१ तास भुताचा - भाग 30 - अंतिम भाग jay zom द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

१ तास भुताचा - भाग 30 - अंतिम भाग


भाग 30
भयानक ट्रक 4



आंतिम भाग

भयानक अशी अमावास्याची काळरात्र झाली होती, आणि अमावास्याची रात्र असल्याने आकाशात चंद्र काळ्या ढगांआड लपून बसला होता, पृथ्वीवर चंद्राची तिरिप पडत नसल्याने, सर्वीकडे मिट्ट, काळोख पसरला होता , समोरच काडिमात्रही दिसुन येत नव्हत,
त्यातच अमावास्याच्या ह्या भयान रात्री , राम्या आणि रघ्या त्या चेटक्याच्या जंगलात वाट मिळेल तिकडे काट्या कूट्यातुन धावत सुटलेले , झाडावर बसलेल्या त्या घुबडाला ह्या वेळेस सुद्धा पुढे काय घडेल ह्याची उत्कंठा लागुन राहीली होती, आपल्या भेदक नजरेने ते घुबड राम्या आणि रघ्या कडे पाहत होते, रघ्या आणि राम्या दोघेही एका झुडुपाचा आधार घेत लपून बसले होते, 20- 25 मिनीट धावल्याने दोघांनाही धाप लागली होती. तस काहीवेळाने त्या दोघांनाही बर वाटू लागल, श्वास पुर्वपदावर आले गेले , तस राम्याने एकवेळ रघ्याकडे पाहील व म्हणाला.
"अर रघ्या ..? काय झालय सांग की जरा लेका ? अस भेडवानी कशापायी पळतूया आपण...?"
" श्ह्ह्ह्ह ! हळू बोल...!" आपल्या तोंडावर एक बोट ठेवत रघ्या म्हणाला .
" आर ...राम्या ..! तु म्हणाला बग.... ! की त्या डायवर चा अंग जाम थंड हाय..?"
" हा. हा . व्हय . !" राम्या इतकेच म्हणाला.
" राम्या ज्यापरकारे त्या डायवर चा अंग थंड व्हता बग," रघ्या च्या ह्या वाक्यावर राम्या फक्त हो अस इशारा करत डोक हलवत होता,
" तसच सेम त्या उज्वळचा अंग बी थंड व्ह्ता बग ,एका मेलेल्या माणसा सारखा...!" डोळे मोठे करतच रघ्या म्हणाला .
" आर म रघ्या ..! त्यात येवढ घाबरुन जायची बात काय हाय ? आजारी असतील की बिचारी ! तस बी थंडी किती पडलीये आण तू त्या पोरास्नी इलाजा साठी 500 रुपये दिल की ? "
राम्या म्हणाला .
" राम्या ! इलाज जिंवंत माणसाच व्हतू मेलेल्या नाय ?" आपल्या डोक्याला हात लावतच रघ्या म्हणाला. आणि रघ्याच्या ह्या वाक्यासरशी
त्या दोघांच्या ही सभोवताली एक अनामिक शांतता पसरली, जी काहिवेळाने एका श्वापदाच्या चित्कारण्याने भंग पावली, त्या आलेल्या आवाजाने काहीक्षण तर त्या दोघांच्याही अंगावर सर्र्कन काटा येऊन गेला,
" म्हंजी ! ती दोघ बी..!"
" भुत व्ह्ती , " राम्याच अर्ध वाक्य रघ्या ने पुर्ण केल. आणि तो पुढे म्हणाला.
" राम्या तु दिलेली बाटली माझ्या हातशी खालती पडली बघ...!"
" व्हय , व्हय "
" त्या येळेस मी ती बाटली घ्यायला खालती वाकलू बघ ...?" रघ्या म्हणाला.
..हा.....हा....." एका बैलासारख डोक हलवत राम्या म्हणाला. तस रघ्या पुढे बोलू लागला " मी ज्या येळेस खाली वाकलू "त्या येळेस मला माझ्या आज्याची एक गोष्ट आठवली..? की भुतांच पाय उलट असत्यात म्हणे ! तर म्या खिशात हात घातला आण फोन बाहेर काढुन " रघ्या पुढे काही बोलणार की तोच त्या झाडावर बसलेल घुबड घुत्कार करत उडून गेल, आणि वातावरणातली ती भयानक शांतता पुन्हा मोडली गेली,
" प....प....पुढ काय दिसल...?" राम्याची तर बोबडीच वळली होती, त्यातच तो म्हणाला .
" म्या खिशात हात घातला आण फोन बाहेर काढून टॉर्च चालू केली!आण त्या डायवरच्या पायाव मारली ! . अस म्हणतच रघ्याने खाली जमिनिकडे पाहिल आणि त्याचक्षणी त्याला अशीकाही आश्चर्यकारक गोष्ट दिसली , की
काहीक्षण तर तो डोळे विस्फारुनच खाली पाहु लागला, डोळे तर इतके मोठे झाले होते की खोबणीतून बाहेरच येतील , रघ्याच हे अनपेक्षित वागण पाहुन राम्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवल व म्हणाला.
" काय झाल ....? राम्याच्या ह्या वाक्यावर सुद्धा रघ्या एकटक खालीच पाहत होता , तस राम्याने सुद्धा खाली एक कटाक्ष टाकला आणि त्याच वेळेस राम्याचा सुद्धा चेहरा भीतिने पांढरा पडला जात डोळे विस्फारले गेले , मेंदू काहीक्षण बधिर झाला गेला , कारण खाली जमीन नसुन हायवे होता, आणि ते दोघे हायवेच्या मधोमध खाली बसलेल्या अवस्थेत होते , त्या दोघांना सुद्धा एक चकवा लागला होता , झाडाझूडपांच देखाव रूपांतरीत करुन त्या सैतानाने ह्या दोघांनाही आपल्या जाळ्यात ओढल होत,
" अर..रघ्या अर आपण तर " राम्या आपले पुढचे वाक्य पूर्ण करतोनी करतो की तोच एक ट्रक भरधाव वेगाने हॉर्न वाजवत आली आणि राम्याला धडक देत पुढे निघुन गेली , ट्रकचा वेग इतका अफाट द्विगुणीत होता, की रघ्याच शरीर त्या ट्रकने कित्येक तरी दुर फरफटत नेल , आणि पुढे- पुढे जात ती ट्रक पुन्हा निघुन गेली,इकडे रघ्याने घाबरतच आपल्या खांद्यावर एक नजर टाकली, तस भितीला भर म्हणुन त्याला अजुन एक झटका बसला , कारण त्याच्या खांद्यावर राम्याचा तुटलेला हात होता, ज्या हातामधुन लाल रंगाच रक्त बाहेर पडत होत, तो अर्धवट तूटलेला हात पाहुन रघ्याला खुप किळस आली तस त्याने तो हात आपल्या खांद्यांवरुन काढत दुरु फेकून दिला, तस थोड दूर खाली पडलेल्या त्या हातामध्ये हालचाल होऊ लागली , ( टीप => पुढच climax थोड दृश्य किळसवाण आहे. हदयाचा त्रास असणा-यानी किंवा कुमकूवत माणसांणी नाही वाचल तरी.. चालेल .=> जमिनीवर पडलेल्या राम्याच्या हाताची चामडी पिवळ्या रंगात बदलून जात त्या हाताला छोट- छोटी छिद्र पडू लागली, आणि त्या छोट- छोट्या छिद्रा आतुन सफेद,व काळ्या , अशा विशिष्ट रंगाच्य छोट्या - मोठ्या आल्या बाहेर पडु लागल्या. हे सर्व आति किळसवाने दृश्य पाहुन रघ्याच्या पोटात मलमळु लागल आणि बाजुलाच त्याला उलटी झाली )
इकडे राम्याचे प्राण केव्हाचेच निघुन गेले होते , राम्याच शरीर निपचित पडल होत, काहिवेळाने त्याच निपचित पडलेल्या देहात हालचाल होऊ लागली, हातापायांचा कट, कट आवाज होत राम्याच प्रेत जागेवर उभ राहिल, डोक्याची कवटी फुटली होती, त्या कवटी मधुन मेंदू बाहेर आला होता,
एक हात तुटला गेलेला , त्यासोबतच पोट फाटले जाऊन आतल्या आतड्या बाहेर आल्या होत्या,
" रघ्याह्या ...हिहि...हिहि....!" त्या निर्जीव प्रेताने रघ्याला आवाज दिला,
त्याआवाजासरशी रघ्याने आपले कान टवकारले, आणि पुढे पाहिल,
" रघ्याह्या .... ये हिकड...ये ...! भसाड्या आवाजात राम्याच प्रेत म्हणाल, आणि एक - एक पाऊल पुढे टाकत रघ्याच्या दिशेने येऊ लागल, त्याच्या प्रत्येक पावलासरशी , हाडांचा कट, कट आवाज होत होता,
" ए नाय नाय ! माझ्या जवळ येऊ नग! तू,....तू.... राम्या नाहीस..? तु सैतान हाईस सैतान हाईस तू दूर हो..!...."
त्या अनामिक ध्यानाला पाहुन रघ्या म्हणाला.
" हीहीही .... खिखिखी.... , ये ये...ये रघ्या !" अस म्हणतच त्या जाडजुड प्रेताने रघ्याच्या दिशेने जोराची धाव घेतली, त्या चित्र- विचित्र आकृतिला आपल्या दिशेने येताना पाहुन रघ्याने सुद्धा पलायन करण्यास सुरुवात केली, मृत्युची भिती जिव खात होती, आणि त्याच मृत्युच्या भीतिने पावलांना विजेसारखा वेग आला होता, स्वत:चा जिव वाचवण्यासाठी रघ्या
जिव तोडुन पळत होता, आणि तितक्याच वेगाने पाठीमागुन राम्याच प्रेत सुद्धा धावून येत होत, अशातच धावता-धावता रघ्याची नजर थोडी दुर गेली , आणि ते पुढच दृश्य पाहताक्षणीच त्याला एक आशेच किरण दिसू लागल, पुढे रस्त्याच्या बाजुला एक मोठा फला लावला होता ज्यावर निळ्या अक्षराने लिहिल होत , चेटक्याच जंगल प्रारंभ, पाहता-पाहता रघ्याने जंगलाची हद ओलांडली . तस रघ्याच पिच्छा करणार ते प्रेत जागेवरच थांबल,
" ए भें.....त हिम्मत असेल तर बाहेर ये ! " रघ्याने एक शिवी दिली , आणि पाठिमागे वळुन त्या प्रेताकडे पाहील, जे रघ्याकडे पाहुन गुर गुरत..होत..! आपल्या जागेवरच एका पिसाललेल्या वाघासारख फे-यामारत होत. पाहिल्यांदाच त्याच्या हातून सावज सुट्ल होत, ज्याचा त्याला भयंकर राग आला होता ,
" माझ्या मित्राला खाल्ल तु भें.....त ! " रघ्या म्हणाला , आणि त्याच्या ह्या वाक्यासरशी एक भयानक गोष्ट घडली, रघ्याला पाठीमागुन कोणीतरी जोराचा एक ध्क्का दिला, धक्का इतका पावरफुल होता की रघ्या पुन्हा वेस ओलांडुन जात चेटक्याच्या जंगलात घूसला, तस आपल्याला धक्का कोणी दिला, हे पाहण्यासाठी रघ्याने - एक गिरकी घेत मागे वळुन पाहिल , अमावास्याची रात्र असल्याने , समोरच येवढकाही दिसत नव्हत , पण त्या काळोखामध्ये एक बुटक्या माणसाची आकृती तिथे उभे आहे अस दिसुन येत होत , तस रघ्याने आपले दोन्ही डोळे छोटे करत पुढे पाहिल , आणि त्याच क्षणी आकाशात एक विज कडाडली, व त्या विजेच्या प्रकाशात रघ्याला एक भयानक दृश्य दिसल, जे त्याच्या समजण्या पलीकडे होत, ते भितीदायक दृश्य पाहताच रघ्या दोन पावले मागे सरला , आणि मागे- मागे जात कोणालातरी धडकला गेला, ज्याचा स्पर्श रघ्याला आति थंड जाणवला, बर्फाच्या लादी सारखा , त्या स्पर्शासरशी रघ्याने हलकेच मागे वळुन पाहिल,मागे राम्याच अक्राळ- विक्राल प्रेत दात विचकत त्याच्या कडे पाहुन हसत होत, हे सर्व भयंकर दृश्य पाहुन रघ्याची डोळ्यांची पापनी लवण्या अगोदरच त्याची मान 360 च्या अंशात फिरली गेली, आणि त्याच प्राण नसलेल शरीर खाली हायवेवर पडल , त्यासरशी पुन्हा आभाळात एक विज कडाडली आणि चेटक्याच्या जंगलात ती लहान / बुटकी आकृती पुढे - पुढे चालत आली त्या आकृतीच्या हातात एक चाकू होता . व ती आकृती दुसरी कोणी नसून चिऊ ची डॉल होती , आणि त्या डॉल मध्ये एका सर्वात शक्तिशाली आतम्याचा वावर होता,
" हिहिहिही , खीखीखि............! त्या बाहूली च्या तोंडून एक हास्य घूमल आणि ती पुढे म्हणाली.
नव घर , नव घर ....!" ह्या वाक्यासरशी त्या आकृतीने रघ्याच्या देहावर सपासप वार करण्यास सुरुवात केली ज्याने आजुबाजूला रक्ताच्या कारंज्या उडू लागल्या....

समाप्त