१ तास भुताचा - भाग 28 jay zom द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

१ तास भुताचा - भाग 28


भाग 28

भयानक ट्रक भाग 2

{भय इथले संपत नाही.}







" ओ दादा ..? कशापायी ओरडताय येवढ भुत पाहिल्यासारख ..? " समोरुन एक मानवीसदृश्य आवाज आला, तस त्या आवाजासरशी रघु ने टपरीच्या आत पाहील, तस त्याला समोरच दृश्य दिसून आल की एक 20 वर्षाचा युवक त्या चरचरणा-या दिव्याच्या प्रकाशात उभा होता, त्या युवकाच्या अंगात एक मलकी टी- शर्ट होती, व खाली एक चॉकलेटी रंगाची पेंट होती आणि त्या युवकाचे केस वाढल्याने चेह-यावर आले होते, म्हणूनच रघु त्याला घाबरुन किंचाळला होता, परंतु माणुस आहे हे पाहुन तसे त्याच्या जिवात जिव आला ,

" काय रे...पोरा ? तु असा अचानक कुठून आला..? त्या अनोलखी युवकाला घाबरतच रघुने प्रश्ण केला,

" इथच व्ह्तू .....! "

शुन्यात पाहत तो युवक म्हणाला.

" पण म्या पाहिल तवा कोणच नव्हत ना.? ?" रघु आपल्या चेह-यावर खोट हास्य आणत म्हणाला, कारण त्याला खुपच भिती वाटली होती,

" काय आहे ना भौ ..! inverter चेक करत होतो, ह्या टेबलाखाली हाय , आणि म्हणुनच तुम्हाला दिसलो नसेल मी , पण जस तुमच आवाज आलना लगेच उभा राहिलो बगा ...! "

" अस व्हय ...! म्हणुन ह्यो बल्ब चरचरतोय काय...?"

रघु त्या चरचरणा-या दिव्याकडे पाहत म्हणाला,

" हो ... हो ! " आपल्या चेह-यावर आलेले केस पुन्हा बाजुला सारत तो युवक म्हणाला,

" काय रे पोरा पाणि भेटल का..? " रघू त्या युवका कडे पाहत म्हणाला .

ह्या वाक्यासरशी त्या युवकाने एक बिसलेरी ची बॉटल रघु कडे दिली, व म्हणाला .

" थंड नाहीये....!"

" चालतय की ..." राम्या इतकच म्हणाला , कारण त्याला खुपच तहान लागली होती , आणि तसही तहान लागल्यावर मनुष्य कधीही थंड किंवा गरम अस काहीच पाहात नाही, गट, गट आवाज करत रघुने पाणि पिल,

आणि राम्याला ही पाजल, परंतु पाणी पितावेळेस रघुला एक विचीत्र गोष्ट जाणवली होती, ती म्हणजे तो युवक केव्हापासूनच त्या दोघांकडे मंदस्मित हस्य करत पाहत होता, आणि शेवटच म्हणजे पाहतावेळेस त्याच्या डोळ्यांची जराशीही हालचाल होत नव्हती, हे जरा रघुला विचीत्रच वाटल,

पण त्यावर त्याने जास्त विचार न करता, बाजुला असलेल्या टेबलावर आपल्या पिशव्या ठेवल्या आणि दोघेही टेबलाच्या बाजुला असलेल्या खुर्च्यांवर बसले,

" चहा आणु का...?" रघुच्या अगदी जवळच म्हणजेच पाठीमागुनच हा आवाज आला, तस अचानल आलेल्या ह्या आवाजासरशी रघुने दचकुनच पाठीमागे पाहिल, तो युवक रघुच्या पाठिमागेच उभा होता ,

" नाय नाय पाणिच बस्स ? आम्हाला निघायचय लगेच ..! " रघुला त्या मुलाच वागण थोड अनपेक्षितमय आणि विचीत्रच वाटल होत ,नाही तरी रघू म्हणायला शहरात दिवसाला 3- 4 वेळा चहा प्यायचाच परंतु ह्या क्षणी त्याने कशी तरी तल्लप रोखुन ठेवली,

" ह्यांना आणु का...? तो युवक राम्याकडे जिभळ्या चाटत पाहत म्हणाला.

"न्हाय, न्हाय....! हा चहा नाय पेत....! " रघू खोटच म्हणाला.

" तुझ नाव काय रे बाळा ? आणि तुझे आईवडील कुठे आहेत...? "

रघुने त्या युवकाला प्रश्ण केला ,

" मी उज्वळ....! माझे आई- वडिल...." तो युवक पुढे काही बोलणार की तोच... एक मोठी ट्रक हॉर्न वाजवत चेटक्याच्या जंगलात निघुन गेली , त्या आवाजासरशी रघुने हायवे कडे पाहि ल , पन पुढे त्याच्या नजरेस काहीही पडल नाही , जणू ती ट्रक खुपच वेगाने जंगलात निघुन गेली असावी, आणि त्या नंतरच रघुने हायवेवर नजर टाकली असावी,

" ह्या त्याच्या मायला थांबावयला पायजी व्ह्ती ट्रक ??" स्वतःशीच अस म्हणतच रघुने पाठीमागे वळुन पाहिल आणि त्याला क्षणात एक आश्चार्याचा झटकाच बसला, कारण समोर- कारण समोर आता कोणीही नव्हत,

" हा उज्वळ कुठ गेला...????" एक आवंढा गिळून रघु म्हणाला.

" मी इथच हाई ...की ! टेबलावर डोक ठेवुन बसलेला राम्या नशेतच म्हणाला, तस रघूने एक कटाक्ष राम्यावर टाकला आणि म्हणाला,

" इथ, परिस्तितीत काय ए आणि ह्यो मा###$%त झोपलाय....!

,ये राम्या उठ ! नाय तर एक लाथच घालतो ..ढुं×××त ..! मा¤¤¤त "

" मला बोलावलात ...???" पाठीमागुन पुन्हा त्याच प्रकारे आवाज आला आणि पुन्हा आलेल्या ह्या बेसावध आवाजासरशी रघुच्या काळजात भीतिने धडकीच भरली, काहीक्षण तर त्याला अस वाटून गेल की छातित कळ येतिये की काय तस त्याने आपल्या छातीवर हात ठेवतच त्या युवका कडे पाहिल , व म्हणाला ,

" अर ये बाबा असा भुतासारख येऊन काय टेपतुस पाठिमाग? गचकावायचा पिल्यान हाय का मला ???"

उसासे टाकतच रघु म्हणाला ,

" मी इथेच होतो , पुन्हा आप्ल्या चेह-यावर आलेले केस बाजुला सारत उज्वळ इतकेच म्हणाला , तस पुन्हा वातावरणात एक ट्रकच्या हॉर्नचा आवाज घुमला, ह्या आवाजासरशी पुन्हा रघुने हायवेवर एक ओघळती नजर टाकली पन हायवेवर एक चिटपाखरु सुद्धा नव्हत,

" काय रे उज्वळ तुला ट्रक दिसली का, ? " रघुने उज्वळ कडे प्रश्नार्थक नजरेन पाहिल, पन उज्वळचे लक्ष त्याच्या बोलण्यावर नव्हते , तो एकटक त्या झोपलेलेल्या राम्याकडे जिभळ्या चाटत पाहत होता, जे रघूला थोड विचित्रच वाटल,

एव्हाना आता 6 वाजुन जात अंधार पडायला सुरुवात झाली होती .थंडीचा माहिना आणि त्यातच जंगली भाग असल्याने वातावरण थंडमय होत आजुबाजुला थोड फार धुक पडल होत, त्यातच कानावर फड, फड आवाज करत पक्षी - पाखर आपल्या घरी जाण्यास निघाले होते त्यांच्या पंखांचा आवाज येत होता , त्यातच तो चरचरणारा दिवा सुद्धा आतापर्यंत ठिक झाला होता, ज्याचाकाय तो पिवळा प्रकाश आता तिघांच्या चेह-यावर पडत होता, राम्याची नशा सुद्धा आता थोडीफार किंचीतशी उतरली होती अस भासून येत होत , कारण राम्या आता खुर्चीमध्ये ताठ बसला होता,

" ए लेका उतरली का तुझी...? रघु राम्या कडे पाहत म्हणाला.रघुच्या ह्या वाक्यावर राम्याने फक्त शहाण्या मुलासारख एकदोनदा खाली पाहतच माण डोळावली , तस रघुला ह्या सर्वांची सवय झाली होती .त्याचा हा होकार आहे हे समजुन त्याने उज्वळ कडे पाहील व म्हणाला,

" चल निघतो आम्ही उशिर झाला खुप !" रघु म्हणाला

" नका जाऊ ! तो जाउन नाही देणार..तुम्हाला .?

उज्वळ गुढपणे म्हणाला, ह्या वाक्याचा अर्थबोधकाही रघुला लागला नाही, तस त्याने पुन्हा उज्वळ कडे पाहिल व म्हणाला .

" काय ....? कोण जाऊ देणार नाय ...?"

" बाबा नी सांगितलय अमुश्याला त्याच नाव नाय घ्यायच ..? "

उज्वळ पुन्हा कोड्यातच म्हणाला ,

" अर तु काय बोलतु बाबा काय समजुन- उमजुन येत नाय बघ ? जरा नीट सांग की...?" रघु म्हणाला,

" तोच तो ..? जो अमुश्याच्या रातिला ह्या जंगलात फिरतु ? "

उज्वळ आपले तोंडावर आलेले केस बाजुला सारत म्हणाला ,

" कोण र....भुतबित हाय का...? हिहिहिही ," येवढ्या वेळ गप्प बसलेला राम्या मध्येच म्हणाला , तस त्याच्या ह्या वाक्यावर रघु सुद्धा किंचीत थोड हसला,

" आरे उज्वळ ..तु नको टेंशन घेऊ ? आम्ही 2 आठवड्यांनी वापस येऊ ना ! त्यादिवशी तुला भेटूनच जाऊ "

रघु राम्या नंतर उज्वळ कडे पाहत म्हणाला,

" नाय दादा....! जो अमुश्याला एकदा ह्या जंगलात गेला त्यो कधी जिता परत येत नाय ...! साधा मड भी नाय भेटु देत तो "

" काय म्हणतुस..? मंग नाव सांग की त्याचा एक शेलेपी काढू त्याच्या संग! हिहिही , राम्या पुन्हा दात विचकत रघु कडे पाहत म्हणाला, राम्याला वाटल की आपल्या जोकवर रघु पुन्हा हसेल पन तस झाल नाही,

रघु ने त्याच्या कडे सिरियस होत , पाहिल आणि म्हणाला,

" काय रे बेवड्या...मगासपासन बघतुया मी ! उतरलिया तर लय डराव- डराव करतु या ? " रघुने राम्यावर एक जळजळीत कटाक्ष टाकत हे वाक्य उद्दारल , तस ह्या वाक्यासरशी राम्या दरवेळे सारखा गप्प बसला.

कारण ही नौटंकी कायमचीच होती,

" दादा ऐका माझ ! वाटलस तर आजची रात्र माझ्या घरी काढा ? आणि सकाळच्यालाच निघुन जा . ! उज्वळ पुन्हा म्हणाला ,

" ले भारी आइडिया आहे बग पोरा ! तस बी मझा गळा सुकलाय आता !"

राम्या रघुकडे दात विचकत पाहत म्हणाला. राम्याच्या ह्या वाक्यावर रघुने त्याच्या कडे डोळे वटारुनच पाहिले, व म्हणाल .

" म्या तुला घरला गेल्यावर पाणी पाजतुना , तेबी हंडा भर " रघु दातओठ खात राम्याकडे पाहत म्हणाला,

" मग येताय ना..? " बारिबरीने त्या दोघांकडे पाहत उज्वळ म्हणाला .

तस रघुने राम्याला गप्प बसवत उज्वळ च्या वाक्याच समर्थन केल,

"आर उज्वळ आलु असतु रे आम्ही ? पण काय हायना आमच्या घरला आम्ही फोन करुन सांगितलय की आम्ही घरला येतोय आन आमचे आई - बाप आता वाट बघत असतील की न्हाय आमची " रघुने राम्या आणि उज्वळ कडे पाहत हे वाक्य उद्दारल ! तसे रघुच्या वाक्याला दुजोरा देत राम्या सुद्धा म्हणाला,

" व्हय ,व्हय खर हाय !" राम्या म्हणाला , तसे रघु ने उज्वळच्या खांद्यावर हात ठेवला, आणि लगेचच एक चटका बसावा तस क्षणार्धात काढून सुद्धा घेतला, कारण उज्वळचे शरीर बर्फासारखे थंड पडले होते,

" हे बघ उज्वळ हा रस्ता आमच्या पायाखालचा हाय, तु टेंशन नको घेऊ आणि हे घे, अस म्हणतच रघुने एक पाचशेची नोट त्याच्या हातावर ठेवली व म्हणाला.

" दवाखान्यात जाऊन ये...! चल निघतो आम्ही " ना ओळख ना पालख, ना रक्ताच नात होत , पण थोड्यावेळापुर्ती का असेना उज्वळच ते वेडयासारख वागण विसरुन जात रघूला त्याची दया आली होती,

असो पुढे पाहुयात=>>>

रघुने आपल्या पिशव्या हातात घेतल्या , की तोच राम्या मोठ्याने ओरडला,

" ए ट्रकवाल्या ???? ओ ट्रकवाले भाऊ ...??? ... थांबा ...??"

" 7 वाजून जात रात्र व्हायला सुरुवात झाली होती , त्यातच हिवाळ्याचा महिन्या असल्याने हायवेवर सफ़ेद रंगाच धुक पडल होत, आणि त्याच धुक्यामधुन ती ट्रक राम्याला पुढे जाताना दिसली होती, ट्रकला आवाज देतच जाडा राम्या ट्रक च्या दिशेने धावला ,

□□□□□□□□□□□□□□□□□□□□□□□□□

ट्रक च्या आत:

मित्रांनो गाडी म्हंटल की ड्राइव्हर हवाच असतो , नाहीतर ती गाडी चालणार तरी कशी , समजा एकाप्रकारे ऑटोपायलेट मॉडवर हवेतल विमान चालू शकत , परंतु एक ट्रक बिना ड्राइव्हरच्या कशी चालू शकते, हे थोडे वेगलेच वाटत नाही का . आणि ह्याच वेगळेपणाचा एक मुद्दा घ्या , कारण राम्याला दिसलेली ती ट्रक बिना ड्राइव्हरच्या चालत होती, सर्व काही क्रिया आपोआप कोणीतरी हाताळाव अस फिरत होत्या , स्टेरिंग आपोआप फिरत , गियर सुद्धा ऑटोमेटिक शिफ्ट होत होते .

ट्रकच्या दोन्ही साईडला असलेल्या एका साईड मिरर मधुन

राम्याची पाठिमागुन धावणारी आकृती दिसुन येत होती, परंतु तरीसुद्धा ट्रक काहीकेल्या थांबली नाही . इकडे पळता -पळता शरीयष्टीने जाडजुड असलेल्या राम्याला धाप लागली तस तो दोन्ही हात कंबरेवर ठेवुन पुढे जाणा-या त्या ट्रक कडे पाहत मोठ- मोठे श्वास भरु लागला , अद्याप सुद्धा राम्याच लक्ष त्या ट्रक कडे होत , त्याच्या मनाला एक भाबडी आशा लागुन राहीली होती, की ट्रक पुढे जाऊन नक्कीच थांबेल ,

रसत्याच्या बाजुला असलेल्या निळ्या रंगाच्या फळ्यावर मोठ मोठ्या अक्षरांनी लिहिल होत , चेटक्याच जंगल प्रारंभ , the witch forest start

अस नाव लिहिलेल्या त्या फल्याला पार करुन त्या ट्रकने चेटक्याच्या जंगलाची हद ओलांडली , आणि त्या ट्रकच्या आतमध्ये सुद्धा आपोआप एकापाठोपाठ सर्व गियर कमी होऊ लागले, आणि त्या ट्रकच्या पाठीमागे

दोन लाल रंगाच्या लाईट दिसू लागल्या , लाईट दिसताक्षणीच पुढच्यावेळेस ट्रक पुर्ण रित्या थांबली गेली, थांबलेल्या ट्रकला पाहताच राम्याच्या चेह-यावर एक विजयी हास्य आल ,

" ए रघु चल लवकर...?? " राम्याने रघुला पाहताच मोठ्याने हाक दिली तसे रघुने घाई-घाईतच आपल्या पिशव्या उचलल्या , आणि त्या ट्रकच्या दिशेने धुम ठोकली , घाईत अस्ल्या कारणाने त्याने उज्वळ कडे पाहिल नाही , नाहीतर त्याला हे कळून चुकल असत की उज्वळ कोणि मनुष्य नसुन एक भुत- पिशाच्च आहे , त्या ट्रकला पाहुन उज्वळचे डोळे एखाद्या विस्तव सारखे तापले होते , चेहरा पांढराफटक पडला जात त्या चेह-यावर काळ्या रंगाच्या वेडयावाकड्या नसा उमटून आल्या होत्या, काहिवेळाने रघु आणि राम्या ट्रकपाशी पोहचले, तस रघुने मागे वळून दूर उभ्या असलेल्या उज्वळ कडे पाहिल, त्याच्या चेह-यावर निराशेचे भाव होते , तो अद्याप सुद्धा आपल डोक नाही -नाही अस होकारार्थी हलवत नका जाऊ त्या जंगलात अस सांगत होता ,

"ए रघ्या .......???? चल की ..?

रघु च्या कानांवर राम्याची हाक ऐकू आली, तस त्याने उज्वळला आपला एक हात दाखवला , व तो ट्रकमध्ये बसण्यासाठी जाऊ लागला .


पण त्या दोघांना आप्ल्या घरी जाण्यासाठी जी घाई झाली होती . ती खरच त्यांना...कोणत्या मोठ्या संकटाचा सामना तर करु देणार नव्हती ना किंवा हा ट्रकचा प्रवास त्यांचा चेटक्याच्या जंगलातला शेवटचा प्रवास तर नव्ह्ता???


पाहुयात पुढच्या भागात ..






क्रमश :