1 Taas Bhutacha - 22 books and stories free download online pdf in Marathi

१ तास भुताचा - भाग 22

!! श्री चा महिमा....

मित्रांनो हि सत्यकथा आपल्या महाराष्ट्रातली नसुन थेट परप्रांतातली आहे! जिथे श्री कृष्णांचा जन्म व वास्तव आहे..! मथुरा, द्वारका, वृंदावन, ओरिसा , ह्या भागांमधलीच ही एक सत्यकथा आहे .
मित्रांनो आज महाराष्ट्रात कामानिमीत्ताने खुप सारी परप्रांतीय लोक -येत असतात , त्यातल्याच माझ्या एका परप्रांतीय मित्राने ही सत्यकथा मला ऐकवली आहे , परंतु जागेची व स्थळ यांची वाच्यता नको ..ह्या हेतुने मी जागेचा उदेश्य, केला नाही . माझ्या मित्राच्या सांगण्यानुसार ही घटना थेट 6 सप्टेंबर 2004 श्रीकृष्ण जन्माष्टमीच्याच दिवशी घडली आहे,
...=>
रत्नमाळाआज्जीं ह्या 65 वर्षाच्या असुन , भगवान श्रीकृष्णांच्या त्या परम भक्त होत्या , रत्नमाळादेवी यांची श्री कृष्णांवर अपरंपार भक्ती होती , सकाळ-संध्याकाळ त्यांच्या मुखी श्रीकृष्णांचा उच्चार चालत असे, रत्नमाळा आजींच्या परिवारात एकुलता एक मुलगा निळकंठ ज्यांच साड्यांच दुकान होत व निळकंठ यांच्या पत्नी रजनीबाई ज्या गृहीणी होत्या , रत्नमाळाआज्जींना एक नात होती , जिच नाव राधा असुन तिच लग्न प्रशांत नावाच्या मुलाशी झाल होत, लग्नाला दीड वर्ष झाल्यानंतर राधा प्रथमच आई झाली होती, म्हणजेच राधाने एका मुलीला जन्म दिला होता ,एकेदिवशी प्रशांत रावांनी निळकंठजींना म्हंणजेच आपल्या सास-यांना फोन लावला , व ते म्हणाले ,
" मला कंपनीतुन एका प्रोजेक्ट साठी 4 दिवसां साठी बाहेर जाव लागणार आहे..! राधा घरी एकटी असेल तर तुम्ही प्लीज आज्जीला 4 दिवसांकरीता आमच्याकडे पाठवा..? "
" परंतू जावईबापू ...? तुमची आज्जी म्हंणजेच माझी आई श्रीकृष्णाची
खुप मोठी भक्त आहे..! आणी येत्या 5 दिवसात श्रीकृष्णजन्माष्टमी असून आमच्या गावात एक पूजा असते जी आई कधीच चुकवत नाही...! तरीसुद्धा मी विचारुन पाहीन..!" निळकंठ यांच्या ह्या वाक्यावर प्रशांत म्हणाले.
" अहो बाबा..? तुम्ही आज्जींना अस सांगा की..मला फक्त 4 दिवसांकरीताच बाहेर जायचय आणि मग मी 5 व्या दिवशी म्हणजेच श्रीकृष्णजन्माष्टमीला परत येईण..! आणि मग मी परत आलो की आज्जीला माझ्या गाडीने तुमच्या घरी सोडेल ..!" प्रशांत रावांची ही कल्पना निळकंठ यांना आवडली ,आणि मग हीच कल्पना त्यांनी मग आपल्या आईला म्हणजेच रत्नमाळा आज्जींना कळवली आणि मग
त्याही जायला तैयार झाल्या, निळकंठजी म्हणाले.
" आई ? उद्या सकाळी 11: 30 वाजता एक बस राधाच्या गावाला जाणार आहे ...! त्याच बसमधुन आपल्या दुकानात काम करणारा सखाराम आहे बघ.. ? तो सुद्धा आपल्या दुकानातल्या काही साड्यांच्या ऑर्डर घेऊन जाणारे ...! तर तु त्याच्या बरोबर जा..! नाही म्हणजे कस होईल..तू सुखरुप पोहचलीस की नाही हे आम्हाला सुद्धा कळेल ..!"
एकंदरीत निळकंठजींचे बोल रत्नमाळाबाईंना आवडले होते ,त्यांनी लगेच होकार दर्शवला व त्या झोपायला निघुन गेल्या , 4 दिवसांच्या मुक्कामासाठी लागणारे कपडे त्यांनी त्याच रात्री एका पिशवीत भरले होते , त्यामुळे सकाळी ऊठून आवरा-आवर करण्याची घाई नव्हती, तश्रीकृष्ण भगवंताच नाव पुन्हा एकदा मनी म्हणत रत्नमाळाबाई झोपी गेल्या , दुस-या दिवशी सकाळी 11 वाजता रत्नमाळाआज्जी सखाराम बरोबर घरुन निघाल्या, बस मध्ये त्यांना शेवटची दोन सीट मिळली ,
काहीवेळाने बसचा प्रवास सुरु झाला, रत्नमाळा आज्जी खिडकीशेजारच्या सीटवर बसल्या होत्या, 30 -35 मिंनीटांनी बस एका नागमोडी वळनावर करकचून ब्रेक मारल्यामुळे थांबली ,
कंडक्ट जरा रागानेच म्हणाला.
" काय झाल रे ब्रेक कशाला मारला...?" कंडक्टरच्या ह्या वाक्यावर ड्राईव्हर म्हणाला.
" अरे पुढे एक्सीड़ंट..झालय..!"
ड्राइव्हरच्या ह्या बोलण्याने रत्नमाळा आज्जींनी सुद्धा बाहेर बघितले ,
आणि बाहेर पाहताक्षणीच रत्नमाळा आज्जींच्या नजरेस एक भयानक दृश्य पडलेल, रस्त्यापासुन थोड दुर 3-4 पोलीस उभे होते , व पोलिसांच्या बाजुलाच खाली जमीनीवर मोजून 4 स्ट्रेचर ठेवले होते, आणि त्या प्रत्येक स्ट्रेचरवर पांढ-या कपड्यात प्रेत गुंडाळून ठेवली होती, त्या प्रत्येक स्ट्रेचवरच्या पांढ-या कापडाला लाल रंगाच रक्त लागल होत, जणू प्रेतातुन रक्ताची धार अद्याप सुद्धा वाहत होती, रसत्याच्या बाजुलाच एक पिवळ्या रंगाची ट्रक व चारचाकी गाडी अपघाती स्वरुपात भीषन अपघातच दर्शन घडवून देत होत्या , ट्रकच्या पुढचा इंजिन जवळचा पुढच्या भागाचा चकणाचुर झाला होता , वरच्या काचा फुटल्या होत्या , व बाजूला असलेली कार सुद्धा चकनाचूर झाली होती आणि त्यात एक प्रेत अजूनही ड्राइव्ह सीटवर मृत अवस्थेत दिसुन येत होत, त्या प्रेताचे शरीर जणू रक्तबंबाळ, कवटीफुटून मेंदू बाहेर आलेल्या अवस्थेत अडकल होत, म्हणून त्या प्रेताला बाहेर काढण्यात आले नव्हते , इकडे रत्नमाळा आज्जींनी हे अघोर, ह्दयद्रावक दृश्यपाहताचक्षणीच आपली मान दुस-या बाजुला वळवुन घेतली , इतक भयंकर , काळीज पिळवटणार द्र्ष्य ह्या वयात पाहून त्यांचे श्वास फुलू लागले , कारन रत्नमाळा आज्जींना अस्थमा हा आजार होता, थर-थरणा-या हातांनीच रत्नमाळा आज्जींनी आपल्या पिशवीत हात घातला, व एक सफेद रंगाचा छोटासा ( inhaler pump ) बाहेर काढला व आपल्या थर-थरत्या हातांनीच तो पंप तोंडात ठेवला व एक दोन मोठे श्वास घेत पंपावरच बटन खाली वर करत दाबले , त्यांना काहीवेळाने बर वाटू लागल ,मग एक दीड तासांच्या प्रवासानंतर रत्नमाळा आज्जी राधाच्या घरी पोहचल्या. राधाला सुद्धा आपल्या आज्जीला पाहुन आनंद झाला होता . राधा म्हणाली .
" आज्जी. तु बस हं ! मी पाणि घेऊन...आले..! " रत्नमाळा आजी सोफ्यावर बसल्या, राधाने ट्रे मध्ये पाणी घेऊन आली, मग एक ग्लास पाणि पिल्यावर रत्नमाळाआज्जींना थोडी तरतरी आली,
मित्रांनो सुखाचे क्षण हे जास्त काळ टिकत नसतात , सुख हे एका मर्यादीत वेळेपुरतच मिळत असत जे ज्याला तितक मिळेल तितकच घ्यायच असत , अन्यथा हव्यासापोटी त्या सुखाच सुद्धा दुख रुपांतरीत होऊन जाऊ शकत , राधा व तिच्या बाळासोबत सोबत राहून रत्नमाळा आज्जींना आपल्या मुक्कामाचे 4 दिवस केव्हा होऊन गेले हे कळालंच नाही , श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दिवस उजाडला त्यामुळे रत्नमाळा आज्जींची आपल्या गावी जाण्याची घालमेळ वाढु लागली, रत्नमाळा आज्जी तर गावी जाण्यासाठी सकाळपासुनच तयारी करुन बसल्या होत्या ,व दर तासांनी राधाला प्रशांत रावांना फोन करण्यास सांगत होत्या , अशातच पाहता-पाहता सकाळची दूपार झाली व दुपार उलटून जात स्ंध्याकाळ व्हायला आली , आणी मग शेवटी 6 वाजता स्वतः प्रशांत रावांचा फोन आला
" मला यायला ऊशीर होईल आजीला म्हणावं थोडे थांबा " अस ते म्हणाले . रत्नमाळा आज्जींना हे वाक्य ऐकताक्षणी थोड्या अवघडल्या, आजपर्यंत त्यांनी श्रीकृष्णजन्माष्टमीची एकही पुजेला गैरहजेरी लावली नव्हती , किंवा त्यादीवशी केला जाणारा उपवास मोडला नव्हता, इतक्या असीम भक्त होत्या त्या श्रीकृष्णाच्या.
" राधा ..? आपल्या गावाला जाणारी कोणती बस आहे का...? " रत्नमाळा आज्जी म्हणाल्या.
" हो आज्जी एक शेवटची बस आहे..? ठिक 7 वाजता " रत्नमाळा आज्जींनी आपल्या हातातल्या घड्याळात पाहिल व पुढे म्हणाल्या.
" मग आता 6:30 वाजलेत ..? म्हणजे मला गावाला जाण्यासाठी ती बस भेटू शकते तर..!"
" अंग्ग आज्जी..? पन...कशाला येवढ्या रात्री एकटी जातेस..?"
राधा काळजीच्या सुरात म्हणाली .
" अंग्ग मी एकटी कुठेय..पोरी..! तो आहे की माझ्याबरोबर..!"
रत्नमाळा आज्जी भिंतीवर लावलेल्या श्रीकृष्णाच्या तस्वीरी कडे हात जोडुन पाहत म्हणाल्या ,
" अंग्ग पन आज्जी...!" राधापुढे काही बोलणार की तोच तीच अर्ध वाक्य तोडत आज्जी म्हणाल्या.
" पन बिन..काही नाही..! चल येते मी.. ! " अस म्हणतच रत्नमाळा आज्जींनी थोड पुढे सरकत लहानग्या बाळाचे चुंबन घेतले व त्या जाण्यासाठी निघाल्या की पण अचानक त्यांच एक बोट लहानग्या बाळाने आपल्या इवल्याश्या हातांनी धरुन ठेवल जणू तो लहानगा जिव अस म्हणत होता " की नको जाऊस आज्जी " परंतु आज्जींना थोडीच तिची भाषा समजणार , त्यांनी बाळाच्या हातुन आपला हात सोडवून घेतला व त्या निघाल्या , आज न जाणे का परंतु अंधार काजळी फासल्या सारखा पसरला होता, गेटजवळ येताच रत्नमाळा आज्जींनी पुन्हा एकदा मागे वळुन बंगल्याकडे एक कटाक्ष टाकला , त्यांना दरवाज्यात ऊभी असलेली निराशजनक चेह-याने आपल्याकडे पाहणारी राधा दिसली व रडना-या बाळाचा आवाज त्यांच्या कानी पडला , जणू त्या बाळाला आज्जींच अस जाण आवड़ल नव्हत , एकक्षण तर रत्नमाळा आज्जींना बाळाच्या रडण्याचा
आवाज आपल्यावर कसल तरी अनाहूत संकट ओढावणार आहे ह्याची जाण करुन देत आहे की काय असं वाटून गेलं , परंतु रत्नमाळाआज्जींनी तो विचार आपल्या मनातुन झटकला व त्या दोघींनाही हात दाखवत त्या बसस्टॉपवर जाण्यासाठी निघाल्या ,
बाळाच्या मोठ -मोठ्याने रडण्याचा आवाज अद्याप सुद्धा त्यांच्या कानी पडला जाऊन सांजवेळेच्या अंधारात मिश्रित होऊन एक भयपद्य , निराशजनक संगीत उत्पन्न करत मनावर मलभ पसरवत होता , काहीवेळाने रत्नमाळा आज्जींनी आपल्या चालण्याचा वेग वाढवला , बाळाच्या रडण्याचा आवाज सुद्धा कमी-कमी होत एकदाचा नहिसा झाला , असच चालता -चालता 10 -15 मिंनिटात आज्जी स्टॉपवर पोहचल्या, स्टॉपवर आज्जीं व्यतिरिक्त कोणिही नव्हत ,साध चिटपाखरुही नाही, तिथे उपस्थी होती -ती म्हणजे फक्त आणि फक्त काळोख्या स्मशान शांततेची व रातकिंडयाची कीर्रकीर्र...! स्टॉपवर एक पिवळ्या रंगाचा बल्ब जळत होता , त्या बल्ब खाली रत्नमाळा आज्जी एसटी (बसची) वाट पाहत होत्या, काहीवेळाने अंधाराला दुर -सारत एक बस आली , व रत्नमाळा आज्जी ज्या बस स्टॉपवर थांबल्या होत्या , त्या बसस्टॉप पासुन थोड़ अंतरावर थांबली , आज्जींनी हळूच बसमध्ये एक कटाक्ष टाकला , व बस मध्ये जाण्यासाठी निघाल्या , पाहिली पायरी चढणार की तोच पाठिमागुन त्यांना एक ओळखीची हाक ऐकू आली ,
"आज्जी ....? ओ आज्जी ...?" ह्या ओळखीच्या आवाजासरशी त्यांनी हळूच मागे वळून पाहील , त्यांना राधाच्या बंगल्याचा वॉचमन दिसला , जो की आज्जींच्या दिशेनेच धावत येत होता ,
" काय ..रे बाबा ..? तू इकड कशाला आला..? बंगल्यावर राधा आणि बाळा एकटे असतील न ?"
अहो.......आज्जी ताईनेच पाठवलय मला ?"
वॉचमन म्हणाला .
" राधानी पाठवलय ..पण का ?" रत्नमाळा आजींनी विचारले .
त्या वॉचमेनने कसलीही प्रतिक्रिया दिली नाही त्याने फक्त आपला एक हात पुढे केला, व रत्नमाळा आज्जींनी सुद्धा त्याच्या हाताकडे पाहील
आणि त्याचक्षणी त्यांच्या चेह-यावर एक निर्मळ हसू पसरल,
कारण त्या वॉचमेनच्या हातामध्ये श्रीकृष्णांची मूर्ती होती ,
" आज्जी ... ताई म्हणाल्या.. की तुमची खुप काळजी वाटतीये म्हणूनच ही श्रीकृष्णांची मूर्ती त्यांनी मला इकडे घेऊन पाठवल ...!
आता माझ काम झाल ...चला येतो ..मी ..?" तो वॉचमन अस म्हणतच
मूर्ती देऊन पुन्हा आल्या वाटेने धावतच निघुन गेला ,
आज्जी सुद्धा बसमध्ये येऊन बसल्या,
आता ह्याक्षणी बसमध्ये गर्दी नव्हती , मोजून जेम-तेम 8-9 माणस होती , त्याव्यतिरिक्त सर्व सीट रीकामे होते ,
" आज्जी तिकीट...?" तिकीट कंडक्टर म्हणाला . आज्जीनी
त्याला आपल्या स्टॉपच नाव सांगून तिकिटचे पैसे दिले , मग पुन्हा एकदा बसचा प्रवास सुरु झाला , अशातच 40-50 मिनीटे झाले असतील की तोच बसची गती मंदावली गेली , बेफान हवेला चीरत धावणारी बस , काहीक्षणातच धक्के खात बंद पडली ,
"अरे हिला काय झाल..? " ड्राइव्हर ने अस म्हणतच बसची चावी फिरवायला सुरुवात केली , परंतु बस काही केल्या सुरु व्हायच नाव घेत नव्हती , त्या निर्जन रस्त्यावर व काळ्याकुट्ट अंधारात इतकी भयानशांतता पसरली होती , की दुर-दुर पर्यंत बसचा आवाज घूमला जात त्या वेळेस अंधारात एका विशिष्ट प्रकारची ( काळ्या सावळ्यांमय ) हाळचाल जाणवली जात होती , जणु त्या काळोखात कितीतरी पिशाच्च वखवलेल्या नजरेने त्या बसकडे आसुललेल्या नजरेने पाहत आहेत , व हळू-हळू बसच्या दिशेने मार्ग क्रमन करत आहेत , जणू बसमध्ये बसलेल्या प्रत्येक माणसाचा काळ आज ह्या सैतानाकडून लिखीत स्वरुपात उपलब्ध करून मिळणार होता, अथक प्रयत्न करुन सुद्धा बस चालू होत नव्हती , ड्राइव्हर व कंडक्टर दोघे सुद्धा खाली उतरले , रत्नमाळाआज्जींनी पुन्हा एकदा आपल्या घड्याळात पाहिल 9:30 वाजले होते , बसचा ड्राइव्हर व कंडक्टर उतरताक्षणीच प्रवासी सुद्धा उतरले व " काय झाल ? काय झाल ..? " अस म्हणतच प्रश्नांची सरबत्ती त्या दोघांवर करू लागले , ड्रायव्हर सुद्धा काय फॉल्ट आहे हे पाहू लागला,
व पाहून झाल तेव्हा पुन्हा एकदा प्रवास्यांसहीत आपल्या जागेवर येऊन बसला , बसला चावी लाऊन त्याने पुन्हा एकदा ती गोल फिरवली आणि त्याचक्षणी पुन्हा एकदा बसचा आवाज त्या अंधारात मेघगर्जना व्हावा असा घुमला , आणी त्या आवाजामुळे पाठीमागे बसलेल्या आज्जींसहीत प्रत्येक प्रवास्याच्या चेह-यावर विजयीभाव दिसू लागले , परंतु हा आनंद जास्त काळ टीकला नाही , कारण काहीवेळाने पुन्हा एकदा बस बंद पडली , व पुन्हा एकदा चारही दिशेना स्मशान शांतता पसरली , ड्राइव्हर कंडक्टर पुन्हा एकदा खाली उतरले , व ह्यावेळेस ड्राइव्हरने मेकेनीकला फोन करुन बसमध्ये काय फॉल्ट आहे हे पाहण्यासाठी बोलावल , रत्नमाळा आज्जींनी पुन्हा एकदा आपल्या घड्याळात पाहील 9 :45 वाजले होते ,वेळ पाहून त्यांच्या चेह-यावर काहीक्षण चिंतेचे भाव पसरले , कारन 12 वाजायच्या आधी त्यांना आपल्या गावातल्या मंदिरात पोहचायच होत, रत्नमाळाआज्जी आपल्या सीटवरुन उठल्या व बसच्या पाय-या ऊतरुन बाहेर आल्या , व एक कटाक्ष त्यांनी त्या रक्तपिपासू अंधारात फिरवला , काहीक्षण तर हा कालसर्प पाहुन त्यांच्या उरात धडकीच भरुन आली परंतु न जाणे का श्रीकृष्णाची मुर्ती त्यांच्या हाती असल्याने त्यांची भितीजरा कमी -कमी होत गेली ,
" काय रे पोरांनो...? बस ठिक होईल का...?" रत्नमाळा आज्जी ड्राइव्हर व कंडक्टर कडे पाहत म्हणाल्या ,
"4 -5 तास लागतील..? तो पर्यंत तुम्ही आत बसा ..!" ड्राइव्हर इतकेच म्हणाला. परंतु 4-5 तास थांबण्या इतपत वेळ आज्जींकडे नव्हता, घड्याळात वेळ पहिला तर 10 वाजले होते , फक्त दोन तास राहीले होते , वेळ जणू आज थांबता -थांबत नव्हता , आता मात्र रत्नमाळा आज्जींनी पायी जायच ठरवल , तसही सामान वगेरे जवळ नव्हतच ,
तस त्या एक-एक पाऊल चालत श्रीकृष्णाची मूर्ती घट्ट आवळत रस्त्याने चालू लागल्या , त्यांना मागून एक हाक ऐकू आली ,
" अहो आज्जी ...? कुठ चाललात...?" बसचा ड्राइव्हर रत्नमाळा आज्जीं जवळ येत म्हणाला . आज्जींनी त्याला श्रीकृष्णजन्माष्टमी बदल सांगितल , मग सर्व बाब ऐकून झाल्यावर तो म्हणाला .
" अहो आज्जी.. अशा एकट्या .जाऊ..नका? तो रस्ता वंगाळ हाय...! .
एक्सीड़ंट होउन मेलेली माणस रात्री-अपरात्री दिसतात म्हणे , ..तिथ! "
ड्राइव्हर म्हणाला .
" मी आयुष्यात फक्त देवावर विश्वासवर ठेवलाय ..! आणी
माझ्यासोबत माझा देव आहे.. मला काही होणार नाही... ..?" अस म्हणतच , रत्नमाळा आज्जींनी श्रीकृष्णाची मूर्ती त्यास दाखवली , तस त्याने त्या मंदस्मित हास्य करत पाहणा-या श्रीकृष्णाच्या मूर्तीकडे पाहून हात जोडले व पुढे म्हणाला .
" ठीके आजी .... आता जाताच आहात तर ही टॉर्च घेउन जा..? "
अस म्हणतच त्या ड्राइव्हरने एक टॉर्च रत्नमाळा आज्जींकडे दिली व पुन्हा बस कडे निघुन आला, रत्नमाळा आज्जींनी सुद्धा ती टॉर्च आपल्या हाती घेतली व टॉर्च चालू करुन त्या अंधा-या रात्री एक -एक पाऊल पुढे -पुढे जाऊ लागल्या , आजदिवसभर रत्नमाळा आज्जींचा उपवास होता , त्यांनी फक्त 3-4 केळी तेवढी खाल्ली होती, म्हणून 20-30 मिनिट चालून झाल्यावर रत्नमाळा आज्जींच्या डोळ्यांसमोर थोडीशी अंधारी यायला लागली , थोडस अस्वथ सुद्धा व्हायला आल , तस थोडवेळ थांबून त्या पुन्हा चालू लागल्या , काहीवेळाने त्यांना एक नागमोडी वळण दिसल, आणी त्या वळना बाजूला एक चारचाकी गाडी दिसली , आणि क्षणार्धात त्यांच्या मेंदूने त्या 5 दिवसाअगोदर घडलेल्या अपघाताची चित्रफीत सुरु केली विचार सुरु झाले , रत्नमाळा आज्जींना त्या चकनाचूर झालेल्या गाडीतल्या भयंकर मृतपावलेल्या प्रेताच द्र्ष्य आठवळ , आणि त्याचक्षणी मनातल्या भीतीला साठवून ठेवणा-या गाभा-याक्ष संदुक उघडला जात, मनात न जाणे कित्येक नाना त-हेचे
भयभीत , अघोरी , अमानविय विचार त्यांच्या डोक्यात येऊ लागले,
चालता-चालताच रत्नमाळा आज्जींनी टॉर्चचा प्रकाश त्या गाडीवर फेकला , त्यांना काळ्या रंगाच रक्त त्या गाडीच्या ड्राइव्ह सीटच्या आजुबाजुला लागलेल दिसल, जे पाहताक्षणीच त्यांनी तो प्रकाश वळवून घेत पायवाटेवर टाकला ,आणि खाली मान घालून गप्प- चालू लागल्या, 10-15 मिनिटांत त्यानी तो नागमोडी वळण पार केला
तस त्यांच्या जिवात -जिव आला , रत्नमाळा आज्जी जसेजसे पुढे-पुढे जात होत्या , तसे धुके अगदी गडद-गडद होत चालले होते , हे धुके सामान्य नसून असामान्य होते कारण एवढे जाड धुके पडले होते की समोरचे काडीमात्र दिसून येत नव्हte आणि थंडी तर जणू रक्त गोठावण्या इतपत पडली होती , रत्नमाळा आज्जीं 3-4 मिनिट चालून झाल्या असतील की तोच पुन्हा एकदा त्यांना तो नागमोडी वळन दिसला , आणि ती अपघातग्रस्त चारचाकी गाडी सुद्धा दिसली , परंतु आता ह् त्या वळनाच रुप पालटले होते , तिथे कमालीचा गारवा वाढला होता , एकक्षण तर रत्नमाळा आज्जींना आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही ,
परंतु त्यावर जास्त विचार न करता रत्नमाळा आज्जी पुन्हा चालू लागल्या , अशातच 10 -15 मिनिटांनी पुन्हा एकदा तो नागमोडी वळनाचा रस्ता त्यांनी मोठ्या मेहनतीने पार पाडला , चालून -चालून गळा सुकण्याची वेळ आली होती, हात - पाय दुखु लागले होते , अंगात त्राण शिल्लक राहिले नव्हते , की तोच पुन्हा एकदा रत्न्माळा आज्जींच्या नजरेस तो नागमोडी वळनाचा रस्ता व ती अपघात ग्रस्त गाडी दिसली, आणि ह्यावेळेस मात्र त्यांच्या मनात शंकेची पाल चुक-चुकली, हे काहीतरी भलतंच आपल्यासोबत घडत आहे हे रत्नमाळा आज्जींना समजायला जास्त वेळ लागला नाही , एखादा मणुष्यप्राणी ज्याप्रकारे चकव्यात अडकला जात पुन्हा-पुन्हा त्याच ठीकाणी येऊन पोहचतो , तोच अनैसर्गिक प्रकार आज्जींच्या बाबतीत घडत होता , चालून -चालून रत्नमाळा आज्जींना पुन्हा एकदा दम लागला , त्या काहीक्षण दम खात रस्त्याच्या थोडे आडबाजुला बसल्या , आता ह्या क्षणी आज्जी अपघात झालेल्या गाडीपासून फक्त 40 -45 मीटर इतक्याच अंतरावर होत्या , की तोच
कसलातरी आवाज झाला, आणी त्या आवाजासरशी रत्नमाळा आज्जींनी हलकेच टॉर्चचा प्रकाश अपघातग्रस्त गाडीच्या दिशेने भिरकावला , परंतु तिथे संशयास्पद अस काही आढळल नाही , रत्नमाळा आज्जींनी आपल्या हातात असलेल्या घड्याळात वेळ पहिलाच तर त्यांना एक आश्चर्यकारक गोष्ट समजली की घड्याळ बंद पडले असुन
त्यात 10 वाजले होते , किती वेळ झाला असेल, 12 वाजून गेले असतील का ? अशा कित्येकतरी प्रश्णांनी आज्जींच्या मनात घर करायला सुरुवात केली , रत्नमाळा आज्जी आपल्या विचारात मग्न होत्या आणि अचानक त्यांच्या कानी एक आवाज पडला,

" ए म्हातारे.....!..., हिहिहिहिन ...स्स..स्स्स! "
एक भयंकर घोगरा आवाज , व त्याला जोड म्हणून एक पाशवी हास्य , जे रत्नमाळा आज्जींच्या कानात घुमले आज्जींनी आपला टॉर्च असलेला हात आवाजाच्या दिशेने पुढे केला त्याक्षणी आज्जीला एक भयानक दृश्य दिसले , जे मानवी क्षमतेच्या बुद्धीपलीकडचे होते , त्या गाडीच्या स्टेरिंगवर कोनितरी डोक ठेवून बसल होत, त्या उपद्रवाच्या अंगावर सफेद रंगाचे कपडे होते , व त्याचे हात पाय चुना पोतल्यासारखे पांढरेफट्ट दिसत होते जणू प्रेतच , हे असले भयानक ध्यान पाहुन आज्जींची पाचावर धारन बसली , येवढ्या रक्तगोठावणा-या थंडीत सुद्धा त्यांना घाम फुटू लागला , हात पाय थर - थरु लागलें,
" क..क..कक...कोण आहे...????" भीतिने आवंढा गिळून त्या खाली डोक घालून बसलेल्या विचित्र आकृतीकडे पाहत रत्नमाळा आज्जी म्हणाल्या .
" ....मला नाहीं ओळखलस ....? 5 दिवसाअगोदर इथ मरुन पड़लो होतो , त्यावेळेस माझ्याकडे त्या बसमध्ये बसून वटारुन बघत होतीस... हिहिहिहिह, खिखिखी.स्स्स्स्स्स्स्स हाहाहाह...! "
पुन्हा एक भयानक घोगरा आवाज घुमला ,
" मी तुझ काही बिघडवल नाही बाबा मला जाऊदे ..?!"
" ए म्हातारे ..? लय घाई झाले ना...तुला जायची ..! हिहिहिही , खिखिखी...स्स्स्स अस म्हंणतच त्या उपद्रवाने आपली मान वर -वर करण्यास सुरुवात केली , आणि त्याच्या हालचालीसहित त्या मानेची हाड जणु कित्येक दिवस हालचाल न झाल्यासारखी कट-कट करत वाजु लागली , आणि एका झटक्यात त्या अमानविय उपद्रवाने मान वळवून आज्जींकडे पाहील , आणि त्याचक्षणी आज्जींच्या हातुन त्यांचा inhaler पंप खाली पडला .
त्या प्रेताचे डोळे पिवळ्या रंगाचे होते व त्यात मिरी येवढा ठिपका होता.
चेह-याला जागो -जागी जखमा झाल्या होत्या .
" हिहिहिही,खिखिखिखी, स्स्स्स्स ....! " एक भयंकर हास्य देत त्या उपद्रवाने त्या inhaler पंपाकडे पाहील आणि कुठल्यातरी अदृश्य शक्तीने त्याने तो पंप स्वतःकडे खेचला .
" ए म्हातारे...! पंप पाहिजे ..? ." आपल्या दोन्ही भूवया उडवत पिशाच्च पुढे म्हणाले ,
" मग ती मूर्ती फेक आणि माझ्याजवळ ये....?"
आपली हाताची बोट एका विशिष्ट प्रकारे फिरवत ते प्रेत म्हणाले .
" नाही...! अस म्हणतच रत्नमाळाआज्जींनी ती मूर्ती आपल्या उराशी
कवटाळून धरली व त्यांचे श्वास फ़ुलले, डोळ्यांसमोर अंधारी
येत त्या खाली कोसळल्या आणि त्यांच्या हातुन श्रीकृष्णाची मूर्ती थोड दूर जाऊन पडली , रत्नमाळा आज्जींच्या समोर जे काही अनैसर्गिक ध्यान अवतरल होत , त्याला ही आयती संधी चालुन आली .
" हाहाहाहाहा.., खिखिखिखी, स्स्स ए म्हातारे... ! आता कोण वाचवेल ग तुला...?? " अस म्हणतच ते प्रेत एक -एक पाउल चालत रत्नमाळा आज्जीं च्या दिशेने येऊ लागले , त्याच्या प्रत्येक पाउलासरशी हाड वाजल्याचा आवाज होत-होता , त्याची चाल नागमोडी होती , कधी दोन पावलांवर तर कधी जमिनीवर रेलून असं ते विचित्र चालत , खदखदत हसून जवळ जवळ येत होते .रत्नमाळाआज्जींच्या शरीराची हाळचाल जणु थांबलीच होती , त्यांना पुन्हा तरतरी येण्यासाठी तो inhaler पंप हवा होता, एखाद्या पाण्याविन माशासारखे आज्जींचे शरीर तडफडत होते , जे पाहुन त्या भयानक आत्म्याला मज्जा येत होती , हसत खिदळत तर कधी एका वेड्या माणसा सारखे ते ध्यान टाळ्या वाजवत जल्लोष साजरा करत होते .
"म्हातारे तुझे दिवस...भरले.... ? हिहिही , खिखिखी, हिहिहिहिही, ह्या.....!" अस म्हणतच ते प्रेत एका कोळ्या सारख चालत आज्जींच्या दिशेने येऊ लागल , आणी त्याचक्षणी वातावरणात एक घंटीचा नाद घूमला , दूरवर धुक्याची वलयं दूर होऊ लागली , घंटीचा नाद आणखी स्पष्ट येऊ लागला व त्या सफेद रंगाच्या धुक्यातुन एक पांढराशुभ्र प्रकाशमय लहान वासरु आतिवेगाने धावत बाहेर आले , त्याच्या खुरांचा आवाज ऐकून प्रेताने त्याच्याकडे बघितले आणि वेळ न दवडता आज्जींवर हल्ला करण्यासाठी हवेत झेप घेतली, एकच प्रहार खेल खल्लास , केव्हाही कोनत्याही क्षणी ते प्रेत आज्जींवर हल्ला करणार होते , की तोच त्या अमानविय आकाराला एक हवेतच वासराने धडक दिली , धडक इतकी प्रचंड होती की ते प्रेत थेट 10 -12 फुट हवेत उडाले आणि धुक्यात परावर्तीत होत नाहीसे झाले , ते प्रेत हवेत कणा कनानी विखुरले गेले . रत्नमाळा आज्जींची शुद्धहरपली , काहीवेळाने त्यांना कोणितरी आवाज देत होते
" माई.......!.ए ...माई .........!"
प्रेमळ स्वरांचा आवाज ऐकून रत्नमाळा आज्जींनी हळूच आपल्या दोन्ही डोळ्यांची हालचाल केली व डोळे उघडले तसे त्यांना आपल्या पुढ्यात एक 15-16 वर्षाचा मुलगा दिसला , काहीक्षण रत्नमाळा आज्जींना तर डोळे उघडताना त्या मुलाच्या डोक्यामागे गोल चमत्कारीक प्रकाशसुद्धा पाहिला होता , परंतु त्या पूर्णतः शुद्धिवर आल्या तेव्हा प्रकाश नाहीसा झाला ,
" पाणी...? पाणि....?!" खालावलेल्या स्वरातच रत्नमाळा आज्जी म्हणाल्या .
त्या मुलाने आपल्या जवळ असलेल्या एका मातीच्या तांब्या एवढे भांडे रत्नमाळा आज्जींना दिले ते पिऊन रत्नमाळा आज्जीना थोड वेगळ वाटु लागल,
" काय रे पोरा.. हे काय पाजलस तु मला ..?" अस म्हणतच रत्नमाळा आज्जींनी तो मातीचा भांडा आपल्या हातात घेतला , ज्यात दुध होते .
" अरे माझा उपवास ...होता..?" रत्नमाळा आज्जी अस म्हणतच उभ्या राहिल्या , व त्या मुलाला खालून वर पर्यंत न्याहाळल , त्या मुलाच्या गळ्यात एक पिवळ्या रंगाचे उपरणे होते , आणि पांढरीशुभ्र धोती , कमरेला बासरी अडकवली होती आणि डोक्यावर एक फेटा होता , फेट्यातील मोरपंख हवेत डुलत होते .
" काय रे , अगदी कृष्णच दिसतो आहेस ? " रत्नमाळा आजी नवलाने म्हणाल्या .
" माई , आज रात्री पुजा असते न , मग आईनेच मला लाडाने असे सजवले आहे ! " तो म्हणाला .
पण बोलताना त्याच्या चेहऱ्यावर एक नटखट हसू होते जणू खोटे बोलण्यात त्याला मज्जा येत असावी .
" माई....! 12 तर कधीच वाजुन गेले...!" तो मुलगा आपल्या प्रेमळ आवाजात म्हणाला .
" काय ..! " रत्नमाळा बाई मोठ्यानेच ओरडल्या व पुढे म्हणाल्या
बापरे येवढ ऊशीर झाल मग तर मला लवकर पोहचायला हव गावात...!" रत्नमाळा बाई आपल्या स्व्त:शीच म्हणाल्या ,
" माई...! मी सोडु तुला...! माझी बैल गाडी तिकडेच ऊभी आहे...!"
" हा चालेल ना लय उपकार होतील...तुझे..!" रत्नमाळा आज्जीने आपले दोन्ही हात समोर जोडले ,
" अंग्ग माई त्यात..उपकार कसले ..ग...! तू दरवर्षी न चुकता पुजा करतेस , तूला मदत करणे हे तर माझे कर्तव्यचे आहे ....!"
तो मुलगा गोड हसत म्हणाला , परंतु त्याच्या ह्या वाक्याचा अर्थ मात्र रत्नमाळा आज्जींना समजला नाही
" म्हणजे..तू देव आहेस की..काय...?" रत्नमाळा आज्जी त्या मुलाकडे पाहत म्हणाल्या.
" नाही ..ग माई...! मी तर असच म्हंटल ..!" तो मुलगा पुन्हा एकदा हास्य करत म्हणाला .
" एक विचारु ..का .बाळा ..?" रत्नमाळा आज्जी सुद्धा प्रेमानेच म्हणाले .
" माई...?! मन हे चंचल असत म्हणूनच त्या चंचल मनात कधीच
प्रश्न ठेऊ नये..! विचार काय विचारायचे आहे तुला...?"
" तुझ नाव काय आहें...? आणि हा वासरु तुझा..आहे का...?"
"हो माई हा वासरु माझ आहे...! आणि माझ नाव मोहन आहे..!"
" वा वा छान .. नावाप्रमाणेच गोड आहेस तू....! " रत्नमाळा आज्जी म्हणाल्या.
" माई तु एक काम कर ...! इथेच थांब ..! माझे काम झाले ! " अस म्हणतच तो मुलगा धावतच पुढे निघून गेला , आणि तो मुलगा ज्या दिशेने गेला त्याच दिशेने काहीवेळात एक कार येऊन थेट रत्नमाळा आज्जींच्या पुढ्यात येऊन थांबली , त्या कार मधून निळकंठजी, सखाराम आणि गावातली काही , 3 - 4माणस उतरली .
निळकंठजींनी लागलीच आपल्या मातेवर प्रश्णांच्या सरबत्तीचा वर्षाव केला , रत्नमाळा आज्जींनी आपल्या समवेत घडलेला सर्व प्रकार जशास तसा सांगितला ,
" पन मावशी...! आम्हाला तर असा कोणताच मुलगा गाडीसमोरुन जाताना दिसला नाही , आणि तु म्हणतेस तसा इथ कोणि वासरु पन नाहीय..!मग तो पोरगा होता कोण ..?" एक गावकरी म्हणाला .
" मावशी तु म्हंणतेस तसे ही जागा झपाटलेलीच आहे..! दिवसा उजेडा सुद्धा इथे किती तरी अपघात होतच असतात ! आणी मला काय वाटते की मावशी ..तो मुलगा नक्कीच श्रीकृष्ण असतील ..!
आणि साक्षात देव तुझ्या भक्तीवर प्रसन्न होऊन तुला वाचवायला आला असेल ! कारण मावशी , 15-16 वर्षांचा मुलगा अशा निर्जन स्थळी येणार नाही , तो सामान्य बालक नव्हता ,साक्षात श्रीकृष्ण तुझ्या मदतीसाठी अवतरले आणि प्रेमाने त्यांच्या हातांनी tulq दुध पाजून तुझा उपवास सोडवला ... !" तो गावकरी म्हणाला .
आणि त्याच्या ह्या वाक्यासरशी रत्नमाळा आज्जींच्या डोळ्यात त्या मुलाच रुप, त्याच माई म्हणून हाक मारणे ,आठवले आणि आज्जींच्या डोळ्यांतुन अश्रुधारा वाहू लागल्या , नटखट मलाही खोटे बोलून माझा प्राण वाचवून गेला ...साक्षात प्रभु श्रीकृष्णाने त्यांना आपल्या लीलेच दर्शन घडवून दिले होत.......


द्रष्टांचा होई अनाचार....!
पृथ्वीते होई पापभार ...!
त्यांचा करण्या संहार....!
परमेश्वर अवतरती.......!
हरेकृष्ण||||


लेखक: .... jayesh zomate......

समाप्त .........

 

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED