मल्ल प्रेमयुद्ध - भाग 26 Bhagyashali Raut द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • आर्या... ( भाग ५ )

         श्वेता पहाटे सहा ला उठते . आर्या आणि अनुराग छान गाढ झोप...

  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

श्रेणी
शेयर करा

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 26

मल्ल प्रेमयुध्द




रात्र कीरररर... झाली होती. आबांना झोप येत नव्हती. दिवसभर वतवत करून सुद्धा बाबांच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता.
आबा खिडकीतून एकसारखे आकाशाकडे बघत होते चंद्र चांदण्या लख्ख दिसत होत्या. आज पौर्णिमा होती. थंड हवा सुटलेली.

सुलोचनाबाई कधी डोक्यावरचा पदर नीट करत त्यांच्या मागे येऊन उभ्या राहिल्या हे सुद्धा त्यांना समजले नाही.
" अहो काय झालंय नेमकं या खिडकी तुम्ही उभ राहता तवा कळतं की काहीतरी बिनसल हाय... काय झाल मला सांगणार नाय व्हय?" आबा तरीही शांत खिडकीतून बघत होते.
"हे घ्या हळदीचे दूध पिऊन घ्या, तुमास्नी सांगायचं असल तर सांगा नाय तर माझा काय आग्रह न्हाय, पण सांगितलं नाय तर मन मोकळ व्हणार न्हाय." सुलोचनाबाईंनी परत डोक्यावरचा पदर नीट केला.

तुमी रोज खिडकीत येऊन उभ राहिला तसा रोज चंद्र येणार न्हाय, आज आला तसा रोज तसाच येईल ? कलाकलाने कमी व्हईल तसंच तुमच्या डोक्यात असलेल्या विचारांच सुधा हाय, जोपर्यंत मनातन कमी करणार नाही तोपर्यंत ते तसच खदखद करत राहील पण मला जर सांगितलं तर ते कलाकलानी कमी व्हईल, रागात हाय, चिडलेली हाय का दुखी हाय हेसुद्धा अमास्नी कळना... पण एक नक्की सांगीन एवढ्या वर्षांच्या संसारात एवढं समजली की मनात लय उलथापालथ व्हत असली की तुम्ही इतकं शांत व्हता." सुलोचना
" सुलोचना आम्हाला या आज कालच्या पोरांचा काय बी कळना," आबा पलंगावर जाऊन बसल आणि दुधाचा ग्लास हातामध्ये घेतला.

"आता तुमच्या पासून काय लपवायच, तूमाला वीर न सांगितलं की नाय माहीत नाय पण तो आमच्याशी बोललाय... सूनबाईंना मुंबईला जायचय..." सुलोचना त्यांच्या बाजूला येऊन बसली. "नाय मला तर कायच म्हणाला नाय, काय झालं नक्की आन आता मुंबईचा नवीनच काय खूळ? लग्न दोन महिन्यावर येऊन ठेपलंय..."

" सूनबाईंना नवीन काहीतरी शिकायला जायचंय आन वीर ला सुद्धा जायचंय आन हे सगळं लग्न झाल्यावर शक्य व्हणार नाय म्हणून दोघांना आत्ता जायचंय आणि जर नाही म्हंटल तर, लग्न नाय करायचं म्हणतो." आबा म्हणाले.

"काय लग्न करायचं नाय म्हणजी काय? हा पोरखेळ हाय व्हय असं कसं लग्न नाय करायचं? लोक तोंडात शेण घालत्याल कि, हे बघा क्रांतीच्या आई-वडिलांना बोलवून घ्या आणि जे काय असल ते समोरासमोर बसून बोलू उद्या, ह्या लहान लेकरांचे काय ऐकायचय, ते काय नाही त्याला म्हणावं तुला जायचं तर लग्न झाल्यावर जा... आपल्या घरात काहीच लेकीसुना भायर जात नायत" सुलोचना बाई म्हणाल्या

" तुम्ही नाय गेला म्हणून आत्ताच्या पोरींनी काय घरात बसायचं का? असं म्हणतोय आता ते दिस गेलं असं त्याचं म्हणणं हाय घरात हाय तोपर्यंत ती घरातलं नियम पाळलं पण भायर गेल्यावर ती तिचं बघल...
"असं कसं म्हणजे आपल्या निर्णयाचं कायच महत्त्व नाय व्हय." सुलोचना आता चिडल्या व्हत्या.



रात्रीचा एक वाजला होता. क्रांती मोबाईल कडे सतत बघत होती. शेवटी विचार केला आणि गुड नाईट चा मेसेज केला. वीरला अपेक्षित होतं की आज क्रांतीच मेसेज येणार... एका कुशीवरून दुसर्‍या कुशीवर होत होता, मोबाईलची रिंगटोन वाजली आणि त्याने चेक केलं बघितलं.क्रांती वाट बघत होती. त्याच्या लक्षात आलं होतं त्याने मेसेज पण केला आणि टाईप केले.
" झोपला नाही अजून?" क्रांती न्यूज मेसेज वाचला आणि रिप्लाय दिला.
"तुमच्या मेसेजची वाट बघत होते.काय झालं बोलत का आबांशी."
" हो बोललो पण आबा काय बोलल नाय अजून, त्यांनी होकार दिला नाय आपण उद्या भेटायचं का? मी तुम्हाला घ्यायला येतो."
" नाय नको..."
" का?"
"आज भेटलो अन लगीच उद्या? दादा आई काय म्हणतील? रोज भेटण बरं नाय..."
"☹️"
"आबांशी बोलणं झालं की मग भेटू किंवा मग तुमी घरी या..."
" तुमचं काय सांगायचं होतं की तुम्ही जिथं मुंबईला कोचींगला जाणार हाय तिथं माझं पण कोचिंग लावायचं आपण दोघं एकत्र शिकायचं मी आबांशी तसं बोलून ठेवलं." हा मेसेज वाचून मात्र क्रांती अंथरुणावर तडक उठून बसली तिने दोन तीन वेळा परत परत तोच मेसेज वाचला हे काय आणखीन ??? मनातल्या मनात म्हणाली. रात्रीचा सव्वा वाजला होता खरं तर तिला एवढ्या उशिरा फोन करण योग्य वाटत नव्हतं पण शेजारी चिनू होती. तिनं काही विचार न करता फोन लावला.
"हॅलो..." वीरचा जड आवाज ऐकताच क्रांतीच्या काळजात धस्स झालं.
"हॅलो... काय म्हणताय तुम्ही? तुम्ही माझ्या बरोबर येनार??" "कारण की मला सुद्धा शिकायचं आणि दुसर मी तुमच्या पासून लांब नाय राहू शकत. " क्रांती लाजली तिला खरं तर कळत नव्हतं की काय बोलावं ती मनापासून लाजली. वीर खरच माझ्यावर प्रेम... मला समजत नाही.
" क्रांती म्हणूनच रोज रोज नवीन कारण करून तुम्हाला भेटायचं म्हणत असतो. खरंच आता नाय करमत तुमच्याशिवाय... हॅलो हॅलो ऐकतत् ना तुम्ही?"
आबांशी बोला म आपण ठरवू काय करायचं ते ?"
"तुम्हाला आवडलं नाय का माझा निर्णय ?"
" असं कायच नाय तुम्ही बरोबर असाल तर मलाही सोबत व्हईल."
आडवळणाने का होईना पण क्रांतीला त्याच सोबत असं हवं होतं. वीरने विषय बदलला,
"झोप नाय येत आज?"
"नाय खरंतर मनापासून वाटतंय आबांनी याला परमिशन द्यावी. तसं त्यांनी किंवा तुम्ही नाही म्हटलं असतं तरी मी ठरवलं होतं की जायचं म्हणून, तुम्हाला माझं बोलणं आगाऊ वाटल पण माझी जी स्वप्न हायती ती मला पुर्ण करायचेत लहानपणापासून दादांनी मला पाठिंबा दिला कारण त्यांनी त्यांच स्वप्न माझ्यामधी बघितलत.... खांद्यावर, कडवर घेऊन मला ती लांब लांब कुस्तीला घेऊन गेलेत कोणाचीही पर्वा न करता उद्या दादा माझ्या संसारासाठी नाय म्हणाल... तरीसुद्धा मला माहिती त्यांच्या डोळ्यात मी स्वप्न बघितलय."
"क्रांती तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा भेटलो तवाच मला कळलं होतं तुमच स्वप्न मोठ हाय, काळजी नका करू मी तुमच्या नेहमी सोबत असेन." वीर म्हनाला क्रांतीला हायसं वाटलं.





"क्रांती उठ." आईने हाक मारली.
"आव राहुद्या झोपुद्या तिला... किती तरी दिवसांनी एवढ्या उशिरापर्यंत झोपली असलं पोर..." दादा
" सकाळ सकाळी फोन आला होता, तिच्या सासर्‍यांचा विचारायला नको तिला काय म्हटलं का वीरराव...?"
"व्हय इचारा पण तिची झोप होऊद्या आपण जाणार न्हाय लगीच..." तेवढ्यात क्रांतीला जग आली.
"दादा अरे बापरे आठ वाजल का? उठवलं न्हाय व्हय??? प्रॅक्टिस राहिली की माझी.? क्रांती घाईने उठली.
"एक दिस आराम कर बाळा... उठवलं न्हाय मुद्दाम... किती दिसातन अशी झोपली व्हतीस..." दादा
"बर मी काय म्हणती..." आशा म्हणाली
"आशा आता कशाला?? तिला जरा आवरूदेत मग बोलू."
" दादा काय झालं?" क्रांती म्हणाली. तेवढ्यात संतू बाहेरून आला.
"अग काय न्हाय तू आवरून घे, मग बोलू आपण." दादा म्हणाले संतुन दादांना खुणावलं काय झालं म्हणून क्रांती आवरायला आतमध्ये गेली तेवढ्यात आशाने संतुला सगळं सांगितलं.
"व्हय मला माहिती हाय. रत्नाला पण मला मुंबईला पाठवाय आणि त्यासाठी रत्नाच वडील तयार झालेत तुमची पण नाय नसेलच ना..." संतू

"न्हाय माझा काय इरोध न्हाय... रत्ना सून न्हाय माझी लेक हाय तिला जे करायचं ते तीन करावं... नाव कमवाव." दादा
"हो करावं पण एकुलती एक सून हाय घर संभाळूनच केलं पाहिजे." आशा फंकाऱ्यान म्हणाली.
"घ्या घरोघरी मातीच्या चुली.." दादा म्हणाले अन संतू अन दोघे मोठ्याने हसले.

आबा बाहेर वीरची वाट बघत बसले होते. वीरलासुद्धा आज उठायला उशीर झाला होता.
"वीर आम्ही तुमच्या सासऱ्यांना बोलावलंय जे काय असेल ते समोरासमोर बोलावं म्हंटल नंतर अडचणी नकोत."
"आबा पण आपण बोललो व्हतो ना त्यासनी बोलवायला कशाला पाहिजे व्हत. क्रांती ऐकणार न्हाईत हे तुमास्नी माहितीये न मला पण म्हाइत हाय. आबा त्यांनी लग्न ठरवताना तुमास्नी सांगितलं व्हत की क्रांतीला पुढं खेळायचं... मग तुम्ही आता का माघार घेताय."वीरला आता राग येत व्हता.
"ठीक हाय वीर मी कळवतो हे लग्न मोडलं म्हणून येऊद्या त्यांना मग बोलतो..."
"आबा..." वीर
"व्हय तुमच्या लग्नापेक्षा आमाला आमची इभ्रत महत्वाची हाय..." आबा एवढं बोलून निघून गेले.
वीरला काय सुचत नव्हत.
"लग्न मोडायचं....?" मोठा प्रश्न


क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत.