ती खिडकीतून खाली वाकत त्यांची वाट बघत होती.इतकयात तिला गेटमधून गाडी येताना दिसली.तशी दरवाजा उघडून ती त्यांची वाट बघू लागली.मुलं आल्या आल्या मम्मा मम्मा करत तिला बिलगली.‌तिने ही दोघांना मिठीत घेतले.‌दोघेही खुप खुश ‌दिसत होते.

हा भाग तुम्हाला कसा वाटला ते तुमच्या प्रतिक्रियेतून नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाच्या आहेत.


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED