१ तास भुताचा - भाग 27 jay zom द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

१ तास भुताचा - भाग 27



भयानक ट्रक 1


भाग 1



संध्याकाळचे 5:30 वाजले होते, आकाशात सूर्य अद्याप तरी टिकून आपला भव्य प्रकाश जमिनिवर फेकत होता, त्यातच दोन तिशीच्या आसपास असलेले ते तरुण युवक हायवेवरुन पायीच कुठे तरी चालले होते , पाहुयात कोण आहेत ते तरुण युवक आणि असे पायी कोठे चालले आहेत .
" अर ये....राम्या .....! चाल की जोरात .... भें......त? "
रघू आपल्या मित्राला म्हणाला .म्हणजेच राम्याला
रघू- आणि .राम्या दोघे ही खुपच जवलचे मित्र , रघु हा शरीराने काटकूला आणि आकाराने मोठा व निरव्यसनी होता , तर राम्या हा त्याच्या स्वभावाने वेगळा होता , राम्याला दारुच व्यसन होत , शरीराच्या आकाराने तो खुप जाडा आणि बूटका होता, दोघे सुद्धा एकाच गावातले होते, त्यातच गावात काही काम मिळत नसल्याने दोघे सुद्धा शहरात आले होते , शहरात आल्यावर त्या दोघांना एकाच कंपनीत नौकरी सुद्धा मिळाली होती , मग ते दोघे शहरातच एका भाड्याच्या खोलीत राहू लागले , 5- 6 माहिन्यांनी कधी-कधी ते दोघे आपल्या गावाला जात असत व 1-2 आठवडे राहुन पुन्हा शहरात येत असत आणि पुन्हा 5- 6 महिन्यांनी हाच क्रम सुरु व्हायचा , त्याचप्रकारे आज सुद्धा 6 महिने झाल्याने ते दोघे आपल्या गावाला चालले होते , गावाला जाण्यासाठी दोघे सुद्धा दरवेळेस एक स्पेशल रिक्षा करायचे, दरवेळेस एकच रिक्षा करत असल्याने रिक्षावाला ओळखीचा झाला होता , आणि आज सुद्धा त्यांनी तीच रिक्षा केली होती, पण कोण जाणे आज त्यांची किस्मतच खराब निघाली होती , म्हणजेच अर्ध्या रस्त्यातच रिक्षा बंद पडली होती , आणि आता ते दोघेही आपल्या गावाला पायीच निघाले होते,त्या दोघांनाही गावाला पोहचण्यासाठी 2 तास लागणार होते, परंतु गावाला जाण्यासाठी त्याना एक जंगल पार करायच होत , ज्याच नाव होत
" चेटक्याच जंगल प्रारंभ....!" रघू पुढे पाहत म्हणाला . पुढे रस्त्याच्या नाजुलाच एक निळ्या रंगाचा मोठा फळक होता , त्यावर सफेद रंगाने मोठ्या अक्षरात ते वाक्य लिहिलेल , जे वाक्य रघूने आताच काहीक्षणापुर्वी उच्चारल होत.
" काय ...? परंभ....?" नशेमध्ये धूत असलेला राम्या वेगळ्याच आवाजात म्हणाला,
" ये बेवड्या... परंभ नाय....रे...? प्रारंभ...! नशेत झुलणा-या राम्या कडे पाहत रघु म्हणाला,
" पाणी हाय कारे ....? ताण लागलीया...!"
जिभल्या चाटतच राम्या म्हणाला.
" अर...भ$#$#व्या....त्यो ....मुत पेलाय तो कमी हाय का ! ... आता पाणि पाहिजे...! "
रघू राम्यावर खेकसतच म्हणाला , कारण चालून-चालून त्याला सुद्धा तहान लागली होती, त्यातच खोलीवरुन निघताना रघूने राम्याला सांगितल होत ,की एक पाण्याची बाटली सोबत ठेव परंतु नशेच्या अधिन झालेल्या राम्याला काही रघूचे बोल कळले नव्हते , (असो आपण पुढे जाऊयात मित्रांनो) रघुने आजूबाजूला कुठे पाणी मिळतय का हे पाहण्यासाठी एक नजर फिरवली , तस रघुला थोड दुरच एक चहाची टपरी दिसली, तस रघु आणि नशेत धूत असलेला राम्या त्या टपरीच्या दिशेने जाऊ लागले,
हातात असलेल्या पिशव्याना सांभालत एक-एक पाऊल वाढवत ते दोघे त्या टपरीच्या दिशेने निघाले , निळ्या रंगाच्या प्लास्टीकने आणि लाकडापासून बनवलेली ती चहाची टपरी खुपच भयानक वाटत होती, त्यातच पुर्ण जंगलात ती एकच टपरी होती , टपरीजवल पोहचताच रघुने आत एक कटाक्ष टाकला, त्या पुर्ण टपरीत कालोखाशिवाय कोणीही नव्हत, परंतु रघुला एक गोष्ट खटकली होती , ती म्हणजे टपरीच्या पुढे असल्यालेल्या टेबलावर सर्व काही सामान स्टो , टोपशी आणि काही प्लास्टीकच्या बरण्या होत्या त्या बरण्यांच्या आत बिस्किट, आणि टोस्ट होते,
" हे सगल सामान इथ हाय म्हंजी? कोण तरी असायला पायजे ?"
रघु आपल्या मनातच म्हणाला, व त्याने आजुबाजुला पाहतच एक आवाज दिला.
" कोण हाय का आत......????? " रघु मोठ्यानेच म्हणाला, त्याचा हा आवाज ऐकुन राम्या मोठ्यानेच ओरडू लागला
" म्या हाय...म्या हाय... ! नशेतच आपल डोक एका बैला सारख हलवत राम्या म्हणाला .
" अर ये राम्या गप्प बसतुस का लेका...? जास्तच चढलीया तुला..!"
राम्या रघ्याकडे पाहत म्हणाला , त्याच्या ह्या वाक्यावर रघ्याने एका लहानमुलासारख हाताची घडी घालून तोंडावर बोट ठेवल, की त्याच वेळेस त्या टपरीतला पिवळ्या रंगाचा बल्ब चरचर करत पेटायला सुरुवात झाली , आणि त्या चरचरणा-या दिव्याच्या प्रकाशा खाली ऊभी होती एक मानवीसदृश्य आकृती,
रघु पाठमोरा असल्याने त्याला अद्याप तरी त्या आकृतीच दर्शन घडल नव्हत, परंतु ते जे काही अमानविय अवतरल होत त्याची नजर त्या दोघांकडेच खिळून होती......! आपल्या पाठीमागे कोणितरी उभा असल्याची चाहूल आता रघुला लागु लागली होती , तस त्याने एक गिरकी घेत पाठिमागे वळुन पाहिल आणि पुढच दृश्य पाहताक्षणी त्याच्या तोंडून एक मोठी किंकाळी बाहेर पडली !

आ.........................!!!!!!


क्रमश :