Warangana books and stories free download online pdf in Marathi

वारांगणा

मनोगत

वारांगना नावाची कादंबरी वाचकांच्या हातात देतांना मला अत्यंत आनंद होत आहे. वारांगना साकारतांंना मला अतिशय लाजही वाटत होती. वाटत होतं की लोकं काय म्हणतील, आपल्याबाबत कोणता विचार करतील. कारण समाजाची आजची अवस्था अशी आहे की लोकं दुस-याकडे एक बोट दाखवतात. परंतू ते हे विसरतात की आपल्याकडे त्यातील तीन बोटं असतात. तेच वाटत होतं मला.
वेश्या.......वेश्येला वारांगना देखील म्हणतात. त्यांनाही भावभावना असतात. त्या कुणाचं कधीच वाईट करीत नाहीत. परंतू आपला समाज त्यांना हीन समजतो. त्यांना दुषणे देतो.
मला ही भिती वाटत होती की ही कादंबरी वाचून लोकं ठरवतील की हा व्यक्ती वेश्यालयात जात होता. परंतू तसं घडलं नाही. मी एकदाच वेश्यावस्तीत गेलो. त्याचं कारणही तसंच होतं. आमचं एकदा प्रशिक्षण होतं त्या वेश्यालयाच्या बाजूला. एकदा त्या ट्रेनिंगमध्ये अर्ध्या दिवसानंतर ब्रेक झाला. त्यावेळी माझं मित्रमंडळ म्हणालं की चला आपण वेश्यावस्ती पाहायला जावू. शेवटी मलाही वेश्यावस्ती पाहायचं आकर्षण होतं. त्यामुळं मिही तयार झालो. त्यापुर्वी मी वेश्यावस्तीवर आधारीत एक वेदना नावाची पुस्तक लिहिली होती. तेही वेश्यावस्तीत न जाता. त्यामुळंही आकर्षण होतं. हा भाग दुसरा आहे.
मी वेश्यावस्ती माझ्या मित्रमंडळासोबत फिरायला गेलो. आम्ही बोलतबोलत चाललो होतो. तोच एका वेश्येनं आमच्यापैकी आम्हा दोघांचे हात पकडले. तसं पकडताच बाकी सर्व पळाले. त्यानंतर ज्याचा हात धरला होता त्या वेश्येनं. तोही हात झटकून पळाला. राहिलो मी. मी पळालो नाही. कारण मला वाटलं की आपण काही गुन्हा केलेला नाही. ही काय करणार. शेवटी त्या मुलीनं अर्थात वारांगनेनं मला आत नेलं. कुलूप लावला व म्हटलं, "पैसे काढ." त्यावर मी म्हटलं, "कशाचे पैसे?" त्यावर ती म्हणाली, "इथं कशाला आलाय." मी म्हटलं, "फिरण्यासाठी." त्यावर ती म्हणाली, "ही काय फिरण्याची जागा आहे का? फिरायचं असेल तर बागेत फिरत जा." त्यावर मी चूप बसलो काही वेळ. मग मी म्हटलं, "मी तुमच्या जीवनावर एक पुस्तक लिहिली. मी लेखक आहे." त्यावर ती म्हणाली, "किती वेळ आलाय या वेश्यावस्तीत?" मी म्हटलं, "कधीच नाही." त्यावर ती म्हणाली, "मग कशी लिहिली पुस्तक?" मी त्यानंतर गप्प झालो. काही वेळानं शेवटी मी विचारलं, "का गं वेश्या स्वतः बनतात की बनवलं जातं?" त्यावर ती म्हणाली, "तू लेखक आहेस ना. तुला काय वाटतं?" मी म्हटलं, "बनवलं जातं." त्यावर ती म्हणाली, "अगदी खरं. तू खरंच जाणकार आहेस. तू एक दिवस मोठा वेखक होशील आणि बनावा अशी माझी इच्छा आहे. हवं तर येत चल इकडं. मी माहिती सांगेन बरीच. मित्रा, वेश्या ह्या वाईट नाहीत. त्यांनाही भावभावना आहेतच. त्या शिकलेल्याही असतात. मी स्वतः एम ए शिकलेली आहे. परंतू परिस्थितीनं मी वेश्या बनले. त्या चांगल्या असतात. परंतू समाज त्यांना वाईट समजतो आणि इथं येतांना वाईटच विचार घेवून येतो."
मला तिनं सोडून दिलं काही न करता. त्यानंतर मी पुन्हा कधीच तिकडं गेलो नाही. आज त्या गोष्टीला बरेच दिवस झाले.
अचानक एक महिण्यापुर्वी माझी वेश्येवर आधारीत वेदना कादंबरी वाचायला घेतली व ती वाचता वाचता वाटलं की आपण हिचा दुसरा भाग लिहावा. मी लिहायचा तसा निर्धारच केला. मन काही स्वस्थ बसू देत नव्हतं व लिहायला बसलो. जनलोकांची पर्वा न करता.
मी दिवसरात्र लिहीत होतो ही पुस्तक. तब्बल एक महिण्यानं ही पुस्तक साकार झाली. आज ही माझी एकोणसत्तरवी पुस्तक आहे.
मी यापुर्वी अडूसष्ट पुस्तका लिहिल्या. त्या वेश्यावस्तीत गेलो होतो, तेव्हा माझ्या दोनतीन पुस्तका होत्या. जेव्हा ती म्हणाली होती की तुम्ही मोठे लेखक व्हाल. कधी कधी वाटतं की घराला घरपण आणण्यासाठी वेश्येच्या अंगणातील माती पवित्र असते. अगदी माझ्याहीबाबतीत तसंच घडलं की काय? मला कळत नाही की या अडुसष्ट पुस्तकाच्या प्रवासाला त्या वेश्येचा आशिर्वाद कारणीभूत ठरला की काय? परंतू काहीही असो, माझ्याही बाबतीत कावळा फांदीवर बसायचा आणि फांदी मोडायची असंच घडलं असावं कदाचीत किंवा तसं घडलं नसावं. परंतू या पुस्तकाला धरुन एकोणसत्तर पुस्तकं माझ्या हातून लिहिली गेली हे नक्कीच.
विशेष सांगायचं म्हणजे मी यापुर्वी वेदना लिहिली. त्यात वेश्याव्यवसायाला समाजमान्यता मिळावी हा विषय होता. यात तो व्यवसाय बंद व्हावा हा विषय होता. यातील नायिकेला वाटते की हा व्यवसाय बंद करावा. त्यासाठी ती प्रयत्न करते. वेश्याव्यवसायही बंद होतो. परंतू पुढे अति समस्या निर्माण होतात. शेवटी काय होते? तिला तसं का वाटते? शेवटी ती काय करते? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात आहेत. आपण ती पुस्तक वाचावी. तथ्यांश शोधावा व एक फोन अवश्य करावा पुस्तक कशी वाटली म्हणून. केवळ शब्दाच्या शिर्षकावरुन या पुस्तकाचा वा माझा दर्जा ठरवू नये. पुस्तक खरंच वाचनीय झाली असून माझ्या वेदना नावाच्या पुस्तकाच्या तेवढीच तोडीची बनलेली आहे. फक्त एवढंच ठरायचं बाकी आहे. ते म्हणजे ही पुस्तक आपण वाचक म्हणून आपल्या पसंतीस उतरवणं. ते मी सांगू शकत नाही. ते आपण ठरवावं एवढीच आपणाला विनंती आहे.
आपला
अंकुश शिंगाडे
९३७३३५९४५०


वारांगना (कादंबरी)
अंकुश शिंगाडे नागपूर


ती एक वारांगना होती. वासनांध लोकांची सेवा करणारी. तिनं आपल्या आयुष्यात कित्येक लोकांच्या वासना पुर्ण केल्या होत्या. ती जर नसती तर आज कित्येक भोळ्याभाबड्या मुली बलत्काराच्या शिकार झाल्या होत्या. कोण्याही मुलींच्या जीवनात दिवाळी उजळली नसती आणि ती जर नसती तर आज मुलींचं उभं आयुष्य उध्वस्त झालं असतं.
वारांगना........ कित्येक लोक तिला एक वारांगना म्हणून चिडवायचे. तिच्या कामाला हीन मानायचे. तिला दुषणे द्यायचे. म्हणायचे की तिनं तसं काम करु नये. दुसरं मेहनती काम करावं. परंतू ती मेहनती काम करु शकत नव्हती काय? करुही शकत होती. परंतू ज्या समाजानं तिला वारांगणा बनवलं होतं. तो समाज तिला मेहनतीचं वा इतर कोणतंच काम देत नव्हता. म्हणूनच तिला नाईलाजानं का होईना, ते काम करावं लागत होतं.
ती वारांगना........आज तिला एड्स झाला होता. ती एड्स सारख्या रोगामुळं मरण पावली होती. कारण ती अशा कोण्यातरी पुरुषांच्या संपर्कात आली होती. ज्याला एड्स नावाचा महाभयंकर रोग होता. त्या रोगानं तिचं उभं आयुष्य पोखरलं होतं. आज तिला एड्स होवून आठ वर्ष झाले होते. तरीही तिच्यात रग होती. कारण तिचं औषध सुरु होतं एड्सवरचं. तिला एड्सवर औषध निःशुल्क होतं.
सुशिला नाव होतं तिचं. ती पुर्वी वारांगना नव्हती. आपण कधीकाळी वारांगना बनू असा विचारही केला नव्हता तिनं आयुष्यात. परंतू नियतीच ती........तिला त्या नियतीनं वारांगना बनवलं होतं.

****************************************

सुशिलाचं बालपण अगदी आनंदात गेलं होतं. त्या दोन बहिणी होत्या. ही सर्वात मोठी होती. ही मोठी असतांना व जेव्हापर्यंत मायबापाला दुसरं लेकरु झालं नाही. तोपर्यंत तिला खुप प्रेम मिळालं होतं. त्यातच त्या प्रेमानं सुशिलावर चांगलेच संस्कार झाले होते. लहानपणच ते........त्या बालवयात तिला काय माहित होते की आपल्याशी कोणी असाही विश्वासघात करतील. जो विश्वासघात आपल्याला पचणार नाही.
लहानगं ते वय. सुशिलाचं शाळेत जाण्यालायक वय झालं नव्हतं. त्या वयात ती आपल्या मोहल्यातील मुलामुलींसोबत खेळ खेळायची. कधी कधी गंमत गंमतच्या विवाहाचा खेळ खेळायची. त्यामध्ये ती कोण्यातरी मुलाची पत्नी बनायची व ज्यापद्धतीनं तिचे मायबाप वागतात. तशी ती वागायची. ज्याला संसार नावाचा शब्द होता. तिला तो खेळ खेळणं जास्त आवडायचं. त्या खेळात गंमत गंमतचा विवाह होताच ती नववधूसारखी ओढणी घेवून बसायची. तसा तिला त्या पती बनलेल्या मुलाचा आवाज यायचा.
"सुशिला, मी आलोय."
मग सुशिला उठायची व डब्यात पाणी घेवून व एक लहानसं पाट ठेवून त्या मुलाचे पाय धुवायची. जणू तो तिचा पतीच आहे. त्यानंतर एका जागेवर त्याचेसाठी एक बसायचा कापड टाकून त्यावर एका झाकणात झाडाच्या पानाच्या गोल फाडलेल्या पोळ्या वाढायची. सोबत तरोट्याची भाजीही. मग तोही तिचा जोडीदार ती पोळी व ती गंमत गंमतची भाजी खायचा. शेवटी जेवन होताच तो ढेकर द्यायचा व पोटावरुन हात फिरवीत तो त्या झाकणाच्या ताटावरुन उठायचा. त्यावेळी त्यांना किती मजा यायची. ते त्यांना कळायचंही नाही. दररोज दररोजचे खेळ खेळता खेळता सुशिला लहानाची मोठी होत होती. तिची बहिण लहान होती.
लहानग्या बहिणीला सोबत घेवून सुशिला असा खेळ खेळत असतांना लहानाची मोठी होवू लागली. तसं तिचं नाव शाळेत टाकलं गेलं. परंतू ती शाळेत जात असतांंनाही तिचे खेळ खेळणे वा पती पत्नीचे खेळ खेळणे बंद झाले नव्हते. आज त्याच खेळाची जेव्हा तिला आठवण यायची. तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू राहात होते. तिला वाटायचं की काश! मलाही लहानपणासारखा एकच पती असता तर......तर आज मी किती सुखी झाले असते. ना आज एड्स असता, ना मी आज आजारी असते. परंतू आता मी आजारी तर आहे. व्यतिरीक्त आज मला पतीही भरपूर होतात. जे माझ्या जीवनात कायमस्वरुपी टिकत नाहीत तर रोजचे रोज बदलत असतात.
तिचा तो विचार रास्त होता. कारण तिच्या जीवनात तेच घडत होतं. ती वासनेनं पछाडलेली माणसं रोजच तिच्या शरीराचा उपभोग घेण्यासाठी येत असत नव्हे तर त्यांची वासना पुर्ण झाली की त्यांना तिचं काहीही सोयरसुतक नसायचं. ती पैसे नक्की कमवायची. परंतू सहानुभूती नाही. एरवी ती माणसं विचार करायची की आम्ही पैसा दिला. त्याबदल्यात आम्हाला आमची वासना पुर्ण करता आली.
सुशिला बालपणीचे खेळ खेळता खेळता मोठी होत होती. आता ती एवढी मोठी झाली होती की तिला पुरुष आणि स्रियांच्या भावना कळायला लागल्या होत्या. त्यातच तिच्यामध्ये पुरुषी आकर्षण निर्माण झालं होतं. तिला मुलं आवडायला लागली होती. तशी ती पुरुषांकडे लक्षही फेकत होती.
ते तरुणपणाचं वय, एक अल्लडच वय होतं. त्या वयात तिला मुलं आवडत असल्यानं ती मुलांची बोलायची. अगदी हसतमुखानं बोलायची. परंतू ती अल्लड जरी असली तरी ती विचार करायची. विचारपुर्वक पावलं टाकायची. कारण तिला विचार होता की तिला एक लहान बहीणही आहे. जर ती अशीच अल्लड वागली तर उद्या आपली बहीणही अल्लडच वागेल. जणू तिला संस्कार करायचे होते आपल्या बहिणीवर. आता ती तो भातूकलीचा खेळ खेेळत नव्हती. ती गंमत गंमतची पत्नी बनत नव्हती. तसेच ती त्या पतीला जेवायला देण्याचा खेळही खेळत नव्हती.
दिवसामागून दिवस जात होते. तसतसा तिचा स्वभाव बदलू लागला होता. मायबापाच्या गरिबीची तिला लहानपणापासूनच झळ पोहोचली होती. त्यातच मायबाप गरीब असल्यानं तिच्या काही काही इच्छाही पुर्ण झाल्या नव्हत्या. त्या इच्छा आपल्याही पुर्ण व्हाव्या असं तिला वाटत होतं. परंतू काय करणार. पैसा तुटपूंजा होता. अशातच तिला वाटायचं की आपण एखाद्याशी मैत्री करावी. त्यांच्याशी विवाह करावा. परंतू ते शक्य नव्हतं. कारण ते गाव होतं व गावात नावबोटं ठेवणारे बरेच जण होते.
ते एक गाव. त्या गावातील मुलीमुलंही आज अदबीनं वागत होते. कोणाचं त्या गावात कधीच प्रेमविवाह झालेला गावानं अनुभवला नव्हता. कारण सर्व मुलांचे विवाह गावानं स्वतः पुढाकार घेवून लावून दिलेत. कोणाच्या विवाहात गावानं कधी कमी पडू दिलं नाही. एकंदरीत सांगायचं झाल्यास सर्व लोकांवरच गावच्या सर्वच लोकांचे कमीअधीक उपकार होते.
सुशिला उच्चवर्णीय वर्गामधून होती. तिच्या जातीत भयंकर हुंडा होता. गाव जेवनखावण करण्याच्या पद्धतीत मदत करीत होतं. परंतू हुंडा........हुंडा ही गरज गाव पुर्ण करीत नव्हतं. तर तो हुंडा त्याच परिवाराला पुर्ण करावा लागत असे.
सुशिला विचार करायची की माझे वडील गरीब. साधारण शेतमजूर. ते जर माझ्या विवाहाला हुंडा म्हणून रक्कम देतील तर छोटीचं काय? छोटीचा विवाह कसा होणार! याच विचारानं तिनं प्रेमविवाह करण्याचं निश्चीत केलं होतं. तिनं प्रेमविवाहाला जास्त पसंती दिली होती. कारण त्या विवाहात पैसे जास्त जात नव्हते.
आठवी नववीचा तो वर्ग. ते कोवळं वयच. ज्या वयात शिक्षण एके शिक्षण ठेवायला हवं. त्या वयात तिनं आपला प्रेमविवाह करायचा ठरवला होता. ते विचाराचं वय नसतांनाही. हेच चुकलं होतं तिचं.
सुशिला वर्गात जशी शिकत होती. तशीच ती त्या काळात इतरही साहित्य वाचन करीत होती. एकदा तिच्या शिक्षीकेनं तिला आम्रपालीची पुस्तक वाचायला दिली होती.
आम्रपाली......जिला अंबापालिकाही म्हणत. आम्रपालीचा जन्म इस पुर्व पाचशे ते सहाशे दरम्यान झाला होता. असं म्हणतात की ती आंब्याच्या आमराईत जन्माला आली होती.
आम्रपाली जेव्हा तरुण झाली होती. तेव्हा तिच्यावर महानमन नावाचा युवक प्रेम करीत होता. ती सुंदर असल्यानं तिच्यावर तो भाळला होता. त्यातच त्यानं तिच्यासाठी आपलं नगर सोडलं होतं. आपलं सामंतपदही सोडलं होतं आणि तो वैशालीला येवून राहिला होता. ज्या वैशालीनगरात अंबाला नावाचं छोटसं गाव होतं. आम्रपाली लहानपणापासूनच सुंदर होती. ती नृत्यांगना होती. तिला नृत्य चांगलं करता येत होतं.
वैशाली हे लिच्छवी जनजातीची राजधानी होती. त्या ठिकाणी एक प्रथा होती. जिला कुप्रथाही म्हणता येईल. राज्यासाठी राजा लागत असे आणि राजाची निवड ही निर्वचन मंडळाद्वारे करण्यात येत असे. ज्या निर्वाचन मंडळात राजा व त्यांचे सहकारी तसेच राज्यातील श्रीमंत लोकांचा समावेश असे. त्यातच ती माणसंं राजा निवडतांना त्या जागेसाठी मतदान करीत. बदल्यात हा राजा एक नगरवधू बनवीत असे. ही नगरवधू त्या पुर्ण राज्यातील एक सुंदर स्री असे. ही नगरवधू एका व्यक्तीशी वा पुरुषाशी विवाह करीत नव्हती तर ती राजा, राजाची गणपरिषद तसेच राज्यातील सर्व श्रीमंत पुरुषांची पत्नी म्हणून काम करीत असे. याचाच अर्थ असा की ती या सर्वांसाठी एक वेश्या वा वारांगना म्हणून काम करीत असे. आम्रपाली अशीच एक सुंदर मुलगी होती. ती नृत्यांगना असल्यानं नृत्य करायची नगरातील कार्यक्रमात किंवा उत्सवप्रसंगी.
वैशालीचा राजा त्यावेळी मनुदेव होता. याा मनुदेवचीही राजा म्हणून निवड त्या राज्यातील गणपरिषदेनं केली होती. त्यातच या गणपरीषदेला खुश करण्यासाठी मनुदेवाला एक नगरवधू शोधायची होती. तसा एक प्रसंग चालून आला.
तोच प्रसंग. एका कार्यक्रमादरम्यान आम्रपाली नृत्य करीत असतांना मनुदेवची भुरटी नजर आम्रपालीवर पडली. त्यातच त्यानं तिचा बालपणीचा मित्र व तिचा प्रियकर पुष्पकुमारची तिच्या विवाहाच्या दिवशीच हत्या केली. त्यानंतर तिला त्यानं नगरवधू घोषीत केलं. तिला सात वर्षासाठी जनपद कल्याणी पद प्रदान केेलं.
आम्रपाली नगरवधू घोषीत होताच तिला दरबारात नृत्य करण्याची मुभा होती. ज्यावेळी बाहेरील राजेे वैशालीला येत. तेव्हा त्या राजांना खुश करण्यासाठी राजा मनुदेव कार्यक्रमाचं आयोजन करीत असे.
आम्रपाली एवढी सुंदर होती की तिच्या सुंदरतेनं वैशालीचं नाव सगळीकडे पसरत होतं. म्हणतात की तिचे नृत्य पाहण्यासाठी दूरदुुरुन राजे, महाराजे येत व तिच्या नृत्याचा आश्वाद घेवून जात. त्यासाठी मोठी किंमत त्यांना मोजावी लागत असे. असे राजे आम्रपालीच्या निमित्याने वैशालीला आपला खजिना आणत असल्याने वैशालीचा खजिना वाढला होता. त्यातच वैशाली अतिशय सुसंपन्न राज्य बनलंं होतं.
आम्रपालीचं नृत्य हे पाहता पाहता मगधला पोहोचलं. जे मगध वैशालीचं शत्रुराष्ट्र होतं. त्या राज्यातील राजा बिंंबीसार होता. कधीकाळी राजा बिंबीसारचंही आम्रपालीवर प्रेम होतं. त्यानं वैशालीवर आक्रमण केलं व आम्रपालीच्या घरी शरण घेतली. तेव्हा ती म्हणाली की त्यांंनी युद्ध थांबवावं. त्यानंतर त्यानं युद्ध थांबवलं. त्यानंतर आम्रपालीनंं बिंबीसारच्या पुत्राला जन्म दिला. ज्याचं नाव विमला कोडन्ना होतं.
आम्रपालीची पुस्तक सुशिलानं वाचली होती. तिचा इतिहास तिला माहीत झाला होता. तिला वाटत होतं की आम्रपाली महान आहे. तसा आम्रपालीचा प्रभाव सुशिलावर पडला. त्याचा परिणाम हा झाला की ती चुकीनं का होईना, पुढील काळात एक वेश्या बनली.
****************************************

