पुन्हा नव्याने - 3 Shalaka Bhojane द्वारा महिला विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पुन्हा नव्याने - 3

उ़ भाग ३
मीराने राजीव ला विचारले की," माझं असं काय चुकलं ते सांग? "
राजीव, " मीरा माझ्या वाईट काळात तू माझ्या पाठिशी खंबीर पणे उभी राहायची स , माझ्या आईवडिलांना तू स्वतः चे आई वडील समजून वाटायची, आणि बाकी पण बरचं काही तू केले आहेस. माझं वागणं चुकलं मी मान्य करतो. मी माझ्या बिझनेस सेटप मध्ये बिझी झालो. तु घरामध्ये बिझी झालीस. आपण जवळ असून पण कधी लांब गेलो कळलचं नाही.

मीरा, " राजीव मी आपल्या च संसारात बिझी होते ना रे. मला तर असं कधीच जाणवलं नाही. तु जे कारण देतो आहेस ना ते मला अजिबात पटलं नाही. माझ्या लक्षात आलं नाही रे कधी. मी समजत होते की, तू ऑफिस च्या कामानिमित्त कुठे गेला असशील. मला काय माहित तुझे काय चाळे चालू आहे त ते."

राजीव ," मीरा प्लीज मला समजून घे. "

खरतर मीराला काही सुचतच नव्हतं. काय करायचं ते?

मीरा," कसं समजून घेऊ‌ तुला राजीव? तुला असं अचानक ‌एका मुलीबरोबर समोर बघून माझ्या मनाला किती यातना झाल्या ‌असतील याची तू कल्पना पण नाही करु शकत. मला वाटायचं माझा नवरा कामानिमित्त बाहेर जातोय. बिचारा किती कष्ट करतोय आमच्यासाठी , त्यामुळे फॅमिली बरोबर ‌राहता येत नाही. याची मला खंत वाटायची.पण मला कुठे माहित होते, तुम्हाला या फॅमिलीचाच कंटाळा आला आहे . तुम्हाला आम्ही नकोत की फक्त मीच नको आहे. राजीव."

राजीव," असं काही च नाही आहे मीरा.तू उगीच पराचा कावळा करते आहेस."

मीरा,"याचा अर्थ असा होतो की तुम्ही जे वागताहात त्या गोष्टीचं तुम्ही समर्थन करता आहात.तुम्ही माफी मागायचं नाटक करत आहात. "

राजीव," असं काही च नाही आहे मीरा.‌खरचं मी मनापासून तुझी माफी‌ मागतो.मीरा प्लीज माझं ऐकून घे.माझं तुझ्यावर खरचं खुप प्रेम आहे.‌"

मीरा काही ऐकून‌ घेण्याच्या मनस्थितीत नव्हती ‌. ती रडत बसली होती.‌राजीव ला समजत नव्हते तिला कसे समजवावे.राजीव च्या ऑफिस मधुन कॉल आला. त्याला जाणे गरजेचे होते म्हणून तो ऑफिस ला निघून गेला.मुलं उद्या येणार होती. मीरा तशीच बसून राहिली तिला खरतर काही च सुचत नव्हतं. इतक्यात रागिणी आली. रागिणी ला बघून मीरा जास्त च रडायला लागली. रागिणी ने तिला‌ अजिबात थांबवलं ‌नाही. मीरा थोडावेळ रडली. मग शांत झाली.
रागिणी येताना‌ पिझ्झा घेऊन आली होती दोघांसाठी . मीराचं आवडतं आईस्क्रीम ‌ घेऊन ‌आली होती . मीरा ते सगळे बघून तिच्याकडे बघतच बसली.

मीरा," रागिणी हे काय आहे? "

रागिणी," मीरा आधी तू शांत हो . अजून रडायचं आहे का तुला तर रडून घे आताचं. "

मीरा," रागिणी तू काय बोलते आहेस ? तुला कळतं का? तुझी मैत्रीण इतक्या मोठ्या संकंटात सापडली आहे आणि इतकी दुखी आहे आणि तू कशी‌ वागते आहेस? तुला कळतंय का? "

रागिणी," मीरा झालं तुझं. आता माझं ऐक . काय निर्णय घेतला आहेस तू? काय ठरवलं आहेस?

मीरा," कशाबद्दल बोलते आहेस?"

रागिणी," तुझ्याबद्दल च बोलते आहे. काय निर्णय घेतला आहेस नवऱ्याला सोडुन देणार आहेस, की, डिव्होर्स देणार आहेस की अशीच रडत बसणार आहेस.?"

मीरा," रागिणी काय बोलते आहेस तू? "

रागिणी," मीरा जरा डोकं शांत ठेवून एक मी काय सांगते ते?"

.मीरा, " ठिक आहे बोल."

रागिणी," मीरा तू राजीव ला डिव्होर्स देणार आहे स का?"

मीरा," नाही देणार मी. मुलाचं काय? त्यांची काय चुक आहे या सगळ्यात."

रागिणी, " मग तुझी तरी काय चुक आहे.‌ या सगळ्यात.‌"

मीरा विचार करू‌‌ लागली.

रागिणी," अशी किती दिवस रडत बसणार आहेस तु? रोज उठून रडत बसणार आहेस का? मुलांना काय सांगशील ‌का रडते आहेस ? "
मीरा विचार करू लागली.
रागिणी," नाही ना? मग एवढा त्रास कशाला‌‌ करून‌ घेते आहेस.‌मुळात तू स्वताला‌ त्रास का करुन‌घेत आहेस. यात तुझी काहीच चूक नाही.आहे.मीरा माझं ऐकशील‌ , आता तरी स्वतः चा विचार ‌कर., स्वतः: च्या आवडीच्या गोष्टी ‌कर स्वतः ‌साठी जग.तु एवढा हौसेने उभारलेला संसार ,कोण्या दुसऱ्या स्त्रीमुळे म़ोडावास असं मला‌ अजिबात वाटत नाही. मीरा मी हे सिरीयसली बोलते आहे. असं रडत बसू नकोस.ऊठ स्वतः ‌कडे‌ बघ ‌आणि‌ स्वतः बदल. राजीव ल पण पश्चातप झाला पाहिजे एवढा स्वतः ला बदल.

मीरा विचार करू लागली.

मीरा काय निर्णय घेते बघुया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला ते आपल्या प्रतिक्रिये मधून नक्की सांगा.