माळीण ते गोसेखुर्द Ankush Shingade द्वारा काहीही मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

माळीण ते गोसेखुर्द

माळीण ते गोसेखुर्द
ही कादंबरी काल्पनिक असून या कादंबरीचा वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही याची नोंद घ्यावी

हळूहळू काळ सरकत चालला होता.विजयाला तिचे गेलेले दिवस आठवत होते. ती आता म्हातारी झाली होती.म्हातारपणाचे दुःख तिला छळत होते. पण आता उपाय नव्हता.
बाहेर पाऊस पडत होता.त्या त्या पावसात तिचं घर पडत चाललं होतं. ढेकळं पावसात खाली कोसळताना दिसत होती. तिला अगदी बेचैन वाटत होतं. धरणीमाता कोपल्यासारखी दृष्ट झाली होती.गावात भुस्खलन झालं होतं. अशा बातम्या तिला आठवत होत्या.
माळीण नावाचं ते गाव.भुस्खलनामध्ये एक गाव गडप झालं होतं.
असाच पाऊस सुरू होता. गावात आणि अचानक दरड खचली व त्या दरडेत गाव गडप झालं. तब्बल आठ दिवस लागले होते.माळीण गावातील मलमा उपसतांना रात्री झोपेत असतानाच ही घटना घडली होती.वाटत होतं की इथे गावच नव्हतं. सकाळी जेव्हा इतर मंडळी उठली. तेव्हा माहिती पडलं होतं. माळीण गावाचा दरडीनं घास घेतला होता. त्यामुळे शारीरिक दुःखापेक्षा मानसिक धक्काही बसला होता. मदतीचा काही ठिकाणं नव्हता.
नासानं या दुर्घटनेची आधीच कल्पना दिली असली तरी गावानं ते ऐकलं नसल्याने आज त्या दुर्घटनेस गावाला सामोरे जावं लागलं होतं.कोणी हळहळत होतं.तर कोणी तंत्रज्ञान असतं तर हे लोक वाचले असते असेही म्हणत होते.
गाव.......अख्खं गाव भूस्खलनात गाडलं जाताच सरकारी यंत्रणा सक्रिय झाल्या. सुन्न मने संततधार आणि मशीन च्या आवाजात माळीणचं खोदकाम सुरू झालं. त्याच बरोबर परिसरात दुर्गंधी पसरू लागली. ढिगा-याखालून एक एक मृतदेह बाहेर पडू लागला.
कोणी जिवंतही बाहेर पडत होता.त्या दूर्गंधीला थांबवण्यासाठी औषध फवारणी सुरू झाली होती.जी जी माणसं जिवंत सापडत होती. त्या माणसांना रुग्णालयात तातडीने पाठवण्यात येत होतं. अंबुलन्स अर्ध्या तासातच माहिती होताच पोहोचल्या होत्या. त्या जिवंत माणसावर तातडीनं उपचार करणं सुरू झालं होतं. त्यातच जे जे मेले होते.त्यांना सरकारें पाच पाच लाख रुपये मंजूर केले होते. काही सामाजिक संघटना सक्रिय झाल्या होत्या. त्याही संघटना या गावच्या मदतीसाठी धावून आल्या होत्या. नव्हे तर येतच होत्या. कोणी पैसाअडका तर कोणी कपडेलत्ते तर कोणी औषधांची मदत करीत होते.तब्बल आठ दिवसानंतर ३१९ मृतदेह बाहेर आले होते.तर कोणी अंदाजही बांधत होते की या भूसखलनात ८० टक्के लोक मरण पावले असतील.पुणे जिल्हा.......या जिल्ह्यात डोंगरांमध्ये वसलेले माळीण गाव ३० जुलै २०१४ ला प्रचंड पावसामुळे दरड कोसळून हे एक गाव गाडलं गेलं.त्यात प्रचंड पावसामुळे दरड कोसळून हे गाव गाडलं गेलं ढिगाऱ्याखाली. त्यात वित्तहानी तसेच मनुष्यहानी झाली. या बातमीने महाराष्ट्रच नाही तर अख्खा देश हादरला. वर्तमानपत्र तसेच काही प्रसार माध्यमातून या घटनेच्या बातम्या पसरल्या.हीे दुर्घटना नैसर्गिक होती. हळूहळू पाहता मृतदेहाची संख्या १०५ झाली होती. मृतदेहाला उपासणे सुरू होते.अशातच एनडीआरएफच्या जवानांमुळे ढिगाऱ्याखालून आठ जण बाहेर पडले. काही जण तर दूर्घटनेमागील कारण शोधण्यात मग्न होते. कोणी म्हणत होते वृक्षतोडीमुळे ही घटना घडली. वृक्ष जास्त तोडले गेल्याने या मातीला जी मूळ धरून ठेवतात. ती मुळं जमिनीत नसल्याने ही दरड खचली. भुस्खलन घडून आज चार वर्ष झाली होती.सरकारने या जुन्नर मधील तळमाचीत लाखो रुपये खर्च केले होते. तरी फारसं माळीणवासीयांचं पुनर्वसन झालं नाही. लोकं मदतीसाठी ओरडत होते. तरी सरकार पाहिजे तेवढे माळीणला गतवैभव प्राप्त करून देऊ शकत नव्हते. सरकारचेही बरोबर नसले तरी कितीही मदत कार्य केलं तरी जुनं गतवैभव एखाद्या गावाला प्राप्त होत नाही. हेच माळीण यांच्याबाबतीत होत होतं. सकाळी साडेसातला होत्याचं नव्हतं झालं होतं. विजयाला सगळं आठवत होतं.कारण तिच या गावाची प्रत्यक्ष साक्षीदार होतीे. ती त्यावेळी सातवीत होती.
भूस्खलन म्हणजे काय? भुस्खलन कसे होते? का होते? हे तिनं भूगोलात अभ्यासले होते. त्याचबरोबर तिनं हिरोशिमा नागासाकी अभ्यासला होता. मोहेंजोदारो व हडप्पा संस्कृतीमध्ये कशी शहरं गाडली गेली आज समजत होतं. बहुतेक प्रचंड पावसामुळे ही शहरं गाडली गेली असेल नदीच्या गाळात. असे तिला वाटत होते.आज मोहेंजोदारोचं उत्खनन तिनं पुस्तकात वाचलं होतं.त्यावरून ते सहज सुंदर असेल याची कल्पना जनसामान्यांना आली होती.
हडप्पा संस्कृतीचा काळ समजून घेण्याच्या वेगवेगळ्या पद्धती होत्या.सूर्यास्त झाला की रात्र व सूर्योदय झाला की सकाळ, सूर्यास्त झाला की रात्र होते. तेव्हा अंधार पडू लागते.काळाचे विभाजन दिवस आणि रात्र या मध्ये झालेले असून असे कित्येक काळ गेले, ज्या काळात हडप्पा संस्कृती उदयास होती. ज्यावेळी हडप्पा मोहेंजोदारोचं संशोधन झालं त.त्यावेळी तेथे सापडलेल्या मूर्ती व ताम्रपट यावरून ती संस्कृती किती वर्षांची जुनी असावी याची कल्पना येते.हे सगळं आठवत होतं विजयाला.
माळीणच्या भुस्खलनात विजयाचे आई-वडील ढिगा-यात गाडले गेले होते. तिचे भाऊ-बहीण सगळे मरण पावले होते.तिच एकमेव जिवंत वाचली होती.

सकाळ झाली.तशी सरकारी यंत्रणा माळीणगाव पर्यंत येऊन पोहोचली होती.काही गावकरी वाचले होते. त्यांचीही मुलं मरण पावले होती.कोणाचे मायबाप तर कोणाची मुलगी मरण पावली होती. कोणाचे भाऊ-बहिणी मरण पावले होते.गायी गुरं पशुपक्ष्यांची तर काही खैरच नव्हती. पक्षी किलबिल किलबिल आवाज करीत होते.
भुतकाळात अनेक घटना घडून गेलेल्या असतात.आपले वय दहा वर्षे असेल तर आपल्या जन्माची घटना दहा वर्षांपूर्वी घडली.असा अर्थ होतो.मग आपल्या वय वीस वर्ष असेल तर ती घटना वीस वर्षापूर्वीची. याला भूतकाळ म्हणतात. या घटना जशा जुन्या होतील,तसतसे त्याला इतिहास म्हणता येईल. भूतकाळात घडलेल्या घटना या जसेच्या तसे पुन्हा घडवून आणणे. हा प्रयोग करणे शक्य नसते. असे असले तरी त्यातील पुरावा शोधण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा वापर करावा लागतो. त्यासाठी आवश्यक असेल तर शासनाची मदत घेतली जाते.
प्राचीन वस्तू, वास्तु,शिल्पे भांडी,नाणी,कोरीव लेख,ताम्रपट,हस्तलिखीते,लोकांच्या स्मरणात असलेल्या कथा-कहाण्या, लोकगीते या आधारावर इतिहासाचे अवलोकन केले जाते.अशा घटना का घडतात? याचा विचार केल्यास माणसाच्या व्यक्तिगत तसेच सामान्य कृतीच्या परिणामातून मानवी समाजाच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण निर्माण होत असते.त्याचा परिणाम हा दैनंदिन जीवनावर होत असतो.एखाद्या गावातील लोक एकजुटीने, एकमेकांच्या मदतीने सगळी चांगली कामे करीत असतील, तर गावचा विकास होतो.पण तीच कामे वाईट स्वरूपात करीत असतील तर गावाची अधोगती होते. माळीण गावाबद्दल तेच झालं होतं.झालेली वृक्षतोड ही बाब गावाच्या अधोगतीच्या कारण ठरलं होतं.
त्या त्या गावाच्या, जिल्ह्याच्या, राज्याच्या, देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास असतो.त्याप्रमाणे पृथ्वी,पृथ्वी वरील डोंगर,जलाशय, प्राणीसृष्टी, माणूस यांचा स्वतंत्र इतिहास आहे.भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ हे स्वतंत्र अशा साखळीने जोडलेले असून त्यांचा परस्पर संबंध आहे.
विविध मानवी समाजाने भूतकाळात निर्माण केलेल्या अनेक वस्तू व वास्तू यांचे अवशेष अनेक ठिकाणी ठिकाणी पाहायला मिळतात. त्यातील सर्व जमिनीवर असतात असे नाही. वर्षानुवर्षे पुराने वाहून आणलेल्या काळात किंवा वा-याने वाहून आणलेल्या मातीचे थर साचून त्याखाली गाडले जातात. मानवाने घडवलेल्या वास्तू व वस्तू यांच्याप्रमाणे मानव आणि प्राणी यांच्या सांगाड्याचे अवशेषही अशाच पद्धतीने गाडले जातात. जे माळीण गावात झालं. जमिनीखाली गाडले गेलेले पुरावशेष उजेडात आणण्यासाठी जमिनीचा एकेक थर अत्यंत शास्त्रशुद्ध रीतीने तपासून काळजीपूर्वक रीतीने खणण्याला पुरातत्वीय उत्खनन म्हणतात.पुरावशेष जिथे सापडू शकतील अशा स्थळांचा शोध घेऊन त्याची नोंद ठेवली जाते.त्यानंतर उत्खनन केले जाते.
मोहेंजोदारो हडप्पा संस्कृती जमिनीखाली दबली गेली. याचे कारण त्यावेळचं प्रगत तंत्रज्ञान.यावेळी मोहेंजोदारो पुराच्या पाण्याने जमिनीत गाडल्या हेलो. त्या वेळी ताबडतोब या गावाच्या उपसा झाला नाही किंवा गाळ उपसला गेला नाही. म्हणून त्या ठिकाणी ती संस्कृती आजतागायत दबून राहिली. अशा कित्येक संस्कृत्या या काळाच्या ओघात दबल्या गेल्या.बँबीलोनियन ही संस्कृती त्यातील एक.
काळ मोजण्याचे काही एकक आहेत.सेकंद,मिनिट,तास,दिवस,आठवडा,पंधरवाडा,महिना,वर्ष,शतक सहस्रक. सेकंद सर्वात लहान एकक.सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी आपली सूर्यमाला निर्माण झाली. आपली पृथ्वी ही सूर्यमालेतील एक ग्रह आहे. पृथ्वीची उत्पत्ती देखील साडेचार अब्ज वर्षांपूर्वीची.काही घटना, त्यांची माहितीही आपल्याला जमिनीखाली गाडल्या गेलेल्या पुराव्याच्या आधारे मिळवावी लागते.तो पुरावा अवशेषाच्या स्वरूपात असतो. मातीचे एकावर एक थर साचलेले असतात. त्यावरूनही कालखंड ठरतो. एखाद्या मातीचं भांड जमिनीच्या किती खाली मिळाले? त्यावरून त्या भांड्याचा काळ ओळखता येतो.झाडाचे वय मोजतांना झाडाच्या खोडाचे एक वलय दरवर्षी वाढत जाते.हे वलय मोजले की झाडाचे वय कळते. लाकडी वस्तूही अशाच पद्धतीने मोजल्या जातात.
शास्त्रीय संशोधनाच्या आधारे सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी अत्यंत तप्त वायू आणि धूळ. त्यांनी मिळून बनलेला प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला.त्याच्या अत्यंत वेगवान चक्राकार गतीमुळे त्याचं विभाजन होऊन सूर्य आणि पृथ्वी तसे त्याच्या भोवती फिरणारे ग्रह व उपग्रह तयार झाले.याची उत्पत्ती होण्यासाठी ८० कोटी वर्ष लागली.असे म्हणतात की पाण्यात प्रथम आदिजीव निर्माण झाले.हे एकपेशीय जीव होत. त्यानंतर बहुपेशीय सजीव निर्माण झाले.
आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात एखाद्या प्राण्याच्या शरीररचनेत आपोआपच काही बदल घडून येतात. कालांतराने तेच बदल आनुवांशिकतेचे रूप धारण करतात.अशा प्रकारे मूळ प्राणी जातीपेक्षा नवीन जाती उदयाला येतात. याला उत्क्रांती म्हणतात.या प्रक्रियेत मूळ प्राणीजात नष्ट होत त्याच्या प्रजाती नवीन वातावरणाशी जुळवून घेतात.त्या ज्या जुळवून घेत नाहीत. प्रजाती नष्ट होतात. पृथ्वीवर पुर्वी डायनासोर होते.आता ते नाहीत.त्याचे कारण हेच आहे. निसर्गातील संकट किंवा वातावरणात झालेला अचानक बदल यामुळे कोरोनासारखी महामारी येते. यामुळे माणसाच्या शरीरावर किंवा अवयवांवर परिणाम होतो.त्यामुळे अशा संकटाशी सामना करण्यासाठी आपल्या शरीराची रचना बदलते. अपृष्ठवंशीयचे पृष्ठवंशीय सजीव बनतात.असस्तनचे सस्तन बनत असतात. पण त्यात हे बदल केवळ त्या त्या त्या परिस्थितीतून व वातावरणातून घडत असतात.उत्क्रांतीच्या प्रक्रियेत शरीर रचनेत जीभेचा विस्तार झाला. जीभ ही पूर्वी जाड होती. ती आता पातळ व लांबलचक बनली. त्यामुळे उच्चार काढणे सहज सुलभ झाले.
ज्याप्रमाणे मानवाच्या शरीरात बदल झाला. त्याप्रमाणे अन्नधान्य व पशुपालन यांमध्येही बदल झाला. बदलत्या परिस्थितीचा सामना करीत असताना मानवाच्या शरीराने सर्वात प्रथम पिष्टमय पदार्थ स्वीकारले.त्यामुळे सहाजिकच शरीरात कार्बोदकाचे प्रमाण वाढले. त्यानंतर हळूहळू त्याला स्निग्ध व प्रथिने तसेच जीवनसत्त्व व क्षाराची माहिती झाली.
याला क्षार म्हणतात. याला जीवनसत्त्व म्हणतात. हा स्निग्ध,हा पिष्टमय. हे मानवाला अजिबात कळत नव्हतं. पशुपालन व शेतीला सुरुवात झाल्यापासून मानवांना केलेली तांत्रिक आणि इतर प्रकारची वाटचाल हे आधुनिक संस्कृतीचं द्योतक आहे. मानवी उत्क्रांतीच्या इतिहासाची मांडणी ही पूर्णत: मानवी हाडाच्या आतापर्यंत झालेल्या संशोधनावर अवलंबून आहे.परिस्थिती तसेच संकटाशी सामना करताना ज्याप्रमाणे मानवाच्या शरारचनेत बदल झाले. त्याप्रमाणे बदल हे मानवाच्या आर एन ए व डी एन ए तही झाले.हाडातही झाले.ही हाडे जेव्हा मातीत गाडली गेली,तेव्हा की हाडे कालसदृश जेव्हा सापडली. तेव्हा त्यामध्ये वेगवेगळ्या काळात कोणता बदल झाला हे लक्षात यायला वेळ लागला नाही.
आज काही देशांमधील लोकंच गोरे,तर काही देशांमधील लोक काळे असतात. हे त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार त्यांची शरीररचना असते. कोरोसारख्या महामारीत हाच बदल दिसतो.ज्यांची शरीररचना या आजाराशी लढायला तयार होती. ते अजूनही जगत होते,नव्हे तर कोरोनासारख्या महामारीचा सामना करताना ज्या गोष्टी आवश्यक नव्हत्या.त्या त्या गोष्टी शरीराने काढून बाहेर फेकल्या होत्या.
भारतामध्ये पुराश्मयुगीन हत्याराचे अवशेष काश्मीरपासून तामिळनाडू पर्यंत तसेच होशंगाबाद जवळ हथनोरा गावात मिळाले.महाराष्ट्रात नाशिक गंगापूर आणि नेवास्याजवळ चिरकी नेवासा इथेही काही अवशेष मिळाले.हवामान आणि पर्यावरणातील बदलामुळे मानवाची जीवनपद्धती सारखी बदलली. मोठी गरज पोटाची होती.ती गरज पूर्ण करताना मानवाला कस लागला.त्यातच शिकार करणे,कंदमुळे खोदून खाणे व पुढे जाऊन शेती करणे या गोष्टी माणूस शिकला.त्यासाठी त्यांनी हत्यारे बनवली.अशी हत्यारे राजस्थान मधील बागोर,मध्यप्रदेशातील भीमबेटका, गुजरात मध्ये लाघनज, महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात पाटणे येथे मिळाली आहेत. पर्यावरणातील या बदलामुळे व माळीण सारख्या नैसर्गिक संकटामुळे मँमोथ सारखे काही महाकाय प्राणी नष्ट झाले. काही आजारानं देखील मरण पावले.
संकटावर मात करण्यासाठी प्रथम गाव व त्यानंतर गावाची रचना झाली.मग गावातील व्यापाराची व साधन संपत्तीच्या वाटपाची ही व्यवस्था सुरळीत चालावी म्हणून, लोकांनी एकमेकांना सहकार्य करावे म्हणून, गावात नियम तयार केले गेले.त्या नियमाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ज्याच्याकडे गेली.त्याला कर्तेपण मिळालं.मग व्यवस्था निर्माण झाली. त्यानंतर शासन व्यवस्था. त्यातच पुढे पूर, जंगली जानवर, गुरे चोरून नेणारे, बाहेरचे लोक, आजार यावर संरक्षण मिळविण्यासाठी काही उपाय योजना करण्यात आल्या.काही ठिकाणी भिंती बांधण्यात आल्या. काही ठिकाणी घर उंचावर बांधण्यात आली.काहींना जंगली प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी हत्यारे बाळगण्याची परवानगी दिली गेली.
थंडी, ऊन,वारा, पाऊस या पासून संरक्षण करण्यासाठी घरे बांधण्यात आली.पुढे पती-पत्नी त्यांचे नातेवाईक त्या एकत्र कुटुंबात राहू लागले. जंगली जनावरांच्या सामना करण्यासाठी तसेच रोगराईच्या पद्धती विकसित नसल्याने एकाच कुटुंबात अनेक व्यक्ती राहात.त्यांना अन्न उत्पादनाचे तंत्र माहीत नसल्याने ते एखाद्या ठिकाणी अन्न संपलं की दुसरीकडे जात.याला भटकंती म्हणत.ऊन,वारा, पाऊस यापासून संरक्षण व्हावे म्हणून घराच्या रचना वेगवेगळ्या होत्या .मृत व्यक्तींना ते घराच्या अंगणात किंवा घरात पुरत. व्यक्तीच्या कुटुंबाची असलेला संबंध मेल्या नंतर नाही असा त्याचा उद्देश होता.
वस्तूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यानंतर व्यापारात वाढ झाली. दूरवर पसरलेली व्यापारी मालाची वाहतूक मोठ्या प्रमाणात उत्पादन करणारी उत्पादनाची केंद्र, त्यामुळे अनेक प्रकारची कामे करणारी मंडळी एकत्र आली व तयार झाली.त्याच्या नोंदी ठेवणे गरजेचे झाल्याने लिपी तयार झाली. व्यापारातील भरभराट हेच एकमेव कारण आहे की ज्या कारणाने नागरी संस्कृतीचा विकास झाला.या नागरी संस्कृतीत मेसोपोटेमिया, इजिप्त,चीन,हडप्पा यांचा समावेश होतो.या संस्कृती ह्या नदीच्या काठावर वसलेल्या होत्या.कारण मानवाला जगात जगायला सर्वात प्रथम पाण्याची गरज असते.विहीर बांधण्याचे तंत्रज्ञान विकसित नसल्याने पाणी मुबलक प्रमाणात मिळावे. यासाठी नदीचा भाग राहण्यासाठी योग्य समजला गेला.नदीमध्ये वसलेल्या या संस्कृतीत टायग्रीस,युृफ्रेटीस या दोन नद्यांमध्ये मेसोपोटेमिया,नाईल नदी मध्ये इजिप्त, सिंधू नदी मध्ये हडप्पा,होयांग हो नदीमध्ये चीन या संस्कृतीचा समावेश होतो. या संस्कृत्या नद्यांमध्ये विकसित झाल्या. पण काळानुसार त्या गाडल्या गेल्या व पुढे त्याचं उत्खनन झाल्यानं त्या संस्कृत्या काही काळात अस्तित्वात होत्या. हे सिद्ध झालं आहे.
विजया हे सर्व शिकले होतीे. या घटनेवरून हे सर्व आठवत होतं तिला.त्याच बरोबर आठवत होते तिथे मायबाप.जे त्या मलब्यामधून निघणार होते.
पृथ्वीची विभागणी जमीन व पाणी या मध्ये झालेली आहे. पाणी ७१ टक्के व जमीन २९ टक्के आहे. हवा,पाणी आणि जमिनीची ही विभागणी झालेली आहे. हवेला वातावरण,पाण्याला जलावरण व जमिनीला शिलावरण म्हणतात. या तिन्ही मध्ये व्यापलेल्या सजीवांच्या आवरणाला जीवावरण म्हणतात. पृथ्वीच्या सभोवती वातावरणाचे म्हणजे हवेचे थर आहेत. यावर स्थायू रूपातील नैसर्गिक घटनांकडे आपण साधन म्हणूनही पाहतो.म्हणजे या घटकांचा वापर आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी करतो. पृथ्वीवर असणाऱ्या हवेत नायट्रोजन,कार्बन डाय-ऑक्साइड वायू, ऑक्सिजन,नायट्रोजन इत्यादी वायू असतात. तसेच ऑर्गन,हेलियम, निऑन,क्रिप्टोन,झेनॉन हे वायू देखील असतात.अॉर्गन विजेच्या बल्बमध्ये, हेलियम विमानामध्ये, निआन रस्त्यावरच्या दिव्यामध्ये,तर फ्लुरोंसेट पाईपमध्ये क्रिप्टान,झेनॉन फोटोग्राफीमध्ये वापरतात. या विविध वायू तसेच इतर घटकांच्या समतोलामुळे पृथ्वीवर जीवसृष्टी टिकून आहे.वातावरण हे विषारी वायूपासून वाचवण्याची गाळणी आहे.तसेच पाऊस यांची उत्पत्ती वातावरणामुळे झाली आहे. परंतु कधीकधी कारखान्यातून होणाऱ्या हवेच्या उत्सर्जनावर उपाय निघत नाही.त्यातच हवा प्रदूषित होते. त्याला वायू प्रदूषण म्हणतात.त्याचाही परिणाम जीवसृष्टीवर होत असतो.
वातावरणाचे काही प्रकार पडतात. तपांबर,स्थितांबर,मध्यांबर,आयनांबर व बाह्यांबर. पृथ्वीलगत तपांबर सुमारे तेरा किलोमीटरचा भाग.पृथ्वीपासून पन्नास किलोमीटर स्थितांबर. त्याच्याखाली ओझोन वायूचा थर असतो. सूर्यापासून येणारी हानी कारक अतिनील किरणे ओझोन वायू शोषून घेतो.त्यावरती मध्यांबर असते. वाहतुकीसाठी वापरली जाणारी सर्व विमाने तपांबराच्या वरच्या भागात उडत असतात.
विजया वातावरणातील बदल शिकली होती आतापर्यंत. आता शिकत होती. माळीणची घटनाही याच नैसर्गिक वातावरण बदलाचाच नमुना आहे. असं तिला वाटत होतं. ती इतिहास शिकत होती. भूगोल आणि सोबत विज्ञान शिकत होती.
लहानपणी तिचं वय अल्लड होतं. माळीण दुर्घटना होण्यापूर्वी तिला अभ्यासाचे महत्त्व वाटत नव्हतं.मुलांशी खेळणे तिला फार आवडायचे.सुनंदा,सुमा,सारीकाशी दिवसभर खेळतांना कधी हवामानाचा अभ्यास करण्याची आवड वाटली नाही.भूस्खलन म्हणजे काय व उत्खनन म्हणजे काय? हे कधी तिला कधीच समजलं नव्हतं. लगोरी, लपंडाव यातच ती मुलं असल्याने कधी पूर, भूकंप, वादळ याकडे तिचं लक्ष गेलेच नाही. तर ती अतिशय कमी गुणांनी पास व्हायची.कधी अभ्यास केलाच नाही.तरीही........
माळीण डोंगराच्या माथ्यावर वसलेले गाव.या गावात आदिवासी लोक मोठ्या प्रमाणात राहत होते. संपूर्ण गाव डोंगर माथ्यावर जरी असला तरी त्यांना कोणतीच भीती वाटत नव्हती.त्यांनी कधी कल्पना केली नव्हती की भूस्खलनात आमचे गाव बेचिराख होईल. गावची माणसं मरतील व वित्त आणि सोबत मनुष्यहानी होईल. मात्र बरेचदा त्यांनी पूर,भूकंप,वादळं अभ्यासली होती.लातूरला किल्लारी येथे झालेला भूकंप,तसेच मोहाडला आलेला महापूर.या नैसर्गिक घटना कित्येकदा या गावानंही वर्तमानपत्रातून तसेच रेडीओवरुन वाचल्या तसेच ऐकल्या होत्या. नव्हे तर हे सर्व नैसर्गिक कारणानं होतं. हे त्यांनी अनुभवला होतं.काही काही घटना ह्या मानव निर्मित होत्या व गोसीखुर्द प्रकल्पात बुडलेली घरं किंवा भोपाळची वायूगळती.ह्या घटनांचा मानवनिर्मीत घटनांमध्ये समावेश करता येईल.
किल्लारीला झालेला भूकंप विजयानं कधीकाळी लोकांच्या तोंडून ऐकला होता.तेथील लोकांच्या वेदना तिला भयंकर जाणवत होत्या. पण हे भूकंप का होतात? पूर का येतो?वादळं का होतात? हे लहानपणापासून तर आज सातवी पर्यंत तरी पुस्तकात लिहिलेलं असलं तरी लक्षात येत नव्हतं. पण ज्यावेळी माळीणची दुर्दैवी घटना घडली. तब्बल ४४ घरं जेव्हा भूस्खलनात गाडली गेली. तेव्हा मात्र तिच्या मनात या नवीन अभ्यासाची ताकद निर्माण झालीे.
माळीण गाव, आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर काळानं निर्दयी झडप घातली. मुसळधार पाऊस त्यामुळे डोंगर कोसळला. या घटनेत एकशे पन्नास गावकरी ढिगा-याखाली अडकले होते.कित्येकांचे बळी गेले असतील असा अंदाज व्यक्त केला जात होता.
गावातील लोकांच्या मदतीसाठी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू झाले.बऱ्याच ॲम्बुलन्स घटनास्थळी दाखल झाल्या. प्रशासनाने ताबडतोब ढिगारे उपसण्याचे काम सुरू केले. सतत पाऊस सुरू, त्यामुळे परिसरात चिखल त्यामुळं भरपूर झालेला होता. तरीही जे सी बी चे मदत कार्य सुरू होतं.
गावाची लोकसंख्या फक्त साडेसातशे च्या घरात होती.असे सांगत होते.डिंबे धरणामुळे बेघर झालेल्या लोकांना विस्थापित करण्यासाठी माळीणगाव उभं करण्यात आलं होतं.
गाव तसा दुर्गम भागात होतं. गावाची लोकसंख्या फक्त साडेसातशेच्या घरात होती. गावकरी तसेच या गावात आदिवासी जमात जास्त होती. विजया ही त्यापैकीच एक.विजया आदिवासी समाजातील मुलगी होती. तो बुधवार दिवस होता. ही घटना पाहता रात्रीचे तीन वाजता घडली होती. तसेच विशेषता: इंटरनेटच्या सोयी बरोबर नसल्याने या भूसखलनाची माहिती सकाळपर्यंत कुणालाच मिळालेली नव्हती.त्यामुळे पोलिसही गावात दहा वाजेपर्यंतच आले नव्हते. डिंबे धरणापासून चाळीस किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या या गावात जेव्हा पोलीस प्रशासन गावात पोहोचलं.तेव्हा सरकारी यंत्रणा कामाला लागल्या. साडेअकराच्या सुमारास पिंपरी-चिंचवड राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या दोन तुकड्या घटनास्थळी आल्या.दुपारी साडेबारापर्यंत सर्व ढिगारे उपसण्याचे काम सुरु झाले. घटनास्थळी पोहोचली तसेच आसपासचे लोकही मदतीसाठी धावून आले.
गावात पोहोचायला व्यवस्थित रस्ते नसल्याने मदत कार्यात विशेषत: अडचणी येत होत्या.तरीही मदत कार्ये या घटनास्थळी रवाना झाली होती. तब्बल ४४ घर मातीत गाडल्या गेल्याने मनाला थरकाप होत होता. निसर्गरम्य वातावरणात तसेच निसर्गाच्या कुशीत वसलेलं माळीण गाव उपसलं असलं तरी त्यांच्या स्मृती आज कायमच काळाच्या उदरात गडप होणार मोहेंजोदारो सारख्या की पुन्हा गतवैभव माळीणला प्राप्त होणार.हाहीे एक प्रश्न लोकांसमोर आ वासून उभा होता.
मोहेंजोदारो हडप्पा सारखी सुंदर शहरं अशाच भूस्खलनातून नव्हे तर पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीतून ढिगाऱ्याखाली गाडलीे गेली असताना, त्यावेळी जेसीबी किंवा प्रगत तंत्रज्ञान नसल्याने ती बर्‍याच काळपर्यंत तसेच जमीनीखाली दडलेली राहिली. हे जेव्हा लक्षात आले, तेव्हा त्यांनी त्याचं उत्खनन केलं. तेव्हा डोंगराच्या ढिगा-यात लपलेली ती शहरं दिसली. पण माळीण गावाच्या बाबतीत भूमिका वेगळी होती. गावाला मोहेंजोदारोसारखं बरेच कालावधीपर्यंत ठेवायचं नसल्याने व पुरेसं तंत्रज्ञान विकसित असल्याने व जेसीबीच्या साह्याने उपसा झाल्याने माळीणगाव आज स्मार्ट ग्राम म्हणून उदयाला आलं होतं.हे सगळं घडलं समाजातील वेगवेगळ्या घटकांनी तत्परतेने दाखविलेल्या सहकार्यानं. तसेच सरकार आणि प्रशासनाच्या मदतीनं.
गावाचे पुनर्वसन करून सरकारने केवळ त्यांचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला नव्हता, तर त्यांच्या दुःखावर फुंकर मारली होती.त्यांना व्यवस्थित घरे बांधून देण्यात आली होती. कोणताही माणूस आपली परंपरा,आपले पिढीजात घर सोडून दुसरीकडे राहायला जात नाही. कारण त्या घराच्या आठवणी,सुख-दुख त्या घराची जोडलेल्या असतात. तसेच माळीण बाबतीत घडलं होतं.हे गाव जरी ढिगाऱ्याखाली गाडलं जरी गेलं असेल तरी त्या गावचे ग्रामस्थ हे गाव सोडून जायला तयार नव्हते.त्यामुळे सरकारला योग्य पाऊल उचलून माळीण गावाचं पुनर्वसन करावं लागलं.
गाव ढिगा-याखाली गाडल्या गेल्यानं व ते गाव भुस्खलनात खचलं गेल्यानं ही जागा पुनर्वसनासाठी सोईची नाही,म्हणून त्या गावचं पुनर्वसन आमडे गाव शेजारी लकरण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यासाठी सरकारने जमीन विकत घेतली.त्याचा आराखडा पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयानं तयार केला.आज माळीण गाव जे डोलात उभं होतं.ते सरकारची तसेच माणुसकीची कृपादृष्टी होती. असे म्हणायला हरकत नाही.ज्याप्रमाणे माळीणचं पुनर्वसन केलं गेलं.त्याचप्रमाणे विदर्भात गोसीखुर्द पुनर्वसन केलं गेलं.त्या गोसे खुर्द मध्ये जयेश आणि त्याचा परिवार राहात होता. जयेश विजयाचा मित्र होता. विदर्भातील तो रहिवासी असून त्याचे ऋणानुबंध पुनर्वसनाशी जोडलेले होते. जयेश पुनर्वसनाशी लढत होता. सरकारने गोसीखुर्द बाबत घेतलेली भूमिका त्याला चांगली जरी वाटत असली तरी गावकरी त्या योजनेला सहकार्य करीत नसल्याने त्याच्या मनात गावकर्यांबद्दल असुया निर्माण झाली होती. तो लोकांना समजावीेत होता. पण गावकरी काही त्याचं ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे पुनर्वसनाची समस्या निर्माण झाली होती. ती सरकारला जड जात होती.
माळीण गाव दुर्घटना. आज माळीण गाव जरी डोंगरात असलं तरी अशी कितीतरी गावं डोंगरात वसलेली होती. केव्हा भुस्खलन होईल आणि केव्हा ते गाव ढिगाऱ्याखाली येईल याची शास्वती नव्हती. पुण्याचा जरी विचार केला तर आंबेगाव जुन्नर तालुक्यात सहा वाड्या व गावे सारख्या धोकादायक स्थितीत होत्या. त्याचे पुनर्वसन करणं अत्यावश्यक होतं.
माळीण गावात एकूण ७४ घरं होती. आदल्या दिवशी पर्यंत पाहिजे तेवढा पाऊस नव्हता. त्यामुळे गावांनं वरुणदेवतेला मंगळवारी रात्री प्रार्थना केली व ते गाढ झोपी गेले. कदाचित वरून देवतेनं त्यांचं ऐकलं की काय कुणास ठाऊक? त्याच रात्री गावात अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टी मध्ये पावसाच्या धारा आभाळ फाटल्यागत कोसळू लागल्या. त्यातच गावातील ४४ लोकांचे जीवन संपुष्टात आले. गावात डोंगरात स्फोटक सदृष्य आवाज आला. मग मातीचा ढिगारा चिखल व उन्मळलेलीे झाडे अचानक खाली घसरू लागली. तेवढ्यात डोंगर कोसळला त्याचबरोबर दरडही...... जवळपास संपूर्ण गाव क्षणार्धात गायब झालं.
माळीणगाव भीमाशंकर पासून वीस किलोमीटर अंतरावर असून पुण्यापासून ७५ किलोमीटर अंतरावर असलेलं होतं. होत्याचे नव्हते झाले,एसटी बस रात्री मुक्कामी गाव सोडून साडेसातला अबूपेपर्यंत पोहोचली. तेव्हा या बसमधील एसटी चालकाला माळीणगाव दरड कोसळल्याने त्यांना घाटात मोबाईलची रेंज नसल्या मुळे घाटाच्या वरच्या बाजूला एसटी नेली.तसेच आपल्या भावाला फोन केला व सदर घटनेची माहिती दिली. भावाने सदर घटनेची माहिती मिळताच त्वरित ती बातमी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला माहिती दिली व तसेच कारखान्याने प्रशासनालाही माहिती दिली. अशा प्रकारे या माळी दुर्घटनेची माहिती सर्वदूर पोहोचली.कारण प्रशासनाने त्वरित हालचाली करून मिडीयाला सूचित केले. मीडिया त्वरित माळीण गावात पोहोचली व माळीण गावाची खडान् खडा माहिती त्यांनी आपल्या प्रसार माध्यमातून जनतेला पोहोचवली.
एकसारखा दमदार पाऊस, वाहनांची गर्दी,अरुंद रस्ता, परिसरात चिखल ह्या सर्व अडचणींना तोंड देवून एन डी आर एफच्या जवानांनी व नर्सेसनं प्रयत्न करुन सहाव्या दिवशी अखेर एकशे एकवीस मृतदेह बाहेर काढले.डोंगर कोसळून झालेली जीवीतहानी ही राष्ट्रीय आपत्ती होती.
दरड कोसळण्याच्या घटना राज्यात काही कमी नव्हत्या. यापूर्वीही राज्यात दरड कोसळण्याच्या घटना झाल्या होत्या. मुंबई येथे ११ जुलै २००५ ला. त्यात पाच ठार झाले होते. रायगडमध्ये महाड तालुक्यात २५ जुलै २००५ ला डोंगरकडा कोसळून १९४ ठार झाले होते. ५ सप्टेंबर २००९ ला मुंबई येथे साकीनाका येथे ही बारा ठार झाले होते.
भुस्खलन होणे ही प्रक्रिया नैसर्गिक असली तरी काही मानव निर्मित कारणाने होते.दरड कोसळणे म्हणजे संधी, भेगा फटीमध्ये पाणी शिरून खडकाची झीज होणे.त्याचे वजन वाढणे तसेच या संधी विस्तारित होऊन खडकांचे तुकडे अलग होणे.हे तुकडे उतारीप्रदेशात घसरत जाऊन खालील बाजूला स्थिरावतात. विशेषतः ज्या भागात जांभा खडक जास्त आहे. त्या भागात असे प्रकार जास्त होतात. या खडकाची मातीही चिबड असते. या ठिकाणी बांधकाम केल्यास ही माती निसरडी असल्याने बांधकामाच्या वजनाने जमीन कोसळते.कधी कधी माणूस हा शेती करीत असताना डोंगर उतारावरील जमिनी करतो. तेव्हा या सपाट भागात पाणीच असते. ते पाणी मुरण्याची प्रक्रिया सुरू होते.त्यातच विघटन प्रक्रिया सुरू होऊन ती प्रक्रिया गतिमान होते.मग चिबड भुसभुसीत प्रस्तर ढासळतात. जर गावात भूकंपक्षेत्र जर असतील तर भूकंप सुद्धा येतात.
महाराष्ट्र राज्याच्या १५ दरडप्रवण आहे.हा भूभाग ९ जिल्ह्यात अस्तित्वात आहे.या दरड प्रवण भागात आदिवासींची वस्ती आहे. माळीण गाव ज्या वेळी दर डेत सापडलं.त्यावेळी जीवित हानी झाली. त्या जीवितामध्ये घरामधील सर्व कर्ते पुरुष मरण पावले.या घटनेची धास्ती म्हणून लोक स्थलांतरित झाले. त्यांनी आपल्या नातेवाईकांकडे आसरा शोधला.कारण ज्या दिवशी ही घटना घडली.त्या दिवसापासून प्रत्येक दिवस अडचणीचा जायचा.हाताला बरेच दिवस काम नव्हतं. रोजगाराची साधने हरवली होती. दुर्घटनेत वाचलेल्या ग्रामस्थांची सोय माळीण फाट्या वरून निवारा केंद्रात केली होती. परंतू त्याठिकाणी मर्यादित जागा असल्याने पशुपालना वरही मर्यादा आली होती. त्यामुळे सहाजिकच गाई म्हशी व पशुपालन यावर अवलंबून असणाऱ्या लोकांच्या कामावर गदा आली होती. काही गाई-बैल तसेच शेतीचा हा भागही जमिनीत गडप झाल्याने काही लोकांजवळ शेती असली तरी ही जनावरे चरण्यासाठी नेणे,तसेच त्यांच्यासाठी चारा गोळा करणे, दूध काढणे, ते विकायला येणे इत्यादी कामे पूर्णतः बंद झाली होती. त्यामुळे रोजगाराच्या प्रश्न तेथील गावकऱ्यांमध्ये आ वासून उभा होता. गावकऱ्यांच्या समोर अजून दुसरा प्रश्न होता.तो म्हणजे घराचा. शासनानं तयार केलेल्या आराखड्यानुसार ४९१ चौरस फूट दर मिळणार होते.पण या घराचा प्रश्न अजून सुटला नव्हता. कारण गृहनिर्माण संस्था स्थापन झाली होती. त्यांच्यात वाद होता.त्या वादामुळे घरे निर्माणाचे काम खितपत पडलं होतं. याचं कारणही तसंच होतं. त्या घराच्या बांधकामात जेव्हा दोन लाख रुपये मंजूर झाले होते. पण हे दोन लाख रुपये बँकेत शासनाने टाकले असले तरी घर बांधणे अशक्य होतं. त्यामुळे गावकरी घर बांधायला मिळालेल्या दोन लाख रुपये......त्या पैशात घर बांधणं झालं नाही तर काय करायचे या प्रश्नाने घर बांधण्यास व ते पैसे घेण्यास गावकरी कचरत होते.तसेच गावकरी म्हणत होते, गावकरी मंडळी म्हणत होते की आम्हाला कोठेही घर द्या.लवकर द्या. तसेच सरकारने ती घरं बांधून द्यायला हवे. घर बांधण्याच्या प्रश्नात आणखी एक प्रश्न होता,तो म्हणजे आमडे गावातील जागेची सुरक्षा.गावातील जागा धोकादायक होती. या ठिकाणी जमीन थोडी खोल खोदल्यास मुरुम आणि मातीच लागत होती. त्यामुळे इथेही घर बांधणे धोकादायकच आहे असे जी एस आयच्या लोकांनी सांगितले होते. तसेच अजून एक प्रश्न होता,तो म्हणजे घराचे व जागेचे वाटप.प्रत्येकाला घर त्या लोकांच्या मताप्रमाणें हवे होते.त्यातच परस्परांच्या शेजारी व त्यांचे संबंध दुरावल्या जाण्याची शक्यता होती.आम्ही एकमेकापासून वेगळे राहू शकणार नाही असं लोकांना वाटत होतं.
माळीण गावात ज्या ठिकाणी दुर्घटना घडली.तो संपूर्ण भाग आज निर्मनुष्य झाला होता. त्यामुळे कौलारू घरांचं माळीण आज भकास दिसू लागलं होतं. जिल्हा परिषदेची शाळा तसेच अर्धवट पडलेल्या अवस्थेत असलेले दोन घरं आणि सभोवतालचे वाढलेले गवत एवढंच काय तर तिथे शिल्लक होतं. या गावातील जवळपास नऊशे जनावर मृत्युमुखी पडली होती.
गोसेखुर्दचं मात्र तसं नव्हतं.नाही गोसेखुर्द ची घटना नैसर्गिक होती. लोकांना रब्बीचे पीक होत नाही, म्हणून सरकारने योजना आखत वैनगंगेच्या खालच्या भागात धरण बांधण्याची योजना आखली.विदर्भही पश्चिम महाराष्ट्र सारखा सुख संपन्न करण्यासाठी सरकार पावले उचलत होती. त्यामुळे त्यांनी गोसेखुर्द ला धरण बांधून गावाचे पुनर्वसन करण्याचं ठरवलं होतं. पण लोक गाव खाली करायला तयार नव्हते.आमच्या हक्काची जागा म्हणत म्हणत लोक जगत होते.
गोसेखुर्दच्या भागात बहुतांश तळी गावातच तळी होती. या तळ्यात वर्षभर पाणी राहत नव्हते. तसेच या तळ्यातून तळ्याजवळच्या लोकांना पाण्याचा उपभोग घेता येत असे. दूरच्या लोकांना या तळ्याच्या उपयोग नव्हता म्हणून की काय सरकारने या भागात धरण अस्तित्वात आणलं. पुनर्वसनाचे काम रखडत चाललं असल्याने गोसीखुर्द प्रकल्प यशस्वी होते की नाही हा प्रश्न सरकारला सतावत होता.त्यामुळेच गोसेखुर्द ला बरीच वर्षे लागली होती.
आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर कोसळलेल्या दरडीच्या बातमीने संपूर्ण देश हादरला.रात्रीपासून कोसळणारा पाऊस कधी थांबतोय याची वाट पाहत वसलेलं गाव एकाएकी डोंगरावरून आलेल्या चिखलाच्या लोंढ्यात गाडला गेला. मग या प्रकरणाला राजकीय रंग आला.कोणी नैसर्गिक कारण सांगत होतं, तर कोणी पश्चिम घाटातील औद्योगिक प्रकल्पासोबत डोंगर उतारावरील शेतीला व जंगल तोडीला जबाबदार धरत होतं. परंतू नेमके कारण सापडत नव्हतं. माळीणच्या कारणाचा विचार केल्यास तेथील भौगोलिक स्थितीचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
माळीण
हे आंबेगाव खोऱ्यातील डोंगर पाहता सह्याद्री पर्वतरांगांमध्ये हा भाग येत असून बेसाल्ट खडकाचे सानिध्य या गावाला लाभले आहे.बेसाल्ट खडक येथे मुळरूपात पूर्णतः नसून त्यांचा रूपांतरित जांभा खडक व लाल माती इथे भरपूर प्रमाणात आहे. यामध्ये पावसाळ्यात पाणी साचून राहते.सह्याद्री पर्वतरांग असून हा भाग उष्ण कटिबंधात आहे. सह्याद्री पर्वतरांगेमध्ये हा भाग असून पश्चिम घाटावरून येणारे खारे वारे या पर्वत रांगेला अडतात व प्रचंड पाऊस पडतो. यामुळे तीव्र ऊन व तीव्र पाऊस यामुळे या ठिकाणच्या खडकाची झीज होते.त्या खडकाला भेगा पडतात. त्या खडकांची बारीक खडी तयार होते तसेच मातीही तयार होते. पण या प्रक्रियेला शेकडो वर्षे लागतात.अशा प्रकारचे खडक हे कोकण,माथेरान, भीमाशंकर व आंबेगाव तालुक्यात आढळतात. जेव्हा मुसळधार पाऊस येतो.तेव्हा या खडकाला पडलेल्या भेगात पाणी साचून ते पाणी धारण करण्याची क्षमता संपताच खडक डोंगरापासून विलग होतात. ते पावसाच्या प्रवाहात घरंगळत खाली येतात.ह्या दरड कोसळण्याच्या तुलनेत सह्यांद्रीचा नंबर लागतो.
माळीण हे घाटाच्या पश्चिम सीमेवर आहे. त्यामुळे तिथे पावसाच्या जोर इतर गावांच्या तुलनेत जास्त असतो.तसेच ते गाव आदिवासी असून तिथे पुरेशा तंत्रज्ञानाच्या सोयी नसल्यानं तिथं पर्यायी सोय नाही. तरीही ज्या वेळी तिथे ही दुर्घटना झाली. त्यावेळी तिथे पावसाचे प्रमाण सरासरी साडेआठ पर्यंत १५६ मिलिलिटर होतं. असंही म्हटलं जातं. त्यामुळे सहाजिकच ७८ मिलिलीटरच्या पेक्षा जास्त पाऊस होता.७८ मिलीलीेटर म्हणजे अतिवृष्टी होय.
माळीण मध्ये अगदी कमी कालावधीत जास्त पाऊस आल्याने माळीणच्या डोंगरावरून आभाळ फाटल्यागत पाण्याचे लोट वाहू लागले. उतारावरील पाण्याचे प्रमाण जास्त वाढले. मातीची पाणी ग्रहण करण्याची क्षमता नष्ट झाली.त्यामुळे या पाण्याला वाहून जाण्यास जागा न मिळाल्याने मातीच्या ढिगा-यासह पाणीही गुरुत्वाकर्षणानं डोंगर माथ्यावरून खाली आले. त्यामुळे सहाजिकच वाटेत येईल त्या गोष्टी या पाण्याच्या लोटानं नष्ट केल्या. त्यातील माळीण एक गाव.
माळीण गावाच्या घटनेला शेती व जंगल तोड कारणीभूत समजली जाते. परंतु ते कारण या घटनेला पुरेसे ठरत नाही.कारण माळीणच्या ५० मीटर उंचीवर भात शेती होत असून त्या शेती वरून म्हणजे ९० मीटर उंचीवरून डोंगराचा भाग कोसळून खाली आला होता.तसेच पायऱ्याची शेती असल्याने सपाट भागामुळे चिखलाचा लोट गावावर येण्याचा वेग कमी असेलच असे जाणवत होते.त्यामुळे शेती हे या गावाला गडप करण्याचे पर्यायी कारण ठरत नव्हते. काही लोक वृक्षतोडीला कारणीभूत मानत होते. परंतू ज्यावेळी पाणी धारण करण्याची मातीची क्षमता संपते.त्यानंतर ते पाणी वाहून जाताना वृक्ष आहे की नाही.हे पाहात नाही. तसंच माळीण गावात झालं. होतं.
माळीण गावातील घटना नैसर्गिक होती.मोठा डोंगर व अतिवृष्टी या गोष्टीवर नियंत्रण ठेवणे कठीण आहे.परंतू मानव या घटनेत थोडीफार सुरक्षा बाळगू शकतो. मुसळधार पाऊस २४ तास सतत असल्यास माणूस काही वेळेसाठी स्थलांतर करू शकतो व पावसाची स्थिती पूर्ववत झाल्यास पुन्हा आपल्या गावी परत जाऊ शकतो. परंतु माळीण गावात कोसळणाऱ्या सरीनं गावाला तसा पर्याय दिला नव्हता.
माळीणच्या ज्या डोंगरावरून दरड कोसळली.त्याचे पृष्ट लाल मातीचे असून त्या मातीची खोली जास्त होती. या भागाची जवळून पाहणी केल्यास त्यात खडकाचे प्रमाण कमी असून मातीचे प्रमाण कमी दिसले. ते माती युक्त पाणी घरंगळत आल्यानं माळीणगाव मातीत गडप झाल.
कधी कधी पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार होतो. यामुळे पावसाचे प्रमाण वाढत असते.घटनेच्या दिवशी पश्चिम किनारपट्टीवर दीड किलोमीटर उंचीपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय होता. दुसरीकडे बंगालच्या उपसागरात सात किलोमीटर पर्यंत कमी दाबाचे पट्टे अस्तित्वात होते. उत्तरेकडे पूर्व राजस्थान मध्ये वातावरणात चक्रीय स्थिती चक्रीय स्थिती निर्माण झाली होती.यातच या सर्वांच्या मदतीला मोसमी वार्‍याच्या प्रवाह होता.या स्थितीमुळे महाराष्ट्र राज्यात सर्वदूर मोठा पाऊस पडला असल्याने या ठिकाणी पावसाचा जोर जास्त होता.
नासानं आपल्या वेबसाईटवर या घटनेची माहिती दिली होती. मात्र त्यांनी तीस किलोमीटर अंतरावर घटनेची दुर्घटना होऊ शकते. असं सांगितलं होतं.परंतू ही दरड कोसळण्याचे प्रत्यक्ष स्थान सांगितलं नव्हतं. नासाच्या वेबसाईटवर भीमाशंकरचा संपूर्ण भाग जांभळ्या रंगात दाखवला होता.त्या ठिकाणी १७५ पेक्षा जास्त पाऊस पडेल असही दर्शवण्यात आलं होतं. त्यातच भीमाशंकर पासून तर गुजरात पर्यंतच्या संपूर्ण भागात भुस्खलन होऊ शकते. असा इशाराही नासानं दिला होता.मात्र काही हवामान विभागाच्या दुर्लकामुळं माळीण गावात दुर्घटना घडली होती. लोक मरण पावले होते.
गोसीखुर्द मध्येही दुर्घटना होणार नाही सांगता येत नव्हतं.लोकं आपआपली जागा सोडून व घरं सोडून जायला तयार नव्हते.जर बांध बांधून पाणी अडवलं तर त्या पाण्यात गावातील पशुधन गाई,म्हशी,बक-या, बैल यासह माणसंही या पाण्यात जलसमाधी घेतील अशी स्थिती निर्माण झाली होती.त्यामुळे सरकार ही जमीन खाली करा.तुमचं पुनर्वसन झालं आहे असं सांगत होतं. पण लोकं मरायला तयार होते. परंतू ती जागा सोडून जायला तयार नव्हते. शेवटी जर लोकं मरण पावली तर विरोधी पक्षांसाठी सणसणीत मुद्दा व पुरावा मिळणार होता.मतासाठी आणि मताच्या राजकारणासाठी.......जे राजकारण माळीणला झालं नव्हतं. माळीणची दुर्घटना निसर्गाचा प्रकोप होती नव्हे तर निसर्गाचा ढासळलेला समतोल होता.म
खगोलीय वस्तू म्हणजे एकमेकांना स्वतःकडे खेचण्याची शक्ती आहे त्याला गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणतात.सूर्याची ग्रहावर कार्य करणारी गुरुत्वाकर्षण शक्ती तसेच ग्रहाची सूर्यापासून दूर जाण्याची प्रवृत्ती यांच्या एकत्रित परिणामामुळे ग्रह सूर्याभोवती ठराविक अंतरावरून ठराविक कक्षेत परिभ्रमण करीत असतात.याच पद्धतीने उपग्रहही ग्रहाभोवती परीभ्रमण करीत असतात. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील सर्व वस्तू पृथ्वीवरच पडतात. एखादी वस्तू जोरात वर फेकली कि ती तेवढ्यात जोरात जमिनीवर येऊन पडते. याच गुरुत्वाकर्षणाचा परिणाम मानवी जीवनावर होत असतो.पूर,वादळ, भूकंप तसेच समुद्राची भरती-ओहोटी हे गुरुत्वाकर्षणाचे कारण आहे. ज्यावेळी पौर्णीमा असते,त्यावेळेस समुद्राला भरती येते.कारण चंद्र पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वीच्या जवळ असतो. ज्याप्रमाणे पृथ्वीला गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. त्याचप्रमाणे चंद्रालाही गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने व चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने समुद्राचे पाणी खेचले जाते व भरती येते. तर चंद्र पृथ्वीपासून दूर असल्यास ओहोटी येते.भरतीचे वेळी जर माणूस समुद्र किनारपट्टीवर असेल तर तो त्या पाण्यातून दूर फेकला जातो पण अोहोटीच्या वेळी माणूस कितीही पाण्याच्या दूर उभा असला तरी ते पाणी त्याला आत ओढतं.
ग्रह व तारे यांच्या दरम्यान असणारी रिकामी जागा म्हणजे अवकाश होय.या अवकाशात वेगवेगळ्या खगोलीय घटना सातत्याने घडत असतात.उल्का पडणे ही एक खगोलीय घटना.कधी कधी हे उल्कापिंड पृथ्वीच्या जवळून जात असतात. पृथ्वीवर पडत नाही.परंतू उल्कापिंडालाही गुरुत्वाकर्षण असतं. त्यामुळे ते जरी पृथ्वीवर पडलं नसलं तरी त्याचा परिणाम पृथ्वीवर होतो. ज्याप्रमाणे एखादा ट्रक घराजवळून गेल्यास आपल्याला तसेच घराला हादरे बसतात.तसंच जाणवतं. तोच तो प्रकार उल्कापिंड पडण्यामुळे होतो.मानवाला जरी या उल्का पिंडाचा हादरा जाणवला नाही तरी पृथ्वीला तो हादरा जाणवला असल्याने पृथ्वीवर भूकंप,भरती ओहोटी व वादळ होतात.कधी कधी जे सूर्यग्रहण व चंद्रग्रहण होतं.त्यात सूर्याच्या आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या परिणाम पृथ्वीला होत असल्याने पृथ्वी वरील जीवसृष्टीवर त्याचा परीणाम होतो.
पृथ्वी ही स्वतःभोवती फिरते त्याला परिवलन म्हणतात. सूर्याभोवती फिरते त्याला परिभ्रमण म्हणतात. या पृथ्वीच्या सतत फिरण्याने पृथ्वीवर दिवस,रात्र, पंधरवाडा,महिना,वर्ष होत असतात. सूर्योदय व सूर्यास्त होत असते. जर पृथ्वी नसती तर पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण नसतं आणि पृथ्वीवर जीवसृष्टी नसती असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.
पृथ्वीच्या सतत फिरण्यामुळे त्यातून निघणारी ऊर्जा ही परिसरात पसरते व त्या त्या उष्णतेवर सूर्यापासून निघणार्‍या प्रकाश लहरीच्या परिणाम होतो. जर पृथ्वी सह इतर ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणाच्या व त्यापासून निघणाऱ्या ऊर्जेचा परिणाम तीव्र असेल तर सूर्यावर त्याचा परिणाम होतो व तिथे सौरडाग तयार होतात. तसे सूर्यापासून विषारी किरणं निघतात.
सूर्य हेलिअमचा गोळा आहे.हेलिअम म्हणजे तीव्र स्वरूपाचा हायड्रोजन.तो सतत जळत असतो.सूर्यावरील या अतिनील किरणांच्या विघटनातून चे विषारी किरण निघतात.ते तपांबराच्या वर असणा-या स्थितांबरात सामावलेल्या ओझोन वायूशी संयोग पावतात व त्याची तीव्रता कमी होते.अथवा त्या वायूत की किरणं नष्ट होतात. जेवढा ओझोन वायू जास्त,तेवढी त्याची तीव्रता कमी.जेव्हा कारखान्यातून निघणारा सल्फर डायऑक्‍साईड व हायड्रोजन सल्फाइड अवकाशात पसरतो.याच सल्फर डायऑक्साईड वायूच्या संपर्क येऊन तो ओझोन वायू वापरला गेल्याने स्थितांबरातील ओझोन वायूचे प्रमाण कमी होते.तेव्हा सूर्यापासून निघणारी जी अल्फा, बीटा, गॅमा किरणं आहेत. त्यातील संयुगाची संयोग होऊन त्या किरणांची तीव्रता कमी करताना स्थितांबरातील ओझोन वायू कमी पडत असल्याने ती अतिनील किरणे थेट पृथ्वीवर येतात. तसेच ते पृथ्वीवरील सजीव सृष्टी वर परिणाम करीत असतात. त्यासाठी पृथ्वीवर झाडे जगवली पाहिजेत. कारण वृक्ष हे परिसरातील कार्बन-डाय-ऑक्‍साईड श्वासोच्छवासासाठी वापरतात व ऑक्सिजन वातावरणात सोडतात.जर जास्त झाडं असली तर ती झाडं जास्त प्रमाणात ऑक्सिजन अवकाशात प्रवाहित करीत असल्याने सहाजिकच स्थितांबरातील ओझोन वायूची पातळी वाढते व ते सूर्यापासून येणा-या अतिनील किरणांशी संयोग पावून पृथ्वीवरील जीवसृष्टीचे रक्षण करतात.
पृथ्वीच्या पृष्ठभागावर काही भागात जमीन तर काही भागात पाणी असते.पृथ्वीवरील सजीव हे जमिनीवर, पाण्यात तसेच हवेत वाढतात,जगतात. अनेक नैसर्गिक घडामोडींना सूर्य कारणीभूत असतो. पृथ्वीवरील बाहेरील कवच कठीण तसेच माती आणि खडकांचे बनलेले आहे. कोठे जमिनीवर जास्त गवत दिसते तर कोठे जमिनीवर कमी. कुठे तळभाग तर कुठे डोंगर. काही ठिकाणी झाडाच्या मुळांनी दुभंगलेले खोलगट दगड दिसतात. तर काही ठिकाणी पर्वताचे उतार दिसतात. त्या ठिकाणी उंच उंच खडकाचे थर दिसतात. सगळीकडे जमीन सपाट किंवा सारख्या उंचीची नसते. तिच्या उंच-सखलपणामुळे जमिनीला विशिष्ट आकार प्राप्त होतो. हे भूरूपे,मैदान, टेकडी,डोंगर, पर्वत इत्यादी नावाने ओळखले जातात.हीच स्थिती पाण्याखालीही असते. त्यानुसार पाण्याखाली आखात, सामुद्रधुनी, पाहायला मिळते.याला जलरुपे म्हणतात.
पृथ्वीवर जमिनीवरून वाहणारे पाण्याचे लहान-मोठे प्रवाह असतात.त्याचे पाणी गोड असते.त्याला ओहाळ म्हणतात. अोढा व नदी म्हणतात.यापैकी सर्वात लहान ओहोळ तर नदी मोठी असते.ओहोळ व ओढे जोडले जाऊन उपनद्या व नद्या बनतात. एखाद्या ठिकाणी नदीचे पाणी उंचीवरुन खाली पडते, त्याला धबधबा म्हणतात. मोठ्या जलशांना सरोवर तर लहान जलाशयांना तळे म्हणतात. काही ठिकाणी पाण्याचे कण गोठण्याने तेथे हिमकण तयार होते. हिमकण पावसाच्या रूपाने खाली येऊन वाहात असतात. त्याला हिमनदी म्हणतात. तर समुद्रात बर्फाचे मोठे तुकडे असतात त्याला हिमनग म्हणतात.हे सर्व थंड प्रदेशात घडतं.तिथे प्रचंड थंडी असते. जमिनीखाली जे पाणी अंश स्वरूपात असते त्याला भूजल म्हणतात. हे भूजल विहिरीमधून कूपनलिकेच्या सहाय्याने बाहेर काढले जाते.
सूर्यप्रकाश, हवा, पाणी, माती, वनस्पती व प्राणी अशा अनेक घटकांच्या आपल्या जीवनाशी संबंध असतो. हे सगळे घटक म्हणजे पर्यावरण.
विजयाच्या कुटुंबात सर्वजण एकत्र राहत होते.प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या होत्या. विचार आणि मते भिन्न भिन्न होते. अनेक बाबतीत त्याचे विचार एकमेकांशी जुळू शकत नव्हते. तरी त्यांच्यात प्रेम आपुलकी होती. ते कोणताही निर्णय घ्यायचा असल्यास एकमेकांना विचारत असत.त्यांच्या घरात तिच्यापेक्षा तीन बहिणी मोठ्या होत्या. तिचे आई-वडील त्या बहिणीच्या सल्ला घेत असत. त्या तिन्ही बहिणींपैकी एक उपवर झाली होती.पण तिचा विवाह झाला नव्हता.विजया सर्वात लहान होती. त्या तीन्ही बहिणींनी आपलं शिक्षण सोडलं होतं. त्या तीन पैकी दोन बहिणी मायबापा सोबतच कामाला जात असत. आपल्या हातून ज्या वाईट गोष्टी घडत असतात. त्याच बर्‍या वाईट गोष्टी त्याच्या हातून घडायच्या. परंतू ते मायबाप रागावत नसत. तर ते आपल्या मुलांची मित्रत्वाच्या भावनेने वागत. त्यातून झालेली चूक सुधारता येत असेल ती तशी संधी त्यांना देत असत. त्यांना वाटत होतं की यातूनच प्रामाणिकपणा वाढीस लागेल.
मालिनी,शालीनी,भीमा व विजया चार बहिणी.वंशाचे वारस म्हणून किसननं एकामागून एक मुले जन्मास घातली.त्यांना कसे मोठे करू याचा विचार किसन रावानं कधीच केला नाही. तोही तसा कमी शिकलेला होता. एरवी तो अठरा वर्षाच्या व्हायचाच होता. तेव्हा त्याच्या बापानं त्यांचा विवाह जवळच्या एका मुलीशी लावून दिलं होतं. तिचं नाव छाया होतं. छाया १८वर्षाची व्हायची होती. तिचे दुधाचे होठं सुकलेले नव्हते.अशा बालवयातच तिचा विवाह झाला. अगदी शिकायच्या वयात संसारात पडलेली छाया तिला संसार म्हणजे काय?हे कळत नव्हतं.नव्हता समजतही.सासू होती. ती चांगली होती. ती मात्र छायाला त्रास द्यायची नाही तर चुकले की समजून घेत होती.समजून सांगत होती.शिक्षणाच्या काहीच उपयोग नाही हे माहीत असल्यानं किशन रावाच्या बापांनं शिक्षणाला तिलांजली दिली.मूळच्या आपल्या पिढीजात परंपरेनुसार किसनराव च्या बापाने म्हणजे शहादूनं विवाह साजरा केला, परंतू परंपरेनुसार किसनला शाळेत टाकलं नाही.शहादू तर शाळेत गेला नव्हता. तसा किसनही शाळेत गेला नाही.शिक्षक मात्र घरी यायचे.शहादूला विनवणी करून जायचे.पण शहादूनं काही किसनचं नाव शाळेत घातलं नाही.
मुळात ती आदिवासी जमात.शिक्षणाचे महत्त्व नव्हतेच मुळी त्यांना.एक मात्र नक्की की आदिवासी मंडळी एकत्र राहायची व शिकार करून आणायची.आता तर रानातील फळांवर जगणारी ही जमात आता मात्र शेती करू लागली होती. तर काही लोक त्यांना आपल्या शेतीवर मजूर म्हणून नेवू लागले होते.
कामाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास ही मंडळी शेती करण्यासाठी डोंगर-उताराच्या पायथ्याची डोंगर चढून अशी कितीतरी एकर जमीन या डोंगराला सपाट करून या मंडळींनी बनवली होती. ही मंडळी नाचणी व बाजरीचीही पीकं भाताच्या शेतीसोबतच घेत होती. सर्वच लोकांजवळ शेत्या नव्हत्या.तर काही काही लोकांजवळ पशुपालनही होतं.ते आपलं पशुधन डोंगराच्या गवतात चारायला न्यायचे. चार महिने सोडले तर बाकीची आठ महीने त्यांची हेळसांड होत असे. पावसाळ्यात पश्चिम घाटात पाऊस जोरदार पडत असल्याने त्यांचं पशुधन रानात चरत असे. त्यामुळे त्यांचं विशेषत: पोट भरत नव्हतं.ते पशुधन पाऊस आल्यास झाडाच्या आडोशाला उभे राहत असे.तर उन्हाळ्यात पाऊस नसल्यानं डोंगर एवढं सपाटुन तपासायचं की गुरांना ही खायला अन्न मिळायचं नाही. किसनचा बाप जोपर्यंत जीवंत होता. तोपर्यंत किसनला कोणत्याच गोष्टीची परवा नव्हती. पण जेव्हा शहादू मरण पावला, तेव्हा मात्र काळजी वाटायला लागली होती. त्यावेळेपावेतो त्याला चार मुली होऊन गेल्या होत्या.एकदोन वर्षाचा फरक असलेल्या त्या मुली.त्याला पैदा करताना काही वाटलं नाही. पण जेव्हा त्याच्या खाण्यापिण्याची वेळ आली. त्यामध्ये किसनला वाईट वाटत होतं.
सह्याद्रीचा पश्चिम घाट.हा पश्चिम घाट भारताच्या पश्चिम किनाऱ्यालगत आहे.ही रांग अंदाजे सोळाशे किलोमीटर लांबीची असून तिनं तापी नदीच्या दक्षिणेकडून महाराष्ट्र,गोवा, कर्नाटक आणि केरळ या राज्यातून भारताच्या दक्षिण टोकापर्यंत भाग व्यापलेला होता.जवळ पास या डोंगररांगेच्या ६० टक्के भाग कर्नाटकात येतो.या डोंगररांगेचे क्षेत्रफळ साठ हजार चौरस किलोमीटर असून उंची सरासरी १२ मीटर आहे.अनेक उंच उंच शिखरे ही डोंगररांग आपल्यात सामावून घेत असून कळसुबाई, महाबळेश्वर, हरीचंद्रगड ही महाराष्ट्रातील प्रमुख, कर्नाटकात कुद्रेमुख,अनाई मुदी दक्षिण केरळमध्ये ही शिखरे आहेत.अनाईमुदी हे सर्वात उंच शिखर आहे.या डोंगररांगेत महत्वाचा खंडभाग पालघाट खिंडीच्या स्वरुपात आहे. हा भाग तमिळनाडू व केरळ यांना जोडतो.येथे सह्याद्रिची उंची कमी आहे.
पश्चिम घाटात सर्वात जास्त सरीसृप प्राण्यांच्या जाती आहेत. सह्याद्रीमध्ये जेवढ्या प्राण्यांच्या जाती आहेत. त्यातील निम्म्या जाती ह्या पश्चिम घाटात आहेत.उदा. बेडूक प्राण्यांच्या ज्या शंंभर जाती आहेत. त्यापैकी एकट्या पश्‍चिम घाटात ८० जाती आहे.वृक्षमंडूकाच्या ३५ जातींपैकी 29 जाती.देव गांडूळ नावाच्या प्राण्याच्या बेडकाच्या बावीस जातींपैकी वीस जातीे तर बांडा सर्पकुलातील ४५ जातीपैकी ३४ जाती ह्या सह्याद्री पर्वतात आहेत. सपुष्प वनस्पतींच्या ४००० जातींपैकी चौदाशे जाती सह्याद्री पुरत्या सीमित आहेत. साक्षात्कार ८६ जाती पैकी ७६ जाती.पाच हजार पेक्षा जास्त फूल झाडाच्या जाती. तसेच१३९ प्राण्यांच्या, ५०८ पक्षांच्या, १७९ उभयचर यांच्या जाती या सह्याद्री पर्वतात आहेत. कितीतरी प्रकारचे वृक्ष संपदा याच सह्याद्री घाटात असून तेरडा नावाच्या तसेच इतर झाडापासून दारू काढून ही आदिवासी मंडळी आपला उदरनिर्वाह करतात. गुजरात, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील सह्याद्री, तामिळनाडू, केरळमध्ये निलगीरी व मलयगीरी यांनी बनलेला सह्याद्री म्हणजे निसर्गाचे नंदनवन वाटते.गोदावरी, कृष्णा, तुंगभद्रा,कावेरी व वैगई यासारख्या पूर्ववाहिन्या आणि वैतरणा, सावित्री, काळी,शरावती, नेत्रावती,भरतपुळा, पेरियार यासारख्या पश्चिम वाहिनी नद्या सह्याद्री पर्वतात उगम पावतात. ज्याप्रमाणे सह्याद्रीच्या पश्चिम घाटातील जैवविविधतेचे नंदनवन दिसते.त्याप्रमाणे येथे खनिज संपत्ती विपुल आहे.हा भाग सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध असून इतर देशाप्रमाणे येथे विकास प्रकल्प जोमाने राबवले जातात. या भागाचे विशेष महत्त्व लक्षात घेऊन पर्यावरण मंत्रालयाने या भागात मार्च २०१० मध्ये या भागाचे निरीक्षण केले। त्यानुसार संवेदनशील परिसर क्षेत्र म्हणून या पश्चिम घाटातील काही गावे घोषित केली. तसेच पश्चिम घाट या भागातील प्रदेशाचे संरक्षण करून संवर्धन व पुनरुज्जीवन याबाबत शिफारस केली गेली होती. तसेच १९८६ नुसार उपाययोजनाही सुचविण्यात आल्या होत्या.१९८० च्या पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार या पश्चिम घाटातील परीसर क्षेत्राबाबत उपाययोजनेची शिफारस तर केली गेली. परंतू २०१० पर्यंत याच शिफारशींकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आल्यानं पुढे ३० जुलै २०१४ ला माळीण दुर्घटना घडली. ती दुर्घटना म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती होईल.जो इतिहास मोहेंजोदारो आणि हडप्पा संस्कृती निमित्ताने बनलेला होता. सन २००० मध्ये प्रणव सेन समितीने कोणत्या निकषावर संवेदनशील परिसर क्षेत्र ठरवावे? याबाबत एक अहवाल तयार केला.त्यात जैवविविधता,भरपूर पर्जन्यमान, डोंगर उतार, नद्यांचे उगम अशावर आधारित निकष होते. तसेच या समितीने अशा संवेदनशील परिक्षेत्राचे व्यवस्थापन कसे करावे? याबाबत मांडणीही केली नव्हती. कदाचित याचमुळे माळीणसारख्या दुर्घटनेला खतपाणी मिळालं. दरड कोसळणे व मारीण संपूर्ण खाली गडप होणे सह्याद्रीच्या डोंगर पायथ्याशी. असा विचार या गावात कधी कुणी स्वप्नातही विचार केला नव्हता की कधीकाळी अतिवृष्टी होईल व आपलं गाव त्या अतिवृष्टीत सापडेल.गावावर दरड कोसळेल व आपलं गाव संपूर्णता ढिगार्‍यात नेस्तनाबूत होईल.विजया सह विजयाची ती भावंडं सह्याद्रीच्या पश्चिम घाटात लहानाची मोठी होत होती. आपल्या सवंगड्यांसोबत राहतांना व खेळताना त्यांना मजा वाटत होती.गवतावर उडणारे तुडतुडे किंवा आकाशात उडणारे चतुर किंवा हाता जवळून उडणारी फुलपाखरे तसेच त्या फुलचुख्या पकडताना अगदी मजा वाटत होती. त्या नद्यांमध्ये पोहताना त्यांना अगदी आनंद वाटत होता. पश्चिम घाटात अनेक लहान मोठ्या नद्या गोदावरी, कृष्णा, कावेरी, ह्या मुख्य नद्या. या नद्या पूर्ववाहिनी असून बंगालच्या उपसागराला मिळतात. तर मांडवी व झुअारी यासारख्या पश्चिम वाहिनी नद्या अरबी समुद्राला मिळतात. नद्यांमध्ये भीमा नदी, मलप्रभा नदी यांचा समावेश होतो. पावसाळ्यात पश्चिम घाटाचे सौंदर्य अधिक प्रमाणात खुलते. कारण वरून येणारे पाणी हे पश्चिम घाटातील सर्वात उंच धबधब्याचे वैशिष्ट्य आहे.जास्त पाऊस पडत असल्याने येथील हवामान उष्ण व दमट असून तिथे १५ अंश सेल्सिअस तापमान असते.तिथे असणारी तसेच काही भागातील सदाहरित जंगले सह्याद्रीची शोभा वाढवतात.ही दाट जंगले आदिवासी लोकांसाठी उपयुक्त असून त्यांना वन संपदा ही जंगले उपलब्ध करून देत असतात. तसेच हत्ती,वाघा सारखे प्राणी सह्यांद्रीची शोभा वाढवतात.अजगराच्या काही जातीहा सह्यांद्रीत आहेत.तसेच अनेक विषारी व बिनविषारी साप इथे आहेत.
पश्चिम घाट कसा निर्माण झाला हे एक कोडेच आहे. दख्खनच्या पठारावरील अंतर्भूत घडामोडींमुळे निर्माण झालेली ही पर्वतरांग. सुमारे १५ कोटी वर्षांपूर्वी गोंडवन खंडाच्या झालेल्या तुकड्यामुळे सह्याद्रीची निर्मिती झाली असावी असे मानले जाते. गोंडवन खंडाच्या तुकड्यातून वेगळी झालेली भारतीय उपखंडाची जमीन ही सरकत सरकत युरेशियन उपखंडाला येऊन मिळाली. तिथे ज्वालामुखीचा उद्रेक झालेला असून तो लावा थंड होऊ लागल्यामुळे दख्खनचे पठार बनले.यात जो खडक बनला. तो बेसाल्ट खडक.हा सह्याद्री डोंगर रांगेत सर्वात जास्त सापडणारा खडक असून चार्कोलाईट, खोंडा लाइट लेफ्टीनाईट, लैटीनाईट, बॉक्साईट हेही खडक दक्षिणेकडील पर्वतरांगांमध्ये सापडतात.
सह्याद्री पर्वतात सततच्या पावसामुळे वातावरण जरी दमट असलं तरी पाऊस सुरू असताना प्रचंड थंडी असते. त्यामुळे किसन हा या थंडीपासून उब मिळवण्यासाठी दारूच्या आहारी गेला होता.तो जरी शेतीवर काम करीत असला तरी कधी कधी जंगलात जाऊन त्या जंगलातून काही फळ आणून त्या फळांवर प्रक्रिया करून दारु काढत असे. तीे दारू संबंधित सर्व गावाला विकत असे. कधी काळी जेव्हा त्याला शेतीवर काम नसायचं. तेव्हा तो याच दारूच्या पैशातून आपलं कुटुंब पोसत होता.अशाच वातावरणात किसनच्या मुली लहानाच्या मोठ्या होत होत्या. त्यांना बापाचा राग येत नव्हता.कारण बाप त्यांच्या सोबत खेळीमेळीच्या भावनेने राहत असे. नव्हे तर याच भावनेतून मुली आपल्या बापावर जीव लावत होत्या.
किसनच्या आजूबाजूची असलेली मंडळी ही पशुपालनाचा व्यवसाय करीत असून डोंगरावर शेळ्या मेंढ्या चारायला नेत.या सदाहरित वनस्पती च्या भागात नेत. मुळात या गावात जास्त प्रमाणात धनगर ही जमात होती.तसं पाहता या गावात शेती पीकवणारे अन्नधान्य कमी पडत असलं तरी गावातील लोक इतर भागातून अन्नधान्न आणत असत. किसनच्या मुली ज्याप्रमाणे लहानाच्या मोठ्या होत होत्या. त्याचप्रमाणे त्यांच्या मुलींना शिक्षणाची आवड वाटायला लागली होती. म्हणून की काय? या तीनपैकी दोन बहिणी मोठ्या होत्या.त्यांनी ह्या शिक्षणाची आवड लक्षात घेऊन आपल्या धाकट्या बहिणीचे नाव शाळेत टाकलं होतं.विजया शाळेत जात होती.ती मन लावून अभ्यास करीत होती. आपल्या सवंगड्या सोबतच खेळणं तिला आवडत नव्हतं. कदाचित तिच्या मनाने चांगले शिक्षण घेण्याचा ध्यास घेतला होता.परंतू ते शिक्षण पूर्ण होऊन जाते की काय हे तिला माहीत नव्हतं. विजया दिवसभर शाळेत जात होती. तेव्हाचे संवाद आजही तिच्या स्मरणात होते. तिला ते सर्व आठवत होतं. तो बाप ती आई अन त्या मलब्यात झालेल्या दुर्घटना सह सर्व परिवार काही तिला आठवत होता.
विजयाची शाळा सुरू झाली होती. आज शाळा सुरू व्हायला महिना झाला होता. शिक्षिकेने पावसाची कविता शिकवली होती. कालपर्यंत वातावरण सुखद होतं. पण आज दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. सायंकाळी शाळेला सुट्टी झाली. शिक्षकांनी रेनकोट वापरला आणि ते जवळच्या गावी आपली मोटारसायकल सुरू करून रवाना झाले. नेहमीप्रमाणे किसन घरी आला. आईही कामावरून घरी आली. तिने ताबडतोब स्वयंपाक बनवला. त्याचबरोबर तिच्या दोन बहिणींनी स्वयंपाकात मदत केली. तसा आपल्या आई-बाबांना जेवण देऊन ते झोपी गेले होते. बाहेर पाऊस मात्र धो-धो पाऊस कोसळत होता. त्यातच अर्ध्या रात्री विजयाला जाग आली. तिला शौचास लागली.
रात्रीचा तो प्रहर.काळाकुट्ट अंधार.घड्याळीचा पत्ताच नव्हता. एवढ्या जोरात लागली होती की तीनं आपल्या आईला तेवढ्याच रात्री उठवलं. शौचालयाची व्यवस्था नसल्याने गावाच्या बाहेर गेली होती. तेवढ्यात अर्धा डोंगर खचला.
विजेचा गडगडाट व्हावा असा भयंकर आवाज झाला.डोंगरावरून पाणी तीव्र गतीनं खाली आलं.त्यातच पाण्यासोबत मातीचा थरही.अशी ती अवस्था होती.
विजया सातवीत होती. ती शौचास बसली होती. तिला काय होतं आहे हे समजत नव्हतं. अशातच विजयाचे घर त्या मातीच्या ढिगार्‍यात गाडलं गेलं. त्यातच छाया ते दृश्य पाहत होती.एकीकडे तिची मुलगी शौचास बसली आहे. तर दुसरीकडे तिच्या मुली व तिचा पती दरडेत गडप होत आहे.तिनं आपल्या मुला-मुलींच्या विचार केला.विजयाचा विचार केला नाही. तिला वाटलं की थोडासा गाळ आहे.आपण आपल्या व आपल्या पोरांना वाचवायला हवं.ती तशी त्या गाळाच्या दिशेने धावली. ती आपल्या घराच्या जवळ आली. आपलं घर सुंदर डोळ्यांनी न्याहाळू लागली. इतक्यात पुन्हा दरड कोसळली व त्या दरडेत छायाही आपल्या पती व मुलांसह गडप झाली.
दरड कोसळण्याच्या आवाजानं जी घरं वाचली होती. त्या घरातील लहान थोर माणसे घरातून बाहेर पडलीे. ती आपल्या पशुधनाची पर्वा न करता सैरावैरा धावत सुटली. रात्रीच्या अंधारात जिकडे रस्ता सापडेल तिकडे धावत होते ते लोक सैरावैरा. त्यांना काय करावे ते समजत नव्हते. अचानक राम्यांनं विजयाला रडताना पाहिलंय. त्यानं विचार केला नाही.तसं अाव न पाहता त्यानं विजयाचा हात जोरात पकडला व तिचा हात खिचत तोही जोरात धावू लागला. जिवाच्या आकांतानं कदाचित आपण यात सापडू नये असे त्याला वाटत होतं.सकाळ झाली होती.काही लोक सुखरूप बचावले होते. काही मात्र या दरडीखाली दफन झाले होते. कुणाचं कोण गेलं.हे ठरवता येत नव्हतं. विजय मात्र रडत होती. कारण तिच्या कुटुंबातील सहा जणांपैकी पाच जण दरडेत गेले होते. हे तिनं प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं होतं.तीे जिवाच्या आकांताने रडत होती. पण तिच्या रडणं कोणालाच ऐकायला जाऊ शकत नव्हतं.कारण त्या गावातील प्रत्येक घरातला एक एक माणूस गेला होता. काही जण वाचले होते.पण ते हळळत होते. कारण सगळ्या गावाचे ऋणानुबंध एकमेकांशी जोडलेले होते.
विजया आणि तिचे आई-वडील प्रमाणीक होते. हे तिला माहित होतं. म्हणून ती प्रामाणिकपणाचे फळ देणार्‍या निसर्गाला दोष देत होती. तिचे आई-वडील नात्यांमधील परस्पर विश्वास जपत होते. प्रामाणिकपणाचे फळ देणारा निसर्गाला ते दोष देत होती.पण आता दोष देऊन काही उपयोग नव्हता.तिचे आई-वडील नात्यांमधील परस्परांचा विश्वास जपत होते. कोणाची फसवणूक करीत नव्हते.प्रामाणिकपणा आपल्याला निर्भय बनवतो असे त्यांना वाटत होतं. त्याच प्रमाणे प्रामाणिकपणाच्या गोष्टी त्यांनी विजयाला तसेच आपल्या इतर लेकरांना शिकवल्या होत्या.अप्रामाणिकपणानं वागल्यास आपला आत्मविश्वास कमी होतो. तसेच समाजात प्रामाणिकपणा पाहिजे असे ते सांगत होते.तसेच आपल्यात आदर निर्माण होतो.फार मोठी ताकदही निर्माण होते असे ते सांगत होते.
"विजयाले शाळेत घालू या. आम्हाले नाय शिकवलं तं चालन. पण आपल्या विजयाले शिकवूया. एक तरी आपल्या घरी शिकलेला व्यक्ती पाह्यजे."
"अवं पण पैसा?"
" पण पैसा बाबा आम्ही कमावणार."
" तिच्यासाठी कमवणार. तुम्ही फकस्त हो म्हणा. बाकी आमच्यावर सोपवा आम्ही पाहू का करायचे ते. तुम्ही लक्ष घालू नका."
" बरं पोरींनो तुम्हाले जे वाटेल ते करा."
किसननं हो म्हणताच शालिनी,मालिनी, शाळेत गेल्या.त्या बाईशी भेटल्या.तसेच तिचं त्या शाळेत नाव दाखल केले.आता विजया प्रामाणिकपणे शाळेत जात होती. तिच्या बहिणी शिकल्या नव्हत्या. काबाडकष्ट करीत होत्या. शाळेत विजयाची शाळेतील फी भरत होत्या. विजयाही मन लावून शाळेतील अभ्यास करीत होती.अशातच मालिनी थोरली असल्याने तिला पाहण्यासाठी स्थळ येत होतं.पण ती आपण जर केला तर आपल्या बहिणीचं शिक्षण जाईल या हेतूने मालिनीनं विवाह टाळला होता. तिनं सातवी पास झाली की आपण विवाह करू असा निर्धार केला होता. परंतू काळाने काही तिची विचार करण्याची भावना ओळखलीे नव्हती. ओळखले तरी ऐकली नव्हतीे. तिही वडिलांच्या नुसार प्रामाणिक होती.प्रामाणिक असल्यास लोकांच्या लवकर सेवा मिळतात असं ते म्हणत होती.प्रामाणिकपणा जीवनातील शिस्त आणि कार्यक्षमता वाढवण्यास मदत करते असे तिला वाटत होते. कुटुंबात आपण एकमेकांना सहकार्य करावे असे त्यांचे आई-वडील त्यांना सांगत होते.एखाद्यावेळेस संकट आल्यास तसेच अशाच प्रकारच्या सहकार्याने ते संकट झेलुन घेत असत. कोणते संकट सहकार्यानेच पार पडते असे आई वडील मानत असत. आपल्या सर्वांमध्ये काही ना काही दोष नक्कीच असतात, परंतू ते दोन मित्र मैत्रिणी आणि सहकार्‍यांच्या मदतीने नक्कीच दूर करता येतात. एकमेकांचे विचार प्रत्येकाला पटेलच असे नाही.आपल्या मित्र-मैत्रिणी मध्ये कधी कधी भेदभाव होतात.मतभेद होतात. पण आपण आपले म्हणणे खरे आहे असे न म्हणता इतरांचे म्हणणे समजून घेतले पाहिजे. प्रसंगी दुसऱ्याचे ऐकावे. ऐकलेच पाहिजे.यातून सहजता वाढीस लागते. हे आई-वडिलांचे शिकवणे होते. लहानपणापासून तिच्या तिच्या तीनही बहिनीवर आई-वडिलांचे चांगले संस्कार होते.ते जरी जास्त शिकलेले नसले तरी चांगल्या गुणांचे बाळकडू ते आपल्या लेकरांना पाजत होते. धर्म, पंथ, परंपरा,रिती रिवाज पाळणारे अनेक लोक गावात होते.त्यांना सहिष्णुता बाळगण्याची आवश्यकता होती.कारण त्यामुळे समस्याचे निराकरण करता येत होते. विजयाचे वडील भेदभाव मानत नसत. परंतु मुलांच्या प्रतीक्षेसाठी त्यांनी चार चार मुली होऊ दिल्या होत्या.ही बाब भेदाभेद करणार होती.मुलांनी एकमेकांचा आदर करावा असे जरी त्यांना वाटत असले तरी प्रत्यक्ष जीवनात त्यांनी मुले मुली असा भेदाभेद केला होता. पण नियतीनं त्यांना फक्त मुलीच दिल्याने पुढे त्यांच्या मनातील स्त्रीपुरुष भेदाभेद प्रश्न मिटला होता. तसेच ते नव्याने स्त्री-पुरुष समानतेचे मूल्य आपल्या मुलींना शिकवत होते. स्त्रीपुरुष भेदाभेद मुलीमुलांमध्ये मुळीच करू नये असे ते सांगत होते. तो मुळीच करू नये असं ते सांगत असत.समानतेची भावना वाढीस लागल्याने सर्वांना प्रगती करता येते, सर्वांना शिकता येते असे ते सांगत. आई-वडील शिकवीत असत चांगले संस्कार.
सर्वांनी नियम पाळले पाहिजे.याविषयी सांगताना आई वडील प्रत्येकाने जबाबदारी ओळखायला हवी. प्रत्येकानं नियमानुसार वागायला हवं. नियमानुसार चालला नाही तर त्याची परिणीती एका पशूसारखी होते. जर आपण नियमानुसार चाललो नाही तर पशू आणि माणूस यात कोणताच फरक उरणार नाही आणि मग पुढे कोणी लहान व कोणी मोठा असतो हे समजणार नाही.नियम मोडला की शिक्षा देतांना ही लहान-मोठा भेदभाव करू नये असे ते सांगत. आपण आपल्या फायद्यासाठी नियम बनवले असून नियम पाळणे आपल्या हिताचे आहे.पण नियमानुसार दोन प्रकार असतात. त्या दोन प्रकारात पहिला म्हणजे आपल्या स्वतःचे नियम आणि दुसरा प्रकार म्हणजे निसर्गाचे नियम. अतिवृष्टी, पूर,वादळ हे ठरलेले असून चार महिने उन्हाळा,चार महिने पावसाळा,चार महिने हिवाळा असणारच. हिवाळ्यानंतर थेट पावसाळा येणारच नाही किंवा जानेवारीनंतर जून येणारच नाही हेच निसर्गनियम होत.आपण नियम पाळताना जसे आपले नियम पाळतो. तसे निसर्गाचे नियम पाळावेत असे ते सांगत.समजा पावसाळा लागला आणि आपण निसर्गाचे नियम न पाळता पेरणी केली नाही तर आपल्याला पीक येणार नाही. असे ते म्हणत असत. निसर्गाचे व्यवहार निसर्गनियमानुसार चालतात. ते आपण बदलू शकत नाही. प्रसंगी आपण आपले नियम बदलू शकतो. याबद्दल माहिती देताना किंवा ऋतुचक्रातील बदल हे कधीच थांबत नाही. गुरुत्वाकर्षणाचा नियम कधीच बदलत नाही. हे नेहमी स्थिर स्थिर आणि निश्चित असतात.ते काल बाह्य होत नाही.परंतू आपले नियम हे कालबाह्य होत असतात. परिस्थितीनुरूप बदलावे लागते आपले नियम.कोणावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये म्हणून नियम.नियम बनवावे.
त्यांनी जरी मुलांना जन्म दिला नाही तरी लोकांचे मुलगा मुलगी भेद करणे आवडणारे नव्हते. काही लोक गावातीलच त्यांना तसे भेद करणारे वाटत होते.ते मुलींना ती मुलगी आहे म्हणून शिकवीत नव्हते. मुलींचे लवकर विवाह करून देत असत.मुलींना त्यांच्या विवाहाबाबत पसंती नव्हती. कित्येक गोष्टी त्यांनी अनुभवल्या होत्या. त्यांचा जेव्हा विवाह झाला होता छायाशी. तेव्हा आई-वडिलांनी छायाला तिची परवानगी विचारली नव्हती. हे कुठेतरी किसन रावाला खटकत होतं. म्हणून की काय मालिनी मोठी झाली तरी तिचा विवाह त्यानं जबरदस्तीने केला नव्हता. तर तो तिच्या पसंतीने तिचा विवाह करून देणार होता.मुले तिला पाहायला पाहुणे म्हणून जरी येत असले तरी त्यांनी विवाहासाठी वर निवडतांना मालिनी लाच तिची पसंती विचारली होती आणि ती विजया सातवी पास झाल्यावर आपला विवाह करू असे म्हणत होती. ती विवाह करण्यासाठी विजयासाठी थांबली होती.
गावात अनेक चांगल्या रूढी परंपरा होत्या.लोकं त्या रूढी परंपरेचे पालन करीत असत.दरवर्षी गावातील लोक म्हसोबा च्या दर्शनाला जात.कोणी देवीचा गोंधळ घालत असत, तर कोणी देवीला नवश म्हणून बळी देत असत.देवीला नवस कबूल करून देवी नवसाला पावते असा त्यांचा समज होता. जर एखादं काम झालं तर देवी नवसाला पावली असा संकेत गृहीत धरून ती मंडळी देवीला त्याचा बळी देत असे. पण किसनला बळी देण्याची प्रथा तसेच त्यांचे मांस भक्षण करणे आवडत नव्हते.
मुळात हिंसा करू नये. हिंसेने शांतता भंग होते. असे ते मानत. त्यामुळे मुळात जी माणसे अशा रूढी, परंपरा पाळतात त्या परंपरा व रुढी किसनला आवडत नव्हत्या.कारण देवी देव्या मान्य साहजिक आहे.पण या देवी देव्यांच्या नावाने निष्पाप जिवांचा बळी देऊन आपण आनंद व्यक्त करणे याबद्दलची भयंकर चीड किसनला वाटत होती. यासाठी तो आपल्या घरी बकर्‍या,कोंबड्या पाळत नसे तर ही परंपरा त्याला आवडत नव्हतीे.
सती प्रथा....ही एक प्रथाच होती.अनिष्ट प्रथा जरी असली तरी ती परंपरा चालत आली होती. परंतू ही कृप्रथा असल्याने लोकांनी या प्रथेला विरोध करून ती प्रथा ज्याप्रमाणे लोकांनी हद्दपार केली, त्याचप्रमाणे बकऱ्याचा परंपरेनुसार बळी देणे ही क्रूरताच आहे हीदेखील कुप्रथा बंद करणे अत्यावश्यक आहे. असे किसनला वाटत होते. त्यामुळे ही प्रथा बंद करण्यासाठी विशेष कायदे करून ही प्रथा बंद करावी. काही प्रथा जरी बंद झाल्या नसल्या तरी त्याबाबत कायदे बनले होते. त्यातून जादूटोणा करून लोकांना फसविण्या वर बंदी आणणारा कायदा तसेच हुंडाबळीचा कायदा करून या दोन्ही प्रथा सरकारने बंद केल्या होत्या. त्याचबरोबर जंगल तोडीचा कायदा बनवला होता.
अाजही गावात वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत होती.जरी वृक्षतोडीचा कायदा असला तरी लोक सरकारच्या आदेशाला जुमानत नव्हते.चुकीच्या रूढी-परंपरा मुळे समाजातील काही लोकांच्या वाट्याला उपेक्षाच येते व प्रगतीची संधी मिळत नाही.गरिबी, दारिद्रय वाट्याला येते असे किसनला वाटत असे. हे सर्व शिक्षणाच्या अभावानंच भाग्याला येतं.असं त्याला वाटायचं. पण तरीही त्यांनं आपल्या मुलींना शाळेत घातलं नव्हतं. कारण त्यांना शिक्षण द्यायला त्याच्याजवळ पुरेसे पैसे नव्हते.पैसा तो कमवित असे. त्या पैशात घरचा खर्च भागत नसे.
आज किसनच्या घरची सगळी मंडळी कामाला जात होती. त्यामुळे मालिनीने विजयाला शिकवा म्हटल्यावर किसना एका पायावर तयार झाला. तिला शाळेत दाखल केलं व विजया शिकती झाली.
दरवर्षी गावात मेंढी कापण्याची प्रथा होती. देवीला जर मेंढी बळी म्हणून दिल्यास गावात संकट येत नाही असंच गावकऱ्यांना वाटत होतं.त्यावेळीही त्यांनी असा बळी गावाच्या देवीला दिलाच होता.तरीही देवीनं गाव वाचवलं नव्हतं.स्वतःही तिचं मंदीर दरडेेत सामावलं होतं.हे विजयाला आज कळत होते. तरी पण आज विजयाला वृक्षतोडी बद्दल खंत वाटत होती.जरी तज्ञ समितीनं या घटनेत वृक्षतोडीला दोष दिला नव्हता. तसेच माळीण दुर्घटना ही जंगल तोड झाल्याने झाली असे तिला वाटत होते. आज दिवसभर अकरा वाजेपर्यंत गावात कोणी ना कोणी येतच होता.ते वाचलेल्या जीवाला नाना प्रकारचे प्रश्न विचारीत होते. कोणी सहानुभूतीचे बोल बोलत होते.मात्र आज वाचलेल्या ग्रामस्थांच्या डोळ्यातले अश्रू सुकलेले होते. ते सुन्न नजरेनं त्या ढिगा-याकडे आस लावून पाहात होते. कदाचित त्यांना वाटत होतं की ही ढिगारा उपसतांना कदाचित आपल्या घरच्या एखादा जीव जिवंत निघेल. समजा एखाद्या जिवंत निघालाच तर अगदी हायसं वाटत होतं.
आज तीन दिवस झाले होते.आज तिसऱ्या दिवशी तीन वर्षाचा बालक मलब्यातून जिवंत निघाला होता. तीन दिवस होऊनही त्याच जीवन, त्याचं जिवंत निघणं निसर्गाचा चमत्कार होता. पण विजयाच्या घरचे कोणी जिवंत बाहेर अजूनही निघालेले नव्हते. तसेच निवृत्त शरीरही निघालं नव्हत.नक्कीच आता आपल्या बहिणी व आपले आई वडील जिवंत नसणार असं तिला वाटत होतं.तीे त्यावेळी अकरा वर्षाची होती.तिला पाहिजे तेवढे समजत नव्हतं.पण आता तिला ते समजलं होतं.ती विचार करीत होती एखाद्या शहाण्यासारखी. तिला वाटत होतं की आपण अनेक बाबतीत निसर्गावर अवलंबून राहतो. निसर्ग आपल्या गरजा पूर्ण करतो.त्यामुळे आपल्या गरजांची पूर्तता करतानाच आपल्या भावी पिढ्यांनाही साधन संपत्ती पुरली पाहिजे. असा विचार न करता केवळ आपलेच स्वार्थीपण जपल्यानं ही दुर्घटना झाली असावी असं मनोमन वाटत होतं.
आज पाचवा दिवस होता. खोदकाम सुरू होतं. त्यातच या खोदकामात तिचा परिवार निघाला होता. मालिनीसह सगळी मंडळी मृत पावली होती. कसाबसा सगळा संसार चालला होता किसनचा. त्यातच या विघ्नानं पूर्णतः संसार बुडला होता ग्रामस्थांचा.आता पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले.त्या मृतदेहांना पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले.पोस्टमार्टम झालं व मृत देह त्यांच्या नातेवाइकांच्या स्वाधीन केले. त्याची विल्हेवाट लावली गेली. पण आता विजयाचं काय? कुठे जायचं तिनं?असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच तिला तिच्या मामानं आपल्या घरी नेले. विजया मामाच्या घरी राहायला गेली. पण मामीच्या काय? मामी मोठी खास्ट होती. ती आपली पोरं व आपल्या नंनदीची पोर,सारा भेदभाव करू लागली.घरची सगळी मंडळी तिला काम करायला लालायित. स्वतः मात्र झोप घेत होती. तेव्हा विजयाला मायबाप आणि तिच्या त्या बहिणी आठवत होत्या. कधी कधी अश्रू येत डोळ्यांना.पण काय करणार? काही उपयोग नव्हता.
मामालाही पाच मुलं होती.मामा कंपनीत कामाला होता. त्यामुळे कोणत्याच सोयी नव्हत्या.जागा अपुरी पडत होती. रात्रीचे जेवण घड नसायचं. दररोजच्या जेवणात पिठलं भात असायचा.
विजयाला सकाळी उठल्या वर विजयाला काम करावे लागत असे. सकाळी सडा सारवण करून सर्वांसाठी पाणी गरम करावे लागत असे.मात्र तरीही जेवण करते समयी हे मामीचे टोमणे ऐकायला मिळत. मामा मात्र त्यावर काहीच बोलत नव्हता. दुपारच्याला मामाची सगळी लेकरं कामाला जात नव्हती,तर ती शाळेत जात असत.
त्या कोवळ्या वयात मामी विजयाला कामाला नेत असे शेतावर. परत घरी आल्यावर चूल फुंकावी लागत असे.शिवाय आपल्या माय बापाला खाल्लं,करंटी कुठली.हेही बोलणे खायला मिळत.
दरड कोसळण्यात विजयाचा काही एक दोष नव्हता.नैसर्गिक कारणाने ती दरड कोसळली होती. पण त्या दरडीचा सारा दोष मामी भाग्याशी लावून अशी करंटी एक दिवस आपल्यालाही खाऊन टाकेल असे वारंवार म्हणत असे. अशा प्रकारच्या शब्दप्रयोगानं विजयाच्या अंगावर काटे उभे राहत. कधी एकदाची तिथून निघून जातो आणि कधी नाही असं तिला वाटायचं.
ते लहानगं वय. विजयाला मामी नाना त-हेचे बोल बोलत होती.ते अत्याचार सहन न झाल्यानं त्यातच रात्रीला ती उठली व ती मामामामीच्या पायावर नतमस्तक होऊन त्या घरातून त्याच अंधार्‍या रात्री बाहेर पडली होती. आपल्या गावचा रस्ता चालत होती.ज्या गावात दरड कोसळली होती. त्यावेळी सहा महिने झाले होते.
विजया अचानक घरातून बेपत्ता झाली.हे सकाळी लक्षात आलं होतं. पण मामींनं मामाला बजावलं की याची चौकशी करू नका. कारण चौकशी केली तर उद्या नातेवाईक विना कामांनं आणि कारणानं आपल्या मागे लागतील. पोलिसही आपल्याला तासतील व आपण गोत्यात येवू.अनाथ पोर ते. तिच्याबद्दल चौकशी न केलेली बरी. नव्हे तर जिथे आपल्यालाच खायला पुरत नाही.तेथे तिला पालवायचं कसं मामीनं मामासमोर प्रश्न मांडला.मामालाही तो प्रश्न पटला.नव्हे तर विजया घरुन गेल्याची गोष्ट त्यानं बाहेर काढली नाही.
माळीण पूर्णतः मातीच्या ढिगार्‍यात गडप झाल्यांनं नकाशावरून पुसले गेलं होतं.त्या ठिकाणी लोक येत व ते मातीचे ढिगारे पाहून हळहळत असत.कोणी कोणी पुनर्वसनाच्या गोष्टी करीत.कोणी अश्रू ढाळत असत. विजया पायी चालत चालत निश्चित था माळीण जवळच्या ढिगा-याजवळ येऊन पोहोचली होती. तिथे दृश्य न्याहाळत होती.मनातल्या मनात हळहळत होती.तेवढ्यात आमडेगावाजवळ पुन्हा स्थापित झालेल्या एका माळीणच्या एका ग्रामस्थाने विजयाला पाहिलं. त्यानं तिला ओळखलं.तसा तो तिच्या जवळ आला. म्हणाला,
" विजया होय."
"हो."
"बेटा एवळे दिस कोठं गेली होतीस?"
ती तशी रडायला लागली न बोलता.
" बेटा एवढे दिवस कुठे होतीस?"
"........."
ती काहीच बोलली नाही.विजया काहीच बोलत नाही हे लक्षात घेऊन त्या ग्रामस्थांनं तिला आपल्या घरी आणलं. तिच्या येण्यानं गावाला आनंद झाला.किसनच्या वारसापैकी कोणीतरी जिवंत असल्याचा दिव्य आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. तसं गाव लोक गाव फारच चांगलं होतं.लोक मात्र तिला सहा महिने कुठे होतीस? हाच प्रश्न सातत्याने विचारत होते.परंतू ती मात्र त्यावर काहीच बोलली नाही.
ती आता आमडे शेजारी बनलेल्या गावात एका ग्रामस्थांच्या घरी राहत होती जणू त्या माणसाने तिला दत्तक घेतलं होतं.तिला तिच्या मामीच्या घरी कामाची सवय असल्यानं ती त्या माणसाकडे काम करीत असे.तोही तिला चाहत असे.आपल्या पोटची पोर असल्यागत.
आमडे गावात लोकांचं पुनर्वसन झालं होतं.पण अजून पर्यंत काहींना हिताची जागा मिळालेली नव्हतीे. शाळा सुरु झाली नव्हती.विजयाला शिक्षणाची आवड होती. तिला वाटत होतं की खूप मोठं शिकावं. कारण शिक्षणाचे बाळकडू तिच्या बापाने आणि मालिनीनं पाजले होते. आज ते हयात नव्हते.पण त्यांनी केलेले संस्कार तिच्यात कुटकूट भरले होते.
गावात एक माणूस राहत होता.ज्याने तिला विजयाला ढिगा-यात बेपत्ता होण्यापासून वाचवले होते. त्याच माणसाकडे ती राहत होती. अगदी त्याची मुलगी असल्यागत.राम्याला दोन मुले होती. मुली नव्हत्या. त्यामुळे कदाचित त्याला मुलगी हवी असल्यानं तो तिचे पालनपोषण करीत होता. तशी त्याची पत्नी तिला जास्त चाहत होती.
राम्याला दोन मुले होती. त्याने विजयाला वाचवले होते. ती आठवण तर विसरु शकत नव्हता. पण त्यांची दोन्ही मुलं त्याच माळीणच्या दरड कोसळण्यात बेपत्ता झाली होती. आता त्याच्या वंशाला वारस नसल्यानं आपल्या मुलासारखाच विजयाला तो सांभाळत होता.
अशातच गावात शिरगणती झाली. अशा गावात कोणकोण राहात होते. त्यांचा सर्वे करण्यात आला. त्यातच राम्यानं विजयाचं नाव लिहायचा प्रयत्न केला.पण साहेब त्या नावाची विजया ही वेगळी का राहात नाही?असे म्हटल्याने तिचं नाव लिहिता आलं नाही.त्यामुळं विजयाचं नाव यादीत आलं नव्हतं. नव्हे तर विजयानं नाव गावात दाखल करून घेतलं नाही.
विजया शिकत होती. सहा महिने उलटल्यावर शिक्षकांनी कोणतेच आढेवेढे न घेता आपल्या शाळेत विजयाचं नाव दाखल केलं होतं. तिचा स्वतःचा बाप नसला तरी राम्या बाप म्हणून आपले कर्तव्य पार पाडत होता.तो मात्र कोणत्याच प्रकारचेे आढेवेढे घेत नव्हता.
नवीन गावात शाळा पोहोचली होती.पण सध्याच्या स्थितीत खूप त्रास होता.आता ती शाळा पुर्वीसारखी नव्हती.ती बंद राहायची.कधी पाऊस तर कधी संपाने.माळीणच्या गावचे वाचलेले लोक तसेच आजुबाजूचेही लोक पुनर्वसनासाठी शासनाशी भांडत होते.त्यामुळं ही शाळा आहे की चैन आहे हे कळायचंच नाही.
आमडे गावात शिक्षणाची होत असलेली आबाळ लक्षात घेता राम्यानं विजयाला तालुक्याच्या ठिकाणी टाकायचं ठरवलं.पण तालुक्याचं ठिकाण काही जवळ नव्हतं.तसेच त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग काही बरोबर नव्हता.त्याचा मार्ग काट्याकुट्यातून जात असे.दगडधोंड्यातून व द-याखो-यातून जात असे.सर्व शिक्षा अभियान तसेच गाव तिथं शाळा अशा प्रकारच्या योजनांमधून सह्यांद्रीतल्या ब-यातशा गावात शाळा पोहोचली होती.पण सध्याच्या स्थितीत खुप ठिकाणी शाळा कागदावरच होती. शिक्षक शिकवायला येत नसत. त्यामुळे साहजिकच मुले गुरे चारायला किंवा शेळ्या मेंढ्या चरायला जंगलात जाण्याची कामं करीत असत. दुसऱ्या शाळेत शिकायचे झाले तर प्लास्टिक पिशवीत शाळेचे दप्तर भरून डोंगराच्या खाचखळग्याच्या रस्त्याने पायी निघत.नदी पार करताना ती लहानगी मुलं नदीवर टाकलेल्या लाकडी सांकवावरून जीव धोक्यात घालून नदी ओलांडत. तर नदीला पाणी नसल्यास पायी त्या नदीमधून निघत असत.
पावसाळ्याचे चार महिने तर नुसता वैताग यायचा.वादळी वारा अंगाला स्पर्श करून जात असल्याने डोक्यावर छत्री टिकायची नाही. नुसतच कधी कधी ओळख किंवा ओढा पार करताना तोल गेलाच तर पूर आलेला ओढा या मुलांना आपल्यासोबत घेवून जायचा.
माळीण सारख्या गावात राहणारी ही आदिवासी मूलं पट्टीचं पोहणं पूर्ण शिकली होती. एखाद्यावेळी ओढा ओलांडतांना त्या सांकवावरुन पडल्यास आपल्या जीवाला क्षती पोहोचू नये म्हणून शाळकरी मुलं पोहणं शिकली होती.
मुलांना शाळेत जायला कोणी जबरदस्ती करीत नव्हता.परंतू शिक्षणाची ओढ त्यांना स्वस्थ बसू द्यायची नाही. शिक्षणही उन्नतीची शिडी आहे.हे कुठेतरी त्या विद्यार्थ्यांना पटलं होतं. त्या आदिवासी मुलांना वाटत होतं ते म्हणजे कदाचित हेच शिक्षण आपली, आपल्या गावची व्यवस्था बदलून टाकेल.म्हणूनच की काय ते आवर्जून शाळेत जात होते.जरी ओढ्याच्या पुराचा धोका असला तरी ही...... विद्यार्थ्यांची दररोज होणारी पायपीट तसेच विद्यार्थ्यांची होत असलेली शिक्षणाची आबाळ पाहून शासनाने या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी आश्रम शाळा काढल्या होत्या.या आश्रमशाळेत तीन वर्षाची मुले घरापासून लांब लांब राहत होते. आठवड्याला एकदा घरी जात होते. पण मी शिक्षण घेईल.याचा निर्धार करुन ते शिकत होते.
मुलींच्या शिक्षणात लोकांना रस वाटत नसे. मुलींनाही आदिवासी लोक शिकवीतच नसत.मुलींना केवळ शिकूनही चूल व मुलच करावी लागतात असे लोकांना वाटत असे. मुली जास्त करून शाळेत जात नसत. शाळेत यामुळेच शाळेत मुलींची उपस्थिती कमी असायची.
काही काही शाळेत हा आदिवासी भाग जरी असला तरी उपस्थिती असायची.याचे कारण त्यावेळचे शिक्षण.या शिक्षकांच्या केवळ बोलण्याणच शाळेत उपस्थिती राहात होती. शिक्षकांचे प्रेमळ बोलणे, मुलांसोबत गप्पा गोष्टी सांगणे, बागडणे, नाचणे, वावरणे यामुळं विद्यार्थ्यांची शाळेची ओढ टिकून राहात असे. शिक्षकांच्या लाड करण्याने ही मुले कितीही पाणी का असेना, कितीही खाचखळगे वा संकटं का असेना किती दगडधोंडे का असेना शाळेत जात होते,नव्हे तर त्यांना शाळेची हुरहूर लागत होती.शाळा हे विद्येचे नाही तर सर्व गोष्टीचं मंदीर आहे प्रकर्षाने जाणवत होतं. कारण गावात एक शाळा होती.ती इतर गावातील लोकांसह वाचली होती. बाकी सगळं मंदिरासह स्मशान झालं होतं.
वाहतुकीच्या व्यवस्था माळीणसह सह्याद्रीच्या पश्चिम घाटात व्यवस्थित नव्हत्या.तसेच मोबाईल, स्मार्टफोन गावात नव्हताच. कारण गावात शिक्षणाची पुरेशी सोय असली तरी शिक्षण लोकांना व्यवस्थित मिळत नव्हते. त्यातच एखाद्याजवळ जर मोबाईल जरी असला तरी त्या डोंगरात नेट कव्हरेज राहत नसल्याने मोबाईल मधून कोणाला फोन करायचा झाल्यास तो अजिबात लागत नव्हता.संदेशवहनाद्वारे आपल्याला माहिती मिळते हे जरी खरं असलं तरी पुरेशा संदेशवहनाच्या सोयी नव्हत्या. त्यामुळे माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग ज्ञान निर्मितीसाठी होत नव्हता.
पाचवीत सहावीत शिकणारी मुले,त्यांना फक्त शेतीवर जाणे, जंगलात मेंढ्या घेऊन जाणे हे समजत असे. शाळेत जाऊन शिकणे हे तेवढे समजायचं नाही. पाऊस पडत असताना व तेथील बेसाल्ट दगडाच्या तुकड्यांनं व मृदेने लाल झालेलं पाणी,ते अशुद्ध पाणी पिऊन आपली तृष्णा भागवणारी ही जमात ते गढूळ पाणी पीत असली तरी आजारी पडत नसत.कारण जंगलातील झाडपत्ती खाऊन तसेच त्या रोगमुक्त वातावरणाची सवय पडल्याने त्यांच्यात रोगाशी लढणारी प्रतिकारशक्तीही साहजिकच निर्माण झाली होती. पाण्यात मिसळलेले पदार्थ हे सजीवांसाठी अपायकारक असतात हे जसं आपल्याला कळतं तसं त्यांना कळत नव्हतं. पाणी प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, हवा प्रदूषण हे जरी खरं असलं तरी ते त्यांना कळत नव्हतं. निसर्ग सानिध्यात वावरत असलेली ही जमात काटकसर करण्यात अगदी पटाईत झाली होती.
बाष्पीभवनामुळे पाण्याचे सतत वाफ होत असते.त्यामुळे अवर्षण अनुभवणाऱ्या भागातील नद्या,तळी,विहिरी,बंधारे, धरणे यातील पाण्याची पातळी बाष्पीभवनामुळे कमी कमी होते किंवा त्यापैकी काही कोरडेही पडतात.तसेच जमीन कोरडी पडते. अशा परिस्थीतीत जनावरांना आणि आपल्याला पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते.शेतीसाठीही पाणी मिळत नाही.म्हणजेच दुष्काळ पडतो. मग या दुष्काळात जनावरांचा चारा व माणसाला धान्य मिळणे कठीण जाते.ज्या भागात दुष्काळ पडतो, तेथील लोकांना विपरीत परिस्थितीशी सामना करावा लागतो.त्या भागातील प्राणी, वनस्पती यांना ही दुष्काळाचा तडाखा बसतो.या गोष्टी येथील लोकांना कळत नव्हत्या.शासनातर्फे दुष्काळग्रस्त भागातील लोकांना आणि प्राण्यांना सुरक्षित जागी हलवले जात होते. पण ती व्यवस्था तात्पुरती असायची.
डोंगर उतारावर शेती असल्याने पावसाचं पाणी ओहवत जाऊ नये म्हणून साठवून ठेवण्याची प्रथा पश्चिम घाटात होती.उतारावर लहान लहान बंधारे बांधणे, आडवे चर खोदणे, गावातील ओढे-नाले यावर बांध घालून पाणी जिरवणे,अडवणे, असे उपाय ग्रामस्थ करीत असत.काही ठिकाणी नदीपात्रातच खड्डे खणून पाणी साठविण्याची पद्धत असल्याने तसेच पन्हाळ्याच्या मदतीने अंगणात ठेवलेला टाक्यांमध्ये हे पाणी साठवण्याची पद्धत या भागात तसेच पाऊस भरपूर प्रमाणात पडत असल्याने या भागात तसा पाण्याचा दुष्काळ जाणवत नव्हता.एवढेच नाही तर या भागात उन्हाळ्यात थंड हवामान असल्याने पर्यटक या भागात नेहमी भटकंती करण्यासाठी येत. तर चार महिने कालावधीत पावसाळ्यात सतत पडणाऱ्या पाण्याने दमट हवामान होतं.
माणसाच्या उत्क्रांतीच्या काळात मानवाच्या शरीरात बदल झाला.शरीरावरील केसांचे प्रमाण कमी-जास्त झाले. त्याच्या शरीरावरील केस कमी झाल्याने संरक्षणाची गरज भासू लागली.त्यातून वस्त्राची गरज निर्माण झाली. सुरुवातीला मानव वस्त्र वापरत नसे. त्यानंतर झाडाची पाने म्हणून वापरू लागला.पुढे तो शिकार करून मारलेल्या जनावरांचे कातळे वापरू लागला. कापसापासून सूत तयार करण्याची कला अवगत झाल्यानंतर सुती कापडाचा वापर होऊ लागला. निसर्गाने प्रत्येकाची गरज भागेल एवढं दिलं. पण माणसाचा हव्यास वाढत गेला. त्यानं दगडालाही मोबाईल स्वरूपात जीव फोडला.या मोबाईल मधून निघणा-या ध्वनी लहरींनी भरपूर पशू पक्षात परिणाम केला. साहजिकच याच मोबाईलच्या ध्वनीलहरीचा निसर्गावर परिणाम झाला. मानवावर ही झाला. नाही तर पशू पक्षांसोबत डोंगरावरही झाला. डोंगर पोखरल्याने जमिनीला हादरे बसले.मानवाला जाणवले नाही. ज्याप्रमाणे मानवाला टाचणी टोचल्यास संपूर्ण शरीराच्या अवयवाला त्रास होतो.तसा त्रास डोंगर पोखरल्यानं संपूर्ण पृथ्वीला झाला.त्यातूनच माळीण दुर्घटना घडल्या.
देशात लोकसंख्या वाढली. लोकसंख्या आज एक कोटीच्या घरात आहे.या सर्व लोकांची गरज भागविण्यासाठी माणूस नवीन तंत्रज्ञान शोधत आहे.यासाठी यासाठी माणूस अधिकाधिक जमीन व जलस्त्रोत वापरताहेत.
वाढत्या लोकसंख्येचा प्रश्न सोडविण्यासाठी तसेच शेती व उद्योगधंदे तसेच रस्ते व लोहमार्ग तयार करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात जमीन आवश्यक आहे.त्यासाठी पश्चिम घाटात जंगलतोड झाली. काही ठिकाणी दलदलीच्या प्रदेशात भराव घालून जमीन सपाट केली गेली. रासायनिक न विरघळणारी खते पाण्यासोबत वाहून गेल्याने ती खते कथा का ओहोळद्वारे नदीत वाहत गेली. त्याचा परिणाम जलचरांवर होऊन नदीतील उपयुक्त जलचर मरण पावले. काही ठिकाणी सतत शिकार झाल्याने प्राणी मरण पावले.तर माळढोक सारखे प्राणी, पक्षी देखील शेतातील कीटक खाल्ल्याने मरण पावले.काही प्राण्यांना उन्हाळ्यात पाणी आणि पुरेसे अन्न न मिळाल्याने मरण पावले. या सर्वांचा परिणाम निसर्गावर झाला व त्यातूनच पर्यावरणाचा समतोल ढासळला.
शरीराची झीज होत असते. तसेच झीज पर्यावरणाची झाली.त्यामुळे त्याचा परिणाम साहजिकच डोंगरावरही झालेला असून माळीण मध्ये दरड कोसळणे हा त्यातीलच परिणाम आहे. अशा बऱ्याच ठिकाणी मानवनिर्मित झालेल्या बदलामुळे दरडी कोसळल्या आहेत. यावर उपाय म्हणजे ज्या भागात असा संभाव्य धोका होऊ शकतो. त्या भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी त्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे किंवा त्या ठिकाणचेे संभाव्य धोके लक्षात घेता सुरक्षित व जाळीचे कुंपण घालणे आवश्यक आहे. जेणेकरून अशा संभाव्य दुर्घटना होणार नाही. त्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे.वेळोवेळी जर पावसाचा जोर जास्त असला तर सूचना देणे गरजेचे आहे.अशा अतिवृष्टीच्या वेळी गावाला सुरक्षित ठिकाणी हलवणे आवश्यक आहे. तरच अशा नैसर्गिक आपत्ती पासून लोकांना वाचता येईल. आपली प्रकृती उत्तम राहावी असं सर्वांनाच वाटतं.तेव्हा आपणही उत्तम राहिले पाहिजे. सुरक्षित राहिलं पाहिजे असं सर्वांना वाटायला हवं.नैसर्गिक आपत्ती ह्या येणारच, कितीही सुरक्षितता बाळगली तरीही.तेव्हा आपण स्वतः स्वतःची काळजी घ्यायला हवी. जेणेकरून निसर्ग जरी डाव रचत असला तरी आपल्याला निसर्गापासून वाचता येईल.
माणसाच्या स्वभावाचे विविध पैलू असतात.कधी राग येतो तर कधी प्रेम वाटते. या भावना येणे स्वाभाविक आहे.तशाच भावना निसर्गालाही असतात. एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी होणे हा निसर्गाच्या रागाचा परिणाम. मात्र आपण निसर्गाकडे त्या दृष्टिकोनातून पाहायला हवं.लाकूडतोड करणे, नदीतील जलचर मारणे, डोंगर पोखरणे ह्या गोष्टी आपण करतो. त्या गोष्टी निसर्गाला राग येण्यासारखे असतात.कारण पशुपक्षी हे निसर्गाचे देणे. ही मृदा सुद्धा निसर्गाची देण तेव्हा यांचा त्रास होणे हे निसर्गाला न पटणारे तत्त्व आहे.
माणूस विचारक्षम असतो.तसाच तो भावनाशील असतो.भाव भावना जर दुखावल्या गेल्या तर ते वाईट वाटते. पण किती वाईट वाटून घ्यायचे हे आपल्याला कळायला हवं.एखाद्यानं चूक केलीस तर राग आला असला तरी त्याची पातळी आपल्याला समजायला हवी.एखादी गोष्ट आपल्याला हवी असते. पण त्या गोष्टी साठी किती हपापलेपणा करायचा तेही आपल्याला समजायला हवं.विचारीपणानं भावना आवरता येतात. संयम ठेवता येतो.भावनांचा मेळ जुळवता येतो. भावनांचा मेळ जुळल्याने आपले व्यक्तिमत्त्व खुलते.इतरांना समजून घेण्याची क्षमता वाढते.प्रतिकूल परिस्थितीवर मात करता येते.इतरांना दोष देण्यापासून आपली सुटका होते. आपण नेहमी आनंदी राहतो. आपल्यातील हेकेखोरपणा कमी होतो. आनंद आणि दुःख या प्रमाणे राग जरी आपली नैसर्गिक प्रवृत्ती असली तरी रागावर नियंत्रण मिळवायला हवं. आपण शिकलं पाहिजे, तेव्हाच आपण या निसर्गाच्या रागावर नियंत्रण मिळवू शकतो. आपला राग आपण व्यक्त करतो.कारण एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडते किंवा आपल्याला राग येतो. राग येत असेल तर त्याचे शारीरिक व मानसिक दुष्परिणाम होतात. माणूस हट्टी व रागीट बनतो.समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कमी होते.भय,डोकेदुखी, निद्रानाश असे काही परिणाम होत असतात.
आपल्या आवडीनिवडी वा क्षमता वेगवेगळ्या असतात. त्यानुसार आपल्यातील उणिवा ही ठरत असतात. आपल्याला काय आवडत नाही,ती आपली उणीव असते.समजा भेंडीची भाजी बनवली तर ती भाजी जर आपल्याला आवडत नसेल तर ती आपली उणीव झाली.हीच उणीव आपल्याला स्वतःला सुधरवता आली पाहिजे.ज्याप्रमाणे आपल्या उणीवा असतात. त्याचप्रमाणे निसर्गातही उणीवा असतात. त्यामुळे वाट शोधून त्या उणीवापासून आपण आपलं स्वतःचं रक्षण करायला शिकलं पाहिजे. तेव्हाच माळीणसारख्या दुर्घटना टाळता येऊ शकतात.
आपल्यापैकी कोणाचा स्वभाव पूर्णतः चांगला असतो.कोणाचा वाईट.आपण आपल्यातील उणिवा दूर करण्यासाठी एकमेकांची मदत घेतो. कोणी असेच सहकार्य घेतात, तर कोणी घेत नाही. यातूनच सहकार्य व सहकार्याची भावना वाढीस लागते.निसर्गाच्या उणिवा दूर करताना आपण सगळे एक येवून या कोणत्या उणिवा दूर करायला हव्यात. जेणेकरून आपल्याला संभाव्य धोके टाळता येतात. पण आपण तसे करीत नाही.उलट एकमेकांचा द्वेष करून सहकार्याची भावना दाखवत नाही. त्यामुळे संकट येतं. ते संकट मग आपल्याला पेलता येत नाही.
आपल्या स्वभावातील आपल्याला व इतरांना खटकणारे पैलू प्रयत्नपूर्वक बदलता येतात. ते बदलण्याचा वेळीच प्रयत्न करणे आवश्यक आहे. अन्यथा त्यातून आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये उणीवा राहू शकतात. तसेच हे तत्व तत्व निसर्गाचेही आहे हे मात्र शासनाला, तेथील लोकांना कळलेलं नव्हतं.
विजयाच्या शिक्षणाची हौस राम्या पूर्ण करीत होता. तो तिचा बाप जरी नसला तरी बापाची जबाबदारी त्यानं उचलली होती.माळीणच्या दुर्घटनेत ७० टक्के भाग भूस्खलनामुळे ढिगाऱ्याखाली गेला. १५९ लोक मरण पावले. शंभर लोक बेपत्ता झाले. ४० घरं बाधीत झाली. या घटनेनंतर पुणे जिल्ह्यातील संपूर्ण भागाची पाहणी करण्यात आली. त्यात ती २३ गावे धोकादायक स्थितीत आढळली.तसेच शासनाच्या म्हणण्यानुसार १६ गावांमध्ये उपाययोजना सुरू झाल्या.असं तमाम वर्तमानपत्रात छापून आलेलं होतं. पण प्रत्यक्षात एकाही गावात कामे सुरू झाली नव्हती. तसेच माळीण दुर्घटनेत मृत पावलेल्या लोकांचे आकडे अजून पर्यंत बरोबर मिळाले नव्हते.वेगवेगळे वर्तमानपत्रांमध्ये वेगवेगळे आकडे तर मिडीयावाले वेगवेगळे आकडे सांगत होते.सरकार कागदावर समोर होतं.पण अंमलबजावणी शुन्य असल्याने आजही लोक मृत्यूच्या छायेत जगत होती.
दरड कोसळण्याच्या तालुक्यातील संभाव्य चार गावांमध्ये संरक्षण उपाययोजना करण्यासाठीच्या उपाययोजना न केल्याने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी दरड कोसळते की काय असे वाटत होते. यात भोर तालुक्यातील हिर्डोशी खोऱ्यातील कोरले जांभुळवाडी, भाटघर धरण खो-यातील पांगारी सोनारवाडी व हेडेन या गावाचा समावेश होता.या चार गावातील धरण किंवा वनाचा काही भाग वन विभागाच्या हद्दीत होता. त्यांची बांधकामाला परवानगी नव्हती.त्यांच्या मान्यतेशिवाय कोणतेच बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागात करता येत नव्हतं. पुण्याच्या शासकीय विभागीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने याबाबतच्या कामाचा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांना दिला. त्यासाठी एक कोटीचा निधी मंजूर झाला. यात गटार काढणे,डोंगर उतारावरील दगड फोडणे, भिंत बांधणे,झाडे लावणे यासारखे उपक्रम होते.
ज्याप्रमाणे भोरला होतं. तेच संकट मुळशी तालुक्यातील घुटके गावाला होतं.डोंगराच्या कडेला हे गाव बसलेलं होतं. तसेच माळीण सारखंच पायथ्याशी वसलेलं होतंं.अत्यंत दुर्गम भागात हे गाव वसलेलं होतं.तिथं २५ घर असून जवळपास शंभर लोक राहात होते. काही प्रदेश माळीण सारखाच अतिवृष्टीचा होता. तसेच माळीणसारखीच या भागात जमीन असून डोंगरावरून येणारे पाणी खालच्या सखल प्रदेशात साचत होते.हेच पाणी गावाजवळून जमिनीतून बाहेर पडते. पाऊस असला तर तीव्र धार जवळूनच उफानत निघते. याच पावसाच्या माऱ्याने दरवर्षी घराला तडे जातात व दरवर्षी घरांना गिलावा करावा लागतो.यातच डोंगराला खूप मोठी भेग पडलेली दिसत होती. त्यामुळे केव्हा तो डोंगर खाली येईल. हे सांगता येत नव्हतं. ग्रामस्थांना कित्येकदा सांगितलं होतं की हा भाग सोडून दुसरीकडे राहायला चला. पण ग्रामस्थ काही ऐकायला तयार नव्हते. त्यांच्या मनात भूस्खलनाची भीती होती. पण परिस्थितीच ती...... परिस्थितीशी लढण्याची ताकद त्यांच्यात होती. संकट आपण कुठे गेलो तर येणारच असे ते मानत होते.
असाच जर पाऊस कधी आलाच तर ही मंडळी गावच्या शाळेचा आधार घ्यायची.जोराचा पाऊस आल्यास लोक घाबरत होते. पुन्हा एकदा आपलं माळीण होणार की काय असेही त्यांना वाटत होतं.असा पाऊस कधी आलाच तर ही मंडळी सुरक्षितेसाठी गावच्या शाळेच्या आधार घेत होते कारण गावची शाळा ही सुरक्षित ठिकाणी बांधलेली होती.माळीण दुर्घटना होताच अधिकाऱ्यांनी या पुणे जिल्ह्यातील माळीण सारखी संभाव्य दुर्घटना घडू नये म्हणून या विभागाची पाहणी केली. पण अजुनही बरेच वर्ष होऊनही या भागासाठी उपाययोजना झाल्या नाहीत.हीच खंत अजूनही घुटके ग्रामस्थांच्या मनात होती.
घुटके गावा सारखंच खेड तालुक्यातील भोमाळे नावाचं गाव होतं. या गावात १९९४ साली दरड कोसळली होती.पण ही दरड गावावर न येता गावाच्या वरच्या बाजूला असणाऱ्या ओढ्याच्या पात्रात पडून वाहून गेली होती.त्यामुळे गाव वाचलं होतं.पण गावातील दोन लोक मृत्यूमुखी पडले होते. हे देखील गाव १९९४ पासूनच पावसाळ्यात भीतीच्या सावटात उभा राहत होता. गाव १९९४ पासून पुनर्वसनासाठी लढत होतं.त्यांना वाटत होतं की कदाचित १९९४ ची पुनरावृत्ती होऊन मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्यास आमचं गाव डोंगराच्या कुशीत नेस्तनाबूत होईल.पण माळीण दुर्घटना झाल्यानंतरही या गावाला न्याय मिळाला नव्हता.या गावात ७० टक्के घर असून या ७० घरात चारशे लोक राहत होते. भोमाळे गावाला भीमा नदीचे विस्तीर्ण पात्र लाभलेले असून पश्चिम व दक्षिण डोंगर आहेत.१४ ऑगस्त १९९४ ला या गावावर निसर्गाची अवकृपा झाली व सकाळी नऊला डोंगराच्या दक्षिण भागात स्फोटा सारखा आवाज झाला. पाहता पाहता डोंगराची एक कडा तुटूून गावाच्या दिशेने झेपावली. त्यात ही घटना माळीण सारखी नसल्याने लोक सैरावैरा पळू लागले.पण हा भाग गावावर न येता तो ओढ्यात सामावला होता. मात्र डोंगराकडे निघालेली दोन माणसं रामचंद्र वाजे व दत्तात्रेय कंगले या दरड कोसळण्यात मरण पावली होती.
दरड कोसळण्याच्या गावांमध्ये अजून एका गावाच्या समावेश होऊ शकतो. जुन्नर तालुक्यातील निमगिरी अंतर्गत दौंड्या डोंगराच्या उतारावर असणाऱ्या तळमाची वाडी ह्या नावाचं गाव. पण सार्वजनिक बांधकाम विभागाने हे गाव दरीत कोसळणार नाही असा अभिप्राय दिला होता.पण या गावापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर भूस्खलन झालं होतं. त्यामुळे ग्रामस्थ घाबरले होते.जिल्हाधिकाऱ्यांनी या गावाला भेट दिली. पण गंभीर दखल घेण्यात आली नव्हती. पण ग्रामस्थ अजून घाबरून होते. या गावापासून दीड किलोमीटरच्या अंतरावर १९७८ मध्ये सुद्धा भुस्खलन झालं होतं.अगदी गावातील जुने लोक सांगत होते.पण त्यानंतर डोंगराला पडलेल्या भेगा याची प्रत्यक्ष पाहणी केली होती.२००५ मध्ये गावाचे पुनर्वसन व्हावं अशी मागणी जोर धरू लागली होती. पण पुनर्वसन अजूनही सरकार करीत नव्हतं.आंबेगावच्या माळीण दुर्घटने नंतर जाग आलेल्या सरकारने जिल्ह्यातील २३ गांव धोकादायक ठरवली होती. उपाययोजना करण्यासाठी काही कोटी रुपयांची तरतूद केली होती.पण या तेवीस गावांपैकी मावळ तालुक्यातील काही गावाचा या सर्वेक्षणात समावेश असला तरी प्रत्यक्ष या तालुक्‍यातील गावांमध्ये कोणत्याच हालचाली दिसत नव्हत्या. काही ठिकाणी नोटीसची ठेवल्या होत्या तर काही ठिकाणी हद्द आड येत होती. प्रशासन हात झटकत होतं. त्यामुळे भुशी,कोरज, ताजे, गबालेवाडी,मोरमारेवाडी,तुंग, मालेवाडी, लोहगड हे गाव अजूनही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत होती.
धोकादायक गावाच्या अहवाल तयार करण्याचे काम सी ओ पी ला देण्यात आला होता. सी पी ओ नं एकाकी तयार केला होता. पण प्रशासन लक्ष देत नव्हतं.माळीण दुर्घटना नंतर आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील ग्रामस्थ पुनर्रचना कडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहून धोकादायक परिस्थितीतूनही आम्हालाही बाहेर काढा म्हणत रोज पुनर्वसनाशी लढत होते.हेलपाट्या मारत होते.तसेच रात्री पाऊस जर आला तर त्यांना झोप लागत नव्हती.मात्र प्रशासन दुर्लक्ष करीत होतं. या गावाचं तातडीने पुनर्वसन झालं नाही आंबेगाव तालुक्यात पुन्हा दुसरं माळीण होणार ही शक्यता नाकारता येत नव्हती.बेंबईवाडीच्या पश्चिम दिशेला डोंगराची कडा कोसळण्याचा धोका होता.त्यामुळं तिथं असलेली १९ कुटुंब पुन्हा पाचशे मीटर अंतरावर असलेला औदुंबर मंदिराजवळ पुनर्वसन करावे अशी मागणी करीत होते..पण हीे जागा व्यवस्थांची असून तुम्ही आपल्या गावी घर बांधा असा फतवा देवस्थान समितीने काढल्याने चिंतेत होते. एवढेच नाही तर माळीणच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेले पसारवाडी अति संवेदनशील भाग होता. तिथेही तीस घरं होती. त्यांची मागणी जवळच्या डोंगराच्या माथ्यावर पुनर्वसन करावे अशी होती.
पुनर्वसनाचा प्रश्‍न मोठा गंभीर होता. दरडी कोसळून कुठे कुठे अख्ख गाव भूमीत दफन होण्याचे प्रकार भरपूर होते,तर कुठे नदीचे पाणी अडवून ते शेतीला पुरवण्यासाठी धरणे बांधताना असंख्य गाव नदीत गेल्याने त्यांचे पुनर्वसन करणे भाग होते. त्यांचे पुनर्वसन तर कुठे भूकंपाने घर पडले त्यात हरवलेला घरांना प्रस्थापित करण्यासाठी त्यांचे पुनर्वसन आवश्यक होतं. सरकार कुठेतरी त्यांनाही पुनर्वसित करणार होतं. सतत वाढणारी लोकसंख्या, जमिनीच्या होणाऱ्या कमी भाग यामुळे निर्वासितांचा प्रश्न सरकारला सरकारपुढे पेच निर्माण करीत होता.असाच प्रश्‍न सरकारपुढे निर्माण झाला होता.
पुण्यातील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या ठिकाणांची यादी जाहीर केली.त्यातच त्या त्या भागातील लोकांना महापालिकेने घर खाली करण्यासाठी नोटिसा दिल्या.परंतू महापालिकेने नोटीस दिल्यानंतर ह्या लोकांनी हे घर खाली केले नव्हते.काही लोक पुनर्वसनासाठी लढत होते. पण त्यांचे पुनर्वसन होत नव्हतं, तर काहींचं पुनर्वसन होत होतं,तरी पण ते नव्या जागेवर जायला तयार नव्हते.अशा लोकांचं काय करावं तेच सरकार पुढे असल्याने कदाचित सरकार दुर्घटनेसाठी दुर्घटनेतून स्वतःला वाचवण्यासाठी पुनर्वसनासाठी लढणाऱ्या लोकांच्या आवाजाकडे शरणागती पत्करून दुर्लक्ष करीत होतं.
मुंब्रा चाही तसाच प्रश्न होता.मुंब्रा बायपास रस्त्याच्या दुतर्फा झोपडपट्ट्यांमध्ये अतिक्रमण वाढत होते. एका बाजूला असलेल्या ठाणे खाडी व दुसऱ्या बाजूला या डोंगररांगा.यामध्ये भुस्खलनाचा धोका होता.मुंब्रा बायपास रस्ता काही वर्षापासून सातत्याने ढासळत होता.दरवर्षी पावसाचे पाणी खाडीत गोळा व्हायचे.त्यातच या पाण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन ते धोकादायक असल्याने लोकांनी डोंगराच्या पायथ्याशी घरं बांधली होती.त्यातच या डोंगरावरून येणारे पाण्याचे प्रवाह आपल्यासोबत माती घेऊन येत असल्याने मुंब्रा बायपास बंद ठेवण्यात येत असे.वाहतूक काही दिवसासाठी खोळंबळत असे.त्यातच घराचे नुकसान होई.काही समाजसुधारक सांगत की त्यांनी या ठिकाणी वस्ती करू नये.परंतू लोकं खाली पाणी येते म्हणून वरवर डोंगराच्या वरच्या भागात अतिक्रमण करीत होते.घर बांधत होते.
विजयाला पुण्याला टाकलं होतं.शिक्षणासाठी पुण्याला एक आश्रम शाळा होती. ज्या आश्रम शाळेत की शिकत होती.त्या आश्रम शाळेत मुली भरपुर होत्या. तिथे जेवण खावण सगळं मिळत होतं. साबण कपडालत्ता सगळं मिळत होतं. पण मालक मात्र चांगला नव्हता. तो आपल्या वासनेची नजर त्या मुलीवर फेकून पाहायचा. कधीकधी तो रात्रीला यायचा. मुलींची परेड घ्यायचा. त्यातच कधीकधी अश्लील ही बोलून जायचा. मजबुरीने वयात आलेल्या मुली. त्याचीे वासणेची नजर जरी असली तरी त्या बोलायच्या नाहीत. कारण त्यांची मजबुरी होती. त्या शिवाय आदिवासी भोळ्याभाबड्या मुली घरापासून दूर राहात होत्या.
शहराच्या आश्रमशाळेत दूरदूरच्या आदिवासी मुली होत्या. त्या मजबुरीने शिकत होत्या. त्या हळू वयात येत होत्या. त्यातच आश्रम शाळेचा संस्थाचालक एक पुरुष होता. त्या ठिकाणी शिकत होती विजया.आज विजया दहावी पास झाली होती. तशी ती तारुण्यात आली होती.गावाकडच्या शाळेत उशिरा नाव टाकलं असल्यानं ती आठव्या वर्गातच तरुण झाली होती. त्याची ती खुपच सुंदर दिसत होती.विजयाचं सौंदर्य खुलत चाललं असल्यानं संस्थाचालकांच्या भरत्या नजरेस पडत होती. तो कधी कधी तिला टाँगटिंग करीत होता. पण विजया त्यातील नव्हती.असे केल्याने तिनं पोलिसांना फोन लावला होता. तिने दिलेली पोलिसात तक्रार त्यामुळेच की काय ते प्रकरण संस्थाचालकानं आपल्या ओळखीपाळखीनं दाबून तर टाकलं, परंतू तिला आता आपल्या आश्रम शाळेत ठेवलं नाही. बाकीच्या मुलींवर जरी संस्था चालक भुरटी ती नजर टाकीत असला तरी त्या मुलींचं बयाण नोंदवण्यात आलं. मुलींनी मजबूरीनं आपलं मत आश्रम शाळेच्या बाजूला नोंदवलं.तो चांगला आहे असे सांगत स्वतःचा बचाव केला.शेवटी अत्याचारविरोधात तिला वडिलांकडून मिळालेला परिणाम म्हणून आवाज उठवल्याने ती पुन्हा आपल्या गावात आली. तिच्या एक वर्षाचं नुकसान झालं होतं. मनात शिक्षणाची हौस असतानाही बरोबर शिक्षण मिळत नसल्याचं दुःख तिच्या मनात होतं. तसं दुसरं दुःखही होतं.ते म्हणजे पुनर्वसीत घर मिळविण्याचं. बहुतेक सर्वांना घरं मिळाली होती. पण विजयाचा नंबर लागला नव्हता. एक वर्ष झाला होता. मात्र यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यानं घरांना एका वर्षातच तडे गेले होते,तर काही भिंती खचल्या होत्या. प्रशासनाला ज्यांना घरे मिळाली,त्यांनी तक्रार केली होती. पण त्यांनी आपला दोष न दाखवता येथील मातीचा दोष दाखवला.तेथील लाल माती असून ती दबली गेल्याने भिंतींना तडे गेले असे त्यांचे म्हणणे होते. पण एका वर्षातच तडे का?हा सवाल माळीण पुनर्वसन झालेल्या लोकांचा होता. त्यातच विजयाला घर न मिळाल्याने विजया आपल्या हक्काच्या घरासाठी लढत होती, तर प्रशासन ती स्वतंत्र नाही तर रामाकडे दत्तक राहते असे म्हणत होते.त्यासाठी पुरावेही दाखवत होते.
विजयाला घर मिळवितांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत होता. एकतर तिच्या अकरावीचं वर्ष बरबाद झालं होतं. राम्या जरी तिला सख्या मुलीसारखा चाहत असला तरी तिला वाटत होतं,हक्काचं आपलं घर हवं.जर एखाद्या वेळी राम्यानं घरून निघून जा म्हटलं तर आपण पैसा कुठून आणणार? आपण कुठे जाणार? कुठे राहणार? ही विचार करण्याची पात्रता तिच्यात आली होती. तसं ते प्रशासनालाही सांगत होती. पण गावात जे सर्वेक्षण झालं होतं.त्यात तिचं नाव न नोंदविल्यानं सगळा गोंधळ झाला होता. त्यावेळी ती गावात लहान असून तिला समजत नसल्यानं राम्यानं तसेच गावकर्‍यांनं प्रशासनाला कितीही सांगितलं तरी तिचं नाव यादीमध्ये लिहिलं नव्हतं.प्रशासन तिच यादी तिला दाखवत होतं. वेगवेगळ्या रहिवाशी दाखल्याचे पुरावे मागत होतं. याचे पुरावे मिळवताना विजयाला नाकी नव आलं होतं. कारण सगळी कागदपत्र माळीणच्या दरड कोसळल्याने मातीत गहाळ झाली होती. गावचा सरपंच,सगळे गाव दाखला देणार कुठून? विजया किती सांगत असली की ती किसनची मुलगी आहे तरी कोणी ऐकायला तयार नव्हता. शेवटी तिने आपल्या वडिलांच्याच जन्माची नोंद तपासण्याचे ठरवलं. एक दिवस ती तालुक्याला गेली होती.पण तालुक्याला तिच्या मागच्या जन्माची नोंद सापडलेली नव्हती.त्यामुळं तिथे एका साहेबांना तिला जिल्ह्यात जाऊन नोंद तपासायला सांगितले. ती जिल्ह्यामध्ये गेली. याचे पुरावे पाहिले तर त्यात किसन याची नोंद होती.पण किसनरावाला झालेल्या पोराच्या काय? त्या नोंदीच नव्ह्यत्या. ते नक्की संग्रहाच्या तर पुन्हा मिळवला पण तीच विजया किसनराव ची मुलगी आहे हे काही तिला सिद्ध करता येत नव्हतं.
गावाची एक गट ग्रामपंचायत होती.ती साडेतीन अंतरावर होती. गावच्या सरपंच कधी या गावचा सरपंच तर कधी त्या गावच्या सरपंच असायचा. पण आता माळीणमध्ये सरपंच नव्हता. तर ओहपे गावाला सरपंच होता. तसं तिला कोणीतरी सांगितलं. त्या गावाला जाऊन पुरावे शोधावे.असं तिनं ठरवलं.विजया पुरावे शोधण्यासाठी तालुक्याला गेली. जिल्ह्यात गेली.पण आपलं गाव तपासलं नाही. कदाचित तिच्या ते लक्षातच आलं नाही. तसेच कोणाच्यातरी म्हणण्यानुसार त्या गावाला गेली. ती सरपंचाशी बोलती झाली.
"तुला काय काम हाये?"
"मला माह्या रहिवासी दाखला पाह्यजे."
" देईन बेटा.पण तू किसनरावची पोरगी होय हे तुले सिद्ध करा लागन.कारण म्हणजे त्याची पोरगी हाय म्हणलं तरी लोक म्हणणार नाही. तसं पायता पोरी त्याचं असं हाय का कोणीबी त्याचा फायदा घेऊन मीच अमक्याची पोरगी पोरगा म्हणून सगळे उपाय करतीन.डाव साधतीन. म्हणून हे आमचीे अट. तवा तुले पुरावा द्याच लागन."
"मंग मी का कराले पाह्यजे?"
" तू येवढच कर की तुले वळखणारे दोन-चार माणसं घेऊन ये. म्हणजे तुले रहिवासी दाखला देतो."
तशी ती फार दुःखी झाली व दु:खी अंतकरणाने ती साडेतीन किलोमीटर अंतर पायी चालत आलेला रस्ता कापत माघारी फिरली होती.तिनं ओळख सांगितली होती तरी......
जगण्यासाठी आपल्याला ज्या प्रमाणे हवा, पाणी आणि अन्न यांची गरज असते.त्याप्रमाणे राहायला निवारा ही हवा असतो. पण विजयाला निवारा नसल्याने ती एक खंत मनामध्ये होती. पण तिच्याकडे कोणताच उपाय नव्हता आणि उपाय जरी असला तरी तिचा मेंदू चालत नव्हता.शरीराबाहेरील हवेत जसा धुळ व धुराचे कण असतात.तसेच रोगाला कारणीभूत ठरणारे जंतूही असतात.त्याचा त्रास होतो आपल्याला.आपल्याला त्रास होत आहे असे वाटत होते.पण आपलं काय ज्याप्रमाणे एखाद्याला मद्यप्राशन करायचा शौक असतो.
ज्याप्रमाणे एखाद्याला मद्यपानाचा शौक असतो, त्याचा परिणाम चेतासंस्थेवर होतो. तसाच परिणाम आपल्यावर होणार काय निवास न मिळाल्यास असे तिला वाटत होते. बाळ रडत असते.कारण ते लहान असते.ते कुठलीच कामे करू शकत नाही. काही हवे असेल तर रडणे आणि हातपाय हलवणे एवढेच त्याला माहीत असते.काही दिवसानंतर काही शरीराच्या इतर भागावर नियंत्रण मिळवता येत असते.मग विविध हालचालींमध्ये समन्वय येतो.त्यातच त्या बाळाचे हसणे हे आनंद देणारे असते.विजयाचे लहानपण अर्थात ज्यावेळी ती सातवीला गेली होती. त्यावेळी माळीण दुर्घटना झाली होती.त्याचवेळी पुरेशी ती सज्ञान नव्हती. तिला पुनर्वसन घर या गोष्टी त्यावेळी समजत नव्हत्या.दोन-तीन वर्ष तिच्या आश्रम शाळेत गेले होते.त्यातच तिला घरकुलाची गरजही वाटली नाही. पण काळाच्या ओघात जशी ती समंजस झाली.तसं तिला घर, पुनर्वसन त्यासाठी संघर्ष तालुका, शहर,गाव, ग्रामपंचायत,सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत कळायला लागलं होतं. त्यातच घरकुलासाठी संघर्ष करतांना रहिवासी दाखले समजत होते.तशी ती विविध कौशल्ये शिकली होती.
दिवसेंदिवस ती वेगवेगळ्या गोष्टी शिकत होती. ज्याप्रमाणे एखादं लहान बाळ प्रथम चेंडू धरायला शिकतो. मग फेकायला शिकतो. चालता येऊ लागले की धावणे, जिना चढणे, फेकलेला चेंडू पकडणे या कृती तो करू लागतो.तशाप्रकारे विजया पुनर्वसनासाठी संघर्ष करणे शिकली होती. नव्हे तर स्वतःच्या निवा-याासाठी झुंज देत होती.
ज्याप्रमाणे मतदान करणे हा कायदेशीर प्रत्येकाला मिळालेला हक्क जरी असला तरी तरी लोक फक्त मतदानापुरतं हो हो म्हणत आश्वासन देतात. मात्र जेव्हा कामाची प्रत्यक्ष वेळ येते. तेव्हा नकार देतात हे तिला खटकत होतं.
रहिवासी दाखला बनवण्याची गोष्ट विजयाला ठणकत होती. त्यातच तिला सरपंचांनं सांगितलं होतं. ते म्हणजे तिला ओळखणारे दोन-चार माणसं तिनं आणायला हवी. पण साडेतीन किलोमीटर पायपीट करून चालत जाणं.तेहीे विजयासाठी.हे लोकांना पटत नव्हतं, नव्हे तर त्यांच्याजवळ तेवढा वेळही नव्हता.शिवाय लोकांना वाटत होतं की ही सर्व मालमत्ता राम्यालाच होईल. किती दिवस राहील विजया घरात.तिचा विवाह झाला की तिच्या सासरला ती जाईलच.अशातच काही लोक तयार झाले,तिच्या सोबत जायला.
असाच तो दिवस उजळला. चार-पाच लोक विजया सोबत जायला तयार झाली. त्यांना तिची दया आली व तिच्यासोबत या ग्रामपंचायतीच्या गावात निघाले.ते जवळच्या ग्रामपंचायत गावात पोहोचले.पण चार-पाच लोक ओळखीचे सोबत नेल्यानंतरही व साडे तीन किलोमीटरची पायपीट केल्यानंतरही सरपंच व ग्रामसेवक गावात हजर नव्हते. ग्रामपंचायत बंद होती.त्याचबरोबर विजया दुःखीकष्टी झाली. कारण ती साडेतीन किलोमीटरचा अंतर चालत आली होती. तिच्या सोबत ते लोक चालत आले होते.रस्ता काही बरोबर नव्हता. तो चालायला दम लागत होता. शिवाय तिच्या सोबत लोकं आले होते.त्यांनाही काही वेळ नव्हताच. तरीही ते तिच्यासोबत वेळात वेळ काढून आले होते.पण ते न भेटल्याने पुन्हा हे गावकरी आपल्या सोबत येतील का? असा प्रश्न मनात आला होता.पुनर्वसनासाठी विजया भांडत होती. त्याचा तिला अनुभव होता. यापूर्वी नवव्या वर्गात जातीचा दाखला बनवताना तिला कस लागला होता. कारण जात पडताळणीच्या १९४९ च्या पूर्वीचा दाखला तिला हवा होता.जाती पडताळणी साठी अशा व्यक्तीचा दाखला तिला हवा होता की जो तिच्या रक्त संबंधातील होता. साधारणपणे तिच्यासारखे दिसणारे, तिच्या आई-वडिलांसारखे दिसणारे लोकं पाहिजे होते. विजय यावेळी पुण्याला शिकत होती.तर तिचा काका आंबेगावला होता.ती मामीकडे जाणार नव्हती. कारण मामीच्या घरून ती मामा मामीला काडीचीही कल्पना न देता ती अर्ध्या रात्री निघून गेली होती. त्यामुळे मामा काय म्हणणार,याची तिला कल्पना होती. एक दिवस ती काकाच्या गावाला आंबेगाव आली. तिला वाटलं की काका आपल्याला सर्टिफिकेट देईल. यावरून आपल्याला जातीच्या पडताळणीचा दाखला बनवता येईल.
ती जशी काकाच्या घरी पोहोचली. त्याचा काकाला आनंद झाला. बऱ्याच दिवसानंतर आपली पुतणी आपल्याला भेटायला आली.असं त्याला वाटलं.कदाचित आपला भावा सोबत त्याची चार मुलं माळीणच्या दुर्घटनेत मरण पावलीे असावीेत असं त्याला वाटलं होतं. पण काका माळीणला गेला नव्हता.कारण माळीण दुर्घटना जेव्हा झाली,तेव्हा काका आजारी असल्याने व बसू शकत नसल्याने माळीणला गेला नव्हता. विजयाचा काका हा तिच्या रक्त संबंधातील होता.पण आजारांनं कोणाला सोडले. त्याला विषमज्वर झाला होता. कोण्या आजाराच्या संपर्कात आल्याने काकाला ठेवलं होतं. कारण हवेद्वारे रोगजंतूंचा त्याच्या तोंडातून संपूर्ण शरीरात प्रसार झाला होता.
गावंच ते.......त्या काळात लोक उघड्यावर शौचाला गेल्यानंतर ती विष्ठा पाण्याद्वारे लोकांच्या शरीरात जात असे.त्यातच ज्या माणसांना आजार असायचा, त्या माणसाला आजार असल्याने त्या माणसाच्या विष्ठेत ते जंतू असल्याने तसेच ते पाण्यात मिसळून ते पाणी लोकांनी प्राशन केल्याने गावात विषमज्वर, कॉलरा, यासारखे साथीचे रोग होत. कारण सार्वजनिक शौचास जाणे, सार्वजनिक पाणवठ्यावर आंघोळ करणे, कपडे धुणे व गाई-म्हशी धुणे यासारख्या गोष्टी केल्याने गावातील लोक स्वच्छ असलेल्या नळाचे पाणी वापरत नसत. कारण ती सोय नव्हती.ते पावसाळ्यात एखाद्या डबक्यात साचलेले पाणी वापरायचे. ज्या पाण्यात असंख्य रोगाचे जंतू असत.असंख्य घाणीवर बसणाऱ्या माश्या असे कुठेही विष्ठांवर बसणाऱ्या माश्या, या माशांच्या पायांना आणि शरीराला लोकतंत्र चिकटत असत. त्याच माश्या अन्नपदार्थावर बसून हे रोगजंतू त्य ा अन्न पदार्थातून आपल्या शरीरात जातात याची कल्पनाच गावाला नसल्याने गावची मंडळी त्या माशा बसलेले अन्न खायचे. एवढेच नाही तर एखाद्या वेळी एखाद्याच्या पोट फुगल्यास ते पोट उतरावे म्हणून माशा मारून त्या गुळामध्ये चारत असत. यामुळे पोट उतरते अशी त्यांची संकल्पना होती.कोणी कोणी तर एखाद्या मांत्रिकाकडे नेत असत. हात धुणे, स्वच्छ साबणाने धुणे ह्या गोष्टी त्यांना समजत नव्हत्या. पिढ्यान् पिढ्या शिक्षण न मिळालेला तो आदिवासी समाज,आज त्या समाजाची लेकरं शिकत जरी असली तरी ती मन लावून शिकत नसल्याने आजार नेमका कशामुळे होतो, हे त्यांना अद्यापही कळलं नव्हतं.काका याचमुळे शिकार झाला होता.
विशिष्ट प्रकारच्या डास चावल्याने हिवतापाची लागण होते हे गावच्या लोकांना माहीत नव्हतं. त्याचबरोबर हेही हिवतापाचे डास एखाद्या आजारी माणसाला चावून ते परत दुसऱ्या निरोगी माणसाला चावल्यास तो माणूस आजारी पडतो हे कोणाला समजत नव्हतं. या लोकांना नायटा, खरुज यासारखे रोग सतत होत असत. तसेच लहान मुलांना सतत फोडे होत असून त्यातून सतत रक्त व पू वाहात असे. त्या जखमा दुखत असल्या तरी लहान मुलांना त्याच्या बद्दल काहीच वाटत नव्हतं. सर्दी व खोकला या आदिवासी भागात पाचवीलाच पुजलेला असे.त्यांना सोबत तापही येत होता. परंतू सर्दी, खोकला व ताप असल्यास वेगवेगळ्या वृक्षाची पाने खाऊन तो आजार ती मंडळी बरा करीत. साबण, सोडे न मिळाल्याने कपडे धुतले जात असले तरी त्या कपड्यावरचे संपूर्ण जंतू मरत नसल्याने व एकमेकांचे कपडे वापरल्याने वेगवेगळे रोग गावातील मुलांना होतच होते.कधी कधी डोळे येण्याची साथ यायची.
रोग येवू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी हे आदिवासी लोकांना कळायचं नाही. पाण्यावाटे होणारे आजार टाळण्यासाठी गावातील पाणी व त्यात पावडर टाकावी लागते नव्हे तर पावडर टाकतात. पण गावात पाणवठाच नव्हता. तेथे पाण्यात पावडर टाकण्याच्या प्रश्न येत नव्हता. साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती जरी होत असली तरी त्या पाण्यात गावातर्फे डी डी टी पावडर फवारल्या जात नव्हतं.
कधी कधी गावात फिरणारा डॉक्टर येत असे. तो आपल्या सायकलवर एक पिशवी आणत असे. तो रोग्यांना तपासत असे. तसेच आजार बरा व्हावा म्हणून चार दोन रुपयाच्या गोळ्याही देत असे.
विजयाचा काका विषमज्वराच्या आजारातून बरा झाला असला तरी त्याला विजयाबद्दल माहिती पडली नाही. विजयाला तिच्या मामानं आपल्या जवळ नेलं व काहीही सांगितलं नसल्यानं विजयाबद्दल काका अनभिज्ञ राहिला. तो जेव्हा गावाला गेला तेव्हा फक्त आक्रोश होता गावकऱ्यांचा बाकी तिथे काहीही सापडलं नाही. त्यातच विजया देखील माळीणच्या दुर्घटनेत सापडली असेल असं काकाला वाटलं असल्याने तो गप्प राहिला.
विजयाच्या काकाला विजयाला पाहताच फार आनंद झाला होता. तसा तो तिला तिथं येण्याचं कारण विचारू लागला. विजया म्हणाली,
" काका मले जातीचा दाखला,मले जातीचा दाखला बनवायचा हाये. पण कागदपत्र माळीणच्या मलब्यात हरवली हायेत.एकच कागद हाये. तो म्हणजे माहया शाळेची माह्यी शाळा सोडण्याची सर्टिफिकेट.पण मले सरकारचे अधिकारी १९४९ च्या पूर्वीचा दाखला मागतेत. मले तुमची मदत हवी हाये. करणार का मले मदत?"
"पण कायले पाह्यजे पोरी तुले हा दाखला."
"काका जर उच्च शिक्षण घ्यायचं असन तं लागते असा दाखला.पुळं नवकरीसाठी बी लागन. असा दाखला."
" पण पोरी,माई काई मदत? मी कोणती मदत करणार तुले? मले त्या शिक्षणाचा गंधबी नाई."
" काका काका मले सांगा. तुम्ही शाळेत गेले नाई का कधी?"
"नाई बेटा, आमच्या काळात शिक्षण नोयतं."
"पण शाळेत नाव तरी.नाव तरी टाकलं असन न तुमच्या बाबानं."
"हो,मास्तर न आमचं नाव शाळेत टाकलं होतं.पण आम्ही एक दिस बी शाळेत गेलो नाई."
"पण मले सांगा,तुमचं नाव टाकलं होतं का?"
"आतं बेटा मी काई शाळेत गेलो नाई. पण पाहून घेऊ शाळेत नावाची नोंद.असन जर नाव टाकलं, तर नाव दिसन.नाई टाकलं असन तं नाई दिसन."
" हो काका, तुमचं बी म्हणणं बरोबर हाये. पण तुम्ही शिकले तरी कुठं? ते तरी सांगा."
काकानं तो आणि त्याच्या भाऊ पुर्वी कुठे राहत होते ते सांगितलं.ते तसे त्या गावाला रवाना झाले.काका आणि विजयानं त्या गावातील शाळा शोधली. त्या शाळेत त्यांनी त्यांच्या शिक्षणाच्या दाखला शोधला,तर जुन्या नोंदीवहीत काकाचे नाव दिसले.तशी ती म्हणाली,
" बाईसाहेब हाच माह्या काकाच्या शाळेत नाव टाकल्याचा दाखला."
मुख्याध्यापिका पदावर एक महिला होती. तिनं तपासणी केली. त्यातच पडताळणी केली. तसा तो दाखला घेऊन ती आपल्या काकाच्या घरी आली. दोन-चार दिवसांचा मुक्काम केल्यानंतर विजया तो दाखला घेऊन आपल्या आश्रम शाळेत आली.दुसऱ्या दिवशी ती जिल्हाधिकारी कार्यालयात गेली. तेथे अर्जनविसा तर्फे तिनं फॉर्म भरून पडताळणीसाठी अर्ज केला.त्यातच माळीणचे प्रमाणपत्र लावलं होतं.
जाती पडताळणीची सर्टिफिकेट मिळवताना विजयाला खूप त्रास पडला होता. तोच अनुभव व तो संघर्ष आज पुनर्वसनासाठी कामात येत होता.तरी पण प्रशासनाच्या दिरंगाईवर विजयाची टर उडत होती.
विजय गेल्या पावली सरपंच न मिळाल्याने परत आली. कारण तिथे थांबून काही उपयोग नव्हता. मग ती कशी थांबणार. दिवसामागून दिवस जात होते.तसं हे वर्ष संस्थाचालकाच्या कुरापतीनं व त्याच्या वासनांध नजरेनं वाया गेलं होतं. मग ती काय करणार. मिळालेले दोन चार महिने तिनं पुनर्वसनासाठी लढायचं ठरवलं. पुनर्वसनासाठी लढतांना विजया मिळेल त्या वेळात सरपंचाकडे साडेतीन किलोमीटर अंतर जात होती.सरपंचाकडे चक्कर मारत होती. सरपंच तिला ओळखणारे लोक आणायला लावत होता. परंतू लोकांजवळ सवड नव्हती. ते कसे जाणार.एकदा गेले होते ते. पण ते असे किती वेळा जाणार. शेवटी कंटाळून फक्त ती एकटीच जात राहिली एका दाखल्यासाठी.
विजयाला एका दाखल्यासाठी नेहमी येताना पाहून एकदा सरपंच त्या गावात आले. ज्या गावाला माळीणचं पुनर्वसन झालं होतं. त्यांनी विजयाच्या घर विचारलं. तसं ते राम्याचं घर दिसताच व विजया त्या ठिकाणी उपलब्ध दिसताच त्यांनी ताबडतोब तिला रहिवासी समजून दाखला दिला.तो दाखला मिळताच विजयाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.आता होता प्रश्न विजयाच्या घरकुलाचा.दाखला मिळताच तिनं शहरात जाऊन घरकुलाचा फॉर्म भरला.त्यासाठी तिने तो रहिवासी दाखला जोडला. त्याचबरोबर आपली शाळेची सर्टिफिकेटही. शेवटी ते सर्व दाखले लावून घरकुलासाठी अर्ज पाठविण्यात आला.परंतू तो अर्ज परत आला. त्यात स्पष्ट लिहिलं होतं की जेव्हा सर्व झालं.त्यावेळी त्यात नाव नोंदलं गेलं नव्हतं.ज्यांचं नाव नोंदलं गेलं,त्यांना घरकुल मिळाली आहेत. ज्यांचं नाव यादीत नाही त्यांना घरकुल मिळणार नाही.या मुळे विजया निराश झाली.
माळीण येथील भौगोलिक रचना पाहता लक्षात येत होतं की नैसर्गिक साधनसंपत्तीचा -हास होत आहे.समुद्रकिनारे,नद्या, डोंगर, दर्या, दरडी ही नैसर्गिक साधन संपत्ती असून त्या नैसर्गिक संसाधनाचा नव्याने संरक्षण करून होणारा -हास थांबवणे गरजेचे आहे.परंतू या सर्वांनवर भूमाफियांनी आपला ताबा मिळवला आहे.निसर्गाची ऐशी तैशी करत गावोगावी शहरे बसली आहेत. डोंगरही राजरोसपणे खोदले जात आहेत. अधिकारी अाणि कंत्राटदार राजरोसपणे खाणकाम,वाळू उपसा, वृक्षतोड करून नदी-नाले काबीज करीत आहेत.हे सर्वांसमक्ष दिसत होते. अाजही त्या माळीणच्या त्या लेकराची 'घर देता का घर' ही आर्त हाक ऐकू येत होती.
गावात दरड कोसळण्याच्या दुर्घटनेने अनेकांना सुन्न करून सोडले होते. झोपेत असलेलं गाव अवघ्या काही क्षणांमध्ये मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं. त्यातच विजयाच्या कुटुंबासह काहींचे संपूर्ण कुटुंब भुस्खलनात गेले.निवाऱ्यासाठी एक शेड तेही टिनाचं बांधून मिळालं.मात्र यादी,निकष हे कारण पुढे करीत नव्या माळीणमध्ये पुनर्वसन टाळण्यात आलं. त्यामुळे अनेकांवर बेघर होण्याची वेळ आली होती.त्यांची लेकरं जर वाचली असती तर ती कुठे राहिली असती हा प्रश्न विजयासमोर उभा होता.त्या आठवणी मनाला धक्का देणार्‍या होत्या. अाजही माळीणच्या त्या आठवणी नकोशा वाटत होत्या.या घटनेतून वाचलेल्या लोकांसाठी शाळेच्या आवारात टिनाचे जे शेड उभारले.त्यातच काही लोक वास्तव्य करीत होते.अजूनही त्यांना घर मिळाले नव्हते. कारण बहुतेकांना ती यादी पुढे करीत त्यांना परतवून लावल्या जात होते. ग्रामपंचायत......तिथेही नव्या घराची नोंद नसल्याचे कारण पुढे करीत होते.मग शेडमध्ये कोणत्या आधारावर निवारा मिळाला किंवा शासनाच्या जी आर चे काय? असाही प्रश्न नागरिकांमधून उभा राहिला होता. माळीण गावची घटना तर झाली. पण त्यानंतर राजकारण तापायला लागलं. जे राजकारण घरासाठी होतं. एका परिवाराच्या अंगावर तुळई पडताच तो परिवार उपचारासाठी पुण्याला आला होता.त्यातच गावात ती मंडळी हजर नसल्याने त्यांनाही घर मिळालं नव्हतं.विजयासारखंच ते कुटुंब.
अजूनही गावात ज्यांची ज्यांची घरे गेली, त्यांना त्यांना घर मिळायला हवी होती.नोंद असो वा नसो. विजयासारख्या निराधार मुलीला घर मिळणे अपेक्षित होतं. तिला घर मिळत नसल्याने ती पाठपुरावा करीत असली तरी शासनाच्या संवेदनशील प्रश्नावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं.
'माळीणगाव कुठे आहे जी' एका खिन्न मनाच्या म्हातारीला कोणीतरी प्रश्न विचारला होता. तो पत्रकार असेल असं वाटत होतं. रस्त्याच्या कडेवर काही शेळ्या चरत होत्या. तिथं टेकडीही होती.कळत होतं की हा रस्ता माळीणला चाललाय.
त्या टेकडीच्या डाव्या बाजूला एक म्हातारी हातात काठी घेऊन ती काठी मातीत खुपसत होतीे. त्या माणसाचा आवाज ऐकताच ती म्हणाली,
" हे काय बाबा पडलेली हेच टेकडी.हेच आमचं माळीण गाव.निसर्गापुळं कोणाचं चालत नाई बाबा. समजलं समदं समजलं आमाले. निसर्गानं नेलं.समदं नेलं आमचं."
ती खिन्न मनाने सांगत होती. जेव्हापासून त्या म्हातारीचं घर गेलं होतं. ती म्हातारी ती काठी घेऊन यायची आणि त्या मातीच्या ढिगार्‍यावर खोदत बसायची.ती का बरं खोदत बसायची ते कळत नव्हतं.ती म्हणत होती,
" बाबा आमचम बी दोन मजली घर होतं. दागिने होतं.पैसा आडका सारं काई.कपडालत्ताबी...... समदं गायब झालं. काय पण हाताले लागलं नाई."
डोंगराच्या त्या बाजूला पूर्णपणे गाडल्या गेलेल्या गावाचं नाव होतं माळीण. ते गाव दररोज हसायचंं,खिदळायचं.मौज करायचं. पण आज फक्त त्या जागेत मातीचे ढिगारे उरले होते. ते गाव इतिहास जमा झालेलं होतं. गावातलं कोणतंच चिन्ह शोधूनही सापडत नव्हतं. तिथं उभं राहिलं की आपण कुणाच्या तरी थडग्यावर उभं आहोत की काय असं वाटत होतं.
गावातील काही ज्येष्ठ मंडळींना या गावची आठवण येत होती.ते हातात काठी घेवून त्या स्थळी येत होते.त्या जखमा आठवत होते.घराची माती पाहात होते.डोळ्यातले अश्रू त्यावर टपकवीत होते. त्यानंतर ते सायंकाळी आपल्यासाठी बांधलेल्या निवा-यावर जात होते.त्या थडग्यामध्ये परीवर्तीत झालेल्या जागेवर कोणीच राहत नव्हतं.कारण याची भीती वाटत होती.त्याचबरोबर त्या मलब्यात दबलेल्या लोकांच्या आत्म्याचीही.......
देवाचे मंदिर,घर, धनधान्य,पैसा,अडका,शेती, नव्हे तर रोजगार ही नेला होता माळीण दुर्घटनेनं.दुर्घटना तर होऊन गेली होती.पण दुर्घटनेनंतर त्या गावाच्या ढिगा-यावर आपल्या घरातील काही वस्तू नक्कीच सापडेल या आशेनं काही म्हातारी मंडळी येत असत.
काही वस्तू नक्कीच सापडत होत्या.तसेच त्या जमिनीवर काळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशव्या सापडल्या होत्या. बहुतांश त्या पिशव्यात नर्सरीची झाडं असतील असं जाणवत होतं. एखाद्या टोपल्या खाली टाकाव्यात आणि त्या टोपलीत कोंबड्या झाकाव्यात असं त्या दरडीनं गावाला झाकलं होतं. गाव डोंगराच्या ढिगाऱ्याखाली झाकला गेला होता.ते अख्खं गाव घुमत होते नजरेत दुर्घटना झाल्यानंतर. आक्रोश अाजही........ते मृतदेह जेसीबीच्या साहाय्याने काढत असताना माणसाचा चिखल दिसत होता. जणू निसर्गाने जिवंत माणसांनाच या माती आणि पाण्याचे मिश्रण बनवून टाकले होते.असे वाटत होते.
सुरुवातीचे काही दिवस लोकांना फुकट अन्न मिळालं.पण नंतरच्या काय राशन कार्डावर रॉकेल मिळत होतं.पण आता राशनवाल्यानंही कोंडी केली होती.तालुक्याला जाऊन मृतांची नावे कमी करा असे सांगितले असल्याने जेव्हा पर्यंत ती नाव कमी करणार नाही, तेव्हापर्यंत राशन मिळणार नाही हे ठणकावून सांगितलं होतं.तलाठी गॅस वाला,तालुका अधिकारी,अन्न पुरवठा अधिकारी असा दमछाक करणारा प्रवास सुरू होता लोकांचा.लोक म्हणत होते की आम्ही केव्हापर्यंत शेडमध्ये राहायचं. हात बांधून केव्हापर्यंत राहायचं. आम्हाला राशन हवं.अन्न हवं तेही चांगलं अन्न त्यांना मिळायला हवं. शेती विकास योग्य व पिका योग्य करण्यासाठी मदत हवी.
लोकांना मदत हवी होती,मिळेल ती. लोकांना दुर्घटनेनंतर बरीच मदत आली होती.पण ती मदत कुठे गेली याचा काहीच पत्ता लागत नव्हता. कारण लोक अाजही मदतीसाठी तळपत होते.नव्हे तर आजही मदतीपासून वंचित होते.
माळीणसह संपूर्ण राज्यात नव्हे तर देशात कोणत्या भागात अतिवृष्टी होईल हे हवामान खातं सांगत असतं.त्यानुसार लोक आपापली सुरक्षा करीत असतात. सावधान आणि सुरक्षित होतात. माणूस आणि निसर्ग,त्यांचे जीवन जगणे प्राचीन काळापासून सुरू आहे. दहा लाख वर्षांपूर्वी आफ्रीकेत रुडाल्फ सरोवराच्या काठी दोन पायावर चालणारा माणूस पाहिला.त्याला नाव दिलं होमो इरेक्टस.सात लक्ष वर्षापूर्वी तो जावा, सुमात्रा बेटावर पोचला.चार लाख वर्षांपूर्वी त्यांनी पूर्वेकडे चीन पर्यंत पश्चिमेकडे युरोप पर्यंत मजल मारली.याच काळात त्याने चाकाचा शोध लावला.वीस हजार वर्षांपुर्वी तो शिकारी अवस्थेत आढळला,तर बारा हजार वर्षांपूर्वी हिमयुगाच्या स्फोटानंतर तो पशुपालना कडे वळला. तो शेती करू लागला. याच काळात आणि याच काळात मानवाच्या रूढी, परंपरा,धर्म, सण, उत्सव जन्मास आले.त्यातच या रुढी,परंपरेच्या बंधनात अडकून आम्ही निसर्गाला संपवायला निघालो की त्यामुळे दुर्घटना होते तेव्हा आम्हाला पर्यावरण रक्षण करण्याची जाग येते.मग माळीणची दुर्घटना काळानंतर जुनी होताच पुन्हा आमचे डोळे बंद होतात व आम्ही आमच्या भावना पायदळी तुडवून पर्यावरणाचे रक्षण करायचे आहे हे विसरूनच जातो. त्यांच्या छोट्याशा गावात जी आपत्ती कोसळली.त्या आपत्तीत चिखल मातीचा खच, त्यातून निघणारे शव, गावातून येणारा कुबट वास, रक्ताळलेला तो चिखल, ते लालसर झालेले पाणी,तसेच त्याही अवस्थेत त्या आसेच्या दृष्टीने प्रत्येक मृतदेहाकडे पाहणारा तो माळीण गाव.तो माळीण गाव आठवला की आजही छातीत धडधड निर्माण होते. आम्ही पुन्हा माळीण होऊ देणार नाही.भविष्यात काळजी घेऊ म्हणणारी ती नेतेमंडळी,आजही आठवत असतात. काहीजण निस्वार्थ भावनेने काम करीत होते, तर काहीजण आम्ही कॅमेरात आलो पाहिजे म्हणून फोटो काढण्यासाठी त्या गर्दीत पुढे पुढे करीत होते, तर कुठे कुठे रडण्याचे आवाज येत होते. हिमालयात एक वर्षापूर्वी झालेल्या बद्रीनाथ, केदारनाथच्या महाप्रलयानंतर एका वर्षातच माळीणची दुर्घटना झाली होती. या दोन्ही घटनात संबंध नाही, पण या दोन्ही घटनांचा विचार केल्यास निसर्ग कुठेतरी कोपतोय.हेच सिद्ध होत होतं.
२६ जुलै २००५ मध्ये रायगड जिल्ह्यात दुर्घटना झाली होती. त्याला आज नऊ वर्ष होऊनही पुनर्वसन झाले नव्हते. त्यातच भर म्हणून आजची घटना घडली होती.पण घटनेची बातमी शिळी होताच नेते घटना विसरतात.आश्वासन पुर्ती होत नाही. हे रायगडच्या घटनेवरून दिसत होतं. कदाचित माळीणमध्ये तेच होईल हे आज तरी वाटत होतं.
दर पावसाळ्यात डोंगर-उताराच्या पायथ्याशी राहणारी ही मंडळी जीव मुठीत घेऊन वावरत असतात. पण त्यांची आर्थिक स्थिती कमजोर असल्याने ते त्या ठिकाणाहून दूर जाऊ शकत नाहीत. त्याच्या यंत्रणा त्यांना घर बांधून देतात. विजेच्या दिव्याची सोय करतात. त्या यंत्रणादेखील त्यांना सुरक्षितता प्रदान करीत नाहीत. माळीण सारखी अशीे कितीतरी गावं आहेत की ज्या गावात शासनाने पुन्हा पुन्हा का असेना रस्ते बनवून दिले. वीज मंडळाच्या सोयी दिल्या. पण सुरक्षितता प्रदान केली नाही.मग माळीण सारख्या घटना होत असल्या तरी अाजही लोकं त्या ठिकाणी राहतातच. आपला श्वास रोखून. रात्र-रात्र डोळ्याला डोळा न लावता दिवस काढत असतात. समजा अशा दुर्घटना झाल्या तर मृतांच्या नातेवाईकांना दोन चार लाख रुपये दिले जाते आणि चूप बसवले जाते. पण जे मृत पावतात त्यांचं काय?हा प्रश्न शासनाला कोणी विचारत नाही.
देशाला निसर्ग संपत्तीचे वरदान लाभलेले आहे.एकीकडे भरपूर पाऊस पडतो,तर दुसरीकडे अजिबात पाऊस पडत नाही.कुठे बर्फाच्छादित प्रदेश आहे,तर कुठे अजिबात नाही. कुठे पानझडी वृक्ष आहेत तर कुठे सदाहरित. गंगा, ब्रम्हपुत्रा, नर्मदा अशा भरपूर लहान मोठ्या नद्या देशात आहेत. काही ठिकाणी बारमाही नद्या वाहतात.तरीही देशात उन्हाळ्यात शेती करता येत नाही.तेच हाल जमिनीचेही आहे. देशात जमिनी भरपूर असल्या तरी बहुतांशी जमीन बंजर अवस्थेत आहे.
पृथ्वी, जल,आप,तेज, वायू या पंचमहाभूतांनी जसं शरीर बनलं आहे.तसं शरीरही बनलेलं असतांना आम्ही मात्र त्याच तत्वा कडे दुर्लक्ष करून अाजही पृथ्वीवर वावरत असतो. पृथ्वी, पाणी ,वायू आणि अनावश्यक तत्वावर आमचे जगणे जरी असले तरी आम्ही त्यांचा उपयोग करीत नाही.अाजही पाणी प्रदूषण,वायू प्रदूषण व जलप्रदूषण सातत्याने होत असते.
माळीण गावातील डोंगराचे भूस्खलन झाल्याने मिटलेले गाव व झालेली जी विविध प्रकारची हानी आहे.तशाच प्रकारच्या घटना तेलंगाना, ओरिसातील तसेच रायगडमधील वादळ, हिमालयातील ढगफुटी, आसाम,उत्तर प्रदेशातील पूर,त्सुनामी, भूकंप या भागात त्या त्या स्वरुपात झालेल्या आहेत.या सर्व घटनामधून आपल्याला हेच कळते की ह्या घटना रोखता येत नाही.तसेच कोणत्याही तंत्रज्ञानाने नैसर्गिक आपत्तींना रोखता येत नाही. निसर्गाची व्यापकता एवढी मोठी आहे की मानवाच्या कल्पना शक्तीला मर्यादा पडतात.ठीक आहे आपण जर विचार केला की डोंगर पोखरला म्हणून असे घडले,मोबाईल काढला त्यामुळे पक्षी मिळण्याचे घडलं,असं काही कारण आपत्तीचं होऊ शकत नाही. याचं कारण आपल्याला मोहेंजोदारो, हडप्पा संस्कृती वरून दिसून येईल.
असल्या नैसर्गिक घटना आणि डोंगर पोखरा की नका पोखरू,त्या होणारच.हडप्पा आणि मोहेंजोदारो ही शहरं जमिनीखाली गाडली गेली. त्यापूर्वी काही डोंगर पोखरला होता काय? तर त्याचे उत्तर नाही असेच येईल.तरी ती घटना झाली. एक मात्र नक्की की या नैसर्गिक आपत्तीपासून लोकांना वाचवण्यासाठी काम करणारी यंत्रणा आपल्याकडे असल्याने, आपण या नैसर्गिक आपत्ती पासून खरेच गावाला वाचवू शकतो. त्याचप्रमाणे पुनर्वसनाने आपत्तीचा सामना करण्यासाठी सज्ज होवू शकतो.
दरवर्षी पु़र येणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. अशा प्रक्रिया पुरामुळे ही असंख्य गावे धराशायी होतात. यामुळे त्या गावाचे पुनर्वसन करणे गरजेचे असते. असे किती गावे आहेत की ती नदीकाठी वसलेलेची आहेत. मग सरकार तरी किती गावाचे पुनर्वसन करणार?हा प्रश्न सरकारपुढे पेच म्हणून उभा आहे. त्यातच माळीण सारख्या दुर्घटनेच्या बाबतीत कारण शोधताना सरकार विजयाबाबत तोच निर्णय घेत होतं. सरकारने माळीणच्या सर्व ग्रामस्थांना घर बांधून दिली होती. पण विजयाला घर बांधून दिलं नसल्यानं मग विजया ने कुठे जावे? हा प्रश्न आणि त्या प्रश्नांचा विचार सरकार करीत नव्हते.
नैसर्गिक आपत्तीचे दोन प्रकार पडतात. आकस्मित आणि अपेक्षित आपत्ती. भूकंप, त्सुनामी हे आकस्मित आपत्तीत येतात.ती आपत्ती कुठे येईल हे रडारच्या साहाय्याने ओळखता येते. त्यांची तेवढी तीव्रता मात्र घटना होण्यापूर्वी ओळखता येत नाही. तसेच जास्त डोके लावून हे ओळखता येते की त्या भागात नुकसान किती होणार.बचावासाठी कोणती काळजी घ्यावी. हे ओळखता येते. भूस्खलन किंवा पूर हे भूकंपामुळे होऊ शकते. या नैसर्गिक आपत्ती अपेक्षित मध्ये मोडल्या जातात. परंतू ह्या आपल्या नकळत स्वरूपाच्या वाटतात.
कुठे भुस्खलन होऊ शकते हे ठरलेले असते.त्यामुळे वेळीच उपाययोजना केली तर संभाव्य धोके टाळता येतात.पैशातील नुकसान टाळण्याच्या दृष्टीने खूप लाभ होत असतो. अपेक्षित आपत्तीमध्ये भुस्खलन, पूर,वादळ, ढगफुटी, किनारपट्टी अपक्षरण,दुष्काळ यांचा समावेश होतो. भूस्खलनाच्या भाग नदीच्या कडेला लागून असेल तर धरण फुटी होते. कधी कधी धरण फुटी होते. संपूर्ण भारतीय उपखंडात प्रत्येक भागात कोणती ना कोणती नैसर्गिक आपत्ती येत असते ते शब्दात सांगणे कठीण आहे.पण आपत्तीपासून वाचविण्यासाठी त्या येण्यापूर्वीच जर त्या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या लोकांचे पुनर्वसन केले गेले तर आपत्तीनंतर पुनर्वसनासाठी लढावी लागणारी लढाई लढावी लागणार नाही असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.
विजयाच्या पुनर्वसनासाठी लढणं पाहून आहूपे गावातील सरपंचानं रहिवासी दाखला दिला.तो दाखला व तिच्या शाळेची सर्टिफिकेट तसेच एक एफिडेविट सह विजयानं घरकुलाचा फॉर्म भरला. तो फाम पुन्हा भरला गेला. मागचे झालं नव्हतं ते सगळं विसरून विजया नव्या जोमानं कामाला लागली होती.विजयानं तालुक्याला भरलेला फाम जिल्ह्यामध्ये गेला.विजयाला बोलावणं आलं.काही विचारण्यासाठी.
विजया जिल्ह्यात गेलीे. त्यावेळी अठरा वर्षाचं तिचं वय झालं होतं.समजदारी पण तिच्यात आलं होतं. साहेबाशीे कसे बोलायचे याची त-हा ती शिकली होती.आश्रमशाळेच्या संस्थाचालकाला धडा शिकवत असताना तिनं जे काही केलं होतं. त्याची परीयंती म्हणून तिच्यात डेरींग आलं होतं.त्या डेरींगच्या भरवशावर त्या घरकुलासाठी लढत असतांना ती जिल्ह्यात गेली.ती साहेबाजवळ गेली.तसे साहेब म्हणाले,
"विजया तुच की."
"हो जी सायेब."
"हा तुमचा अर्ज का?"
"हो जी सायेब."
"घर भेटलं नाय का?"
"नाई जी सायेब."
"पण या यादीत तुमचं नाव नाय."
"कसं रायन नाव सायेब?"
"का बरं?"
"सायेब,अधिका-याईनं बराबर यादीच बनवली नाई."
"मले सांगा,हे मेले हे कोण?"
"सायेब,ते माह्ये बाबा,आई आन् बईन."
"मले सांगा,तू त्याईचीच मुलगी कशावरुन?"
"म्हंजे?"
"अहो,तुम्ही किसनरावाचीच पोेरगी हे कसं वळखायचं आम्ही?"
"सायेब,माह्या शाळेचा दाखला लावला हाये.चवथी पासचा.शाळेचा दाखला काय खोटा बनवता येईन का मले.अन् तेवळं बी वाटत नसन तं गावले चाला.आन् चौकशी करा.मी कोणाची पोरगी हाये ते मालूम होईन."
"हं हं,पटलं पटलं.तुम्ही किसनरावाचीच पोरगी असान.पण मले सांगा तुम्हाले घरकुल का पाह्यजे?"
"म्हंजे?"
"अहो,घरकूल कशासाठी हवं म्हणलं?"
"राहायसाठी.........दुसरं काय?"
"मंग आतापर्यंत कोठं राहात होत्या."
"गावले असते.त्या सरकारनं बांधून देलेल्या तात्पुरत्या शेडमंधी.जो त्या माळीण रस्त्यावर तात्पुरत्या स्वरुपात उभारला हाये."
"पण तुम्हाले घरकूल का हवं?आतं तं दोनचार वर्षानं तुमचं लगन होईन.तुम्ही सासुरवाडीत जान अन् गाव सोडान.सरकारचे पैसे का खर्च करता?तुमच्यासाठी खर्च होणारा पैसा हा दुस-या कोणाच्या कामात येईन."
"सायेब,म्हणून का मी तवापर्यंत उघड्यावर रावू.आतं माह्य लगन कवा होते न कवा नाई.तवा आतंपासून मी लगन जुळायच्या पहिलंच सासरी जावून बसू.अन् सायेब मले सांगा.मले पावाले येणारा का माह्य थुतरंच पावून लगन करन का माह्याशी.घरदार नाय का पायणार.तुम्हाले बी बायको असन नं.तुम्ही रस्त्यावरुनच पोरगी आणली का उचलून.का घरदार असणा-या माणसाचीच आणली."
"अहो,तुमचं घरकुल मंजूर करतांनी काही हरकत नाय माई.पण खात्यात पैसाच नाय.तवा,जवा कवा अनुदान येईन.तवा व्यवस्था करु तुमच्या घरकुलाची."
"मंग तवापर्यंत कोठं रावू मी."
"राहा की त्या टिनाच्या शेडात.तुम्हाले कोणी काई म्हणन तं आमाले सांगा."
"सायेब,ते टिनाचं शेड.आतं तेथं कोणी राहात नाई.मंग मी एकटी कशी रावू?शिवाय मी जानजवान हाये.तेथं मले चोर उचक्याची भीती वाटते.तसं तेथं जंगली जानवर बी येतेत.अान् कोणी तं म्हणतेत का त्या ठिकाणी मलब्यात दबलेल्या माणसाचाबी आवाज येते."
"पण तुम्ही तं सुशिक्षित वाटता."
"सायेब,मी आत्मा नाई मानत जी.पण मी एकटीच हाये न जी.कोणीच नाय राहात न टिनामंधी.मंग मी एकटी कशी राहणार.जरा ईचार करा."
"मंग एखाद्या गावक-याच्या आस-यानं राहा की."
"कोण रावू देईन जी जास्त दिस.एक दोन दिसाचं ठीक हाये.पण परमनंट रावासाठी सोताचं घर नाई पाह्यजे का?"
"हो,तुमचं म्हणणं बराबर हाये."
"पण सरकार माह्याकडं लक्ष देत नाई.सायेब,या घरकूलासाठी मी मागील पाच वर्षापासून जुझते हाये.अर्ज बी भरते हाये.पण तालुक्याले भरलेला अर्ज जिल्ह्यातून परत येते.कोणीबी यादीत नाव नाई हेच सांगतेत.पण मले सांगा यादी करनेवाल्यानं बराबर यादी केली तरी का?अहो,सरकारच्या जी आर नुसार माळीणमंधी राहात असलेल्या सर्व परीवाराले घर मिळणार होते की नाई.पण सायेब त्यापैकी मोजक्याच लोकाईले घरं मिळाली.काई मातर प्रतिक्षेत आतापर्यंत.मंग घर भेटत नाई म्हणून काई काई लोकं दुसऱ्या गावात राहायला गेले. काई काई लोक गाव सोडून गेले.काई काई लोक सासूरवाडीत राहायला गेले. सोडली आशा त्याईनं घराची.का करतीन शेवटी. आज पहिल्यांदा मले बोलावणं आलं घरासाठी. माईत नाई कोण बनवली यादी तं. सर्वच चुकीची यादी बनवली.काई काई लोकाईले तं चक्क सोडूनच देलं. मले वाटतंय गावच्या माणसानं यादी बनवली नसन.तुमच्या अधिका-याईनच बनवली असन यादी.मी अजून माहितीसाठी सांगते का माळीण दुर्घटनेत जे कोणी दबलेले जिवंत होऊन निघाले. त्याईचा उपचार दवाखान्यामंधी सुरू असतानी कुटुंबातले सर्व लोक दवाखान्यात होते.त्याच दरम्यान यादी बनवली.मंग कसे येईन यादीत नाव. घरचेही संपूर्ण गावाला गेले होते.अहो घरं ही संपूर्ण गावाले द्याले पाह्यजे होतं. निकष लावायलेच नको होतं. माहित आहे का साहेब या माळीणच्या दुर्घटनेचा अंगावर काटा उभा राहते. या दुर्घटनेत आमच्या सगळ्यांचे कपडेलत्ते, भांडीकुंडी, पैसा, माय बाप, भाऊ बहिण,नातलग,आन् ऋणानुबंध सर्वच काई.एवढंच नाई तं ज्या देवाले आम्ही मानत होतो.तो देवबी गेला. आता दोन मंदिर होती गावात सायेब. शाळेले लागून एक आन् गावात एक. शाळेची भिंत कोसळली.गावातलं मंदिर वाचला नाई.तं माणूस तरी कसं म्हणावं वाचन.आम्ही वाचलो कारण आमच्या भाग्य मोठं. असं म्हणून समजा. नाई तं आम्ही बी अर्ध्या रात्री काळाच्या पडद्याआड डोंगराच्या कुशीत विसावलेले असतो कायमचे.मंग तुम्हाले आतं घरकुल मांगाले आले ना.तशी आले नसते मी. तुम्ही एक करा सायेब. तुम्ही काहीबी करा.पण माह्या घरकुल मंजूर करा. लय गरज आहे जी.तुम्ही मले समजून घ्या माय गरज मी समजून घ्या."
"ठीक आहे. समजलं.मी करतो काय ते. लवकर करतो.तुम्ही निश्चिंत व्हा.आतं जा. तुमचं घरकुल मंजूर झालं म्हणून समजा."
"बरं आतं येतो मी."
"बरं."
साहेबानं म्हटलं.तशी मनात असंख्य विचार घेऊन आपल्याला घरकुल मिळेल का की फक्त साहेबांनं अासच दाखवली. याचा विचार तिला पावलोपावली येत होता. कारण ती बऱ्याच दिवसापासून घरकुलासाठी लढत होती. पुनर्वसनासाठी नव्हे तर पुनर्वसित जागेवर स्वतःचे अस्तित्व स्थापन करण्यासाठी.त्या डोंगराच्या दरड कोसळण्यानं तिचं घरकुल हिरावलं होतं.
आठ दिवस झाले होते.तसं जिल्ह्यातून तिच्या नावाचं एक पत्र तिच्या हातात दिलं.तिची सही घेतली व पोस्टमेन निघून गेला. पण पत्र पाहून तिला फार आनंद झाला.तिचं घरकुल मंजूर झालं होतं. त्यासाठी ग्रामपंचायतमध्ये तिला जावं लागत होतं.तशी ती त्या साडेतीन किलोमीटर असलेल्या दगडधोंड्यांच्या वाटेनं गेली.त्या पत्रातील मजकूर तिनं ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला दाखवला.तसं त्यानं विचारलं,
" घरकुल मंजूर झालं का?"
घरकुल मंजूर झालं का विचारताच ग्रामपंचायतीने लिस्ट तपासली.त्यात तिला तिचे नाव आढळलं नाही.तशी ती दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात गेली.ज्या जिल्ह्यातून तिला पत्र आलं होतं.
तिथं ती जशी त्या जिल्ह्याच्या पुनर्वसन विभागात गेेली. त्याची चौकशी केली असता तिला जाणवले की तिचा घरकुल मंजूर होऊन फाईल तालुक्याला पाठवलेली आहे. तालुक्यावरुन ती फाईल ग्रामपंचायतीला जाते.तसेच त्या अधिकाऱ्यांनी जावक फाईलही विजयाला दाखवली. त्यात विजयाच्या घरकुलाची यादी तालुक्याला पाठवलेल्याची नोंद होती.तशी ती पुन्हा आपल्या घरी परत आली.असे दोनच दिवस गेले.ती परत ग्रामपंचायत गेली. त्यांना जिल्ह्यातील कहानी सांगितली.पण ते ऐकायला तयार नव्हते.ग्रामसेवक यादी दाखवत होता.या यादीत तिचे नाव नव्हतं. काय करावे? तिला नेमका प्रश्न पडला. नेमके काय झाले ते तिला समजेना. शेवटी तिनं तालुक्याला जाण्याचे ठरवले. ती तालुक्याला गेलीे. तिनं संबंधित अधिकाऱ्याला ते पत्र दाखवलं.तसा अधिकाऱ्यानं याद्या तपासल्या. पण त्याही ठिकाणी ज्या याद्या होत्या. त्या यादीत तिचं नाव नव्हतंच.शेवटी तिथंही ती हताश झाली. तिला विचार आला की नेमकी फाईल गेली कुठे? तिला तो प्रश्न पडला होता.ती परत परत ती फाईल पाहू लागली.पण कुठेही तिचे नाव दिसत नव्हते.शेवटी की साहेबांना म्हणाली,
" साहेब आपण कॉम्प्युटर वर कुठेतरी फाईल शोधा. वाटल्यास पैसे घ्या."
पैसे घ्या हा शब्द तिनं आतापर्यंत उच्चारला नव्हता. जिल्हा पातळीवरच्या अधिकाऱ्यांनं तिच्या भावनांची कदर केली होती. पण तालुकापातळीवर तिच्या भावनेला कदर नव्हती. पण तिनं वापरलेला शब्द प्रयोग पैशाचा. तिचा फायदा करून गेला होता. साहेब म्हणाले,
" पैसे देणार आहे?"
"किती घेणार?"
" दोनशे रुपये. लगाम. दोनशे रुपये नाव शोधायचे. दोनशे रुपये देत असाल तर नाव शोधतो."
" नाही भेटलं नाव तर."
"नाही भेटलं नाव तर ते तुमचं तुम्ही पहा."
ती विचार करू लागली. पैसे दिल्याशिवाय हा व्यक्ती फाईल पाहून देणार नाही. भेटलं नाही तर आपला फायदा नाही. भेटलं तर फायदा होईल. दोनशे रुपयेच जातील ना.पैसे देणे हा तसा गुन्हाच. भ्रष्टाचार आहे. पण काय करावं आजच्या काळात आपल्या भावनेला किंमत नाही.यादी शोधायची तर पैसे तर द्यावेच लागेल.पैसे दिल्याशिवाय उपाय नाही. शेवटी तिनं साहेबाला पैसे देण्याचे कबूल केले. नाही नाव मिळाल्यास या पत्राच्या आधारे आपल्याला अजून चौकशी करता येईल पुन्हा. जिल्ह्यात जाऊन पुन्हा पाहता येईल आपलं नाव. साहेबांना विनंती करून परत फाईल पाठवायला सांगता येईल.
चले तिनं साहेबाला पैसे दिले.तसा तो साहेब आपल्या काम्प्युटरवर तिचं नाव शोधू लागला. तर त्याला तिचं नाव सापडलं. तसा तो म्हणाला,
" सापडलं तुमचं नाव. तुमचं नाव स्पेशल यादीत आहे."
तिचं नाव सापडलं. तशी त्यांना आलेल्या फाईल मध्ये तिचे नाव पाहिलं तर तिची फाईल आली होती.तसं जावक फाईल पाहिली. पण जावक फाईल मध्ये तिचे नाव नव्हते.तसा तो म्हणाला,
"हे बघा, तुमच्या नावाची फाईल आहे.जिल्ह्यातून आलली आहे.पण ती फाईल अद्यापही ग्रामपंचायतीने नेलेली नाही. तुम्ही तुमच्या गावच्या ग्रामसेवकाला सांगा. ग्रामपंचायतीला सांगा आणि लवकरात लवकर ही फाईल न्यायला पाठवा. हे फाईल मी तुमच्या हातात देऊ शकत नाही.देता येत नाही."
"साहेब एक काम करू शकता का तुम्ही?तुम्ही मले ही फाईल तालुक्याला आली हाये असं लिहून देऊ शकता काय?"
" ते कसे लिहून देता येईल.यासाठी जिल्ह्यातून हे पत्र मला आलं.तसं नाही हो तसं मला लिहून देता येणार नाही."
सायेब प्लीज."
ती विनवणी करू लागली.तर साहेब म्हणाले,
" ठीक आहे. लिहून देतो.पण काही गडबड करायला नको."
"नाई करणार सायेब."
ती म्हणालीे. तशी साहेबांनं फाईल प्राप्त झाल्याचे लिहून दिले. तसे पत्र घेऊन विजया आपल्या गावी परत आली.
ती गावाला परत आली खरी.पण रात्रभर विचार येत होता. रात्रभर तिला झोप आली नव्हती. ती नेहमीप्रमाणे सकाळी उठली व सकाळीच तयारी करून ती ग्रामपंचायतीला निघाली.ग्रामपंचायत जिल्हा तालुका अशा चक्रा मारता-मारता तिच्या नाकी नऊ येत होतं. तिला कंटाळा येत होता. श्रमाची लाही लाही होत होती. पण काम काही झालं नव्हतं व अधिकारी वर्ग दिरंगाईने वागत होता.खुद्द गावचा सरपंच,ग्रामसेवक वागत होता तसा.तसं तिला वाटायचं की ज्या गावचा सरपंच,ग्रामसेवक असा वागत असेल तर त्या गावच्या विकास होईल कसा?कदाचित अशाच प्रकारच्या दिरंगाईमुळे आपलं गाव डोंगराच्या कुशीत गडप झालेला असावा.
ग्रामपंचायत आली होती.तशी ती त्या ग्रामपंचायतीत पोहोचली. तसा ग्रामसेवक व सरपंच ग्रामपंचायतीत होताच. तिनं आपल्या हातातील कागद सरपंचाला दाखवला.म्हणाली,
" सायेब,माह्या घरकुल आला आहे.मले जागा देऊन आपण माह्या घरकुल मले बांधून द्यावं. तसेच सायेबांच्या मतानुसार तालुक्याले जाऊन माह्या घरकुलाची फाईल घेऊन यावी."
ती बोलली खरी.पण सरपंच,ग्रामसेवक चूप होते. त्यामुळे तिथं स्मशान शांतता पसरली होती. ती स्मशान शांतता सोडून ग्रामसेवक म्हणाला,
" किती देणार आहे?"
"मले काई समजलं नाई."
तशी ती पुन्हा म्हणाली,
"सायेब, काय देणार? कळलं नाही काहीच?"
" टक्केवारी किती देणार?"
"कशाची?"
" तुमच्या घरकुलाची म्हटलं."
" म्हणजे?"
"हे बघा, तुम्हाला घरकुल मिळणार. तुम्ही मजा करणार.तर आम्हाला काय मिळणार."
" मले नाई समजलं. काय म्हणायचे ते सरळ बोला.असं कोड्यात बोलू नका."
तसा सरपंच बोलला.
" हे बघ पोरी,ह्या घरकुला मधली किती रक्कम आमच्या ग्रामपंचायतीला देणार तू?"
" ही रक्कम माह्ये घर त्या माळीण दरडीत दबल्यामुळे आणि मी प्रयत्न केल्यामुळे मले घरकुल प्राप्त झालं. तशी मी फारच मेहनत केली."
" तरीही तुम्हाले पैसे द्यावे लागतील. नाहीतर घरकुल बनणार नाही.पैसे मिळणार नाही.सरपंच साहेब खरं बोलतात आहेत." ग्रामसेवक म्हणाले.
" पण मी मेहनत केली त्याचं काय?"
"अहो मेहनत तर कोणीही करते.परंतू यश येते का? तुम्ही जोपर्यंत पैसे देणार नाही.तोपर्यंत तरी तुम्हाले घरकुल मिळणार नाही."
तुझ्या विचार करीत होती. खरं तर तिला घरकुल हवं होतं. पण काय करणार एकशे एक संकटं तिच्या मार्गावर येत होते. घरकुल मिळताना शेवटी तिला वाटलं की आपण जर यांना पैसे दिले नाही, तर आपल्याला घरकुल मिळणार नाही. त्यानंतर ती म्हणाली,
" किती द्यावे लागतील पैसे?"
" पूर्ण रक्कम मधील २० टक्के रक्कम द्यावी लागेल."
"२० टक्के पुष्कळ झाले ना.उरलेल्या पैशात घर बनेल का?"
" तो तुमचा प्रश्न आहे."
"ठीक हाये. तुम्ही चेक पास करा.मी देते पैसे."
"ठीक आहे मी. उद्या पाठवतो तालुक्याला ग्रामसेवकाला. पण रक्कम नक्की द्याल ना."
"हो.माझं वचन हाय तुमास्नी.मी खरच देणार पैसे." ती म्हणाली.तशी पुन्हा ती म्हणाली.
"बरं येते."
"आता तुम्ही या. आम्ही चेक बनवून ठेवतो."
" बरं येते."
विजया म्हणाली. तशी तीे निघाली.ती तशी विचार करीत होती. समजा मला एकटीला जर या संबंधित रक्कमेतील वीस टक्के रक्कम मागितली.हीच वीस टक्के रक्कम आमच्या गावच्या पुनर्वसनात सहभागी असलेल्या प्रत्येक नागरिकाला मागीतली असेल.ह्यात काही दुमत नाही. मग हा गावचा विकास झाला की सरपंच ग्रामसेवक आणि सदस्य यांचा विकास. म्हणूनच गावच्या राजकारणात करोडो रुपये खर्च करून निवडणूक लढवली जाते. जिंकली जाते. निवडणुकीसाठी राजकारण असतं.गावचा विकास गेला खड्ड्यात. खालपासून वरपर्यंत सर्वच नेते आणि अधिकारी भ्रष्टाचार करतात.पण मग अशा वेळी गरिबांनी जगावं कसं? आज माळीणचं पुनर्वसन झालं असलं तरी, प्रत्येकाला नवीन घर बांधून दिली असली तरी, आजही त्यांच्या भिंतींना तडे गेले आहेत. कारण त्या घराचे बांधकाम....... सरपंच ग्रामसेवकानं वीस टक्के रक्कम हडपल्यानंतर झालं.कमी पैशात घर बांधकाम करता येत नाही. तरी बांधकाम केलं.म्हणूनच गावाचे पुनर्वसन करताना गावाच्या सह्या घेतल्या.पण तो पैसा यांच्या हातात दिला नाही.या बांधकामात शासनानेच अधिकारी होते. ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच या सर्वांनी पैसा खाल्ला असेल. त्यातच नेतेमंडळींनी काही पैसा खाल्ला असेल, तर घराला तडे गेले आणि नाव सांगतात जमीनीचं.जमीन चांगली नाही असं सांगतात. आपल्याला घर बांधून पाहिजे असेल तर वीस टक्के रक्कम सरपंचाला द्यावीच लागेल.नाही दिली तर आपलं घरकुल बनणारच नाही. त्यानुसार आपली अवस्था होईल.आपल्याला घरकुल मिळणार नाही.मग पश्चातापाशिवाय मार्ग सापडणार नाही. यासाठी घरकुल महत्त्वाचं. महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे आपल्यासाठी घरकुल.
विजयाला केव्हा घरकुल मिळते आणि केव्हा नाही असं वाटत होतं.तशीे ती येरझारा घालून थकली होती. संतापलीे सुद्धा होती.आज आठ दिवस झाले होते. तशी विजयाला आपल्याला दिलेल्या सरपंचाच्या आश्वासनाची आठवण झाली. तसेच ती सरपंच यांच्या भेटीला पुन्हा साडेतीन किलोमीटरचा अंतर चालून गेली.विचारपूस करायला लागली.विचारपूस केली असता सरपंचानं चेक बनवून ठेवला होता.पण सरपंच म्हणत होता की ती त्यातली पैसे मिळण्यापुर्वी मागितलेली वीस टक्के रक्कम द्यावी. परंतू तेवढे पैसे कुठून आणणार. त्यावर सरपंचानं उपाय सुचवला.तिला बँकेत खातं काढायला लावलं व त्या खात्यातून चेक बुक उचलून तो चेक सरपंचाला वीस टक्के रकमेसह द्यायला लावला. त्याशिवाय सरपंच तिला चेक देणार नव्हता. शेवटी नाईलाजाने बँकेतून विजयानं चेक उचलला. बँकेत खाते उघडले व त्यातील त्याला एका पानावर मिळणाऱ्या रकमेची वीस टक्के रक्कम लिहून व सही करून तो चेक सरपंचाच्या हातात दिला. सरपंचांनी मिळालेल्या रक्कमेतून वीस टक्के रक्कम चेक टाकून ती रक्कम पटकन खात्यातून काढून टाकली. विश्वास नव्हता त्याला.विजया पैसे देणार की नाही हे त्याला वाटत होतं.
गावच्या सरपंचानं गावकऱ्यांच्या विकासासाठी त्याला मतदान पद्धतीने निवडून दिला होतं.सरपंचानं काय केलं तर विजया सारख्या गरीब मुलीला लुटलं.जिचा आधार त्या दरडीनं हिरावून घेतला होता. अशा भरपूर लोकांना या सरपंचांना लुटलं होतं,नव्हे तर तो श्रीमंत बनला होता. तसाच ग्रामसेवकही असल्यानं गावकऱ्यांचा पैसा खाऊन तोही श्रीमंत बनला होता. गावच्या भरवशावर खाणारी माणसं विजयाला आता आवडत नव्हती.कारण त्यांचं पितळ खरंच तिच्यासमोर उघड झालं होतं. गावासाठी असलेल्या सरपंच,ग्रामसेवक,तसेच तलाठी आज गावाच्या विकासासाठी होते. पण गावाला लुटू-लुटू अाज ते मलाई चाखत होते. त्यांच्या पगार तुटपुंजा असला तरी पाच वर्षात त्यांची शान वाढत होती. तसं पाहता गावातील कोणाही माणसांमध्ये एवढी हिंमत नव्हतीे की ते त्या पैशाचा हिशोब घेऊ शकतील. त्यांना स्वतःच्या इज्जतीचा,इभ्रतीचा काही लवलेश नव्हता.
विजयाचा चेक वटला होता.तशी एक-दोन दिवसात तिच्या रक्कमेतून वीस टक्के रक्कम वजा झाली होती.बाकी उरलेल्या पैशातून तिला मिळालेल्या गावठाणाच्या जागेवर घरकुल बांधणे होते.त्याच्या जागेवर घरकुल बांधणे ही तारेवरची कसरत होती.तिच्या घरकुलासाठी कष्ट जरी पडले तरी आता त्या कष्टाचे चीज होणार होते.
पुनर्वसनासाठी मोठे कष्ट जरी पडले असले तरी आता त्या कष्टाचं चीज होणार होतं. विजयाला चेक मिळताच राम्यानं ठेकेदार बोलवला व त्याला मिळालेल्या रकमेतून दहा, वीस हजार रुपये विजयासाठी काढून ठेवले तिला शिकविण्यासाठी.घर बांधायला सुरुवात केली. काही दिवसातच एक साजेसं घरकुल उभं राहिलं.तिच्या स्वप्नांचं माहेरघर होतं.बाकी पैसा विजयाच्या शिक्षणासाठी काढून ठेवला.
सघरकुल तयार होताच विजयानं त्या घरात वाचनालय सुरू केलं.या वाचनालयात ती गरिबांची मुले यायची. निवांत अभ्यास करायची.वेगवेगळी पुस्तकं वाचायची. तसेच ज्ञान मिळवायची.जे त्यांना त्यांच्या कामात यायचं.हे समाजसेवेचं व्रत तिनं अकराव्या वर्गात असतानाच सुरु केलं होतं. ज्यांना शिक्षणासाठी पुस्तक घ्यायची ऐपत नव्हती. ती मुले अभ्यास करायला येत होती. तसेच अभ्यास करून मोठे बनणार होती. विजयाच्या पावलामुळे गावची मुले शिक्षणाच्या कक्षेत येत होती.त्यांना अभ्यासाच्या पुस्तकाला जास्त पैसा लागायचा नाही. त्यांना या वाचनालयाचा फायदा होता.ही सेवा असून त्या सेवेचे बाळकडू तिला जे वडील होते, त्या वडिलांकडून मिळाले होते. तसेच तिची बहीण मालिनी, त्या मालिनी कडून मिळाला होते. ते मायबापाचे स्वप्न व मुलींचे स्वप्न अकराव्या वर्गातच तिनं साकार केले होते. या विजयाच्या उपक्रमाची प्रशंसा गावोगावी होत होती.
गाव तसं चांगलं होतं. पण गांव आजही जादूटोण्यावर भरोसा करत होतं.देवाचा प्रकोप,भुतबाधा यामुळे रोगबाधा होते,अशी लोकांची समजूत होती. त्यातच माळीणच्या घटनेनंतर त्यात अजून वाढ झाली होती.त्यावर उपचार म्हणून अघोरी उपाय केले जात होते. त्यामुळे कोणतेही रोग हे सूक्ष्म जीवांपासून होतात,ही शास्त्रज्ञाची कल्पना,कल्पना वाटत होती.तसचे अाजही मलब्यात दबलेले जीव सतावतात भुत बनून. असंच गाव मानत होतं.त्यातच कधीकधी एखाद्याला कारण घडून जायचं. कधी कधी अन्न खाण्यातून विषबाधा व्हायची.हाहाकार उडायचा. पण त्या विषबाधेस जबाबदार न धरता माळीणच्या मलब्यात दबलेल्या लोकांच्या आत्म्याला जबाबदार धरले जाई. चांगले आरोग्य हे पोषक आहार,स्वच्छता, उत्तम व्यायाम यातून मिळत असते. ह्यातून व्यक्तीचा विकास होतो.जसे आपण आपलं आरोग्य सांभाळत असतो. तसेच समाजातील सर्व लोकांचे आरोग्य चांगले चालण्यासाठी तसेच राहण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या सर्वांना तणावरहीत आणि आनंदी जगणे हवेहवेसे वाटते. तसेच संपूर्ण समाजाला उपलब्ध झाले पाहिजे. व्यक्तिगत आरोग्य व स्वच्छतेच्या सवयीने आपल्याला समाजाचे आरोग्य व सार्वजनिक स्वच्छता प्राप्त करता येते. हे विजयाचे मत होते. प्रदूषण,अस्वच्छता,साथीचे आजार, व्यसनाधीनता कीटक दंश यासारख्या जीवा पासून होणारे आजार सामाजिक आरोग्य धोक्यात आणत होते.या आजारापासून सर्वसामान्य जनतेचे संरक्षण करणे आणि त्यांना आनंदी व स्वस्थ पूर्ण जीवन उपलब्ध करून देणे हे शासनाचे काम होते. पण शासन लक्ष देत नसल्यामुळे लोक तिकडे वळले होते.
देशाची प्रगती आणि विकास यातील सर्वात महत्त्वाचा घटक हे देशातील नागरिक होय. स्वच्छ पाणी,स्वच्छ पर्यावरण,पोषक आहार, निर्धोक पाणी आणि आरोग्याच्या पुरेशा सोयी असतील तर लोकांचे स्वास्थ्य टिकते. परंतू लोक जागोजागी थुंकत असतील तर आरोग्य बिघडते. हे जागोजागी थुंकणे, तंबाखू, गुटखा,पानमसाला,सिगारेट,मावा,विडी व मशेरी खाणाऱ्या व्यक्तीकडून जंतूचा प्रसार सतत होत असतो. सुरुवातीला एखादी व्यक्ती सहज कोणीतरी आग्रह केला,म्हणून तंबाखू खाते किंवा व्यसन करते. परंतू सहज म्हणून केलेली सुरुवात ही धोकादायक तेव्हा होते,जेव्हा तो व्यक्ती तंबाखूच्या आहारी जातो. मग तंबाखू किंवा ते व्यसन करणे आरोग्याला हानीकारक नाही असले तरी माणसाला त्याचे काहीच वाटत नाही.तंबाखू खाण्याशिवाय कोणत्याही कामात लक्ष न लागणे हे तंबाखूचे दुष्परिणाम असताना,आम्ही त्या दुष्परिणामांचा विचार करीत नाही.
तंबाखू, दारू व विविध अंमली पदार्थ नशा उत्पन्न करतात. त्यांचे व्यसन शेवटी व्यक्तीचे प्राण घेतात.म्हणून हे व्यसन करू नये.पण गावात ह्याच प्रकारच्या अंमली पदार्थांच्या व्यसनाने पूर्ण गाव त्रस्त होता. गावातील तरुण पोरं तसेच ज्यांची दुधाची ओठं सुकलेले नाहीत.अशी मुले तंबाखू सारखे व्यसन करीत होती,नव्हे तर दारूच्या आहारी गेली होती.
विजया आता बारावीला गेली होती. ती सातत्याने अभ्यास करीत होती. पण त्याच वेळी देशात कोरोनाचा आजार अाला होता. कोरोना गावागावात पोहोचला होता. स्वच्छता पाळा, हात साबणाने धुवा,सानिटायझर वापरा. अशा प्रकारच्या बातम्या प्रसारमाध्यमातून चमकत होत्या. त्यातच प्रसारमाध्यमांची सोय गावात तेवढ्या प्रमाणात पोहोचली नसल्याने, गावात दवंडी देऊन सरपंच गाव जागृत करीत होता. शिक्षणाची दैना उडत होती. खेड्यापाड्यातील लोक गावोगावी जायला घाबरत होते.
कॅन्सर पेक्षाही महाभयंकर असलेल्या कोरोनानं जागतिक पातळीवर भरपूर जीव घेतले होते. तसेच असंख्य लोकांना बाधीतही केलं होतं.त्यामुळे सहाजिकच लोकांना भीती वाटत होती. जो तो कोरोनाच्या दहशतीत होता. काय करावे हे सरकारला समजत नव्हते त्यातच सरकारने या रोगावर जय मिळवण्यासाठी लॉकडाऊन केलं होतं.
लॉकडाऊन चा परिणाम म्हणजे लोक घरी बसले होते. त्यांच्या हाताला काम नव्हतं. कारखाने,उद्योगधंदे,दुकाने सार काही बंद होतं. लोकांची उपासमार होत होती. त्यातच सरकारने ऑनलाइन शिक्षण आणलं होतं. ऑनलाइन शिक्षण म्हणजे स्मार्टफोनवरील शिक्षण.कारण शाळा बंद होत्या.सुरू करणे अवघड होते. कारण शाळा सुरू केली,तर उद्या विद्यार्थी कोरोनाच्या चपेटमध्ये येऊन संपूर्ण लोकांना बाधीत करुन त्यात विद्यार्थ्यांच्या पालकांचा जीव जाऊ शकतो.तसेच विद्यार्थ्यांचाही.असे सरकारला वाटत होते. त्यामुळे शाळा सुरू करण्यावर बंधन आलं होतं.त्यातच विद्यार्थ्यांचं शिक्षणाचं नुकसान होवू नये म्हणून सरकार शाळा मोबाईल द्वारे सुरु करा. असं सरकार म्हणत होतं. नव्हे तर सक्ती करीत होतं.
ऑनलाईन शिक्षण मोबाईलवर कसे सुरु करायचे?हा शिक्षकांसमोर मोठा पेच निर्माण झाला होता. त्यातच विजयाला जास्त समस्या निर्माण झाली होती.कारण ती बारावीत होती.नेट कॅफे जाऊन ऑनलाइन बारावीत प्रवेश तर तिनं घेतला होता. पण शिक्षणाचं काय?अभ्यास कोठून आणि कसा करायचा? तिच्यासमोर हा प्रश्न होता.आपल्या जवळ मोबाईल नाही, मोबाईल घ्यायला पुरेसे पैसे नाहीत, हा प्रश्न तिला सतत होता.
विजयाचं महाविद्यालय शहरात होतं. कारण शिक्षकांची पुरेशी सोय माळीण तसेच जवळपासच्या गावात नव्हती. त्यामुळे उच्च शिक्षणासाठी तिला बाहेरगावी शहरात शिकणे भाग होते. त्यातच कसाबसा तिने बारावीला प्रवेश मिळवला व महाविद्यालय शहरात असल्याने व शहरातील बहुतःश मुलं ही श्रीमंतांची असल्याने त्यांच्या जवळ स्मार्टफोन होता.पण विजयाचं काय?तिला तिथं साधी राहायची सोय नव्हती. तिथे मोबाईल कसा घेणार? हा प्रश्न होता. त्यातच स्मार्टफोनवर महाविद्यालयाचं ऑनलाइन शिकवणं सुरू झालं होतं. विजया मात्र बरीच मागे होती.तसा तिला आता फार त्रास होत होता.
एक दिवस विजया निराश बसली असताना राम्यानं पाहिलं. कारण विचारताच कळलं की ती अभ्यासाच्या चिंतेत आहे. महाविद्यालयातून अभ्यास सुरू झालेला असून तिच्याजवळ मोबाईल नसल्याने तिला शिकता येत नाही. तिचं नुकसान होत आहे.तेव्हा राम्याने तिला न सांगता शहरात जाऊन स्मार्ट फोन विकत घेतला व तो विजयाला देत तो म्हणाला,
" पोरी,हा घे मोबाईल.भरपूर शिकून मोठीे हो आणि मले परकं समजू नोको. तुहा बाप नाय हाये म्हणून काय झालं.सांगायचं मले.सांगायचं,कोणती काळजी करायची नाय.कमीपणा बाळगायचा नाय. समस्त प्रॉब्लेम न लाजता सांगायचे. मले सगळे प्रॉब्लेम. मी तूहे हे समदे प्रॉब्लेम दूर करीन. मलेबी आपला बापच समज बेटा."
राम्याच्या उदारतेने व भावनात्मक बोलण्यानंं विजयाला गहिवरून आलं. तिला पोरगी म्हणून करीत असलेली मदत उपकार जागविणारी होती.तिला जेवण घावणं किंवा कपडे घेऊन देणं, पालन पोषण करणं ह्या गोष्टी उपकार दर्शविणा-या होत्या. तो तिला मुलगी मानत होता. पण ती त्याला बाप समजत नसल्याने तिला अाजही परायासारखं वाटत होतं.त्यामुळे कोणत्याही स्वरूपाची मदत मागायला ती आतापर्यंत लाजत होती. नाहीतर स्मार्टफोनसाठी राम्यासमोर विषय काढणं तिला आवडत नव्हतं. स्मार्टफोन घेणं तिच्यासाठी कौतुकाचा विषय होता.
राम्यानं घेऊन दिलेला स्मार्टफोन,मुलीच्या अभ्यासाची आभाळ होऊ नये म्हणून केलेला सात आठ हजाराचा खर्च तिला उत्साह देणारा ठरला. तिचे डोळे पाणावले. त्यातून नकळतच अश्रू वाहू लागले, तर तिचे अश्रू पुसत राम्या म्हणाला,
" रडू नोको पोरी.माया लेकरासारखीच आहेस तू. आज ते जिवंत असते तर मला त्यांच्यासाठी ही सोय करावी लागली नसती का? करा लागली असती ना. तेच सोय केली तुह्यासाठी. मंग यासाठी रडू नोको पोरी.रडू नोको."
तसं विजयाला अजून गहिवरून आलं. विजया आणखी हुंदके देऊन रडू लागली. तशी ती म्हणाली,
" बाबा बाबा."
"बोल पोरी."
" किती करताय तुम्ही माह्यासाठी? माह्या सोताचा बाप जरी असता तरी त्यानं माह्यासाठी एवळं केलं नसतं. त्या घरकुलासाठी तुमच्या पायात चालण्याचे बळ नसतानाही तुम्ही माह्यासाठी नेहमी सात किलोमीटर दगडधोंड्यातून चालत आलात.तरी मी तुमास्नी परायाच समजत होते.माह्ये एवळे ढगभर नातेवाईक हायेत.पण ते सांभाळू शकले नाही मले.येऊ शकले नाही. परंतू तुम्ही मले ते प्रेम देलं. आपला समजले.बाबा मी आयुष्यात कुठेबी असो तुम्हा दोघांलेबी कधीच अंतर देणार नाई.".
तशी ती गप्प झाली तिचे डोळे पुसले. तसा राम्या म्हणाला,
" बेटा, मी तुले पोरगी मानले ना.मग पिता-पुत्र कसला आला इथं भेद.तुले शिकवणं,मदत करणं,तुझ्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करणं हे माह्यं प्रथम कर्तव्य.ते कर्तव्य मी पूर्ण केलं. बाकी काहीबी केलेलं नाय. तू आता आपलं रडू आवरत निश्चिंत मनाने अभ्यास कर. काही लागलं तर खुशाल सांग."
राम्या गरीब होता. तो आणि त्याची बायको त्या डोंगराच्या कुशीत दिवसरात्र काबाडकष्ट करीत होते. त्या डोंगरात फिरून कधी लाकडं तर कधी चार मोह गोळा करून,ते शहरात विकून त्यावर राम्या आपला उदरनिर्वाह करीत असे. गाठीला काही पैसा गोळा करुन ठेवला होता. वेळ प्रसंगी पैसा राहायला हवा म्हणून त्यांनं काही पैसा गोळा करून ठेवला होता. त्यातच माळीण दुर्घटना.
माळीण दुर्घटने नंतर त्याच्या बायकोच्या अंगावर एक दगड पडल्याने घरबशीच झाली होती. ती सतत आजारी राहात होती.डॉक्टर ने तिचं ऑपरेशन सांगितलं होतं. त्यासाठी तो पैसे गोळा करीत होता. वाटल्यास आलेल्या घरकुलाच्या पैशातून तो आपल्या बायकोचं ऑपरेशन करू शकत होता.पण त्यांनं विजयाचं घरकुल,ते घरकुल साकार होऊ दिलं. तिला वाटल्यास सहयोग दिला. पण तिचा पैसा त्यांना स्वतः साठी वापरला नाही.नंतर तिला नव्हे तर तिच्या स्मार्ट फोनची गरज पाहून तिला ऑपरेशन साठी गोळा केलेले पैसे.......त्या गोळा केलेल्या पैशातून काही पैसा स्मार्टफोनसाठी राम्यानं खर्च केला होता.आपल्या बायकोचं ऑपरेशन मागे टाकलं होतं.
विजयानं स्मार्टफोन हातात घेतला तसा तिला फार आनंद झाला. याबद्दल तिच्या मनात कुतूहल निर्माण झालं. तसं तिनं मोबाईल वापरायला सुरुवात केली. त्या मोबाईलच्या द्वारे ती आपला अभ्यास करू लागलीे. तो डोंगर,तो भाग. त्या भागात ना इंटरनेटचे टावर होते,ना त्या मोबाईलवर नेटवर्क होता. त्यामुळे स्मार्टफोन जरी घेतला असला तरी तिच्या काहीच कामाचा नव्हता. स्मार्टफोनवर तिला अभ्यास करता येत नव्हतं. काय करावं ते सुचत नव्हतं. शिक्षक शिकवीत होते ऑनलाइन.विजयाच्या अभ्यासाचं फारच नुकसान होत होतं. कोणताही उपाय करता येत नव्हता. तशी ती विचार करीत होती. आपण बारावीचे पुस्तक विकत आणून त्यातून अभ्यास केला तर कदाचित आपण बारावी पास होऊ शकतो. असे तिला वाटत होते. तशी ती अभ्यास करू लागली होती. ती आपल्या महाविद्यालयीन शिक्षकांशी बोलली होती. त्यांनी सांगितलं होत की 'घरी राहूनही अभ्यास होवू शकतो.तसेच तिनंही अभ्यास करणार. मला परीक्षेच्या वेळी सांगा व म्हणजे झालं' त्यामुळं शिक्षकांनीही होकार दिला होता.
कोरोनानं मात्र एक सत्र निघून गेलं होतं. तो निघून जायला बरेच दिवस लागले होते. पण त्या कोरोनानं विजयाच्या अभ्यासाचं मोठं नुकसान केलं होतं. अशातच विजया बारावी पास झाली.ती बारावी पास झाली असली तरी तिला समाधान कारक गुण मिळाले नव्हते.त्यामुळे ती हताश झाली होतीे. तिला पुढील शिक्षणासाठी पदवीच्या वर्गाला प्रवेश मिळाला. ती शिकू लागली.चांगला अभ्यास करू लागली. यातच तिचे एका कॉलेज कुमार प्रेम जडलं.
कॉलेज कुमार चांगला होता. कोणतेही व्यसन नव्हते त्याला,नव्हे तर तिला त्याचं बोलणं आवडत असे. राम्यापासून दूर अशा ठिकाणी आपल्या शिक्षणाची गावाला आभाळ होते हा उद्देश गृहीत धरून ती महाविद्यालयाच्या वसतीगृहात राहू लागल्याने व इथे तिला कोणीही बोलू शकत नसल्याने तसेच कोणताही धाक नसल्याने ती त्या कॉलेज कुमार सोबत बोलू लागली. यातच तो कॉलेज कुमार शहरातच राहणार असल्याने तिला आवडायला लागला होता. मग काय त्याच्या गाडीवर फिरायला जाणं,तर कुठे रेस्टॉरेंटमध्ये नास्ता करायला जाणं तिचं सुरू झालं होतं. नाश्ता करता-करता गप्पागोष्टी करणे यातच तिचा वेळ जाऊ लागला. यातच दिवसाचा वेळ कसा कटतो. हे तिला कळायचे नाही. सारखी मनात हुरहूर लागलेली असायची सायंकाळची. दररोज सायंकाळ केव्हा उजळते असं तिला होऊन जात होतं. त्या कॉलेज कुमारचे नाव विकास होतं. विकासलाही मनात हूरहूर लागलेली असायची.
ती केव्हा भेटते. तेव्हा आपल्या सोबत फिरायला चालते. असे त्याला वाटायचे.म्हणून तो नित्यनेमाने घराच्या समोर उभा राहून तिची प्रतीक्षा करीत असायचा. मग ती बाहेर येताच त्याच्या समोर यायची.त्यानंतर त्याच्या गाडीवर बसून ती त्याच्या सोबत फिरायला जायची. तिच्यासोबत फिरणे त्याला आवडायचे. पण याची यत्किंचितही माहिती तिने राम्याला सांगितली नव्हती. मात्र तिच्यासाठी योग्य वर तो शोधत होता.
विकास आणि विजयाचं प्रेम फुलत चाललं होतं.विजयाचं तरुणपण राम्याला डिवचत होतं. पण तुझ्यासाठी मुलगा पाहू का म्हटल्यावर ती म्हणत असे.
'नको मला भरपूर शिकायचे आहे. माझं शिक्षण पुर्ण झालं की खुशाल मी विवाह करेल. तुम्ही काळजी करण्याची गरज नाही.'
कॉलेजला जाताच व मित्रांच्या संपर्कात येताच विजयाची भाषा सुधारली होती. ती आता सुद्धा बोलताना माळीण मधील रहिवासी आहे,असे वाटत नव्हते. जसजसे दिवस जात होते. तिचं प्रेम फुलत चाललं होतं.राम्या विचारत होता तिला.राम्या विचारत होता लग्नाविषयी तिला. म्हणत होता.मात्र ती त्याला उत्तर देत नव्हती. त्या विवाह बद्दल सांगत नव्हती. तसेच स्वतःच्या प्रेमाबद्दलही सांगत नव्हती. तिला भरपूर शिकायचं होतं कारण तिचं खूप शिकणं हे तिच्या बहिणीच्या मालिनीच्या स्वप्न होतं.ते स्वप्न तिला पूर्ण करायचं होतं. तसं तिला आपल्या गावाला सुधरवायचं होतं. शिवाय अाता राम्याची सेवाही करायची होती. ज्याने तिच्या साठी त्याग केला होता, नव्हे तर ऑपरेशनच्या पैशांनं ऑपरेशन न करता तिच्या शिक्षणासाठी कोरोनाच्या काळात मोबाईल आणला होता.
विजयाच्या शिक्षणात खंड पडणार होतं.कारण शिक्षण ही काळाची गरज झाली असली तरी शिक्षणाच्या कक्षेत तिच्या प्रेमानं जागा घेतली होती.त्यातच तिचा कॉलेज कुमार तिला विवाह करण्याविषयी रट लावत होता.शिकण्याच्या उमेदीत विकास वर असलेले प्रेम. त्याच्यासोबत घुमणं फिरणं विजयाच्या शिक्षणावर ब्रेक लावत होतं.आता तिचं अभ्यासात मन लागत नव्हतं.प्रेम एके प्रेम एवढेच अस्तित्व दिसत होतं. शेवटी विकासाच्या बोलण्याचा व शिक्षणाला ब्रेक लावण्याचा परिणाम की काय, विजयानं लग्नाला होकार दिला. विजयानं राम्याला न विचारता विवाहास दिलेला होकार, तिला काय माहित होतं की विकास नावापुरताच विकास आहे. शेवटी दिलेला होकारनुसार विकासशी विवाह केला. तसा त्यांचा संसार सुरू झाला.
काही दिवस चांगले गेले होते.पण नंतर कळलं की तो कसा आहे आणि त्यानं का बरं विवाह केला.
ती माळीणचा संघर्ष पूर्णतः विसरू शकत नव्हती.ते पुनर्वसनाचे झुंजणं तिला विसरता येत नव्हतं तसेच ते मलब्यातील शेकडो आक्रोश ती विसरू शकत नव्हती.पदोपदी तिला वाटत होतं.हा माळीणचाही इतिहास बनेल.शाळेत इतिहास शिकवला जाईल.मोहेजोदारोला जे जे मिळालं.ते ते पण या माळीणला कुठे मिळणार? कारण माळीणचं तर आतच खोदकाम केलेले आहे.
पृथ्वीवरील एकूण वाळवंटापैकी साधारण २५ टक्के वाळवंट वाळूची आहेत व उरलेली वाळवंट छोट्या छोट्या दगडांनी किंवा त्यांनी व्यापलेली आहेत. काही वाळवंटामध्ये उंच डोंगर किंवा चित्रविचित्र स्वरूपाचे कातळाचे सुळके आहेत. थोडक्यात आपल्या माळीणमध्ये ज्याप्रमाणे पाण्याचे लोट आलेत व त्या पाण्याच्या लोटांनी टेकड्यांना परास्त करुन आमचं माळीण उध्वस्त केलं. तिच स्थिती वाळवंटामध्ये आढळून येते.वाळवंटातही वा-यामुळं अख्खी वाळू उडून येते.व ती वाळू एखाद्या गावाला नेस्तनाबूत करू शकते. त्याप्रमाणे चुंबकीय गुरुत्वाकर्षणाच्या शक्ती या वादळ निर्माण करतात. त्याप्रमाणे हवेचा वातावरणातील दाब वाऱ्याची निर्मिती करीत असतो.वादळ निर्माण करीत असतो. पावसाची निर्मिती करीत असतो. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे वातावरणातील हवा पृथ्वीवर ओढली जाते. म्हणून समुद्रसपाटी जवळ हवेचा दाब जास्त असतो.वातावरणातील हवेचा दाब सर्वत्र असल्यामुळे आपल्यावर हवेचा दाब कार्य करतो. सर्वसाधारणपणे प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर असलेल्या हवेच्या स्तंभाचे वजन १००० किलोग्रम असते.हे सर्व ती शिकली होती.
ती पुढे अजून शिकली असती.पण तिच्या शिकण्यावर प्रश्नचिन्ह लागले होते.कारण तिने विवाह केला होता. विकास सोबत विवाह करताना तिला कोणतीच भीती वाटली नाही. आपण करीत असलेला विवाह आपल्या प्रेमाचा विजय आहे असे तिला वाटत होते.
विकास एक नंबरचा धोकेबाज माणूस होता,तो कामावर तर जात असे. तो कामावर जात असे.पण त्या कामावरून परत येतांना खूप दारू पिऊन येत असे. शिवाय घरी आल्यावर काही बोलल्यास मारपीट करीत असे. तसं पुढे असं कळलं की त्याला गावाकडेही एक पत्नी होती.पण आता माहीत होऊन काही उपाय नव्हता.तिच्या जिंदगीची अख्खी राखरांगोळी झाली होती.तिच्या मनाला जेव्हा त्याच्या जुन्या विवाहाची गोष्ट माहीत झाली.तेव्हा की खजील झाली होती. तिला फार वाईट वाटलं. तिचं नशीब समजून तिनं त्याला माफ केलं.पण नियती.पण नियती कशी काय तिला माफ करु शकेल.त्यातच लवकरच तिचा गर्भधारणा झाली. तिनं एका गोंडस बाळाला जन्म दिला. आता तिला वाटत होतं की आपला पती आता आपल्या बाळाला पाहून सुधरुन जाईल.
बाळाला नजर आली होती.बाळ अंगाखांद्यावर खेळत होतं. त्यातच हसत होतं.अगदी चांगलं वाटत होतं. पण एखाद्या चांगल्या संसाराला दृष्ट लागावी, तशी दृष्ट तिच्या संसाराला लागली. बाळाला नजर येताच कळलं होतं की त्याला तिच्या अगोदर अजून एक पत्नी आहे.ती पत्नी त्यानं सोडून देवून तो शहरात आलेला आहे. तो ऐतखावू असल्याने त्या पत्नीने त्याला हाकलून दिलेले आहे.
विजयाला पण त्याला हाकलावेसे वाटत होते.पण इथे तो काम करीत होता. कशीबशी विजयाही जॉब करत होती. कारण त्याच्या पैसा त्याच्या दारूलाच पुरत नव्हता. तो घरात कसा पुरणार.शेवटी तिला कामावर जावं लागतं असं तिला वाटत होतं.पण आता तिला तिचा बाळ झाल्यापासून ती घरी बसली होती. तिला घरी बसावे लागले होते. नाईलाजाने त्यामुळे तिची अक्षरश: उपासमार होत होती. शेवटी निर्णय झाला त्याला सोडायचं.कायमचं सोडायचं. हा बेवळेबाज तर आहेच शेवटी वेगवेगळ्या शौकाचा आधीन.आता पत्नीही आहे असं कळलं. शेवटी तिनं त्याला सोडण्याचा निर्णय घेतला. तसा तो एक दिवस उजाडला.
अाजही तो पिऊन अाला होता. विजया रात्रीच तसेच तीन-चार दिवस सतत त्याला पिऊन यायचा नाही, नाहीतर सोडून जाईल असा दम दिला होता. परंतू त्याने तिचं न ऐकताच तो पिऊनच आला होता. तशी ती त्याला म्हणाली,
" मी तुम्हाला वारंवार माँगते. पिऊ नका म्हणून. परंतू तुम्ही वारंवार पिऊन येता.मला वाटते आज सुधराल.उद्या सुधराल. परंतू तुम्ही सुधारण्याचं नावच घेत नाही."
तसा तो म्हणाला,
"हे मादरचोत निघून जा.मी का तुझ्या बापाची पितो."
"मी म्हटलं होतं ना की सोडून जाईल तुम्हाला."
"जा निघून जा.इथं कोणाला सांगते. त्या सारख्या छप्पन मुली मिळतात मला. तुझी गरज आहे कोणाला.आत्ताच निघून जा.लई माल खाऊ खाऊ माज आला."
" मी निघून जाते बाळाला घेऊन."
" पोराला घेऊन. तुझ्या बापाचं पोरगं आहे का? कशी नेते पोराला तर तेच पाहतो."
असे म्हणत तिला तो मारझोड करू लागला. त्याच्या मनातच राग धुमसत होता.तो राग आता विकास तिच्या अंगावर हात घालणार. ती सरकली.शेवटी तिनं आपल्या लेकराला उचललं आणि त्याला घेऊन निघणार.तोच विकासने आपल्या संपूर्ण ताकदीनिशी त्याला हिसकावला व तिला लाथ मारून घराच्या बाहेर केलं व तो घराच्या आत गेला. त्यांना तशी आतून कडी लावून घेतली.
विजयाला बसलेला मार त्यातच आधीपासून धुमसत असलेला राग, त्यातच बाळाला हिसकावून घेणे ह्या कृती तिला भयंकर राग आणणा-या होत्या. विजया शेवटी त्याच रात्री बाळाची पर्वा न करता घरातून बाहेर पडली. रात्रीची शेवटची एसटी पकडली आंबेगावची. आंबेगावला ती संतापाच्या भरात निघाली. रात्रीला नव वाजता पोहोचली. आंबेगावातून मग माळीणला जाण्याचा पर्याय नसल्याने तिथे तालुक्यात स्टेशनवर ती झोपली. त्यातच तिला झोप केव्हा लागली हे कळलेच नाही.
सकाळ झाली होती.पक्षांचा आवाज कानी येत होता. तशी ती उठली. तिला रात्री झालेलं भांडण आठवलं. त्याचबरोबर गावंही आठवला. त्यातच तिला तिच्या आंबेगाव स्थानकावर बाहेर गावी प्रवासाला जाणारी माणसे आलेली दिसली. तशी काही वेळाने एसटी आली.
तिनं माळीणची एसटी पकडली.ती येताच ती आपल्या सख्ख्या असलेल्या रामाच्या घरी गेली.त्यालाही तिला पाहताच आनंद झाला.तसा तो म्हणाला,
" बेटा, एकटीच आलिया. जावयाले नाय आणलं."
"नाही ना आणलं."
"नातवालेबी नाई आणलं."
"नाही."
तशी ती रडायला लागली होती.
"पोरी का झालं?जावई काई बोलले का?" ती गप्प होती.तसा तो म्हणाला,
"बोलत का नाहीस. काही म्हणलं का तुला जावयानं?"
तशी ती पुन्हा हुंदके देत रडायला लागली.
"रडू नोको.किसन्या जरी जिवंत नसला तरी हा किसन तुह्या राम्याच्या रूपात जिवंत हाये.कोणीच बाल बाका करू शकत नाय.अख्खी जिंदगी पोसून टाकीन तुले. चिंता कायले करतेस. उद्यापासून हितच राहा.ईसर त्याले."
" पण बाबा माझ्या बाळाले मी कशी विसरणार."
"बेटा बाळालेबी ईसर आतं. असं समज आपल्याला बाळच झालं नाही. आपलं लगनच झालं नाही."
राम्याचे खडे ते बोल. त्याचाही पारा चढलेलाच होता.त्याला विजयानं सांगितल्याबरोबर संताप आला होता. त्यावेळी फार राग आला होता. तसा तो म्हणाला,
" उद्या चालते काय? त्याची चांगली खबर काढून घेऊ."
"नको बाबा, मी प्रयत्न करेल. सर्व माझी चूक.माझ्या नशिबाचे भोग समजा. जाऊ द्या. वाटत असेल त्याला की ही काहीच करणार नाही.नियतीनं लहानपणी माझे मायबाप मेले.नियतीनं पाठ फिरवली. आता पती अन् बाळंही हिरावला. जाऊ द्या.नियती यातून बाहेर काढेलच." अशातच राम्या तिला समजावू लागला. कारण दोन चार दिवस झाले होते.अशांनं संसार आपल्या पोरीचा तुटेल असं त्याला वाटत होतं.
" बेटा,मी समजवेल त्याले. तु सरळ जा. कोणालाही न घाबरता जा. तु तिकडे जा."
"पण बाबा काही करणार तं तो."
"बेटा काय करणार आहे तो.दारू प्यायल्यावर तसं करतो. तू जा तिकडे. तो काहीच करणार नाही.लोकं सोडचिठ्ठी झाल्यावरबी जातात. कोणी काही म्हणलं तर चूप राहायचं.काहीपण बोलायचं नाय. मग काही बी करणार नाय."
" तर तो ठेवेल का बाबा मला."
"पण जाशीन तवा नं."
"कवा जावू."
"तू एक काम कर."
"कोणतं काम करु बाबा?"
"बेटा,तू एक काम कर.एक तर तू त्याला पुर्ण विसर.नाही तर उद्याच जा. उशीर करू नको.नाहीतर दोन-चार दिवसानं जा. अन् जायचंच अनशन तं परवापासून हा विषय काढाचा नाय.हा विषय डोक्यात आणाचाच नाय. कारण एखाद्या जखमेवर मीठ चोळले तर ते जखम जशी चिरघळते ना. तसा तुह्या जीवाचं होत हाये. लगन झालं ना लग्न झालं ना एखाद्या पोरीचे तं तिचे मायबाप हे तिचे नाय राहात. पती हा सर्वस्व असतो अन् पतीची भीती पत्नीला नसावी. एकदाच मारन जास्त. अन् मारण्याच्या पूर्वी सरणाची भीती बाळगू नये.असं कितीतरी वेळा त्याईनं तुले मारलं असन. आता मारन तं एकदा मार एकदा खाऊन घ्यायचा. लेकरासाठी........ लग्नानंतर आम्ही कितीही चांगले बोलत असलो तरी आम्ही तुह्ये नाय. तसं पाहता तू गेल्यावर ते चांगले राहणार,राहतीलच. असं नाय हे दिसतं.हेही दिसं निघून जातील आणि पायता पायता त्या लग्नाला किती दिसं झाले बेटा, किती ओळख पटली पतीची? तो पती आयुष्यभर नाही ओळखता येत.तो पती दीड वर्षात कसा ओळखला तुनं? माहित आहे पतीला वाकवणं बाईच्या हातात असतं. कारण माणसं बाईच्या तालावर चालत असतात. ठीक आहे आता तुझ्या हा बा जिवंत आहे. पण उद्या मी मेल्यावर तू का करशीन? मी तेच सांगतोय मी अनुभवानं बोलतोय. बेटा, तुटलेल्या संसार जोडणे अवघड हाये. तूच जोडलं ना संसार.आता तुले एक बाळ हाये.ते बाळ तुह्या भविष्य हाये. भविष्यात तुले सुद्धा उद्या चांगला पती नाय भेटला तर...... नाय उद्या तू दुसरे लग्न केल्यास दुसरा वाईट भेटला तर त्याच्यापेक्षा. तवा का करशीन? त्यापेक्षा हाच बरा. बाळ तुझेच ना. मग समजून घे.त्याचेवर संस्कार बरोबर कर. आता गेल्यावर परत येऊ नोको. त्याच्या घरून पायच काढू नये आन् लग्नानंतर यायचं असन तं पाहुणी म्हणून यावं बापाच्या घरी. परत येतानी बाळाले सोडून येऊ नोको.यावर आता तू तुह्या निर्णय घे. तुले समदी जिंदगी काळाची हाय. एकतर इथं नाय तं त्याच्या घरी.पण एकटी जिंदगी काळता येत नाय. आम्हाला नाय काळाची जिंदगी. मी सांगतो म्हणून नाय तं तू ईचार कर त्याचा. तुले जरा जाचंच असन तं आनंदानं जा. आम्ही चार दिवस बोलणार नाय तुह्याशी. रोष राहीन.तसा रोष परतेक मायबापातच असते. तुले जर वाटत असन का त्यानं यावं तं तसं होणार नाय.हे तुलेबी माहीत हाये. कारण तुले जास्त त्याचा राग आला तसा त्यालाही राग आला असंच का नाय.आन् प्रत्येकाला वाटते का माही चूक नाय.मी मोठा. पण तसं होत वाय. कोणीच कोणाले सांगितलेले ऐकत नाय. समदे रागात तालात असतात. महत्त्वाकांक्षा महत्त्वाची असते ना सर्वांची. म्हणून महत्वाचा निर्णय तुह्या.तुही चिंता तुह्या बापाले वाटते.माह्या मुलीचं वाईट होऊ नये. म्हणून त्याच्याकडं मी तुले पाठवायचा निर्णय घेऊ शकतो. मी ही मागे हटू शकत वाय. पण पोरी,मी पोरीचा बाप.कशी होणार संधी. लोकं तुलेच नाव ठेवतीन.म्हणतीन, काय हे माय होय का का होय? तीन महिन्याच्या लेकराले सोडून आली. कशी राहत असन बाप्पा. म्हणून सांगतो निर्णय महत्त्वाचा. तो बी तूह्या.तुले वाटत असेन का त्यानं माफी मागावी. तं तसं होणार नाय.त्या तुले वाटत असन तं त्याने यावं तसं होणार नाय.कारण त्याले राग आला. त्याचा तुलेबी राग आला.असं असतानाही सहाजिकच हाये. प्रत्येकाले वाटते काय काम आहे चूक नाही मी मोठा. पण ते तसे होत असन. तवा तुलेच नमतं घ्यावा लागन पोरी.तू आपल्याच मनाले पटव आन् विचार कर. का तुले सोतासाठी जावाचा हाये का एका लेकरासाठी. मग हिंमत कर. कारण तुले एकटीले जिंदगी कापायची हाये."
" इथं पण बाबा, मला त्याच्या इथं जायला फार भीती वाटते."
त्यावर तो बोलला,
" बेटा, तो का वाघ हाये का की तो तुले खाऊन टाकन.तू जा त्याच्या घरी. मग मी बोलेन त्याच्याशी. त्याले वाटत असन का तुह्या बोलणारा कोणीच नाय.म्हणून तो तसा करत असन. पण म्हणावं तिचा बाप हा राम्या जिंदा हाये अजून. मग आपण दोघं मिळून त्याले सुधरवायचा प्रयत्न करू."
राम्याचं विजयाला बोलून झालं होतं.तसा काही एक फरक विजयाच्या मनावर पडला व ती जायला तयार झाली.
अलीकडे घटस्फोटाचे न्यायालयात भरपूर अर्ज होते.कारण नसतांना शुल्लक शुल्लक कारणावरून लोकं घटस्फोटाचे अर्ज करीत होते. शुल्लक शुल्लक कारणावरुन काही लोक घर सोडून जात होते.त्यात त्यांची चूक असायची असं नाही. पण टाळी एका हाताने वाजत नाही.तसाच यातील प्रकार होता. विजयानं विकासशी केलेला विवाह कोणाच्याच पसंतीचा नव्हता.त्याचाच फायदा घेत होता तो.तीच जीवनातील विजयाची चूक तिच्या क्षणाक्षणाचा जीव घेत होती. राम्यानं विजयाला समजाविण्याचा केलेला प्रयत्न. केलेल्या प्रयत्नातून विजया तयार झाली खरी.पण विकास येत नव्हता.त्याला वाटत होतं की लहान बाळाला सोडून जाणारी महिला आई होऊ शकत नाही. म्हणून तर तिला नाकारत होता तो.हे विजयाला त्याच्याकडे गेल्यावर कळलं होतं.
अलीकडे परिवार तुटू नये म्हणून कोणी मार्गदर्शन करीत नाही.त्या मार्गदर्शनासाठी कोणाकडे सवड नाही.कोणी भडकवणारी बोलणे बोलतात.अशाच कारणामुळे परिवार तुटतो. विजयाचे तेच होत होतं. राम्याच्या मार्गदर्शनानं विजया जायला तयार झाली. तसं राम्यानं दोन-चार दिवसांनी तिला नेऊन दिलं.पण तिथे जाताच विकासनं तिच्या आणि तिच्या बापाचाही घोर अपमान केला होता. सासू बोलत होती.ते ऐकून घ्यायला तयार नव्हती. विजया होत असलेला अपमान सहन करु शकत नव्हती.पण ज्या बाळांना स्वतःच्या बाप मरून गेल्या नंतर पोसलं, शिकवलं, लहानाचं मोठं केलं.त्या बापाचा अपमान सहन करू शकत नव्हती ती.त्यामुळे तिचा पारा वाढला. तिला भयंकर राग आला. त्याच्या आईचे कोर्टात जा म्हणणे तिला खटकले व ती जवळच्या पोलिस स्टेशनला तक्रार टाकण्यासाठी गेली.पोलीस स्टेशनला तिला सांगण्यात आले की हा तुमचा घरगूती प्रॉब्लेम आहे.प्रॉब्लेम आपसात मिटवा.आम्ही तक्रार घेत नाही. शेवटी हताश विजया घरी आली. कोर्टात जायचं असेल तर पैसा लागतो. वकिलाची फी द्यावी लागते.ती कशी द्यायची हा एकच प्रश्न तिच्या मनात घुटमळत होता.कारण तिच्या जवळ पैसा नव्हता आणि राम्याला ती कशी मागणार.राम्या तर तिचा सख्खा बाप नव्हता. विजयाला तीन महिन्याच्या लहान बाळाची आठवण येत होती.आपला बाळ कसा असेल? दूध पिला असेल की नाही?त्याला झोप येत असेल की नाही? याची चिंता तिला सतावत होता. ते बाळ काही मनातून जात नव्हतं.
दिवसामागून दिवस जात असले तरी त्याची रोज असलेल्या चिंता विजयाला दिसत होतीे. पण राम्या तरी काय करणार होता.कधीकाळी तिच्या सांत्वन करायचा तो. पण त्या सांत्वनानं तिचं मन भरत नव्हतं.तिचे दुःख विसरत नव्हतं.काय करावं तिला सुचत नव्हतं. अशातच विजयाला एक व्हाट्सअप वर मित्र सापडला.तो तिच्याशी तासनतास बोलत असे. तिला हायसं वाटत असे. व्हाट्सअप वरचा मित्र, तिला काही म्हणायच्या आत ती त्याला मार्ग विचारत असे. शिवाय ती त्याला प्रश्न करायची.त्या प्रश्नांची उत्तरे तो देत असे. तिचं सात्वन करीत असे. तिला जायला सांगत असे. पण तिनं सांगितलं की तिथे गेल्यावर तिच्या बापाचा घोर अपमान होतो. कसे जावे? यावर तो म्हणाला,
" किती दिवस झाले? बाळाला सोडून तू अजून विचार कर व बाळाला न्यायला जा."
"मी गेले होते. माझ्या बाळाला लपवून ठेवलं आणि मला त्यांनी हाकलून लावलं. माझ्या बाळाला लपवून ठेवून पाहूही दिलं नाही.त्यानंतर माझ्या बाबाचा घोर अपमान केला."
" तरीपण सांगतोय, काही बिघडलं नाही. आताही जाऊ शकतेस. हे बघ जास्त दिवस झाले तर दुराा वाढेल. मग तो घरात घेणारच नाही.तशी ती रडायला लागली. तिची बाळाची आठवण पुन्हा जागी झाली. तसा तो म्हणाला,
"काय झालं रडायला? जाणार आहे की नाही ते विचारलं."
"आता माझा बाप नकार देते जायला.मागे घोर अपमान झाला ना."
ती रडत रडत म्हणाली.
"हे बघ ते सोडून गेले का आपल्या लेकरांना. त्यांना काय माहित आहे ती ममता. ममता आईलाच माहिती. एखादी वस्तू आपल्या जवळच असते. तेव्हा तिचे महत्त्व नसते.तीे वस्तू दूर जाताच महत्त्व प्राप्त होतं.तू, तू आणि तुझ्या बाळ, ती ममता आणि तुझे मायबाप,यात बराच फरक आहे.म्हणजे ममता ममता त्यांनी अनुभवले नाही. ती बाळाची ओढ तुला लागली आहे.ती ओढ ते पूर्ण करू शकतील काय? जीवन जगतांना माया,ममता व ओढीला फार महत्त्व आहे. जीवनात आनंदाने जगता यावे म्हणून विवाह करावा लागतो.तुझे मायबाप तुला सांभाळतील जीवनभर. पण केव्हा पर्यंत.ते जिवंत आहेत तेव्हा पर्यंतच ना. पण ही जी ममता आहे, ती ममता ते पूर्ण करू शकतील काय? याचा तूच विचार करावा व तू तुझे निर्णय घ्यावे."
"तो जास्त दारू पितो."
"तो एकटाच आहे, तर आता जास्त पिणारच. तो दारू अजिबात सोडणार नाही. तेव्हा जायचं की नाही. हा तुझा निर्णय. पण आता माझ्या मनानं तरी तू बाळासाठी तरी जावं."
"बाळावर परीणाम होऊ शकते काय?"
"हो वेगळे राहतांना नक्कीच बाळावर परिणाम होऊ शकतो.मला तू तर म्हणते की नाही जायचं.मग परिणाम विचारते कशाला? नाही जायचं असेल तर बाळाला विसर. बाळाचे कोणतेही तो हाल करो.कारण आता त्याला कोणीच अडवायला तयार नाही. त्या घरात तूच एक होती, त्याला रोखणारी.आता त्याला कोणी रोखू शकत होती."
" पण आता कसा रोखणार?"
" एक सांग मला की तुझे बाळ आता कोण सांभाळत आहे?"
"माझी सासू. माझी सासू सांभाळते माझ्या बाळाला. ती आहे म्हणून तर मी आली.म्हणून तर मी आले."
" बरं आहे तुझं. प्रत्येकाच्या लेकराला आजीनेच सांभाळलं असतं. तर कशाला राहिली असती आई आणि तुझ्या बाळाबद्दल आता मी जास्त बोलू नये, कारण तू आपला स्वतंत्र निर्णय घेऊ शकत नाही. ठीक आहे की आज तुझा बाप आहे.उद्या बाप नसल्यावर कशी जगशील.सगळे असतात. सगळे असतांना बाळाची अास का असते? सांग लवकर.म्हणूनच जा. जास्त दिवस झाले नाहीत. जर जास्त दिवस झाले तर तू बाळाला मुकशील.तो बाळ तुझा राग करेल. पुढे तुला शाप देईल.ते पाप लागेल.कारण तू बाळाचं मन तोडलं आहेस. असं वाटतं,तुझ्या बापाला लोकं नावे ठेवणार नाहीत. तुलाच नावे ठेवतील. याचा विचार कर."
असं बोलताना तिला बाळाची आठवण झाली. ती आठवण स्वस्थ बसू देत नव्हती. तिची सासू तिला कोर्टात जायला सांगत होती. कोर्टाशिवाय मुलगा देत नाही असे म्हणत होती.पोलीस स्टेशनने घरगुती प्रश्न आहे असे सांगितले होते. त्यांनी तक्रार नोंद केली नव्हती. त्यामुळे ज्या देशात ती जन्मली होती. त्या देशात पदोपदी माणुसकी पुढे तिचा जीव जात होता.कोर्टकचेरी करतो म्हटलं तर तिच्या जवळ पैसे नव्हते. पोलिसही न्याय द्यायला तयार नव्हते. अशा वेळी काय करावे हे तिला सुचत नव्हते. कोर्टातही काही न्याय भेटेल नाही हा प्रश्न.हा एक प्रश्न होता.कारण वकीलाच्या वशिलेबाजी वर प्रश्न होता,जो वकील जास्त पैसे घेईल. त्याच्याच बाजूने केस लागेल. त्यामुळे तिच्या जवळ पैसे नसल्यानं न्यायही त्याच्या बाजूला झुकणार.असे वाटत असल्यानं राम्या कुठे जायचं नाही.असे सांगत होता.तो मित्र बाळाला व विकासला विसरून जा, म्हणत होता. पण म्हणणे सोपे होते.प्रत्यक्षात विसरता येणे शक्य नव्हते. त्यातही ते तीन महिन्याचे बाळ असल्यानं तिला पुन्हा पुन्हा तिथे जाण्यासाठी तिचा मित्र तिला म्हणत होता. मित्राचं नाव होतं जयेश. त्याला वाटत होतं की तिचा संसार तुटू नये.ती परत परत जाता जाता एक दिवस तरी तिचा पती तिला ठेवेल.असं त्याला वाटत होतं.
तशी ती म्हणाली,
" हे बघ,तो कोर्टाशिवाय मुलगा देत नाही म्हणते. आता मी काय करू?"
'कोर्टाच्या देणार नाही.' जयेशच्या मनात प्रश्नचिन्ह उभं राहिलं. काय सांगाव आता तिला. याचा विसर त्याला विचार पडला. तसा तो सांगू लागला.
" हे बघ, कोर्टात वाळलं ही जळते.तुला बाळ भेटेलच याची काही शाश्वती नाही. हे लक्षात ठेवून पुढचं पाऊल उचल. आम्ही फक्त तुला मार्गदर्शन करू शकतो. सांत्वना देऊ शकतो.पण स्वतः पुढे होऊन कार्य करू शकत नाही."
"तो कसा पोसेल याची चिंता आहे. मला त्यासाठी बाळ हवं मला. कारण तो खूप पितो. त्याला होश पण राहत नाही.धड त्याच्या घरात स्वयंपाकाला भांडीही नाहीत.दूध आणायला पैसे नाहीत. म्हणून मी कोर्टात जावे.असं मला वाटतंय."
" हो बरोबर.जर तो असाच पीत राहिला तर तुझ्या बाळाला कसा पोसेल. कसा वाढवेल. खरच तुझी चिंता रास्त आहे. तुझी चिंता रास्त. पण मला सांग हे भांडीकुंडी तू असताना होती का?"
"नाही, तेव्हाही नव्हती. पण नंतर मी जेव्हा जाऊन पाहिले तर दिसली नाही. सगळं त्यानं दारूच्या नादात खाल्लं. तरी कोर्टाच्या गोष्टी करतो."
" हे बघ कोर्टात जाण्यापूर्वी दहावेळा विचार कर. लेकराला प्रेमाने मागून पहा. कारण एकदा का प्रकरण कोर्टात गेलं की कोणी कोणाच्या हिताचा राहात नाही.म्हणून सांगतो की लढाई ही लढाई असते अखेरची.जो हारतो त्याचेही नुकसान आणि जो जिंकतो,त्याचेही नुकसान होते.प्रेमाने मागून पहा.मला सांग तुम्ही दोघांनी तरी कोर्टाची लढाई लढली आहे काय?तुझे बाबा तुला जायचं नाही म्हणतात.त्यात त्या अबोल निरागस बाळाचा काय दोष? बाळाच्या भावनेचं काय?तू विसरु शकशिल हे सगळं? एकतर बाळ पाहा, नाहीतर बाप पाहा. तू त्याच्याच घरी जाऊन स्वतः कमवायला पाहिजे होतं आणि बाळाला घालायला पाहिजे होतं. खूप वाईट झालं तिथून पाय काढून. त्याच्याच घरी राहून हे सगळं करायला हवं होतं.तोच उपाय होता."
" जाऊ द्या आता. आता कामावर जाणार, विसरणार मुलाला. जाऊ दे त्या सगळ्या गोष्टी."
"अगं,तुला आई म्हणाव की नाही हाच विचार आहे माझ्या मनात. अगं सोडायचं होतं तर गरोदर असताना त्याला सोडायचं होतं.म्हणजे मुलगा आज तुझ्या घरी असता किंवा मुलगा घेऊन सोडायचं होतं किंवा मुलगा मोठा झाल्यावर. तुझा हाच निर्णय मला,तुझ्या मुलाची हत्या करण्यासारखा वाटत आहे. तुझ्या जवळच त्याचा उपाय आहे. कोणी तुला चांगलं केलं म्हणणार नाही. मला तू खरा मित्र मानतेस ना. मग माझं ऐक.तू जा आता आपल्या लेकराजवळ. उपाशी राहिली तू तरी चालेल. पण बाळाला उपाशी ठेवू नको. त्याला पोटाला अन्न दे. तू मार खाल्ला तरी चालेल. पण ममतेचा मार आपल्या बाळाला देऊ नको.त्याची ममता हिरावून घेऊ नको. जशी तू बापाची मुलगी आहेस. तुझ्या बापाला वाटते की माझ्या मुलीचं वाईट होऊ नये, तसेच तुला वाटायला हवं की माझ्या बाळाचं वाईट व्हायला नको. जरी तू दीड वर्ष तिथं राहिली,तशीच आता तू यानंतर जोपर्यंत सहन होते,तेव्हा पर्यंत तिथेच राहा.मुलगा थोडा मोठा झाल्यावर त्याला सोडलं तरी चालेल. पशुपक्षी पहा,ते तरी आपल्या लहानग्या बाळाला सोडत नाहीत.गाई, बकरीच्या लहान बाळाला, आपल्या लहान बाळाला सोडत नाहीत. ती आपल्याला मारतात. कोंबडीच्या पिल्लाला मारुन पहा बरं.ती कोंबडी आपल्याला टोचायला धावते. परंतू तू मात्र मला विचारत आहेस की आता मी काय करू. तू स्वतंत्रपणे आपला मार्ग ठरव. त्याची स्वतःची, स्वतःची अाई जिजाई बन. तू स्वतः स्वतःचा मार्ग ठरव. पुण्याला असतांना शिवाजी घडला, तेव्हा त्याचा बाप शहाजी सोबत नव्हता. झाशीच्या राणीने दत्तक पुत्र पाठीशी बांधून लढाई केली. तेव्हा तिचा पती जिवंत नव्हता.मायबाप तुला शेवटपर्यंत पुरणार नाही. दुसरा विवाह केल्यास तोही कसा निघेल हे ओळखता येत नाही."
जयेश बोलला.त्याच्या वाणीचा प्रभाव तिच्या हृदयावर पडला होता.शेवटी तिला वाटलं की आपण त्याच्या घरी जाऊन यावं. त्यानंतर ती गेली. परंतू याही वेळी झालेला अपमान.तिला हुसकावून लावणे पाहून तिला जीवच द्यावा असं वाटत होतं.काय करावे सुचत नव्हते.परंतू मनाच्या कोपऱ्यात स्वतःला बंदिस्त करून ती नागीण शांत होत होती.कारण तिच्या पुढे नीतीचे बलदंड बाऊ हातात काठ्या घेऊन शांत उभे होते.परिस्थितीच तशी होती. त्यातूनही मार्ग काढून तिला जगायचं होतं. उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी. आजच संकटमय वर्तमान विसरुन. मित्र मात्र तिला सांगत होता. हवा तेवढा व हवा त्या वेळी आधार देत होता. तिची आठवण नाही पुसत होता मनातून तिच्या. तिने जेव्हा सांगितलं की मी त्याच्या घरी जाऊन आले. त्यांनी हुसकावून लावले. तेव्हा तो तिला म्हणाला,
" ठीक झेलम. एकदा गेली, तर आता नको जाऊस.एकदा गेली ना.आता न्यायालयात जाता येतं.पण लेकरू सध्या मिळणार नाही. चार वर्षे तरी लागतील.हाकललं म्हणाव लागेल.पण पैसा असेल तर जा. नाहीतर विसरून जा,कायमची. त्याला,आपल्या लेकराला. आठवण काढू नको. हे ही दिवस निघून जातील. नशिबावर विश्वास ठेव. सगळं चांगलं होईल. असं समजायचं की तुला मुलगाच झाला नाही.तुझे लग्न झाले नाही.तो एक अपघात होता.आठवण काढायची नाही. आता आठवण आलीच तर इतर विषयावर बोलायचं.ताजी घटना असल्याने आठवण येईल काही दिवस.जसे जसे दिवस जातील, तसतशी आठवण जाईल. माझ्याशी बोलायचं. अजून कोणाशी बोलायचं. नसेल पर्याय तर काही तरी लिहीत बसायचं आणि नसेलच विसरता येत त्याला, तर एखादा मित्र पकडायचा. त्याच्या सोबत फिरायला जायचं. वेळ घालवायला. जाऊ दे. तुझे नशीब खराब आहे. असं समजून वाग तू. माझी आई अशीच सहा महिन्याच्या लेकराला सोडून आली होती.त्यांनी हाकलून दिलं होतं. पण आईची चूक नसल्याने बाबा चांगले मिळाले. त्यांच्या मते त्यांच्या मात्र फार गती गती झाल्या. त्यांना आठवण यावी म्हणून कदाचित देवानं नेलं असेल बाळास. तुला आज त्यानं हाकललं, हा त्यांचा गुन्हा आहे. तू चिंता करू नको.तुझ्या बाळ तुझा बदला जरुर घेईन. हे पहा उन्हाळ्यानंतर पावसाळा, जरूर येतो. तू बोलशील तर तेवढं तुझं मन हलकं होईल. पण तू हे दिवस विसरणार नाहीस. म्हणून या आठवणी काढू नकोस व आपलं मन खराब करू नकोस. सुखी राहा, आनंदी राहा "
मित्राचा सल्ला ऐकून विजया काळानुसार बाळाला विसरली. तिला बाळाची आठवण यायची. मन कासावीस व्हायचं. पण त्यावेळी ती आपलं मन इकडे-तिकडे भटकवायची. कधी लिहित बसायची, तर कधी त्याच जयेश बरोबर व्हाट्सअप वर बोलायचीे. ती लिहीत होती तिच्या आयुष्यात घडलेल्या घटना. तो माळीणच्या संघर्षाचा इतिहास. ते पुनर्वसन.ते मलब्यात सामावलेले मायबाप.तसेच या घरासाठी केलेला संघर्ष.
मिळालेल्या या घरात आज वाचनालय थाटात चाललं होतं. आज विजया आपल्या बाळाला विसरली होती. तिच्या जीवनात शिक्षणानंतर वसंत फुलला होता. कारण या जयेशचं मार्गदर्शन पुरेसं ठरलं होतं.
जयेश बोलत होता तिच्याशी. त्याला वाटत होते की तिचं बाळाचं आकर्षण कमी व्हायला हवं. ती जेव्हा बाळाची आसक्ती कमी होईल, तेव्हाच ती प्रगती करेल असं वाटत होतं.
दिवसामागून दिवस जात होते. तसं विजयावरचं टेन्शन हटत आलं होतं.ती आपला पती विसरत चालली होती. तिला पतीची व मुलाची फार आठवण येत नव्हती.
राम्याला डोळ्यासमोर आठवत होता तो किल्लारीचा भूकंप.ज्या घटना त्यानं रेडिओवरून ऐकल्या होत्या.गणपती विसर्जनाच्या तो दिवस. सारा महाराष्ट्र साखर झोपेत असताना लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे भूकंप आला होता. या भूकंपाने आजूबाजूची गावे हादरली होती. ह्या घटनेची ही विदारकता काळीज पिळवटून टाकणारी घटना वाटत होती.तसेच अशी घटना माळीण गावात झाली.तो काळ त्या काळात मोबाईल फोन सगळीकडे पोहोचले नव्हते. त्यामुळे आसपासच्या गावात नेमकं काय झालं, हे कोणाला कळत नव्हतं. तीच गत होती आज माळीणची. माळीणच्या काळात मोबाईल जरी असला तरी माळीण डोंगर पायथ्याशी असलेल्या गावात पुरेसं नेट कव्हरेज नसल्याने माळीण ची घटना समजली नव्हती.
६.४ च्या रिश्टर स्केलच्या भूकंपानं सात हजार बळी घेतले होते. सोळा हजार लोक जखमी झाले होते. तर ५२ गावातील तीस हजार घरं पृथ्वीच्या पोटात गेली होती. ह्या महाप्रलय होता. किल्लारी ज्याप्रमाणे भूकंप झाला. त्याचप्रमाणे सस्तुरलाही भूकंप झाला होता. हजारो जखमी तसेच शवांचा खच पडलेला होता. त्या जखमी ना उपचारासाठी रुग्णालयात पुरेशी जागा नव्हती. ऑपरेशन साहाय्यता युद्धपातळीवर सुरू होती. सैनिक युद्धपातळीवर काम करीत होते. राम्याला किल्लारीचं सगळं आठवत होतं.



विजयाची बाळाची आस कमी झाली होती. अशातच तिनं वर्तमानपत्रात एक बातमी वाचली. पती-पत्नीच्या वादात नाकीनव आल्यानं जन्मदात्या पित्याने आपल्या पोटच्या गोळ्याचा जीव घेतला व स्वतःचा गळा कापला. त्या घटनेमुळे तिला अजून चिंता वाटायला लागली होती.आपल्या बाळाचं काय होईल याची चिंता तिला सतावत होतीे. बाळाची विसरलेली आठवण परत आली असल्याने सारखी घायाळ हरिणीसारखी तिची अवस्था झाली होती. पण आज कावराबावरा होऊन उपाय नव्हता. तिचा विवाह, तिचं प्रेम,त्यानंतर संसार, अभ्यासात न लागणारं मन,लग्न या साऱ्या गोष्टी तिला आठवत होत्या.अशातच बाळाला आणण्यासाठी आपण त्यांच्यावर जादूटोणा केला तर...... त्याचबरोबर तिला आठवलं की पूर्वी चंद्राला, सूर्याला देव मानायचे.सूर्य, चंद्र हे देव नाही हे शास्रज्ञामुळं सिद्ध झाले. पृथ्वीवर वादळ, भूकंप भूस्खलन, त्सुनामी ह्याही गोष्ठी खगोलिय घटना. वातावरणातील तसेच पृथ्वीवर होणारा परिणाम ह्यातून घडणाऱ्या गोष्टी......... या गोष्टी पूर्वीही व्हायच्या आणि आताही. देवाच्या प्रकोप. लोक देवाच्या मंदिरात मांडलेल्या दगडावर कोंबड्याचा बळी देत.
मग या बळी तुह्या घटना सुटला काय त्या घटना होतच गेल्या मात्र मांत्रिकाची पैसा लुटला ठीक आहे नशिबात जे होईल ते ठीक आहे नशीब मान्य ठीक आहे त्यामुळे कदाचित भेटीतच नष्ट होते सगळे माणूस नशिबावर सोडतो होईल त्या आपणही बाळाच्या बाबतीत हेच करावं सगळं नशीबच सोडा म्हणून म्हणजे आपल्यालाही बाळाच्या शक्ती कमी होईल विद्यापती आणि बाळाची खुप आठवण येत होती त्या घटनेनंतर पण उपाय नसल्याने ती घायाळ हरणी सारखे तळपत होती. काय करावे सुचत नव्हते.अशातच तिनं जयेशला फोन केला. तसा तो तिच्या व्हाट्सअपवर हजर झाला. म्हणाला,
" बोल विजया काय झालं अजून आता?"
" अरे सकाळी मी वर्तमानपत्रात एक घटना वाचली.पती-पत्नीच्या वादात नाकीनव आलेल्या जन्मदात्या पित्याने आपल्या लहान बाळाचा अन् आपला जीव घेतला. जयेश कसे असेल रे माझं लेकरू? मला फार काळजी वाटते. लय आठवण येते त्याची."
"अगं कितीदा सांगितलं की तू आपल्या बाळाला विसरून जा. आपल्या पतीलाही.एक काम कर तू.तू परत महाविद्यालयात शिक्षण शिकून खूप मोठी हो. तुझ्यासारख्या अशा कितीतरी आपल्या पृथ्वीवर असलेल्या मुलींना मदत कर.त्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी लढ. त्यांच्यासाठी काम कर. त्यांचे दुःख कमी कर,नव्हे तर त्यांनी टाकून दिलेली मुलं दत्तक घे. त्यांच्यासाठी कार्य कर.तसेच त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्विकार. त्यांच्यासाठी अनाथाश्रम बनव."
ती त्यांच्यासाठी कार्य करु लागली. मदतीला तो होताच.तशी ती तयार झाली. त्या कार्यासाठी.तसा काळ बदलत होता.बदलत्या काळानुसार विजयाने महाविद्यालयात नाव टाकलं.ती शिकू लागली. तसेच पुरेसे पैसेही गोळा करण्यासाठी कामावर जाऊ लागली. त्यातच आता ते गावही माहिती तंत्रज्ञानानुसार त्याच्या कक्षेत आलं.आता गावात मोबाईल आणि स्मार्ट फोन आला होता.त्यामुळे अभ्यास महाविद्यालया व्यतिरिक्त घरीही करता येत होतं.
विजया खाजगी फॉर्म भरीत होती.घरीच अभ्यास करून शिकत होती.तिला कामावरून आल्यावर अभ्यासाचा कंटाळा वाटत नव्हता. राम्या आता म्हातारा झाला होता.त्याच्याच्यानं आता काम जमत नव्हतं. आई मरण पावली होती.त्यामुळे राम्याला पोसण्याचं काम विजयावर आलं होतं.
विजया शेतावर कामाला जात होती.ती शिकलेली पोर असूनही कामावर जात होती.मोळ्या आणत होती.तशी ती तरुण होती.
विजया तरुण झाली होती. लोकांची भुरटी नजर विजयाला छळत होती.ते दुषणेही देत होते. पण संकल्प ढळत नव्हता.ती शिकत होती.त्या लेकरांसाठी शिकत होती.त्या मुलांसाठी.जी लेकरं अनाथ होते.त्या अबलांसाठी शिकत होती.ज्यांची मुले सासूसासरे हिसकत होते.तशी थी विचार करीत होती.
प्रेम.....प्रेमाला अलिकडे फार महत्व आलेले आहे.मुलगी किंवा मुलगी वयात आल्यावर त्यांना ख-या प्रेमाचं नाही पण शरीरअवयवाचं फार आकर्षण वाटत असतं.या शरीर अवयवाची भुक भागविण्यासाठी तरुण नुकतीच वयात येणारी मुले ही प्रेमाची भाषा करीत असतात.
प्रेम म्हणजे त्यांना भातुकलीचा खेळ वाटणारच कारण काही तरुण जातीची सकस बंधनं असल्यानं फक्त वेळकाढू धोरण अवलंबतात.मग प्रेमात सगळं काही जायज असते असे म्हणत ही तरुण मंडळी या तरुण पणाची शारिरीक भुक भागविण्यासाठी शारिरीक संबंध प्रस्थापीत करतात.नव्हे तर शरीरअवयवाची भूक भागविण्यासाठी हे तरुण प्रेम काही क्षणापुरतं करीत असतात.
काही तरुण हे जातीची सकस बंधनं असल्यानं फक्त वेळकाढू धोरण अवलंबून शरीरअवयवाची भुक भागविण्यासाठी प्रेम हे फक्त काही क्षणापुरतं करीत असतात.विवाह जुळत पर्यंत.यात भीती असते गर्भधारणा होण्याची......पण केवळ वेळकाढू धोरण,त्यातच जातीची बंधनं........आंतरजातीय विवाह केल्यास ठार होण्याची भीती किंवा घरातुन बाहेर हाकलून देण्याची भीती......ह्यामुळे केवळ वेळकाढू धोरण अवलंबणारी मंडळी अशी गर्भधारणा झाल्यास घाबरुन जातात.काही पळ काढतात.तर काही तो गर्भ पाडण्याचा सल्ला देतात.
अलिकडे गर्भ तपासणी करतांना वा गर्भपात करण्याला बंदी आणलेली आहे.त्यामुळे असे तरुण घाबरुन जावुन मुलींना तशाच अवस्थेत टाकून देवून पळ काढत असतात.
काही मुली गर्भ पाडतात, पण त्यासाठी गर्भधारणा झाली आहे हे वेळीच लक्षात यायला हवं.पण दोन तीन महीने मासीक पाळी न आल्यास ही नैसर्गिक समस्या गृहीत धरुन मुली वैद्यांकडे जावून इलाज करुन घेत नाही.त्यातच पाळी आली नाही असे वैद्यांना सांगीतल्यास ते नानाप्रकारचे प्रश्न विचारतील ही भीती मनात धरुन ह्या मुली वेळीच तपासणी करीत नाही.मग अशातच जास्त दिवस निघून जातात.त्यातून गर्भ पाडताच येत नाही.गर्भपाताला बंधनं येतात.
गर्भ पडत नाही हे लक्षात येताच ह्या मुली ज्यांच्यापासून गर्भधारणा झाली, अशा मुलांना जेव्हा सांगतात.तेव्हा ते चक्क नकार देतात.हवं तर सांगतात की ही गर्भधारणा माझ्यापासुन झालेली नसून तू इकडे तिकडे तोंड मारले असेल,त्यापासून झाली असेल.असे म्हणतात.पण ती गर्भधारणा कोणापासून झाली हे फक्त मुलींनाच माहीत असते.त्या मुली विनंती करतात.पाया पडतात.पण त्याचा काही फायदा नसतो.मग कुमारीकेला प्रश्न पडतो.आता काय करायचे? आपल्या हातून चूक तर झाली.सगळ्याच मुली नावाचा असे उत्तर ऐकून घाबरतात.पण काही मुला त्या त्या परिस्थीतीला सामोरे जातात.आता चूक झाली,पश्चाताप करुन फायदा नाही.त्या गर्भपात केंद्र शोधतात वा असे केंद्र शोधतात.ज्या केंद्रातून समस्या पच्चीस.तसेच अब्रुला धक्काही लागणार नाही.त्या त्याच केंद्रात जावून आधार घेतात.तर काही मुलींना ही केंद्रे माहीत नसल्याने जवळच्या दूर असलेल्या नातेवाईकां कडे आधार घेवून बाळाला जन्म देतात.बाळाचा जन्म होताच हे पाप समजून ह्या मुली त्या बाळाची कच-यासारखी विल्हेवाट लावतात.अर्थात मातीचा खड्डा खणून बाळ दफण करणे वा बाळाला कचराकुंडीत टाकून देणे.इत्यादी गोष्टी करीत असतात.अशी बाळं अक्षरशः मोकाट कुत्री वा डुकरं कुरतडतांना बरेचदा सापडली आहेत.ही जराजर्जर अवस्था.एक खुनच.विचारांची हत्या की चुकांची हत्या.....भावनांची हत्या की विश्वासाची हत्या......काहीच कळत नाही.शरीरअवयवाचं आकर्षण. त्यातच मुलांचे खरे प्रेम जाहीर करणे.त्यातून हे घोर पाप.स्वतःच्या कोकमधून जन्म दिलेला मुलगाही शाप वाटतो.जन्म दिलेल्या मुलांनाही हक्कानं माझं बाळ म्हणता येत नाही.मनात इच्छा असूनही बाळाला वाढवता येत नाही.मनात इच्छा नसूनही बाळाला ठार करावे लागते. ह्यातच काही काही मुली बाळाला जोपासण्याचा प्रयत्न करतात.
एखाद्या संस्थेला किंवा ज्यांना मुलबाळ होत नाही,त्यांना बाळ दान देणे हे पुण्याचे काम.....पण अलिकडे असे आंतरजातीय प्रेम करणे वा मायबापाच्या मतानुसार लग्न न करणे, हा कायदा नसला तरी कायद्यानुसार यावर समाजाचे नियंत्रण आले.असा गर्भपात झाला हे समाजाला माहीत जरी झाले, तरी समाज त्या मुलीला स्विकारत नाही.काही ठिकाणी अशा प्रेमीयुगलांनी लपून छपून विवाह केलाही.पण इतरांनी तसा विवाह करु नये म्हणून त्यांना ठार करण्याची उपाययोजना करण्याचे प्रकार गावात नाही तर देशात चालतात.शिवाय असे तरुण तरुणी आणि गर्भातलं अपत्य ठार केल्यानंतरही केस बनत नाही नव्हे तर ते गाव बनू देत नाही.सा-या प्रकरणावर पांघरुन.सगळा प्रकार अंधारात झाल्यागत पुराव्यासह नष्ट केला जातो.तर काही ठिकाणी दोष दोघांचा जरी असला तरी मुलींनाच ठार केलं जातं.
घोर पाप....तीहेरी खुन.....तरीही समाजमन शुन्न आणि सुन्नही......सा-या भावनाच नाही तर माणूसक्याही मेलेल्या.प्रेमीयुगलाचं शरीरअवयवाचं आकर्षण.पण बळी नवजात पाखराचा.ज्याचे जन्मानंतर डोळेही उघडलेले नसतात.नव्हे तर ज्यांना जग म्हणजे काय हेही समजलेलं नसतं.ते बाळ विनाकारण मारलं जातं.काय दोष असतो त्याचा? हे कुणालाच कळत नाही.कोणीही समजून घेण्याचा प्रयत्न करीत नाहीत.
आई होण्याचं भाग्य सहसा मिळतं.कोणाला मिळतं,कोणाला मिळत नाही.कोणी लाचार असल्यागत बाळ व्हावं म्हणून देवाचा धावा करावा लागतो.नवश कबूल करावा लागतो..पण तरीही बाळ होत नाही.पण या मातांना विना नवसानं होतं.परंतू त्या जगवू शकत नाही.हा फक्त माझ्या देशाचाच प्रश्न नाही,तर संबंध जगाचा प्रश्न आहे.यावर उपाय म्हणून कायदेही आहेत.
हे घोर पाप.त्यातच प्रेमीयुगलाची होणारी ससेहोलपाट.....यामुळेच की काय? आंतरजातीय विवाह केल्यास प्रेमीयुगलांना काही रक्कम सरकार देते.त्यांचे विवाह लावून देते.नव्हे तर त्यांचा संसार फुलावा म्हणून त्यांना काही बक्षीसही देते.
गर्भपात करणं वा भ्रूण तपासणी कायद्यानं गुन्हा आहे.कारण लोकांची मानसिकता.लोकांनीच या गर्भपात केंद्रात जावून मुलींचे भ्रुण तपासणी करुन मुलींच्या जननसंख्येवर मर्यादा आणल्याने असे सरकारने उचललेले पाऊल रास्त आहे.पण निदान या प्रेमीयुगलांसाठी जागोजागी बिनधास्त पणे गर्भपात केंद्र सरकारनं उघडावीत.लग्नापुर्वी असे शरीरअवयवाचे संबंध प्रस्थापीत करु नये, यासाठी सरकारने जनजागृती करावी.नव्हे तर या जनजागृतीतून एखाद्या प्रेमीयुगलाने ऐकले नाही आणि गर्भधारणा झालीच,तर त्या मुलींनी न घाबरता कितीही धमक्या मिळाल्या तरी पोलिस स्टेशनला तक्रार करुन त्या तरुणांना योग्य तो धडा शिकवावा.पोलिसांनीही थेट व ठोस कार्यवाही करावी.जेणेकरुन दुसरी मंडळी असे खोटारडे,शरीर अवयवाच्या आकर्षणापुरते,मतलबाचे प्रेम कोणी करणार नाही.तसेच या गर्भधारण झालेल्या मुलींसाठी सामोपचाराचे केंद्र सरकारने उघडावे.त्या केंद्रात कुमारी मातांनाच संरक्षणच नाही,तर कुमारी मातांना जन्म देण्यापासून त्यांचं संगोपन करण्यापर्यंतच्या सुविधा उपलब्ध होतील.या केंद्रात कुमारीकेला प्रसुतीपर्यंतच्या सुविधा ह्या विनामुल्य असाव्यात.झालेलं बाळं दत्तक द्यायचं की नाही हे त्या मातांनाच ठरवता यावं.तसच न्या मागण्यासाठी स्पेशल कक्ष या कुमारीकांसाठी सरकारनं उपलब्ध करुन द्यावं.प्रेमात लपूनछपून का होईना,शरीरसंबंध करायला न घाबरणारा लग्नास का घाबरतो? यासाठी समुपदेशन करणारी केंद्र जागोजागी असावी. या केंद्रातून कुमारीकांना न्याय मिळायला हवा.असा लग्न करत नसेल तर जबरदस्तीनं त्यांचं लग्न लावण्याच्या गोष्टी अशा केंद्रात व्हाव्यात.अशी केंद्र स्थापन करण्याची जागा पोलिस स्टेशनच्या आवारातच विकसीत व्हावीत.


विजयानं शहरामध्ये असेच आशा फाउंडेशन नावाचे समुपदेशन केंद्र उघडले होते..त्यांची ती संचालिका होती.ती अशा कुमारी मातांना संरक्षण देत होती.तिच्याकडे गेलेल्या मुलींना ती घालवून न देता प्रथम मुलांना समजावून त्यांचं लग्न लावण्याचा प्रयत्न करत होती.नव्हे तर अशा मुलांनी न ऐकल्यास अशा मुलांची पोलिसस्टेशनला तक्रार करुन त्यांना धडा शिकवीत होती.शिवाय अशा मुलींना आपल्या होममध्ये ठेवून त्यांना बाळंतपणापर्यंतच्या सर्व सुविधा पुरवून त्यांना पायावर उभे राहण्यासाठी सशक्त करत होती..बाळंतपणानंतर त्यांना होणारे बाळ त्यांना दत्तक द्यायचे की स्वतः सांभाळायचे,याबद्दलही मातेला विचारुनच योग्य निर्णय घेतला जाई.जर बाळाला दत्तक देण्यास मातेने नामंजूरी दिली,तर त्या मुलांच्या शिक्षणाची पासणपोषणाची जबाबदारी स्वतः घेत होती. तसेच त्या मुलांचे शिक्षण एखाद्या वसतीगृहात ठेवुन करीत होती.
देशात तसेच जगात सर्वत्र बलत्कारही होणे सार्वजनिक बाब झाली आहे असं विजयाला वाटत होतं.सरकारचे याबाबत कायदे असले तरी ठोस शिक्षा होत नसल्याने बलत्कार करणारी माणसं सुटतात.यातच या बलत्काराच्या गोष्टी न्यायालयात तसेच पोलिसस्टेशनला नेवून हा बलत्कार चव्हाट्यावर येवू नयेे व बदनामी होवू नये म्हणून मायबाप चक्क मुलींना गप्प बसायला सांगतात.हे तिला पटत नव्हतं.ते मायबाप स्वतःही चूप बसत होते.परंतू मायबापाच्या चूप बसण्यानं अशा मुली जीवनभर समाजाचे टोमणे खात जगत असतात.जगावेसे वाटत नसते तरीही.त्यातच खेडेगावात गर्भपाताच्या सोयी सुविधा नसल्याने व गर्भपात न झाल्याने अशा बलत्कारातून दिवस जातात व संतती जन्मास येते.असे जन्मास घातलेले मुल हे मनात इच्छा नसूनही जेव्हा जन्मास येते,तेव्हा जरी समाज स्विकारत नसला तरी ती कुमारी माता बाळाला सांभाळत असते.तिनं पाप केलं नसलं तरी ते तिनं केलेलं पापच समजून तिला वाळीत टाकतांना समाजाने तिच्या भावनांचा विचार का करु नये?असंही विजयाला वाटत होतं.खरंच यामध्ये स्रीलाच अबला समजावे काय? पुरुषांनी मात्र रंगरलिया मनवीत स्रीच्या शरीरअवयवाशी खेळावे.काम संपल्यावर मी नाही त्या गावचा म्हणत तिचा साथ सोडून जावे.याला खरंच न्याय म्हणता येईल का?सगळेच भोग स्रीच्याच वाट्याला यावेत का?
हा एक गहन जागतिक प्रश्न असून याची जागतिक स्तरावर दखल घेणे गरजेचे आहे.आम्ही आमची पुरुषी जोखडाची मानसिकता गृहीत धरुन या स्रीयांवर कधी मताने तर कधी बळजबरीने या ना त्या मार्गाने बलत्कार करीत असतो.परिणाम विचारात घेत नाही.मग परिणाम दिसू लागताच तिला सोडून पलायन करणे रास्त नसतांनाही आम्ही पलायन करतो.यात जर आम्हाला पलायन करायचेच आहे तर मग लग्नापुर्वी प्रेमच कशाला करावे.मुलींनीही लग्नापूर्वी मुलांशी गट्टी का करावी?
माझंही असंच झालं.मीही अशीच गट्टी केली विकासशी.त्यानं विवाह केला असला तरी विवाहानंतर सोडलं मला.माझ्या शरीराचा उपभोग घेवून.माझं त्याच्यावर निरतिशय प्रेम होतं.पण ते लग्नापुर्वीचं सारं प्रेम तो विसरला.शिवाय माझ्या जीवाचा तुकडा माझंही बाळ हिसकलं.काय? मी प्रेम केलं नसतं तर........पण वयच ते....त्या वयात सगळेच फसतात.मीही फसले.आता मग पश्चाताप येतो.यावेळी वेळ गेलेली आहे.मी माझे भोग आज भोगत आहे.कारण विकास पुढे कसा निघेल याची मला कल्पना नसल्यानं मी फसली.माझा निर्णय फसला.शेवटी फसणारच.कारण मी माझ्या रामासारख्या मायबापाला न विचारता प्रेम केलं आणि विवाहही केला.
तसं तिला वाटत होते,आतातरी मुलांनी नाही तर मुलींनी तरी सुधरावे.प्रेम हा काही भातुकलीचा खेळ नाही.शरीरअवयवाचं आकर्षण म्हणजे प्रेम नाही.प्रत्येक मुलगा काही प्रेम निभावेल असा नाही.म्हणून प्रेम करण्यापुर्वी मुलींनी सावधान व्हावे किंवा प्रेम केलेही आणि मित्राने शरीर सुखाची मागणी केलीच,तर शरीर त्याला प्रदान करु नये. तर वेळीच दखल घेवून त्या मुलाबद्दल दहा लोकांना नक्कीच सांगावे.आपले आईबाप,भाऊबहीण,नातेवाईक,तसेच इतरांना आपल्या प्रेमाबद्दल नक्कीच सांगावे.त्यांच्या आज्ञेत वागावे.कारण ते आपल्याला लहाणपणापासून सांभाळतात.याही वेळी संकटात चांगलाच मार्ग सांगतात.त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा.तसेच आपले जर प्रेम झाले असेल आणि तो शरीर सुखाची मागणी करीत असेल तर त्याला असे संबंध प्रस्थापीत करण्यापुर्वी लग्न करण्यासाठी तयार करावे. तो तसे ऐकत नसेल तर त्याची सरळ पोलिस स्टेशनला तक्रार करावी वा त्याचा नाद सोडून द्यावा.मात्र असे शरीर संबंध प्रस्तापित करण्यापुर्वी मुलींनी सावधान असलेलं बरं!
आज परीवर्तननादी काळ आहे.या काळात परीवर्तनाला महत्व आलेलं आहे.पण अवाढव्य महत्व प्राप्त झालं आहे.होत आहे.हे बरोबर नसलं तरी आजच्या युवापिढीला तेच बरे वाटते.बरे वाटणेही साहजिकच आहे.
आमची मुळ संस्कृती ही काही अंशी अंधश्रद्धेने भरलेली असली तरी त्या अंधश्रद्धेचा काही भाग सोडला तर बाकी आमची संस्कृती चांगली आहे.पुर्वी बालविवाह पद्धती होती.आता ती नसल्यानं बलत्कारासारख्या गोष्टी होतात.
पुर्वी स्रिया रस्त्याने जात असतांना पदर डोक्यावर घेवून चालायच्या.तेव्हा त्या कोणत्याही पुरुषांकडे डोळे उचलून पाहायच्या नाहीत.मान मरातब अख्ख्या कुटूंबात नाही तर गावातही असायचा.त्यामुळं त्यांची आगामी येणारी पिढी ही सन्मान करणारीच असायची.जर बालविवाहासारखी कुप्रथा जर सोडली तर बाकी स्रियांबद्दलच्या गोष्टी आणि त्या स्रियांच्या हातून अबोध बालकांवर होणारे संस्कार वाखाणण्याजोगे होते.बालक हा केवळ शिक्षकांच्या हातून घडत नव्हता,तर परीवारातून घडत होता.स्रियांचं सौभाग्यही वाखाणण्याजोगं होतं.कपाळाला भलामोठा कुंकू किंवा अर्धचंद्रकोर,गळ्यात डोर डोरले,भांगावर कुंकू,पायात पैंजण,हातात बांगड्या,सप्त श्रुंगार होता.पण आज त्याची जागा टिकली,जी त्या जागेवर श्वेतकोष्ठ तयार करते.लिपस्टीक जी ओठाला काळे बनवते.गळ्यात चैन जी दाहकतेने गळ्यात दाग निर्माण करते.जेणेकरुन घालणे मुश्कील.डोक्यावर पदर नसतो.जो उन्हापासून वाचवतो.डोळ्यात शितलता नसते.जी तिचा सन्मान वाढवते.नव्हे तर अलिकडे पब संस्कृती ही वाढीस चाललेली आहे.त्या पबमध्ये जाणारी महिला केवळ अश्लीलतेचा नंगा नाच करीत नाही,तर आपल्या पतीच्या जुव्याच्या तालाचा विरोध न करता पती जुवा हरल्यावर दुस-या पतीच्या बाहुपाशात स्वतःला झोकून देते.ही आपली संस्कृती नाही.असं विजयाला वाटायचं.कधी कधी तिला येणारे विचार तिला परीवर्तन करण्यासाठी बाध्य करीत होते.
आज पुरुषांमध्ये परीवर्तन वाढत चालले आहे.मुळची मायबापाला म्हातारपणी पोषण्याची संस्कृती दूर गेली आहे.नव्हे तर आज मायबापापासून विभक्त राहून वृद्धाश्रमात मायबापाला पाठविण्याची संस्कृती जोर धरत आहे.नव्हे तर एकाच ग्लासमध्ये बापलेकांचे दारु पिणे ही आजची संस्कृती ठरत चालली आहे.म्हणूनच आज पुरातन संस्कृती टिकविणे गरजेचे ठरले आहे.
मायबाप हे देव आहेत.हे दाखविणारी मुळची संस्कृती.......एवढंच नाही तर गावातील प्रत्येक जेष्ठ माणूस हा वडीलधारी आहे हे सांगणारी मुळची संस्कृती.......तर शिक्षकही देव आहेत हेही मुळची संस्कृती आपल्याला शिकवीत होती.त्या लोकांचे आपण मार्गदर्शन ऐकून आपण आपला विकास करुन घेत होतो.त्यांनी जोडून दिलेल्या विवाहाला आपल्या वडीलांची बदनामी होवू नये म्हणून पतीकडून रितसर घटस्फोट झाल्याशिवाय पतीला स्री सोडत नव्हती. ती महिला.सासूने कितीही अत्याचार केला तरीही.
आज म्हातारी सासू अत्याचार करीत नाही तर जवान सुनच तिच्यावर अत्याचार करते.आज महिला आपल्या पायातल्या चप्पलसारखे पती बदलवते आणि पतीही आपल्या पायातल्या चप्पलसारख्या पत्नी.आपल्या स्वलेकरांचाही विचार न करता.त्यांना मायबाप असूनही जीवंतपणी अनाथ करुन सोडून जातात.खरंच हीच का आपली संस्कृती होवू शकते का? एवढंच नाही तर कुवारपणी ह्याच मुलींना भाळवून गर्भवती करुन त्यांना मग न स्विकारणारे महाभाग आपल्याही देशात वाढत चालले आहेत.अशा कुवा-या मुली गर्भवती राहिल्याच आणि गर्भपात घडून आला नाही तर आपली बदनामी होईल या धाकाने कुवा-या मुलींना घरातून हाकलणारे मायबापही याच देशात आहेत.ह्या मुली आता मुलीकडेही जावू शकत नाही.ज्याने लग्नाचे आमीष देत देत बलत्कार केलेला असतो.मग झालेल्या नाजायज मुलांना कोण सांभाळणार? या जगात आपण कसे जगणार याच धाकात ती कुवारी माता आत्महत्या करते बाळासह.हीच का परीवर्तनवादी संस्कृती? यापेक्षा आमची मुळ संस्कृती बरी होती.असे वाटायला लागले आहे.मायबाप बालविवाह लावून देत.लहानपणापासूनच पत्नीबद्दल प्रेम निर्माण व्हायचं.असा गर्भपाताचा खेळ नसायचा.नव्हे तर आत्महत्येचाही नसायचा.आम्ही गावातील वडीलधा-यांची इज्जत करायचो.तेही आम्हाला आमच्या संकटप्रसंगी मदत करायचे.संयुक्त कुटुंबपद्धती असायची.कुटूंबात जिव्हाळा,प्रेम,माया आत्मीयता आणि मुख्य म्हणजे आधार असायचा.जीवनात पब नसायचं आणि जुवा नसायचा.तर पतीव्रतव्य असायचं.एका रात्री बदलणारे पती नसायचे.सारंच कसं सुंदर होतं.जगंही आम्हाला सुंदर दिसायचं.आम्हीही सुंदर असायचो,सुंदर वागायचो आणि आमची संस्कृती ही.
आज आम्हीच आमच्या संस्कृतीला बदनाम केले आहे.बिघडवले आहे.संस्कृती टिकवून ठेवणा-या शिक्षकाला बदनाम केले आहे.शाळेशाळेतल्या वर्गखोल्यातून परिवर्तीत विचारसरणी आम्ही स्विकारली आहे.शाळा संस्काराचे केंद्र जरी असले तरी तिथूनच आम्ही मुलांमध्ये शिस्त न लावता तोकडे कपडे घालण्याचे धडे देतो.मुलं मुली हातात हात घालून मैदानात बसतात.ते पिरेडवर न जाता तासन् तास एकमेकांशी बोलत बसतात.नव्हे तर यातूनच मग आश्वासन व कुमारी मातांचा प्रश्न निर्माण होतो.हे कुठंतरी थांबायला हवं.
संस्कृती जर टिकवायची असेल तर शिक्षकांनाही अभय द्यायला हवं.महाविद्यालयात उच्च शिक्षणही घेत असतांना ड्रेसकोड असावा.जेणेकरुन मुलंमुली तोकडे कपडे वापरणार नाहीत.
आज शाळेत शिक्षकांची इज्जत नाही.मुले शिक्षकांना वात्रट बोलतात.शासन शिक्षकांना माकड बनवतात.नाचायला लावतात.असाच अभ्यासक्रम बनवला आहे.हा अभ्यासक्रमच कुठंतरी बदलायला हवा.आम्ही अभ्यासक्रम तयार करतांना मुलांचा विचार करतो शिकण्यासाठी.पण आमच्याकडे शिक्षकांचा माकड बनतो त्याचं काय? या अभ्यासक्रमानं हे विसरतो.जर आम्ही आमचा अभ्यासक्रम पुर्वीसारखा बनवला तर,त्यात शाळेशाळेतून संस्कार फुलतील.मुले शिक्षकांचा आदर करतील.शिक्षकांच्या पायावर नतमस्तक होतील.जसे पुर्वी होत होते.पालकही शिक्षकांचा सन्मान करतील.ज्या दिवशी असे घडेल तेव्हाच ख-या अर्थानं या देशात संस्कारक्षम पिढी अस्तित्वात येईल.पण आम्हाला वाटते की मुलं शिकणार नाहीत.
पुर्वीच्या शिक्षणातून संशोधक,डॉक्टर,इंजिनिअर बनले नाही का? काल विकास झाला नाही का? झाला.मग आता या परीवर्तनवादी संस्कृतीचा हव्यास का? आजही देशात पाहिजे तो बदल झालेला नाही अजूनही काही अंशी संस्कृती शिल्लक आहे.तेव्हा ही संस्कृती नेस्तनाबूत होण्यापुर्वी आपणही वेळीच जागे होवून ही संस्कृती टिकविणे महत्वाचे.जेणेकरुन मुळ संस्कृती लयास जाणार नाही.
पूर्वीच्या विवाहात घटस्फोट होईपर्यंत मुलगी घरातून पळ काढत नसे. 'घरातून पळ काढू नकोस,प्रसंगी या घराच्या उंबऱ्यात मरून जायचं जायचं.' असे मायबाप सांगत.कधीकधी याचा गैरफायदा सासरकडील मंडळी घेत.आज देशात मुलींना गर्भवती करून त्यांना न स्वीकारणारे महाभाग वाढत आहेत. अशा मुलींना नकळत नादानपणानं गर्भधारणा झाल्यास घरातून हाकलून देणारे मायबाप जगात आहेत. त्यामुळे ज्याने तिला गर्भवती केले,त्या मुलांकडे ती जाऊ शकत नाही.मग अशा नाजायज मुलांना कोण सांभाळणार? असा विचार करून याच मुली आत्महत्या करतात. बाळातीही आत्महत्या होते. मग यापेक्षा आमची मूळ संस्कृतीपेक्षा पूर्वीची संस्कृती बरी होती की नाही.निदान नाजायज मुलं तर जन्माला येत नव्हती. लहानपणापासून पत्नीबद्दल प्रेम निर्माण व्हायचं.असा गर्भपाताचा व गर्भधारणेनंतर हत्येचा जीवघेणा खेळ असायचा नाही.
विजया समाजाचा विचार करीत होती.तिला स्वतःचा विचार होताच, त्याचबरोबर त्या कुमारी मातांच्या विचार होता. जयेशनं म्हटल्याप्रमाणे ती मुलींसाठी लढणार होती. नव्हे तर त्याच्यासाठी लढण्याचा तिनं मनात निश्चय केला होता.
असाच एक प्रकल्प गोसेखुर्दचा होता. तिथेही पुनर्वसनाचाच प्रश्न होता. राज्यात बहुतांश ठिकाणी धरण बांधून व कालवे काढून शेतीला पाणीपुरवठा होत असल्याने आसपासच्या शेत्या सुपीक झाल्या होत्या. त्याच अनुषंगाने विदर्भ कोरडा जात होता. विदर्भातील शेतकरी आपली शेती करू शकत नव्हते.
विदर्भातून वाहणारी एकमेव मोठी नदी म्हणून वैनगंगेचं नाव होते.तशा विदर्भात भरपूर नद्या होत्या.त्या नद्यांवरही धरण बांधलेलेच होते.पण त्या नद्यांचे पाणी त्या त्या जिल्ह्यासाठी होतं.नव्हे तर तालुक्यासाठी होतं.
वैनगंगा ही भंडारा जिल्ह्याच्या बहुतेक संपूर्ण भागात होती.हा भाग भातशेतीचा होता.या भागात भात भरपूर प पिकत होता. परंतू पाऊस जर आल्यास संपूर्ण धानाची फसल नष्ट होते हा प्रश्न सर्वांना सतावत होता. त्यात जिल्ह्यातील संपूर्ण शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत होते.त्यामुळे विदर्भातील शेतकरी आत्महत्या सुरू झाल्या होत्या.त्यावर पर्याय म्हणून येथे स्थानिक काही नेत्यांनी त्यांच्या प्रयत्नातून राज्यात धरण बांधण्‍यात यावं.तसेच येथील शेतक-यांना अडचणीपासून वाचवून सधन करावं.असं सरकारचं झालं.या प्रकल्पात त्यांनी शिक्कामोर्तब केलं.
१९८३ ला या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली.त्यानुसार त्याला नाव दिलं गेलं त,गोसीखुर्द प्रकल्प.नागपूर व भंडारा या प्रकल्पाचे जिल्हे. या तीन जिल्ह्यातील २,५०,८०० हेक्टर जमीन ओलिताखाली आणणारा प्रकल्प. या प्रकल्पाला इंदिरा सागर असहीे नाव दिले गेले. या प्रकल्पाला लागणारा लागणारा खर्च १९८३ च्या खर्चानूसार ३७२.२२ कोटी होता. परंतू येथील स्थानिक नेत्यांच्या प्रयत्नाने त्या नेत्यांनी या प्रकल्पाची सुरुवात केली होती. या प्रकल्पाने त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने २०१० पर्यंत त्याचे मूल्य वाढले होते प्रकल्प ११ हजार ५०० कोटी झाले. या प्रकल्पाची बहुतांश कामे पूर्ण होऊनही आज पर्यंत तरी लोकांना लाभ मिळालेला नव्हता.आजही लोकं या प्रकल्पापासून वंचित होते.आपल्याला लाभ मिळेल म्हणून गोसीखुर्द प्रकल्प उभारताना भंडारा जिल्ह्यातील १०४,नागपूर जिल्ह्यातील ८५,तर चंद्रपूर जिल्ह्यातील ११ गावांनी पुनर्वसनाचा स्वीकार केला. त्यांना त्यानंतर वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागले.
वैनगंगा नदी या तीनही जिल्ह्यातून वाहत असली तरी या प्रकल्पासाठी धरण कुठे बांधायचे हे निश्चित करण्यात आलं होतं. त्या नुसार गोसेखुर्द गावात पवनी तालुक्यात भंडारा जिल्ह्यात प्रकल्प उभारावा.असं ठरलं. त्यामुळे लोकांना प्रश्न पडला की आपली पिढीजात जागा सोडायची कशी? तरी त्यांनी लोकांच्या फायद्यासाठी पुनर्वसनाच्या स्विकार केला.भंडारा,नागपूर चंद्रपूर मधील शेती ह्या मुख्यतः धानाच्या शेत्या असून या भागात भात पिकविणेपासून तर धान कापणीपर्यंत पाणी गरजेचे असते. या भागातील लोक भाताचे अंकुरण करताना प्रथम पाणी टाकतात. पर्याय म्हणजे धान जमिनीवर टाकतात. त्यांचे काही दिवसानंतर अंकुरण होऊन ते धान वाढल्यानंतर शेताची चिखलणी करुन त्यावर अंतराअंतराने धानाची रोपे लावतात. ही रोपे म्हणजे परे. यावेळी येथील शेतकरी विशिष्ट प्रकारचे गाणे म्हणत असतात.त्यानंतर रोवणी पूर्ण होताच तेथे शेतकरी उत्सव साजरा करतात. बहुतेक त्याला श्रावणोत्सव असे म्हणतात. या उत्सवात नृत्य केले जातात. त्यानंतर धान रोवण्याच्या कामात असलेल्या शेतक-याला मुख्यत: नाश्ता जेवण इत्यादी गोष्टी करतात. जेवणाच्या मोठा समारंभ होतो.
गोसीखुर्द प्रकल्प पूर्ण न होण्याची कारणे होती. सुरुवातीच्या काळात धरणासाठी असलेले ३७२.२२ कोटी रक्कम. या रकमेतून प्रथम त्यांनी कालवे बांधले होते. हे मातीचे कालवे पुढील काही काळात या सर्वेक्षणानंतर गरज लक्षात घेता यशस्वी ठरले नाही. पुढे धरण योजना कार्यान्वित करण्यात आली. सिंचन कालवे तयार करावे असे ठरले आणि पुन्हा एकच काम पुन्हा पुन्हा करण्यात आले. हे कच्चे मातीचे कालवे तयार करताना व तो आराखडा मंजूर करताना स्थानिक नेत्यांच्या प्रयत्नानं या प्रकल्पाचा पूर्ण होण्याचा वेळ वाया गेला,तर पुनर्वसित लोकांना पुनर्रचित होण्यासाठी पैसे देण्यात आले.पण काही लोकांनी एवढ्या पैशात घरं बनत नाही.पैसे जास्त द्या.म्हणून आपला गाव खाली केला नाही. त्यांच्या मागण्या पूर्ण करता करता वेळ वाया गेला. काही लोकांनी पुढे ती जागा सोडून देण्यास नकार दिला होता. काहींनी म्हटलं होतं की आम्हाला जागा विकत घेऊन द्या.त्यामुळे वेळेवर त्यांना जागा देण्यात न आल्यानं व पैसे न मिळाल्याने सरकारचा मिळालेला पैसा स्थानिक लोकांनी आपल्या कामात खर्च केला. तसेच नंतर परत पैसे मागू लागले.
जयेश हा भंडारा जिल्ह्यातील प्रकल्पाचा साक्षीदार होता. प्रकल्पा सोबत जगता जगता तो लहानाचा मोठा झाला होता.त्याचे घर दोन मजली असून त्याचे वडील दुधदुभते काढत असत. त्यांना दोन मुले होती.एक जयेश होता व दुसरा सुरेश.जयेश फार हुशार होता. सुरेश त्यामानाने कमी हुशार होता.परंतू वडिलांची इच्छा होती की सुरेश मोठा भाऊ.त्यानं शिकावं व खुप मोठं व्हावं.
जयेशचे बाबा त्यांना उशिरा मुलं झाल्यानं ते म्हातारे झाले होते.त्यातच सूरेशला शिकत असताना सुरेशला लय शिकवावे असे त्यांना वाटत होते.पण आता त्यांचं शरीर साथ देत नव्हतं. त्यातच त्यांचं पोटपाणी शेतीवर अवलंबून होतं.त्यातच सुरेश शालान्त पास.पास झाला होता.सुरेश मात्र शिकत होता.कारण गावात फक्त दहावीपर्यंतच शिक्षण होते.जयेश लहान होता. त्यामुळे तो गावात शिकता शिकता लहानाचा मोठा होत होता.तो लहानाचा मोठा होत होता,बापाची हालत पाहत होता. आपल्या बापाच्या थकलेल्या शरीराला तो प्रत्यक्ष डोळ्यांनी न्याहाळत होता.तो हुशार होता.
तो हुशार होता..त्याचा कोणी हात पकडत नसे. पण त्याला वाटायचे आपण बापाला सांभाळायला हवं.आपला बाप मातीत मातीत राबताना एखाद्या दिवशी बाप निघून जाईल. मग आपला आधार जाईल.मग आपण आधार गेल्यावर जगायचं कसं? शेवटी त्याच्या बापाची शिकवायची इच्छा असूनही त्यांनं शाळा सोडली. त्यातच प्रकल्प आला.
जयेश शालान्त शिकत होता.अशातच त्याचा बाप आजारी पडला. आता बापाची प्रकृती,शाळा,पशुधन, शेतीची काम करता करता त्याला त्या लहान वयात नाकीनव येत होते. त्यातच त्याची शिकायची इच्छा असूनही त्याला ती मोडणे भाग होते.
सुरेशचा नंबर शहरात शिक्षकी पेशाला लागला होता.तो शहरात शिकत होता. त्यातच जयेशला वाटायचं की भावाला बापाच्या प्रकृतीबद्दल सांगू नये.ते सांगितलं तर भाऊ शिक्षकाच्या अभ्यासक्रम पूर्ण करणार नाही.उद्या तो मास्तर बनणार नाही. मास्तर बनला तर आपल्याला मदत करेल.आपले अस्तित्व टिकेल.कदाचित आपण शालान्त पास होवूही.पण बारावी. कदाचित आपल्या नोकरीचा विचार केलाही.पण आजच्या काळात नोकरी लागत नाही. मग काय करणार? असा विचार करता करता शिक्षणाचा त्याने त्याग केला.तो आता आपल्या बापाकडे लक्ष देऊ लागला. त्यातच आलेल्या पैशातून भावाच्या शिक्षणासाठी पैसे खर्च करू लागला. तसेच पुनर्वसनासाठीचा प्रश्न सांभाळू लागला. पण ती बापाची प्रकृती, आपलं शिक्षण, गोसेखुर्द प्रकल्प, घरची दैना या सर्व गोष्टीची झळ भावाला होऊ दिली नाही.
काही दिवस जाताच सुरेशनं मास्तरचा अभ्यासक्रम पूर्ण केला. तो गावाकडं न येता शहरात राहायला आला.त्यानं खासगी शिकवण्या घेण्यास सुरुवात केली. त्यातच जो पैसा यायचा. त्या पैशात आपलं पोट भागविणं व नोकरीसाठी फॉर्म भरणं सुरू केलं. अशातच एक दिवस फॉर्म भरता भरता त्याचा सरकारी शाळेत परीक्षा पास झाल्यानं नंबर लागला व आता तो गलेलठ्ठ पगार कमवू लागला.
सुरेश मास्तर बनला होता. तो तसा गावाला आला. त्याने पाहिलं की आपल्या वडिलांची प्रकृती खराब आहे. आपले वडील अंथरुणाला खिळलेले आहेत.मागील चार वर्षापासून ते बिस्तरावरच आहेत.भावाने शाळा सोडलेली असून त्यानं घर सांभाळलं आहे.त्यातच तो आपल्या शिक्षणासाठी अतिशय कष्ट झेलले असून आपल्याला तो पैसा पाठवत होता.तसा पुनर्वसनाचा प्रश्नही सोडवित आहे. त्याला फार दुःख झाले, पण तो काय करणार होता.त्याने निश्चय केला की गावाला जयेशसाठीनाहीतर आपल्या वडिलांसाठी मदत म्हणून पैसे पाठवणार.त्याप्रमाणे सुरेश दर महिन्याला जयेशसाठी व वडीलांसाठी पैसे पाठवत होता.
गोसीखुर्द प्रकल्प ९० टक्के पूर्ण झाला होता. त्यातच एका तालुक्यातील चौरास भागात गोसेखुर्दचं पाणी काही प्रमाणात पोहोचल्यानं लोकांनी या वर्षी दुष्काळावर मात करून आपल्या शेतीत धानाची रोवणी केली होती. कारण लोक खूप चिंतेत असल्यानं नाईलाजानं दुष्काळावर मात करण्यासाठी गोसेखुर्दचं पाणी सोडण्यात आलं. पण यामध्ये कालवे मातीचे असल्याने ते पाण्याच्या दबावानं काही ठिकाणी फुटल्यानं त्या कालव्याच्या आतल्या बाजूला असलेल्या शेतकर्‍यांचं अपरिमित नुकसान झालं. त्यातच पाणी बंद केलं गेल्यानं पुढे शेतीचेही नुकसान झाले.आता पक्के सिमेंटचे रस्ते जेव्हापर्यंत बनणार नाही,तो पर्यंत पाणी सोडायचे नाही असे ठरवण्यात आले.
पावसाळ्याचे अडीच महिने होत आले होते. पाऊस पडला नव्हता. सर्वांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या. त्यातच या धरणाचे पाणी सोडल्याने शेतकऱ्यांचे पीक बुडाले होते. हा कालवा शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरला होता. ती पीके करपली होती. शिवाय अतोनात नुकसान झाले होते.
गोसीखुर्द प्रकल्प लवकरच पूर्ण व्हावा, यासाठी प्रति वर्ष दोन हजार कोटी रुपयांची तरतूद सरकारनं करावी. यासाठी त्या पैशाची मागणी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली होती. बरोबर या बैठका होत होत्या.त्यातच नव्या प्रकारची तरतूद १८,४९४ कोटी रुपयाची होती. त्यात नव्या योजनेनुसार येथील शेतकरी तसेच ग्रामस्थांना मुबलक प्रमाणात वीज मिळावी म्हणून जल विद्युत प्रकल्प बनविण्यात यावे असे असे ठरले होते. डावा कालवा पूर्ण झाला होता. पण अजून पर्यंत जलविद्युत प्रकल्प बनवण्यात आले नव्हते.
नेरला सिंचन योजना कार्यान्वित झाली नव्हती.मात्र ती योजना पुर्ण बनून तयार होती.२०,६८० हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या या सिंचन योजनेतून मार्च अखेर १०,६१२ हेक्टर क्षेत्र सिंचन झाले होते. खेड्यात धारगाव, सुरेवाडा ह्या क्षेत्राचा त्यात समावेश होता.त्यातच या प्रकल्पाच्या पुनर्वसनाचे काम जलदगतीने व्हावे, यासाठी त्या गोष्टीचा आढावा येथे आलेल्या मंत्र्यांना घेतला होता.
सुरेश शहरात राहत होता. तो जयेशला पैसे पाठवत होता. तसेच काही पैसा स्वतःसाठी गोळा करीत होता. त्यातच स्वतःसाठी गोळा करीत असलेल्या पैशाने व काही पैसे बँकेतून काढून त्यानं शहरात एक चांगलं घर बनवलं होतं.हे घर खूप चांगलं बनवलं होतं. शहरात जागा घेऊन बंगला बांधला नव्हता.
बँकेतील काढलेल्या कर्जावर घर असल्यानं आता सुरेशला पैसा पुरत नव्हता.त्यातच जे गावाला पैसे पाठवत होता.ते पाठविणे त्यानं बंद केले होते. त्यातच बाप जास्त आजारी झाला होता. त्यामुळे साहजिकच जयेशला जास्त चिंता सतावत होती. त्यातच शेतीतून येत असलेला तो सर्व पैसा पोट भरतांना व पुनर्वसनासाठी लावताना खर्च होत होता.त्यामुळे सहाजिकच वडलांना खाजगी रुग्णालयात कसे भरती करावे अाणि कसा उपचार करावा हा प्रश्न जयेशला पडला होता. त्यामुळे बापाच्या इलाज खाजगी रुग्णालयात न करता तो घरीच ठेवून बापाचा इलाज करीत होता. पण घरी व्यवस्थित इलाज होत नसल्याने प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती.
पुनर्वसनाचे प्रश्न काही संपत नव्हते. काही लोक जागा खाली करून गेले होते. तर काही लोक ती जागा खाली करीत नव्हते.त्यांनी आपला पैसा खर्च केला होता.त्यांना वाटत होतं की आपण आपली शेती,आपली मातृभूमी सोडायची कशी? आपल्या पिढ्या याच मातीत राबल्यामुळं व याच मातीनं आपल्या पिढ्या पोसल्यामुळं आपली मातृभूमी हे आपलं दैवत आहे,असे ते ग्रामस्थ मानत होते. म्हणून ते तो गाव सोडायला तयार नव्हते. कदाचित त्यांना वाटत होतं की आपण जर विरोध केला तर सरकार या प्रकल्पाच्या नाद सोडून देईल किंवा पैसे तरी जास्त देईल. याच एकमेव उद्देशाने हे लोक वागत होते.
सुरेशला नोकरी लागल्याने सुरेश खुश होता. त्याला भावाची व बापाची काही चिंता नव्हती. तर मागच्या जुन्या सगळ्या गोष्टी तो विसरला होता.ती भावाची, त्याच्या शिक्षणासाठी मदत करणं नव्हे तर आपला भाऊ शिकला पाहिजे म्हणून स्वतः तो शिकत असताना घर कोण सांभाळेल म्हणून मधातच शिक्षण सोडून नव्हे तर बापाचं आजारपण व पुनर्वसनासाठी लढणं, या सगळ्या गोष्टी त्यांना मनातून केल्या होत्या.
घर बांधण्यापूर्वी सुरेश गावातील शाळेत लागला होता. त्या शाळेत इमानेइतबारे शिकवीत होता. त्यातच शाळेत शिकविणाऱ्या एका मुलीवर त्याचे प्रेम निर्माण झाले होते. दररोज तिला आपल्या गाडीवर शहरात आणत असताना ते प्रेम होणे सहाजिकच होते. त्यातच ती नोकरीवर आहे हाच उद्देश गृहीत धरून सुरेशनं विवाहाचा प्रस्ताव तिच्याकडे फेकून पाहिला होता. त्या प्रस्तावावर तिही तयार झाल्याने सुरेशनं तिच्या सोबत आपला विवाह केला.
सुरेश चा झालेला विवाह, त्यानंतर पत्नीच्या सहकाऱ्यांना बांधलेलं घर, स्वतःसाठी काढलेलं कर्ज, त्यातच त्या कर्जाचे हप्ते चुकवीत असताना सुरेशची होत असलेली तारांबळ, शिवाय पत्नीला त्याचे गावाकडे पैसे पाठवणे माहीत झाल्याने तिची सगळी कटकट,यामुळे सुरेशच्या मनाची हत्या होत होती. काय करावे सुचेनासे झाले होते. त्यातच त्यानं गावाला पैसे पाठवणे बंद केले होते.
जयेशनं मिळालेल्या पैशातून व मिळालेल्या जागेवर घर बांधायचं स्वप्न बघितलं होतं.त्याची पुनर्वसनाशी झुंज खेळण्याच्या नादात हार होईल असे त्याला वाटत होते.त्यातच एक दिवस आजाराशी लढता लढता त्याचा बाप मरण पावला होता.जयेश आता एकाकी झाला होता. सगळे हळहळत होते.त्याचा धसका जयेशनं घेतला होता.
सुरेश शहरात स्थाावर झाला होता.ते दोघेही पती-पत्नी नोकरी करीत होते.सुरेशला दोन मुले झाली होती. ती लहान होती.त्यातच त्यानं अाया ठेवली होती.पण त्यांना नातवाला सांभाळण्यासाठी आपल्या आईला सुद्धा नेलं नाही. त्याला आपल्या जन्मदात्या आईची ही आठवण येत नव्हतीे. तसेच तो गावाला येत नव्हता. मी,माझी पत्नी व माझी मुले एवढंच त्याचे अस्तित्व होतं.ते अस्तित्व कर्तव्य समजून पूर्ण करत होता जयेश.अर्थातच जो भाऊ आपला पुढे आधार होईल म्हणून त्याच्या शिक्षणासाठी पैसे पाठवणारा जयेश आज ख-या अर्थानं पोरका झाला होता. त्याला त्यानं दगा दिला होता.
तसा गोसेखुर्द प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान असलेला हा प्रकल्प.हा प्रकल्प चांगल्या दृष्टिकोनातून राबवण्यात येत होता.या प्रकल्पाद्वारे खासकरून विदर्भासाठी वरदान असलेल्या वैनगंगा नदीला पाच नद्या आंभोरा येथे मिळतात. त्या नदीला बांध घालून पाणी अडवून कित्येक किलोमीटर परिसरातील लोकांना पाणीपुरवठा करण्याचे स्वप्न सरकारनं पाहिले होते. ते पूर्ण करण्यासाठी सरकारने आटापिटा चालवला होता.या भागातील शेतीला पाणी तसेच लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी हे धरण बांधण्याचे उद्दिष्ट सरकार करीत होतं. ही सरकारची योजना शेतकऱ्यांसाठी आनंदाची योजना होतीे. या नदीच्या आजुबाजूची मंडळी जरी दुःखी कष्टी झाली असली तरी या नदीच्या परिसरातील दुरदूरची माणसे या प्रकल्पाने सुखी होणार होती.कारण कित्येक हेक्‍टर क्षेत्र लागवडीखाली येणार होते.पण झालं उलटंच.
वैनगंगा नदीवर गोसेखुर्द गावात धरण बनलं.पण शासनाच्या लेटलतिफशाहीमुळं आजही प्रकल्प अपूर्ण होता.आजही त्या भागात सोयी नव्हत्या.आजही जनतेचे हाल होत होते..आजही ते हाल बघवत नव्हते.शेवटी प्रकल्पानं त्यांचा फायदा होत असतांना यांनाच असा त्रास का? असं साहजिकच कोणाला वाटत होतं.कारण कोणालाही तेवढा अभ्यास नव्हता.त्यांच्या समस्या माहीत नव्हत्या.पण जेव्हा त्या भागात कुणी गेलंच आणि त्या भागातल्या समस्या जाणून घेण्याचा योग आलाच तर आपल्याला त्या लोकांच्या समस्या माहित होत होत्या.
गोसीखुर्द प्रकल्प बनवितांना मुख्य बाब निदर्शनास येते की येथील लोकांचं पुनर्वसन.लोकं या ठिकाणावरुन जायलाच तयार नव्हती.त्यांना वाटत होतं,आमच्या पुरखाची जागा.आमच्या कित्येक पिढ्या न पिढ्या या गावात होवून गेल्या.त्या सर्वांनी सुख दुःख पाहिलं.कित्येक अवखळा झेलल्या.वैनगंगेची पुरं झेलली.आम्ही या ठिकाणी मरुन जावू.पण जागा सोडणार नाही.सरकारने त्यांना समज दिली.काही गावक-यांनीही समजावले.त्यानंतर जागा सोडली.या लोकांना पैसा मिळाला.जागा घेण्यासाठी.तसेच शेतीचाही.आजही त्या भागातील गावं उठले आहेत.काही तिथेच राहात आहेत.आमच्या पुर्वजांची जागा समजून.पण काही ठिकाणी चक्क उठावंच लागलं आहे.
कित्येक गावंची गावं उठली.या प्रकल्पासाठी.त्यांना पैसा मिळाला खरा.पण केवळ पैशानं पोट भरत नाही.पैसा हा तोकडा पडतो जीवनासाठी.गोसेखुर्द प्रकल्पातून हेच जाणवतं.त्यात काय काय जाणवलं
*मालक असलेले मजूर झाले.*
सर्वात पहिली समस्या आली या लोकांना ती रोजगाराची.कारण या भागात ज्या शेत्या होत्या.त्या प्रकल्पग्रस्ताच्या पुर्वजांच्या होत्या.कित्येक एकर असलेल्या या जमीनी.या जमीनींनी त्यांच्या पिढ्याच्या पिढ्या पोसल्या होत्या.तसेच ते त्या शेतीचे मालक होते.त्या जमीनी गेल्यानं लोकांकडे जमीनी उरल्या नाहीत.पुनर्वसीत गावात इतर लोकांच्या जमीनी असल्याने त्या गावात या जमीन मालकांना आता शेतमजूर म्हणून कामाला जावे लागले.घरासाठी जागा मिळाली.पण हाताला काम.ज्या पुनर्वसीत गावात आधीच राहात असलेल्या लोकांना रोजगार नव्हता.त्यातच हे पुनर्वसीत गाव आलं.त्यामुळं दुस-याच्या शेतात काम करतांना मालक असलेल्या या लोकांना नोकरासारखं राबतांना लाज वाटत होती.शिवाय त्यामुळं एक नुकसानही झालं.या गावातील लोकांना पोट भरण्यासाठी राबत असतांना अत्यंत कमी पैशात रोजगारावर काम करावं लागलं.त्यातच ज्या गावाजवळ पुनर्वसन झालं.त्या गावातील लोकांनाही ह्या मजूरांमुळं काम मिळेनासं झालं.कारण त्यांना मिळणारी मजूरी ही पुनर्वसन होण्यापुर्वी जास्त होती.साहजिकच बेरोजगारी निर्माण झाली.जुन्याही गावात आणि पुनर्वसीतही गावात.
*दारुच्या सवयी लागल्या.दारुमुळं पैसा गेला.*
प्रकल्पात शेती तसेच घराचा पैसा मिळताच काही लोकांची तर चांदीच झाली.ते हवेत उडल्यासारखे करु लागले.कधी पाहिला नाही एवढा पैसा डोळ्यांना दिसल्यानं त्यांना दारुच्या सवयी लागल्या.दिवसभर काम नसल्यानं चिंतेनं लागलेल्या सवयी.त्यातच जे दारुडे होते.त्यांच्या सवयी जास्त झाल्या.त्यातच होता नव्हता तोही पैसा गेला.परीणामी यातून रावाचे रंक बनल्यागत या नागरीकांची अवस्था झाली.
*शिक्षणाची आबाळ झाली*
गावातील शिक्षण शिकणा-या होतकरु मुलांच्या शिक्षणाची या प्रकल्पानं आबाळ झाली.कारण प्राथमिक शाळा ही या जुन्या गावात होती.तिथं शिक्षणाचा दर्जाही होता.पण जेव्हा या गावाचं पुनर्वसन झालं.तेव्हा एकाएकी शाळा कशी बंद करायची?हा प्रश्न शिक्षकांसमोर उभा होता.तसेच काही लोकं पुनर्वसन ठिकाणी आले होते.तर काही लोकं त्याच गावात थांबले होते.त्यामुळं पुनर्वसीत लोकांसाठी शाळा कशी सुरु करायची? हाही प्रश्न शिक्षकांसमोरच होता.त्यामुळं असा विचार करीत असतांना मुख्याध्यापकाच्या पुढे पेच निर्माण झाला.आजही या गावची मंडळी शिक्षकांना धन्यवाद देतात.म्हणतात की त्यांच्या शिक्षकांनी त्यांना बरंच सहकार्य केलं.हे मुख्याध्यापक दोन शिक्षकी जर शाळा असेल तर एक एका गावात तर दुसरा दुस-या गावात आळीपाळीनं शिकवायला जायचा.हे या काळात शिकविणं म्हणजे तारेवरची कसरतच होती.असं म्हणायला हरकत नाही.
आज काही काही गावाचं संपूर्ण पुनर्वसन झालेलं आहे.मोठ्या शाळाही पुनर्वसीत गावात बनलेल्या आहेत.काही गावांचे प्रश्न मिटलेले आहेत.काहींचे अजुनही सुरुच आहेत.पैशाचे हफ्ते काही काही गावांना पुर्ण मिळालेले नाहीत.बेरोजगारी आजही आहे.काही मंडळी पुनर्वसीत गावात राहायला आली.काही शहरातही गेली.पण आजही ह्या पुनर्वसन भागातील लोकांनी जो संघर्ष केला.ते सांगतांना त्यांच्या डोळ्यात आजही अश्रु तरळतात नव्हे तर अंगावर रोमांच देखील उभे राहतात.
या प्रकल्पाने मग एकदा असेच ठाण मांडलेले असताना या प्रकल्पाला पूर्ण करण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना शेतीची तसेच गावठाणाची पाहिजे तेवढी रक्कम दिली व ते गाव खाली करायला लावले. त्यातच गावच्या गावं खाली झाली.पण यात मुख्य प्रश्न होता तो म्हणजे शिक्षणाचा व गुराढोरांचा. लोकांना सरकारनं जागा दिली होती पण लोकं जगायला तयार नव्हती.तर पिढीजात गाव म्हणत ती मातृभूमी तेे खाली करीत नव्हते.आम्ही याच भूमीत मरु असे ते म्हणत होते.ही आमच्या पुरखाची जागा. आमच्या पुरखांनी कित्येक त्या जन्मात सुखदुःख पाहिले असून आमच्या पुरखाचे या भुमीत आशीर्वाद आहेत.असे म्हणत या गावातील लोकांनी ही जागा सोडायला नकार दिला होता.नवीन तरुण पिढी तयार झाली झाली असली तरी म्हातारी माणसं म्हणत होती की ज्या भूमीत आमची हाडं झिजली. ती भुमी एकाएकी कशी सोडायची.आमच्या पिढींनी कित्येक अवखळा झेलल्या आहेत.असेही लोक म्हणत होते.आम्ही या ठिकाणी मरून जाऊ पण जागा सोडणार नाही, अशा प्रकारच्या त्यांच्या बोलण्यानं सरकार त्रासून गेलं होतं.सरकारनं दोन-तीन वेळा नोटिसा पाठवल्या.काही लोकं समजले. पण काही लोक म्हणत होते, आमच्या पुरखांनी वैनगंगेची कित्येक पूर पाहिलेले असून ती पूर झेललेली आहेत. गंगा आमची माय असून ती आमच्या अवकृपा होवू देणार नाही. तसं पाहता पुनर्वसनाचा प्रश्न सोडवतांना काही गावात तयारी झाली. कारण त्यांना विचार पटलेला होता. पण काही गावं तयार नव्हते.
काही समाजातील शिकलेली माणसं.काही गावातील होतकरू तरुण. काही सरपंच,काही नेते, काही मंत्री अख्ख्या गावातील या म्हाताऱ्या लोकांना समजवत होते की जर त्यांनी आपली स्वतःची जागा गोसीखुर्द प्रकल्प ला दिले नाही,तर या भागातील लोकांचा विकास होणार नाही. पिण्याचे पाणी मिळणार नाही.शेतीला पाणी मिळणार नाही. तुमच्या या नंतरच्या पिढी सुखी होणार नाही.पण ही मंडळी म्हणत होती की जर प्रकल्प बनवताना आमची जागा, शेतीवाडी गेली तर आमचे कोणतीे पिढी सुखी होणार. काही कालांतराने लोक समजले की त्यांनी प्रकल्पाला जागा दिली, बदल्यात पैसे घेतले.
लोकांनी पैसा घेतला घर बांधण्यासाठी. ते घर बांधण्यासाठी व जागा मिळवण्यासाठी शहराकडे पलायन करू लागले.त्यांना मिळालेल्या पैशात काही पैसे टाकून त्या पैशांत शहरात घर घेतले. काहींनी जागा घेऊन घर बांधलं.पण काही मात्र पुन्हा पैसे घर बांधायला द्या म्हणत होते. त्याचं कारणही तसंच होतं. शेती आणि घराची जागा जरी गेली असली तरी त्यांच्याकडे पशुधन असल्याने ते आपलं पोट जगवू शकणार होते. परंतू म्हणूनच त्यांनी पुनर्वसनासाठी जागा घेतली.
सरकारने ज्या ठिकाणी जागा दिली होती.त्या ठिकाणी काही लोक स्थलांतरित झाले होते. लोकांबरोबर जयेशही आपल्या पशुधनाला घेऊन स्थलांतरित झाला होता. नवीन ठिकाणी ज्या गावात सरकारला जागा दिली होती.
कित्येक गावं उठली होती. लोकांना पैसा मिळाला खरा.पण केवळ पैशाने पोट भरत नाही. काल जे मालक होते. ते आज शेती गेेल्याने बेकार झाले होते. तसा पैसा ही तोकडा पडत होता. लोक काम देत नव्हते. त्याची प्रकल्पात शेती तर गेली होती.पण पशुधन तेवढं ते घेऊन ते नवीन गावात आले होते. पण त्या गावी त्यांना इतर लोकांप्रमाणे लोक काम देत नव्हते. तसेच ज्या गावी पुनर्वसन झालं होतं. त्या गावचे लोक ओरडत होते,नव्हे तर ती मंडळी त्यांचा सतत अपमान करीत.बोलत असत.या प्रकल्पाचे अनुषंगाने पहिली समस्या आली ती म्हणजे रोजगाराची कारण नवीन ठिकाणी पुनर्वसित होण्यापूर्वी जुन्या प्रकल्पग्रस्तांच्या पूर्वजांच्या असलेल्या जमिनी. या जमिनी त्यांच्या पिढ्यांनी पोसलेल्या होत्या. तसेच ते प्रकल्पग्रस्त या जमिनीचे मालक होते.त्या जमिनी गेल्या नंतर दुसऱ्याच्या शेतात ते स्थानांतरित मजूर बनले होते. कारण त्यांच्याकडे आता जमिनी नव्हत्या. म्हणूनच त्यांना इतर लोकांकडे शेतमजूर म्हणून कामाला जावे लागत होते.
घरासाठी जागा मिळाली होती. पण हाताला काम मिळाले नसल्याने आपण पोट कसे भरणार. हा विचार पुनर्वसित लोकांच्या मनात होता.कारण नवीन गावातील राहत असलेली माणसं आधीच बेरोजगार होती. त्यात पुनर्रचित झालेले माणसं भर घालून होती.ज्यांना आपल्या स्वतःच्या शेतात दुसऱ्यांना मजूर म्हणून राबायची सवय नव्हती. पण जेव्हा पुनर्वसन झालं, तेव्हा मात्र त्यांना दुसऱ्याच्या शेतात राबायला लाज वाटत होती. कारण ते काम करणं म्हणजे नोकरी सारखं वाटत होतं.त्यामुळे नुकसान झालं होतं. या गावातील लोकांना पोट भरण्यासाठी गावात राहत असताना अत्यंत कमी पैशात रोजगारावर काम करावं लागलं. यातच ज्या गावांमध्ये या लोकांचे पुनर्वसन झाले. त्या गावातील लोकांना या पुनर्वसित लोकांमुळे कामे मिळेनाशी झाली. कारण त्यांना मिळणारी रोजी ही ही पुनर्वसन होण्यापूर्वी जास्त होती. पर्यायाने सांगायचं झाल्यास पुनर्वसनानं बेरोजगारी निर्माण झाली होती. अजूनही गावात बेरोजगार तसेच पुनर्वसित गावातही बेरोजगार निर्माण झाले होते.
प्रकल्पामध्ये शेती आणि घर गेलेली असल्याने त्यांचा जो पैसा मिळाला होता. तो पैसा मिळताच काही लोकांची चांदी झाली होती.ते हवेत उडाल्यासारखे करू लागले होते.कधी पाहिला नाही एवढा पैसा डोळ्यांना दिसला.त्यातच त्यांना दारुच्या सवयी लागल्या. त्यांना हाताला काम नसल्याने तो पैसा ऐसआरामात खर्च झाला. त्यातच होता नव्हता तोही पैसा गेला. यातून रावाचा रंक बनला. अशी गावची परिस्थिती झाली होती. ज्याप्रमाणे बेरोजगारी गावात निर्माण झाली ते दारूच्या सवयी लोकांच्या वाढल्या होत्या.
आज आज काही काही गावाचं संपूर्ण पुनर्वसन झालेलं होतं. तर मोठ्या शाळाही पुनर्वसित गावात बनलेल्या होत्या. काही गावाचे प्रश्न मिटले होते,तर काही गावाचे प्रश्न अजूनही शिल्लक होते. पैशाचे हप्ते काही काही गावांना जे मिळाले होते. काही मंडळी पुनर्वसित गावात राहायला गेले.काही मंडळी शहरातही गेले होते. पण आजही ह्या पुनर्वसन भागातील लोकांनी संघर्ष केला,ते सांगताना आज ही त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते,तर अंगावर रोमांच उभे राहत होते.
आजही गोसीखुर्द प्रकल्प पूर्ण झाला नव्हता. कारण मोठ्या शहरातून येत असलेले सांडपाणी या वैनगंगेच्या पाण्यात मिसळल्याने पाणी खराब झाले होते.मोठ्या शहरातून येणारे पाणी हे त्या त्या सांडपाण्यात मिसळलेले असायचे.या कारखान्यातून कारखान्यातून निघणारे विषारी घटक व कारखाने शहरालगत असल्याने ते पाणी शेतीला तसेच पिण्याला अपायकारक होते.गोसीखुर्द प्रकल्पाच्या कालव्याचे काम पूर्ण झाले होते.पण हा कालवा जरी पूर्ण झाला असला तरी कारखान्यातून वाहत येणाऱ्या पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक होते.त्यासाठी ते पाणी हे त्या त्या भागाकडे वळवणे आवश्यक होते.ते काम पूर्ण न झाल्याने लोकांच्या शेतीला व आरोग्याला अपाय होण्यात बाधा आणता येत नव्हती नव्हती. म्हणूनच लोकं अाजही या प्रकल्पाच्या लाभापासून वंचित होते. व्यवस्था करण्यास शासन दिरंगाई करीत असल्याने ह्या प्रकल्पांवर कोट्यवधी रुपये खर्चूनही काही उपयोग झाला नव्हता. ही व्यवस्था करण्यास शासन दिरंगाई करीत असल्यानं ह्या प्रकल्पावर कोट्यवधी रुपये खर्चूनही काही उपयोग झाला नव्हता.तो उपयोग भविष्यात होईल काय? हा प्रश्न पुनर्वसित मंडळी तसेच इतरही मंडळीमध्ये आ वासून उभा होता.
जयेश विजयाला व्हाट्सअपवर मिळालेला मित्र होता. तो असा मित्र होता की ज्याने विजया सारखाच पुनर्वसनात संघर्ष केला होता. दोघांनीही पुनर्वसनासाठी केलेला संघर्ष काही गोष्टीत समान असला तरी थोडीशी भिन्नताही होती. दोघांनीही यासाठी संघर्ष केला होता.
जयेशचा पुनर्वसनासाठी असलेला संघर्ष,गोसेखुर्दातून निर्माण झालेला पेच होता.तर विजयाचा तर पुनर्वसनासाठी असलेला संघर्ष माळीणची दुर्घटना होती.एक नैसर्गीक घटना होती तर दुसरी मानवनिर्मित घटना होती.परंतू दोघांचा उद्देश एकच असल्याने दोघांचे एकमेकांशी पटत होते.
जयेश विजयाला सल्ला देत होता. तशी विजयाही जयेशचं सांत्वन करीत होती.विजयाला तिच्या पतीकडून धोका मिळाला होता,तर जयेशला त्याच्या सख्ख्या भावाकडून. विजयाला मात्र बाळाची आठवण येत होती. पण जयेशला भावाची आठवण येत नव्हती. त्यामुळे तो विजयाला बाळाला विसरण्याचा सल्ला देेत होता. त्याचबरोबर अशाच प्रकारे व्यवहार करणाऱ्या लोकांवर जरब बसवण्यासाठी शिक असाही तो म्हणत होता.
तसा तोही आपल्या भावाला विसरलाच विसरला होता.
सगळीच मुले कालांतराने मोठी होतात. वयात येतात. वयात आल्यानंतर ती मुले प्रेम करू लागतात.कारण त्यांच्या शरीरात बदल होत असतो. मुलींना मुलगा आवडायला लागतो. मुलाला मुलगी आवडायला लागते.प्रत्येकाला प्रेम करावसं वाटतं.मग तो मुलगा कसा आहे,कसा नाही,याचा इतिहास जाणून न घेता मुलगी प्रेमात पडते.मुलगाही तसा विचार करून प्रेम करायला लागतो.कारण ते वयच तसं असतं.
अलिकडे खरं प्रेम उरलेलं नाही.ह्या प्रेमात स्वार्थ निर्माण झालेला आहे.संसारगाठ बांधू म्हणणारा मोठमोठे आश्वासन देणारा हा काळ.मुलींच्या शरीराचा वासनेच्या दृष्टिकोणातून उपभोग घेणारा हा काळ.अर्थात शरीरसंबंधांसाठीच काही काही मंडळी प्रेम करीत असतात.एकदा का शरीरसंबंध संपले की ती कुठली हे तो तरुण आठवतही नाही.पण याची झळ सर्वात जास्त पोहोचते ती तरुण मुलींना.
शरीरसंबंधासाठी त्याही उत्सुक असतात.त्यामुळे की काय विवाहाचं आश्वासन मिळाल्यावर विवाह करण्यापुर्वीच त्या शरीरसंबंध प्रस्थापीत करतात.काही तर फक्त विवाहाचं आश्वासन नाही मिळाले तरी फक्त कामवासना पुर्ण करण्यासाठी शरीरसंबंध प्रस्थापीत करतात.शरीरसंबंध संपले.....कामनासना पुर्ण झाली की हे दोन्ही घटक एकमेकांपासुन दूर जातात.तद्नंतर दुस-या कोणाशी शरीरसंबंध प्रस्थापीत करतात.केवळ कामवासना पुर्ण करण्यासाठी.......कामवासना पुर्ण करण्यासाठी एकाचवेळी अनेकांशी शरीरसंबंध.तोही राजीखुशीनं.कामवासना पुर्ण करण्यासाठी हा भातुकलीचा खेळ.....पण जेव्हा याचे परिणाम दिसायला लागतात.तेव्हा मात्र तो नेमका कोण?हेच कळत नाही.
केवळ आनंदासाठी व शरीराची शारिरीक भुक भागविण्यासाठी हा कामवासनेचा कौमार्य बिघडवणारा खेळ.या खेळात हारते फक्त स्री.पुरुष हारत नाही.कारण या खेळातून मुलीच गर्भार राहतात.मुलं नाही.मुलीला जेव्हा गोळ्या खावूनही मासीक पाळी येत नाही.तेव्हा ती घाबरते.ती एवढी घाबरते की आपले काय होईल या धाकाने ती आत्महत्या करते.तर काही काही मुली ह्या आपल्या प्रियकराला स्वतःवर घडलेला प्रसंग सांगतात,त्याने नकार देताच मायबापाला स्वतःवर घडलेला प्रसंग सांगतात.काहींना हे अपत्य नेमके कोणाचे हे माहीतच नसते. कारण त्या मुलीचे शरीरसंबंध एकाच मुलाशी नसतात.तरीही एखाद्याला गृहीत धरुन ती मुलगी जेव्हा आपल्या प्रियकराला म्हणायला जाते की तुझं बाळ माझ्या पोटात वाढते. तेव्हा मात्र तो मुलगा.....ज्याच्यावर ती निरतीशय प्रेम करीत असते.तो स्पष्ट नकार देतो.म्हणतो, 'तू इकडे तिकडे तोंड मारायला गेली असेल,हे पाप दुस-याचं अाहे आणि माझ्यावर लावते काय?' तो तिला धुडकावून लावतो.शिवाय यानंतर मला तोंड दाखवायचे नाही.असेही म्हणतो.
ज्याच्यावर निरतिशय प्रेम केले,तो प्रेमी,कधी लग्नाचे आमीष दाखवून तर कधी ते आमीष न दाखवता भोळ्या भाबड्या मुलींना फसवतो.वारंवार बलत्कार करतो.कधी मुलीही कामवासना पुर्ण करण्यासाठी त्या आमीषाला बळी पडतात.स्वतः बलत्काराच्या शिकार ठरतात.परिणामाचा विचार न करता........अशावेळी गर्भ राहिल्यास बदनामी तर होते.पण एफ आय आर दाखल करुनही असा मुलगा पैसेवाला जर असेल तर तो पोलिस ठाण्यापासून तर न्यायालयापर्यंत सगळी जुळवाजुळव करुन मोकळा सुटतो.मुलीलाच कुलथा ठरविलं जातं,म्हणून मुलींनीच सावधान राहण्याची गरज आहे.प्रेमाला भातुकलीच्या खेळासारखे समजू नका.शरीरसंबंध प्रस्थापीत करतांना प्रथम मायबापाचा विचार करा.प्रेम करीत असाल तर मायबापांना सांगा.शरीरसंबंध प्रस्थापीत करण्यापुर्वी लग्न करा.त्याचा पुरावा घ्या.
अलिकडे शरीरसंबंध ठेवण्याची प्रथाच निर्माण झाल्यासारखी वाटते.लग्न झाल्यानंतरही पुरुष आणि महिला याच कामवासनेच्या आहारी जावूून आपला संसार उध्वस्त करतात.लग्न करुन मिळविलेला पतीदेव त्याला देवाचा दर्जा न देता त्यांची हेळसांड करुन त्याला माहीत न करता स्रीया शरीरसंबंध का ठेवतात? ते कळत नाही.पुरुषही आपल्या कर्मनिष्ठ पत्नीला माहीत होवू न देता असेच विवाहबाह्य संबंध कसे प्रस्थापीत करतात? ते कळायला मार्ग नाही.अगदी मुलं बाळं असतांना या विवाह बाह्य संबंध ठेवण्याने संसाराचे नुकसान होत असले तरी अगदी बाल्यावस्थेत असल्यासारख्या या महिला वागतात.हे विवाहबाह्य संबंध माहीत झाल्यावर व त्यांना रोक लावण्याचा प्रयत्न केल्यावर त्या पतीलाच उलट उत्तर मिळते.तो माझा बायफ्रेंड आहे.कशाला बायफ्रेंड हवा पती असल्यावर.तरीही......पुरुष तर याबाबतीत एक पाऊल पुढेच असतो.तो तर चक्क पत्नीने असा विरोध करताच या स्रीसोबत दुसरीकडे राहायला जातो. वा तिला जबरदस्तीने आपल्या घरी आणतो.हे बरोबर नसले तरी हा जागतिक चिंतनाचा विषय बनत चालला आहे.याचा परिणाम मुलाबाळावर होत असून यामुळे घटस्फोटाचेही प्रमाण वाढत चालले आहे.स्रीयाही ऐकायला तयार नाहीत.पुरुष तर नाहीच नाही.मात्र यात जन्मास येणा-या बाळांचं अतोनात नुकसान होत आहे.शरीरसंबंध ही काही मुलांपुढे तेवढी महत्वाची गोष्ट नाही मुलांपुढे. तरीही मायबापाचे विवाहबाह्य शरीर संबंध ठेवणे ही न पचणारी गोष्ट आहे.
विजया शरीरसंबंध व विवाहबाह्य संबंधांवर विचार करीत होती.तिच्या मनात येणारे विचार खरे होते.तसं तिला एक प्रकरण आठवत होतं.एक महिला.तिचा पती व्यसनाधीन असून दारुच्या आहारी गेला होता.तिला एक मुलगीही होती.तिची काळजी न करता त्या मुलीने आपल्या पतीला सोडले.केवळ विवाहबाह्य शरीरसंबंधासाठी.तिने तो व्यसनाधीन आहे.म्हणून त्याला सोडले.बहुतेक या महिलेचं प्रेम त्याला माहित होतं.म्हणून तो ते विसरण्यासाठीच दारु पीत होता.तिने घरी परत यावे म्हणून तो नेहमी भांडण करायचा.पण ती जात नव्हती.सारखी ती तो दारु पितो म्हणुन सांगायची.आपल्या विवाहबाह्य शरीर संबंधाविषयी सांगायची नाही.तिचं खरंही वाटायचं.पण काळानुसार वेळ गेली.तो पती सांगायचा की तिचे विवाहबाह्य संबंध आहेत.पण कोणाला विश्वास वाटायचा नाही.यातच एक दिवस तिला घरच्यांनी रंगेहाथ पकडायचं ठरवलं.कारण जावई दारु पित होता.अशी तक्रार मुलीची होती.आई मुलीच्या बाजुनं होती.तर बाप आणि भाऊ हे थोडे विरोधात.यातच जावई मारहाण करतो अशी मुलीची तक्रार.
आधुनिक तंत्रज्ञानानुसार मोबाइल तंत्रज्ञान निघालं.मग व्हाट्सअप,फेसबुकच्या आहारी गेलेली पिढी त्यांचं कोणावर कशाप्रकारचं प्रेम आहे हे मोबाईल तंत्रज्ञानावरुन सहज समजतं.तसं पाहिल्यास व्हाट्सअपवर आलेले मेसेज कोणाला आपला स्वभाव कळू नये म्हणून पटकन नष्टही करता येतात.पण एक दिवस याच महिलेचा मोबाइल तिच्याजवळ नसतांना भावाने तपासला.त्यात व्हाट्सअपवर हिने एका पुरुषाला मी प्रेम करतो(I love you) हे इंग्रजीत लिहिलेलं.त्याचंही मी प्रेम करतो हे इंग्रजीत लिहिलेलं.नंतर हिने त्याला चुंबणाचा व्हिडीओ पाठवलेला.त्यानेही बोट सापडल्यागत अश्लिल व्हिडीओ पाठवलेले.चोरी पकडली गेली.बहुतेक व्हाट्सअपवर आलेल्या त्या गोष्टी ती नष्ट करायला विसरली असेल.तो व्हिडीओ त्याने भीत भीत बाबांना दाखवला.थोड्या वेळाने ती आली.चेह-यावर राग होता.पण राग न दाखवता बापाने सुरुवात केली.त्याच्या नावाचा उल्लेख करुन विचारणा झाली.तर मुलीचं उत्तर आश्चर्यात टाकणारं होतं.ती म्हणत होती की तो तिचा बायफ्रेंड आहे.त्याला सोड म्हटल्यावर ती सोडायला तयार नव्हती.वाटल्यास ती घर सोडून देईल पण बायफ्रेंड सोडणार नाही अशी धमकी.यातच जर बायफ्रेंडने ठुकरावले तर आत्महत्या करणार अशी ही धमकी.अर्थात तिच्या पोटच्या मुलीचं आयुष्य बेकार.वाया गेल्यागत.
लग्न झाल्यावरही असं शरीराचं आकर्षण.काय गरज आहे अशा विवाहबाह्य बाह्य संबंधाची? तेही पती सोडून. पतींना व्यसनाला लावून.पुरुष मंडळीही असे विवाहबाह्य शरीरसंबंध ठेवतात.मुलाबाळांचा विचार न करता.तसेच बायकोचा विचार न करता.......ही खरंच विचार करायला लावणारी गोष्ट आहे.
हे असे शरीरसंबंध अलिकडे वाढत चाललेले दिसून येत असून व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून ते अगदी घनिष्ठ होत चाललेले आहेत.याला जनसामान्यांचा विरोध असला तरी जो तशा स्वभावाचा आहे,त्याला तसे संबंध चांगले वाटतात.पण यात किती नुकसान होते हे शरीरसंबंध प्रस्थापीत करण्यापुर्वी कोणीही लक्षात घेत नाही.बिचारी ती महिला ही मैत्रीणीच्या याच शरीरसंबंधाच्या प्रेमात मरण पावली. काही महिला तर याच शरीरसंबंध संबंधातून कोमात गेल्या.फरक एवढाच की त्यांच्याशी झालेला शरीरसंबंध हा बलत्कार स्वरुपाचा होता.अशी कितीतरी प्रकरणं झाली आहेत.पण तरीही अजून कोणाचे डोळे उघडलेले नाहीत.आजचा काळ एखाद्या मुलीचे जर प्रेम असेल तर तिच्या प्रेमाचा फायदा घेत तिला अज्ञात ठिकाणी बोलावले जाते व तिथे स्वतःची कामवासना तृप्त न करता सामुहीक भोजन समजून मित्रांचीही कामवासना पुर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो.हा सामुहीक बलत्कारच असतो.पण प्रकरणाची वाच्यता कुठेच केली जात नाही,जेव्हापर्यंत समस्या निर्माण होत नाही.कारण हा बदनामीचा विषय ठरतो.ही वाच्यता तेव्हाच होते जेव्हा या मुलींना दिवस जातात.लग्न झालेल्या महिला जर पतीजवळ राहात असतील तर हे पातक खपतं.पण जर राहात नसेल तर खपत नाही.म्हणून विवाह झाल्यावर असो की विवाह होण्यापुर्वी असो,असे कामवासना पुर्ण करणारे शरीरसंबंध नकोतच.
आज ही सरकारी कार्यालयातही मुलींना छळलं जातं.मुली जर कामवासनाचे संबंध करायला तयार होत असतील तर त्यांचे वेतन वाढविणे बढत्या देणे इत्यादी गोष्टी केल्या जातात. त्या तयार होत नसतील तर त्यांना नोकरीवरून काढून टाकले जाते.अथवा त्याच्या पदाची गच्छंती केली जाते.हे जरी चांगलं असलं तरी त्या अधिकारीवर्गावर रोक लावता येत नसल्याने तसेच अधिकाऱ्यांचे वरच्या पातळीवर वजन वरच्या पातळीवर असल्यानं बहुतःश महिलांना मजबूरीनं ते सगळे अत्याचार सहन करावे लागतात.हे अधिकारीच नाहीतर आज वरिष्ठ तसेच कनिष्ठ नेतेमंडळीही अशाप्रकारे मुलींना छळत असतात. आपल्या वासनेची शिकार बनवत असतात.
विजयाला सगळं वाटत होतं.तिनं जो विचार केला होता,तो विचार तसेच तशा त्या प्रकारचं वागणं समाजाचं होतं. या समाजाच्या वागण्याला ती हद्दपार करणार होती.
विजया खूप शिकली होती.ती फाम भरत होती नोकरीसाठी. त्यातच परीक्षाही.ती उंचीपुरी धिप्पाड असल्यानं परीक्षा पास झाल्यानंतर पोलिस महासंचालक म्हणून राज्यात रुजू झाली होती आणि आपल्या पोलिस महासंचालक पदाची सुत्रे हातात घेताच ती लोकांना मदत करू लागली होती.तिनं संविधानानुसार बनवलेले नवे नवे नियम अंमलात आणून समाजातील ज्या अबला होत्या,त्यांना न्याय मिळवून देऊ लागली होती.तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी अपंग, विधवा,निराधार महिलांच्या जनकल्याणासाठी एक आशा नावाचं समुपदेशन केंद्र उघडलं होतं.ती अशाच मुलींना मार्गदर्शन करीत असे.कधी कधी ज्या मुली तरुण होत्या, नव्हे तर नुकत्याच वयात आलेल्या मुलीने प्रेम करून आपलं अस्तित्व समाप्त करू नये,म्हणून ती त्यांना समजवीत होती. तसेच ज्या महिला विवाह झाल्यावर विवाहबाह्य संबंध ठेवीत.त्यांना केंद्र मार्फत मार्गदर्शन करू लागली होती. गावात वाचनालय उघडलं होतं. तेही आज विद्यार्थ्यांसाठी मदत केंद्र मार्गदर्शन केंद्र ठरलं होतं.
पोलीस महासंचालक म्हणून रुजू झालेली विजया......आज तिला मिळणार्‍या वेतनातून जो ही पैसा वाचत होता.त्या वेतनाच्या भरवशावर तिनं आशा फाउंडेशन नावानं ती गोर गरीब अनाथ महिलांसाठी समुपदेशन केंद्र उघडत होती. त्या डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांनी शिकावे म्हणून त्या डोंगराळ भागात शिक्षणाच्या सोयी करीत होती. कारण शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध आहे तिला समजलं होतं.
डोंगराच्या कपारीत राहणारी आदिवासी जनता. त्यांना शिक्षण नसल्याने त्यांची कोणीही फसवणूक करीत असत.अख्ख्या सरपंच, ग्रामसेवकापासून पुढे मतदानासाठी मत मागणा-या नेत्यापर्यंत सारेच त्यांना फसवीत होते.आश्वासन देवून मत मागत होते.पण ह्या लोकांसाठी काही करण्याची ताकद त्यांच्यात अजूनही नव्हती.अजूनही त्या भागात शिक्षणाच्या सोयी नव्हत्या.नव्हे तर रस्तेही बांधलेले नव्हते.दरडी कोसळत होत्या.ज्या सोयी तिच्या आवाक्यात होत्या.त्या ती करीत होती.ज्या तिच्या आवाक्याबाहेर होत्या, त्या सोयी करण्यासाठी ती पत्रव्यवहार करीत होती. याच पत्रव्यवहारातून काही ठिकाणी पुरेशा सोयी होत होत्या.
जयेशशी व्हाट्सअपवर बोलत असलेली विजया......तिची दर्शाई झालेली मैत्री...... तिला काही बाबतीत बोलताना फायदा होत होता. तर कधी सल्लामसलत करण्यासाठी तिला तो मदत करीत होता. जयेश जास्त शिकलेला जरी नसला तरी त्याला भरपूर ज्ञान होतं.त्या खगोलिय घटना आणि हवेच्या दाबाची लत्याला चांगली माहिती होती.
विजया महासंचालकपदी पोहोचली असली तरी तिला गर्व नव्हता. ती जयेशला विसरली नव्हती.तर ती आजही त्याचशीे फोनवर बोलत होतीे. त्याला तिने केलेल्या सगळ्या गोष्टी सांगत होती.तोही तिचे अभिनंदन करीत असायचा.
माळीण गावाला गतवैभव प्राप्त झालं होतं. थोड्याच दिवसात माळीण प्रगत झालेले असून जगाच्या नकाशावर झळकत होतं.तेथील गावकऱ्यांचे प्रश्न मिटलेले होते.वीज, पाणी,शिक्षण या सर्व गोष्टी झाल्या होत्या. नव्हे तर गावही सुरक्षित ठिकाणी निवास करीत होती.त्या गावात आता पाऊस येत होता.अतिवृष्टीसारखाच.पण आता त्यांना दरड कोसळण्याचीे भीती नव्हती. ना पुराचा धोका होता. ना वादळ येणार होतं. ना भूकंप....... माळीणला आलेलं नवीन रूप नवीन जरी आलेलं असलं तरी आज येथील लोकांच्या मनात ते मलब्यातील व्रण अजूनही घर करून होते.
माळीणचा प्रश्न मिटला होता.पण गोसेखुर्दचा प्रश्न अजूनही शिल्लक होता. दरवर्षी वैनगंगेला पूर यायचा.दरवर्षी वैनगंगेचं पाणी परिसरात शिरायचं व त्या पाण्यानं आजूबाजूच्या शेतीचं भयानक नुकसान व्हायचं.कधीकधी हेच धरणाचे पाणी कालव्यातून वाहत जाऊन शेतात जायचे.तेही दुरच्या शेतात.ज्या शेतात पीक असायचं.ते पुर्ण करपायचं.मग धान असो की अजून काही.त्यातच सरकारने प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एकाला प्रकल्प अंतर्गत नोकरी द्यावी असं लोकांचं म्हणणं होतं.पण सरकारनं सर्व सांगितलं होतं ते कोणाला नोकरी देणार नाही.
गोसेखुर्द प्रकल्प बनलेला होता.तसेच त्या पाण्याचा उपयोग दूरदूरच्या लोकांना होणार होता.परंतू ज्या भागात प्रकल्प बनला.त्या भागातील लोकांना पाण्याचे उपयोग होत नव्हता.त्या लोकांनी या प्रकल्पाला जागा दिली होती.त्या लोकांच्या जमीन आजूबाजूच्या गावात होत्या. त्यांनाही त्याचा फायदा होत नव्हता. कारण बऱ्याच ठिकाणी उपसा सिंचन प्रकल्प सुरू झालेला नव्हता.
जयेशचं पुनर्वसन तर झालं होतं.पण त्याला आजही एक खंत लवाटत होती ती त्या प्रकल्पाची. ज्या लोकांच्या जमिनी गेल्या होत्या.त्या मंडळींपैकी काही जणांनी पैसे भेटूनही गाव सोडली नसल्याने प्रकल्प सुरु कसा करायचा याची चिंता सरकारला होती.ज्यावेळी 32 दरवाजाचं धरण बांधून पूर्ण झालं, त्याचं पाणी अडविल्यानं बहुतःश प्रकल्पाजवळचे गावं व शेतजमिनी पाण्यात बुडाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी आपापल्या जागा खाली केल्या होत्या.
पुनर्वसन क्षेत्रातील लोकांना खाली करताना सरकारला नाकीनऊ येत होतं.त्यातच लोक घरातील एकाला नोकरी मागत होते परंतू त्यावेळी सरकारने आपल्या उपक्रमास सरसकट पैसा दिला होता. नोकरीचं प्रावधान ठेवलं नव्हतं.शिवाय नोकरीचा विचार करून एकाला नोकरी दिल्यास बाकी कुटुंबातील सर्व जणांवर अन्याय होणार होता.लोकं मी वेगळा राहतो. मी कसा पोट भरू.असे म्हणून नोकरीसाठी अर्ज करणार होते.हा संभाव्य धोका लक्षात घेऊन सरकार पुढे प्रश्न होता. कारण यापूर्वी काही काही पुनर्वसनात लोकांनी तशीच मागणी केली होती.
पैसा हा रेशन कार्डवर मिळणार असल्याने वेगवेगळ्या सदस्यांनी आपल्या नावाची वेगळी वेगळी रेशन कार्ड बनवली होती.त्यांनी पैसा उचलला होता. त्यातच पुनर्वसित भागात जागा मिळाली होती. पण लोकांनी मिळालेला पैसा स्वतः वापरून कोणी दारू पाण्यात खर्च करून टाकला होता. लोकांना पैसाही मिळाला असला तरीही लोकांनी आपल्या हक्काची जागा व पैसा खर्च करून टाकला होता. सरकार ती जागा सोडा असे सांगत होते. प्रकल्प सुरू करायचा आहे असेही सांगत होते. तरी ती जागा सोडायला लोकं तयार नव्हते.आता तर वाढीव दराने आपला पैसा खर्च केल्यानंतर हे लोक पैसा मागताच सरकारपुढे पेच निर्माण झाला. सरकारने लोकांच्या नुकसान होऊ नये,लोकं पाण्यात बुडून मरू नये, म्हणून वारंवार लोकांना सुचना दिल्या. त्यांना पुन्हा व्यवस्थित जागा दिली. घर बांधायला पैसाही दिला. परंतू तरीही लोकांनी जागा खाली केली नसल्याने सरकारपुढे पेच निर्माण झाला. त्यामुळे सरकारला प्रकल्प सुरू करता येत नव्हता.
शेवटी सरकारनं न राहवून गोसेखुर्दचं पाणी अडवलं.त्यात बरीच गावं पाण्याखाली बुडाली. लोकांच्या नाकात तोंडात पाणी शिरले. त्यामुळे नाईलाजाने लोकांनी आपलं गाव खाली केलं.
जयेशचा भाऊ मात्र आपल्या पुनर्वसन प्रमाण पत्राच्या आधारे नोकरीवर लागला नाही. तर तो स्वतःच्या आत्मनिर्भरतेनं नोकरीला लागला होता.
माळीण सर्व गोष्टीनं सुशोभित झालं होतं. सरकारनं वाचनालय,बाग-बगीचे व सर्व सुविधा माळीणमध्ये निर्माण केल्या होत्या. तसेच विजयाचे संपूर्ण स्वप्न साकार झालं होतं.नोकरी, गाडी, बंगला सारं काही विजयाला मिळालं होतं. पण जयेशचं मात्र पुनर्वसन होवूनही तो अजूनही अनेक सर्व गोष्टींपासून वंचित होता. त्यानं पुनर्वसन स्थळी लहानसं घर बांधलं होतं व काही पैसा त्यांना पुढील जीवनासाठी गाठीला ठेवला होता.
भाऊ आपल्या संसारात रममाण झाला होता. त्यानं लग्न केलं होतं. मुलंही झाली होती त्याला. पण जयेशचा विवाह झाला नव्हता.तो मात्र आजही परिस्थिती सोबत झुंज देत होता.
गोसीखुर्द प्रकल्प विदर्भासाठी फार मोठा प्रकल्प होता. या प्रकल्पात भंडारा,नागपूर आणि चंद्रपूर ची जागा गेली असली तरी या प्रकल्पाच्या उपयोग अखंड महाराष्ट्राला होऊ शकत होता. तसेच चंद्रपुरात दगडी कोळशावर वीज बनत असली तरी ती वीज विदर्भाला स्वस्त नव्हती.वीज अख्ख्या महाराष्ट्रात जात होती. बदल्यात विदर्भा काही मिळत नव्हती.विदर्भाची जी शेती होती. ती एका पाण्यानं जात होती. पावसाळ्यात विदर्भात पडणारा पाऊस. पावसात खरीप हंगामात फक्त धान व तत्सम पिके व्हायची.रब्बी हंगामातील पीक होत नव्हती.कारण होतं तो म्हणजे पाऊस. चालू हंगामात पाऊस पडत नव्हता.तसेच तलावातील पाणी सुकून जायचे.त्यामुळे पिकांना पाणी न मिळाल्याने तसेच पेरणीच्या वेळी पाणी न मिळाल्यानं हंगाम पूर्ण कोरडा जात होता व हा प्रकल्पामध्ये विदर्भातील शेतकऱ्यांसाठी वरदान होता.कारण या प्रकल्पात पाणी जिथे अडलं होतं. त्या ठिकाणी पाणी जास्त होतं.त्यामुळे त्यांना केवळ नागपूरच नाही तर भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्हा समृद्ध होणार होता.
नागपूरला पेंचचं धरण होतं. पेंच नदीचे पाणी रब्बीला मिळत नव्हते. कारण त्याच्यामध्ये तेवढे पाणी नव्हते. पण वैनगंगेला पाणी भरपूर होतं.या नदीला पाच नद्यांचा संगम आंभोरा इथे झाला होता.
जयेशला वाटत होतं की वर्धा प्रकल्प विदर्भातील शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. या ठिकाणी जल विद्युत प्रकल्प उभारल्यास व ती वीज या भागात पुरवल्यास लोकांना मोठ्या प्रमाणात वीज पुरवठा करता येईल. त्यावेळी त्यांना वाटले की विजेचे दर कमी करता येतील.त्या प्रकल्पाच्या जवळ एखादी बाग सरकार निर्माण करावी. तसेच या प्रकल्पाजवळ एखादं सुंदर अभयारण्य उभारावं.जेणेकरून या भागात विदेशी पर्यटक येऊन येथील पर्यावरणाचा आनंद घेतील, नव्हे तर या अभयारण्यात तिकीट ठेवल्यास मुबलक प्रमाणात पैसा कमावता येईल.येथे आजूबाजूच्या भागात कारखाने काढले तर बऱ्याच ठिकाणी लोकांना रोजगार मिळवून देता येईल.तसेच विदर्भातील बेरोजगारी नष्ट करता येईल. येथील पर्यावरणाचा विकास केल्याने विदर्भात तर समृद्ध होईलच. त्याच बरोबर राज्या व देशाला समृद्ध करता येईल.
शेतीला पाणीपुरवठा करता करता मत्सशेतीहीया भागात करता येऊ शकते. झिंगे पालन,मत्स्यपालन मोठ्या प्रमाणात करता आल्यानं विदर्भाचं उत्पादन वाढवता येईल.त्याचबरोबर सरकारने वनाचा विकास करून विस्तार करावा. जेणेकरून या भागातील लोकांना गाय-म्हैस,बकर्‍या मेंढ्या आधी प्राणी पाळता येतील. महत्त्वाचे म्हणजे लोकांना प्रकल्पांतर्गत पोट भरता येईल. विदर्भाला कोणत्याच गोष्टीची कमी होणार नाही.
जयेशचं म्हणणं बरोबर होतं.कारण विदर्भ समृद्ध होता. या भागात उमरेडला कोळशाच्या खाणी होत्या. येथे सापडणारा कोळसा विदेशात व देशातील वेगवेगळ्या भागात जात होता. चंद्रपूर,खापरखेडा, कोराडी येथे निर्माण होणारी औष्णीक वीज ही राज्यात सर्वदूर जात होती. जयेशला विचार यायचा की यात विदर्भात निर्माण होणारी वीज राज्याच्या विविध भागात वापरली जाते. तर हीच वीज या भागातील लोकांना मोठ्या प्रमाणात मिळाली असती तर साहजिकच कमी दर विदर्भाला मिळाले असते. शिवाय विजेचे दर कमी असते. या ठिकाणी जल विद्युत केंद्र बनली असती तर विदर्भ विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला असता. संपन्न झाला असता.


विदर्भ तसा संपन्न होता.येथेे असणा-या भंडारा जिल्ह्यात भरपूर वने होती.या वनात साग मोह,आवळा,आंबा, कळंब,कडूनिंब,सालई,बाभूळ इत्यादी झाडं होती. भारतातील वनक्षेत्र पैकी महाराष्ट्रात हे प्रमाण ८० टक्के होते. तसेच ही वनक्षेत्र नागपूर भागात जास्त होती.तसे पाहिल्यास सर्वात जास्त जंगल असणारा प्रदेश म्हणून गडचिरोली जिल्हा प्रसिद्ध होता. या ठिकाणी पानझडी वृक्ष भरपूर होते. दरवर्षी येथे शिशिर ऋतूत झाडांची पानं गळत तर वसंतात नवी पालवी फुटत असे. दरवर्षी वेगवेगळ्या भागातील पशुपक्षी या भागात स्थलांतर करायचे व पशुपक्षी या वनातील झाडांची फळे खाऊन तृप्त व्हायचे.येथील जंगलात मिळणार्‍या सागाच्या लाकडाला देश-विदेशात मागणी होती. येथील शेती समृद्ध झाली असली तरी या वनावर जगणारी माणसे या भागात भरपूर होती.येथील जंगलात उपजीविका करणारी मंडळी जंगलातून तेंदूची पाने आणून त्यापासून विड्या बनवीत. तसेच येथील वनात मिळणारे मोह आणून त्यापासून काही ठिकाणी घरोघरी मोहाची मदिरा काढण्यात येत असे.काही ठिकाणी मोहाची राब बनवीत असत.तर काही ठिकाणी मोहपु-या.येथील वनात मिळणारे चारं बोरं खूप चविष्ट असून त्याला चांगली मागणी होती. काही ठिकाणी सदाहरित जंगल असून त्या भागातील हवामान उन्हाळ्यात थंड असायचं. येथे मिळणारा पांजराच्या लाकडापासून चांगल्या प्रकारची बँट तयार केली जात असे. वर्धा, वैनगंगा या नद्या या भागासाठी वरदान होत्या. या ठिकाणी ८० ते १२० सेंटीमीटर पाऊस वर्षभरात पडत असे.त्यामुळे या ठिकाणी शुष्क पानगळी वृक्ष जास्त प्रमाणात होती. ही झाडं साधारणतत: उंच असायची.या भागात जी झाडं होती, इथे खैराचे झाड सुद्धा होते.या खैराच्या झाडापासून कात बनवला जात असे.तसेच वनात सापडणा-या डिंकापासून शक्तिवर्धक औषधी बनवल्या जाई. तेवढीच झाडं या भागात नव्हतीे तर,अशाणा, बेहडा, चेरा,पळस बारतोंडी,धामण,निंब धामण, टेंभुर्णी ही देखील या भागात होती. काही लाकडाचा उपयोग इमारती लाकूड म्हणून जरी होत असला तरी काही लाकडाचा उपयोग जळावू लाकूड म्हणून होता.
विदर्भामध्ये ११ जिल्हे होते. मुल्यवाान मँगनीजच्या खाणी नागपूर जिल्ह्यात आहे मनसर इथे आहेत. इथे असणाऱ्या वनातून जसा लाकूड मिळतो.तसेच येथे होणाऱ्या प्रमुख पिकांपैकी उत्तम दर्जाच्या कापूस, उत्तम प्रकारचा तांदूळ.हे प्रमुख उत्पादन व प्रसिद्ध बासमती तांदूळ या भागातीलच.
चंद्रपूरला असणारे सिमेंट कारखाने महाराष्ट्रातील सिमेंटच्या दर्जापैकी उत्तम दर्जा ठेवत असतात. सर्वात जास्त महाराष्ट्र पैकी सिमेंट कारखाने एकट्या चंद्रपूरला जास्त आहेत.
महत्त्वाचे म्हणजे विदर्भ प्रांत समृद्ध प्रांत होता. त्यातच रब्बीची पिकं जातात म्हणून उभा करण्यात येणारा गोसीखुर्द प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी नव्हे तर येथे राहणा-या संपूर्ण जनतेसाठी आत्मनिर्भर करणारा प्रकल्प होता.

विजया पोलीस महासंचालक बनून लोकांची सेवा करत होती. ती जयेशला आवडत होती. त्याला प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं तिनं.पण प्रत्यक्षात पाहायची तिची इच्छा होती.त्यांच्याच मार्गदर्शनातून विजयाची कारकीर्द घडली होती.
जयेश मात्र एवढा शिकलेला नव्हता. व्हाट्सअप वर बोलताना तिनं व्हिडिओ कॉल करून त्याला पाहिलं होतं. पण आता त्याला प्रत्यक्षात भेटण्याची इच्छा होत होती. त्यानं कमी शिकलेला असूनही केलेली मदत........शिक्षण सोडलेल्या विजयाला अजून शिक्षण घेण्याची प्रेरणा त्यानंच दिली होती.त्यामुळे ती शिकली होती.नव्हे तर पोलीस महासंचालक बनली होती. तसेच की बहुतेक समाजातील बहुतेक निराधारांची धात्री बनली होती.पण ती लोकांची धात्री बनली असली तरी याचे सर्व श्रेय की त्याला देत होती.
विजया आपल्या बाळाला भरपूर विसरली होती.तेही जयेशच्याच प्रयत्नाने तिच्याशी बोलताना तिला वेळोवेळी सांत्वन द्यायचा व तिला येणारी बाळाची आठवण विसरवायचा. त्यामुळे ती आज एवढी पुढे आली होती.
दोघांचे संभाषण होत असे.त्या संभाषणात शारीरिक ओढीच्या दुराव्याच्याच गोष्टी होत होत्या. त्यामुळे शारीरिक आणि विवाह बद्दलचं आकर्षण कमी झालेलं होतं.जयेशचा पुनर्वसनासोबत विवाह झालेला असल्यासारखा पुनर्रचना सोबत लढताना लढतानाच त्याला विवाहाची आठवण आली नाही.त्याला वाटायचे की त्याच्या मोठ्या भावाचा विवाह होईपर्यंत मदत म्हणून पैसा यायचा.परंतू आपल्या भावाच्या पत्नीचे आगमण होताच तो पैसा येणे बंद झाले होते. त्यालाही वाटत होते की त्यांच्या मोठ्या भावाची आपल्या वडीलाची सेवा करायची इच्छा असूनही तो केवळ पत्नीमुळे की सेवा करू शकला नाही. त्यामुळे पत्नी,मुलगा विवाह करण्यासाठी तो तयार नव्हता. जर आपला विवाह केला तर आपलं मन पती-पत्नी गुरफटेल व आपल्या आईची सेवा होणार नाही.जर पत्नी चांगली मिळाली तर ठीक, नाहीतर आपल्या हातून आपल्या आईची सेवा होणार नाही.असे त्याला वाटत असल्याने त्यानं आपला विवाह केला नव्हता.
जयेशला आई फार आवडत होती.आईवर त्याने निरतिशय प्रेम केले होते.त्याची आई आज म्हातारी झाली होती.आई त्याचा एकमेव आधार होती.त्याचा बाप मेल्यानंतर आईनंच तर त्याला आधार दिला होता. आईनं बापाची आठवण येऊ दिली नव्हती.
ज्याप्रमाणे जयाची .आई म्हातारी झाली होती. त्याचप्रमाणे राम्याही. अाता विजया ख-या अर्थाने त्याची सेवा करीत होती.त्याला जपत होती. कारण त्यानेच विजयाला जपलं होतं.तिच्या सुख-दुःखात सहभागी झाला होता.अशातच तो मरण पावला होता.तिचा आधार गेला. तसं तिला आता करमेनासं झालं.
विजया आता एकाकी झाली होती. राम्याची पत्नी म्हणजेच विजयाची आईही पुर्वीच मरण पावली होती. आता राम्याही गेला होता. त्यातून तिला एकाकी वाटत होतं. तिला करमत नव्हतं.काही करायला सुचत नव्हतं.अशातच तिची बदली त्या भागात झाली होती.ज्या भागात जयेश राहात होता.
विजयाची बदली झाले खरी. पण आता तिला जयेशची आठवण ताजी झाली आणि तशी ती एक दिवस त्याला भेटायला आली.तशी ती भेटायला आल्यावर जयेशनं बोलली तिची ओळख आईला करून दिली.त्याच बरोबर आईने तिला आत घेतलं. तसं बोलणं सुरू झालं.
" जयेश, कसा अाहे तू?"
"अगदी छान आहे."
" तुझी मुलं?"
तसा तो गप्प होता. कारण त्याचं अजून लग्नच झालं नव्हतं. पण तिला वाटत होतं की त्याचं लग्न झालेलं असून त्याला दोन चार मुले असावीत. तशी ती परत बोलली,
"तुझी मुलं कुठे आहेत?"
"त्याचं लग्न झालं नाय." आई मधातच बोलली.तशी ती गप्प झाली. त्यानंतर बऱ्याच चर्चा झाल्यानं ती म्हणाली,
"येते हं जयेश."
"रावून जा. राहून जा." आई म्हणाली.
"नगं,मग राहिल केव्हातरी."
"बरं!" आईनं म्हटलं.तशी ती रवाना झाली.
विजया गेली खरी.पण आज तिला तो जयेशचा चेहरा आठवत होता आणि त्यालाही विजयाचा चेहरा आठवत होता.कालची व्हाट्सअप वर भेटणारी विजया प्रत्यक्ष भेटल्यानंतर तिचा चेहरा त्याला विवाह करण्यासाठी खुणावत होता. पण तिला वाटत होतं की तो आधी बोलेल. पण कसं बोलायचं म्हणून ती गप्प होती. नव्हे तर आपल्या मनातील इच्छा तिने आपल्या मनातल्या मनात दफन केल्या होत्या.
दोघंही एकमेकाशी बोलत होते. कधी कधी विजया त्याला भेटायला येत असे. तर कधी जयेश तिला भेटायला जात होता. आपसात एकमेकांशी ते बोलत होते. ते कधी प्रेमाच्या गोष्टी करीत होते. आता तिला बाळाची आठवण येत नव्हती.कधी कधी तर ते गोसीखुर्दच्या भागात फिरायल जात होते. कधी कधी रिमझिम पाऊस यायचा.तसा तो शरीरावरुन ओथंबून जायचा. तेव्हा पावसाचे तुषार अंगावर रोमांच उभे राहात होते. त्याच बरोबर आनंदही वाटत होता.
गोसेखुर्दचं रुप पालटलं होतं. जयेशनं केलेल्या विचारानुसार गोसीखुर्द प्रकल्प सुरू झाला होता.त्यावर दोन जलविद्युत केंद्र सुरू झाले होते.त्यामुळे विदर्भवासीयांना वीज मुबलक प्रमाणात मिळणे सुरु झाले होते. तसेच वीज स्वस्तही मिळत होती.डाव्या आणि उजव्या कालव्यातून तसेच या भागात असलेल्या पाच सिंचन योजनेतून लोकांना पिण्याचे पाणी तसेच शेतीला पाणी मिळत होते. अशाच मोठ्या शहरातून येणाऱ्या नद्या स्वच्छ केल्या होत्या.तरीही कारखान्यातून निघणारे सांडपाणी नदीत मिसळत होतं.त्या पाण्यावर नवीन प्रकल्प सरकारने सुरू करून ते पाणी उपयोगात आणलं होतं.
गोसीखुर्द प्रकल्पाच्या पाण्यानं त्या भागातील शेती समृद्ध बनली होती. ज्या भागात फक्त खरीप हंगामाची पिके व्हायची.त्या भागात आता रब्बीचा हंगाम सुरू झाला होता.तसेच या भागात सरकारने उद्योगासाठीही जागा दिल्यानं कारखाने उभे राहिले होते. या कारखान्यात आजूबाजूची प्रकल्पग्रस्त मुलं कामावर लागली होती. नव्हे तर त्यांचे पोट भरीत होती.
ज्याप्रमाणे या भागात कारखाने उभारले गेले होते. त्याच बरोबर या भागात अभयारण्य निर्माण केले होते.या अभयारण्यात स्थानिक भागातील वेगवेगळे पक्षी व प्राणी होते.हे पक्षी व प्राणी पाहायला विदेशातील पर्यटक येत होते. तसेच त्या ठिकाणच्या सौंदर्य पाहून तृप्त होत होते. त्यातून आलेला पैसा हा या अभयारण्याचा विकास करण्यासाठी वापरला जात होता.तसाच काही पैसा कराच्या रूपात सरकारला जात होता.
अभयारण्या सोबतच या भागात मोठ्या प्रमाणात पशुपालन व दुग्ध व्यवसाय सुरू झाला होता. लोक पशुपालन आनंदानं करीत.कारण या भागात सरकारनं वन विकसित केलं होतं.त्यामुळे जनावरांना चरायला भरपूर जागा होती.त्याच लोकांनी मत्स्य व्यवसाय सुरू केला होता. पण हे जरी खरं असलं तरी पशुपालन व दुग्ध व्यवसायाला तसेच मत्स्य व्यवसायाला सरकारी यंत्रणा परवानगीचे पत्र बनवायला लावत होती.परवानगी पत्र सामान्य माणूस बनवू शकत नसल्याने तो दुःखी होता. ती यंत्रणा परवानगीचे पत्र बनवायला लावत होती. ते परवानगी पत्र सामान्य माणूस बनवू शकत नसल्याने तो दुःखी होता. तो आपल्या घरातच लहान स्वरूपात पशुपालन व दुग्ध व्यवसाय करीत होता.गोसीखुर्दमध्ये लोकांची जागा गेली खरी.पण पुनर्वसित भागात त्या बदल्यात लोकांना भरपूर जागा मिळाल्यान पुनर्वसित झालेली मंडळीही आपल्या जागेत पशुपालन व दुग्ध व्यवसाय करीत होती. काहींनी रोपवाटिका तयार केल्या होत्या. तर काहींनी वेगवेगळे उद्योग थाटले होते.लोक आत्मनिर्भर झाले होते.काहींनी मंगल कार्यालय बांधले होते. गोसीखुर्दच्या प्रकल्पानं काही लोक नक्कीच आत्मनिर्भर झाले असले तरी काही लोक अजूनही दुःखी होते.
जे लोक दुःखी होते.त्यांच्या दुःखाचे कारण होते त्यांची पूर्वीची जागा.ज्या जागेत त्यांच्या पुरखानी कित्येक पिढ्या काढल्या होत्या. ते पुनर्वसीत झाले असले तरी अजूनही त्या भागातील आपल्या जागेवर जात होते. त्या जागेला नमन करीत होते,नव्हे तर काही जण त्या भागात मत्सशेतीही करीत होते.कारण शेती ही नदीच्या पाण्याने होत नव्हती.तिथे दलदल निर्माण झाली होती.
जयेशनं विचार केल्यानंतर गोसीखुर्द नवं रुप घेवून आलं होतं.हा प्रकल्प नक्कीच विदर्भासाठी योगदान ठरला होता. तेथे असणाऱ्या प्रत्येक माणूस संपन्न बनला होता. पण अजूनही काही लोकांचे प्रश्न शिल्लक होते.ते प्रश्न मिटवण्यासाठी ही मंडळी अजूनही न्यायालयात भांडत होते.आपल्या पुर्वजांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी. त्यांना गोसीखुर्द नको होता. परिवर्तनही नको होतं. तसे त्या लोकांच्या मतासाठी काही नेतेमंडळी ही हवा भरून राजकारण करीत होते.आपल्या सुखासाठी ते आपल्या स्वतःचा जीव द्यायला तयार होते, नव्हे तर त्या भागात घर असतानाही राहात होते वा पुनर्वसित क्षेत्रातून जाणे-येणे करीत होते. तेथे जीव धोक्यात घालून.......
ज्याप्रमाणे राम्या मरण पावला होता. त्याचप्रमाणे जयेशची आईही मरण पावली होती.आता जयेशही विजयासारखा एकाकी झाला होता.
जयेश एकाकी झाला खरा, पण आता त्याला घरी करमत नव्हतं. घरी पशुधन सारं काही होतं.त्यांची काम करता करता त्याचा दिवस जात होता.पण रात्र मोठी जड जात होती.आपल्यालाही समजून घेणारी जीवनसंगीनी असावी असे त्याला वाटत होते.पण आता त्याला मुलगी कोण देणार! कारण वय झालं होतं.आईची सेवा करता करता त्याचं वय निघून गेलं होतं. तसे पाहता आई असताना त्याला विवाहाची चिंता विवाहाची चिंताच वाटली नव्हती.पण आता एकाकी ज्यामुळे त्याला आता जीवंसंगिनी ची गरज वाटत होती.कधी कधी तो विजय बोलून घेत असे पण किती बोलणार काय बोलणार,त्याला प्रश्न पडत असे अशातच त्याला आईची आठवण यायची.
आई ही मृत झाली होती. तशी विजया एकाकी झाली होती. तिला करमत नव्हतं.तसेच ती आज म्हातारी झाली होती. तिचा ही दिवस चांगला जायचा नाही.पण रात्रीचा काळ.तिलाही रात्र काढणं कठीण जायचं.त्यातच जीव गमविण्यासाठी त्यांच्याशी ती बोलायची. आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी शेअर करायची. तशी ती आता विदर्भातच राहत होती.माळीण आणि पुण्याचा भाग केव्हाच सुटला होता. तसं पाहिलं तर माळीण सुसंपन्न झाल्यानं व त्या माळीणला गतवैभव प्राप्त झाल्यानं माळीणला काहीच प्रश्न उरले नव्हते. सर्व लोकांना काम मिळालं होतं. तसेच आजूबाजूच्या परिसरात कारखाने उघडल्याने बेरोजगारी संपली होती. त्या डोंगरात काट्याकुट्यात जाणे त्या जंगली श्वापदाचे पोटाचे अन्न बनणे ह्या गोष्टी आता कमी झाल्या होत्या. पण आजही त्या माळीण चा थळगा शिल्लक होता.आपल्या मलब्यातील आठवणी जागवीत.........
विजयाला वाटत होते की रात्रीचा प्रहर तिला कठीण जातेय.कोणीतरी जीवनसाथी असावा असा म्हातारपणाच्या सोबतीला. पण तिची विवाहाची इच्छाच नव्हती.हेच वाटत होतं.पण जयेशची विवाह करण्याची इच्छा होती.याचे कारणही तसंच होतं. त्याला लिव इन रिलेशनशिप मंजूर नव्हतं. कारण त्याला कोणाला धोका द्यायचा नव्हता.तसा विचार करून त्यांना विजयाला फोन लावला.
"हेैलो विजया."
" हेैलो जयेश. बोल कसा आहेस बरे?"
"बरा आहे."
"काही प्रॉब्लेम?"
" नाही.कोणते प्रॉब्लेम नाही.एक समस्या सतावतेय."
"कोणती?"
"पण तुझ्या पुढे सांगायला लाज वाटते."
" का रे.बोल बोल.मी मैत्रीण नाही का तुझी. तर निसंकोच बोल. आता जीवनातल्या या घडीला तू मला आपल्या दुःखात सहभागी नाही करशील तर कोणाला करशील.बोल."
"तू रागावणार तर नाही ना."
"नाही रागवणार. बोल."
" हे बघ, तू एकटीच राहते.मीही एकटाच. पण आता मला वाटते कीे आपण विवाह करावा.एकत्र राहावं. तुला मंजूर आहे का नाही?"
"नाही. जयेश हे तू का बोलत आहेस?"
"अगं तूच तर म्हटलं ना की रागावणार नाहीस म्हणून.म्हणून मी बोललो.सॉरी बर का."
"सॉरी कशाला म्हणतेस? माझी इच्छा आहेच. पण मला विवाहासारखं बंधन नको. आम्ही विवाह केलाच मागे. पण फसली. केसही टाकली त्याचेवर.पण हारले. माझा बाळ मला मिळालेला नाही.तो त्यालाच मिळाला. माझे चुकले. मी त्याला सोडून द्यायला नको होतं.पण एक सांग,या अर्ध्या वयात तुला हे विवाहाचं खूळ सुचलंच कसं?"
"अगं माझा दिवस बरा जातोय.पण रात्रभर झोप लागत नाही. चिंता सतावते आहे.आता हे म्हातारपण आलंय.या म्हातारपणात मला मुलगी तरी कोण देणार?म्हणून तुला विचारलं.पुन्हा विचारतो की तू माझ्याशी लग्न करशील?"
"नको रे जयेश.आता विवाहाचा मुद्दा नकोच. आपण असेच एकमेकांशी बोलत बोलत काढू आपलं म्हातारपण."
" बरं जाऊ दे. मला एक सांग. आपण व्हाट्सअपवर व फोनवर केव्हापर्यंत असं बोलत राहणार? नको करू विवाह,पण आपण एकत्र तर राहू शकतो.तसा प्रावधान नाही का कायद्यात?"
"आहे.तसं प्रावधान आहे.आपण लिव्ह इन रिलेशनशिप अंतर्गत राहू शकतो एकत्र. पण तू तयार आहेस का?"
" हो.मी तयार आहे." क्षणाचाही विलंब न लावता तो म्हणाला.
" पण मला तुझं बंधन नको.पण एक सांग तू विवाह का केला नाही?"
" बंधन घालायला मी काय तुझा नवरा राहणार का?"
" ठीक आहे, मी सांगते तसं."
जयेश विचार करीत होता. लिव्ह इन रिलेशनशिपचा .विवाह करून मुले पैदा करण्यापेक्षा लिव इन रिलेशनशिप अंतर्गत राहिलेलं बरं. असं त्याला वाटत होतं.तशी त्याला आई आठवली.तसा तो म्हणाला,
"आई माझं सर्वस्व होती. तिनं उन्हातून सावलीत नेलं. दूध पाजलं. शिकवलं.लहानाचा मोठा केलं.नव्हे तर आपल्या तोंडचा घासही दिला. ती मला उच्च शिक्षण घ्यायला नकार देत नव्हती.पण मी तरी काय करू? परिस्थितीत आड आली. त्यातच पुनर्वसन आणि माझ्या वडिलांच्या प्रकृतीने माझं शिक्षण गेलं. जर मी अशा आईमुळं विवाह न करता कुवारा राहिलो तरी त्याचा मला पश्चाताप नाही. माझ्या आईने मला मायेचा ओलावा दिला. पुनर्वसनाच्या काळात मी रडत होतो. पण माझ्या आईनं अश्रू पुसले.तिनं सांत्वन केलं माझं.वाईट गोष्टी करण्यापासून अडवलं.माझा भाऊ जेव्हा बेईमान निघाला,तेव्हा तिने माझे काहीएक ऐकले नाही. पण तिने मला ढळूही दिले नाही.जेव्हा माझे बाबा गेले, तेव्हाही मला तिनं आधार दिला. महत्वाचे सांगायचे म्हणजे माझी आई माझ्यासाठी रात्र रात्र राबली.
आपण मात्र स्वार्थी.आपण थोडेसे मोठे झालोच तर आपले विचार मावत नाही आपल्या मनात.मग याच विचारात कुविचारही येतात आपल्या मनात.मग आई कितीही चांगलं सांगत असली तरी तिचे विचार आपल्याला पटत नाही आणि त्याचबरोबर आपण तिच्या विचाराचा त्याग करतो.आपल्याला दुस-याचे विचार चांगले वाटतात.त्यातच ती मुलगी असेल तर मग विचारता सोय नाही.
विजया ती प्रेयसी आपल्याला हवीहवीशी वाटते.तिच्यासोबत जगावेसे वाटते.तिच्यासोबत आपल्याला राहावेसे वाटते.ती आपल्याला जीव की प्राण वाटते.ती जवळ राहावी असं वाटतं आणि अशातच ते प्रेम वाढत जावून आपण तिच्याशी विवाहबद्ध होतो.
नवीन आलेली मुलगी.आपण तिच्या इवल्याशा प्रेमावर फिदा झालेले.ती आपलं मन ओळखते.तिला तुमच्या घरी पाय रुतवायचे असतात.रुतबा निर्माण करावयाचा असतो.त्याचाच फायदा ती घेते.ती तुमच्या कानाशी लागते.तुमच्या विश्वासाला तडा जाईल याचा तिला विचार नसतो.त्यातच ती आपला विश्वासघात करते एक दिवस.जी आई.......ज्या आईनं एवढं जपलं.त्या आईला आपण त्या नवीन सुन म्हणून आलेल्या पोरीच्या हातचे बाहुले करीत असतो.ती आदेश देणारी अधिकारी असते आणि आपण तिचे नोकर.मातृप्रेम आपलं विफल होतं.आपण तिनं जे काही आपल्यासाठी केलं,ते सारंच विसरतो आणि या नव्या मुलीला प्रेम देतो.हवं तर तिच्या बोलण्यातून आपल्या आईची रवानगी वृध्दाश्रमात करतो.पण पत्नीला सोडू शकत नाही.
आज घरोघरी अशाच गोष्टी सुरु आहेत.आपण रामायण मोठ्या आवडीनं पाहतो.पण तसे वागण्याचा प्रयत्न करतो का? त्यातील काही काही गोष्टी खरंच शिकण्यासारख्या आहेत.पण आपण तसे वागण्याचा प्रयत्न करतो का? तर याचं उत्तर नाही असेच आहे.
ज्या रामायणात कैकेयी सावत्र आई जरी असली तरी रामानं तिनं दिलेला वनवास सहर्ष स्विकार केला व हसत हसत जंगलात गेला.किती मोठं मातृप्रेम आणि आपण साधं बोलणं तेही सख्ख्या आईचं सहन करु शकत नाही.त्यानं तर जनतेसाठी सीतेची अग्निपरीक्षा घेतली.आपण आपल्या सीतेसाठी आई सोडतो आणि स्वतः पोरके होवून जातो.
घरोघरी हाच पोरकेपणा आज कलीकाळात पाहायला मिळतो आहे.कोणीही शिकून मोठा अधिकारी झाला असेल,पण त्यानं जर आईला त्रास दिलाच तर त्याच्या जगण्याचा काहीच फायदा नाही.आई गुरु आहे,कल्पतरुही आहे.पण केव्हा?जेव्हा तिला आम्ही म्हातारपणात मानू.तिचा गौरव करु.तिला दुःख होणार नाही असे वागू.नव्हे तर आपल्या सुखाचा त्याग करुन आईच्या म्हणण्यानुसार म्हातारपणी वागू.आईला पोरके वाटणार नाही.अशीच आपली रहनसहन असेल.
आपली आई अनुभवी असते.उन्हाळे पावसाळे तिनं पाहिलेले असतात.म्हणून विवाह करतांनाही आईची पसंती असावी.काही काही महाभाग विवाह करतांना मायबापाची पसंती नसते.आईबापाला समजत नाही याचा विचार करीत ते विवाह करतात.मग फसतात एखाद्या चित्रपटातील कथानकासारखे.शेवटी काय होतं तर विनाश....भांडणं.......ताटातुट व घटस्फोट.हे जर टाळायचं असेल तर मायबाप सांगतात.तसंच वागावं विवाह करतांना.
पूर्वीही विवाह व्हायचे.मायबाप पोटाला कुंकू लावायचे.पण आता तसं तर नाही.आपल्यालाही मुलगी पसंत करण्याचा अधिकार आहे.पण खरंच आपली पसंती ही आपण रास्त तरी ठरवू शकतो का? ठरवीत असाल तर ठीक आहे.कारण आईला पोरकं वाटायला नको.जेव्हा तुम्ही तिला वृध्दाश्रमात टाकता ना.तेव्हा खरंच आईला जग पोरकं झाल्यासारखं वाटतं.तिला वाटतं की असली मुलं मला नसती झाली तर बरं झालं असतं.मी वांझ असते तर अगदी बरं झालं असतं.बेकार अशा मुलाला मी जन्म दिलाय आणि बेकारच असा बाळ जन्माला घातलाय. माझ्या भावाच्या बाबतीत हेच झालं.लग्न होईपर्यंत मला पैसे पाठवत होता तो.पण माझी वहिनी आली असताना त्यानं आपला पवित्रा बदलला. त्यानं पैसे पाठवणे बंद केलं.नव्हे तर पुर्ण संकटात आम्हाला सोडून तो आम्हाला विसरून गेला.
विजया, आजच्या जगात असे आहे की आपण कोणावर प्रेम जरी केलं तरी ती चांगली निघेलच असे नाही.वृद्धाश्रमात आईला जेव्हा टाकतो,तेव्हा तिला मुलगा, सून,नातवंडे दिसत नाही. आपल्याला वाटते की आईला सोडू नये.पण आपण आपल्या पत्नीलाही सोडू शकत नाही.पत्नी एकतर मी नाहीतर ती असं जेव्हा म्हणते,तेव्हा पुरुषांच्या पौरुषत्वाची हत्या होते.त्याला काय करावं व काय नको ते सुचत नाही.हे मला माहित असल्यामुळे मी आतापर्यंत माझ्या आईसाठी विवाह केलेला नाही.
विजया,मला मी विवाह न केल्याचा पश्चाताप नाहीच.विवाह केल्यानंतर माझीही गत माझ्या भावासारखीच झाली असती.माझी पत्नी जर माझ्या मतानं वागली नसती तर मी काय केलं असतं.शेवटी आईला सोडण्याशिवाय पर्याय नसता.मग माझी आई कुठे गेली असती?मी आईली सोडलं नाही.भरपूर सेवा केली.आता म्हातारपण आलंय. त्यात माझा काय दोष?पण विजया तुला विचारतोय की आता तू तुझा निर्णय लवकर सांग.कारण आता हे दिवसं काढणं कठीण झालंय."
"मलाही अगदी तसंच वाटते.जे मी शब्दात सांगू शकत नाही. लवकरच मी माझा निर्णय कळवेल. ठीक आहे.आता ऑफिसला वेळ होतो मला. मी फोन ठेवते.बाय."
तिनं फोन बंद केला होता.त्याच बरोबर त्यानं बोलणे बंद केलं होतं.
दोन-तीन दिवस झाले होते. विजयाचा फोन जयेशला काही आला नाही. विजयानही त्याच्या व्हाट्सअप वरचे मेसेज उचलले नाही. त्यामुळे परेशान झाला होता.तसा तिला तो फोन करीत होता. पण ती फोनपण उचलत नव्हती.त्यामुळे चिंता सतावत होती.तिला काय झालं असेल?का नाही? असं सारखं जयेशला वाटत होतं.तिची प्रकृती....... कदाचित आपल्या बोलण्याचा राग...... आपण असा तिला बोलायला नको होतं.असं त्याला वाटत होतं.तसा चौथ्या दिवशी तिचा फोन आला.
"हॅलो जयेश कुठे आहे?"
"जिथे होतो तिथेच आहे. का बरं?"
"आज मला सुट्टी आहे. आज सांजच्याला खाली आहेस का?"
"होय.मी खालीच असतो.मला काम नाही."
" फिरायला नेशील?"
" येणारच ना. का बरं?"
" तुला एक गिफ्ट द्यायचं आहे."
"कोणतं?"
"ते नंतर कळेल."
तसा तो गप्प झाला.
सायंकाळ झाली होती.तसा जयेश तयार झाला व तिची वाट पाहत बसला.त्याला तशी आता चिंता उरलेली नव्हती. कारण घरचं पशुधन त्यानं आई गेल्यानंतर विकून टाकलं होतं.कारण त्या पशुधनाचीे सेवा करणं आता त्याला जमत नव्हतं. पण पोटासाठी मात्र त्यानं घरीच रोपवाटिका बनवली होती.या रोपवाटिकेचं त्यानं प्रशिक्षण केलं होतं.परंतू आता आपल्या रोपवाटिकेत तो कलमा तयार करीत होता.त्या कलमांना आजुबाजूच्या गावातील शेतकरी काही पैसे देऊन विकत घेऊन जात असत.नव्हे तर पैसे देत असत.या कलमांच्या विक्रीतून जो पैसा यायचा.त्या पैशात त्याचा उदरनिर्वाह चालत असे.
थोड्याच वेळात सजून धजून विजया आली.तिनं स्वतःची गाडी त्याच्या घरासमोर उभी केली.तसा तिनं जयेशला आवाज लावला.
"जयेश कुठे आहे?ये बाहेर.गाडीत बस.चल फिरायला."
"विजया,पाणी वैगेरे......"
"नको बाटली आहे माझ्याकडे."
"बरं." तो म्हणाला. त्यानं घराला कुलूप लावलं आणि लाईट लावला होता. तो गाडीत बसला.तशी ती गाडी भरधाव वेगात निघाली.तसा तो म्हणाला,
" कुठे जातोय आपण?गोसेखुर्द तर तिकडे आहे आणि तुझी गाडी उलट दिशेने जात आहे.आपण गोसेखुर्द धरणात फिरायला चाललो की दुसरीकडं चाललो?"
" नाही.गोसीखुर्दला नाही. दुसरीकडे जात आहोत."
" पण कुठे?"
" तुला कळेलच. पण सध्या चूप बैस थोडावेळ." तसा तो गप्प राहिला.गाडी मात्र चालत होती त्या सिमेंट रस्त्याच्या भरधाव वाटेनं.पुढे मात्र डोंगर आलं.तशी गाडी त्या डोंगरावर चढत नव्हती. हे तिने पडताळलं. त्यावेळी त्या डोंगराच्या पायथ्याशी तिनं गाडी उभी केली.तसे ते उतरले.ते दोघे जण त्या डोंगराच्या पायर्‍या चढायला लागले. तसा तो म्हणाला,
"आपण कुठे चाललोय?"
" तू गप्प राहा.मी तुला सरप्राईज गिफ्ट देणार आहे." तसा तो परत गप्प राहिला. ते पूर्ण डोंगर चढून गेले होते. तोच त्या डोंगरावर असलेलं मंदिर दिसलं.तसा तो म्हणाला,
" तुला मंदिराचे दर्शन घ्यायचं होतं."
"आणि तुला सरप्राईज गिफ्ट द्यायचं होतं."
"कोणतं?"
"जरा धीर धर." तसे ते दत्त मंदिरात पोहोचले. तसे तिथं काही लोकही होते.त्याचबरोबर तो भटजी.लग्नाची तयारी करीत असल्याचे दिसले.ते म्हणाले,
"आली पोरी."
" हो."
"कुठे आहे मुलगा? कुठे आहे तो मुलगा?"
"हेच ते." तिनं डोक्यावर पदर घेतला.जयेशकडे एक कटाक्ष टाकला व परत म्हणाली,
" हाच मुलगा.माझा होणारा पती."
"बस पोरा या पाठावर."
जयेशच्या ते शब्द कानावर पडले.तसा तो आश्चर्यचकित झाला. त्यानं कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती की विजया विवाहाला होकार देईल.कारण ती विवाहाला नकारच देत होती.मग काय त्याला फार आनंद झाला होता. पण तरीही तो म्हणाला,
"विजया, हे काय?"
"आपला विवाह. का? तुला मी पत्नी म्हणून स्वीकार नाही का?मी तर तुझ्याशी लग्न करायला तयार झाली आहे.सर्व तयारी करून. हं, तुझा नकार असेल तर आत्ताच सांग."
"नाही. तसं नाही."
" मग विवाहाला तयार आहेस ना तू?"
"हो, मी तुझ्याशी विवाह करायला तयार आहे."
"आणि एक सांग. मी तुला पसंत आहे का?"
"हो, नक्कीच.तू मला पसंत आहेस."
"तर मग बस पाटावर."
तसा जयेश पाटावर बसला. तिहीे पाटावर बसली.तसेच भटजीनं मंत्र म्हटले व थोड्याच वेळात त्यांचा विवाह पार पडला.ते पती-पत्नी बनले.
विजयानं भटजीला दक्षिणा दिली. तशी ती त्या जयेशसमवेत ती डोंगर उतरू लागली. आज ते दोघे पती-पत्नी बनले होते.तसे सर्व संकटमय जीवन संपले होते.
आज तो सुखी होता. आपला भावापेक्षाही. कारण त्यानं आपल्या आईची व वडिलांची नित्य सेवा केल्यामुळे त्याला चांगलं जीवन पाहायला मिळालं होतं.
विजया व जयेश पत्नी बनले होते.आता ती खुश होती. कारण त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या होत्या. आता तसं पाहिल्यास त्या दोघांचे प्रश्न जरी वेगळे असले तरी त्यांनी भोगलेल्या यातना काही अंशी समान होत्या.
विजया आज त्याच्या घरी राहात होती. तशी तिची नोकरी याच भागात होती. कधीकधी ती माळीणला जात असे. तिथे असलेल्या वाचनालयाला भेट देत असे.नव्हे तर आशा फाउंडेशनमध्ये असलेल्या या लोकांमध्ये मिसळत असे.त्यात असलेल्या बाळांची चौकसी करीत असे.पैसाही देत असे.तसं पाहता आता जीवन जगत असताना आज तिला दुःख वाटत नव्हतं.तसं पाहिल्यास आता दुःख तरी कसे वाटणार.कारण आता तिच्या जवळ जयेश होता. ज्याच्या सोबत जगताना तिला हायसं वाटत होतं.
ते अर्ध्या वयाचे झाले होते. त्यांच्या त्या अर्ध्या वयामध्ये त्यांचा विवाह झाला होता,नव्हे तर विजयानं नकार दिल्यानंतरही विवाह केला होता.ते आता एकत्र राहत होते. तसा दोन्ही भागातील पुनर्वसनाचा प्रश्‍न मिटला होता.पण त्यांचा प्रश्‍न बाकी होता. विजयानं आज विवाह केला खरा. पण त्यांचाही एक प्रश्न होता. तो प्रश्न म्हणजे त्यांच्या विवाहाला पाच वर्षे झाली तरी त्यांना बाळ झालं नव्हतं.नव्हेतर होणारंही कसं? म्हणजे बाळ होण्याचा काळ गेल्यानंतर त्यांचा विवाह झाला होता.
अशातच विचार करीत विजया चिंतेत राहू लागली. ती चिंता पाहात एक दिवस जयेश तिला म्हणाला,
" विजया, कसली चिंता सतावतेय तुला? तुला मी दररोज पाहतो. कसल्यातरी चिंतेत असतेस. काय भानगड अाहे?"
"असते चिंता ऑफिसमधील.रिटायरमेंट जवळ आलं.तशी ती भविष्यातील चिंता सतावते."
" चिंता...... भविष्यातील कोणती चिंता सतावते तुला? अन् भविष्य का पाहायचं? आलेला दिवस गोड करायचा सोडून तुला चिंता वाटते.तिही भविष्यातील चिंता."
"नाही. कशाला करू भविष्यातील चिंता? उद्याचा दिवस कसा उजाडेल हे सांगणे कठीण. कोणता माणूस केव्हा मरेल हे काही सांगता येत नाही.हं एक आठवलं मला. सांग की तुला भविष्यातील कोणत्या चिंता सतावत आहेत?"
"आपल्याला मूलबाळ नाही ना.ती चिंता सतावते मला."
" मूलबाळ....... कशाला हवी मुले?"
"तुला मूलबाळ नाही पाहिजे का? का बरं नाही पाहिजे?"
"अगं मुलं प्रत्येकांना हवी. मला ही हवी.पण आपल्याला कसं होणार मूलबाळ?"
"म्हणजे?"
"आपला विवाहाला बराच उशीर झाला. आपला तारुण्याचा काळ गेला. ज्या काळात मुलं होऊ शकत होती. तो काळ आपण दुसऱ्याच्या सुखासाठी जगलो. तू त्या माळीणमध्ये लोकांचा अन्याय दूर करीत होती. त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाच्या सोयी करीत होती.अन् मी त्या गोसेखुर्दच्या शेतकरी तसेच अन्यायग्रस्त लोकांसाठी लढत होतो. जेव्हा आपले उद्योग यशस्वी झालेत.तेव्हा आपण विवाह केले.मग कसे होणार मूलबाळ? म्हणून तुला सांगतो हा मुलाबाळांचा प्रश्न सोडून सोडून दे."
"होय.मी हा प्रश्न सोडून देईल. चिंता सोडून देईल.पण म्हातारपणानं कोणाला सोडलं. तुला मला सर्वांना म्हातारपण आहे.तेव्हा या म्हातारपणात कोण पोसेल आपल्याला? ती चिंता सतावत आहे. अरे तुझे म्हणणे बरोबर असली तरी ही चिंता नाही का तुला?"
"अगं ही चिंता जरी केली तरी त्याचा उपयोग आहे का?आपण चिंता जरी केली तरी त्या चिंतेवर उपाय तरी आहे का आपल्याजवळ? नाही ना.मग कशाला चिंता करायची?"
"हं एक उपाय आहे माझ्या जवळ."
" कोणता उपाय? जरा मला तरी कळू दे."
"आपण एखादं बाळ दत्तक घेतलं तर."
"हं,हा उपाय बरोबर आहे.पण आपल्याला कोण देणार दत्तक मूल. दत्तक घ्यायचं असेल तर मोठा मुलगा घ्यावा लागेल.लहान घेतला तर त्याला लहानाचा मोठा करावा लागेल. त्याचे पालनपोषण करावे लागेल. तेवढा वेळ आहे का तुझ्याजवळ?"
" वेळ नसला तरी वेळ काढावा लागेल ना."
" हो, तुझं म्हणणं बरोबर आहे. पण.....
"पण काय आता?
"अगं तू आकर्षण जी समाजसेवा केली. अाशा फाउंडेशन निर्माण केलं.तेथील लेकराची जोपासना केली.त्यांचं काय होणार?जराही विचार केला का याचा? जर आपण आपली म्हातारपणाची सोय म्हणून लेकरू दत्तक घेतलं तर त्या बिचार्‍या.........त्या कुमारीमाता नव्हे तर ती आस लावून येणारे वाचनालयातील लेकरं....... ते अनाथालयातील ते बाळ.बिचारे पुन्हा अनाथ होतील."
"ते कसे अनाथ होतील?"
"अगं एकदा का आपल्या घरी बाळ आलं की लोभ निर्माण होईल आपल्याला बाळाबद्दल. आपण आपला पराया हे ओळखायला लागू.मग आपण जे काही जमवू.ते खर्च करण्याची आपली तयारी राहणार नाही. आपल्यात स्वार्थ येईल. आपण मग आपल्या बाळासाठी जमवण्याचा विचार करू. त्यानंतर जी मदत आपण अाशा च्या माध्यमातून समाजातील गोरगरीब मुलं,कुमारीमाता व अनाथांना करीत असतो.ती मदत आपण करू शकणार नाही."
" हंं, तुझं म्हणणं बरोबर आहे.पण एक सांगू विजया."
" बोला. काय सांगायचे ते?"
"अगं या गोरगरीब मुलांनाच लेकरु मान. त्यांनाच प्रेम दे. कुमारीमातांना प्रेम दे.त्यांच्या समस्या सोडव. तेच तुला म्हातारपणात पोसतील.तुझे म्हातारपणातील बाळ बनतील. नव्हे तर त्याच्यासोबत वावरतांना तुला कशाची चिंता नाही राहणार."
" हं, बरोबर आहे तुझं. मी याचा विचारच केला नव्हता. पण आता मी ठरवणार की मी आता कोणत्या मुलाला दत्तक घेणार नाही, तर समाजातील ह्याच मंडळींना मदत करेल.ज्या कुमारी मातां आहेत. त्यांच्यासाठी जगेन. त्यांना आपले समजेन.त्यांना मदत करून त्यांच्या आयुष्याच्या अंतिम श्वासापर्यंत त्यांनाच आपलं लेकरुही समजेन."
विजया आता नोकरीवरून रिटायर्ड झाली होती.तिला आता पेन्शन लागू झाली होती. पुष्कळ सारा पैसा तिला मिळालेला होता. तो पैसा तिने आपल्या म्हातारपण साठी बँकेत ठेवला होता.तसेच जयेशसोबत राहू लागली होती,तर कधी कधी ती माळीणला जात असे.ती तेथील वाचनालयाला भेट देत असे.तर कधी ज्या ज्या ठिकाणी आशा फाउंडेशन च्या समस्या असायच्या.त्या संस्थांना मार्गदर्शन करीत असे. त्याचप्रमाणे आपल्या पेन्शनमधून काही पैसा त्यांना याकामी देत असे.सर्वतोपरी मदत करीत असे.यात तिला आनंद वाटत होता.जयेशही या कामी तिला मदत करीत असे.तसे आता जास्तच ते म्हातारे होत चालले होते.
त्या थंडीचे गुलाबी दिवस सुरू होते.तसेच घरातही थंडी वाजत होती. सकाळ झाले होती.विजया उठली. जयेश मात्र झेलम उठायचा होता. आता तिला काय माहित होते की नियतीनं तिच्या सोबत डाव साधला आहे.तिला वाटलं की नेहमीप्रमाणे जयेश झोपलेला आहे.तशी कामे करता करता वेळ निघून गेला. तशी उठायची वेळ झालेली असूनही जयेश न उठल्यानं विजयानं आवाज दिला.
"जयेश,जयेश."
जयेशला आवाज दिला खरा.तरी जयेशच्या कम-यातून आवाज आला नाही.तसा तिला राग आला. तशी रागाच्या भरात ती आतमध्ये गेेली. पण त्या थंडीच्या दिवसात जास्त काम करून झोपला आहे अशी कल्पना करून तिनं त्याला पुन्हा आवाज दिला. पण तो उठलेला नसल्याने त्याच्या तोंडावरचं पांघरून काढलं. तर पाहतो काय तो झोपलेला नसून मृत झालेला होता. तिनं बराच आवाज देवून पाहिला. पण जयेशचं न उठल्यानं पुष्टी झाली होती.
जयेश मरण पावलेला होता.ती आता परत एकाकी झाली होती. पती केलाही,पण तो काय, जवळपास पंधरा ते वीस वर्ष पाहिजे तेवढं सुख मिळालेलं होतं.तसं तिला माहिती होताच ती हंबरडा फोडत रडायला लागली होती.
तिचं रडणं आजूबाजूला ऐकायला गेलं.त्याचबरोबर आजूबाजूची मंडळी तिथे आली.त्यांना जयेश अंथरुणावर मेलेल्या अवस्थेत दिसला होता. त्याच्याजवळ बसून विजया रडत असलेली दिसली.तसेच लोकांकडे ती भिरभिरत्या नजरेनं पाहात असलेली दिसली.
लोकांनी जयेश मरण पावलेला असल्याची खात्री करून त्याला अंथरुणावरुन खाली उतरवलं. त्यांनी विजयाकरवी फोननंबर घेवून गावच्या लोकांनी तिच्या नातेवाईकांना फोन लावला.सांजच्याला चार वाजे पर्यंत बहुतेक सर्व नातेवाईक जयेशच्या घरी गोळा झाले. त्यांनी शिडी बांधली.मोठ्या भावाच्या मुलांनी त्याला खांदा दिला. तसा भाऊ जिवंत असल्याने त्यानं आत्ता पकडली होती.तसा सुरेश स्मशानाच्या दिशेने चालू लागला.तसं स्मशानाच्या दिशेने चालता चालता तो भाऊ व त्यानं आपल्या जीवनात केलेला संघर्ष, त्यांच्या सर्व जुन्या आठवणी त्याला आठवत होत्या.शिवाय आज त्याला त्याचा स्वार्थ आठवत होता. नव्हे तर त्यानं भावाशी केलेली दगाबाजीही आठवत होती. त्याला पश्चाताप होत होता. पण आता पश्चाताप करण्यात काही उपयोग नव्हता.कारण ज्याच्यासाठी पश्चाताप करत होता.तो काही या जगात नव्हता. तसा तो स्मशानाजवळ आला.मोठा भाऊ.....त्यानं आपल्या भावाच्या चितेला अग्नी देऊन ती चिता अग्नीच्या स्वाधीन केली. तसा त्याला हुंदका भरून आला. त्याच हुंदक्याच्या भरात क्षणाचाही विलंब न होऊ देता काळानुसार त्याचा भाऊ सुरेश गतप्राण झाला. शेवटी या स्मशानभुमीत एकाच दिवशी दोन चिता त्याही सख्ख्या भावाच्या जाळण्यात आस्था. सुरेश व जयेश शांत झाले होते. नंतर सुरेशची पत्नी आपल्या लेकरांना घेऊन आपाल्या गावी रवाना झाली.तिचं शहरात मोठं घर होतं,नव्हे तर त्या शहरातील स्मृती तिच्या सोबत जोडल्या होत्या.
विजया आता एकाकी झाली होती. म्हातारी झाली होती. तशी ती त्या गोसीखुर्दच्या पुनर्वसीत घरात आजही राहात होती.तिला करमत नव्हतं.आजुबाजूची लोकं तिला चाहत होते. त्यांची त्यांची मुलं तिला मदत करीत असत. पण तिच्या मन काही या मातीत रमत नव्हतं. कारण तिची नाळ याच मातीत रुजली नव्हती.तर तिची नाळ त्या मातीत होती.ज्या मातीनं तिचे मायबाप,तिच्या बहिणी हिरावल्या होत्या. आपला ही प्राण त्याच मातीत जावा असे तिला वाटत होते. तसेच ती लोकांना बोलूनही दाखवीत होती.पण लोक तिला तिथेच राहण्याविषयी समजावीत होते.शेवटी तिने विचार केला की ही जागा आपण दान द्यावी.
तिनं जसा दानाचा विचार केला तसा तिनं वकील बोलवला.त्याच्या हाताने वकीलपत्र बनवलं व ती जागा ग्रामपंचायतीला दान दिली.दानात अशी इच्छा व्यक्त केली की या जागेचा उपयोग चांगल्या गोष्टीसाठी करावा. तसेच ते कागदपत्र ग्रामपंचायतीच्या सुपूर्द करुन ती माळीणला रवाना झाली.ज्या माळीणला तिची नाळ जुळली होती.
माळीण सह्याद्रीच्या डोंगर कपारीत असलेल्या गावात चोवीस तासाचा प्रवास करीत ती माळीणला पोहोचली होती. बरेच दिवस झाले होते.ती आली नव्हती माळीणला. तिनं ज्या घरासाठी संघर्ष केला होता.त्या घरी आजही वाचनालय दिमाखात चालत होतं. मात्र जे राम्याचं घर होतं. त्या घरामध्ये काहीही नव्हतं.ज्यावेळी तिची विदर्भात बदली झाली होती.त्यावेळी तिनं घर सोडलं होतंं.त्यावेळी तिनं त्या घराला कुलूप लावला होता.आज माळीणला पोहोचताच तिला बरोबर घर आठवलं.ते घर न्याहाळलं.त्या घराची अवदसा बदलली होती. तिथे तिचं घर काही पडलेलं होतं.तिथं गवत उगवलेलं होतं. आत मध्ये काय होतं हे कुलूप उघडल्यावर दिसणार होतं. तसं तिला जाणवलं. कुलूप उघडताच ती आत मध्ये गेली.
ती माळीणला पोहोचताच तिला हायसं वाटलं.ते घर तिचीच वाट पाहत होतं हे तिला जाणवत होतं. मग एक नोकर लावून ते घर तिनं स्वच्छ केलं.बाहेरचे गवत काढले होते.तसेच ती त्या घरात राहू लागली. एकाकी असहाय्य दुर्बलतेसारखी.सारख्या तिला तिच्या लहानपणीच्या आठवणी आठवायच्या.
तिला आठवत होत्या त्या आठवणी.ती डोंगरातली खेळण्याची फुलपाखरे. ते पावसाळ्याचे दिवस.आई रागवत असतानाही पावसात ओलं कणों. इच्छा नसतानाही त्या मुलींच्या शाळेत जाणं आणि क्षणातच आठवत होतं.ते भूस्खलन. त्या भूस्खलनात दबलेली ती कित्येक माणसं,नव्हे तर तो त्यांचा आक्रोश.ती करणारी माणसे आणि त्याचबरोबर आठवत होती तिच्या त्या मेलेल्या मायबापांना. मेलेल्या त्या तिच्या बहिणींना.शालिनी, मालिनी,भीमा आणि आठवत होता तो अतिवृष्टीच्या पाऊस.
याहीपेक्षा महाभयंकर होत्या त्या भुस्खलनानंतरच्या वेदना. तिनं आपल्या जगण्यासाठी पुनर्वसन क्षेत्रात घर मिळवण्यासाठी केलेला संघर्ष.सतत जिल्ह्यात,तालुक्याला तसेच सरपंचाकडे व दर आठवड्याला साडेतीन किलोमीटर जाणे.सरपंचाकडे सरपंचाचे त्रास देणे आठवत होते.त्या सरपंच व ग्रामसेवकांना पगार मिळूनही तिला त्यांनी वीस टक्क्यावर लोटलं होतं.नव्हे तर त्या सरपंच व ग्रामसेवकानं पण आपल्या गावाला पुनर्वसनाच्या नावावर लुटून घेतलं होतं.त्यामुळे त्यांच्या विकासाला मर्यादा आल्या होत्या.कधीकधी सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर जोराचा पाऊस पडत होता. तेव्हा काही घटना आजही ऐकायला येत होत्या.तर कुठे कुठे भूस्खलन झाले. एवढे लोक जखमी झाले.एवढे लोक मरण पावले. तेव्हा विजयाला विचार यायचा की देश डिजिटल बनला. देशात सुधारणा झाल्या. देशात निसर्गाला कैद केलं. भूकंप,पूर,अतिवृष्टी,त्सुनामी या डिजिटल काळात ओळखता पण येतात.पण आजही ह्या घटना या डिजिटल तंत्रज्ञानाला रोखता येत नाही. अाजही भूकंपाला रोखता येत नाही.लाखोनं जीवं जातात.तसेच अाजही भूकंप,सुनामी ला रोखता येत नसून त्यातील लाखो लोक मरतात. मग माळीण असो की गोसेखुर्द.माळीण सारख्या भागात या घटना होत असल्या तरी कित्येक ठिकाणी लोकं सुरक्षित ठिकाणी राहायला तयार नाहीत.सुरक्षीत ठिकाणी जायला तयार नाही. ते अाजही नदीच्या काठावरच वर्षानुवर्षे राहतात. पूर येते दरवर्षी. हे माहीत असूनही राहतात.भुस्खलन झालं होतं माळीणला.हे माहीत असूनही अाजही अशाच डोंगरपायथ्याच्या भागात राहतात.लोकं आजही भूकंप प्रवण भागात राहतात. भूकंप वारंवार येऊन आपल्याला मृत्यूच्या दाढेतून ओढून नेतो.हे माहीत असूनही लोकं राहतात.वादळाचं ठीक आहे. ते काही सांगून येत नाही.पण भुस्खलन, पूर, भूकंपानं जीव वाचवता येऊ शकतो. लोकांनी स्वतःचा जीव वाचवायला पाहिजे. ही संभाव्य घटना घडण्यापूर्वी.कारण आपण त्या संभाव्य घटना घडण्यापुर्वी स्वतः सावधान होत नाही आणि मग पुनर्वसनासाठी सरकारला दोष देत रडत बसतो.
विजया आता अजून म्हातारी झाली होती. त्याचबरोबर तिला चालणही जमत नव्हतं. मात्र यातही म्हातारपणातील गावची मंडळी तिची लेकरागत सेवा करीत होतीे. आपली स्वतःची माय असल्यागत.
पोस्टमन तिच्या घरी आला.तिच्या हातात एक पत्र ठेवलं.तशी तिची सही घेऊन चालता झाला. पोस्टमन जाताच तिनं पत्र उघडलं.ते पत्र वाचलं.त्या पत्रात लिहिले होते की आपण दानात दिलेल्या जागेवर समाजभवन बांधलेलं आहे. आम्ही तर त्याचा सदुपयोग केलेला असूनही त्या जागेवर आणि गरीबांच्या सेवेसाठी, त्यांच्या घरच्यासाठी,तसेच ज्या ज्या वेळी वैनगंगेला पूर असेल,त्यावेळी निर्वासितांची सेवा करण्यासाठी आम्ही निःशुल्क देणार आहोत. त्या समाज मंदिराचं आम्हाला उद्घाटन करायचे आहे. आपल्या हाताने उद्घाटन व्हावं अशी आमची ग्रामस्थांची इच्छा आहे. तेव्हा तुम्ही या व उद्घाटन करून द्या. अशी आमची इच्छा आहे.
विजयानं पत्र वाचलं. तिला फार हायसं वाटलं. त्याचबरोबर तिला आनंद झाला. तसं थरथरत्या हातानं तिनं एक पत्र लिहिलं.त्यात तिनं लिहिलं की आपलं पत्र मिळालं.वाचून आनंद झाला. मी फार थकलेली असल्यानं मी येऊ शकणार नाही. आपण आपण आपला समारंभ उरकवून घ्यावा.
पत्रावर पत्र सुरू होते. त्यातच सरपंचानं एक संदेश पाठवला. त्या संदेशानुसार त्यांचा एक माणूस तिला न्यायला येणार होता.पण तिचा होकार हवा होता.संदेश परत मिळताच विजयानं होकार दर्शवला.तसं तिनं परत माळीणमध्ये वकीलाला बोलावले. वकीलाच्या हाताने मृत्यूपत्र बनवलं.ते मृत्यूपत्र वकीलाच्या हातात ठेवत ती म्हणाली,
"वकील साहेब हे मृत्यूपत्र माझ्या मृत्युनंतरच उघडावं."
वकीलांनं हो म्हणताच तिला बरं वाटलं. त्याचबरोबर त्या समारंभाच्या दिवशी ती सरपंचाच्या पाठवलेल्या माणसाच्या करवी ती त्या गावाला रवान, झाली.ज्या गावी ती जयेश सोबत राहत होती.जीवनाचे अंतिम क्षण जन्मलेल्या गावात काढले होते. तशी ती उद्घाटनाला तिच्या सासरच्या गावी आली होती. तसं तिनं ते समाज मंदिर न्याहाळलं.
तिथे भव्यदिव्य मंदिर बांधलेलं असून समाजामध्ये डोळे दिपून टाकत होतं.एक स्टेज मंदिराच्या समोरच उभारला होता. तोरण लावले होते.विद्यार्थ्यांच्या लेझीमचा आवाज येत होता.गाव सजवला होता. त्यांना कोणी तरी नेता येत अाहे अशी गावाने व्यवस्था केली होती. विजयाची बातमी जशी गावात पोहोचली. तसाच तिचा पंचक्रोशीत मानस होता. कारण ती पोलिस महासंचालकपदी असताना कित्येक लोकांना मदत केली होती.कोणाला पैशाची मदत केली. त्यामुळे ती सर्वांची आवडती लाडकी बनली होती.
विजया गावात आली.त्यातही भाषण द्यायला ती विचार पीठावर चढली. त्यापूर्वी तिनं उद्घाटन केलं.तशा तिनं बोलायला सुरुवात केली. ती त्याच्याशी बोलू लागली. तिचे बोलणे,ती त्यांच्याशी बोलत होती.अशातच तिला दम भरून आला ती विचारपीठावर कोसळली. सर्वत्र हाहाकार माजला. लोक ओरडायला लागले. कोणी म्हणायला लागला की लवकर दवाखान्यात न्या.
दवाखान्यात नेण्याची व्यवस्था झाली. पण नाही तिला वेगळेच मंजूर होतं.नियतीलाही वेगळंच मंजूर होतं.तशी ती दवाखान्यात नेता नेता मरण पावली.
विजया मरण पावताच वाऱ्याच्या वेगानं पंचक्रोशीत बातमी पोहोचली. लोक तिचं दर्शन घ्यायला येऊ लागले होते. जो तो हळहळत होता. कारण तिनं स्वतः म्हातारे,अनाथ,दुर्बल,अन्यायग्रस्त व कुमारी मातांना मदत केली होती.नव्हे तर पैसाही दिला होता. त्यामुळं तिचा अंत्यविधी समाजातल्या दुर्बल, अन्यायग्रस्त व कुमारी मातांनी उरकवला होता.
विजया मरण पावली खरी. दुसऱ्या दिवशी तिच्या मृत्यूची बातमी वर्तमानपत्रात झळकली.माळीणलाही माहित झालं.माळीणच्या गावकऱ्यांना माहित होताच ते हळहळत होते. ज्यावेळी मृत्यूपत्र बनविलेल्या वकीलाला ही गोष्ट माहीत झाली. तो सरपंचाकडे गेला. त्याच्या हातामध्ये ते मृत्यूपत्र देत वकील म्हणाला,
" सरपंच साहेब,यात जो जे लिहिलं आहे. त्यानुसार करा."
सरपंचानं मृत्यूपत्र हातात घेतलं. गावच्या विकासाचा आराखडा होता त्यात. तिनं पैशाची तरतूद केली होती त्यात. पैसे तिनं माळीण गावाला दान दिला होता. त्यांचा विकास करण्यासाठी.
सरपंचानं विजयाचं मृत्यूपत ्रसमोर ठेवून गावाचा विकास केला. त्याच बरोबर माळीणला तिच्या स्मरणार्थ एक आश्रम बांधला. त्याला नाव दिलं. विजयाआश्रम. तसे विजय आश्रमाच्या बाजूला तिचा एक पुतळाही बांधला. तिची समाधी तयार केली. हाच पुतळा तिच्या अस्तित्वाची साक्ष देत होता. नव्हे तर ज्या ठिकाणी गाव खचलं होतं. त्याठिकाणी स्मृती मंदिर बांधलं होतं. त्यावर माळीणमध्ये मेलेल्या लोकांची नावे कोरली होती.
अाजही गावात जेव्हा जेव्हा ती अतिवृष्टी होत असे.तेव्हा तेव्हा ती त्या गावावर कोसळलेली दरड आठवत असे.पण आता माळीणला धोका नव्हता. कारण सरकारने माळीणचं पुनर्वसन चांगल्या सुरक्षित ठिकाणी केलं होतं. त्यात विजयानही काही पैसा पुरवून माळीणला अजून सुशोभीत केलं होतं.
विजयाची जशी समाधी माळीणला बांधली होती.तशीच समाधी आजच्या पुनर्वसनाच्या गावात समाज मंदिराच्या बाजूलाच बांधललीे होती. जणू माळीणची लेक सासरी गेल्यागत समाधी तयार झाली होती.आज तिच विजयाची समाधी तिच्या अस्तित्वाची साक्ष देत होती. नव्हे तर दुर्बल, अन्यायग्रस्त लोकांना प्रेरणा देत होती. जणू अन्यायाविरुद्ध लढा हेच शिकवत होती की काय?असे वाटत होते.