आज सुशिला शालान्त पास झाली होती. तिला चांगली टक्केवारी मिळाली होती. त्यानुसार सुशिलाला पुढील शिक्षण शिकायचं होतं. परंतू त्या गावात फक्त दहावीपर्यंतच शाळा होती. पुढील शिक्षण शिकायचं कसं? सुशिलाला विचार पडला होता. तसं तिनं ठरवलं की आपण शहरात शिकायचं. तिथे असलेल्या वसतीगृहात राहायचं.
सुशिला तशी हुशारच होती. त्यातच सुशिलानं आपला फाम भरला होता वसतीगृहात आणि नाव टाकलं होतं महाविद्यालयात.
महाविद्यालयात सुशिलाला प्रवेश मिळाला होता. परंतू वसतीगृहात? वसतीगृहात अजूनपर्यंत नंबर लागला नव्हता. पहिली लिष्ट लागून संपली होती. दुसरीही लागली होती. तशी तिला चिंता पडली होती की जर आपला नंबर वसतीगृहात लागला नाही तर उद्या आपण महाविद्यालयीन शिक्षण शिकू शकणार नाही. काय करावं सुचत नव्हतं. शेवटी तिसरी लिष्ट लागली व तिचा नंबर तिस-या लिष्टमध्ये लागला. सुशिलाचा वसतीगृहात नंबर लागताच तिनं वसतीगृहात प्रवेश घेतला.
ते वसतीगृह तसं पाहता तिच्या लायक नव्हतं. त्या वसतीगृहात तिची रॅगींग नित्यनेमानं ठरलेली होती. रॅगींगमध्ये फक्त ओळख विचारली जात असे. त्यात सांगताना पुर्ण बायोडाटा हा एकाच भाषेत सांगावा लागत असे. सुशिलाला वसतीगृहात त्या रॅगींगमुळे राहावंसं वाटत नव्हतं. परंतू त्यावर काही उपाय नव्हता. परंतू हळूहळू ती त्या वातावरणात रुळली व ती आता वसतीगृहात राहू लागली.
आज ते वसतीगृह मुलांना राहायला देत होतं. तिथं खाणं पिणं अगदी मोफत मिळत होतं. परंतू काही वाईटही गोष्टी त्या वसतीगृहातील मुली शिकवत होत्या. त्या वाईट गोष्टी म्हणजे प्रेम करणे.
वसतीगृह चांगलं होतं. त्या वसतीगृहातील काही मुली नक्कीच चांगल्या होत्या. परंतू काही मुली या काही चांगल्या नव्हत्या. त्या महाविद्यालयात मुलांवर प्रेम कसं करायचं ह्या गोष्टी शिकविणा-या होत्या. काही मुली तर चक्कं आपल्या बायफ्रेंडला आपल्या वसतीगृहात आणत असत.
ते मुलींचं वसतीगृह. तिथं एक स्री महिला अधिकारी होती. ती वसतीगृहाची देखरेख करीत असे. परंतू ती काही रात्रीला मुक्कामी राहात नव्हती. ती सकाळी अकराला यायची व सायंकाळी पाचला वसतीगृहातून घरी जायची. त्यामुळं ती तिथं राहात नसल्यानं त्या मुलींच्या कार्यकर्तृत्वाला हवा लागली होती. त्या मुली रात्री वसतीगृहात कोणीच नसल्यानं वाह्यात सारख्या वागत होत्या. त्या अभ्यास करण्यासाठी आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी जरी आल्या असल्या तरी त्या अभ्यास करीत नव्हत्या. काही काही विद्यार्थीनी मात्र नक्कीच अभ्यास करीत होत्या.
सुशिला वाह्यात नव्हती. ती गावावरुन आलेली एक भोळीभाबडी मुलगी. तिच्यावर गावातील संस्कार झाले होते. परंतू एक गोष्ट मनात होती. ती म्हणजे आपण प्रेम करुन विवाह करावा. अर्थात प्रेमविवाह. त्यामुळं की काय, ती वाह्यात नसली तरी तिच्या या गोष्टीला त्या वसतीगृहातील मुलींमुळे खतपाणी मिळाले व ज्या मुली त्या वसतीगृहात बायफ्रेंड आणत होत्या. ते पाहून तिलाही बायफ्रेंड बनवावंसं वाटू लागलं. कोणावर तरी महाविद्यालयात प्रेम करावंंसं वाटू लागलं होतं. त्याचा विचार ती करु लागली होती. सुशिला वसतीगृहातील मुलींच्या म्हणण्यानुसार प्रेम करु लागली होती.

***********************************************

अर्शद नाव होतं त्याचं. तो तिच्याच महाविद्यालयात शिकणारा मुलगा होता. तो तिला चांगला वाटत होता. शिवाय तो मन मिळावूही वाटत होता. तो सर्वांना हवाहवासा वाटत होता. तसा तो तिलाही आवडत होता.
सुशिलाला तो आवडत होता. परंतू बोलावं कसंं? हा प्रश्न होता तिच्यासमोर. सुचत नव्हतंं मैत्री कशी करावी. तसा एकदाचा तो प्रसंग घडला.
सुशिलाच्या मनात प्रेमाचं भूत चढलं होतं. तशी ती सतत विचारातच असे. तशी ती त्या दिवशी महाविद्यालयात आली होती. विचारच करीत होती मनातल्या मनात. त्यातच ती त्याला टकरावली. तिचं डोकं फुटलं. भळाभळा रक्त वाहायला लागलं. तसं तिचं अवसान गळलं. ती शुद्धीवर नव्हती. तसं त्यानं आव ताव न पाहता तिला दवाखान्यात नेलं.
सुुशिलाला अर्शदनं दवाखान्यात नेलं. डॉक्टरचा पैसा दिला व थोडा वेळ तो तिथंच थांंबला. थोड्याच वेळाचा अवकाश. सुशिला शुद्धीवर आली होती. तिनं पाहिलं की ती रुग्णालयात असून तिला नळ्या लागलेल्या आहेत. आजुबाजुला रुग्ण आहेत व एक डॉक्टर दुस-या रुग्णाला तपासत आहे. तशी ती म्हणाली,
"मी कुठे आहे?"
जशी ती म्हणाली, 'मी कुठे आहे' तशी डॉक्टराची नजर तिच्याकडे गेली. तसे डॉक्टर तिच्याकडे वळले. त्यांनी तिला पाहिलं. म्हटलं,
"आता कसं वाटतंय."
"बरं वाटतंय. पण मला इथे कोणी आणलं?"
"अर्शद नावाचा कोणीतरी मुलगा आहे. त्यानंच तुला भरतीही केलं. निव्वळ भरतीच नाही तर त्यानं तुझी काळजीही घेतली."
डॉक्टरांचं ते बोलणं. तशी सुशिला चूप बसली. परंतू ती विचार करु लागली की बिचारा अर्शद. त्याची चूूक नव्हतीच. तरीही त्यानं मला भर्ती केलं. माझे प्राण वाचवले. त्याचे उपकार झाले माझ्यावर. कधीकाळी हे उपकार मला कसे फेडता येतील.
ती होशात आली होती. ती विचारच करीत होती. तसा अर्शद औषधी घेवून आला. त्यानं पाहिलं की ती होशात आली आहे. तसा तो जवळ येताच बोलका झाला.
"कसं वाटतंय तुला?"
"बरं वाटतंय."
"चहा घेणार काय?"
"नाही. चहा नाही घेत मी."
"अगं चहा घे. बरं वाटेल तुला."
"ठीक आहे." ती म्हणाली. तसा त्यानं थोड्याच वेळात चहा आणला.
सुशिला चहा पीत होती. तसं तिला वाटत होतंं की अर्शद यालाच पुुढील आयुष्याचा जोडीदार बनवावे. कारण अर्शदनं मला जीवदान दिलं आहे. त्याच्याचमुळे आज माझा जीव वाचला आहे.
सुशिलाचं विचार करणं बरोबर होतं. तिचा जीव वाचला होता. परंतू तो काही तिच्यासाठी योग्य नव्हता. कारण त्यानं तिचा जीव जरी वाचवला असेल तरी तो एका वेश्यालयाचा दलाल होता. तो अशाचप्रकारे उपकार करुन भोळ्याभाबड्या मुलींना आपल्या प्रेमपाशात ओढत होता आणि त्यांना प्रेमपाशात ओढून वेश्यालयात ओढत होता.
रुग्णालयातून सुशिलाला काही दिवसातच सुटी झाली. ह्या दरम्यान अर्शदनं तिची पुरेपूर सेवा केली. तो तिचा अपघात......त्या अपघाताची कल्पना तिच्या मायबापांनाही नव्हती. तसं त्यावेळी फोन नसल्यानं काहीही सुशिलाबद्दल तिच्या मायबापांना माहीत झालं नाही.
सुशिलाला रुग्णालयातून सुटी झाली खरी. ती अर्शदनं तिची सेवा केल्यानं. मग काय आता ती वसतीगृहात राहू लागली. तसं सर्व वसतीगृहातील मुलींनाही तिची सेवा त्या अर्शदनंच केल्याचं माहीत झालं होतं. तशा त्या मुली तिची कधी कधी अर्शदवरुन मौजही घ्यायच्या.
आज अर्शद तिला भेटायला तिच्या वसतीगृहात जात होता. त्या वसतागृहातील मुलीही त्याला काही म्हणत नव्हत्या. त्यातच तिचं हळूहळू प्रेम वाढायला लागलं होतं अर्शदवरचं. तशी ती पुर्ण स्वस्थ झाली होती. आता ती पुर्ण स्वस्थ होताच अर्शदसोबत फिरायलाही जावू लागली होती. कधी बागेत तर कधी रेस्टॉरेंटमध्ये. मात्र त्यानं तिला कधी आपलं घर दाखवलं नव्हतं.
आता ती पुर्णतः त्याच्या वशमध्ये झाली होती. तिला तो जीव की प्राण वाटत होता. आज ती त्याचेशिवाय राहू शकत नव्हती. कधीकधी तो तिच्या स्वप्नातही दिसत असे. तिचं आता अभ्यासात मन लागत नव्हतं. तसा तो एक दिवस उजळला.
तो दिवस. त्या दिवशी तो सकाळीच तिच्या वसतीगृहात आला होता. म्हणाला, 'आपल्याला बाहेर जायचं आहे' त्यानं तसं म्हणताच तिनं लवकर तयारी केली. परंतू त्यानंं पुन्हा म्हटलं की तू माझ्यासोबत येवू नकोस. मी आधी जातो. मग काही वेळानं तू ये. कुणाला शंका नको यायला की तू माझ्यासोबत फिरायला निघाली.
तो एक संकेत होता. परंतू तिला त्याची पुसटशीही कल्पना नव्हती. तसा तो आधी निघाला. त्यानंतर काही वेळानं ठरल्याप्रमाणे तिही.
ती खाली उतरली. त्यानंतर वसतीगृहापासून ती पायी चालत चालत थोडी दूर गेली. जिथे तो उभा होता. जिथे कोणीच नव्हतं.
त्यानं इकडं तिकडं पाहिलं. तसं कोणीच नाही आजुबाजूला याचा वेध घेवून तो तिला म्हणाला,
"चेह-याला कापड बांधून घेे. आपण बाहेर चाललोय. जरा कोणाला शंका यायला नको."
तिला कळलं नाही, तो काय बोलला ते. कारण यापुर्वी फिरायला जाताना ती खुुल्या चेह-यानंं जात होती. परंतू आज त्यानं तिला तोंडाला कापड का बांधायला लावलं. याचं तिला आश्चर्य वाटत होतं. परंतू त्याची तिनंं शहानिशा न करता तिनं तोंडला कापड बांधलं व त्याचेसोबत ती बाईकवर बसली व निघाली. तिला आज कल्पना नव्हती की तो तिला कुठे घेवून जात आहे.
ती बाहेर पडून त्याचे गाडीवर बसताच त्यानं आपली गाडी सुरु केली व ती गाडी भरधाव धावू लागली. आता ती गाडी मुख्य रस्त्यावर धावायला लागली. जो रस्ता दुस-या जिल्ह्याला जात होता. तशी ती म्हणाली,
"आपण कुठे चाललोय?"
"माझ्या गावाला." तो म्हणाला. तिनंही त्याचेवर विश्वास केला आणि ती चूूप बसली.
थोड्याच वेळाचा अवकाश. त्या रस्त्यानं जंगल लागलं होतं. कोणतीही वाहनं दिसत नव्हती या रस्त्यान. अतिशय भयाण वाटत होता तो रस्ता. तशी ती गाडी आडवळणे घेत जंगल पार करुन बाजुुला वळवली त्यानं. त्यातच तो त्या ठिकाणी थांबला. जिथे एक चारचाकी गाडी उभी होती.
त्या गाडीजवळ गाडी थांबवताच त्या गाडीतून चार धष्टपुष्ठ माणसं उतरली. त्यांपैकी तिघांनी तिला आव ताव न पाहता तिला जबरदस्तीनं पकडलं. तशी ती त्या अर्शदला म्हणाली,
"अर्शद, हे काय? या माणसांनी मला पकडलं आणि तू चक्कं उभा पाहात आहेस. यांना अडवतही नाहीस. का बरं?"
ती बोलली. तसा अर्शद म्हणाला,
"घाबरु नकोस मेरी जान, मी तुला विकलं आहे. तुझा सौदा केला आहे मी. मला त्याचे पैसे मिळाले आहेत. मी तुला वेश्यालयात विकले आहे."
"म्हणजे तू दलाल भडवा आहेस तर........."
"हो, मी वेश्यांचा दलालच आहे."
"मग मला का वाचवलं? मला मरु का दिलं नाहीस?"
"कशी बोलतेय. तुझ्यासारख्या सुंदर मुली मरायसाठी असतात का?" तो तिच्या गालावर हात फिरवत म्हणाला व तिनं त्याचा हात मस्तकानंच झिडकारला व जोरात म्हणाली,
"भाग निर्लज्जा, अशानं कोण तुझ्यावर विश्वास ठेवेल."
"सर्वच मुली ठेवतात विश्वास. अगदी तुझ्यासारख्या. तू ठेवली ना माझ्यावर विश्वास. अशाच इतरही मुली माझ्यावर विश्वास ठेवतात. मीच नाही तर माझ्यासारखी कित्येक मुलंं महाविद्यालय विद्यार्थी बनून हेच करतात आहे. तेव्हाच आमचंं वेश्यालय चालतं. आम्हाला पैसे मिळतात. अगदी कमी मेहनतीनं भरपूर पैसा. अगं, तुझ्यासारख्या कित्येक मुली मी आणल्या आहेत फसवून. काहींसोबत प्रेमाचं नाटक करुन. कारण पळवून वा अपहरण करुन आणतांना सापडण्याची भिती असते. पोलीस पकडू शकतात. परंतू प्रेम करुन जर मुली आणल्या तर कोणीही शंका घेवू शकत नाही आणि पुरावाही राहात नाही. मायबापांनाही वाटते की माझी मुलगी पळून गेली. तोंड काळं करुन गेली. ते आजच्या काळात मुलींचा शोध घेत नाहीत. कारण आपली संस्कृती महान आहे. प्रेम केल्यानंतर ती मुलगी वा कोणाची सुन कोण्या दुस-या जातीबरोबर पळून गेल्यास तिनं तोंड काळं केलं समजतात. ते साधी चौकशीही करीत नाहीत. तसेच कोणी पोलीसस्टेशनला तक्रारही करीत नाहीत. कोणी करतात. परंतू पोलीसही यात जास्त डोकं टाकत नाहीत. जे टाकतात. त्यांना आम्ही देणगी देतो. त्यामुळं त्यांची तोंडही बंद होतात. तेही काहीच हालचाल करीत नाही. त्यामुुळं आमचं भागतं. समजलं का? आता चूप राहायचं आणि जे तुझ्या नशिबाला आलं, त्याचा स्विकार करायचा. सर्वांचं ऐकायचं. नाही ऐकल्यास आमच्याकडे मारुन टाकण्याचीही प्रथा आहे. तुला आम्ही मारुन टाकू व तुझा थांगपत्ताही कोणाला लागणार नाही. म्हणून जीवंत राहायचं असेल तर चूप बसायचं. एक शब्दही काढायचा नाही कधी. अन् हो, पळून जायची कधी संधी आलीच तर पळून जायचा विचार किंचीतही करायचा नाही. कारण पळून जाणारी मुलगी ती मग कुठेही असली तरी आम्हाला ती सापडते. आमचं तसं नेटवर्क आहे प्रत्येक शहरात. म्हणून सांगतोय. त्या मुली सापडल्या की त्यांना जीवंतच जाळतो आम्ही. त्याचा व्हिडीओ बनवतो. तो आमच्या वेश्यालयातील सर्वच मुलींना दाखवतो. म्हणून सांगतो आहे. पळून जायचं नाही.
माहीत ठेवायचं की ज्याप्रमाणे महाविद्यालयाचे नियम असतात ना. तसे नियम आमच्याही वेश्यालयाचे आहेत. ते पाळायचे. नाहीतर शिक्षा आहे. आम्ही त्यांचा एकेक अवयव कापून फेकतो. ते नियम पाळले नाही तर.......आमच्या वेश्यालयाचे कडक नियम असून ते नियम कडक असल्यानं आमचंं वेश्यालय आजही अब्रू राखून आहे. कोणी दाग लावलेला नाही आमच्या वेश्यालयाला. आम्ही आजही कोणाच्या नजरेत आलेलो नाही."
त्याचं बोलणं संपलं होतं. ती स्तब्ध होती आणि त्याचं बोलणं शांतपणे ऐकत होती. तिचं चुकलंं होतं. कारण तिनं भलत्यावरच विश्वास केला होता. तिला आता काहीही सुचत नव्हतं. तिला आता स्वतःचा जीव संपवासा वाटत होता. परंतू काय करणार. ती हतबल होती. ती तीन बलदंड माणसं तिला कसून पकडूून होते. थोड्याच वेळात त्या चवथ्या माणसानं अर्शदला पैसे दिले. तसा ते पैसे मोजतच अर्शद म्हणाला,
"घेवून जा लवकर हिला. नाहीतर कोणी येईल. जा लवकर."
अर्शदनं तसं म्हणताच त्या तिघांनी तिला गाडीत कोंबलं. तिचे डोळे बांधले. त्यानंतर तिला जबरदस्तीनं इंजेक्शन दिलंं. त्याचबरोबर ती बेशुद्ध झाली. त्यांनी आपली गाडी सुरु केली. ती गााडी आपल्या रस्त्यानं लागली. तसा अर्शद माघारी फिरला आणि आपल्या शहरात येवू लागला.

************************************

ते तरुणपण.........आपल्याला तरुणपण चांगलं वाटतं. कारण त्या वयात कोणाचं ऐकावं लागत नाही. कोणाचं बंधन राहात नाही. आपल्याला आपण स्वतःचे मालक असल्यासारखे वाटते. तरुण मुलांची चांदीच असते. तशी मुलींचीही चांदीच असते.
हा तरुणपणाचा काळ. आपण निर्णयक्षम झालेले असतो. स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यायला लागतो. त्यासाठी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज उरत नाही. तसं कायद्यानुसार अठरा वर्षाची मुलं मुली झाल्यास त्यांच्यावर मायबापाची वा इतर कोणाचीही मर्जी चालत नाही.
प्रेम करणे हा गुन्हा नाही. प्रत्येकांनी प्रेम करावं. तरुण तरुणींंनीही प्रेम करावं. प्रेम करायला मनाई नाही. परंतू याबाबत थोडा विचार करायला हवा. थोडी शहानिशाही करायला हवी. कारण अठरा वर्षानंतर कायद्यानुसार आपण सक्षम झालेले असलो आणि आपल्याला हवे तसेे निर्णय घेता येत असले तरी आपण घेतलेले आपले निर्णय कधी काळी फसत असतात.
ती सुशिला नावाची मुलगी. ती ग्रामीण भागात राहायची. मुलगी हुशार होती. ती शालान्त पास झाली. तसं तिनं वसतीगृहात प्रवेश मिळवून शहरात तिनंं महाविद्यालयात प्रवेश घेतला.
सुशिलाच्या घरची परिस्थिती बेताचीच होती. म्हणून तिला नाईलाजानं वसतीगृहात राहावं लागलं. तसं पाहता वसतीगृहात सुशिलाला राहतांंना तिथं असलेल्या मुलींनी तिला प्रेम करण्याविषयी डिवचलं. परंतू त्या बाबतीत तिनं स्वतः निर्णय घ्यायला हवा होता. परंतूू तिनंं मुलींच्या म्हणण्यानुसार तिनं प्रेम केलं त्या तरुणाशी. ज्या तरुणाचं वेश्यालयाशी कनेक्शन होतं नव्हे तर तो वेश्यालयात महाविद्यालयाच्या मुलींना प्रेम करुन विकत होता. ते तिला माहीत नव्हते. म्हणूनच ती फसली.
त्याचं नाव अर्शद होतं. तो अर्शद महाविद्यालयात महाविद्यालय विद्यार्थी म्हणून प्रवेश घेत होता व शिक्षणही. त्यानंतर तो मुलींना मदत करायचा. अतिशय काळजी घ्यायचा त्यांची. त्यातच त्या मुली त्याचेवर भाळायच्या. त्या जिवापाड प्रेम करु लागायच्या त्याचेवर. त्या मुली त्याचेवर जिवापाड प्रेम करु लागताच एखाद्या दिवशी संधी साधून अतिशय शिताफीनं काहीही बहाणा करुन तो त्यांना बाहेरगावचं नाव सांगून फिरायला न्यायचा आणि संधी न दवडता विकून टाकायचा. बदल्यात पैसे कमवायचा. त्या त्याच्या अशा करण्यानं त्या मुलींचं उभं आयुष्य उध्वस्त व्हायचं.
विशेष सांगायचं म्हणजे महाविद्यालयात शिकणारे सर्वच मुलंमुली आपले मित्र असतात. चांगले मित्र असतात. ते आपली काळजी घेतात. याचा अर्थ असा नाही की ते चांगले असतीलच. कोणाच्या मनात तुमच्याविषयी काय चाललं आहे ते तुम्ही तपासू शकत नाही. जिथे एकाच आईच्या पोटातून जन्म घेणारी भावंडं सारख्या विचाराची नक्षेची नसतात. तिथं तर ही मित्र आहेत. त्यामुळं ती नेमकी काय करु शकतील हे काही सांंगता येत नाही. त्यामुळे कोणावर कसा विश्वास ठेवायचा तेही मांडणे कठीण आहे. आज काळ बराच बदलला आहे. ज्याचेवर विश्वास करतो ना आपण. तोच धोका देतो आपल्याला.
याबाबतीत एक आणखी गोष्ट सांगतो. एक मुलगी एका महाविद्यालयात शिकत होती. ती प्रेम करीत होती त्या मुलावर. ज्या मुलावर त्याच महाविद्यालयातील तिचीच जीवलग असलेली मैत्रीण प्रेम करीत होती. त्यानं ते सांगीतलं नव्हतं तिला. तो दोघींवरही प्रेम करायचा. यातूनच त्यानं दोघींशीही प्रेमसंबंध बनवले होते. विवाहाचं आश्वासन देत देत. या प्रेमसंबंधातून एक गरोदर राहिली. तिला पाच महिने झाले होते दिवस गेल्याला. तसं प्रेमसंंबंध करतांना त्यानं त्या दोघींनाही अंंधारात ठेवलं. सांगीतलं नव्हतं काहीच. परंतू पाच महिने झाल्यानंतर गरोदर मुलीनं त्याच्याशी विवाहाचा तकादा लावताच त्यानंं आपल्यावर तिच्या मैत्रीणीचं प्रेम असल्याचं सांंगीतलं. जर ती आपलं प्रेमसंबंध तोडेल तर मी तुझ्याशी विवाह करणार. अन्यथा नाही असं तो म्हणाला. शेवटी तिच्याजवळ उपाय उरला नाही. गर्भपातही पाच महिने झाल्यानं करता येत नव्हता. शेवटी ती तिच्याजवळ गेली. तिला त्याचेवरील प्रेमसंबंध तोडून टाकण्याविषयी बोलू लागली. गयावया करु लागली. परंतू ती ऐकेना. ती म्हणाली की यात तुझी चूूक आहे. तू त्याला ही गोष्ट आधीच विचारायला हवं होतंं. मी माझं त्याचेवर असलेलं प्रेम बंद करु शकत नाही. शेवटी तिचा नाईलाज झाला. ती दुःखी अंतःकरणानं घरी आली. कम-यात गेली. छतावर पंख्याला दोर अडकवला व लावला गळफास व आपलं जीवन संपवलं.
ती मुलगी मरण पावली होती. मुलाचं काय गेलं. काहीच नाही. गेलं ते मुलीच्या आईवडीलाचं. त्यांची उपवर मुलगी मरण पावली होती.
आज मुलं मुली तरुण झाले आणि ते महाविद्यालयात गेले तर कोणत्याही गोष्टीचा आव विचार न करता प्रेम करु लागतात. प्रेम हे त्यांना सर्वस्व वाटत असते. परंतू त्या प्रेेमाच्या आड काय लपलेलं असतं. ते त्यांना दिसत नाही. कोणता मुलगा वा कोणती मुलगी आपल्यासाठी संकट घेवून येईल ते काही कळत नाही कोणत्याच महाविद्यालयीन मुलांना. या गोष्टीचा विचार प्रत्येक महाविद्यालयीन मुलामुलीने करण्याची गरज आहे.
महत्वाचं सांगायचं झाल्यास एखाद्या वेळी एखादा मुलगा वा मुलगी आपली जीवलग मैत्रीण वा जीवलग मित्र असल्याचा देेखावा करुन आपल्यासमोर केव्हा संकट उभं करेल नव्हे तर आपल्याला केव्हा विकून टाकेल वेश्यालयात. ते सांगणे कठीण आहे. म्हणून कधीही कोणीही महाविद्यालयीन मुलांनी प्रेमाला सर्वस्व मानू नये. कोणावर जिवापाड प्रेम करण्यापुर्वी सावधान असलेलं बरं. प्रेम करावं. प्रेमाची पावलं नक्कीत टाकावीत. परंतू प्रेमाची पावलं जरा जपून टाकावीत. कारण प्रेम हे काचासारखं असतं. थोडासा धक्का लागलाच तर काच जशी लवकर फुटते. तसंच प्रेमाचंही आहे. त्याही प्रेमाने आपल्यावर केव्हा आणि कोणतं संकट येईल ते काही सांगता येत नाही.
विशेष सांगायचं म्हणजे महाविद्यालयात मुलांनी नक्की यावं. शिकावंं, उच्च शिक्षण घ्यावं. करीयर बनवावं. ते ठिकाण आपलं करीयर बनविण्यासाठी आहे. महाविद्यालय हे शिकण्यासाठी आहे. परंतू ते ठिकाण प्रेम करण्यासाठी नाही. कारण या महाविद्यालयातून कोणकोणते संंकट निर्माण होवू शकतात आपल्यावर हे सांगणे कठीण आहे. महाविद्यालयीन प्रेमातून वेश्यावस्तीत विकणे दुरच. व्यतिरीक्त आत्महत्या मायबापाच्या व आपल्याही, डिप्रेेशन, खुन आपला व आपल्या प्रेमींचाही, आपल्या भावाचा व मायबापाचाही, वेडेपणा मायबापाचा व आपलाही, बलत्कार, करीयरचा उध्वस्तपणा, विश्वासघात, कुमारीमातेचा प्रश्न, बाळाची विल्हेवाट त्यातच त्याचा दोष नसतांनाही खुन. या सर्वच समस्या निर्माण होत असतात. म्हणून प्रेम करावं महाविद्यालयीन तरुणांनी. परंतू तसं प्रेम करु नये. संसार बसविण्याचे प्रेम करु नये. ज्या प्रेमातून वरील प्रकारच्या समस्या निर्माण होतील व ज्या समस्येतून आपली कधी सुटकाच होवू शकणार नाही.
सुशिलाला गाडीत कोंबताच व तिला इंजेक्शन देताच सुशिला काहीच बोलू शकली नाही. ती बेहोश होती. जेव्हा ती होशात आली. तेव्हा तिला अतिशय कमजोर वाटत होतं. डोकं गरगर फिरल्यागत फिरत होतं. तिचे हातपाय अजूनही बांधलेलेच होते. मात्र तिचे डोळे उघडे होते. तिनंं पाहिलं की तिच्या पुढ्यात एक मुलगी बसलेली आहे व तिला अंथरुणावर झोपवलेलं आहेे. वर पंख्याची हवा असून खाली शेणानं सारवलेला कमरा नाही तर चांगला कमरा आाहे.
ते एक झोपडंच नव्हतं. तर ती एक मोठी टोलेजंग इमारत होती. जशी सुशिला होशात आली. तसं तिनं आजुबाजुला पाहताच व तिला ती मुलगी दिसताच तिला ती म्हणाली,
"मी कुठे आहे आणि तू कोण आहे?"
सुशिला होशात येताच व बोलताच समोरील मुलगी म्हणाली,
"रिलॅक्स हो आधी. मी सगळं सांगतेय."
"मी रिलॅक्सच आहे. परंतू माझे हातपाय का बांधले आहेत?"
"तू पळून जावू नये म्हणून."
"म्हणजे?"
"म्हणजेे नवीन आणलेली कोंबडी जशी पळून जावू नये म्हणून तिला सवय पडावी म्हणूून काही दिवस तिच्या पायाला धागा बांधतात. तसा तुलाही तू पळून जावू नये म्हणून या लोकांंनी तुला धागा बांधलेला आहे."
"परंतू मी कोठे आहे आता?"
"विदेशात. तू या देशाची नाहीस."
"म्हणजे?"
"तुला आपल्या देशात कधीच जाता येवू नये म्हणून हे लोकं तुमच्या देशातील लोकांना इथे आणतात आणि येथील मुलींना आपल्या देशात नेतात."
"तुला आमच्या देशातील भाषा येत आहे. ती कशी काय?"
"मी तिकडलीच आहे. तुला सगळं समजावून सांगता यावं म्हणून मलाच तुझ्या सेवेत ठेवलं आहे."
"हो का? अन् मला इथं का बरं आणलं? जरा साांगशील का?"
"होय, सगळं सांगेन मी. आधी थोडीशी रिलॅक्स हो."
"मी रिलॅक्सच आहे. सांग आधी आणि एक ऐकशील का?"
"काय? सांग आदेश कर."
"माझे हातपाय सोडशील का?"
"नाही."
"का बरं?"
"हे लोकं मारतील मला. फार वाईट आहेत हे लोक."
"बरं जावू दे. आधी मला हे सांग की इथे मला का आणलं?"
"धंदा..........धंदा करण्यासाठी आणलं तुला इथं यांनी."
"धंदा! धंदा म्हणजे?"
सुशिलाला पुसटशी कल्पना आलीच होती की तिला विकलेलं होतं. परंतू तरीही तिनं विचारलं,
"धंदा........इथं शरीर विकली जातात रोजच. तीन चार वेळा. जेव्हा जेव्हा गि-हाईक येतात इथं. इथं आपली मर्जी चालत नाही. त्यांची मर्जी चालते. चांगलं खावं प्यावं लागतं. तंदूरुस्त राहावं लागतं आणि गि-हाईकांची सेवा करावी लागते. कोणत्या वेळी कोणत्या गि-हाईकांना कोणता माल पसंत पडेल हे सांगता येत नाही म्हणून सर्वांना स्वस्थ राहावं लागतं."
"अन् जे स्वस्थ नसेल तर......."
"त्यांना वेदना देतात ही माणसं. ही माणसं मोठी जहाल आहेत."
"वेदना! म्हणजे नेमकं काय?"
"गरम सळाखीचे चटके. कधी चाकूच्या चुबकण्या."
"चुबकण्या म्हणजे?"
"चाकूनं घाव दिले जातात. शरीरावर चिरे मारले जातात चाकूनं आणि एखाद्या मुलीनं नाटकच केलं जास्तच तर.......तिचे अवयवही छाटले जातात. कधी जीवही घेतले जातात. इथं कोणाला दयामाया नाही. पक्की शैतानच आहेत ही माणसं."
"पुरं आता. तू आणखी सांगू नकोस. नाहीतर मी पुन्हा बेशुद्धच व्हायची. तू मला ते सांग की तू कशी काय आली इथे?"
"जावू दे माझी कहाणी. आधी स्वस्थ हो लवकर. नाहीतर हे लोकं तुला मारुन टाकतील. कामाची नाही म्हणून."
"एखाद्याची इच्छा नसली तर.......़़"
"तर तिचा इथे राहण्याचा काहीच अधिकार नाही. इथं राहायचं असेल आणि खायचं असेल तर इच्छा असो वा नसो. आपली इच्छा ठेवावीच लागते. नाही म्हणून चालत नाही."
"सांगणं तुझ्या जीवनाची कहाणी."
"धीर धर. सांगेन मिही. माझीही कहाणी सांगेन तुला. मोठी करुण कहाणी आहे माझी."
"बरं ते जावू दे. तुझं नाव काय आहे हे तरी सांग."
"माझं नाव.."
"हो नाव. तुझं नाव सांग मला."
"माझं नाव अंजली."
तिनं सांगीतलं व ती बाहेर गेली. ते पाहून सुशिलाही झोपी गेली. कारण तिच्याजवळ उपाय नव्हता. तिचे हातपाय बांधले होते. त्यामुळं ती उठू शकत नव्हतीच.
दोनतीन दिवस झाले होते. सुशिलाच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. कदाचित ती बेशुद्ध असतांनाच त्या नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला होता इथं येण्यापुर्वी. तसंच वाटत होतं तिला. सारखं अंग दुखत होतं तिचं. त्यातच प्रकृती चांगली वाटत नव्हती.
दोन तीन दिवस झाले होते. अंजली तिच्या कम-यात जात येत होती. तिनं काही आपली कहाणी सुशिलाला सांगीतली नाही. पुन्हा कधीतरी सांगणार हे सांगून तिला चूप केलं होतं तिनं. तशी सुशिला तिच्या मागेच पडली होती. ती म्हणाली,
"ताई, मी स्वस्थ होताच तुझं काम होईल. तू कुठे जाशील आणि मी कुठे? मला मग तुझी कहाणीही ऐकायला मिळणार नाही. सांग ना तुझी कहाणी."
दोन तीन दिवस झाले होते. सुशिलाला स्वस्थ वाटत होतं. परंतू अंजलीनं ती स्वस्थ झाल्याबाबतची गोष्ट त्या नराधमांंना सांगीतली नाही. तसं आज तिला सुशिलानं विचारताच तिला आपलीही कहाणी सांगाविशी वाटली. तशी अंजली तिला म्हणाली,
"नाव काय गं तुझं?"
"सुशिला."
"कुठे राहते तू?"
सुशिलानं आपला पत्ता सांगीतला.
"अन् इथं कसं आणलं तुला?"
अंजलीनं तिला विचारलं. तशी ती सांगू लागली आपली कहाणी आणि अंजली ऐकू लागली तिची कहाणी.
"मी ग्रामीण भागात राहणारी मुलगी. हुशार होते म्हणून मी दहावी पास झाले. पुढं शिक्षण शिकण्याची इच्छा झाली. माझे मायबाप शिकू नको म्हणत होते. तरीही मला शिकायची इच्छा होती म्हणून मी शहरात शिकायला आले. तिथं वसतीगृहात राहू लागले. ज्या वसतीगृहात रॅगींग व्हायची. या रॅगींगमध्ये मुली म्हणत की एखादा मुलगा पटवावा. तो आपल्या जीवनातील जोडीदार व्हावा. त्यानं निरतिशय प्रेम करावं आपल्यावर. आपणही त्याचेवर. तशा त्या मुली त्यांच्या प्रियकरांना वसतीगृहातही आणत होत्या.
ते त्यांचं बोलणं आणि त्यांचं वागणं पाहून मलाही वाटलं की आपणही कोणावर प्रेम करावं. जीव लावावा कोणावर. शेवटी मिही प्रेम करायचं ठरवताच मला माझ्याच महाविद्यालयातील एक मुलगा गवसला. पहिल्याच दिवशी त्यानं मला टक्कर दिली व मी बेशुद्ध झाले. तेव्हा त्यानंच मला भरती केलं रुग्णालयात. त्यानं माझी फार काळजी घेतली. परंतू तो त्याचा दिखावा होता.
मी स्वस्थ झाले होेते. तसं त्यानं त्या बेशुद्धपणात माझी काळजी घेतल्यानं मी त्याचेवर भाळले. त्याचेवर निरतिशय प्रेम करु लागले. त्याचेवर विश्वास ठेवून फिरायला जावू लागले कुठेही. कुठेही म्हणजे बागेत आणि रेस्टॉरेंटमध्येही. शेेवटी त्यानं घात केला."
अचानक तिच्या डोळ्यातून अश्रूधारा टपकल्या. तशी अंजली म्हणाली,
"रडू नकोस. वेडी कुठली. अशी रडत बसशील तर आताच संपशील. हे वेश्यालय आहे. या ठिकाणी रडायचं नसतं. हिंमत बांधायची असते. हिंमतीनं सगळं इच्छा नसतांनाही सहन करायचं असतं. दुःख पचवायचं असते मनात. ते दाखवायचं नसतं मुळीच."
एक दिवस त्यानं म्हटलं की आपण बाहेरगावी फिरायला जाणार आहोत. तू तयारी करुन खाली ये. मी आडोशाला उभा राहतो. कोणाच्या लक्षात यायला नको की मी तुला रोजरोज फिरायला नेतोय. नाहीतर आपली तक्रार करतील या मुली. मग हे वसतीगृह प्रशासन तुझ्या आईवडीलांनाही सांगतील. मग आपलं भेटणंच बंद होईल.
मलाही त्याच्या बोलण्यात सत्यता दिसली. मिही विश्वास केला त्याचेवर व निघाली फिरायला त्याचेसोबत. परंतू त्यानं मला मुर्ख बनवलं. मी विचारलं मध्येच त्याला. तेव्हा तो म्हणत होता की तो त्याच्या गावला नेत आहे. शेवटी जंगल लागलं. त्या जंगलानंतर एक चांगला मोकळा रस्ता. परंतू त्या रस्त्यानं कोणीही येणारं जाणारं दिसलं नाही. एक गाडी उभी असलेली दिसली तिथं. तशी त्यानं त्या गाडीजवळ आपली गाडी थांबवली. त्या गाडीतून चार जण धष्टपुष्ठ मुुस्तंडे उतरले. तिघांनी मला आवळून पकडलं व एकानं पैसे दिले त्या अर्शदला. त्यावेळी मी त्याला जाब विचारताच तो म्हणाला की तो वेश्यांचा दलाल आहे. एवढंच त्याचं नि माझं शेवटचं बोलणं. त्यानंतर मला जबरदस्तीनं गाडीत कोंबलं व माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली गेली. काही वेळानं मला काहीतरी टोचलं गेलं. बहुतेक ते इंजेक्शनच असावं. कारण त्यानंतर मला चक्कर यायला लाागली हळूहळू. मी बेहोश झाले होते. आज जेव्हा होशात आले, तेव्हा आज इथं आल्यावर कळत आहे की आपल्यासोबत काय झालं."
सुुशिलानं तिचं पुर्णपणे ऐकलं. तशी ती म्हणाली,
"बापरेे! म्हणजे प्रेम करणं वाईटच. तसा विचार करणंही वाईटच. कोणावर अलीकडे विश्वास ठेवावा तेच कळत नाही. विचारच आहे सर्व. तिकडे माायबापही चिंंतेत असतील ना तुझे."
"हो ना ताई. परंतू आता यावर काय उपाय आहे. काहीच नाही."
"हो ना ताई. आता माझ्याकडे काहीच उपाय नाही. देशात असती कदाचीत तर पळूनही जावू शकली असती. परंतू इथं शक्य नाही."
"हो खरंं आहे तुझं. इथं ते शक्य नाही."
"आता तुझ्या म्हणण्यानुसार मलाही सर्व विचार करुन सगळं सहन करावं लागेलच. एक वेश्या बनावं लागेल. जिला आपच्याकडे वारांगना म्हणतात. मग रोजचे रोज पुरुष पती म्हणून चढवावे लागतील आपल्या उरावर. आता तर असं वाटायला लागलं की आपला जन्मच मुळात याच गोष्टीसाठी झाला असावा."
"हं, अगदी तसंच समज तू. आपल्या नशिबातच होतं हे सारंं. समज की आपले प्रारब्धच विधात्यानं असंच लिहिलेलं असावं."
"ताई, आता तू सांग ना आपली कहाणी. तू कशी आली इकडे?"
"माझी कहाणी तर तुझ्याहीपेक्षा महाभयंकर आहे."
"म्हणजे?"
"मिही प्रेम करीत होती निरतीशय. आम्ही पळून जावून विवाह करणार होतो. तो तसाच म्हणत होता, परंतू मी नकार दिला. मी नकार देताच तो मानला व माझा विवाह रितीरिवाजानं झाला. माझे आईवडील त्याचेशी विवाह करु नको म्हणत होते. परंतू मला तो आवडला होता. मी विवाह करतोच म्हणत होतेे. त्यामुळं माझ्या आईवडीलाला वाटलं की ही मुलगी पळून जाईल. म्हणून त्यांनी माझा विवाह रितीरिवाजानं करुन दिला.
माझा विवाह झाला होता. दोन वर्ष तो बरा वागला. मग काय सततची भांंडणं. तो घरुन निघून जा म्हणत होता. परंतू मी काही निघून गेली नाही. तसा हा माझ्याच मर्जीचा विवाह असल्यानं मिही त्याची तक्रारही मायबापांना केली नाही. त्याचाच फायदा घेतला त्यानं. एक दिवस तर त्यानं कहरच केला. त्या दिवशी त्यानं माझ्यासोबत झोपविण्यासाठी एका माणसाला आणलं व मला जबरदस्तीनं त्याचेसोबत झोपायला बाध्य केलं. मी अबला काय करणार. त्याचे त्यानं पैसे कमवले होते.
आता ती त्याला सवयच पडली होती. तो आता मला धंद्यावर बसवत होता आणि मी सगळं सहन करीत होती. मायबापालाही वा कोणालाही सांगत नव्हती. कारण त्यात चूक माझीच होती.
शेवटचा तो प्रसंग. ज्या दिवशी त्यानं मला विकलं. त्या प्रसंगी त्या गोष्टीला वा त्या प्रसंंगाला मी विसरु शकत नाही.
कदाचित त्या दिवशी त्याला वाटलं असेल की ही सोन्याचा अंडा देणारी कोंबडी, आपण ही कोंबडीच कापावी, म्हणजे आपल्याला पुष्कळ अंडे मिळतील. बस तोच विचार त्याचा. त्यानुुसार मला या वेश्यालयात आणले गेले."
"पण ताई, आापले मायबाप याचा शोध लावत नसतील काय? कदाचीत पोलिसस्टेशनला तक्रार देत नसतील का आपली?"
"देतही असतील. परंतू काही दिवसांनी तेही लक्ष देत नसतील. म्हणत असतील की जावू देे पळून. तोंड काळं करुन गेली, त्याचं काय? आपल्यालाच दुषणं देत असतील. कारण त्यांना काय माहित नसतं आपलं काय झालं ते. आपले इतिवृत्त त्यांना माहित नसतं.
अलीकडे मुली बेपत्ता होण्याचेे वा पळूून जाण्याचे प्रमाण वाढत आहे. आता त्या स्वतः पळून जातात की त्यांना पळवून नेलंं जातं वा त्याचं अपहरण केलं जातं तेे काही सांगता येत नाही. परंतू त्यांचं अपहरण झाल्यास ती तक्रार पोलीस स्टेशनला जाते. पोलीसही अतिशय कष्ट करुन तिचा शोध लावतात. त्यावेळी ती स्वतः म्हणते की मी स्वतःच पळून आली व कायद्यानुसार कोणत्याही स्रिला अठरा वर्षानंंतर ती पळूनही गेली तरी तिला काहीही म्हणता येत नाही. कारण कायद्यानुसार ती बालीश नसली तरी तिला बालीश समजलं जातं. शेवटी अशी अनेक प्रकरणं घडतात. याच प्रकरणामुळं एखाद्या चांगल्या मुलीचं नुकसान होतं. ती पळून गेलेली नसते. तिचं अपहरण केलेलंं असतं. परंतू पोलिसांना वाटतंं की तिही इतरांसारखी पळून गेलेली असेल.
मुली पळून गेल्या असं मायबापांनी समजू नये. कारण मुुली जेव्हा बेपत्ता होतात, तेव्हा त्यांच्यावर बरंच संकट आलेलं असतंं.
आपला भारत देश हा सृजलाम सूफलाम आहेे. येथील संस्कृती महान आहे. तसेच ही संस्कृती लोकांनाही मााहीत आहे. कित्येक कवी लेखकांनी या देशाचे गोडवे गायले आहे. त्यानुसार मुली किंवा मुलांना विवाहाचं बंधन आहे. त्यांना पळून जावून विवाह करता येत नाही. तशा विवाहाला मान्यताच नाही भारतात. तसा विवाह केला मुलामुलींनी तर मुलाला तेवढा दोष देत नाही येथील संस्कृती. ही संस्कृती मुलीलाच जास्त दोष देते. कारण आजही देशात पितृसत्ताक कुटूंंब पद्धती आहे. याचाच फायदा येथील काही महाभाग घेत असतात.
मुलगी पळून जाताच वा कधी गायब होताच 'गेली तोंड काळं करुन.' असं येेथील पालकवर्गाचं म्हणणं असतंं. ती कुठे गेली असेल, कोणं नेली, काय झालं तिचं? याची साधी शहानिशा न करता पालकवर्ग चूप बसतो. तिचा यात दोष नसला तरी. परंतू पालकांनी मुलगी बेपत्ता होताच शांत बसू नये. सावध होवून जमेल तसा तिचा शोध लागेपर्यंत प्रयत्न करायला हवा. कारण काळ हा बराच वेगळा आहे.
आजचा काळ हा फुस लावणारा आहे. मुलगी तरुण झाली रे झाली की पुरुषांची वाकडी नजर तिच्यावर जाते. त्यातच ते आश्वासनाचे जाळे फेकतात. या आश्वासनाच्या जाळ्यात चांगल्या चांगल्या मुली फसतात. ही मुलंं शेवटी या नवीन वयात येणा-या मुलींना एवढी फुस लावतात की त्या, शेवटी त्याचंच ऐकतात. त्या मुली प्रसंगी आपल्या मायबापाचंही ऐकत नाहीत. त्या मुलांचंच ऐकतात आणि मायबापही त्या प्रकरणावरुन भांडत असतात मुलींशी. कारण त्यांनाही वाटत असतं की आपली मुलगी या वाईट शैतानाच्या जोखडात फसू नये. जीवनभर आपलं दुःखी जीवन काढू नये.
मायबापाचं बरोबर असतं. कारण त्यांनी आपल्या जीवनात बराच अनुभव घेतलेला असतो. बराच त्रासही सहन केलेला असतो आणि अशावेळी ती भांडणं करीत असतांना अचानक मुलगी बेपत्ता झाली तर मायबापाचा तो विचार बरोबर असतो की गेली असेल तोंड काळं करुन. परंतू तसं होत नाही. दोनचार मुली जर अपवादात्मक सोडल्या तर काही काही मुलींवर नक्कीच संंकट कोसळलेलं असतं. या मुली संकटात फसलेल्या असतात. त्यांच्यावर ती मुलं त्यांच्या मायबापाचा शांतपणा पाहून खुुप अत्याचार करतात. एवढंच नाही तर ती मुलं कामाला जात नाहीत. त्याच मुलींना राबवतात. एवढ्यानंंच त्यांचं भागत नाही. त्याहीपुढे ती मुलंं त्यांना वेेश्यावृत्तीची कामं करायला बाध्य करतात. त्या गोष्टीसाठी त्या ऐकत नसतील तर मारतात. छळतात आणि यातून ती त्यांचेवर भारी झाली तर त्यांना जाळूनही टाकतात. खुन करतात किंवा वेश्यावस्तीत विकतात. यातून त्यांना जास्तीत जास्त पैसा मिळतो. काही काही मुलं तर मुलींना वेश्यालयात विकण्यासाठीच फुस लावून प्रेम करीत असलेले दिसून येत आहेत.
काही मुलं विवाह करुन वेेश्यालयात विकतात तर काही मुलं चक्क प्रेम करुन वेश्यालयात विकतात. आज आकडे पाहिले किंवा सर्वेक्षण केेलं गेलंं ख-या अर्थानं तर आपल्याला या गोष्टीची वास्तवीकता सहज लक्षात येईल. जे वेश्यालय तुरुंगापेक्षाही महाभयंकर असतं स्रियांसाठी.
कोणतीही स्री सहजपणे वेेेश्यापणाचा स्विकार करणार नाहीच. कारण तेथे वेेदना भरपूर असतात. बॉसचं ऐकावंच लागतं. नाही ऐकल्यास प्रचंड त्रास दिला जातो तिथं त्यांना.
महत्वाचं म्हणजे कोणतीही मुलगी ही पळून जातांना आपलं सुखंच बघतं. माझा जोडीदार मला भविष्यात अतिशय आनंदात ठेवेल असं तिला वाटत असते. म्हणून ती पळूून जात असते. परंतू होतं उलटं. कारण ती ज्याला चाांंगला जोडीदार समजते. तो कधीकधी फारच वाईट निघतो. तो विचित्र वागत असतो. अपवाद की काही काही चांगलेेही निघतात. काही मात्र असेच निघतात. तेव्हा मुलींनी सावधान असावं. मायबापांनीही सावधान असावं. एकतर ही खबरदारी घ्यावी की ती पळून जाणार नाही. अन् समजा ती न ऐकता पळून गेलीच तर शांत राहावं. चीडचीड करु नये. स्वतःला सांभाळावे. शांत राहावे याचा अर्थ मायबापांनी चूप बसावे असा नाही. चूप बसूच नये. कारण तिही तुमच्या गर्भातून तुम्हाला त्रास देवून जन्म घेत असते. तिला लहानाचं मोठं करतांंनाही तुम्हाला त्रास होत असतो. मग ती पळून गेल्यावर तर होणारच. परंतू तो त्रास तिला पळून जातांंना कोण सांगेल. ती नादान असते. अठरा वर्षाच्या वर ती झाली असते. तरी तिला चांगलं वाईट ओळखता येत नाही. ती जेव्हा आई बनते, तेव्हा तिला तो त्रास कळतो वा ती पळून गेल्यावर तिच्या मागे जेव्हा भोगमान (संकट) येतं, तेव्हा तिला ते सारं कळतं. तेव्हा वेळ निघून गेलेली असते. याचा अर्थ मायबापांनी चूप बसणं असा नाही. ती पळून गेल्यावरही तिचा शोध लावावा. ती व्यवस्थीत असेेल तर ठीक. नाहीतर तिच्यावरील संकट दूर करण्यासाठी तिला मदत करावी. ते तुमचेच कर्तव्य आहे. जेणेकरुन तुम्ही चांगले मायबाप ठराल. मुलीलाही पश्चाताप होईल. त्यानंतर ती जीवनात कधीच चूकणार नाही. पर्यायानं सांगायचं झाल्यास तिला नरकवासनेचे भोगमान देण्यासाठी मायबापानं मजबूूर होवू नये. त्यांनी त्यांचे कर्तव्य पार पाडावे म्हणजे झालं. तसेच घाबरुन भ्रृणहत्याही करु नये.
अंजलीचं बरोबर होतं. ती वास्तवीकतेला धरुन बोलत होती. वास्तवीकता ही होती की प्रत्येक मायबाप मुलगी पळून गेल्यावर ती तोंड काळं करुन गेली असंच समजत होते.

