1 Taas Bhutacha - 16 books and stories free download online pdf in Marathi

१ तास भुताचा - भाग 16

भाग 16

प्रेमाची ताकद 1

भाग 1

जंगलातल्या मातीच्या रसत्यावरुन ती चार चाकी गाडी मंद वेगाने धावत होती. गाडीच्या हेडलाईटच्या पिवळ्या प्रकाशात पुढचा नऊ फुट लांबीचा सरळ गेलेला रस्ता दिसत होता. आजुबाजुला कमरे इतकी वाढलेली हिरवी झुडपे आणि त्यांपुढे झाडांची गर्दी ऊभी होती. अंधारातुन रातकीड़यांची किरकर गाडीच्या बंद काचांना ठोठावत होती जणु त्यांना गाडीआत जाऊन किंचाळायच होत, आवाज द्यायचा होता. गाडीत सीटवर अभय वय सव्वीस उर्फ अभी बसला होता. त्याच्या बाजुलाच सीटवर अंशुना उर्फ अंशू वय पंचवीस बसली होती. मुलगी आहे म्हंणजे काही वेगळ विचार आणु नका! दोघेही मित्र होते , शहरात राहायचे,

म्हंणायला अभी काही शहरातला नव्हताच, तो ह्या जंगलात वसलेल्या माटळ्यावाडीतला गरीब मुलगा होता. शिक्षणासाठी तो शहरात गेला होता-नव नव असतांना त्याला पैशाची अडचण असल्याने घर मिळत नव्हत-तेव्हा एका बस स्टेन्डवर त्याची ओळख अंशूशी झाली होती. तीने अभिला एक चांगला माणुस म्हंणुन आसरा दिला होता. तिच्या त्या मदतीमुळेच आज अभी एका कंपनीत उच्च पदावर कामाला लागला होता.तब्बल दोन वर्षानंतरत्याला आपल्या घरातल्यांची आठ्वण येत होती. म्हंणुनच त्याने माटळ्यावाडीला जायच ठरवल होत-व सोबत म्हणून अंशुला घेतल होत.

" ए अभी हे जंगल आहे ना ? मग इथे वाडी वगेरे नक्की आहे ना? की"

अंशू मध्येच थांबली.

" की काय?" अभी छद्मी हसला " मी इथे गाडी थांबवेल आणि, ह,ह,हं,हं!" अभी हसु लागला होता. त्याची ती चेष्टा ती ओळखून होती.

" अभी आई एम सिरीयस हं." अंशू मध्येच म्हंणाली ,पुढे पाहू लागली. तसा एकक्षण तो तिच्याकडे पाहतच राहिला, तिच्या अंगावर एक फिकट निळसर ड्रेस होता.गळ्यावर एक ओढणी अडकवली होती. केस मागे देवी सारखे सोडले होते. तिच्या त्या गोलसर चेह-यावरती लेक्मीने सोन्याची चकाकी दिली होती. डोळ्यांवर काजळ फासल होत.पातळसर ओठांवर हलकीशी गुलाबी लिपस्टिक लावली होती-तीचे ते टपोरे थेंब डोळे तिची सभ्यता दर्शवता होते. अभीच्या मनात एक विचार आला.

" यार आपल्यात अस काय आहे? की माझ्या सारख्या न ओळख असणा-या मुलाला हिने विश्वास ठेवून तिच्या फ्लैटमध्ये राहायला जागा दिली.आणि माझ्या एका वाक्यासरशी ह्या अशा जंगली भागात माहीती नसतांना ही यायला तैयार झाली? " तो एकटक तिच्याकडे पाहतच होता. ती मात्र पुढे पाहत होती.की तेवढ्यात तीने वळुन त्याच्याकडे पाहिल.

" काय रे काय झाल? अस काय बघतोयस?"

" मी ..!" प्रथम तो हसला " छे नाही ग " अस म्हंणतच तो ड्राईव्ह करु लागला. आजुबाजुला सहज नजर फिरवली तर शेकडोने ऊभी ती झाडांची फौज कब्रस्तानातल्या कबरींसारखी भासत होती. अंधार जणु झाडांना अजगरासारखी मीठी ताणुन बसला होता. मातीच्या रस्त्यातुन गाडी खड्डे लागले की हळत डुलत पुढे जात होती. शेवटी काहीवेळाने हे दोघे माटळ्यावाडीत पोहचले. एक साठ सत्तर घरांची वस्ती होती. वाडीला म्हंणायला जंगलाने आपल्या पोटातच घेतल होत.अगदी जुनाट परंपरेच्या लोकांचा वस्ती ,जुनी सारणी,जुनी,राहणी, विचार तर्क, सर्वकाही जुन होत. एवढच नाहीतर तिथे लाईट सुद्धा नव्हती. फ़क्त लोकांचे कपडेच काय ते कापडाचे होते. अभीची गाडी पाहून वाडीतली मुल मोठ्या आश्चर्यकारक उत्सुक नजरेने तिच्याकडे पाहत होते जणू कधी गाडी वगेरे त्यांनी पाहिलीच नसावी. अभी-अंशू दोघेही आपापल्या बाजूच गाडीच दार उघडून बाहेर आले.समोर एक विटांच बांधकाम केलेल घर होत. घराला दार वगेरे काहीच बसवल नव्हत, चौकट उघडीच होती. आणि दाराच्यावर एक काळी बाहुली अडकवली होती. हो तीच करणी जादूटोणाला वापरली जाणारी बाहुली. गाडीच आवाज ऐकुन एक धोतर नेसलेला शरीरयष्टीने माजलेला माणुस बाहेर आला. राकिट चेहरा, डोक्यावर टक्कल, तोंडावर एक महिन्याची दाढी उगवली होती. दोन्ही हातांत चकचकते चंदेरी कडे घातले होत. गळ्यात एक काळ्या रंगाची चौकोनी ताविज घातली होती.

" बाबा !" अभीने अस म्हंणतच! त्याच्या वडिलांचे आशिर्वाद घेतले. अंशू एकटक त्या दोघांकडे पाहत होती. तिला वाटल आता त्याचे वडिल आभिच्या खांद्याना पकडुन त्याला एक मिठि मारतील, आनंद अश्रु गाळतील, पन तसं काहीच घडल नाही, त्यांच्या त्या टपो-या भेदक डोळ्यांनी ते फ़क्त त्याच्याकडे पाहत होते बस्स. तसेच ते गावात निघुन गेले. जातावेळेस एक कटाक्ष त्यांनी अंशूवर टाकला होता आणि ते छद्मी आसुरी हास्य तिला दिसल होत. पन त्याचा काय अर्थ घेणार होती ती?

" अंशू माझे बाबा अशेच आहेत ! सो जास्त विचार करु नकोस, ये मी माझ्या आईशी ओळख करुन देतो तुझी!" अभीच्या वाक्यावर ते दोघेही आत जायला निघाले होते -की तोच .

" थांब तिथेच !" एका स्त्रीचा आवाज आला. अभी-अंशू दोघांनी मिळुन दरवाज्यात पाहिल. एक पांढ-या केसांची , लुकड्या शरीरयष्टीची, अंगात काळीसाडी घातलेली एक बाई तिथे ऊभी होती.

" दाईमा !" अंशूचा स्वर जरासा जड झाल होत. एवढ्या वर्षांनंतर त्याच्या आईला(दाईमाला) त्याने पाहिल होत, भावना कश्या दुधाची टोपशी तापताच दुध उकळाव्या तश्या मनातुन वर आल्या होत्या.

" थांब पोरा!" दाईमा घरात गेली, येतावेळेस तिने हातात ओवाळणी आणली होतू, पन किती वेगळी. त्या सोन्याच्या ताटात दिवा होत-पन विझलेला, एका वाटीत लाल कुंकू होत- पन किती पातळसर जणू वाटीत ताज रक्तच ओतळ असाव, बाजुलाच तांदळांच्या सफेद अक्षतांजागी, लाल तांदूळ होते-तोंड़ात गोडधोड टाकण्यासाठी साखर वगेरे अस काहीही नसुन, एका मांसाचा कच्चा तुकडा होता.अंशू हे सर्व पाहून अगदी गोंधळून गेली होती. तिचा तो गोंधळलेला चेहरा ते स्पष्ट दाखवत होता.

" दाईमा ओवाळणी राहूदे! " त्याने कसतरीच हसत अंशूकडे पाहिल,

" बर या आत या!" म्हंणत त्या चौकटीतुन बाजुला झाल्या. दोघेही आत शिरले. घरात पाहिला एक हॉल होता-भिंती मातीने सारवल्या होत्या.

उज्व्या बाजुला एक उघडी चौकट दिसत होती- तिथे स्वयंपकघार,न्हानीघर होत. डाव्या बाजुला अभीची आराम खोली होती. दोघांनाही थोडफार सामान होत ते हॉलमध्येच ठेवल आणि फ्रेश झाले.दाईमाने तो पर्यंत त्यांची ताटे वाढली होती.

एक चटई, पुढे दोन चांदीची ताटे दिसत होती- त्यात तांदळाच्या भाकरी, एका वाटीत कोंबड्याचा रस्सा, बाजुलाच पोळवलेले कोंबड्याच मांस होत.कांदा, गाजर,काकडी, आणि एक वाटी दिसत होती-त्यात काहीतरी लालसर ठेवल होत. नक्कीच रक्त.आणि त्या रक्तावर काजु,बदाम किसून टाकलं होतं.

" आई हे घे !" त्याने ती रक्ताची वाटी दोघांच्याही ताटातून उचलून

दाईमा कडे दिली.

" अभ्या हे काय करतोस? इतक्या वर्सांमी आलास म्हंणजे आपली प्रथा विसरला काय? आणि लगीन पन केलस व्हय शहरात?" दाईमाने एकापाठोपाठ मनात असलेल्या प्रश्णांचा भांडारा उधळला.

" अंग दाईमा कोण म्हंटल की मी लग्न केल आहे, ही माझी मैत्रिन आहे ! बायको नाही. " तो जरासा हसला.

" काय?" दाईमा पटकन जागेवरुन उठलीच.

" अरे अभय तु येडा झाला आहास काय? मला वाटलं ही पोर तुझी बायको हाये.अरे एवढी वर्ष इथ राहिलंस आणि दोन वरीस शहरात काय गेलस, इसरलस सगळ्ं! " दाईमाच्या चेह-यावर राग मुळीच नव्हता उलट त्या चेह-यावर भीतीची पडछाया उमटू लागली होती.

" अंग दाईमा अस का बोलत आहेस!"

" काय इचारु नकोस आताच्या आता उठ ! आण निघुन जा ह्या पोरीस्नी घेऊन ह्य वाडीतुन! पुन्हा फिरकू नकस इकड " अंशू गप्प राहून एकटक हे सर्व ऐकत होती. तिला काय चाललं आहे हे काहीच कळत नव्हतं.

" अहो आई माझ काही चुकल का!"

" नाय गो बाई तुझ काय चुकल नाय. अंग तुला ह्या वाडीबदल काय ठावुक नाय ग म्हंणून! हे बघा माझं ऐका तूम्ही परत जा, निघा इथून !"

" दाईमा -दाईमा अंग अस काय झाल आहे की तु आम्हाला असं अचानक जायल सांगतेस!" अभी न समजुन म्हंणला. त्यावर दाईमानर एकक्षण गप्प राहून पुन्हा बोलायला सुरुवात केली.

" अर अभ्या उद्या रंस्ममा देवाची जत्रा हाई, आण आज रातच्याला देवास्नी ह्या वाडीतला माणुस सोडुन एक नरबळी दिला जात माहीतीये ना!" दाईमा अस म्हंणली, तेवढ्यात अभीच्या डोक्यावर एका काठीचा वत झाला,.

" आहाऽऽऽऽऽ " अभीच पुर्णत शरीर पोटावर पडल.

" अभ्याऽऽऽऽऽ" दाईमाचा आवाज .

" अभीऽऽऽ" अंशूचा आवाज.

" हा,हा,हे,हे,हे," आसुरी हास्य करत अभीचा बाप आणि बाजुलाच

धोतर, वाढलेले केस, आणि कपाळावर एक काळसर टिकला लावलेली चार पाच मांणस उभी होती. ती सर्वजन अंशूकडे कुत्सीक हसत पाहत होती.

" अर ए चांडाळा! स्व्त:च्या पोरावर वार करायला हात कस काफल नाय र तुझ!" दाईमा हळुच खाली बसली, अभीच्या डोक्यावर झालेल्या वाराने रक्ताचा पुर वाहत होता .

" अर हट्ट, सैतान हाई मी, सैतान ! ह्या वाडीतला एक नी एक माणुस सैतानाच पोर हाई. आण ह्यो माझा पोर नाहीच, हा जव्हा शहरात गेला तव्हाच मेला माझ्यासाठी, आण आता ही पोर!" अभीच्य बापाने छद्मी हसत अंशूकडे पाहिल " ही पोर आता माझ्या रंसाम्मा देवाच भोग हाई भोग, हा,हा,हा,हा" अभीचा बाप पुन्हा मोठ्याने हसू लागला. त्याला जोड म्हंणुन ते बाकीचेही हसु लागले-ते हसण सामान्य मुळीच नव्हत-आसुरी आनंद भरला होता त्यात. अंशूची भीतीने वाचा बसली होती, एकाक्षणासाठी तिला काय सुरु आहे ह्यावर विचार करायलाही वेळ मिळाला नव्हता, अभीच्या डोळ्यांच्या पापण्यांसमोर अंधूकश्या दृष्यांची हालचाल भिंगू लागली होती, कानांवर आवाज येत होता पन कळत नव्हत , काय सुरु आहे ? काय नाही?

" ए पकडा रे हीला! " अभीचा बाप ओरडला, तसे त्या बाकीच्यांनी अंशूच्य मऊशार हातांना जोरात पकडल तिच्या हाताच्य बांगड्या त्या पकडीने फुटल्या.

" ए हात लावू नका त्या पोरीस्नी, " दाईमाने बाजूचा सुरा घेऊन तो हातात पकडला, तोच डावि-उजवीकडे फिरवू लागली. तसे ते पुढची मांणस मरणाच्या भीतीला घाबरुन मागे सरकू लागले.

" चंदे हरामखोर गद्दार साली ! बाजु हो नाहीतर !" अभीचा बाप दात ओठ खात दाईमाच्या अंगावर जात खेकसला. पन सू-यामुळे तो मागे हटला. पोराच्या रक्षणासाठी मातेचा अवतार रणचंण्ड़ीका रुप धारण करुन शकतो,हे त्याला ठावुक होत.

" नाहीतर काय? काय करसाल ? "

" तुझी ही हिम्मत चंदे, वर तोंड करुन बोलतेस! रां×× साली, "

" ए गप्प , माझ्या पोरांसाठी माझ जिव गेल तरी चालल पन ह्या पोरिस्नी म्या तुम्हाला हात लावून देणार न्हाई."

दाईमाचा गडगडाटी आवाज घुमला. अंशू बाजुला उभी राहून डोळ्यातुन अश्रु गाळत होती.

" ए पोरी तु घाबरु नको!" दाईमा अंशूकडे पाहत बोलत होती, अभीच्या बापाने तिरकस नजरेने तीच्य नजरचुकीचा फायदा घेतला , तो हळूच चोरपावलांनी पुढे आला, व दाईमाच्य हातातला सुरा हिस्सकावुन घेतला. अभीच्या डोक्यावर झालेल्या प्रहाराने त्याची शुद्ध हरपायला आली होती.-डोळ्यांपुढे अंधूक दिसू लागल जात जड झालेल्या पापण्या मिटणार होत्या.आणि तेवढ्यात एक ओळखीची वेदनादायक किंकाळी त्या घरात घुमली.."आऽऽऽऽऽऽऽऽऽ" अभीच्या बापाने दाईमाच्या पोटात सुरा खुपसला होता, तीच शरीर अभीच्या डोळ्यांपुढेच पडल होत.

" दाईमाऽऽऽऽऽऽऽऽ" अभीच्य तोंडून एक हलकासा आवाज व डोळ्यांतुन अश्रु बाहेर आला त्याची शुद्ध हरपली.

" ए घेऊन चला रे हीला बारा वाजाच्या अगुदर संमदी तैयारी व्हायला हवी !" अभीच्या बापाने बाकीच्या मांणसांना आदेश दिला, तसे सर्वांनी अंशूला धरुन दरवाज्यातुन बाहेर नेहायला सुरुवात केली.

" अभी वाचव, हैल्प..अभीऽऽऽऽऽऽ!" अंशू जमिनीवर बेशुद्धावस्थामध्ये पडलेल्या अभीला साद घालत होती-पन प्रतिउत्तर येत नव्हत, शेवटीकाहीवेळाने तीचा आवाजही कमी-कमी होत बंद झाला.



क्रमश :






पुढचा भाग लवकरच :








इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED