मल्ल प्रेमयुद्ध
तेजश्री विचार करत होती. संग्रामला हे सांगितले तर त्याला काय वाटल तो परत लताबाईकड गेला तर...? मला वाटतय की नको सांगायला न्हायतर परत मगच दिस पुढं... तेवढ्यात वीर आला... वहिनी बोलावलं व्हय मला...
"भाऊजी घाई न्हाय ना??? मला बोलयचंय व्हत तुमच्याशी..." तेजश्री
"वहिनी मी क्रांतीला भेटायला निघालोय... आपण आल्यावर बोलायचं का?" वीर
"चाललं..." तेजश्री एकदम शांत होते.
"वहिनी काय काळजीच हाय का?
"व्हय तस हाय पण तुम्ही भेटून या मग आपण बोलू..." तेजश्री
"न्हाय क्रांतीला सांगतो उद्या भेटू... तुम्ही आत्ता बोला..." वीर खिशातून मोबाईल काढला.
"असाही हे घरात हायत त्यामुळं आपल्याला नीट बोलता येणार न्हाय तुम्ही भेटून या मग आपण बोलू..." तेजश्री
"वहिनी काहीही असलं तरी मी कायम तुमच्या बरोबर हाय... मी जाऊन येतो संध्याकाळी दादा भायर जाणार हाय आपण बोलू..." वीरला क्रांतीला भेटायची ओढ होतीच पण वहिनीला टेन्शनमध्ये बघून त्याला जावसं वाटत नव्हतं. संग्राम घरात असल्यामुळे त्यांना बोलता येणार नव्हते हे पण तितकेच खरे होते. त्याने गाडी काढली आणि क्रांतीला घ्यायला गेला.
दारातून गाडीचा हॉर्न दिला. दादा, आशा आणि चिनू भायर आले.
"पावन आत तरी या..." दादांनी विनंती केली.
"न्हाय आत्ता आमी भायर जाऊन येतो मग येताना येतो. तेवढ्यात क्रांती आली. लाईट एल्लो कलरच्या ड्रेसमध्ये ती आज काहीशी वेगळी दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर आनंद, भीती, उत्साह, काळजी होती. बाकी सगळ्यांना यीची अवस्था माहिती होती. वीरला पुढे जे होणार व्हत ते म्हाइत नव्हतं. वीरच्या बाजूला ती बसली. दोघे निघून गेले. आशाच्या डोळ्यात पाणी आले.
"आता रडायला काय झालं? दादा
"आव बघितलं कशी भुर्रकन गेली नवऱ्याबरं साधा हात पण केला न्हाय... अशीच जाईल एक महिन्यात... तवा रडत का???" आशा पदरान डोळ पुसत म्हणाली.
"आई आग कशाला रडती तुलाच घाई व्हती ना तीच लग्न करायची मग आता हात न्हाय केला म्हणून उगाच रडती." चिनू म्हणाली
"तीच वाईट व्हणारे का? जव आय व्हाशील ना ताव कळलं तुला आत्ता न्हाय... लग्न योग्य वयात व्हायला पाहिले न्हायतर त्या रखमच्या पोरीसारखं आयुष्यभर घरात बसावं लागलं...तीच काय झालं?" आशा फटकन बोलली.
"आई अग काहीपण कस बोलतीस? त्या पोरीची काय चूक हाय का? तिच्या आई बापानं काय कमी स्थळ बघितली का? उगच गावभर त्या पोरीच्या नावाची वाट लावली... मी तिची बहीण असते ना तर म्हणाले असते तुझ्या आयुष्यात जर कोणी असलं तर कर लग्न उगच झुरत बसली. कोणाचा संदर्भ कुणाशी लावायला लागली तू..." चिनू आता चिडली व्हती.
"आशा आग पोरगी कामाला जाती... न्हाय म्हटलं तर घर चालवती बसून हाय व्हय... बाशिंगबळ जड असलं तर तिची काय चूक? अस लेकराला बोलू नये व्हय..." दादा
" आव तस न्हाय कस व्हत की आपण वयात लक्ष दिलं की व्हत येळला पण पोरगी कमावती, घर चालवता महान तिच्या आय बापानं काय लक्ष दिलं न्हाय..." आशा
"व्हय मग त्या पोरीला काशलडोह देताय.. तिची थोडीच क्सहुक हाय..." चिनू रागात आत गेली.
"बघा ह्या पोरीचं लवकर उरकायला पाहिजे आतापसन कशी बोलती बघितलं ना??" आशा
"आशा आग तू बोलतीस म्हणून ती बोलती तिचुकताच न्हाय..." दादा
"घेतली पोरीची बाजू..." आशा चिडून गेली.
"राम कृष्ण हरी..." दादा खाटेवर शांत बसले.
वीरने एका पठारावर गाडी थांबवली. एवढी सुंदर जागा बघून क्रांतीला काय बोलावे सुचत नव्हतं..
"मी लय आनंदी असलो किंवा लय दुःखात असलो की इथं येवून बसतो. माझी खास जागा हाय ही... अन माझ्या आयुष्यात येणाऱ्या माझ्या अर्धांगिनीला सुद्धा हे म्हाइत असावं. मंजी अजून तसा होकार न्हाय मिळाला तुझा पण तरीसुद्धा मला वाटतं माझ्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हाइत असाव्या." वीर
"ही जागा आमच्या गावापासून इतक्या जवळ हाय तरी मला कशी म्हाइत न्हाय... किती भारी वाटतय वीर सांगू नाही शकत. खरंतर निसर्गाच्या कुशीत स्वर्ग हाय ते काय खोत न्हाय... कशाला मन मोकळं करायला कुणाची गरज हाय..." क्रांती भावुक होऊन बोलत व्हती.
" क्रांती इथं बसा बाग आजूबाजूला वसलेल्या वस्त्या, गाव कशी भारी दिसत्यात... एवढी मोठी असणारी गाव लुकुकत्यात... गाड्या मुंगीवानी दिसत्यात. मज्जा वाटतय सगळं बघायला. थकवा लांब पळतो, आनंद व्यक्त करता येतो इथं..." वीर आणि क्रांती एक मोठ्या दगडावर जाऊन बसले जिथून सगळं दिसत व्हत. क्रांतीला सगळ्या गोष्टींचा विसर पडला व्हता. ती डोळ भरून सगळं बघत व्हती.
"क्रांती तुमास्नी काय बोकायच व्हत???" वीरने विचारलं क्रांती एकदम जागेवर आली. ती थेट मुद्द्यावर आली.
"वीर मला शहरात जायचंय कोचिंग लावायला. कुस्तीसाठी मला आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळायचं त्यासाठी मला आणखी प्रॅक्टिसची गरज हाय पण लग्नाला थोडे दिवस उरलेत आणि लग्नानंतर पण मला तिकडंच काय दिवस काढावं लागत्याल." क्रांती भावनिक बोलत व्हती.
" म्हंजी आता तुम्ही लग्नाला तयार झालाय?" वीर
" न्हाय अजून तसा इचार न्हाय केला पण जर केला तर तुमास्नी ह्या गोष्टी ऍडजस्ट कराव्या लागत्याल." क्रांती स्पष्ट बोलली.
"कुठं जायचं ठरलंय?" वीर
"अजून काय ठरलं न्हाय आधी तुमच्याशी बोलावं मग ठरवावं असा इचार केला." क्रांती.
वीर जर वेळ शांत बसला. त्याने थोडा विचार केवळ आणि म्हणाला
"नि आबांशी बोलून लवकरात लवकर सांगतो.पण माझ्या मते तुम्ही जावं नक्किच जावं मी तुम्हाला कधीच अडवणार न्हाय." वीरचेहरे वाक्य ऐकून क्रांतीला आनंद झाला.
"खर सांगू मला वाटतं व्हत तुम्ही न्हाय व्हय म्हणाल किंवा तुमचं मत एवढ्या स्पष्टपणे सांगणार न्हाय पण एक मन सांगत व्हत तुम्ही मला सपोर्ट कराल अन ज म्हणाल..." क्रांतीच्या डोळ्यात वीरविषयी विश्वास दिसला.पण हे कितप5 पुढे सध्या व्हणारे हे वीरलासुद्धा माहीत नव्हतं. आबाचा विचार सतत डोक्यात येत व्हता.
ज्या माणसानं आयुष्यात पाटलांच्या सूना लेकिना उंबरा ओलांडून दिला न्हाय तो आता क्रांतीला खेळू देणार..?
"वीर...वीर कसला इचार करताय?" क्रांती
" न्हाय मी तुमला लवकर सांगीन..." वीर
क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत