१ तास भुताचा - भाग 8 jay zom द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

१ तास भुताचा - भाग 8

भाग 8 .....समाप्ती .


पाहता-पाहता दोन दिवस सरले त्यासरशी चेटूक मूक्त विधीचा दिवस आला गेला , चेटूक मक्त विधी विलासरावांच्या घरी होणार होती, त्याकारणाने जगदीशरावांनी विलासरावांकडून सर्वकाही विधीच सामान मागुन घेतल, रात्र झाली त्यासरशी विधीचच सामान मांडल जात विधीला सुरुवात केली गेली, जगदीशरावांनी ह्यावेळेस साधेकपडे परिधान केले नव्हते, जस की पेंन्ट शर्ट, ह्यावेळेस त्यांनी एक काळ्या रंगाची लुंगी घातली होती , बाकी अंगावर काही नव्हत , जगदीशराव हवनकुंडा समोर बसले होते, जगदीशरावांन स्मोर असलेल्या त्या हवनकुंडात तांबड्या रंगाची आग पेटली होती , आणि हवनकुंडा पुढे एक सफेद रंगाची कवटी ठेवली होती, त्या कवटीच्या डोक्यावर एक नारळ ठेवला होता आणि कवटीच्या आजूबाजुला लिंबू, बुक्का, एक काळी बाहुली, अशा कित्येक तरी विचित्र सामग्री - वस्तु ठेवल्या गेल्या होत्या, विलासराव आणि रामचंद्र जगदीशरावांच्या बाजुलाच एका कुंकवाच्या व राखेने मिश्रित केलेल्या आभिमंत्रीत गोल रिंगणात बसले होते , रिंगणात बसल्या कारणाने कोणतीही वाईट शक्ति त्यांना इजा करु शकत नव्हती , पुर्णत घरात शांतता होती , फक्तस्त जगदीशरावांचे मंत्र आवाज काय ते पुर्णत घरात घुमत होते , त्या व्यतिरिक्त कसलाही आवाज येत नव्हता , जणू पुर्णत घर आज स्मशान शांततेत प्रस्थापित झाल होत, वेळ जसा-जसा पुढे जात होता, त्यासरशी कवटी
वर ठेवलेला तो नारळ काळ्या रंगात बदलत जात होता,
काहिवेळाने तो नारळ काजळी फासल्या सारखा पुर्णत काळा झाला,
व अचानक काळ्या झालेल्या त्या नारळाच काळेपण त्या कवटीने शोषून घेतल,
" रिंगणाच्या बाहेर ..साधा ...हात पन काढु नका. ? तो बघा ..., तो
मा त आला बघा....! " जगदीश राव त्या काळ्या होणा-या नारळाकडे पाहत म्हणाले, त्यासरशी विलासराव आणि जगदीशराव एकटक त्या कवटीवर ठेवलेल्या नारळाकडे पाहू लागले,
सफेद रंगाच्या कवटीवर ठेवलेला तो नारळ काळ्या रंगात बदलला जात, त्या कवटीने नारळाच काळपण शोषून घेतल व एका सैतानाचा चेहरा त्या कवटीवए अवतरला , काळ्या रंगाचा चेहरा, दोन बैला सारखी लहान शिंगे , आणि कुत्र्यासारखे दात, व त्याचप्रमाणे जिभ सुद्धा ,बाकी शरीर नव्हत फक्त नी फक्त एक धड अवतरल जात होत, जर का त्या कवटीसहीत बाकीची मनुष्य रुपी हाड जर उपस्थित असती, तर विचार करुनच अंगावर सर्र्कन काटा उभा राहातो,
" काय रे भें@@त कशाला बोलावलय..मला इथ ?" कवटीवर अवतरलेल ते भयानक उपद्रव आपल्या भयभीत करणा-या गलिच्छ आवाजात म्हणाल .
" ए ....ह×××××र ... ! तुला इथे .. कोणिही .. बोलवल नाहीये..आणी नाही तुझी लायकी आहे.. इथ रहायची... ....समजल...का.?"

" मग बोलावलय...कशाला...तुझी आ####$×ला...!हिहिहिही , खिखिखिखी....! " छद्मी हास्य करत व गलिच्छ शब्दांच वापर करत ते कैकृलाक राक्षस म्हणाल.

" ए गप्प बैस्स..! नाहीतर अस अखंड त्रास..देईन ना......! की कुत्र्यासारखी दशा करेन...!" जगदीशजी त्या कैकृलाक राक्षसाकडे पाहत म्हणालें.

" तू .....? खिखिखी ...ना माझी दशा करणार....? ती पन कुत्र्यासारखी ... ! हिहिहिही, खिखिखी..हिहिही, तुझ उभ राहात कारे...! .हिहिही...खीखी .खीखी
धमकी देतो..... !हिहिहिही.....ते पन मला ...नरकातल्या राक्षसाला .... हिहिही...खीखी ...! याच्या बायकोला अजुन दोन दिवस घरात ठेवली असती ना.... तर....!" तो कैकृलाक राक्षस पुढे काही बोलणार की
तोच जगदीशजींनी बाजुला असलेली मंत्रबधीत केलेली राख त्या सैतानावर फेकली, त्यासरशी त्याच्या चेह-यावर ज्याप्रकारे गरम तव्यावर पाण्याचे शिंतोडे पडताक्षणी एक विशिष्ट पद्धतीचा ( फ्स्स) आवाज होत वाफा निघाल्या जातात, सेम -हुबे -हुब त्याच प्रकारे त्या सैतानाच्या चेह-यावर ते अभीमंत्रीत राख पडताक्षणीच फ्स्स आवाज होत , चेह-यातुन वाफा निघाल्या, व भयंकर कर्णकर्कश कानठळ्या बसवणा-या आवाजात ते उपद्रव ओरडल..., व काहीवेळाने ज्यासरशी त्याच्या वेदना थांबल्या त्यासरशी ते उपद्रव पुन्हा एकदा खिदळू, हसू लागल,

" हिहिहिही, खिखिखी...! ए मा@×××#त ............मी देव...आहे.. देव ..!...समजल का ......? मला तु फक्त इजा करु शकतोस...! मारु श्कत ..नाही.....हिहिहिही, खिखिखिखी...!"

" अरे ए चांडाळा....! ... देव शब्दाचा अर्थ तरी समजत का तुला...?
तु कोणी देव नाहीस...! तर....तु एक पापी सैतान....आहेस...! सैतान आहेस तु...! ...स्व्त:च्या हिताचा विचार करणारा..महाक्प्टी सैतान
कैकृलाक आहेस तू... ! " जगदीशजींनी ह्या वाक्यासरशी पुन्हा एकदा
ती अभीमंत्रित राख कैकृलाक पिशाच्च देवाच्या दिशेने फेकली त्यासरशी त्याच्या तोंडून पुन्हा एकदा आर्त किंकाळी निघाली , व ज्यासरशी वेदना कमी झाल्या तस एका निर्लज्जा सारखा तो पुन्हा हसु लागला

" हिहिही , खिखिखी.. ! हे काय मुत फेकतो..रे .....! फेक-फ़ेक अजुन फेक हिहिखिह्खी..... लय मजा येतीये.. ..."
त्या कवटीवर अवतरलेल कैकृलाक पिशाच्चा धड म्हणाल. परंतु जगदीशजींनी त्याच्या हसण्यावर किंवा बोलण्यावर लक्ष न देता विलासरावांना हाक दिली,

" विलासराव.. ..?.........जगदीशजींनी विलासरावांना हाक दिली परंतु कसलही प्रतिउत्तर आल नाही , त्यासरशी जगदीशरावांनी विलासरावांन कडे पाहील, परंतु विलासराव भितीने गाळण उडाली जात एकटक त्या धडा कडेच पाहत होते, जगदीशजी आवाज देतायेत आणि विलासच लक्ष नाही हे पाहुन रामचंद्र यांनी त्यांच्या शरीरास स्पर्श केला त्यासरशी , विलासराव एक झटका बसल्यागत आपल्या तंद्रीतुन बाहेर आले,
"..अं..! काय...?" विलासराव म्हणाले .
" अरे विलास जगदीशजी आवाज देतायेत..लक्ष कुठे आहे ...तुझ..?"
रामचंद्र यांच्या ह्या वाक्यावर विलासरावांनी लागलीच त्यांच्या कडे पाहिल व म्ह्नाले
" काय..जगदीशजी .? "
" विलासराव..घाबरु नका ...! ह्या नराधमाच फक्त धडच आपण प्रस्थापित केलय..त्याकारणाने घाबराची...काही गरज..नाही ! फक्त मी काय सांगतो...ते निट ऐका...?" .
" विलासराव...रामचंद्र एक काम...करा..? "
" हा बोलाना जगदीश जी..!" रामचंद्र म्हणाले.
" रामचंद्र तुम्ही एक कळशीभर पाणी घेऊन या.....?
आणि विलासराव... तुम्ही...? एक मोठ गोल( टोप) ... असलेल..भांड घेऊन या.."
...प्रत्येकाला एक-एक काम देत जगदीशजींनी दोघांना कामाला लावल,
त्यासरशी विलासराव गोल भांड आणण्यासाठी व रामचंद्र पाण्याने भरलेली कळशी आणण्यासाठी निघुन गेले,
" ए भट्या...! मला अक्खा आणायचा ना..इथे.. ...! हिहिहिह "
कैकृलाक भयंकर हस्य करत म्हणाला .
" तेवढा... मूर्ख ...दिसतो... मी... तुला....! " जगदीशजी रागातच म्हणाले .
" ए भटा..! तु लय..चालू...हाय रे....! हिहिहिही, खिखिखी....! "
" हम्म समजेलच...तुला थांब ..जरा ....!"
" अरे ए ...! थांब जरा नाही..कायमचा थांबणार आहे ह्या घरात मी..!हिहिहिही, खिखिखी....!
कैकृलाक ची अखंद बडबड चालूच होती, काहीवेळाने ते दोघेही म्हणजेच विलासराव रामचंद्र जे साहित्य सांगितल होत-ते घेऊन आले ,
" विलासराव ...! ते भांड ... त्या हवनकुंडावर ठेवा.." जगदीश रावांच्या ह्या वाक्यासरशी विलासरावांनी घाबरतच ते भांड हवनकुंडावर्र ठेवल , त्यासरशी
जगदीशजी आपल्या जागेवरुन उठले ,
" रामचंद्र इकडे या....?" जगदीशजींनी रामचंद्र यांस आपल्याकडे बोलावल त्यासरशी रामचंद्र त्यांच्या जवल गेले,
जगदीशजी हळूच खाली वाकले , हवनकुंडासमोरच थालीत सफेद रंगाची राख ठेवली होती, ती राख त्यांनी आपल्या एका हाती घेतली व राखेने भरलेली मुठ आवळून कपाळावर धरली , व काही बाही मंत्र उच्चारत त्या कलशीत टाकली त्यासरशी ते पाणी तांबड्या र्ंगाने चमकू लागल ,
" ए ..फो@#$××च्या...काय-चालू ये तुझ..? सांग मला सांग नाहीतर..!"
" तू हे घर ...सोडुन जाणार ..आहेस की नाही ...! ते सांग ..?"
" नाही ..मी नाही .जाणार...!"
" बर ठीके ...... ! मी तुला मारु...किंवा संपवु तर शकत नाही , परंतु परंतु तुला परत नक्की पाठू शकतो . ..!"
जगदीशजींनी अस म्हणतच त्या कैकृलाक च धड आपल्या दोन्ही हातात उचळल व हवनकुंडाव ठेवलेल्या त्या मोठ्या भांड्यात ठेवल ,
" रामचंद्र ...? ..मी सांगेल तेव्हा ...-तेव्हा ..ते पाणी थोड-थोड भांड्यातल्या त्या धडावर ओतायच....! विलासराव तो लाल बुक्का घ्या...?" हवनकुंडा बाजुला असलेल्या लाल कुंकवा कडे पाहत जगदीश राव म्हणाले . त्यासरशी विलासरावांनी ती लाल रंगाने भरलेली थाळी आपल्या हाती घेतली,
" तुम्ही दोघेही आपला धीर जरासाही खचवु नका...! वेळ खुप महत्वाची आहे...! बाहेरुन तुमच्या ओळखीच्या माणसांचे आवाज येतील...! ओ देऊ नका..! भयानक चेहरे दिसतील ...? परंतु त्याकडे पाहु नका ...! ती मंदाकिणी सुद्धा दिसू शकते आपल्या मालकाला वाचवण्यासाठी ती नक्की येईल. ! परंतु ती .. तुम्हाला घाबरवेल किंवा आपल्या सौंदर्यात संमोहीत करेल....! परंतु तुमच घात करण तिच्यासाठी असंभव असेल कारण तुम्ही दोघेही आता ह्या क्षणी आभिमंत्रीत रिंगणात उभे आहात...!" जगदीशजींनी त्या दोघांनभोवती राखेने दोन रिंगण काढले व पुढे म्हणाले.
" विलासराव...मी मंत्र ..म्हणायला..सुरुवात...केल्यावर..तुम्ही..तो.. बुक्का.. .थोड-थोड ह्या गोल भांड्यात म्हणजेच ह्या धडावर टाकत.राहा..?
आणि रामचंद्र...? कळशीतल पाणि थोड़-थोड़स ह्या भांड्यात ओतत राहा..! " अस म्हणतच जगदीशजींनी आपल्या छातीवर हात ठेवला:
मोठ -मोठ्याने मंत्र म्हणायला सुरुवात केली , विलासराव तो बुक्का त्या भांड्यात फ़ेकत होते , आणि रामचंद्र कळशीतल पाणी थोड-थोड भांड्यात ओतत होते, त्यासरशी हवनकुंडातल्या आगिने तापलेला तो भांडा पाणी पडताक्षणीच फ्स्स, फ्स्स आवाज करत धूर सोडत होता, त्यासोबतच कैकृलाक सुद्धा गुरा सारखा आर्त किंकाळ्या फोडत होता, आजुबाजुचा वातावरण ज्याने भयंकर झाल होत , जे काही अतृप्त आत्मे त्या सैतानाचे गुलाम होते , ते सर्व विलासरावांच्या घराबाहेर जमले जात दार खिडक्या, एका विशीष्ट प्रकारचा धड, धड, खट , खट आवाज करत ठोठावु लागले ,
" ए..झ××××नो थांबवा हे सगळ नाहीतर....! हिहिही, खीखी ..! "
विव्हळत , हसत तर कधी मध्येच गलीच्छ शब्दांच वापर करत ते उपद्रव ओरडल , बाहेरुन खिडक्या ठोठावण्याचा तर कधी दार धड-धड आपटण्याचा आवाज आता असहनिय होत वाढला जात होता , की तोच
धाडदीशी दाराच्या चिरफाळ्या उडाळ्या,दाराचे छोठे -छोठे लाकडी तुकडे होत , मोठा आवाज झाला , जगदीशरावांचे मंत्र अद्याप सुद्धा चालुच होते , परंतु विलासराव रामचंद्र यांची नजर दरवाज्याबाहेरच खिळून राहीली होती, त्या दोघांच्या ही हातुन आपल कार्य रोखल गेल , इकडे दरवाज्याबाहेरुन सफेद रंगाच धुक वाहू लागल , अगदी मंद गतीने ते धुक वाहत, जात होत , की अचानक 25 x चा रोल्पले ऑन झाला, आणि सर्व काही शांत मुंगीच्या हालचाली सारख सूक्ष्म रित्या घडू लागल त्या धुक्यातुन एक काळ्या रंगाची साडी घातलेली मादक सौंदर्याचा ठेवा असणारी स्त्री बाहेर आली , विलासराव व रामचंद्र एकटक त्या स्त्रीकडेच पाहू लागले, इकडे जगदीशजींचे मंत्र संपायला आले होते, परंतु ही दोघ एकटक त्या स्त्रीकडे संमोहीत झाल्याप्रमाणे पाहत होती,
पाहता-पाहता जगदीशजींचे मंत्र पठन करुन झाले , त्यासरशी त्यांनी एक गिरकी घेत दरवाज्याकडे आपल शरीर वळून घेत , हाता मध्ये उरलेली थोडीशी राख दगड फेकाव अशी त्या स्त्रीवर फेकली , त्यासरशी त्या स्त्रीच रुप पाळटल , मादक सौंदर्यवती काहीसेंकदातच कुष्ठरोगीत परावर्तित झाली, त्यासरशी विलासराव आणि रामचंद्र यांच संमोहीत चक्र तुटल गेल , विलासराव , रामचंद्र यांनी संमोहित तुटताक्षणीच हलकेच दोघांकडे पाहत डोक हो असा इशारा करत हळवल,आणि त्याच क्षणी पुन्हा एकदा वातावरणातली प्रत्येक हालचाल सुक्ष्म गतीने घडू लागली , ज्याप्रकारे 25x चा video ऑन व्हावा हुबेहुब त्या प्रकारे विलासराव आणि रामचंद्र यांनी एकदाच कळशी व बुक्का त्या भांड्यात ओतल ,त्यासरशी बुक्का व पाण्याच मिश्रण आगदी सूक्ष्म गतीने दोघांच मिश्रन होउन सोनेरी रंगात चमकुन जात त्या कैकृलाक सैतानाच्या धडावर पडल , आणि त्याच वेळेस दरवाज्याबाहेर अवतरलेल्या त्या मंदाकिणीच्या शरीराच रुप काया पाळटल जात तिच्या नाक , कान, डोळे ह्या सर्व अवयवातुन काळपट जाडसर द्रव बाहेर पडू लागल, व एका भयंकर अजस्त्र किंकाळीसरशी तिच्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या,व ती काळी बाहुली सुद्धा जळू लागली, मंदाकिणीचा अंत होताक्षणीच, ते उपद्रव म्हणजेच कैकृलाक मोठ्याने किंकाळल , आणि त्याच्या किंकाळी सरशी घरातल्या वस्तु हवेत उचललेल्या जाऊ लागल्या, भयंकर थराराला सुरुवात होऊ लागली ,इकडे हे सर्व दृष्य पाहून विलासराव व रामचंद्र गांगारले गेले ,
धड-धड करत छाती वाजत होती, नाकातुन वेगाने श्वास बाहेर पडले जात होते , ह्याक्षणी जर कोणी भानावर असेल ,तर ते एकमात्र जगदीशराव होते , वेळ घालवुन चालणार नव्हता...एक -एक क्षण
मोलाचा होता , आता एक मात्र कृती करायची होती , ती म्हणजे कैकृलाक च्या धडावर असलेला, नारळ त्याच्या डोक्यावर फोडायचा होता, ज्याने तो सैतान पुन्हा एकदा नरकात जाणार होता,
जगदीशजींनी एक कटाक्ष रामचंद्र व विलासरावांवर टाकला,
दोघेहे ही आजुबाजुचा हा थरार पाहण्यात व्यस्त होते, परंतु मज्जा म्हणून नाही तर भीती म्हणून, भीतीच्या दडपणा खाली चेपले जात,
ह्या दोघांन मधला एकही कार्य पार पाडण्याच्या अवस्थेत नव्हता, त्याच कारणाने जगदीशजी पुढे सरसावले व त्या भांड्या मध्ये ज्यात कैकृलालच धड होत, व त्या धडावर ठेवलेला तो नारळ होता,
क्षणाचाही अवधी वाया जाऊ न देता जगदीशजींनी
भांड्यात हात घातला व तो नारळ आपल्या हातात घेतला , आणि दात ..ओठांनी चावत जगदीशजींनी, आपला हात हवेच्या वेगाने वर केला , आणि त्याच वेगाने खाली आणणार, की अचानक एक अमानविय धक्का त्यांच्या शरीरास बसला , त्या धक्क्याने जगदीशजींच्या हातुन नारळ सुटला जात वर हवेत उडाला , इकडे जगदीशजींना तो अमानविय धक्का बसताक्षणीच ते मागे उडाले आणि जाऊन थेट भिंतीवर आदळले , आणि त्याचक्षणी विलासरावांना तो नारळ हवेतुन एका चेंडूप्रमाणे खाली येताना दिसला, जो विलासरावांनी आपल्या एका हाताने झेलला , आणि तोच हात वेगाने वर घेत , द्विगुणीत त्रिफाट वेगाने खाली आणत तो नारळ त्या भांड्याच्या दिशेने भिरकावला , आणि एका चाकू सारखा फिरत जात त्या कैकृलाकच्या धड़ावर आदळला एका झटक्यात नारळ फुटला जात, त्या नारळामधुन
लाल रक्तासारख पाणी निघू लागल, आणि त्या लाल रंगाच्या पाण्याने
जणु एसिड प्रमाणे आपल काम करण्यास सुरुवात केली , हळू-हळू ते लाल रंगाच पाणि ज्यासरशी त्या कवटीवर पसरल जात होत , त्यासरशी
त्या कैकृलाकच धड झिजल जात होत, आणी काहीवेळाने त्या भांड्याला एक मोठा होल पडला , व त्या भांड्यामधल जे काही विशिष्ट प्रकारच पाणि, बुक्का साचल होत, ते सर्व त्या काळ्या रंगाच्या खड्डयात
खाली -खाली जात अंधारात नाहीस झाल ,...
आणि ह्या सरशी सत्याचा -असत्यावर विजय झाला,
कैकृलाक ला त्या तिघांनीही ..नरकात आपल्या जागी पाठून दिल
आणि विलासराव ह्या भयंकर चक्रातुन कायमचे सुटले.....








क्रमश..:
खाली वाचा ...:=>

अंत आवडला नसेल अर्ध्या वाचकांना ..कारण वाचकांच मत अस असेल की ..सत्यकथेत अस कस घडू शकत.. ! नाही का प्रिय वाचकांनो...तस सांगायच तर ही एक सत्यकथाच आहे फक्त...एक भयलेखक म्हनुन कथेत ..क्लायमेक्स टाकल...मला सुद्धा विचित्रच
वाटल लिहीताना..की सत्यकथेत .अस कधी ..घडेल...का त्याच कारणाने क्लायमेक्स स्टोरीलाइन कमी पडल गेल..म्हणजेच कथा खुप फास्ट लिहिली गेली.... तस सांगायच तर मी ह्या कथेची खरी घटना सुद्धा लिहिलिये ..एकदा वाचा...😊 ॥/



1996 ......
this story is.based on true story....
कै-.. मंदाकिनी...राक्षसाची पुजा करणारी एक भयानक स्त्री .
कै .कृलाक..- नरकातला एक भयंकर ...राक्षस...

1996 ला घडलेली ही घटना खुपच विचित्र होती ,
आजोबांचे मित्र म्हणजेच विलास...त्यांच ( खर नाव - चांगो..-माळी) होत ..चांगो यांच्या भावाच्या बायकोने एक करणी केली होती, ज्याने निताबाई ( खर नाव -फशीबाई दरवेळेस आजारी पडायच्या, मग त्या काहीकाळ बर होण्यासाठी माहेर ला जायच्या मग तिक्डे त्यांना लागलीच बर वाटायच...आणी इकडे त्यांच्या सासरी नव्या घरी आल्यावर मग ..पुन्हा एकदा त्रास सुर व्हायचा..4-:5 वेळा अस झाल्याने फशीबाइंना कसल तरी संशय येऊ लागला होता मग त्यांनी मिळुन जगदीश => खर नाव वाळक्या ) यांच्या कडून
मदत घेतली होती ,ते भुत, प्रेत उतरवायचे, त्यांनी मग काही साधना केल्या ज्याने हे सर्वकाही चांगो यांच्या वहिनी करत आहेत हे उघडकीस आल , त्यादीवशी चांगो ह्याच्या पत्नी फ़शीबाई व वहिनी गोदाबाई.मध्ये खुप मोठा वाद निर्माण झाला होता, जे मी कथेमध्ये सांगितल नाही , भांडन झाल त्यादीवशीपासून मग फशी बाईंना काही विचीत्र स्वप्न पडू लागली, स्व्पनात एक 12-13 फुट काळा माणूस दिसू लागला, ज्याला चेहरा नव्हता , तो नेहमी स्वप्नात दिसल्यावर हेच म्हणायच की मी तुम्हाला माझ्या सोबत घेऊन जाईल, त्या पडणा-या स्व्पनांसरशी फशीबाईंची अवस्था दिवसेंदिवस खालावत चाल्ली होती, त्याच कारणाने चांगो ह्यांनी रामचंद्र म्हणजेच माझे आजोबा ह्यांच्या मदतीने जगदीशजींना ( वाळक्या ह्यांना..सांगून ही करणी त्यांच्या वहिनीवर पळटवण्यास सांगितली होती कारण वाळक्या माझ्या आजोबांचे चांगले मित्र होते, करणी पलटवल्या नंतर फ़शीबाईंचा त्रास दिवसेंदिवस कमी-कमी होत गेला , परंतु करणी पळटल्याने गोदाबाईना 6 महिन्यानंतर एक लकवा मारला ज्याने त्यांचे हातपाय लकवा ग्रस्त झालें, मग त्यासरशी खाण्यापिण्याचे,नैसगिर्क विधीचे अशे कित्येकतरी त्यांचे हाल झाले ,
आणि 5 वर्ष त्यांनी कशी तरी ह्या रोगातुन, शिक्षेतुन काढली,
मग 5 -1 -2001 ला त्यांनी अखेरचा श्वास घेतला,
जगदीश -वाळक्या यांच्या सारख्या चांगल्या माणसाने अशा चेटूक ग्रस्त कित्येक तरी लोकांची मदत केली...होती! आणि ह्या अशा पुरुषाची प्राणज्योत
22-6-2012.... ला मावळली... परंतु आज ही त्यांच कपड्याच दुकान
चालू असुन ... त्यांची मुल...स्व:मालकी हक्काने मिळुन- मिसळून चालवतात...!

मित्रांनो सदर कथा सत्यघटनेवर आधारीत असुन ...त्यात फक्त climax sccen दिले गेलेत...बाकी...स्टोरी माझ्या आजोबांनी जशी सांगितली तस मी इथे सांगितली आहे .! कथेत आता पाहीलेला ending सीन तुम्हाला नक्कीच आवडला नसेल, परंतु जगदीशजी-वाळक्या यांनी कोणती विद्या केली होती, हे त्यांनी आजोबा व त्यांच्या मित्राला सांगितल नव्हत....!
त्याच कारणाने मी आपल क्लायमेक्स ...जशास तस लिहिल...
माफ करा....

मी लाइब्रेरित एक ग्रंथ वाचला त्यात मला कैकृलाक -मंदाकिणी
ह्या दोन्ही अमानविय शक्तिंबदल थोडक्यात कळाल ज्यावर
मी एक काल्पनिक भयकथा लिहीणार आहे...

ह्या कथेतल्या नरक देव कैकृलाकच्या माहीतीवर आधारीत कथा

धनगडमहल .- कैकृलाक..