1 Taas Bhutacha - 12 books and stories free download online pdf in Marathi

१ तास भुताचा - भाग 12

फसगत भाग 3

धाऊ जरी गावात राहणारा एका सामान्य माणुस असला! तरी त्याला थोडफार लिहीता वाचता येत होत.नाहीतर त्याला पाहून
कोणत्याही सुशिक्षित माणसाला हेच वाटल असतं, की हा नक्कीच
एक अडाणी,अंगुठाबहादूर आहे. तब्बल वीस मिनीट चालून धाऊने
दोन एकर बागेचा शेवटच तळ गाठला होता. परंतु त्या शेवटच्या तळाला गाठता-गाठता त्याला किती विलक्षण अनुभवातु जाव लागल होत.विजेरीच्या प्रकाशात काहीक्षण दिसलेली ती विचित्र-बिभत्स रुपाची आकृती, नी त्या आकृतींवरुन विजेरीचा प्रकाश पुढे सरकताच त्या जागी अंधारात चमकलेले दोन विस्तवासारखे डोळे. त्या डोळ्यांत पाहता क्रोध , लालसा,वासना, सुड,भूक ह्या सर्वांच्या छवीच दर्शन क्षणात घडत होत.
नाहीतर धाऊच्या हातून हातात घट्ट पकडलेली ती विजेरी भले खाली कशी पडली असती? धाऊला त्या डोळ्यांत पाहता ते सर्व जाणवल होत, ती भीती मनात काळोखासारखी दाटून आली होती.परंतु ती आकृती नाहीशी होताच , धाऊच्या मनाने तो भास होता असं समजलं होत.मानवाच मन जेव्हा घाबरत -बिथरत त्यावेळेस मनात एक मोटीवेशनल विचार आपल मेंदू कार्यरत करायला सुरुवात करतो.
उदाहरणार्थ समजा एक फोबिया पेशंटला गावात, शहरात कोणि आजुबाजुच मेल, कोणी वारल, दगावल, तर एक विशिष्ट प्रकारची भीती वाटायला सुरवात होते.त्या मेलेल्या प्रेतात्म्याचा चेहरा सतत त्या रोग्याच्या डोळ्यांसमोर उभा राहत असतो, रात्री अपरात्री पर्यंत त्या रोग्याला झोप येत नाही. मनात भलते सलते विचार येत असतात, जिव द्यावासा वाटत असतो, परंतु त्याक्षणी त्या रोग्याची इतकी हिम्मत होत नाही,! तर का? कारण त्याच्या मेंदूतले सकात्मक विचार त्याला सतत बळ पुरवत असतात, कि सर्व ठिक होईल, घाबरु नकोस! तो मेला , त्याच प्रेत जाळल सुद्धा! आता घाबरायच नाही.मानवाचे विचार हे एक असं मोटीवेशन आहे.जो कोणत्याही परिस्थितीतुन त्याला बाहेर काढु शकतो.धाऊ सोबत ही हेच झाल होत.आपण जे पाहिल ते भास होत
अस त्याच्या मनाने मानल होत.ज्याने ती भीती दुर हिबाळली गेली होती.
परंतु कायमची नाही बर का! समोर कंपाउंडची नऊफुट भिंत दिसुन येत
होती.नी त्या सफेद भिंतीवर कालपट रंगाने एक वाक्य लिहिल होत.
" बाबा मला वाचवा!" धाऊने हे वाक्य उच्चारल.नी त्या भिंती जवळ पोहचला. त्या कालपट रंगाच्या नावाजवळ पोहचताच, धाऊच्या दोन्ही नाकपुड्यांत एक कुजका सडका घाण वास घुमला.धाऊने जरा डोळे छोठे करुन समोर पाहिल, वास त्या नावातुन येत होता.
ह्याचा अर्थ ते नाव, नक्कीच मानवी रक्ताने रेखाटल होत.जे की लाल रंगातुन सुखून कालपट झाल होत.परंतु आताह्याक्षणी इथे कोण उपस्थीत होत?की ज्याला मदत हवी होती?
हा संदेश नक्की कोणी लिहिला होता,का लिहिला होता? नक्की काय गुढ होत ते.? धाऊच्या डोक्यात नाना त-हेचे विचार येऊ लागले .
की तेवढ्यात झाडांत मागे सळसळ झाली,त्या स्मशान शांततेत तो आवाज , ती शांतता मुळाच्या खोडापासुन दुभागुन गेला, नी त्याचक्षणी धाऊची विचारक्षीणतेची तंद्री भंग पावली.धाऊने हातात विजेरी घेतलेल्या अवस्थेतच झटकन मागे वळुन पाहिल.
समोर आठफुट ऊंचांपर्यंत धुक्याची लहर हवेसारखी वाहत होती.
आणी त्या गाढ धुक्यात एक तरुण युवतीची पाठमोरी आकृती ऊभी होती.जी की धाऊला विजेरीच्या पिवळ्याजर्द प्रकाशात दिसली.
ज्यासरशी त्या विजेरीचा प्रकाश त्या आकृतीवर पडला , ती विजेरी चर चरु लागली.प्रकाशाच्या सीमारेषा कमी जास्त होऊ लागल्या.पिवळा प्रकाश विझला गेला.
" आर हिला काय झाल.!" धाऊने एकदोन वेळा विजेरीवर हात मारुन तीला चालू करण्याचा प्रयत्न केला. परंतु निष्फळ,व्यर्थपणाने तो हिबाळला गेला.शेवटी तो प्रयत्न सोडून धाऊने पुन्हा समोर पाहिल,
आणी समोर पाहाताच त्याला एक अकल्पित दृश्य दिसल.कारण समोर-कारण समोर आता ह्याक्षणी कोणीही उपस्थित नव्हत.
"आर ती पोर कुठ गेली?"धाऊने स्व्त:लाच प्रश्न केला.साहजिकच होत ते प्रश्ण .तस्ंही सर्व काही बुद्धीला आकळन क्षमतेला लाजवेल अस घडत होत, ज्याचा मेल काही बुद्धीला बसत नव्हता.काय घडतंय काही कळंत नव्हत.वर आकाशात चंद्राच्या उजेडाला कालपट ढग सापासारखे विलखा घालत होते,नी ह्या भल्यामोठ्या सृष्टीवर कालअंधार पसरत होता.गाढ धुक्याचे वलय एका मागोमाग पुढे पुढे सरकत होते, तशी तशी ही भयान मंतरलेली रात्र सरत होती.धाऊने कुठल्यातरी टिव्हीवर कधी तरी जयेश झोमटे प्रस्तुत द-अमानविय आग्यावेताळ तीन तास सात मिनीटांचा चित्रपट पाहिला होता.ज्या चित्रपटातली भय दृष्य , अमानवीय लहरींची जाणिव मनातली भीती नी ते विचार पोखरून पोखरुन काढत होते.मानवाला भीती वाटायला लागली, की हे चित्रपटातले,भुताखेतांच्या गोष्टीतले भय दृष्य मनात एका विशिष्ट प्रकारच्या भयरचनेने साकार व्हायला सुरुवात होते, अस दरवेळी होत.काहीजणांना तस अनुभव असतोच.तुमच्यातल्या काही वाचकांनां सुद्धा असेलच नाही का?.मला तर आहे ! धाऊची नजर त्या अंधारात चौही दिशेना त्या अनोळखी मुलीचा शोध घेत होती, की अचानक ती विजेरी चर चरकरत चालू झाली.धाऊने तर देवाला हातच जोडले. व विजेरीचा प्रकाश त्या बागेतल्या झाडांभोवती मारु लागला.
हिरव्या रंगाची पाण्याने भिजलेली ती झाडांची पान, अक्षरक्ष मेलेल्या प्रेताला आंघोळ घालुन उभ्या केलेल्या हिरव्या साडीतल्या सवाशीणी सारखी भासत होती.मानवाच्या शारीरीक रचनेत विशीष्ट प्रकारच्या चेतातंतु असतात. ज्या धोक्याच्या काळावधीत अफाट द्विगुणीत सक्रिय
होतात.जर आप्ल्या मागे कोणी उभ असेल,आपल्यावर चोरुन पालथ ठेवत असेल, तर मानवाच्या ह्या चेतातंतुना त्या धोक्याची जाणीव होते.
मेंदूला कसला तरी संदेश मिळतो , डोक्यातल्या सर्व नसा काहीक्षण खेचल्या सारखुआ होतात. नी तेवढ्यात धोक्याच्याक्षणी मनूष्य मागे वळून पाहतो.धाऊला सुद्धा असंच काहीतरी जाणवत होत. विजेरीचा प्रकाश झाडांवर मारता मारता आपल्या मागे काहीतरी उभ आहे.
आपन मागे वळायचीच वाट ते पाहत आहे.मागे वळून पाहव का?
मागे वळून पाहिल आणी त्याने काही केल तर? नक्की ह्या सर्व घटना पाहता मागे जे काही उभ आहे ,ते मानवीय तर मुळीच नाही.धाऊ ला त्याची जाणीव झाली होती.मणूष्याने जी काही भुत खेतांना नाव ठेवली आहेत.जस भुत, पिशाच्च,हडळ, सैतान, त्यातलच काहीतरी धाऊच्या मनात भीती निर्माण करत होत. विस्फारलेले डोळे, कपाळावरुन ओघळत सूक्ष्म गतीने खाली खाली येणारा तो घामाचा द्रव बिंदू भीतीची गणना दर्शवत होता.छातीची धड-धड काळिज पिळून टाकत होती.
कानसुळ्या गरम झाल्या होत्या शरीरावरचा एकनी एक केस ताठरला गेलेला. भीती कय असते , ती जाणवल्या भोगल्याशिवाय मुळीच कळ्ंत नाही. हे एक सत्य आहे ,जे अकल्पित असत्याच्या वरचढ आहे .
आ वासलेल्या तोंडाने , फुललेल्या श्वासाने आणि क्षणा क्षणाला भीतीने खालीवर होणा-या छातीच्या पिंज-याने धाऊने हळूच मागे मागे पाहायला सुरुवात केली. छातीची धड धड वाढत होती.गळा अक्षरक्ष सुखून गेला होता.थंडीच्या सेल्सियस हाड मांस गोठावणा-या वातावरणात सुद्धा धाऊला निथळणारा घाम फुटला होता.भीतीच्या असुरी छायेखाली दाबत धाऊने जागेवरच एक गिरकी घेत वळुन थेट समोर पुढ्यात पाहिल.समोरच दृष्य पाहताच डोळे विस्फारले
छातीचे ठोके थांबले, श्वासांची गती अशीकाही मंदावली की कोण्या अज्ञात शक्तिने गळा आवळला असावा. त्या कालपट रंगाच्या नावामधोमध एक बिभत्स हदयाचा थरकाप ऊडवनारा आकार उभा होता. नऊ फूट काळपट रंगाचा सैतानासारखा, खप्पड चेह-याचा आणि त्या खप्पड चेह-यावर सफेद रंगाने काही विशिष्ट प्रकारच्या आकृत्या रेखाटलेल्या दिसत होत्या.त्या आठफुट आकृतीच्या अंगावर
कसलेही वस्त्र नव्हते.पुर्णत शरीराला माती फासलेली ,जणु चिकटल्यासारखी वाटत होती.आणि त्या आकाराच्या चेह-याला पाहुन धाऊला काहीतरी आठवत होत.हा चेहरा आपण कोठेतरी पाहिला आहे , परंतु कोठे हे मात्र लक्षात येत नव्हत.धाऊ पासुन ठिक वीस पावलांवर ती विचित्र वुडू प्रजातीची आकृती ऊभी होती.तिने धाऊकडे पाहत हालचाल करायला सुरुवात केली. हळूच त्या अभद्र सोंगधा-या सैतानाने आपला एक हात पाठीमागे घालुन एक मातीपासुन बनवलेली दोन फुट इतकी चौकलेटी रंगाची बाहूली बाहेर काढली. मानवा सारखे हात पाय , सफेद बुभळ आणि त्यावर एक मीरी सारखा टिपका.बस्स येवढच काय ते रुप होत त्या बाहुलीच.धाऊ एकटक भेदरलेल्या अव्स्थेत त्या अभद्र आकाराच्या घडणा-या प्रत्येक कृतीकडे पाहत होता. त्याची वाचा अशी काही बसली होती , की मेंदू अक्षरक्ष बधीर झाला होता. बाहुली बाहेर काढून त्या सैतानाने कमरेला लावलेला एका चामडयाच्या बटव्यातुन एक सुई बाहेर काढली, आणी एक भयंकर डोळे वटारुन दात विचकत हसत ती सुई हळू हळू त्या बाहूलीच्या दिशेने घेऊन जाऊ लागला. की त्याच क्षणी
आजुबाजूला ऊष्णतेच प्रमाण वाढु लागल! थंडी जाऊन गरम होऊ लागल. आणी त्याचवेळेस धाऊच्या कानांवर एक लहान मुलाचा आवाज पडला.
" ओ ..काका ! सुई टोचुन देऊ नका! सुई टोचुन देऊ नका!"
धाऊने त्या आवाजाच्या दिशेने पाहिल, एक आठ नऊ वर्षाच्या लहान मुलाची आकृती समोर ऊभी होती.त्या लहान मुलाच्या शरीरातुन अखंड डोळे दीपवणार पांढरट तेज बरसत होत.ज्या तेजाने आजुबाजुचा परिसर प्रकाशुन गेला होता.धाऊने बधीर झाल्यासारख त्या मुलाकडे पाहिल, जणु धाऊ संमोहित झाला होता.त्याचे हात -पाय गोठले गेले होते.शरीराच्या अवयवांची हालचाल थांबली होती.धाऊने पुन्हा एकदा त्या अभद्र सैतानाकडे मान वळवली , दात विचकून हसत-हसत ती ब्याद आपला सुई असलेला काळा कुट्ट हात त्या बाहुलीच्या दिशेने हळू-हळू वाढवत होती.त्या लहान मुलाने धाउंकडे पाहील,धाऊ एकटक पुतळ्या सारखे उभे होते.त्या मुलाच्या आत्म्याच्या चेह-यावर धाऊंना वाचवण्याची छटा दिसुन येत होती, तो काहीतरी विचार करत होता.
की धाऊना वाचवायला हव. इकडे हळू हळू त्या सैतानाचा हात त्या मातीने बनलेल्या बाहुलीच्या दिशेने येत होता. की तोच त्या मुलाने
एक स्मित हास्यहिंत कटाक्ष धाऊवर टाकला,नी दुस-याचक्षणाला एक जळजळीत कटाक्ष त्या आकृतीकडे पाहून,त्या मुलाने आपला एक हात त्या आकृतीच्या दिशेने उंचावला .की त्याचक्षणी त्या लहानग्या मुलाच्या हातुन एक विद्युत निल्या रंगाच्या प्रकाशीत उर्जेचा डोळे दीपवणारा झोत असा काही त्या आकृतीच्या दिशेने निघाला , की तो वार थेट त्या सैतानाच्या छाताडावर बसला. दिवाळीत पेटवल्या जाणा-या फुलकांड्यांसारखा चकचकीत प्रकाश काहीक्षण त्या सैतानाच्या छाताडावर वार होताच दिसला.आणि पुढच्याचक्षणाला त्याच्या हातुन ती मातीची बाहुली उडून थेट धाऊच्या पायांखाली आली.
त्यासरशी धाऊच्या शरीराला एक झटका बसला जणु धाऊ
संमोहीत क्रियेतुन बाहेर आला असावा.
" काका ती बाहुली उचला , काका ती बाहूली उचला!"
धाऊच्या कानांवर त्या मुलाचा पुन्हा एक आवाज आला. ह्यावेळेस धाऊचे हात पाय त्याला साथ देत होते.शरीरावर स्व्त:च नियंत्रण होत.
" काका ती बाहुली उचला? तो पुन्हा उठुन उभा रहायच्या अगोदर,
ती बाहुली उचला आणि पळा इथुन.!" धाऊने एकवेळ गांगारल्या सारखे
समोर पाहिल, खरच तो अवाढ्व्य सैतान स्व्त: च्या पायांवर उभा राहत होता.
" काका ती बाहुली उचला , काका ती बाहूली...! " एका पाठोपाठ चारही दिशेतुन आवाज येऊ लागला, धाऊने त्या मुलाच्या दिशेने पाहिल.परंतु आता ह्याक्षणी तिथे कोणीही उपस्थित नव्हत.
धाऊने स्व्त:च्या शरीराची हालचाल केली नी मातीची दोन फुट बाहुली हातात उचलुन घेत त्या अभद्र सैतानाकडे पाहून सरळ दिशेने पळ काढला.

क्रमश:

पुढील भाग वकरच 🙏🏼😊..

 

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED