१ तास भुताचा - भाग 18 jay zom द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

१ तास भुताचा - भाग 18

प्रेमाची ताकद आंतिम
भाग 3 अंत.

वातावरणात चांगलच गारवा भरायला लागला होता. मंद धुक्याचे वलय आजुबाजुच्या परिसराला झाकण्याचा प्रयत्न करत होते. परंतु त्यांना...यश? यश मात्र काही येत नव्हत. तरीही त्यांचा चोरटा प्रयत्न मात्र सुरु होता.निल्या आकाशात चांदणीरुपी स्फटिक चमकत होते. त्यांचांच निलसर प्रकास माटळ्यावाडीवर पडला होता.अभीची चार चाकी गाडी उभी दिसत होती- गाडीच्या पुढेच, अभीच घर होत. घराच्या पायरीवरच समर्थ त्यांच्या अभीला बसलेला दिसत होता.
" अभी तुझ हे जन्मस्थान ,म्हंणजेच ही माटळ्यावाडी एक नास्तिक लोकांच गाव आहे. एक अस गाव जे देव, प्रकाश , शुभ -लाभ ,सत्य अस काहीच मानत नाही.जर हे अस का? विचारशील ? तर त्या मागे एक आख्यायिका आहे.ती अशी, की खुप वर्षांअगोदर एका पाखंडी, नीच, वाईट कृत्य करणा-या कर्मा नामक अघो-याच निधन झाल होतं, जिवंतपणी त्याने कधीही चांगले कर्म केले नव्हते. म्हंणुनच त्याच्या नशीबी नरक आल होतं . " अभी सर्वकाही नीट लक्ष देऊन ऐकत होता.
" नरकात त्याने आत्म्यांना दिल्या जाणा-या शिक्षा उभ्या डोळ्यांनी पाहिल्या-तेव्हा त्याच काळीज थरथरुन उठल! कारण तिथे आत्म्यांवर कोणतीच दया-माया दाखवली जात नव्हती. ज्या सर्वांनी उभ्या आयुष्यात कुटिल कृल्प्ती मार्गाने आपला पाया चालवला, त्या आत्म्यांची तो महात्मा तरी कस जाण ठेवणार?" समर्थांच्य वाक्यावर अभीने फ़क्त नकारार्थी मान हलवली.समर्थ पुढे बोलु लागले.
" उभ्या तोंडाची,आडदांड शरीरयष्टीची राक्षस, वाईट आत्म्यांना क्रुर पद्धतीने क्षिक्षा देत होते.कोणास खांबाला बांधून त्याच मांस कापल जात होत, तर कुठे जे परस्त्रीयांवर गलिच्छ भाषेचा वापर करत, त्यांच्या तोंडातल्या जिभांना दगड़ावर ठेऊन हातोड्याने ठेचल जात होत.डोळ्यांत गरम सलया घुसवल्या जात होत्या. बुभळे फोडली जात होती.मोठ-मोठ्या शेकोट्या पेट्वून त्यांवर गोलसर भांडे ठेवले होते. त्या भांड्यांमध्ये तेल ओतून ,त्या गरम कढलेल्या तेलात आत्म्यांना भाजल, तळल जात होत. स्त्रीयांच, अपहरण,करुन बलात्कार करणा-या नराधमांना उंच टेकड्यांवरुन काटेरी झाडांच्या जंगलात ढकल्ल जात होत. हे सर्व दृष्य पाहून त्या अघोरीची वाचाच बसली होती. त्याला ह्या सर्व शिक्षा पाहून तिथून पळून जावस वाटत होत. तस म्हंणायला, कर्मा अघोरी विद्यामान होता. देह सोडल असल , तरी मरणपश्चात आत्म्यातले वाईट गुणमात्र कद्दापी समाप्त झाले नव्हते. " बोलता बोलताच समर्थ गंभीर झाले व पुढे सांगू लागले .
" त्याने त्याच्या काळ्या शक्तिंमार्फत नरकातुन पळ काढला , जर तो धरतीवर आला असता , तरी पुनच्छ त्याला त्याच्या देहात शिरकाव करता आला नसत, कारण तेवढी त्याची शक्ति नव्हती हे त्याला ठावुक होत. म्हंणुनच त्याने आधीपासुनच एक युक्ती आखली होती. कर्मा नरकातुन पळून पृथ्वीवर न जाता थेट पाताळात गेला होता. त्याला माहीती होत की देव त्याची मदत करु शकणार नाहीत , म्हंणुनच त्याने सैतानांची मदत घेतली.पाताळात शेकडो करोडो-अब्जाधीश संख्येने सैतानी देव राहतात, त्यातल्याच एका रंसम्मा शक्तीवर्धक देवाची त्याने भेट घेतली.त्याकाळी देव-आसुर,सैतान ह्यांच युद्ध होतच असायचं. तुला एक गोष्ट माहीती असेलच !" समर्थांनी अभीकडे पाहिल.
" शत्रुचा शत्रु मित्र असतो ! रंसम्मा सैतानी देवाने कर्माची मदत करायची
ठरवल, पन सैतानच तो? त्याला मदती बदल्यात काहीतरी द्याव लागणारच होत. पून्नरजिवन मिळणार ह्या आनंदात कर्माने रंसम्माची अट मान्य केली.! आणि ती अट अशी होती.
की रंसम्मा सैतानाला पृथ्वीवर प्रवेश द्याव लागेल. "
" पन समर्थ जर रंसम्मा हा स्व्त:हाच एक सैतानी देव होता. तर मग तो स्व्त:हा पृथ्वीवर जाऊ शकत नव्हता का? त्यात त्या अघो-याची मदत ?" अभीच्या वाक्यावर समर्थांनी मान डोलावली व काहीक्षण थांबून पुढे म्हंणाले.
"त्याकाळी आसुर , राक्षस ह्या सर्वांनी पृथ्विवरील मानवाला खुप त्रास दिला होता, आण देत ही होते. म्हंणुन त्यांच्या ह्या जाचाला कंटाळून सर्व तेहत्तीस कोटी देवांनी एकरुप होऊन पृथ्वीला चारही बाजुंनी सुरक्षा कवच लावल होत- तर कुठे मानवाच्ता रुपात देव स्व्त:हा पृथ्वीवर राहत होते. म्हंणुनच मरणाच्या भीतीपोटी कोणिही सैतान पृथ्वीवर पाऊल ठेवण्याच धाडस ही करत नसायचा. म्हंणुनच रंसम्माने प्रथम अघो-याच्या आत्म्याला त्याच्या देहात प्रवेश दिला. अघो-याने जिवंत होताच रंसम्माला दिलेल वचन पुर्ण करण्यास सुरुवात केली. त्याने पृथ्वीवर एक घनगर्द व अंधारात वसलेल जंगल निवडल, मग जंगलातल्या एका गुहेत तब्बल तीस वर्ष ध्यानास्थ बसला.त्या तीस वर्षात त्याने रंसम्मा सैतानाला पृथ्वीवर कशाप्रकारे आणता येईल -ह्याच खोल अभ्यास केल. आणि अशी एक स्वतंत्र श्रेणी निर्माण केली...जी सैतानी हस्तक म्हंणुन उदयास आली. हा माणुस देवांच तिरस्कार करु लागला, सत्य-असत्य, धर्म,संस्कार त्याला लागू नव्हते. उजेडाला हाकलून त्याने अंधार निवडल.आणि काहीवर्षातच ही माटळ्यावाडी इथे वसली. त्या अघो-याने जिथे ध्यान केल होत- म्हंणजे त्या गुहेत तिथेच त्याने रंसम्मा सैतानाची एक अंडकार काळ्या दगड़ाची मूर्ती तैयार केली , ज्या मूर्तीत तो सैतान वसला आहे. आणी दर सत्तावीस वर्षांनी त्याची जत्रा इथे ह्या माटळ्यावाडीत भरली जाते- व त्याला नैवेद्य म्हंणुन, ह्या माटळ्यावाडीतल रहिवासी वगळुन सामान्य मानवाच देह अर्पण केल जात- ज्यालाच जत्रेचा बळी म्हंटल जात."
" परंतु समर्थ वाडीतल माणुस नैवेद्य का होऊ शकत नाही? आणि जर तस झालंच तर?" अभीने समर्थांकडे प्रश्नार्थक नजरेन पाहिल.
" प्रथम प्रश्णाच उत्तर हे , की माटळ्यावाडीतली मांणस त्या सैतानाची हस्तक-आहेत ! ज्यांच नैवेद्य तो स्विकारु शकत नाही. आणि जर तस झालंच ! तर कोप बसेल , ही माटळ्यावाडी,ह्या वाडीतला एक नी एक हस्तक जिवंतपणे जमिनीच्या गर्भात सामावला जाईल! " अभीने लक्षपुर्वक ऐकत मान डोलावली.
" आता सर्व माहीती तु ऐकली आहेसंच .तर आता, मी तुला काय करायचं आहे! ते सांगतो.. ऐक!" समर्थ सांगू लागले.
" ह्या वाडीपासुन पश्चिम दिशेला जंगलात , ठिक एक तासांवर एक गुहा लागेल. तुला त्या गुहेत प्रवेश करायच आहे आणि त्या सर्वांच्या तावडीतून अंशूला सोडवुन , पुन्हा गुहेबाहेर यायचं आहे . पण एक लक्षात ठेव, पुन्हा ह्या वाडीत यायच नाही."
" होय समर्थ , पन बाहेर यायचा रस्ता तर ऽऽ"
अभी पुढे बोलणार तोच त्याच वाक्य तोड़त समर्थ म्हंणाले.
" नाही पुन्हा इकडे फिरकायचं नाही. "
" मग बाहेर यायचा रस्ता, आई मीन शहरातला हाइवे."
" होय आहे त्या गुहेच्या मुखापासुन डाव्या बाजूला, एक रस्ता आहे -जो जंगलातुन थेट शहरातल्या रसत्याला मिळतो. एकदा का जंगलाची वेस ओलांडली- की तूम्ही सुटलात,म्हंणुन समजा."
अभीच्या ओठांवर सुटका हे शब्द ऐकून एक स्मित हास्य झळकल.
पन समर्थ अद्याप गंभीरच होते.
" आता ह्याक्षणाला एक वाजून वीस मिनीटे झाली आहेत." समर्थांकडे घड्याळ नव्हत-तरीही त्यांनी वेळ अगदी अचूक सांगितली होती. अभीने त्याच्या डाव्या हातात असलेल्या घड्याळात पाहिल ही.
" त्यांची विधी बारा वाजता सुरु झाली आहे आणि विधीला दिड तास उलटून गेला आहे. ठिक तीन वाजता त्यांची विधी संपेल , त्या अगोदर तुला तिथे तूझी उपस्थिती दाखवावी लागेल. त्या सर्वांसमवेत लढा द्यावा लागेल. " समर्थ जागेवरुन उठले. अभीमात्र खालीच बसला होता. त्या सर्वांसमवेत एकट्याने लढा द्यायच म्हंणजे काही खायच काम होत का? राक्षसी दैत्यासारखे दिसणारे ते मानव, अभीची काय अवस्था करतील? ह्याच विचार करुनच त्याच्या मनात भीती उत्पन्न होत होती.
" एक लक्षात ठेव ?" समर्थांचा आवाज व एक हाताचा पंजा वर आला ,तस त्याने समोर पाठमो-या समर्थांकडे पाहिल.
" वेळ ही जळणा-या लाकडा सारखी असते. जो पर्यंत त्यात आग- आणि विस्तव आहे , तो पर्यंतच उब मिळेल.पन जेव्हा त्या पेटत्या आगीची वेळ समाप्त होईल तेव्हा मागे फ़क्त पांढरट राख उरेल. दीड तास शिल्लक आहे तुझ्याकडे, " अभीने डोळे बंद केले त्याचे श्वास फुलले होते. छाती फुगवून फुगवून तो श्वास घेत होता. त्या बंद पापन्यांच्या आड कालोखी स्क्रिनवर काही विशीष्ट रंगीबेरंगी तरंग उठले जात अंशुचा चेहरा उमटत होता. तिचा हसरा चेहरा, तिची मदतीची हाक .
" अभी हैल्प,अभी वाचव मला!"
"ह्या दिड तासात तुला तुझ प्रेम-आणि मातेच्या हत्येचा प्रतिशोध घ्यायचं आहे! " समर्थांच पुढील वाक्य त्याच्या कानांत घुमल. त्या काळसर पडद्यांवर दाईमाचा मृत चेहरा पाहून काळीज दगडासारख राठ झाल.
भीती तर सोडाच, आता त्या मनात फ़क्त प्रतिशोध ,बदल्याची आग मस्तकात शिरली गेली होती. समर्थांच्या पाठमो-या उभ्या अवस्थेत चेह-यावर हास्य उमटल.
" तैयार आहे मी !" अभीचा गरुड आवाज दुमदूमला.भुवया ताणल्या ग्रल्या.
" खुप छान, " समर्थांनी मागे वळून पाहीले.
" येतो मी !" अभी दोन पावलं चालून पुढे आला. मग कंबर वाकवुन त्याने समर्थांचा आशिर्वाद घेतला.
" सर्व कार्येषू सर्वदा!" समर्थांनी उज्व्या हात वर करत आशिर्वाद दिल. गाडीपाशी पोहचुन अभीने प्रथम दार उघडल मग तो सीटवर बसला, गाडीची चावी स्टेरिंगखाली लावुन तीच त्याने डाविकडून उजवीकडे फिरवली.
" भूर्रभर्ररर्रर!" इंजीनचा विशिष्ट आवाज झाला. तेवढ्यात काचेवर समर्थांनी ठोठावल, त्याने काच खाली केली .
" काहीतरी द्यायच होत. " समर्थांनी उजवा हात पुढे केल.हाताच्या पंज्यावर एक सोनेरी रंगाची गोल डबी दिसत होती.- त्यात कुंकू होत.
" हे घे, तिच कपाळ भर ! कारण तिच्यावर फ़क्त तुझा हक्क आहे!" अभीने थरथरत्या हातांनी समर्थांच्या हातुन ती सोनेरी ड्बी घेतली. एक कटाक्ष त्यांच्यावर टाकला व मान होकारार्थी हळवली. दुस-या हाताने गियर टाकल,गाडीची चाके जमिनीवर चक्रीसारखी माती उधळत फिरली, नळीतुन काळसर धुर निघाल जात गाडी पुढे निघुन गेली.
"स्व्त:वर विश्वास ठेव अभी, विजय सत्याचाच असेल !" समर्थ अभीच्या पुढे जाणा-या गाडी कडे पाहत म्हंणाले. गाडीची मागची हेडलाईट त्यांना दिसत होती.आकाशात काळ्या ढगांशी चंद्राचा लपंडाव सुरु होता. त्या काळ्या ढगांआड अर्धा गोल चंद्र कधी लपून बसत होता-तर कधी बाहेर येत होता. त्याच्या ह्या खट्याळपणामुळे, पृथ्वीवर अंधार पडला जात होता. घनगर्द झाडांच्या मधोमधुन निघालेल्या सरळ वाटेने गाडी धावत होती. गाडीच्या पिवळ्या हेडलाईटसचा-प्रकाश धुक्याची पाठ आडवुन धरत होती, रस्त्यावरचा धुका त्या हेडलाईटसना मार्गावर पडू देत नव्हता. गाडीच्या चारही काचेंवर थंड वातावरणामुळे बाष्प साचल होत. आजुबाजुला भयाण शांतता पसरली होती त्या शांततेत तो गाडीचा आवाज काळजात चर्रचर्र करत होता. गाडीच्या पुढची हेडलाईट व खालच चाक,एका जागेवरच थांबल, त्या पिवळ्या हेडलाईट जवळुन वाकडतिकड धुक जाताना दिसत होत. तोच इतक्यात इंजीनचा घर्रघर्रता आवाज, ती पिवळी हेडलाईट बंद झाली. गाडीच दरवाज उघडून अभी बाहेर आला, व त्याने समोर पाहिल. समर्थांच्या वर्णना नुसार समोर तीस पावलांवर एक मंदिरा सारख एक कळस असलेल लाल मातीच डोंगर होत त्या डोंगरामधोमध एक गोल होल दिसत होता-तीच गुहा असावी. अभीने एक आवंढा गिळला. आपली पाउले त्या गुहेच्या दिशेने वाढवली. त्या आठफुट मोठ्या गुहेच्या तोंडापाशी
पोहचताच त्याने एक कटाक्ष आत टाकला, आत गहिरा गुढ अंत नसलेला अंधार पसरला होता , अभीने एकवेळ त्या अंधारात, मग डाव्या हातातल्या घड्याळात पाहिल.
" दोन वाजून चाळीस मिनीटे.!" अभी म्हंणाला. फ़क्त वीस मिनीटे उरली होती बस्स.
" आता काहीही झालं तरी माघार नाही." अभीने स्व्त:लाच मानसिक शक्ति प्रदान केली , व त्या गुहेत घुसला. आतला अंधार डोळ्यांना आंधळा करुन गेला होता. समोरच काहीच दिसत नव्हत. शेवटी अभीने आपल स्मार्टफोन काढल- स्मार्टफोनची टॉर्च ऑन केली. आता डोळ्यांना उजेडात थोड फार दिसू लागल.. खाली लाल मातीचा रस्ता होता तोच सरल रेषेत पुढे जातांना दिसत होता. अभी टॉर्चच्या प्रकाश जोरजोरात चालत त्या रस्त्याने पुढे निघाला. काहीवेळ चालून झाल्यावर अचानक त्याची पावले एकजागेवरच थांबली...कारण समोर, मोठ आश्चर्यकारक दृष्य दिसत होत.समोर एकुण सहा पायवाट फुटली होती.
" बापरे !" अभीच्या तोंडातून आश्चर्यकारक उद्दार बाहेर पडला. त्याने
घड्याळात वेळ पाहिली, दोन वाजून पंन्नास मिनीटे.
" ओह शट!" अभी त्रासिक सुरात म्हंणाला. समोर सहा मार्गातला नक्की खरा रस्ता कोणता? हे ओळखण्यासाठी दहा मिनीटे कमी होती! त्याच्या समोर एक मोठी पेच उत्तपन्न झाली होती. आता त्यातुन सुटका कशी? अभीने कपाळावर हात ठेवल ,व फोनमध्ये वेळ पाहिल.
" दोन वाजून छप्पन मिनीटे!" वेळेची गती जणु वेगवान झाली होती-एक नी क्षण,सेकंदाचा काटा जसा वेगाने पुढे ढकलला जात होता-त्या सेकंद काट्यागणिक छातित कळ उमटत जात होती.अभीच्या दोन्ही डोळ्यांच्या भुवया जराश्या आकसळ्या गेल्या- मोबाईलच्या उजेडात खाली त्याला काहीतरी दिसल.
" पायाचे पंजे!" अभीच्या दुखी चेह-यावर आनंद पसरला.खाली लाल मातिवर पायांचे पंजे दिसत होते-ह्याचा अर्थ ती मांणस ज्या दिशेने गेली होती-त्या मार्गावर ही पाऊले त्याला घेऊन जाणार होती. त्याने मोबाईलच्या उजेडात मार्ग शोधल-होय सहा पायवाटेंमधली पाचवी वाट हीच खरी वाट होती. घड्याळात दोन वाजून एकोणसाठ मिनीटे ही वेळ दिसत होती. अभीच्या पावलांनी वेग पकडला होता. समोरच एक उजळलेली चौकट, आणि पुढे पाय-या दिसत होत्या.खाली नक्कीच तळघर असाव. धावत धावत तो त्या चौकटीपाशी पोहचला-समोरच दृष्य अंगावर काटा आणनार होत. निवडुंग फुटतील अस होत. खाली तळघरात लाल मातीच्या भिंती होत्या-जणू रक्ताचा आभिषेक घातला असावा- आणि त्या मातीवर कुजळेल मांस शेणाच्या गोव-यांप्रमाणे थापल होत. अजुन खाली तळघरात शेकडोने चित्ता पेटल्या होत्या-त्यांचा तांबडसर प्रकाश आजुबाजुला पडला होता. त्या जळणा-या चितेंमधुनच एक सरळ वाट तयार होऊन पुढे गेली होती- व पुढेच अभीच्या बापासहित ती सहा मांणस उभी होती. अभीचा बाप सर्वात पुढे होता. त्याच्या पायांसमोर एक लाकडाचा चारफुट टेबल होत, त्यावर बेशुद्धावस्थेत अंशुला झोपवल होत. तिच्या अंगावरच ड्रेस कपडे काढून शरीरावर फ़क्त एक पारदर्शक सफेद रंगाची साडी घातली होती.
त्यातून तिच्या स्तनांचा आकार, व ताठरलेली मनुके दिसत होती. जस गळ्यात एक पिवळ्या भगव्या फुलांचा हार घातला होता जस प्रेताला घालतात.
" अंशुऽऽऽऽऽऽ!" अभी मोठ्याने ओरडला. त्याचा आवाज ऐकून त्याच्या बापासहित त्या पाचही मांणसांनी जळजळीय नजरेने त्याच्याकडे पाहील.
" तिच्या आईची गां×, भें××त ! वाचलाच व्हय हा!" अभीच्या बापाने एक शिवी हासडली.
" आर बघता काय आई घा××नो ? हाणा रांxxच्याला! " ती पाचही जण अभीच्या रोखाने धावली.हातात जाड जुड काठी असलेली ती मांणस अभीला जीवे मारायला कमी नव्हती. मोठ मोठ्या ढेंगा टाकत ते सर्वजण पायरीपाशी पोहचले. पाय-या म्हंणायला वीस होत्या. अभी त्या सर्वांपासुन जेमतेम बारा फुटांच्या ऊंचीवर , शेवटच्या पायरीवर उभा होता. ही सर्व पाचही जण घोळक्याने तिथे पोहचली होती.तोच अभीने दाराच्या चौकटीतुन थेट वरुन आपल पुर्णत शरीर त्या पाचही जणांच्या अंगावर झोकून दिल.त्याच्या वजनाने ती पाचही जण जमीनदोस्त झाली. इतकेच नाहीतर पाच जणांमधील दोन जणांची पाठीची हाड जागीच तुटली होती ते जागेवरच बेशुद्ध झाले. आता उरले होते तीन . अभीच्या बापाने पायाजवळ असलेल एक लाकडी गोल भांड हातात घेतल- त्यात मांणवाच रक्त होत. तो भांडा घेऊन तो अंशुला झोपवलेल्या टेबला पुढे आला.समोर जमिनिवर एक तीन फुट अंड आकाराचा काळसर दगड होता. त्या दगडाच काळसर रंग म्हंणजे, सुखून गेलेल रक्त होत. हातात असलेला रक्ताचा भांडा त्याने त्या दगडावर जस पिंडावर दुध ओताव तस आभिषेक देत रिकाम केल. तो अंड गोल दगड आता पुन्हा एकदा लाल रंगात रंगला होता. अभीने एकवेळ मागे पाहिल,प्रथम त्याला बेशुद्धवस्थेतली अंशु दिसली आणी मग थोड पुढे त्याचे वडिल, जे हातात एक गोलसर लाकडी भांड पकडून लालसर रंगाच रक्त आपल्या पुढ्यात असलेल्या दगडावर ओतत होते.
" अंशु ऽऽऽऽ!" अभी पुन्हा मोठ्याने ओरडला, त्याची पाउले तिच्या दिशेने जायला निघाली. तोच मागुन त्या तीन मांणसानी त्याला पकड़ल.
एकाने डावा हात, तर दुस-याने उजवा, आणि तिस-याने मागून थेट त्याच्या पाठणात एक लाथ मारली.
" आऽऽऽऽऽऽ " त्या लाथेने अभीचे दोन्ही पाऊल जमिनीला टेकले.
"हिहिहिहिही,खिखिखिखिखी...!ह्याच्या आईला तर खपवली आता ह्याला पन भें××त तिरडीवर झोपवुया !हिहिहिहिही,खिहिखी!" गलिच्छ शब्दांच उच्चार करत अभीवर मागून वार केलेला माणुस विकृत हास्य करत म्हंणाल. अभीच्या बापाने तो लाकडी भांडा एका चितेत फेकला, तसे त्या चितेतली आग फना काढल्यासारखी दोन सेकंद हवेत उठली.
अभीच्या हाताना पकडून धरलेल्या त्या दोन जणांनी त्याच्या गालावर एका पाठोपाठ दोन-दोन अशा मिळुन चार पंच लगावल्या.त्या पंचमुळे त्याच तोंड फुटल, आतुन रक्ताची लाल बाहेर पडू लागली.अभीच्या मागे असलेल्या त्या बलाढ्य माणसाने कमरेमागे आपला एक हात नेहला, व मागुन एक धारधार पातिचा कोयता बाहेर काढलां.
" मर स्व्त:च्या कर्माने !" त्या मांणसाने अभीच्या टाळूवरचे केस मुठीत धरलें-मान थोडीवर केली. जस एक कोंबड कापाव तशी, मग कोयता असलेला हात त्याने हळू हळू पुढे नेहायला सुरुवात केली.
" थांब रे..?" अभीच्या बापाचा खर्जातला आवाज आला. तसा तो माणुस जागेवरच थांबला.
" हिला मरताना दाखवायची मंग त्याला खपवायचं हिहिहिह,खिखिखी!"
अभीच्या बापाच बोलण त्या तिघांनाही पटल. कुत्सीक हसत सर्वांनी होकार दर्शवला. तस त्याने कमरे मागे हात नेहल, व पुढे आणल, आता ह्याक्षणाला त्या हातात एक कट्यार होती, धार धार पातिची कट्यार , जी त्या तांबडसर उजेडात सोनेरी रंगाने ऊजळून निघाली होती,
" नाही बाबा , प्लीज असं करु नका ! माझ खुप प्रेम आहे तिच्यावर !"
अभीच्या डोळ्यांतुन दोन अश्रु बाहेर आले.
" काय बाबा? अरे ह्याट " अभीचा बाप तुच्छतेने म्हंणटला.
" म्या तुझा बाप बिप नाय, आण नाही तु माझ पोर आहेस समजल?. जंगलात भेटला व्हतास तु त्या चंदिला! म्या तर तुला तव्हाच मारणार व्हतु, पन ती रां×× मधी आली ना ! " त्याने अस म्हंणतच दात चावले.
" पन काय बी असो ! मारली मी त्या रां×××ला! हिहिहिही!"
त्याचा एक नी एक शब्द जणु अभीच्या ह्दयात काट्यासारखा टोचत शिरला होता. ज्या माईला आपण आपली आई मानली, ती आपली आई नव्हतीच ! ह्याचा अर्थ आपण अनाथ होतो.पन तरी सुद्धा त्या मातेने आपल्या रक्षणाकरीता स्व्त:चे प्राण त्यागले होते.-रक्ताच नात नसल तरी काय झालं? -प्रेम तर केल होत ना? इतकी वर्ष पोटच्या मुलासारखी माया लावली होती? त्याच विकृत हास्य अभीच्या काळजात ज्वालाहिंत आग्निचा भडका ऊठवत होता. , आपल्या मातेच केलेल खून,आणि आता आपल्या अंशूला ही तो आपल्यापासून हिरावून घेणार होता.सर्वत्र शरीरात जणु क्रोधाने भ्रमण करायला सुरुवात केली.
अभीच्या डोक्यात त्रिनेत्रधारी महाकाल शिरु लागला.दात चावले जाऊ लागले ज्याने डोक्यावर झालेल्या प्रहारातुन रक्त बाहेर पडल जात कपाळावरुन खाली बंद डोळ्यांत हळकस शिरु लागल.
" अभीच्या बापाने कट्यार दोन्ही हातांत पकडली तीच वेगाने वर हवेत नेहली. तेव्हाच अभीने खाडकन डोळे उघडले, जखमेतुन निघणार रक्त डोळ्यांत साचल होत- पांढरट बुभळ अक्षरक्ष डोळे आल्या सारखे भडक लालसर झाले होते,त्या डोळ्यांच्यात असलेल्या वाकड्या तिकड्या उमटळलेल्या काळसर नसा स्पष्ट दिसत होत्या. अभीच्या समोरच वितभर अंतरावर धगधगती चित्ता जळत होती.त्याच चितेत अभीने कसलीही पर्वा न करता उजवा हात घातला, आणि एक पेटत लाकूड निखारे ऊडवत खाडकन,उपसून बाहेर काढल. आणि तेवढ्यातच अगदी वा-याच्या वेगाने अभीला पकडुन धरलेल्या त्या मांणसांच्या कपाळावर एक एक असे मिळुन दोन वार झाले! त्या वाराने ते दोघेही थेट आठ फुट हवेत उडून जळत्या चितेत कोसळले, !
" आऽऽऽ !" अभीच्या मागे उभा असलेला तो माणुस चवताळून उठला,
हातात असलेला वाकड्या पातिचा कोयता घेऊन तो अभीच्या दिशेने धावत आला- एक,दोन,तीन,चार पावलांनीच त्याने अभीला गाठल ,आणि तेवढ्यातच अगदी वेगाने उजव्या हातातल्या कोयत्याचा वार अभीच्या मानेवर करण्यासाठी कोयता उजवीकडून डाविकडे आणला, पन अभीने अगदी वेगाने हालचाल केली, सर्व शरीर खाली झुकवल, तसा तो कोयत्याचा हात डोक्यावरुन थेट पुढे डावीकडे निघुन गेला!
" ..रंसम्माऽऽऽऽऽ ए... भोग स्विकार..रंसम्मा ऽऽऽ!"
तो खर्जातला आवाज ऐकून अभी ने एकक्षण मागे पाहिल. त्याच्या बापाने हातात धरलेली कट्यार अजुन थोडी वर नेहली, आणि पुढच्याचक्षणाला ती वेगाने खाली येऊ लागली.तेवढ्यात वेळेची गती जणु मंदावली , वातावरणातला वेग जणु 0:25x चा झाला होता. अभीने हातातल्या त्या जळत्या फाट्याचा पुढचा भाग त्या मांणसाच्या पोटात मारला- तसा त्या मांणसाच्या हातातला कोयता हवेतुन गोल-गोल भिंगत हलक्या वेगाने खाली येऊ लागला, अभीने तोच कोयता अगदी चालाखीने हवेत झेळला.
" याऽऽऽऽऽऽ" त्या कट्यारीची धारधार पात अंशुच्या छाताड़ात घुसण्यासाठी वेगाने खाली येत होती. अभीने कोयता असलेला हात वेगानेमागे नेहला , व तिप्पट वेगाने तोच हात पुढे आणत ,पाचही बोटांची पकड सैल केली-तसा तो वाकड्या पातीचा काळसर कोयता
गोल-गोल चक्रीसारखा भिंगत वेगाने , हवेला कापत थेट पुढे जाऊन अभीच्या बापाच्या छाताड़ात घुसला, पुर्णत देह झटका बसल्यासारख शहारल,वासलेल्या तोंडातुन रक्ताची गुळणी बाहेर पडली! क्ट्यार असलेला हात हवेतच थांबला होता. पुढच्याक्षणाला त्याच पुर्णत देह निर्जीव वस्तुप्रमाणे थेट मागे त्या लालसर दगड़ावर पडल.त्या प्रेताच स्पर्श दगड़ाला होताच, त्या गुहेत भुक्ंपाचे हादरे बसु लागले,
अभीने अंशुला बेशुद्धावस्थेतच उचलुन कसतरी गुहे बाहेर आणल, तस त्या गुहेचा सर्वभाग खाली जमिनीत गाडला गेला, हवेत मातीचे लोट उडाले. रंसम्मा सैतानाला त्याच्या हस्तकाचा बळी मिळाल्याणे कोप बसला होता- ज्याकारणाने ती गुहा नष्ट झाली होती. अभी अंशु दोघेही वाचले होते.

कथेचा सारांश सुखद अंत:
अभी- अंशु दोघेही पुन्हा शहरात परतले, त्या दोघांनीही एक चांगला दिवस ठरवुन मग रीतसर कोर्टात जाऊन लग्न ही केल.
आणि अभीने तोच कुंकू तीच्या कपाळात भरला..जो समर्थांनी दिला होता..

समाप्त: