मल्ल प्रेमयुद्ध - भाग 29 Bhagyashali Raut द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 29

मल्ल प्रेमयुध्द

तेजश्रीने स्वप्नालीला फोन केला.
"हॅलो स्वप्नाली... तुला समजलं का जे झालं ते.."
"हो मामींचा फोन आला होता आईला सगळे डिस्टरब आहेत."
स्वप्नाली
"अय येडे अग तू का नाराज हायस? तुला तर खुश व्हायला पाहिजे. आयती संधी मिळाली तुला... आता तुला आबासाहेबांच्या घरात येण्यापासन कोण आडवणार हाय? अगदी भाऊजी सुद्धा नाय..." तेजश्री
"पण मनाविरुद्धच ना...?" स्वप्नाली
"अग मन वळण की नंतर... तुझ्यात तेवढं स्किल हाय की..." तेजश्री
"उद्या आम्हाला बोलावलंय तिकडं मामा मामींनी तवा ठरवू.." स्वप्नाली
"स्वप्नाली... आनंदात ये ग बाई उद्या आणि भाऊजीबरोबर तुझच लग्न झालं पाहिजेत बघ... आता क्रांती या घरात येन अशक्य हाय करण एकदा आबांच्या मानतात कोणी उतरलं की मग उतरलं." तेजश्री
"मला आधीपासूनच वाटत होतं वहिनी मी वीरसोबत लग्न करायाला पाहिजे मी अन त्यांनी एकत्र आयुष्य घालवल पाहिजे. पण मामा मामींनी अजूनही डोक्यावर पदर घेऊन राहणारी सून पाहिजे अन मी सुद्धा जॉब करते मग???" स्वप्नालीने काळजीने विचारले.
"अग तू साडी नेसून जाणार ना ऑफिसमध्ये का हाफ चड्डीवर?? न्हाय ना मग .. तू घरची पोर आपण ते नंतर बघू... उद्या ये मग बोलू..." तेजश्री
" होय....बाय.." स्वप्नाली
"बाय..." तेजश्रीने फोन ठेवला तिच्या मागे कधी संग्राम येऊन उभा राहिला हे तिलाही समजले नाही ती घाबरली.

"तुमी कधी आला?"
"जवा तू स्वप्नालीची शिकवणी घेत होती ना तवा.."
"अहो तस नाय.... आता एक गेली दुसरी नको जायला न्हायतर कोणीतरी येऊन पडायचं ह्या घरात...म्हणून मी स्वप्नालीची समजूत घातली." तेजश्री
"त्यापेक्षा एका मोठ्या सुनेच्या नात्याने तू हे होऊच द्यायला नको होतंस... आज तू पुढाकार घेऊन मज्जा न बघता जर लग्न न मोडण्यासाठी प्रयत्न केला असतास तर कदाचित आजबटूला सुद्धा मान ताठ करून जगता आलं असतं. हे असले उद्योग कुनीसुदा करत ग... पण तुला ते कधी जमायचं मला वाटल तू शिकलेली अडाणी बायकांपेक्षा तुझं डोकं कायतरी येगळा इचार कराल पण न्हाय... तू क्रांतीला जर प्रोत्साहन दिलं असतास अन लग्न मोडायचं थांबलं असत ना तर नक्कीच आज सगळ्यांच्या नजरेत तू मोठी झाली असतीस बघ." संग्राम

"आबासाहेबांच्या पुढं कोणाची हिम्मत तोंड उघडायची...अन त्यांचा शब्द हा शेवटचा असतो हे इसरलात" तेजश्री
" इथंच तर मग पडलात अन घरात राहिलात... मोठी सून म्हणून साखरपुड्यात जो काय मान कमावला व्हता त्याने मोठ्या झाला व्हता तुम्ही पण आता जे करताय न त्यांनी आमची मान खाली जाणार नक्की."संग्रामला तेजश्रीचा राग आला होता.
"अहो पण..."
"इतकंच सांगतो जे करतय ते योग्य न्हाय कारण वीर सगळ्यांचा विरोध पत्करून क्रांतीशीच लग्न करणार हाय..." संग्राम एवढं बोलून निघून गेला.



वीरने गाडी नेहमीच्या ठिकाणी पार्क केली अन दादांच्या समोर उभा राहिला. दादामनी हात जोडून नमस्कार केला.
"या वीरराव..." दादा म्हणाले वीरने वाकून दादांना नमस्कार केला.

"दादा पहिल्यांदा तर माफी मागतो जे काय झालं त्यासाठी..." वीर
"आधी घरात तर या..." घरात सगळे बसले होते. सगळीकडे काही झालच नाही असं वातावरण होते एकदम आनंदी...

"वीरराव तुम्ही येणार हा फोन आला अन सगळ्यांचे दुःखी चेहरे आनंदी झाले." दादा म्हणाले.

"दादा अहो मी तुमचा मुलगा हाय अन मुलगा आपल्या घरी यायचा थांबतो का?" क्रांती आतून सगळे ऐकत होती. हे ऐकल्यावर तिला भरून आले. आशाने वीरला पाणी दिले. चिनूने पोह्यांची प्लेट आणून दिली. रत्नाने चहा दिला.

"आधी खाऊन घ्या मग बोलू निवांत... तुम्ही लगीच आला ह्यातच सगळं आलं." दादा
वीरने एक पोह्यांचा घास खाल्ला सगळे समोरच उभे होते. वीर सगळीकडे क्रांतीला शोधत होता.
"दाजी आधी खा क्रांती येईल आव भायर..." संतू अस बोलल्यावर मनसोक्त सगळे हसले. क्रांती आत एकटीच लाजली.

" दादा हे बघा मी आबांच्या शब्दाबाहेर न्हाय..." सगळीकडे टाचणी पडली तर आवाज येईल एवढी शांतता पसरली.
"व्हय ते अमास्नी ठाव हाय..." दादा
"पण माझं क्रांतीवर जिवापाड प्रेम हाय... मला तिच्या स्वप्नांवर प्रेम हाय... तिच्या कुस्तीवर प्रेम हाय...अन मी तिच्याशिवाय इतर कोणत्यापण पोरीचा माझ्या आयुष्यात इचार करू शकत न्हाय.दादा आबा आता या लग्नाला मान्यता देणार नाय पण मी शेवटपर्यंत त्यांचं मन वळवायचे प्रयत्न करीन... दादा यासाठी मला तुमची गरज हाय..." वीर म्हणाला.

"वीरराव मला वाटतं आपण आबांच्या शब्दभायर नको जायला आपण त्यांना समजून सांगू... अन पोराची इच्छा नसताना कुठल्या बापाला वाटलं त्यानं दुसऱ्या पोरीबरोबर आयुष्य काढावं. आबासाहेब एकत्याल आपण लगीच नको त्याच्या विरोधात जायला थोडा येळ द्यायला पाहिजे जुन्या माणसांना नव्या गोष्टी समजूनघ्यायला येळ लागतो." दादा म्हणाले.

"दादा मी प्रयत्न करणार हाय मी नाय म्हणत न्हाय पण त्यांच्या म्हणण्यान लग्न मोडलं म्हणजे माझ्या मनातन क्रांती गेली. अस नसत ना दादा... त्यांनी माझ्यासाठी माझ्या आत्याच्या पोरीची लगीच रात्री मागणी घातली. आज सगळे लग्न ठरवायला घरी येणार हायत. तुम्हाला वाटलं का तरी की लगीच सगळ्या गोष्टी अश्या पटापट हळत्याल. दादा आबासाहेब हायत ते त्यांना हें न्हाय सहन व्हणारे कोणी त्यांचा अपमान केलेला त्यांचं न ऐकन म्हंजी त्यांचा अपमान असतो. दादा मी परवा क्रांतीबर मुंबईला जाणार हाय... मी सुद्धा तिकडं ट्रेनिंग घेईन. माझ्या ओळखी हायत तिकडं दोन खोल्या बघून ठेवल्यात... ट्रेनिंग सेंटरच्या शेजारीच... रत्ना अन क्रांती एकत्र राहत्याल अन मी एक रूममधी..." वीर
"पण तिथं होस्टेलची सोया व्हती... सगळं त्यांचं आपण फकस्त पैस भरायचं...अन मी पैस भरल्यात आधीच..." दादा म्हणाले.
"बर ठीक हाय... मी रूममधी राहील अन या होस्टेलमधी..." वीर
"वीरराव पण भांडण करून असा तड की फड निर्णय घेऊ नका..आबांशी शांततेत बोला.आईंशी बोला." आशा म्हणाली.
"व्हय मी बोलणार हाय त्यांच्याशी अन त्यांना सांगूनच मी निघेल." वीर म्हणाला सगळे शांत झाले.पुन्हा वीर म्हणाला.
"दादा क्रांती नाराज हाय ना.. म्हणूनच भायर न्हाय आली." वीर

"ज जर दोघ भायर फिरून या तुम्हाला एकमेकांशी बोलायला पाहिजे. अस गैरसमज हुन उपयोग न्हाय..." दादांनी क्रांतीला हाक मारली. क्रांती आवरून बाहेर आली आणि दोघे वीरच्या नेहमीच्या जागेवर गेले.



क्रमशः
भाग्यशालीअनुप राऊत.