Kouff ki Raat - 23 books and stories free download online pdf in Marathi

खौफ की रात - भाग २३

भाग 2३

लेखक -जयेश झोमटे



महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्वकाही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी

फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत🙏

ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह मेसेज आणि वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल!

सदर कथेत शुद्धलेखनाच्या चुका असू शकतात तर कृपया करून लेखकास समजून घ्या !

लेखक चुका सुधारण्याचा प्रयत्न करत आहे ..

धन्यवाद

कथा सुरु

अनोळखी अंधारी रात्र आणि , ...वातावरणातली सुनसान शांतता तिचा सख्या होता.

आणि मध्येच भेसूर संगीतासारखी रातकीड्यांची किरकिर सुरु होती.

पाषाणासारखा चकचकीत काळा अंधार आजुबाजुला पसरलेला होता .

जागेवर स्तबध उभी झाडे मेलेल्या मुर्द्यासारखी खाली मान घालून होती .

अश्याच एका झाडाच्या फांदीवर एक घुबड बसलेली दिसत होती.

तिच्या भेदक नजरेने ती आपल्या सर्वाँकडे पाहत होती.
नाही नाही ही नजर आपल्याकडे नव्हती -आपल्या मागे होती-मागून दहा पावलांवरून , पांडू चालत येत होता.

त्याची काळजीने भरलेली नजर एका जागेवर स्थिरावत नव्हती, कधी डावीकडे तर कधी उजवीकडे तो पाहत होता.. .

त्या बिचा-या पांडूला आपल्या अंधवतपत्नीची काळजी वाटत होती.

ह्या अंधारात न जाणे ती कोठे असेल? जिथे असेल तिथे सुखरूप असेल ना ! हा विचार त्याच्या मनात क्षणाक्षणाला येत - काळीज धडधवून जात होता.

भीतिने त्याच्या कल्पना शक्तिने त्याला डोळ्यांसमोर काहीबाही चित्र दिसत होती.

त्याच्या अंधवत मृत बायकोच प्रेत तिरडीवर झोपल होत -अंगात हिरवा शाळू, दोन्ही नाकांमध्ये सफेद कापसाचे गोळे कोंबळेले , कपाळावर लाल रंगाचा रूपया एवढ़ा मळवट भरला होता , पिंजारळेले खांद्यावर लोंबत होते -

प्रेताच्या डोक्याबाजुला मंद धुर बाहेर पडणारा धुंदेरा जमिनीवर ठेवलेला दिसत होता ..

" देवा !अस काही होऊन देऊ नको !"

पांडू त्या झाडाच्या खालून चालत पुढे निघुन गेला.

झाडाच्या फांदीवर बसलेली ती घुबड पांडूला पूढे पुढे जाताना पाहत होती.

कब्रस्तानातल धुक वाढत चाल्ल होत - त्या धुक्याला जाड पांढरट कापडासारखा आकार प्राप्त होत होता .. - आजुबाजुला जरी कोण उभ असेल तरी ते दिसणार नाही.

पांडूच्या ध्यानात एक गोष्ट आली नव्हती- की चालून चालून तो कब्रस्तानाच्या शेवटच्या टोकाला आला होता- की कोणीतरी त्याला आणल होत?
कळसुत्री बाहुली हातालावी तस पांडूला कोणी हाताळत तर नव्हत ना?

कब्रस्तानात ही कसली माया पसरली होती? की माणुस बधीर होऊन जात होता!

इथला धुका जणू विषारी होता - जो श्वासांवाटे शरीराआत जाताच मानवाची विचारकरण्याची पद्धत,हुशारी सर्वकाही अधू करूण टाकत होता.


पांडु होता तिथे जागेवरच थांबला .पायाखालच गवत संपल होत -

आता लहान ब्लॉकची पिवळ्या -लाल रंगाची रांग सुरु झालेली , आणी सरळ पुढे जात होती.

" ए ईठेssss! "
पांडूने एकच हाक दिली होती-

पन तो आवाज? " ..ईठेsss...ईठेssss" करत
डोंगरावर उभ राहाव आणी पुढे असलेल्या खोळ खाईत गुंजत रहावा तसा गुंजत होता.
काळ्या काचेच्या अंधाराच्या गर्भात न जाणे कितीतरी उशीर तो आवाज गुंजत होता.

पांडू गप्प उभ राहून आपल्याच आवाजाची
ती हाक ऐकत होता.

आता तर त्याला हाक मारायची ही भीति वाटू लागली होती-

कारण स्वत:च्या आवाजाची त्या भीति वाटू लागली होती.

त्याने सुकलेल्या गळ्याने आवंढ़ा गिळला-
आता आवाज द्यायलाच नको -फक्त डोळ्यांनी ईठाला शोधुयात अस त्याने ठरवल.
हाक दिली आणि कोणि वेगळ्याच आवाजात ओ दिल तर ? किती भयाण विचार.

पांडूने खाली पाहिल , खाली पिवळ्या-लाल , हिरव्या, चौकलेटी अश्या विविध ब्लॉकची रांग पुढे जात होती-
पुढे बंगला , फार्म हाऊस , अस काहीतरी असाव, किंवा चर्च? तसंही ह्या असल्या भक्कास स्थळी
कोण घर- बंगलो बांधुन राहणार होत?

पांडू पाऊल ऊचल्ली तो चालत होता- चार पावल चालताच अचानक कानांवर पैजणांची ' छण,छण ' ऐकू आली...

" छण ,छण, छण, छण, !" कोणी पायांत पैजण घालावा तसा आवाज होता हा !

आवाज ऐकून तो जागेवरच थांबला -परवादिवशीच त्याने त्याच्या लाडक्या बायकोसाठी बाजारातून पैंजण आणले होते -

सोन्याचे चांदीचे? तेवढी त्याची ऐपत नव्हती !
दोनशे- तीनशेच्या आसपासचे होते.पन त्याची बायको खुप खुष झाली होती ना - तिच्या चेह-यावरचा आनंद लाख-मोलाचं होत. आणी तेवढच त्याच्यासाठी पुरेसा होत.

" ए ईठे..! " पैंजणांचा आवाज ऐकून त्याने पुन्हा हाक दिली - त्याच्या मनातून पटकन ती हाक बाहेर पडली ...

आणि आलेल्या आवाजाची दिशा कळताच तो त्या आवाजाच्या दिशेने धावला... दहा पावल चालून होताच मध्येच त्याची पावले थांबली-

समोर एक चर्च होता.
रुंदीने पसत्तीस फुट लांब पसरलेला - सफेद रंगाच्या लाकडाच्या भिंती वीस फुट उंच होत्या - आणी वरच लाल रंगाच कौलारू छप्पर त्रिकोणी आकाराच होत.

त्याच छप्परावर एक तुटलेला क्रॉस लोंबकळत होता - भरवसा नव्हता की कधी -कस तुटून खाली पडेल..

चर्चच्या आत प्रवेश करण्यासाठी एक दोन झापांचा चौकलेटी रंगाचा दरवाजा दिसत होता ..

दरवाज्याची एक बाजू मोडुन खाली पडली होती -तर दुसरी शाबूत होती.

मोडलेल्या त्या दरवाज्यातूना चर्चच्या आत पसरलेला जहरी अंधार नजरेस दिसत होता -त्या अंधारात पाहता ,संमोहिंत झाल्यासारख वाटत होत..
तो अंधार खोळ-अगदी खोळ गर्तेत घेऊन जाणा-या गढूळ पाण्यासारखा होता -किती खोळ असेल? सांगता येत नव्हत !

चर्चच्या आजुबाजुला चार पाच मोठाली झाडे होती- झाडांमागे आठ फुट उंचीच कंपाउंड होत ,- ह्याचा अर्थ ही कब्रस्तानाची शेवटची बाजू होती.

" ए ईठे? तू आत हाईस का ? बाहेर ये बगू रात झाले , घरला जायचं चल.. !"
पांडू पटकन म्हंणाला.

त्या दरवाज्यातून आत अंधारात घुसायची , पांडूची हिम्मत होत नव्हती- त्या अंधारात पाहताच धीर डगमगत होता ,पाय रबराचे झाले-होते.

" अहो , मी इथ ह्या कालोखात आहे, मला काही दिसत नाही आहे ओ,मी बाहेर कशी येऊ .. माझी मदत करा! मला बाहेर काढ़ा.."
पांडूच्या कानांवर त्याच्या बायकोचा हुबेहूब नक्कल असलेला आवाज पडला.

तिच्या आवाजात असलेली ती करूण मदतीची
हाक - पांडूच काळीज चिरत गेली.

" ईठे? तू जाग्याव आहे तिथंच थांब , म्या येतो म्या येतो....थांब!" पांडू घाई घाईतच म्हंणाला.

व लागलीच त्या उघड्या दरवाज्याच्या दिशेने निघाला.

Xxxxxxxxxxxx

" आई..आई...आई...!"
कमरेला हाताने चोळत अमोल जागेवरून उठला.

काहीवेळा अगोदर किंगक्रोब्राच्या आगमनाने - एक वेगळाच थरार रंगला होता- त्यातच गाडीच एक्सीडंट झाल होत.

सोपानच्या मागोमाग -निळचंद्र कपडे झटकत ऊठला - त्याने एक कटाक्ष समोर टाकला ,समोर एक झाड होत - त्या झाडाच्या खोडावरटू-व्हीलर आदळली होती- गाडीच उजव्या बाजूच एक्सीलेर हेंन्ड़ल, मोडल होत- हेडलाईटच चक्काचूर झालेल दिसत होत.

"आई...आई..आई...!" अमोल अद्याप कंबर
चोळत होता.
वेदनेने त्याच्या आईची आठवण काढत होता..

" गप्प!" निळचंद्र (निळ्या) एकदम खेकसला , खरतर तो अमोलच्या अंगावरच धावला होता , मांजरीसारखी नख असती तर नरडीतच घुसवली असती त्याने.

" तुला अक्कल आहे का ?केळा आणि किंग कोब्रा ह्यातला फरक नाही कळत का? "

" म..म..म भाई मला थोडी ना माहीती होत तो केळ नाही , की..किंग कोब्रा आहे म्हंणून!"
निळ्याच राग पाहून अमोलची भीतीने जराशी तणतणली होती.

" कुणाला माहीतीये म ? नाव सांग त्याच ? "
निळ्या पुन्हा खेकसला.

" ब..ब...सोपान ! सोपानने दिल मला तो!"

" सोपान? " अमोलने होकारार्थी मान हळवली.

" कुठ आहे तो ? " निळ्याने अमोलला विचारल.

" हा काय, इथ !" अमोलने गाडीजवळ पाहिल ..

परंतु एक्सीडंट झालेल्या गाडीशिवाय आणि त्या दोघांशिवाय तिथे कोणिही नव्हत.

:" हा इथच तर माझ्या मागे बसला होता- मग कुठ गेला. !" अमोल स्वत:शीच म्हंणाली.

निळ्याच राग आता जरा कमी झाल होत.
कारण सोपानला जर काही झाल असेल तर? हा विचार जरा काळजी करण्यासारखा होता.

" निल्या कुठ गेला असेल हा सोपान"
अमोल काहीवेळ थांबून पुढे म्हंणाला.
" तो कोब्रातर घेऊन नसेल गेला ना त्याला?"

अमोलच्या ह्या वाक्यावर निळ्याने त्याच्याकडे
पाहिल..मग स्वत:शीच विचार करत त्याने एक दोना वेळा डोक नाही अस करत हळवल.

तो कोब्रा फक्त लांबीने मोठा होता - माणवाच शिकार करेल एवढी त्याची शारीरीक यष्टी नव्हती.

" नाय ...नाय...कोब्रा अस नाही करू शकत !"

" अरे भाई करू शकतो , मी इंग्लिश पिक्चर मध्ये बघितला ना - पिक्चरच नाव नाही आठवत नाही पन ! "

" ..एनाकोंडा "
निळ्या दात ओठ खात म्हंणाला. त्याच्या त्या वाक्यावर अमोल हो बोलणार होता..पन त्याचा तो रागिट चेहरा पाहून त्याने विषय बदलायचं ठरवल.

" ए सोपान !" त्याने तिरकस नजरेने निळ्याकडे पाहत , जागेवर उभ राहूनच सोपानला हाक दिली.

" तू तिकडे बघ, मी इकडे बघतो !"
निळ्या उजवीकडे गेला- तर अमोल डावीकडे शोधु लागला.

पाच - सहा मिनिटे शोधा शोध केली परंतु..
सोपानचा काहीच पत्ता लागला नाही..
आजुबाजुला घनदाट जंगल होत - झाडांव्यतिरिक्त
तिथे ही दोघच हालचाल करणारे जिव होते.
जंगलातून एक विशिष्ट प्रकारचा शिट्टी वाजल्यासारखा आवाज येत होता - चिमण्या पाखरांचा, चिचिची, रातकीड्यांची किरकीर ऐकू येत होती..

झाडांच्या खालून सरपटणारे प्राणी ह्या दोघांनाही पाह पुढे निघुन जात होते.

दोघेही पुन्हा एक्सीडंट झालेल्या जागेवर आले..

" निळ्या! सोपान मेला वाटत ,त्याच्या आई-बापाला कस सांगायचं आता आपण- कोणत्याने तोंडाने सांगायचं रे? एकूलता एक होता बिचारा , तुझी किती उधारी झाली होती रे त्याच्यावर !"

" माझी ?" निल्या पटकन म्हंणाली.

" हो..हो..म्हंणजे थोडीफार माझी सूद्धा होती."
अमोलच्या ह्या वाक्यावर , एक कण्हण्याचा आवाज आला.

" स्स..स.आहा..."
तो आवाज त्या दोघांनीही ऐकला होता.
.

" अमोल तू आवाज ऐकला ?"
निळ्याच्या वाक्यावर अमोलने होकारार्थी मान हळवली.

एक दोन वेळा पुन्हा कण्हण्याचा आवाज आला..

तसा त्या आवाजाची दिशा समजली.

" निळ्या आवाज वरून येतोय!"
दोघांच्या समोरच ते झाड होत - जिथे टू- व्हीलरच एक्सीडंट झाल होत.

दोघांनीही एकदाच झाडावर पाहिल..

" सोपान !" त्या दोघांच्याही तोंडून एकच हाक बाहेर आली.

वर झाडाच्या आडव्या फांदीवर वेताळासारखा सोपान पाठीवर लटकला होता.

" एय सोपान, तू झाडावर काय करतोय ?
इथ आम्ही तुला कधीपासून शोधतोय- आणि तू आहेस की असा वेताळासारखा झाडावर उलटा लटकलाय..!: अमोल एका स्वरात म्हंणाला.

" अरे मी सगळ सांगतो पन मला आधी सरळ करा रे ! कंबर दुखेतेय जाम !"
सोपान रडवेल्या स्वरात म्हंणाला.

समोर असलेल झाड अकरा फुट उंचीच होत आणि ह्या दोघांपासून सोपान नऊ फुट उंच फांदीवर वेताळासारखा उलटा लटकला होता.

" कस काय ऊतरायचं ह्याला ? झाड लय उंच आहे !" अमोल..

" झाडावर चढ़ाव लागेल! " निळ्या..

" हा तू चढ!" अमोल पटकन म्हंणाला.

" हा मीच चढतो, तू फक्त बघायच्या लायकीचंच आहेस !" निळ्या रागात म्हंणाला.

त्याच्या त्या वाक्यावर अमोल निर्लज्जासारखा हसला होता.

निळ्या झाडावर चढला - फांदीवरून चालत जात तो सोपान जवळ पोहचला -सोपानला आधार देत सरळ केल. ...

मग सोपान प्रथम खाली ऊतरला..

" निळ्या तू पन ये लवकर!" अमोल म्हंणाला.
त्याच्या बाजुला उभा सोपान निळ्याकडे पाहत होता.

" हो हो !" अस म्हंणतच निळ्या खाली येणार होता ..तोच त्याची नजर समोर गेली..

मोठ मोठाल्या झाडांमधुन सरळमार्गी मातीचा रस्ता दिसत होता - आणि त्याच रस्त्यावरून एक जीप वेगाने पुढे येत होती..

जीपमध्ये ड्राईव्हसीटवर अण्णा बसला होता - जिपमध्ये सूरू पुढच्या मीरर बाजुला एक लाईट पेटली होती त्या लाईटच्या प्रकाशात त्याचा खप्पड चेहरा भयाण दिसत होता - वाढलेले केस चेह-यावर आले होते.

आणि त्याचे ते बारीकसे डोळे निळ्याकडे पाहत होते.. तोच अण्णाने , बाजूचा सीटवरची M24 स्नाईपर रिफील उचल्ली.

8x स्कोपद्वारे नेम धरला..

निळ्याची ती भलीमोठ्ठी बंदुक पाहून जागेवरच
फाटली..


" अमोल - सोप्पान , पळ..!
इकडे निळ्या अस म्हंणाला न म्हंणाला तोच अण्णाने
बंदूकीच ट्रिगर दाबल

' ठणssss!" एक मोठा आवाज झाला..
पुढच्या लांबसर नळीतुन धुर उडवत गोळी निघाली...

क्रमश :

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED