१ तास भुताचा - भाग 7 jay zom द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

१ तास भुताचा - भाग 7

सूड भाग 5 ...अंतिम..प्रारंभ..

....
नरकासूर कैकृलाक...साधना

" काय....? कोण आहेत .ती माणस .?"

विलासराव हे वाक्य जरा मोठ्यानेच उद्दारले , ज्याने आजुबाजुला हॉटेल मध्ये बसलेली माणस विलासरावांकडे अचंबित, व थोड्या वेगळ्याच नजरेने पाहू लागली होती,

" सांगतो विलासराव ... ! परंतु माझ्या ह्या वक्तव्याचा तुमच्या मनावर
कितपत विश्वास बसेल ...! आणि कितपत नाही....! हे मात्र मी
सांगु शकणार नाही....! पण मी जे पाहिल ... आणि अनुभवल....!
त्यानुसार माझा संशय हेच सविस्तर स्वरुपात सांगत आहे.. की तीच
...माणस तुमच्यावर चेटूक करत आहेत !परंतु ते सत्य सांगण्या
...अगोदर मी तुम्हाला काही-प्रश्न विचारेन , आणि जर का.. त्या .
प्रश्नाची उत्तर...! मला साफ -साफ मिळाली , म्हणजे अर्थातच माझ्या प्रश्नांच्या धाग्यांची जोड जर का तुमच्या उत्तरास मिळाली ,तरच माझा संशय खरा ठरला जात! ती माणस कोण आहेत हे , मी तुम्हाला सांगु शकतो..!" जगदीशरावांच्या ह्या वाक्यावर विलासराव काहीक्षण थोड बुचकळ्यातच पडले , आणि मग काहीवेळाने त्यांनी प्रश्नांसाठी होकार सुद्धा दर्शविला,
" ठिके ...! जगदीश.. जी .........विचारा...!"विलासराव अस म्हणाले व जगदीशरावांनी पाहिला प्रश्न केला.

" विलासराव..! तुम्हाला आठवतय...? ज्या वेळेस आपण पाहिल्यांदा भेटलो...! त्यावेळेस...तुम्ही मला तुमच्याबदल, तुमच्या पत्नीबदल, आणि शेवटला तुमच्या परिवारा बदल माहीती दिली ...? "

" हो.. ! हो ... बरोबर...! विलासराव इतकेच म्हणाले .
त्यासरशी जगदीशरावांनी पुढे बोलायला, सुरुवात केली .

" परंतु विलासराव तुम्ही मला एक गोष्ट नाही सांगितली .........? की
तुमच्या दोन्ही भावांन मध्ये प्रॉपर्टीसाठी खटके उडतायेत...?!... "

" हो नाही सांगितली ..! परंतु हे तुम्हाला कस कळाल...? "
विलासरावांच्या ह्या वाक्यावर जगदीशरावांनी रामचंद्र यांच्या कडे पाहिल व म्हणाले .

" ते मला रामचंद्र ने सांगितल....! आणि अजुन एक गोष्ट विलासराव
मी तुम्हाला...ती पाण्याची बॉटल दिली होती पाहा..?तर तेव्हा मी तुम्हाला काय सांगितल होत,?"

" तूम्हि म्हणाला होतात की , मळमल, उलटी काही त्रास झाल तर
मला कळवा...!"
विलासरावांनी अचूक उत्तर दिल , त्यासरशी जगदीशराव पुढे बोलु लागले ..

" अचूक ..बोललात..विलासराव ! मग तुम्ही ते मला कळवळत का..?"

" नाही...! " विलासराव तोंडाचा आ वासत म्हणाले.

" का नाही कळवलात सांगाल का मला......? " जगदीश राव आपले
नेत्र छोठे करत म्हणाले.

" मला सांगायच होत....! पण तुम्ही आल्यानंतर विसरलो मी...!"
विलासराव आपल्या डोक्याला हात लावत म्हणाले . जणू त्यांच डोक डोक हे विचार करुन दु:खु लागल होत .

" अच्छा ठीके....! काही प्रॉब्लम नाही..आता ...एक.... शेवटचा ....आणि आंतिम..प्रश्न ....! " जगदिश राव असे म्हणतच आपल्या खुर्चीतुन थोडे पुढे सरकले व थोड सिरियस होत म्हणाले .
" मी तुमच घर पाहायला ज्या दिवशी आलो ..! त्यादीवशी मला रामचंद्रने सांगितल की... तुम्ही ..एन सकाळीच घरी निघुन गेला होतात-म्हणून ..!"

" हो ...! कारण दोन दिवस झाल घरात कोणीच नव्हत ..! तर घरात साफ -सफाई करायला हवी होती...! कारण तुम्ही घर पाहायला येणार म्हंटल्यावर !"

" अच्छा... ! मग मला आता एक सांगा ... ! की त्या दिवशी तुम्हाला कोणी काही खायला किंवा प्यायला दिल होत का?"
जगदीशराव एकटक विलासरावांकडे पाहत म्हणाले.
त्यासरशी विलासरावांनी आपल्या डोक्याला हातलावला व आठवु लागले,

" हो माझ्या मोठ्या भावाची बायको.. म्हणजेच..
माझी मोठी वहिनी आली होती.! ..तिने मला कोकम प्यायला दिला होता...! " विलासरावांच्या ह्या वाक्यावर जगदीशरावांचे डोळे एका विशिष्ट लयीच्या प्रकाशाने चमकले , व त्यांनी रामचंद्र यांस कडे पाहील,त्यासरशी रामचंद्र यांनी हळूच समोर असलेला पाण्याचा ग्लास उचळला आणि गटा, गटा सर्व पाणि पिऊन टाकले.

" विलासराव आता माझ्या एका आंतिम प्रश्नाच उत्तर द्या ...? ज्या
दिवशी तुम्ही तुमच्या पत्नीला ...!माहेरी सोडुन आलात ....!
त्यादीवशी तुम्हाला जेवन -खावण कोणि बनवुन दिल होत , की ..
तुम्ही स्व्त:हा बनवल होत , ? "

" तस सांगायच तर .....निताला माहेरी सोडुन .. घरी यायला मला
संध्याकाळ झाली होती ! तर माझ्या वाटणीच जेवन त्यादीवशी मोठी वहिनीच माझ्यासाठी ...बनवुन गेली ...होती ...!"
विलासरावांचा हा वाक्य पुर होताक्षणीच जगदीशराव जोशातच म्हणाले .
"! पाहिलस रामचंद्र..! माझा ....संशय... खरा निघाला ....!"
जगदीशराव रामचंद्र यांच्या कडे पाहत म्हणाले . परंतु जगदीशराव काय बोलता आहेत हे मात्र विलासरावांना काडीचही समजल नव्हत .

" जगदीशजी तुम्ही काय बोलताय ...? मला काहीच कळत नाहीये"
न समजल्या सारखे विलासराव म्हणाले .त्यासरशी टेबलावर दोन्ही
हात ठेवत व आपल डोक पुढे सरकवत जगदीश राव म्हणाले.

" विलासराव मी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाच धागा हा , तुमच्या उत्तराशी जाउन बरोबर जुडतोय, आणि त्याचकारणाने माझा संशय जो होता तो कित्येक तरी पटीने सार्थक ठरलाय...! तुम्हाला माहीतिये का विलासराव ती माणस कोण आहेत...? :"
जगदीशराव विलासरावांकडे पाहत म्हणाले , तस विलासरावांनी फक्त
नकारार्थी डोक हलवल . जणू विलासरावांना काहीच समजल नव्हत.

" रामचंद्र..........! मला वाटतय की ती माणस कोण आहेत हे तुम्हीच विलासरावांना सांगाव...! कारण एकतर तुम्ही त्यांचे मित्र आहात..! आणी त्यांचा माझ्या बोलण्यापेक्षा तुमच्या बोलण्यावर जास्त विश्वास बसेल..!"
" ठीके .. जगदीश जी ...! "
रामचंद्र यांनी बारीबारीने जगदीशराव व विलासराव यांच्याकडे पाहत हे वाक्य उद्दारल व पुढे बोलू लागले .
" विलास ...! जगदीशजीनी ह्या 5 दिवसात जी काही साधना केली,
त्यात त्यांना अस कळाल...! की तुझ्यावर म्हंणजेच नितावहिनी
आणि तुम्हा दोघांवरही तो झाला गेलेला चेटूक... तुमच्या
घरातल्यांनीच कोणितरी केलाय , "
" काय ...!" विलासराव पुन्हा एकदा मोठ्यानेच ओरडले, व त्यांच्या
ह्या आवाजासरशी हॉटेल मध्ये बसलेले सर्वजन विलासरावांकडे
..डोळे फाडून पाहु लागले, आणि ह्यावेळेस तर त्या लोकांना अस वाटुन
....गेल होत , की विलासराव कोणी मुर्ख माणूस आहेत.!"
" विलास शांत हो...!"
" कस शांत होऊ...! तुला जरा कळतय..का तु काय बोलतोयस..., भल माझ्या परिवरातली माणस अस का वागतील ....? आणि समजा मी विश्वास ठेवलाच तर मग पुरावा काय आहे तुझ्याकडे "

" पुरावा आहे....विलास !कारण हे सर्व ती वाईट शक्तिच जगदीशजींना आवाहान केल्यावर सांगून गेलीये , परंतु त्या वाईट शक्तिने जगदीशजींना तो इसम किंवा ती स्त्री कोण आहे ...ते नाही सांगितल , ..जगदीशजींनी खुप प्रयत्न सुद्धा केला ,त्या वाईट
शक्तिकडून सत्य उकळवण्याचा, परंतु त्या वाईट शक्तिने ते सत्य
उघडकीस होऊन दिल नाही , परंतु जगदीशजींना त्या वाईट शक्तिपासु हे मात्र कळाल, की तो चेटूक तुमच्या घरातल्यांनीच केलाय...आणि ती शक्ति . कोणती आहे, आणि कोठून आली आहे,
रामचंद्र यांच्य्क़ ह्या बोलण्यावर विलासराव एकटक त्यांच्या चेह-याकडे
पाहतच राहीले होते ,एक शब्दही त्यांच्या मुखातुन बाहेर पडला नव्हता.
त्यासरशी रामचंद्र पुढे बोलू लागले.
" विलास त्या वाईट शक्तिने तुमच्या घरातलाच कोणीतरी हे द्र्षकृत्य करत आहे हे...सांगितल तर खर, परंतु नाव न कळल्याने आता ह्या क्षणी जगदीशजीं समोर ...एक मोठा प्रश्ण उभा राहीला ,? की नक्की
तुमच्या घरातल्यांमधला कोण तो इसम व ती स्त्री असावी ..? जो हे सर्व कटकारस्थान चेटूक करतोय , ? मग पाचव्या दिवशी ..म्हणजेच काळ रात्री जगदीशजींनी मला भेटायला बोलावल , मग मी त्यांच्या घरी पोहचल्यावर त्यांनी मला ह्या सर्व अघटीत प्रकरणाची इत्यंभूत
सर्व काही माहिती दिली , मला ही अगोदर तुझ्यासारखाच धक्का बसला , परंतु ही वेळ धक्का बसवण्याची नव्हती, मग मी कसतरी
स्व्त:ला सावरल आणि मग जगदीशजीं नी मला तुला ह्या हॉटेल मध्ये भेटायला घेऊन येण्यास सांगितल मग आता पुढे जे काही घडल ते तर तू पाहतोच आहेस..!"
रामचंद्र यांनी त्यांच्याकडे जी काही माहीती होती, ती सर्व काही विलासरावांना थोडक्यात कळवली, व विलासरावांनी सुद्धा ती सर्व काही गप्प -गुमाने ऐकुन घेतली,
"आणि विलासराव ....! ती व्यक्ती दुसरी कोणि नसुन तुमची मोठी वहिनीच आहे ..! तुमच्या वहिनीला तुमची प्रगती पाहावली नाही .!
आणि म्हणूनच तुमच्या वहिनीने कै..- मंदाकिनी कृलाक ही पौराणिक नरक देव पिशाच्च विद्या एका मातब्बर मांत्रिका कडून करुन घेत, त्या विद्ये मार्फ्त तुम्हा दोघांवर चेटूक केलय , आणि हो विलासराव ही विद्या पौराणिक असुन खुप शक्तिशाली आहे , ह्या विद्येचा एक वेगळाच इतिहास आहे , ते तर मी नाही सांगू शकत , परंतु ह्या विद्येमार्फत आपल्या शत्रुला एक विशिष्ट प्रकारच पेय पाजुन आपल्याला हवी ती भयंकर काल्प्निक दृश्य दाखवता येतात ,

.." म्हणजे वहिनीने मला जे कोकम प्यायला दिल होत , त्यात ते द्रव होत..! तर....." विलासराव मध्येच म्हणाले .
"हो विलास ....! .अगदी बरोबर बोललास..! " विलासरावांच्या वाक्या दुजोरा देर रामचंद्र म्हणाले.
" आणि विलासराव.......? तुम्हाला दिसलेली ... ती सर्व दृष्य जरी काल्प्निक असली ...! तरी सुद्धा ती अनुभवणारा पिडाग्रस्त मंदाकिनी नावाप्रमाणे मंद होतो...! व कृलाक म्हणजेच नरकातला एक राक्षसी देव आहे, जो बायंगी प्रमाणेच नारळात भरुन मिळतो, परंतु बायंगी प्रमाणे ह्याचा फायदा होत नाही, आणि नाही बायंगी प्रमाणे ह्याला घरात ठेवता येत, कृलाक हा नारळात भरुन मिळतो , आणि नारळात भरळ्यानंतर तो नारळ कालोखाची काजळी फासल्यासारखा काला-काला होत जातो, कैकृलाक ला घरात ठेवता येत नाही कारण हा राक्षस फक्त आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा काम करतो , म्हणूणच जी माणस लोक दुस-यांवर जळतात , ती लोक ह्या राक्षसाला आपल्या शत्रुच्या घराबाजुला पुरतात , पुरतावेळेस कृलाक भरलेल्या नारळाला त्या बाधा करण्याचे व्यक्तीचे केस बांधावे लागतात, ज्याने ते घर व तो इसम किंवा/ स्त्री नैराश्यात जाऊन -जाऊन असहाय्य होत , मृत्युमुखी पडतो , आणि हो विलासराव तुमच्या वहिनीने कृलाक रुपी नारळ घर बांधतावेळेस तुमच्या घराखाली पुरलाय,"
" काय.....! " विलासराव म्हणाले .
" हो .....विलास....!" विलासरावांच्या वाक्याला दूजोरा देत रामचंद्र
म्हणाले .
" माझ तर विश्वासच बसत नाहीये ..की वहिनी अस करु शकते...!"
खाली विलासराव म्हणाले .
" अहो विलासराव ..! अस तुमच्या बाबतीच घडलय किंवा घडतय
अस विचार करु नका...! कलियुग आहे हो हे ....! अशा कित्येक
घटना रोजच्या घडतात..! स्व्त:चा भाऊ प्रॉपर्टी साठी रक्ताच नात
विसरुन जात सकख्या भावाचा खून करतो, तर बहिण प्रॉपर्टी साठी
राक्षसीण बनते , अहो ..विलासराव..तुम्ही चांगल्या स्वभावाचे आहात
म्हणजे दुनियापन चांगल्या स्वभावाची होइल ..! ... अस नसत .?"
" परंतु जगदीशजी...ह्यावर काही उपाय आहे का...?"
रामचंद्र म्हणाले.
"1 उपाय आहे परंतू तो उपाय माझ्या मते विलासराव स्विकार करणार ... नाहीत ...!" अस म्हणतच जगदीशजी बोलायच थांबले.
" परंतू जगदीशजी.. उपाय काय...आहे.....?"
" परंतु त्या उपायासाठी विलासराव तैयार असायला हवेत ना...! जर त्यांची परवानगी असेल तेव्हाच ....मी तो मार्ग सांगु शकतो .!"
" ठीके जगदीशजी ..तुम्ही...सांगा काय आहे तो....उपाय...! जर वहिनीने माझ्या बायकोच माझ्या होणा-या मुलाचा विचार नाही केला तर मी का करु...! बोला तुम्ही...!"
विलासराव जरा रागातच म्हणाले.
" मग... ठीके... विलासराव ...! ऐका तर ..!"
जगदीशजींनी अस म्हणतच , पुढे बोलायला सुरुवात केली .
" तुमच्या वहिनीने जी काही..विद्या ( चेटूक) तुमच्यावर केला आहे..!
ते सर्व आपण त्यांच्यावरच पलटवायच....! ज्याने हे सर्व काही इथेच थांबेल....! ".!" जगदीशरावांच्या ह्या वाक्यावर विलासर्क़व काहीक्षण गप्पच बसले व काहीवेळाने विलासरावांनी त्या फ
दोघांकडे पाहील व एक उसासा टाकतच त्यांनी ह्या चेटूक मुक्त विद्येसाठी होकार दर्शवला
" जगदीशजी जर माझा कुटूंब ह्या दृष्टफे-यातुन सुटणार असेल.. तर ...मला हे मान्य आहे..!"
विलासरावांनी विचारकरुन लागलीच होकार दर्शविला, त्यासरशी जगदीशजींनी
पुढील दोन दिवसात एक विद्या करण्याच ठरवल , ........
ज्याने हा सर्व भयंकर रक्तरंजित खेळ .थांबणार होता.....परंतु ते इतके सोपे होते....का...या पाहू पुढे....
.

क्रमश.. ..: