Kouff ki Raat - 14 books and stories free download online pdf in Marathi

खौफ की रात - भाग १४

भाग 14

लेखक -जयेश झोमटे



महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्वकाही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी

फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत🙏

ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह मेसेज आणि वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल!

सदर कथेत शुद्धलेखनाच्या चुका असू शकतात तर कृपया करून लेखकास समजून घ्या !

लेखक चुका सुधारण्याचा प्रयत्न करत आहे ..

धन्यवाद..

कथा सुरु

कैमेरा एंगलखाली..

एक लालसर रंगाचा आणी चौकोनी आकाराचा टेबल दिसत होता.

टेबलावर एक स्टीलचा जग , आणी तीन दारूच्या बाटल्या, चकणा म्हंणून चिकन करी दिसत होती.

टेबलाच्या बाजुलाच आता तीन खुर्च्या दिसू लागल्या , त्या तीन खुर्च्यांवर तीन तरून मुल बसली होती.

निळचंद्र उर्फ निळ्या , बाजुलाच अमोल होता - आणी त्या दोघांपुढे सोपान बसलेला.

काहीवेळा अगोदर सुखाने फुललेले त्यांचे चेहरे आता कोमजले होते..

तिघांचेही चेहरे सुतक लागल्यासारखे झाले होते. चेह-यावर कोणतेच भाव नव्हते.

" सोप्पान खरच पैसे नाहीत का ? अरे बघ ना एकदा चेक करून पाकिट असल पेंटमध्ये."
अमोल खालच्या आवाजात म्हंणाला.

कोणाला ऐकायला जायला नको ह्या हेतूने..

" अरे खरच नाहीयेरे पेंटमध्ये पाकिट , दहावेळा बघुन झालंय ! " सोपान जरा त्रासिक सुरात म्हंणाला.

" मग आता काय करायचं रे ? भांडी घासायची का ? "

"नाही ! मी नाय घासणार भांडी , माझ्या बापाची ईज्जत जाईल ! हसतील मला सगळी, लग्नाला कोण पोर नाही देणार मला !"

सोपानच्या वाक्यावर अमोलने होकारार्थी मान हलवली.

" बरोबर आहे , माझ्या पप्पांची पन ईज्जत जाईल !" अमोलने सोपानच्या वाक्याला दूजोरा दिला.

" मग आता ज्याच्या बापाची ईज्जत नाही जाणार असा कोण आहे आपल्यात ? जो भांडी घासू शकतो !" सोपान - अमोल दोघांनी एकमेकांच्या चेह-याकडे पाहील..आणि भुवया उडवले आणि गर्रकन मान निळ्याकडे वळवल्या..

जो की केव्हापासून ह्या दोघांच बोलण ऐकत होता.

त्या दोघांनीही दात विचकत हसत निळ्याकडे पाहिल..तसा तो प्रथम गोंधळला..मग जरा धीर आल्यावर पटकन म्हंणाला.

" म...म्म...मी..! हाट .!"
निल्या .. जरासा खवळला..आणि पुढे बोलू लागला.

" मला माहिती आहे , की माझ्या बापाला माझी फिकिर नाही ! पन माझी आई !"

निल्याने वर पाहिल , वर आकाशातले काळे ढग दिसत होते. निळ्याची आई ह्या जगात नव्हती म्हंणूनच त्याने वर पाहिल होत !

" माझी आई मला वरून बघत असेल ना ? तिची सर्गात ईज्जत नाही जाणार का ? मग मी कस काय भांडी घासू?"

निल्याच्या वाक्यावर सोपान - अमोल दोघांनी एकमेकांच्या थोबाडाकडे पाहिलं.

" बरोबर आहे !" अमोल म्हंणाला.
(पागल कुठचे)

" अरे मग आता करायचं काय म? पैसे नाय दिले तर हॉटेलवाला भांडी घासायलाच लावेल ना ? तो काय ओळखीचा आहे व्हय आपल्या !" सोपान ...

" आईडीया !" अमोलने टिचकी वाजवली, हसतांना त्याचे सश्यासारखे दात बाहेर आले होते.

" आपण इथून पळून जायचं!"

" ह्या ..काय पन , तिघेजण एकसाथ गेल्यावर त्या हॉटेलवाल्याला समजणार नाय का ?"

सोपानने अमोलची आईडीया धुडकाऊन लावली ... परंतू अमोल फुलफॉर्म मध्ये होता.

" मी एकसाथ जायच म्हंणत नाहीये , माझ प्लान तर ऐक अधी !"

सोपान - निळ्या दोघांनी एकसाथ होकार दर्शवला.
तसा अमोल प्लान सांगू लागला.

" सगळ्यात अगोदर मी गाडीजवळ जाईल!"

" ए अमोल गाडी मी चालवणार आहे मग तु कस अगोदर जाशील !" सोपान .

" बर बाबा तू आधी जा खुष !"
अमोलने कसतरीच सोपानकडे पाहिल..
सोपान जाम खुश झाला होता .
पन मध्येच निळ्या म्हंणाला .

" अरे अगोदर मी जातो, कारण ऑर्डर सोपानने दिले ना ? आणी जर त्या वेटरने सोपानला पहिले जाताना पाहील तर त्याला शक नाही येणार का ? आणी गाडी सुद्धा मी चालवतो. "
निळ्याच बोलण बरोबर होत .
" ही घे !" सोपानने गाडीची चावी निल्याला दिली.

निळ्याने ती हाती घेतली.

" ठीके निळ्या आधी गाडीवर जाऊन बसणार ! "
त्यानंतर दुसरा नंबर माझा असेल ! " अमोल ने सोपानकडे पाहिल .

"आम्ही दोघे गाडीवर बसलेलो असू ! आणी तू हॉटेल मालकाशी बोलायच नाटक कर, ईकड निळ्या जशी गाडीला कीक मारील तस तू लागलीच पटकन गाडीच्या दिशेने धावत ये , आणी मग भुर्र्र्र्र ...."

अमोलची युक्ति त्या दोघांनाही आवडली होती.

" वा अम्या वा , काय डोक लावलय ! " निळ्याने अमोलची पाठ थोपटली.

" हा हा चला प्लान सुरु करा !" अमोल पटकन म्हंणाला.

प्लान ठरल्या प्रमाणे सुरु झाला.

टेबलावरून प्रथम निळ्या उठला ..

शिटी वाजवत तो हॉटेल बाहेर जाऊ लागला.
बाजुला तोच वेटर उभा होता..जो निळ्याला जाताना पाहत होता.

" ए पोरा? बिल कोण देणारे ?"
तो वेटर निळ्याकडे पाहत म्हंणाला.

निळ्या जागेवर थांबला.

" मित्र देतील ,मित्र !"

" कुठ आहेत तुझ मित्र ?"

" ते काय तिथ बसल्यात !"
निळ्याने सोपान - अमोल बसलेल्या जागेकडे बोट दाखवल.

तसा वेटरने एक कटाक्ष त्या दोघांवर टाकला..तसे दोघेही दात दाखवत हसले.

" हा ठीके !" तो वेटर म्हंणाला.

" हुश्श्श!" निळ्याने एक सुटकेचा उसासा सोडला.

आणी दोघांनाही अंगठा दाखवत थंब्सअप केल.
निळ्या गाडीजवळ पोहचला, एक ढेंग टाकुन त्याने ड्राइव्हींगचा ताबा घेतला, चावी गाडी लावली.


ईकडे अमोल उभा राहीला ,
'" चल सोप्पान ऑल द बेस्ट ! " अमोलने सोपानशी हात मिळवल . बोलतांना त्याचा स्वर जड झाला , डोळ्यांतून अश्रु बाहेर आले..

" ईज्जत राख आपल्या दोस्तीची , भांडी नाय घासायची आपल्याला. " दोघांनीही एकमेकांची गळाभेट घेतली जस की कोण्या युद्धावर चालले असावेत. काय द्रुश्य सुरु होत!

" टेंशन नॉट भाई मी आहे ना , आहे न मी !"
सोपानने आपल्या दोन्ही हातांनी अमोलच तोंड धरल होत.

' पी...पीप !' गाडीवर बसलेल्या निळचंद्रने हॉर्न वाजवल होत.

अचानक आलेल्या गाडीच्या हॉर्नच्या आवाजाने ह्या दोघांची नौटंकी थांबली होती.

अमोलने सोप्पानच निरोप घेतल..आणी तोही गाडीचा दिशेने निघाला.

मध्येच चालताना त्याने एक चोरटा कटाक्ष
डाव्या ब्जुला टाकल !

तो वेटर तिथेच उभा होता - अमोलकडेच पाहत होता.

दोघांचीनजरा नजर झाली तसा अमोलने पटकन पुढे पाहिल..

जोर जोरात पावळ उचलत तो ही गाडीपाशी पोहचला , एक ढेंग टाकून निळ्याच्या मागे बसला.

निळ्या- अमोल दोघेही टार्गेटवर सेफ पोहचले होते.

" हे हनुमान शक्ति दे ! मला माहीती आहे चुकीच काम करतोय आम्ही , आणि तू आमची मदत नाही करणार ! पन मला भांडी नाय घासायची रे , वाटलस तर पाच नारळ फोडील हनूमान मंदिरात तुझ्या , पन
वाचव मला !"

सोपान जागेवरून ऊठला.

तो वेटर आता डोळे बारीक करून सोपानकडेच पाहत होता.

सोपान मात्र त्याच्या नजरेस नजर भिडवू शकत नव्हता -कारण खाली मान घालून तो पुढे पुढे चाल्ला होता.



" ही पोर जरा चालूच वाटत्यात.. काहीतरी गडबड आहे . ! अन्ना ?"

त्या वेटरने एकदम जोरात हाक मारली ...त्याचा
तो आवाज ऐकून सोपानची पावले जागीच थांबली..

" ए ईकडे रे ?" त्या वेटरने सोपानला
आवाज देत आपल्याकडे बोलावल.

निळ्या-अमोल तिघेही सोपानला त्या वेटरच्या दिशेने चालत जातांना पाहत होते.

" आई शप्पथ वाट लागली! हा सोपान भीतिमुळे काय बोलेल त्यालाच कळणार नाही , जर तो खर बोलना .!"

अमोलच्या वाक्यावर निळ्याने आवंढ़ा गिळला.


वेटरच्या बोलवण्यावर सोपान त्याच्या दिशेने निघाला ...


" बिल दे ! " सोपान जवळ येताच तो वेटर पटकन म्हंणाला.

" बी.....बी..बी..बिल..! " सोपानची दातखीळी बसली.

" हो बिल , मगाशी तर एकदम हिरोसारखा बोलत होता ना- मग आता काय झालं, अस फाटक्या खिशावाल्या भिका-यासारख काहून बोलतो आहेस !"

" मी बोल्लो होतो ? बोललो होतो ना मी ! बिल देणार मी बोललो होतो !"

" हा मग दे ना बिल !"

" दे...दे...देतो ना , मला पळून तर जाऊदे आधी !"

नकळत सोपानच्या तोंडून हे वाक्य निघाल ..तस त्याने पटकन जीभ चावली तोंडावर हाट ठेवला.

" लागले ...पद्धतशीर , निळ्या मार कीक भांडी
घासू दे ह्याला !"
अमोलचा आवाज.

" मला वाटलंच होत, तुम्ही तिघे नालायक आहात -ये अन्ना!" त्या वेटरने पुन्हा हाक मारला..

सोपान एकदम पुतळ्यासारखा उभा होता..त्याच सर्व लक्ष पूढे त्या वेटरकडे होत.

सोपानची भीतिने पावल जमिनीकडे चिकटली होती.

" ये अन्ना ! हा बघ पैशे नाय देत , पळून जातोय !" ह्यावेळेस त्या वेटरच्या वाक्यावर एक घोगरा खर्जातला आवाज आला.

" कोण ? कोण आहे तो हरामखोर !"
त्या आवाजाला एक भयानक धार होती.
तो आवाजच इतका भयानक वाटत होता तर तो माणुस कस असेल?

तो आवाज ऐकून सोपानच्या अंगात थ्ंडी भरली ... दात दातांवर आपटले जात शरीर काफू लागल.

त्या वेटरच्या मागे एक खोली होती , खोलिला दरवाजा नव्हता ...

फक्त एक पाच फुट उंचीची चौकट होती ..

त्याच उघड्या चौकटीच्या दरवाज्यातून एक आडदांड सहा फुट उंचीचा माणूस आपल शरीर खाली झुकवून बाहेर आला ..

सहाफुट उंच , शरीर यष्टीने काठी झालेला , उंची जास्त आणि शरीर काठी असल्याने भयानक दिसत होता तो.- त्यातच त्याचा चेहरा खप्पड होता -चेह-यावर खड्डे पडले होते , डोळे बारिक करड्या रंगाचे होते, डोक्यावरचे केस लांब खांद्यांना स्पर्श करत होते.

त्याच्या अंगावर फुल बाह्यांचा काळा शर्ट, आणी खाली काळ्या रंगाचा पायजमा होता.

हा होता अण्णा - ह्या ढाब्याचा मालक .

" काय रे पोरा ? पैशे नसतांना फुकटच खायला आलाच कसा तू ? पैशे नाहीयेत मग 0 भांडी घास चल ? ए जय-या जा ? ह्याला किचन मध्ये घेऊन जा "

अण्णाने त्या वेटरच नाच घेतल.
अण्णाचा दमदार घोगरा आवाज आजुबाजूला गुंजत होता. .

टेबलावर बसलेले कस्टमर फुकटच शो पाहत होते.

" चल रे ए , दिवसभराची भांडी पडलीयेत , चल घांसून टाक सगळी ." जय-याने सोपानच्या हाताला पकडल .

" भिकार xxट साला...हा हा हा हा हा !"
अण्णा मोठ मोठ्याने हसू लागला... त्याचा तो हसरा आवाज एका दैत्यासारखा वाटत होता.

" याच्या तर आ××ला ! " त्या अण्णाला आपल्या मित्राच अपमान करतांना पाहून निळ्याची पार सटकली होती.

उजव्या पायाची हाळचाल करत त्याने एक कीक मारली..

' भुर्र्ंम...भुर्रम.' विशीष्ट आवाज करत गाडी सुरु झाली.

एकाच क्षणी त्याने दोन गियर शिफ्ट केले..कल्च सोडला .

" निळ्या काय करतोय ?ए निळ्या....?" मागून अमोल ओरड़त होता ..

गाडीची चाक वेगान फिरू लागली..

" पकडून ठेव !"

निळ्या इतकच म्हंणाला.
त्याने एक्सीलेटर पिळल...

मागच्या नळीतून काळसर धुराची वाफ बाहेर पड़त होती..

चेह-यावर रागिट भाव आणत निळ्याने भुवया ताणल्या .

अण्णा , जय-या , आणि सोप्पान पाहता पाहता गाडीने ह्या तिघांपर्य्ंतच अंतर कापल , आणी जस गाडी त्या तिघांपाशी पोहचली.. तसा निळ्याने गाडीच पुढच हेंन्ड़ल गच्च धरल..आणि गाडीची पुढची बाजू वर हवेत उचल्ली...

" आssssss !"

अमोल घसाफाडून ओरडला...

सर्वकाही मंद गतीने घडू लागल..
त्याचा आवाज ऐकून अण्णा, त्याच्या बाजुला खेटून उभा असलेला जय-या आणि त्या दोघांपूढे उभा असलेला सोप्पान तिघांनीही हळूवारपणे ..

त्या आवाजाच्या दिशेने वळून पाहिल...

जय-या आणी अण्णा दोघांच्याही तोँडाचा
आ- वासला ...

कारण पुढून एक टूव्हीलर वेगाने त्यांच्या दिशेने येत होती . .... आणी आश्चर्यकारक गोष्ट अशी की गाडीच पुढच काळ टायर वर हवेत उचल्ल होत..आणि मागच एकच टायर जमिनिवर होत..त्या टायरवरच वेगाने धावत गाडी त्या दोघांच्या दिशेने येत होती...

निळ्याने गाडीच हेंन्ड़ल गच्च पकडल होत..भुवया ताणून तो त्या दोघांकडे पाहत होता...

तर त्याच्या मागे बसलेला अमोल तोंडाचा आ-वासून खुळ्यागत ओरडत होता..

पुढच्याक्षणाला गाडीचा पुढचा टायर अण्णाच्या छातीवर बसला , त्या वेगवान धडकेने तो त्याच्या बाजुला खेटून उभ्या असलेल्या जय-याच्या अंगावर पडला..

अण्णाच वजन जरी कमी असल , तरी त्याची हाईट जास्त होती ना , त्याच्या हाईटने साडेचार फुट उंचीचा जय-या धाड़कन खाली कोसळला..


" आई..आई ...!" जय-या जरासा विव्हळला..
आणी लागलीच त्याच लक्ष पटकन वर गेल..तर त्याला धिप्पाड देहाचा , अणि काठीसारख उंच असलेला राक्षसासारख्या अण्णाची पाठ..आपल्या दिशेने येताना दिसली ...

: आह्ह्ह्ह्ह्ह्ह! त्याने दोन्ही हात पुढे केले आणि तोच तेवढ्यात त्याच्या अंगावर अण्णा कोसळला...

" धप्प ' आवाज करत गाडीच पुढच काळ चाक जमिनीवर आदळल.

सोप्पान एकाच जागेवर बाहुल्यासारख उभ राहून सर्वकाही पाहत होता.

कारण सर्व कस अचानक घडल होत . कसलीच कल्पना नव्हती की अस काही घडेल .


" सोप्पान गाडीवर बस्स!" निळ्या एकदमच ओरड़ला .

त्याच्या आवाजाने सोपान भानावर आला.. त्याने भीतभितच एक कटाक्ष खाली जमिनीवर पडलेल्या अण्णावर टाकला..

" अरे बसना तो उठायच्या अगोदर झाकणझुल्या !" निळ्या खेकसलाच...

तसा होकारार्थी मान हळवत सोपानने सुद्धा एक ढेंग टाकत अमोलच्या मागे आपल बस्तान मांडल.

आजुबाजुची लोक ह्या तिघांकडे पाहत होती..
कहीजण मोबाईलने व्हिडिओ शुट सुद्धा करत होते.

निळ्याने पुन्हा एकदा गाडीला कीक मारली..
इंजीनचा आवाज होत गाडी सुरु झाली..

पिवळ्या रंगाची हेडलाईट पेटली..आणी गाडी वेगाने आजुबाजूला असलेले टेबल खुर्च्यांमधुन वाट काढत जंगलात घुसली.

इकडे

मुंगीच्या अंगावर हत्ती कोसळावा आणि ती भुईसपाट व्हावी तशी अवस्था जय-याची झाली होती ..

उंचपूरा काठीसारखा काळ्या कपड्यातला अण्णा जागेवर उभ राहीला ..डोक्यावरचे केस चेह-यावर आले होते ...

डोक्यावरच्या मोठ्या केसांनी चेहरा झाकला गेला होता. ..पन ते करड्या रंगाचे डोळे मात्र खूनशीपणे ...गाडीच्या लालसर टीपक्याला पुढे पुढे जातांना पाहत होते..

" हरामखोर..सोडणार नाही मी तुम्हाला!"
अण्णा रागीट स्वरात उच्चारला.

क्रमश :

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED