Kouff ki Raat - 18 books and stories free download online pdf in Marathi

खौफ की रात - भाग १८

खौफ की रात

□□□□□□□□□□□□□□□□□

सीजन 1
....

लेखक :जयेश झोमटे.भाग 18

लेखक -जयेश झोमटे



महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्वकाही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी

फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत🙏

ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह मेसेज आणि वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल!

सदर कथेत शुद्धलेखनाच्या चुका असू शकतात तर कृपया करून लेखकास समजून घ्या !

लेखक चुका सुधारण्याचा प्रयत्न करत आहे ..

धन्यवाद..

कथा सुरु


कब्रस्ताना बाहेर बाळ्या हाताची घडी घालुन , गाडीला पाठ टेकून उभा होता ....

त्याची भेदरलेली घाबरीगुबरी नजर अंधारात
फिरत होती -

ती भ्यायलेली नजर काहीतरी शोधत होती.. कसलातरी ठाव घेत होती... भीतिचा ठाव!

ह्या खोल अंधारात काही फिरत तर नाही ना? त्या काळ्या निळ्या पडलेल्या झाडांकडे पाहत अचानकच मागुन काही पांढरट चेह-याच आपल्याकडे रोखुन पाहत तर नाही ना?

आणी जर कधी त्या थंड मृत नजरेची आपल्या सजीव नजरेशी नजरानजर झाली आणि आपल्याकडे पाहून ते ध्यान दात विचकत हसल , तर?

काळजाचा ठोकाच चुकेल !

मग एक भयानक विचार मनात येत होता , जर ते झाडा आड लपलेल ध्यान अचानक चार पावळांवर कोळ्या कोष्टका सारख आपल्या रोखाने धावत आल , तर? आपण काही हाळचाल करणार तोच अगोदर त्याने झेप घेतली.. तर?

मग आपल हे काडीसारख बाहुल्याच देह मातीतून, हाईवेवरच्या रसत्यावरून , मग जंगलातल्या काट्या कुट्यातून ते आपल्याला ओरबाडत कालोखात घेऊन जाईल आणि मग आपल्या शरीराची हाड, मांस चोखून, पिऊन ,चाळण बनवुन टाकेल! बाळ्याच्या मनात एकापाठोपाठ मृत्यु कसा होइल, किती भयानक होइल ह्याच गोष्टींचा विचार येत होता.


बाळ्या एकटक पुढे पाहत होता...

पंधरा- वीस पावलांचर हायवे आणि मग थोड पुढे जंगलाची वेस सुरु होत होती.. श्रापीत आमुश्याच्या रात्री अंधारात काळ्या निळ्या पडलेल्या झाडांकडे पाहत , त्याच्या मानवी मेंदूत भुतांच्या पिक्चर मध्ये पाहिलेले भयान दृश्य दिसुन येत होती, ज्याने हदयाचा अक्षरक्ष भीतीने थरकाप उडत होता- रक्त मांस गोठल जात होत, कानसुळ्या गरम झाल्या, होत्या , हदयाचे ठोके जलद गतीने वाढ़ले गेलेले.

नी तेवढ्यात बाळ्याच्या भेदरलेल्या नजरेस जंगलातल्या एका काळ्या पडलेल्या झाडामागुन एक पांढरट धारधार नखांचा पंज्या त्या झाडावरुन पुढे येताना दिसला.....

त्या पंज्याचा आकार मानवी रचनेपेक्षा जरासा मोठा होता ,त्वचा पांढरी , प्रेताड़ जणू लाकडाची राख फासली होती- वाढलेल्या धारधार नखांना , अंधाराच्या काळ्या रंगाचा आभिशेक घातला होता.

ती बोट झाडावर समुद्राच्या लाटे प्रमाणे एका लईत फिरत होती.

बाळ्याच्या भीतिचा उद्रेक होण्यासाठी आणखी काय हव होत ?

आधीच भीतिने कासव झालेल्या बाळ्याची इतकी घाबरगुंडी उडाली होती , त्यात ह्या अघोरी चेष्टेने
आणखीनच भर घातली, आणी बाळ्याची वाचाच गेली.

हाई बीपीने बाळ्याला भीतीचा लकवा मारला ,
त्याच डोक शॉक लागल्यासारख हळु लागल, जीभ तोंडातून बाहेर आली, जी की डोक वेगवेगाने हाळतांना कुत्र्यासारखी वाकडीतिकडी हळत होती.

झाडाच्या काळपट सालटीवर विषारी काळसर्पासारखा चिकटून बसलेला तो पंज्या , हळुच खोडामागे खेचला गेला ...

झाडाच्या खोडामागे तो पंज्या जाताच बाळ्याने श्वास रोखून धरला - न जाणे का पन बाळ्याला वाटत होत काहीतरी भयानक घडणार आहे !

तसंच झालही.

त्या झाडाच्या खोडामागून अचानकच लालसर रंगाचा प्रकाश उमटला, अगदी गडद लालसर रक्तासारखा प्रकाश होता तो....

त्या आलेल्या लालसर प्रकाशाने ती झाडाची सावली आणी तो लाल प्रकाश बाळ्याच्या तोंडावर पडला होता.

विस्फारलेल्या डोळ्यांमध्ये भीति उतरली होती..
काहीवेळा अगोदर त्या झाडाच्या खोडावर एकच पंज्या चिकटला होता - परंतु आता ह्याक्षणाला , झप,झप,झप आवाज करत एकापाठोपाठ त्या खोडावर सहा पंजे चालत आले -

येवढ्याश्या झाडाच्या खोडामागे जेमतेम एक माणुस लपून बसेल एवढीच जागा होती...

सामान्यत पणे एका मांणसाला दोनच हात असतात , मग खोडावर दोनच हात असायला हवे होते ना ? मग हे सहा सहा विद्रूप हाताचे पंजे तिथे अवतरले कसे ? नक्की झाडामागे माणुसच उभा होता का ? की आणखी काहीतरी ? जे माणुस मुळीच नव्हत ? सजीव नव्हत ? काहीतरी तामसी, क्लिष्ट, काळी मायावी शक्ति असलेली , एक एनर्जी, भुत-प्रेत पिशाच्छ ! हो ह्यातलच काहितरी तिथे उपस्थीत होत .

हा भयानक दृष्य पाहता त्याची भीतिने तणतणली गेली,
आणि त्याचवेळेस त्याच्या खांद्यावर शवागारातल्या एका मृतप्रेतासारखा एक थंडगार हात पडला.

" आ..आ..ऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ"

बाल्या अक्षरक्ष कंठाच्या देठापासुन ओरडला.
त्याच्या तोंडातली घंटा ठणठण वाजू लागली.

" सोड ..सोड...,! सोड..मला..... मला मारू नको ..!.. सोड.. " बाळ्या डोळे मिटून मोठ मोठ्याने बड-बडत होता.

त्याच्या मनात भीतीने थरथराट काहूर माजवल होत.

मरणाच्या भीतिने तो अक्षरक्ष वेडा झाला होता.

" अवो मालक , अवो मालक ..म्या हाय .... माय हाय पांडू..! "

मागुन एक ओळखीचा आवाज आला गेला. तसे लागलीच पुढे पाहत बाळ्याने दोन्ही डोळे उघडले...
सर्वप्रथम त्याने हाईवे पुढे असलेल्या त्या झाडाकडे पाहिल... काहीवेळा अगोदर दिसणारा तिथला लालसर प्रकाश आता नाहीसा झाला ,खोडावर चिकटलेले ते पंजे सुद्धा तिथे उपस्थीत नव्हते , तो दृष्य नक्की खरा होता , की फसव दृष्य होत? -की एक चेष्टा झाली होती ! की मनाला झालेला भास होता .? बाळ्याला काहीच समजत नव्हत !

बाळ्याने मागे वळून पाहिल , तस त्याच्या नजरेस खांद्यावर कूदळ घेतलेला, डोक्यावर गुलाबी मळलेल्क़ कापड बांधलेला, तोंडाला तपकिरी माती लागलेला पांडूबुवा दिसला.

पांडूला पाहुन त्याच्या जिवात जिव आला.
व त्याने लागलीच घसा खाकरल व म्हणाला.

" पांड्या.... येड झxxxण्या तुला आवाज नाय देता येत का रे? झार्याझोट्या "
बाळ्या फुललेल्या श्वासांसहित म्हंणाला.
जणु ते वाक्य बोलतांना कितीतरी मेहनत त्याला घ्यावी लागली होती.

" अहो मालक ! म्या आवाज दिल हो , पन तुम्ही हे अस बहि-यवाणी उभ होत , हो नाय की हू नाही! आवाज देऊन देऊन दमलो की मी , मग म्हंनल खांद्यावर हात ठेवून हाळीवतो , हात ठेवल तर तुम्ही हे अस अंगात आल्यावाणी नुस्त इवळाया लागल !" पांडूबुवा न थांबता म्हणाला.

त्याच उत्तर तस म्हंणायला बाळ्याला पटल होत , म्हंणूनच त्याची जीभ अडकली
" हा...हा...! चल.ठीके ! खड्ड़ा खणला का?" बाल्याने पटकन विषय बदलल .

" जी मालक ! " पांडू इतकेच म्हणाला .

त्याच्या ह्या वाक्यावर बाल्याने कसलेही प्रतिउत्त न देता खिशातुन फोन काढल,एक दोन बटण दाबुन सावकाराला फोन लावल.


क्रमश :

खड्डा खणून झालय बर का ?

पन प्रेत गाडायला मिळेल ना ?

सर्वकाही ठिक होइल ना ?

की नाही होणार ?

या पाहूयात पुढील भागात....

भाग 19

..चाहूल भयाची....

आभासी सावली हा असतो खरा प्रकाश
जे सत्य भासती ते , असते नितांत भास ..
हसतात सावलीला हा दोष आंधळ्यांचा.....

......😈



इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED