खौफ की रात - भाग १ jay zom द्वारा भयपट गोष्टी मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

खौफ की रात - भाग १

॥ कोहराम ..कब्रस्तान ...॥

भाग 1 ...

लेखक: जयेश झोमटे..--------------------------

1970 ...

" अर ए बाबा ! तिकडून कुठून चाललास?"
रात्रीच्या वेळेस जंगलातून अंधा-या कालोखातून धाऊ - आणि त्याचा लाडका मित्र किसना
घरच्या वाटेने चालत होते ..

तेव्हाच .धाऊ आप्ल्या मित्राला म्हंणजेच किसन्याला म्हणाला होता..

त्याच्या वाक्यावर किसन्याने धाऊकडे पाहील..

" काय .र ....? असं काय हाय तिकड?"

किसन्याने न समजल्या सारख राहून विचारल .

तस धाऊने गुढ भाव चेह-यावर ठेवत एक नजर अंधारात चौही दिशेला टाकली..


" अरे ती काजळ वाट त्या कब्रस्तानातुन जाते !"

धाऊच्या मुखातुन कब्रस्तान नाव ऐकताच किसन्याचे डोळे विस्फारले.

त्याच्याकाळ्या चेह-यावर भयप्रद्य भाव पसरलेले दिसत होते..

" आ..आ..आर त्यो..त्योच..कब्रस्तान का रे ?"
बोलतांना त्याची चांगलीच बोबडी वळली होती.

रातकिड्यांची किरकीर , आजुबाजुच्या अंधारातून येणारे अजुन खुपसारे एकक्षण थांबले होते..


" व्हय त्योच त्यो ..कोहराम कब्रस्तान! जिथ मौत बी थर -थर काफते, मेलेल्या मांणसाची आत्मा बी बाहेर पडत नाय, तेराव्याला कावळा बी शिवत नाय..

त्या इंग्रज हराम जाद्यांनी काय पुरलय काय माहीती तिथं , अशी मौत मिळती ना लेका ! की आत्मा बी थरथर काफतो!

धाऊ आपल्या हातातली काठी आणि डोक पुढ झुकवत हळक्याच स्वरात म्हणाला.

त्याचा एक नी एक भीतीमय शब्द अंगावफ
थरथराट, शहारे आणत होते.

कानाची कानसुळे झटक्यात गरम होऊन किसन्याच काळिज धडधडू लागल होत..


मित्रांनो हे आहेत धाऊ आणि किसन्या , गाळपुर गावातले रहीवासी.

दोघांची ही परिस्थिती गरीबीची दिवसभर काम करायच ,

नी रात्री जेवणासाठी जंगलातून लाकड गोळा करुन आणायची, त्याकाळी गैस नव्हती ना! आजही रोजच्या प्रमाणे हे दोघे कामावरुन आल्यावर लाकडांकरीता जंगलात आलेले.

परंतु आज जरा जास्तच ऊशीर झाला होता. जास्त वेळ झाल असल्याने म्हणुनच किसन्याने शोर्ट कट रस्ता वापरायच ठरवल, जेणे करून ते लवकर घरी पोहचतील.परंतु त्याला हे ठावुक नव्हत, की तो रस्ता एका सैतानाच्या मुखात घेऊन जातो ,कोहराम कब्रस्ताना जवळून घेऊन जातो.

" अर ! बापरे मंग नको तो रस्ता! येळ झाली तरी चालल पण जीव

प्यारा हाय..!"

किसन्या पुन्हा आवंढा गिळून म्हणाला.

त्या दोघांच्याही आजुबाजूला घनदाट हिरव्याजर्द झाडांच जंगल होत!

झाडांनी असलेली हिरवी पाने हवेने सळसळत होती.

रात्र असल्याने जंगलातली झाड विष फासल्यासारखी काली-निळी पडल्यासारखी दिसत होती .

जंगलातल्या मोठमोठ्या झाडांच्या फांद्यांमधुन चंद्र भुतासारखा डोकावुन पाहत होता

.त्या च्ंदेरी रात्रीत जंगलातुन कोल्ह्यांचा , तर कधी कोण्या जंगली श्वापदांचा भेसूर आवाज ऐकू येत होता. रा

तकिंडयांची किर्र-किर अभद्र आवाजात किरकिरत होती.

त्या दोघांसमोर जंगलाच्या पायवाटेने तैयार झालेले मातीचे दोन तपकीरी रस्ते दिसुन येत होते.

डावीकडे गाळपुरचा रस्ता होता, तर उजवीकडे गाळपुरची शार्टकट होती.

परंतु ती शार्टकट एका कब्रस्ताना जवळून गेऊन जात होती, ज्याच नाव होत ,कोहराम कब्रस्तान.

" चल किश्या? "

धाऊ किश्याकडे पाहत म्हणाला,

परंतु किश्याने त्याच्या ह्या वाक्याला कसलेही उत्तर दिले नाही,

उलट तो सावधपणे एकटक समोर पाहत थिजल्यासारखा उभा राहीलेला, दोन्ही हात हवेत उंचावले होते .

पोलिस हातवर करा अस म्हंणतात ना ? तसंच. पवित्रा धाऊने घेतला होता.

" आर काय झाल..?"

धाऊने आपल वाक्य पुर्ण करताक्षणीच त्याच्या दोन्ही कानांवर एक आवाज पडला,

जंगली श्वापादाच्या गुरगूरण्याचा आवाज .

तो आवाज ऐकुन धाऊचे दोन्ही डोळे भयाने नटून गेले, चेहरा पांढरा पडला.

घश्याला कोरड आली. त्या कोरड्या घशानेच

धाऊने एक आवंढा गिळला.

आणी हळुच मागे-मागे वळून पाहायला सुरुवात केली.

मित्रांनो त्याकाळी जंगल खुपच घनदाट असायच.

झाड तोड होत असे, परंतु आताच्या युगाप्रमाणे नव्हे.

म्हंणजेच मोठ-मोठ्या बिल्डींगस वगेरे उभारण्याकरीता झाडांना मुळापासुन तोडण्यासारख, जंगल जाळुन टाकण इत्यादी!

त्याकाळी घनदाट जंगल असल्याने आणि जंगल तोड कमी प्रमाणात होत असल्याने,

जंगलातले सर्व प्राणी पशु चांगले वाईट जसे की पुढीलप्रमाणे सिंह, वाघ, कोल्हे, लांडगे, अस्व्,

इत्यादी हिंस्त्र प्राणी अक्षरक्ष मणुष्य वस्तीत येऊन शिकार करण्याची हिम्मत ठेवत असतं.

त्याचप्रमाणे जंगलात जातावेळेस कोणत्याहीक्षणी हिंस्त्रप्राण्यांच दर्शन घडत असे.

आणि आज आता ह्याक्षणी तिच परिस्थीती ह्या दोघांवर ओढावलेली.

धाऊच्या पाठीपासुन ते डोक्यापर्यंतच्या भागाची हालचाल व्हायला सुरुवात झाली होती.

धाऊ स्व्त:हुन आपल्या मृत्युच्या मुखात उडी घेण्यासाठी उतावळा झालेला की काय?

किश्याला हे ठावुक होत. की जो पर्यंत आपण आप्ल्या शरीराची हालचाल करत नाही,

तो पर्यंत मागुन आलेली ब्याद आप्ल्यावर हल्ला चढवणार नाही !

किश्या डोळ्यांनीच धाऊ ला आप्ल्या मित्राला मागे न पाहण्याची खुण करत होता,

परंतु त्याच लक्ष मात्र किश्याकडे नव्हतं. धाऊच्या अंगाला काफर भरलं होतं, 120 च्या फणफणलेल्या रोग्यासारख शरीर थरथरत होत.

कपाळावरुन भीतीचा ओघळता द्रव बिंदू भीतीची गणना दर्शवत होता.

मागुन गुरगूरण्याचा आवाज वाढू लागलेला, नी त्या गुरगुरण्याच्या आवाजासहित छातीतले ठोके ढोल बदडावे तशे बदडत होते,

नी तो आवाज कानांत घुमत होता.

शेवटी धाऊने न राहून मागे वळुन पाहिल.

त्याच पुर्णत शरीर मागच्या मागे फिरल, नी पुढच्या आंतिम क्षणाला धाऊच्या दोन्ही विस्फारलेल्या डोळ्यांत एका काळ्या चित्याची( ब्लैक पेंथर ) ची हवेत झेप घेतलेली काया दिसुन आली,

त्या काळ्या चित्याच्या हवेत झेप घेतलेल्या अवस्थेत जबडा वासला होता, ज्यामधुन त्याचे ते रक्तपिपासु धार-धार पिवळे दात दिसुन आले जे कोणत्याही क्षणी धाऊच्या नरडीत घुसणार होते. त्याच्या त्या दोन पिवळेजर्द डोळ्यांच्या कडा चंद्राच्या उजेडात चमकुन उठत लकाकतहोत्या, आणी त्याच ते हिंस्त्र रुप आतीभयान भासवत होत्या. हे असल ध्यान पाहुन पुढच्याक्षणाला धाऊच्या मुखातुन किंकाळी निघणार की तेवढ्याफ एक काल झडप त्या काळ्या चित्त्याने धाऊच्या अंगावर घेतली, धाऊ खाली जमिनीवर कोसळला आणी त्याच्या छाताडावर दोन्ही पाय ठेवत त्या काळ्या चित्त्याने आपले दोन्ही सुल्यासारखे दात धाऊच्या मनगटात घुसवले , मानेजवळ असलेल्या रक्तनटीकेला फाडुन त्या ब्लैक पेंथरचे दोन टोस्कूले दात रक्त लुचू लागले. गरम -गरम रक्ताचा वास आजूबाजूला पसरु लागला. धाउचे दोन्ही हात पाय पाण्यात डुबणा-या मांणसासारखे हालत होते.जीव जो पर्यंत देहात असणार होता तो पर्यंत ते तसंच झाडले जाणार होते

क्रमश :

कोहराम कब्रस्तान पुन्हा एकदा नव्या रूपात , नव्या भीतीत ..आणि नव्या शैलीत तुम्हासर्वाँसमोर सादर आहे.