****************************************

सायंकाळ झाली होती. सुशिला वसतीगृहात परतली नाही. तसं तिच्या रुममेटला वाटलं की ती गावला गेली असावी. परंतू त्यांना ती आज कशी काय सांगून गेली नाही याचं आश्चर्य वाटत होतं. कारण सुशिला नेहमी गावाला जातांना आपल्या मैत्रीणींना सांगत होती.
सुशिला गायब झाली होती. हे तिच्या मैत्रीणींना तेव्हा लक्षात आलं, जेव्हा एक महिण्यानंतर वार्डननं जाहीर केलं.
पुरते पंधरा दिवस झाले होते. सुशिला काही वसतीगृहात परतली नव्हती. तशी ती परत न फिरल्यानं वसतीगृहाच्या अधिक्षकाच्या लक्षात आलं. तसा तिच्या सुटीचा अर्जही वसतीगृहात नव्हता. त्यांनी तिच्या कम-यात त्या गोष्टीची चौकशी केली. मुलींनी सांगीतलं की त्यांना ते माहीत नाही. मग त्या अधिक्षकानं तिच्या वडीलांना पत्र पाठवून ताबडतोब बोलावून घेतले. या सर्व प्रोसीजरला आठ दिवस लागले. शेवटी तिचे मायबाप वसतीगृहात आल्यावर वसतीगृह प्रमुखानं तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार पोलीसस्टेशनला टाकली व जाहीर केलं की सुशिला बेपत्ता झालेली आहे. ती कुणातरी सोबत पळून गेलेली आहे. कुणाला माहिती असेल तर त्यानं तिची माहिती द्यावी.
पोलिसस्टेशनची ती केस. तिच्या मायबापांनी वसतीगृह प्रमुखाला दोष दिला. परंतू पोलिसांनी सांगीतलं की ती अठरा वर्षाची झाली असून ती कोणातरी सोबत पळून गेली आहे. त्यामुळं वसतीगृह अधिक्षकाला दोष देता नाही. तसेच अधिक्षकांनही सांगीतलं की आपली मुलगी ही सज्ञान आहे. तिच्याकडे ते लक्ष कसे देवू शकतील. शेवटी ते मायबाप स्वतःच्या कर्मावर पश्चाताप करीत गावला परतले. आपल्याला फक्त एकच मुलगी होती हा विचार मनात धरुन.
प्रकरण बंद झालं नाही. परंतू पोलिसांनी या केसमध्ये काहीच तपास केला नाही. कारण अपहरणाच्या तक्रारी पोलीयसस्टेशनला भरपूर होत्या. त्यांची फाईलही वाढतच होती. तशाच या घटना भरपूर होत्या देशात.
ते वसतीगृह. त्या वसतीगृहात सुशिला स्वभावानं चांगली होती. तिची वसतीगृहात मैत्रीण होती. तिचं नाव प्रतिभा होतं. पंधरा दिवस झाले होते. तशी ती एक मुलगी वार्डनकडे आली. ती तिची रुम पार्टनर होती. ती येताच वार्डनला म्हणाली,
"मैडम, मला काहीतरी सांगायचं आहे सुशिलाबद्दल."
प्रतिभा सुशिलाची जीवलग मैत्रीण होती. वसतीगृह अधिक्षकानं जेव्हा जाहीर केलं की सुशिला ही वसतीगृहातून बेपत्ता झाली आहे. तिला बरं वाटत नव्हतं. तशी सुशिला काही तिलाही सांगून गेली नव्हती. परंतू तिला माहीत होतं की अर्शद नावाचा तो तिचा बॉयफ्रेंड असून तोच बॉयफ्रेंड आता वसतीगृहात येतांना दिसत नाही. पुर्वी तो नेहमी वसतीगृहात यायचा. चौकशी करायचा. ती जर वसतीगृहात नसली तर तिला ती कुठे गेली याबद्दल विचारायचा. परंतू ती बेपत्ता झाल्यापासून तो काही वसतीगृहात आला नव्हता. त्यामुळं तिला वाटत होतं की कदाचीत या अर्शदनंच तिचं अपहरण केलेलं असावं. कारण ती जर स्वतः बेपत्ता झाली असती तर एक दिवस तरी तो वसतीगृहात तिला भेटायला आला असता वा निदान तो तिची चौकशी करायला तरी आला असता. तो ती बेपत्ता झाल्यापासून एकही दिवस वसतिगृहात आला नाही हे लक्षात घेवून तिची शंका वाढली व आज ती तेच सांगायला वसतीगृह अधिक्षकाकडे आली होती.
"बोल प्रतिभा, काय सांगायचं आहे तुला?"
"सुशिलाबद्दल काहीतरी खास सांगायचं आहे."
"काय सांगायचं आहे सुशिलाबद्दल?"
"मैम, सुशिलाचा एक बॉयफ्रेंडही होता."
"काय नाव होतं त्याचं?"
"अर्शद. अर्शद नाव होतं त्याचं."
"हो का? कुठला होता तो?"
"मैम, तिच्याच महाविद्यालयातील होता तो."
"मग तुला काय करायचं आहे आता. ही केस आता पोलिसात दिली आहे ना. पोलिसं जे काही करायचं ते करतील. तू शांत बस."
"मैम, तुम्हीही महिला आहात आणि सुशिलाही महिलाच आहे. एका महिलेनं दुस-या महिलेसाठी धावू नये काय? आणि ती जर तुमची मुलगी असती तर......"
"प्रतिभा, तुझं म्हणणं बरोबर आहे. परंतू आज ती नाबालीग नाही. कदाचीत पळून गेली असेल त्याचेसोबत."
"मैम, चौकशी करायला काय हरकत आहे. कुणाहीसोबत जावो. तिची चौकशी व्हायला हवी. जर ती सापडली तर आपण निश्चींत बसू. परंतू तिच्यावर संकट असलं तर आपण धावायला नको का? मैडम प्लीज. मी ग्वाही देते की सुशिला एक चांगली मुलगी होती. ती पळून जावूच शकत नाही कुणाहीसोबत."
"मग मी काय करायला हवं?"
"मैम, एकदा पोलिसस्टेशनला चाला. मिही येते."
"प्रतिभा, आता जावू दे ना. आपल्या वसतीगृहाची बदनामी होते."
"मैम, सुशिला, तुमच्या मुलीसारखी आहे. कृपया तिच्यावर जर अत्याचार झालाच तर ती तुम्हालाही व मलाही माफ करणार नाही. आपण प्रयत्न करायला हवा."
"प्रतिभा, मी काहीच करु शकत नाही. तुला काय करायचं ते तू करु शकतेस."
"मैडम."
"प्रतिभा, तू आता जावू शकतेस आणि हं, या केसमध्ये जास्त लुडबूड करु नकोस. यात वसतीगृहाची बदनामी आहे. जर तू आपली पावलं उचलली आणि वसतीगृहाची बदनामी जर झाली तर तुला वसतीगृहातून काढून फेकण्यात येईल."
वसतीगृह अधिक्षकानं प्रतिभाला म्हणताच प्रतिभा गप्प झाली ती आपल्या कम-यात आली.
प्रतिभा आपल्या कम-यात आली असली तरी तिचं मन काही तिला स्वस्थ बसू देत नव्हतं. ते मन तिचं तिलाच खात होतं. तशी एक भितीही वाटत होती, ती वसतीगृहातील अधिक्षकानं तिला दिलेल्या धमकीची. वसतीगृह अधिक्षकानं तिला धमकी दिली होती की ती जर ती केस उघड करेल तर तिला वसतीगृहातून काढून टाकण्यात येईल.
एक मन तिला सांगत होतं की सुशिला तिची रुम पार्टनरच नाही तर एक महिलाही आहे तिच्याचसारखी. तिनं गप्प राहू नये. तिला न्याय मिळवून द्यावा. परंतू दुसरं मन सांगत होतं की जर तिनं यात मन घातलं आणि तिला वसतीगृह अधिक्षकानं वसतीगृहातून काढून टाकलं तर तिची आबाळ होईल. ती त्यावर प्रचंड प्रमाणात विचार करीत होती. शेवटी तिनं विचार केला की वसतीगृह अधिक्षकानं तिला वसतीगृहातून काढलं तरी चालेल. परंतू त्या सुशिलाला न्याय मिळवून द्यायचाच. शेवटी तिनं विचार पक्का केला. त्यातच एक दिवस ती स्वतः पोलीस स्टेशनला गेली. तिनं पोलिसांना सुशिलाबद्दल सांगीतलं. तसंच अर्शदबद्दलही सांगीतलं. तिच्या बयाणानुसार पोलिसांनी सुशिलाच्या महाविद्यालयात चौकशी केली.
ते महाविद्यालय. त्या महाविद्यालयात चौकशी झाली. तिथे असलेल्या अर्शदचीही चौकशी झाली होती. परंतू अर्शदला विचारपूस केली असता काहीच निष्पन्न झालं नाही पोलिसांना. कारण अर्शदची पाहिजे त्या प्रमाणात चौकशी झाली नव्हती. शेवटी सुशिला न सापडल्यानं ती केस थांबून राहिली. फाईल बंद झाली नव्हे तर केली गेली आणि सुशिला काही काळासाठी का होईना, अत्याचाराची शिकार झाली.
प्रतिभा पोलिस स्टेशनला गेली. तिनंं वसतीगृह अधिक्षकाचं काहीही ऐकलं नाही. त्याचा परिणाम हा झाला की वसतीगृह अधिक्षकानं तिला वसतीगृहातून काढून फेकलं व ती रस्त्यावर आली.
प्रतिभा गावचीच मुलगी होती. ती अतिशय गरीब असून तिचे वडील शेतमजूरच होते. तिही दहावी पास होवून वसतीगृहात शिकायला आली होती. ती स्वाभिमानी व सत्यवचनी होती.
तिचा वसतीगृहात पहिल्याच यादीमध्ये नंबर लागला होता. ती वसतीगृहात जेव्हा राहात असे. तेव्हा जेवनखावण अगदी फुकटात मिळत असे. तिला जेवनासाठी एक रुपयाही द्यावा लागत नव्हता. जेवनात सकाळी दूध आणि नाश्ता असे. नाश्त्यात मोट, मुंगाची उसळ व पोहे किंवा उपमा असे. दहा वाजता जेवन मिळायचं. जेवनात दोन भाज्या, पापड, पिंगर, लोणचे व एक लहान वाटीभर दही असायचं. दर रविवारी दोन अंडे व जी मंडळी अंडे खात नसत, त्यांचेसाठी खास करुन गोड पदार्थ असत. महिन्यातून एका रविवारी मटनही असे. ते मटनही अगदी भरपेट असायचं. त्यातच ते मटन खातांना काही मुली तर पोळी कधीही घेत नसत. कधीही मिळत नसल्यासारख्या त्या मुली पुर्ण जेवन होईपर्यंत मांसावरच ताव मारत असत. ते पदार्थ खात खात व लोणचे तोंडी लावत लावत इतर मुलींसोबत प्रतिभाचंही जीवन कटत होतं. त्यातच राहतांना तिला ना वीज बिल भरावं लागत असे ना कम-याचे पैसे. व्यतिरीक्त तिला महिन्यासाठी काही पैसेही मिळत. ते पैसे तिला कपडे धुण्यासाठी लागणा-या साबण सोडा व आंघोळीसाठी लागणा-या साबणासाठी आणि डोक्याला लागणा-या तेलासाठी असे. ती त्या पैशात साबण पावडरसोबत वह्या पुस्तकंही विकत घेत असे.
प्रतिभा आज रस्त्यावर आली होती. तिच्यासमोर विचार आला होता की दिवस कसे काढावेत. कारण तिच्या जेवनाखावणासोबत तिला मिळणारी संपुर्ण मदत बंद झाली होती. काय करावं सुचत नव्हतं. शिक्षण तर शिकायचंच होतं. महाविद्यालयात तर जायचंच होतं. तिनं जे काही केलं होतं, त्यातून निष्पन्न काहीही झालं नव्हतं. उलट तिला वसतीगृहातून काढून फेकलं होतं.
प्रतिभासोबत अतिशय वाईट झालं होतं. परंतू ती हारली नाही. ती रस्त्यावर राहिली. तिनं फुटपाथला आपलंं घर बनवलं. ती रात्रीच्या अंधारात विजेच्या खांबाच्या प्रकाशात अभ्यास करु लागली. भिका-यासारखी राहू लागली दिवसभर.
प्रतिभा फुटपाथवर राहात असे. दिवसभर महाविद्यालयात जात असे. तेथून आली की फुटपाथवर पैसे मिळविण्यासाठी हिंडत असे. तेही भिका-याच्या अवस्थेत. त्यातच दोन पैसे आले की त्या पैशात ती जेवनाखावणाचे पदार्थ विकत घेत असे. साबण पावडरही विकत घेत होती त्या पैशात ती. काही पैसा शिल्लक ठेवून त्या पैशात महाविद्यालयाचा खर्च भागवत असे.
ते फुटपाथ. त्या फुटपाथवर राहतांना तिला कधी पोलीसही तंग करीत. तर कधी गुंड मवाली. पोलीस आलेच तर ते काहीबाही बोलत. तेव्हा ती आपलं अंथरूण उचलून दुसरीकडे हलवत असे. तसा आपला मुक्कामही हलवत असे. गुंड मवाली आलेच तर त्यांनाही त्यांच्या भाषेत ती प्रतिउत्तर देत असे. तशी ती लवकरच स्वयंपाक करुन झोपी जाई. कधी स्वयंपाकाचा त्रास आलाच तर हॉटेलात नाश्ता पाणी करुन ती आपलं पोट भरुन घेई. कधी कधी तिला पैसे मिळत नसत. तेव्हा ती उपाशीपोटीच पाणी पिवून झोपी जाई. त्यातच पुर्ण शहर झोपलं की कोणाला माहीत पडू नये अशाप्रकारे अर्ध्या रात्री ती अभ्यास करीत होती. तरीही सकाळीच उठून प्रातःविधी आटोपून ती स्वच्छ आंघोळ करुन आपलं सामान फुटपाथवरच कडेला ठेवून ती महाविद्यालयाची तयारी करुन महाविद्यालयात जात होती.
ते कष्टाचे दिवस होते तिचे. ती शिकत होती. जरी वसतीगृहातून तिला काढून फेकलं तरी ती हिंमत हारली नाही. शिकत राहिली.
प्रतिभा कधी कधी विचार करायची की सुशिलाला न्याय मिळाला नाही. आपण तिला न्याय मिळवून द्यावा. कदाचीत पोलिसांनी आपल्याला मदत केली नाही म्हणून काय झाले. आपण पोलीस अधिकारी बनावं. जेणेकरुन आपल्याला स्वतःला तपासाचा अधिकार राहील. कोणाहीसमोर तपास करण्यासाठी हात फैलावा लागणार नाही. आज आपल्याला त्रास आहे. कदाचीत हेही दिवसं निघून जातील.
तिचा विचार रास्त होता. ती शिकत होती रास्त विचार करता करता. आता तिला ते वसतीगृहातील सुग्रास अन्न मिळत नव्हतं तर कधी कधी तर तिला उपाशीच राहावं लागत होतं.
प्रतिभाची ही त्रेधातीरपीट तिच्या जीवनाला वळण देवून गेली. तिच्या आयुष्याला सुशिलाच घडवत होती. कारण सुशिलाचा शोध कसा लावता येईल याचसाठी ती शिकत होती. तिलाच न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत असतांना तिला वसतीगृह अधिक्षकानं काढून टाकलं होतं.
हळूहळू प्रतिभाची प्रतिभा निखारत चालली होती. आता तिचं शिक्षण पुर्ण झालं होतं. परंतू पोलीस अधिकारी तेवढं बनणं बाकी होतं. तसा तिनं आता पोलीस अधिकारी पदाचा फार्मही भरला होता. त्यातच ती जोरकसपणानं अभ्यासही करीत होती.

***********************************************

सुशिलाची पुर्णपणे प्रकृती ठीक झाली होती. तसं तिला माहीतच झालं होतं की यातून आपली काही सुटका नाही. आपल्याला वेश्या बनावंच लागेल. त्यादृष्टीनं तिनं आपल्या मनाची पुर्ण तयारी केली होती. तसं पाहिल्यास तिला प्रौढ झाल्यासारखं वाटत होतं. कारण ती होशाात नसतांना कोणीतरी तिच्यावर बलात्कार केलेला आहे. हे आता तिला जाणवत होतंं. कारण तिच्या गुप्त मार्गातून सारखा रक्तस्राव सुरु होता. त्यातच ती जागा आणि तिचं शरीरही सारखं दुखत होेतं.
आज तो दिवस होता. ज्या दिवशी तिनं पुर्ण मनाची तयारी केलेली होती वेश्यापणासाठी. तशातच अंजली म्हणाली,
"सुशिला प्रकृती कशी आहे तुझी?"
"आज पुर्णपणे स्वस्थ आहे मी."
"पुर्णपणे स्वस्थ आहेस की आणखी तुला विश्रांती हवी आहे थोडीशी. आताच सांग. कारण जर का तू अगदी स्वस्थ आहे असं मी मानून त्या भडव्यांना सांगीतलं तर ते तुला यापुढे कधीच विश्रांती घेवू देणार नाहीत. कारण त्यांना दया माया नाही हे मी आधीच सांगीतलंय तुला. मी जर त्यांना तू स्वस्थ असल्याचं सांगीतल्यास ते तुझा आताच सौदा करतील. कारण त्यांना पैसा कमवायचा आहे. त्यामुळं हवं तर दोन तीन दिवस तू विश्रांती घेवू शकतेस."
"नाही ताई. मी अगदी स्वस्थ आहे आणि वाट तरी किती पाहायची. एक ना एक दिवस मला त्या येणा-या संकटाच्या सामोरे जावे लागेलच. त्यातून आता माझी सुटका नाहीच असं मला वाटतेय. तेव्हा तू त्यांना सांग की ही सुशिला आजपासून वेश्या बनण्यासाठी तयार आहे."
"तर ठीक आहे तर. मी त्यांना सांगतेय तसं. तसं पाहता ते भडवे तुझ्या शरीराचे लचकेे तोडण्याची वाटच पाहात असतील. त्यांनाही वाटत असेल की केव्हा केव्हा ही सुशिला सुधारते आणि केव्हा नाही."
"हो ना ताई, त्यांना अगदी तसंच वाटत असेल."
"हो, त्यासाठीच तर ते आपल्याला आणतात पळवूून आणि आपल्या आपल्या आप्तापासून आणि मायबाप भाऊबहिणीपासून तोडून. आता हे समज की हेच आपले आप्त आहेत आणि हाच आपला परिवार. कारण इथून आपली कधीच सुटका नाही मरेपर्यंत. एकदा का या धंद्यात पडलं की बाहेरचं जग आपल्याला प्रियही वाटत नाही."
"ताई, मी पुर्णपणे स्वस्थ आहे आणि तयारही आहे. तू सांंग तसंं त्यांना. उगाच तुला त्रास नको पुढचा. नाहीतर ते तुझ्यावरच शंका घेतील व तुला विनाकारण त्रास देतील."
"हो का, तसं म्हटलं तर तुझंही बरोबर आहे. मी जाते आता त्यांना सांंगायला. आता ते येतील तुझ्याकडे. कदाचीत मी आता येणार नाही इकडे. परंतू एक सांगून जाते शेवटचं की हिंमत हारायची नाही. दुःखही करायचं नाही. विचार करायचा मनात की हे आपल्या नशिबातच होतं आणि नशिबातील लिहिलेलं कोणीही टाळू शकत नाही. परमेश्वरही नाही. अगं हे समजायचं की ज्या लोकांना आपण देव मानतो, त्या क्रिष्ण अन् रामालाही येथे कर्मफल भोगावं लागलं. रामाला चौदा वर्षाचा वनवास झाला आणि क्रिष्णावर स्यमंतक मणी चोरीचा आरोप. अगं, हेही लक्षात ठेव की इथे चंद्र, सुर्यालाही ग्रहण लागतं. आपण तर माणसं आहोत."
"हो ताई, मी अगदी तसंच मानून चालेल. मी तुुझे उपकार कधीच विसरणार नाही."
"हे उपकार कसले? मी असे कोणते उपकार केले तुझ्यावर."
"अगं ताई, तू माझी नातेवाईक नसतांनाही ना तूझी माझी ओळख असतांनाही तू माझ्यात जी हिंमत भरली, ती हिंमत दाद देण्यासारखी आहे. हे उपकारच नाही का तुझे?"
"बरं ठीक आहे." अंजली म्हणाली. तसं तिनं आपल्या डोळ्यातून पाणी आणलं. ती रडायला लागली. तोच सुशिलाही. जणू सुशिलाच तिला मार्गदर्शन करीत होती. असं वाटत होतं. तसं सुशिलान तिच्या छातीवर आपलं डोकं ठेवलं. म्हटलं,
"ताई, तू अगदी माझी मोठी बहीण शोभतेय."
अंजलीनं तेे ऐकलं. तसा तिनं तिच्या पाठीवरुन व केसावरुन हात फिरवला व म्हटलं,
"तू मला मोठी बहीण मानते ना. मग घाबरायचं नाही कोणाला. प्रतिकार करायचा याही प्रसंगाचा. ठीक आहे."
"ठीक आहे."
सुशिला म्हणाली. त्याबरोेबर अंजली व सुशिला दोघींनीही एकमेकांचा निरोप घेतला व ती झपाट्यानं तेथून निघून गेली.
अंजली निघून जाताच सुुशिला विचार करु लागली त्या प्रसंगाचा. मी त्या लोकांना कशी पेलवेल. जे काही मागे माझ्यासोबत घडलेही असेल. माझ्यावर बलात्कार झालाही असेल, परंंतू त्यावेळी मी होशात नव्हते. परंतू आता मी होशातच असणार. ते भडवे येतील तेव्हा. कधी कधी दोन दोन चार चार माणसांना पेलवावेे लागेल. ती रग माझ्यात असेल का की पुन्हा बेशुद्ध होणार मी. असं बेशुुद्ध होता होता एक दिवस माझं मरण. छी! असलं मरण. त्यापेक्षा आत्महत्या केेलेली बरी. परंतू आत्महत्या.........या वासनांध पुरुष नराधमांना घाबरुन . छेे! यांच्या भितीनं...... नाही. आत्महत्या करायची नाही आपण. प्रतिकार करायचा. ताईनं सांगीतलं तसं. अंंजली बोलून गेली की घाबरायचं नाही, प्रतिकार करायचा. मलाही तेच करावं लागेल. हं एक, कदाचीत हे आपल्या नशिबाचेच भोग असतील. आपल्या नशिबातच लिहिले असतील असलेे भोग. म्हणूनच हे भोग आपल्या वाट्याला आले असावेत. बरोबर आहे ताईचं. ज्यांंना आपण देव मानतो. त्या रामाला चौदा वर्ष वनवास झाला आणि क्रिष्णावर तर चोरीचा आरोप लागला. स्यमंतक मण्याच्या चोरीचा आरोप. जिथे चंद्र सुर्यालाही ग्रहण लागतं, तिथं आपण तर माणसं आहोत. मला हिंमत बांधावीच लागेल. मग कितीही भडवे येवू दे.
सुशिलाचा विचार बरोबर होता. ती आता वेश्या बनणार होती. त्यासाठी तिला तिच्या मनाची तयारी करणं भाग होतं. त्यासाठी तिनं केलेला विचार रास्त होता. ती विचारच करीत होती. तशी तिला ती पुरातन काळातील देवदासी प्रथा आठवली.
(खालील माहिती मी त्या लेखकाची क्षमा मागून आधार म्हणून घेत आहे.)
देवदासी.......देवतेला वाहिलेली मुलगी. कर्नाटक, महाराष्ट्रात आता देवदासी प्रथा बंद झालेली आहे. देवदासी म्हणजे देवतेला वाहिलेली मुलगी. एखाद्या देवतेला वाहिलेली मुलगी. पुर्वी काही लोक अपत्यप्राप्ती करिता किंवा अपत्य जगण्याकरिता पहिले मूल देवाला वाहण्याचा नवस करीत. त्यानुसार ते लोक त्यांना पहिले मुल झाल्यास त्यांच्या भावभावनांचा विचार न करता किंवा त्यांचे मत विचारात न घेता त्यांना मंदिरात दान करीत. त्यात मग मुलगी असली तर तिचा विवाह हा देवांशी लावून देत. त्यानंतर ह्या मुलीचे लैंगिक शोषण मंदिरातील पुजारी वा गावातील श्रीमंत माणसं करीत. हा एक प्रकारचा वेश्याव्यवसायच असे.
प्राचीन भारतात पूजेच्या वेळी देवतेला फुले, धूप, धान्य, शिजविलेले अन्न, पेय इ. अर्पण करण्यात येई. ईश्वराने भौतिक सुखांचाही उपभोग घ्यावा, असेही मानले जाई. म्हणून देवतेसमोर नृत्य करण्याकरिता व गाणे म्हणण्याकरिता त्याचप्रमाणे देवतेकरिता होणाऱ्या समारंभात भाग घेण्याकरिता सुंदर मुली ईश्वराला अर्पिल्या जात. पुराणांनी या दृष्टिकोणास पुष्टी दिली. देवाची पत्नी म्हणून मुलींना दान देण्यात येई. काळाच्या ओघात पुजाऱ्यांनी त्यांचा आपल्या विषयोपभोगाकरिता उपयोग केला. जुन्या ग्रीक लोकांतही त्याचप्रमाणे बॅबिलोनियातील ईस्टर मंदिरातही अशीच प्रथा असलेली दिसून येते. हे इतिहास सांगतो. बॅबिलोनियातील प्रत्येक स्त्रीने एकदा तरी ॲफ्रोडाइटीच्या मंदिरात प्रथम चांदीचे नाणे देणाऱ्या पुरुषाशी मंदिराबाहेर जाऊन संग करून त्यास तृप्त केले म्हणजे देवी प्रसन्न होते, अशी त्यांची समजूत असल्याचे हिरॉडोटसचे म्हणणे होते.
मुख्य म्हणजे मंदिरात सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळी नृत्य करणे वा गाणे म्हणणे, त्याचप्रमाणे सर्व सार्वजनीक समारंभांत भाग घेणे, ही देवदासींची अधिकृत कर्तव्ये होती. त्यांना विवाहसमारंभाच्या वेळी व इतर धार्मिक कौटुंबिक मेळाव्यास बोलावण्यात येई. त्या काळात वाचन, नृत्य व गाणे शिकण्याचा विशेष अधिकार असणाऱ्या ह्याच एकमेव स्त्रिया होत्या. देवदासींना मंदिराकडून ठराविक रक्कम मिळे. केव्हा केव्हा मंदिराशी संलग्न असलेली जमीन देवदासींना उदरनिर्वाहाकरिता देण्यात येई. देवदासीच्या मुलीला आईकडून वारसा मिळे आणि तीसुद्धा देवदासी बने, तर मुलगा मंदिराचा गवई वा वादक बने. मंदिराच्या नृत्यांगना अत्यंत लावण्यपूर्ण असत. त्या सुगंधी द्रव्य वापरत, सुंदर पोशाख आणि सुवासिक फुलांनी सुशोभित असलेली केशभूषा करीत, रत्नांचे व सोन्याचे दागिने वापरीत व पुरुषवर्गास कुशलतेने आकर्षीत करीत. परंतू ज्यावेळी त्या वेश्या बनल्या, त्यावेळी त्यांची प्रतिष्ठा घसरली. सामान्यपणे देवदासींना विवाह करण्यास परवानगी नव्हती.
दक्षीण भारतात नवव्या दहाव्या शतकांत मंदिरे उभारण्याचे कार्य चालू होते. त्या काळात पुष्कळशा देवदासींना भरती करण्यात आले. त्यांना मूर्तीला चामराने वारा घालणे, कुंभारतीची पवित्र ज्योत नेणे तसेच मिरवणुकीच्या वेळी ईश्वरासमोर नृत्यगान करणे, अशा प्रकारची कामे करावी लागत. मदुरा, कांजीवरम व तंजावर येथील मंदिरांत अनेक देवदासी होत्या. त्या ठिकाणच्या मोठ्या मंदिरांच्या स्थायी दानातून त्यांना भत्ता मिळत असे. कर्नाटकात देवदासी ‘बसवी’ म्हणून ओळखली जायची. बसव्या म्हणून देवदासींना अर्पण करणे, विशेषतः लिंगायत व होलेया लोकांत प्रचारात होते. त्यांना वारांगना म्हणून राहावे लागत असे. लिंगायत बसव्यांना स्थलनामाव्यतिरिक्त आडनाव नसे. बसवेश्वर व मल्लिकार्जुन हे त्यांचे देव होते. त्यांची मुख्य कामे जातीच्या बैठकीला, विवाहाला आणि इतर समारंभांना उपस्थीत राहणे, धार्मीक विधी आचरण्यात स्त्रियांना मदत करणे व वधूवरांना आरती ओवाळणे अशा प्रकारची होती. बसव्यांना आपल्या मातापित्यांकडून धनाचा वारसा मिळे. कर्नाटकात बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथे दर पौर्णिमेला देवदासींची जत्रा भरत असे. त्यात माघी पौर्णिमेला मोठी जत्रा भरत असे. ज्या पौर्णीमेला रांड पुनव असंही म्हणत असत. जत्रेत यल्लमा देवतेला मुली वाहण्याची प्रथा पूर्वापार चालत आली होती. या देवदासींना ‘जोगतिणी ’ म्हणत. केस गुंतल्यावर म्हणजे ‘जट’ आल्यावर तो देवीचा कोप मानून ती मुलगी देवीला वाहण्यात येई. या जोगतिणी गळ्यात मण्यांच्या किंवा कवड्यांच्या माळा घालत, डोक्यावर ‘जग’ देवीचा पितळी मुखवटा ठेवलेली परडी वाहून नेत व कपाळावर भंडारा लावत. चोंडक, टाळ व तुणतुणे यांच्या साथीने त्या देवतेच्या स्तुतीपर गाणी गात. त्या देवदासी उपजीविकेकरिता जोगवा मागत. काळाच्या ओघात बहुतेक जोगतिणींना वेश्याव्यवसाय पत्करणे भाग पडले. तो त्यांच्यावर समाजाकडून लादला गेला, असे दिसून येते.
महाराष्ट्रामध्ये खंडोबाला मुरळी म्हणून मुली वाहिल्या जात. पुरुष वाघ्या म्हणून ओळखले जात. मुरळी नाचते, तर वाघ्या गाणे गातो व तुणतुणे वाजवतो. असे म्हणत. ते जागरणाचा विधी करत. तमाशा आणि ग्रामीण नाटके यांतही ते कामे करत. काही मुरळ्याही वेश्याजीवन पत करतात.
कदंब अंमलात गोव्यात मंदिरे बांधण्यास सुरुवात झाली. अशा तऱ्हेने बौद्ध काळापासून गोव्यात देवदासी होत्या. सुरुवातीला देवदासी ईश्वरस्तुतीपर गाणे गात, उपवास करीत आणि ईश्वराच्या वार्षीक समारंभाच्या वेळी फक्त भाग घेत. परंतु हळूहळू त्या नृत्य करणाऱ्या व गाणाऱ्या मुली बनल्या. त्या फक्त धार्मीक समारंभातच भाग घेत नसत, तर सामाजीक समारंभातही भाग घेत. राजमहालाशीही त्यांचा नर्तकी म्हणून संबंध असे. देवदासी अर्पण करण्याचा समारंभ ‘शेंस’ विधी म्हणून ओळखला जाई. शेंस विधी हा लग्नसमारंभासारखाच असे. फरक फक्त इतकाच होता की वर म्हणून पुरुषवेषातील मुलगी असे. केव्हा केव्हा लग्न हे एका तलवारीशी किंवा कट्यारीशी होत असे. काळाच्या ओघात त्या रखेल म्हणून राहात. त्यांना नृत्य गायनाचे विशेष शिक्षण देण्यात येत असे.
देवदासींचे तीन भाग होते. कलांवतिणी वा नायकिणी आणि भाविणी. पुरुष हे नाईक आणि देवली म्हणून ओळखले जात.
कलावंतिणी गायिका व नर्तकी असत. साधारणतः त्या रखेल्या म्हणून राहात. भाविणींपेक्षा त्यांचा दर्जा वरचा असे. भाविणी कमी शिकलेल्या असत व नृत्य–गायनात प्रवीण नसत. त्या मंदिरांची झाडलोट करीत, दिवे लावीत व ईश्वराच्या पूजेत भाग घेत. त्या पुष्कळदा वेश्याव्यवसाय करीत. महाराष्ट्र राज्यात रत्नागिरी जिल्ह्यातील सावंतवाडीमध्ये भाविणी आढळून येत. देवदासींना त्यांच्या उपजीविकेकरिता मंदिराची जमीन देत.
देवदासी प्रथा ही वाईट प्रथा होती. म्हणून ती देवदासी प्रथा बंद करण्याचा प्रथम प्रयत्न त्यावेळच्या म्हैसूर संस्थानाने १९१० साली एक कायदा करून केला. नंतर त्यावेळेच्या मुंबई प्रांताने १९३४ साली व मद्रास प्रांताने १९४७ साली अशाच प्रकारचे कायदे केले. १९७५ साली गडहिंग्लज येथे ‘म. फुले समता प्रतिष्ठान’ तर्फे देवदासी भगिनी परीषद भरविण्यात आली होती. निरनिराळ्या राज्यांनी देवतेला मुली वाहण्यास प्रतिबंध करणारे असे कायदे जरी केले असले, तरी देवदासी प्रथा पूर्णतः बंद झालेली नाही.
आज आपल्या देशात स्त्रिया सर्वच क्षेत्रात स्त्रिया ह्या पुरुषांच्या बरोबरीने प्रगती करत आहेत. एक महिलाही राष्ट्रपती होवून गेली. काही महिला चंद्रावर गेल्या तर काही महिला गिर्यारोहक बनल्या. परंतू आपल्या समाजातील स्त्रियांचा एक वर्ग असाही आहे ज्याला महिला सबलीकरण, स्त्री-पुरुष समानता, जागतिक महिला दिन हे शब्द तरी त्यांच्या परिचयाचे आहेत का ? हा प्रश्न पडतो तो वर्ग आहे देवदासी स्त्रियांचा.
प्राचीन काळापासून ते आजतागायत मुलींना देवदासी केले जाते. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात या प्रथेचे प्राबल्य जास्त दिसते. आजही चौदा पंधरा वर्षाच्या मुली देवदासी बनून परडी घेऊन, भीक मागून आपला उदरनिर्वाह करताना दिसतात. रेणुका देवीला देवदासी व खंडोबा देवाला मुरळ्या वाहिल्या जातात. मुला मुलींच्या केसांमध्ये न विंचरल्यामुळे गुंता होऊन जट धरली जाते. मुलां मुलींना इसब, खरुज, नायटे यासारखे त्वचेचे रोग होणे, मूल न होणे, मूल न जगणे, घराण्याची परंपरा टिकविणे आणि देवीचा नवस फेडणे अशा विविध कारणांमुळे अज्ञानी धर्मभोळे लोक आपल्या मुलींना देवदासी किंवा मुरळ्या बनवतात. देवदासी प्रथेतील लिंब नेसणे, परड्या भरणे, जोगवा मागणे या अनिष्ट प्रथांनी मन विषण्ण होऊन जातं. आजच्या ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात समाजातील या अंधश्रद्धेने स्त्रियांची अब्रूच वेशीवर टांगली आहे. कारण देवदासीची दिक्षा दिल्यानंतर त्या मुलीचा उपभोग घेण्यासाठी गावातील प्रतिष्ठित धनिकांमध्ये चढाओढ लागते. ते तिला भरपूर पैसे देऊन तिचा मनमुरादपणे उपभोग घेतात. इथूनच तिच्या कुजकट आयुष्याची सुरुवात होते आणि कालांतराने गलिच्छ दरीत दूर लोटून देते ती परत कधीही वर न येण्यासाठी. देवदासी स्त्रीचे देवाशी लग्न लागल्यामुळे ती मर्त्य नव-याच्या जबाबदारीतून मुक्त झालेली असते. शेवटी पोट भरण्यासाठी वेश्या व्यवसाय करणं तिच्या नशिबी येतं.
देवदासी प्रथेविरुद्ध अनेक समाजसुधारकांनी आजपर्यंत अनेकवेळा आवाज उठविला याचे मुख्य कारण म्हणजे या अनिष्ट प्रथेमुळे वेश्या व्यवसायाला खतपाणी मिळाले व तो व्यवसाय वाढीस लागला.
देवदासी प्रथेमध्ये मुलीला वयात येण्यापूर्वी देवाला सोडून कोवळ्या वयातच त्यांचे भवितव्य ठरविले जाते. तेही तिच्या जन्मदात्याकडूनच. विशेष म्हणजे ही प्रथा समाजातील खालच्या वर्गात अजूनही सुरुच आहे. ज्या ठिकाणी अशिक्षितपणा आहे, त्या ठिकाणी त्याचे प्राबल्य जास्त जाणवते. या प्रथेत बळी पडलेल्या स्त्रियांमध्ये गरीब आणि दलितांचे प्रमाण अधिक आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांच्या सीमाभागातील देवदासींची संख्या फार मोठी आहे. देवदासी ही देवाची स्त्री मानली जाते. त्यामुळे तिला अनिच्छेने का होईना, पण देवधर्माच्या नावावर काही अनिष्ट प्रथा आणि उत्सव साजरे करावे लागतात. दारिद्र्यात आणि अज्ञानाच्या अंधःकारात पिचणा-या अस्पृश्य देवदासी कोणतीही तक्रार न करता उत्सवात भाग घेतात. त्याबद्दल त्यांना मिळणारी साडीचोळी, नारळसुपारी यातच त्या समाधान मानतात. मागासलेल्या समाजात कालपर्यंत देवदासी प्रथा अस्तित्वात होती आणि आहे. विसाव्या शतकात त्याविरुद्ध अनेक लढे झाले, चळवळी झाल्या तरी तिचे समूळ उच्चाटन झालेले नाही. सुरुवातीच्या काळातील स्वरुप जरी बदललेले असले तरी मूळ प्रथेशी निगडित जे उत्सव अथवा प्रथा आणि परंपरा आहेत, त्या तशाच आहेत. देवांच्या सेवेसाठी सोडलेली देवदासी परिस्थितीच्या फे-यात सापडून जेव्हा भोगदासी बनली, तेव्हा समाजानं लादलेलं तिच शापित जीवन तिला कळत गेलं. स्वतःचं पोट भरण्यासाठी देहाचा बाजार मांडल्याशिवाय तिला दुसरा पर्याय उरत नसल्याने ती वेश्या बनली. या प्रथेस नंतर धार्मीक आणि सामाजीक मान्यता दिलेली असल्याने या प्रथेत विकृती शिरल्याचे दिसत होते. त्यानंतर अनेक कायदे करूनही ही प्रथा संपलेली नव्हती. बहुसंख्य देवदासींना या प्रथेतून मुक्त होण्याची तीव्र इच्छा होती. आपल्यावर आलेला प्रसंग आपल्या मुलां-मुलींवर येऊ नये यासाठी त्यांची धडपड चाललेली होती. कारण कोणतीही आई वा बाप आजच्या काळात आपल्या मुलींना वेश्या बनवू पाहात नाही. मात्र त्यांच्या जागृतीच्या प्रमाणात उपाययोजनांचा अभाव कटाक्षाने आढळतो. म्हणूनच देवदासी प्रथा निर्मूलनाच्या व पुनर्वसनाच्या बाबतीत राष्ट्रीय स्वरुपाच्या कायद्याची गरज आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये देवदासींचे प्रमाण जास्त असल्यामुळे आजदेखील या भागात ब-याच देवदासी डोक्यावर रेणुका देवीचा जग व हातात यल्लमाची परडी घेऊन जोगवा मागताना दिसतात. म्हणून त्यांचे पुनर्वसन करणे हे अत्यंत गरजेचे आहे. त्यांच्या मुलांसाठी ठिकठिकाणी वसतीगृह चालविली जात असली तरी किती मुलं याचा फायदा घेतात हा एक संशोधनाचाच विषय ठरू शकेल.
मनात खोलवर रुजलेल्या धार्मिक श्रद्धांना बदलत्या परिस्थितीनुसार मूठमाती दिली पाहिजे आणि एकवटून संघर्षही केला पाहिजे. स्वतःच्या फायद्यासाठी अबलांच्या शरीराची नासाडी करणारे नराधम याच समाजात आहेत. म्हणून स्वतःचं आयुष्य कसं असावं याचा थोडा जरी डोळसपणे विचार केला तर काही अंशी का होईना पण या जीवघेण्या प्रथेस आळा बसू शकेल. आज ठिकठिकाणी संघर्ष होत आहेत. पण कडक कायद्याचीही तितकीच गरज आहे. एकूणच शासनाची आणि समाजाची उदासीनताही याला कारणीभूत आहे. त्यांचा निवारा, त्यांच्या मुलांचे शिक्षण, त्यांना आवश्यक असणा-या वैद्यकीय सुविधा, उदरनिर्वाहाच्या किमान गरजा तरी पूर्ण व्हायला हव्यात. एक माणूस म्हणून जगण्याचा हक्क त्यांना या जन्मात जरी मिळाला तरी खूप काही त्यांनी मिळवलंय असं म्हणता येईल. एकूणच देवदासी स्त्रियांच्या उन्नतीची चळवळ आज एकाकी अवस्थेत आहे. राज्यकर्त्यांमधील बदलते धोरण, लहान वयातच घरच्यांनीच लादलेले उपेक्षेचे जीवन, सतत पत्करावी लागणारी लाचारी, इच्छा असो वा नसो सतत देहावर होणारे अत्याचार हे सर्व निमूटपणे सहन करावं लागतं. आजच्या या आधुनिक युगातही स्त्रीला भोगाव्या लागणा-या या यातनांची समाजानं थोडीतरी दखल घ्यायला हवी. त्यांना मिळणा-या सुविधांचा अभाव, अर्थ सहाय्यास होणारा विलंब आणि स्वतःच्या देहाची भूक भागविण्यासाठी सहज उपलब्ध होणारा स्त्रीचा देह, सामाजीक विकृती बळकट करणा-या या प्रथा जशा समाजाला घातक ठरतात तशाच त्या स्त्रियांच्या दुरवस्थेलाही कारणीभूत ठरतात.
मनुष्यास असल्या विकृत जुनी परपंरा व रुढी नको आहेत. इथला बहुसंख्य वर्ग जातीच्या तळाशी विकलांग होऊन रुतला आहे. माणसांना देवत्व देऊन धर्माची पद्धत रूढ झाली. बहुसंख्य समाज धर्माच्या नांवाने दारोदार पोटासाठी वणवण भटकणारा भिकारी झाला. तो देवदासी, पोतराज, वाघ्या, मुरळी झाला. बहुसंख्य वर्गाची सामाजीक प्रतिष्ठा लयास जाऊन बहुसंख्यसमूह उद्ध्वस्त झाला.
देवदासी प्रथेवर कायद्याने बंदी असली तरी भारतात आजही मोठ्या प्रमाणावर ही प्रथा सुरू असल्याचे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने एका अहवालात म्हटले आहे. आजही गुरूच्या सांगण्यावरून अनुसूचीत जातीतील गरीब लोक आपल्या मुलींना देवाच्या भीतीपोटी देवदासी प्रथेत ढकलतात, असे या अहवालात म्हटले आहे.
आजही जास्त गाजावाजा न करता, एखाद्या गुरूच्या घरी किंवा लहान देवळात हा विधी उरकण्यात येतो. अत्यंत गरीबी आणि धर्माचे बंधन यामुळे देवदासी बनूनही पैसा कमविण्याची एक संधी या गरीबांना मिळते. देवदासी या ' ईश्वरी ' नावाखाली बहुतेक मुलींना 'शरीरविक्रयाचा धंदा' करायला सांगितलं जातं.
महत्वपूर्ण गोष्ट ही की कोणाच्या सडक्या मेंदूतून ही कल्पना आली असेल ते माहित नाही पण ही प्रथा आपल्या समाजात असणे म्हणजे माणूस म्हणून जगायच्या आपण लायकीचे नाही हेच पदोपदी दर्शवते. यासारखे बरेच व्यवसाय देवाच्या नांवाखाली चालवून अशिक्षीत, गरीब लोकांना पैश्यांची भुलावण देऊन जे असे कर्म करीत आहेत, त्यांना तर खरंच जबर शिक्षा मिळायला हवी. आधीच कलियुगात धर्म दुबळा झालेला, त्यात बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर असे आग्रह, आजकालच्या काळातील प्रगतीमुळे देवाधर्माच्या गोष्टींना वेळ नाही, वेळ नाही तर किंमत नाही, त्यांत भरीस भर म्हणून अशा ज्या घाणेरड्या प्रथा आहेत त्या खरोखरीच लज्जास्पद आहेत. असमर्थ वर्गाच्या लोकांना अशी प्रलोभने देऊन, बळाने वा पैशाच्या जोरावर जो अधर्म आपल्याच शारीरिक भुकेच्या समाधानासाठी त्यांचा गळा घोटून केला जातो तो योग्य नाही. त्यांना बिचार्‍यांना धड मरता पण येत नाही. तेव्हा त्यांना अशी काही शिक्षा झाली पाहिजे की एक इतिहास घडेल पूर्ण जगासाठी जे एक उदाहरण म्हणूनही समोर येईल. याच धाग्यातील 'देवदासी' नामक वेश्या व्यवसायाच्या जोडिनेच, धर्माधारीत "लव्ह जिहादाद्वारे" मुलींना फसवून धर्मांतर करविणे व नंतर त्या मुलींना आपल्या परिवारातील एक रखेल अशा पद्धतीने वागवणे वा तीन वेळेस तलाक म्हणून वार्‍यावर सोडणे वा केवळ संख्यावाढीकरता व प्रजननाकरता उपयोग करणे, तसेच तरुण नवतरुणी मुलींना फसवून एका राज्यातून दुसर्‍या टोकाच्या राज्यात नेऊन विकून वेश्याव्यवसायाला लावण्याच्या बाबीवर देखील उपाय योजना यायला हव्यात. आज देवदासी प्रथा बंद झाल्या आहेत. काही ठिकाणी तुरळकपणे लपून छपून सुरु आहेत या प्रथा आजही. आजही गावोगावच्या वेश्यावस्त्या या अशाच फसवून पळवून आणलेल्या मुलींनी भरलेल्या आहेत. हे गेली साठ वर्षे डोळ्यावर झापडे लावून बसलेल्या सत्ताधार्‍यांना कळत नाही की त्याबद्दल त्यांना काही करायचेच नाही हे उमगत नाही. आजवर कधीही या वेश्यांच्या पुनर्वसनाबाबत काही ठोस उपाय केले गेले नाही. नाही त्या वेश्यावस्तीच्या गिर्‍हाईकांवर काही कारवाई झाली. खरं तर खरी जागृती त्या समाजाची झाली पाहिजे, ज्या समाजात या प्रथा चालू आहेत. वेश्या व्यवसाय तर पुर्णतः बंद करायला हवा. कारण त्यासाठी आज जास्तीत जास्त मुलींचं अपहरण होत आहे.
देवदासी प्रथा ही मुळात सर्वप्रथम बंद केली, ती म्हणजे मुथूलक्ष्मी रेड्डी या महिलेने. तिचा जन्म ३० जुलै १८८६ ला तामिळनाडूच्या पुड्डकोट्टई इथं झाला. तिचे वडील नारायण स्वामी अय्यर महाराजा महाविद्यालयात प्राध्यापक होते. तिची आई चंद्रामाईी ही देवदासी समुहातील होती.
ती फक्त दहावी शिकली. त्यापुर्वी ती महिला असल्यानं तिला शिकवलं जाणार नव्हतं. परंंतू तेथील महाराजांच्या कृपेनं तिला पुढील शिक्षण शिकता आलं.
मुथूलक्ष्मी अय्यर ही पहिली महिला की जिनं बालविवाह प्रथा, देवदासी प्रथा, वेश्या व्यवसाय प्रथा...... या सर्व प्रथा बंद करण्याचा निर्णय तामिळनाडूमध्ये घेतला. ज्यावेळी तिला १९२६ ला एका नामांकीत परिषदेवर घेतलं गेलं. त्या परिषदेत तिनं विचार मांडला की एखाद्या स्रिला सतीप्रथेत फक्त एकाच वेळी वेदना होतात. परंतू बालविवाहात तिला आयुष्यभर वेदना होत असतात. तशीच वेदना देवदासी प्रथेतही होत असते. देवदासी प्रथा ही सतीप्रथेपेक्षाही महाभयंकर प्रथा आहे आणि त्याहीपेेेक्षा महाभयंकर प्रथा म्हणजे वेश्याव्यवसाय.
देवदासी प्रथा काय आहे? असा जर प्रश्न केला तर आपल्या सहज लक्षात येते की देवदासी प्रथा हीच वेश्याप्रथा होय. तसेच अशिक्षित अडाणी लोकांचे धर्म आणि आध्यात्माविषयी घोर अज्ञान आणि त्यामुळे प्राप्त झालेली बौद्धीक दिवाळखोरी आणि तथाकथीत शिक्षीत आणि आर्थीकदृष्ट्या सबळ लोकांची ऐयाशी याचा एकत्रित परिणाम म्हणजे देवदासी प्रथा.
अमुक गोष्ट घडली तर माझी पोटची मुलगी देवाला वाहीन. खरेतर वाहून टाकीन असा शब्द द्यायचा आणि ती गोष्ट घडली की देवानेच इच्छा पूर्ण केली असे समजून ती पोटची मुलगी वाहून टाकायची आणि तिला समाजाच्या गर्तेत वेदनेत लोटवून कृतकृत्य व्हायचे. नंतर परस्त्री मातेसमान असते असे सांगणारा आपला दांभीक समाज मग त्या लाचार स्त्रीचा गैरफायदा घेणार आणि त्यातून तिला मातृत्व प्राप्त झालेच तर कदाचीत अजून एक मुलगी ह्याच दुष्टचक्रात अडकणार. ऐयाश समाजाला ह्या निराधार स्त्रिया म्हणजे एक उपभोगाची वस्तू वाटायच्या. त्यामुळे एक ठरावीक वय झाले की या देवदासींचे आयुष्य अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायक होणार हे ओघाने आलेच. हीच देवदासी प्रथा.
देवदासी प्रथा हिंदू धर्मामध्ये आहे का? अशी प्रथा पूर्ण भारतभर पसरलेल्या हिंदुधर्मात सर्वत्र आहे का? उपलब्ध माहिती अनुसार, हिंदू धर्म शास्त्रांमध्ये कुठेही देवदासी परंपरेचा उल्लेख नाही. देवदासी परंपरेची नेमकी सुरुवात कधी झाली हे थोडं अस्पष्ट आहे.
साधारणतः महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा, तामिळनाडू, गुजरात या ठिकाणी ही प्रथा अस्तीत्वात होती. तसेच ओडिशा राज्यात देवदासींना जगन्नाथ मंदीर परिसराचे महारी म्हणून ओळखले जात असे. महारी म्हणजे महान नारी म्हणजेच देवाशी संबंधीत स्त्री. इसवी सन पूर्व पाचशे मध्ये प्रथम देवदासी, आम्रपालीचा उल्लेख वैशाली राज्यात नगरवधू म्हणून केला गेला. मंदिरांमध्ये महिला कलाकारांची परंपरा इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात विकसीत झाल्याचे सांगितले जाते. अशा नृत्यांगनांचा संदर्भ गुप्त साम्राज्याचा शासनकाळात दिसतो.
सतिप्रथाही वाईटच होती. परंतू रामायण कालखंडात त्या प्रथेचे संदर्भ सापडत नाहीत. रामायणात दशरथ राजाचा मृत्यू झाला तेव्हा एकही पत्नी सती गेली नाही. रामायणात सती प्रथा सापडत नाही. एक सती प्रथा खासकरून राजस्थान सारख्या सीमावर्ती भागातच जास्त करून दिसायची. त्याला कारण हे होते की त्या भागात विदेशी आक्रमणे खूप जास्त प्रमाणात झालेली होती. त्यामुळे तेथील समाजव्यवस्था व सामाजीक जीवन पार ढासळले. विकृत टोळक्यांनी वारंवार आक्रमण करून ही प्रथा जन्माला घातली. शत्रू वीर लढून मेला तरी त्याला यथोचीत सन्मान मृत्यूनंतर देणे. ही भारतीय संस्कृती होती. परंतू विकृत वाळवंटी टोळकी आक्रमण व त्यांची हिंस्रता पशू सुद्धा असे नीच कृत्य करत नाही असे काम ह्या प्रथेने दिसले.

***********************************************

भाग दुसरा

सुशिला विचार करीत असतांना तिला आठवलं की ही देवदासी प्रथा वेश्येप्रथेसारखीच होती. यातही मुलींना पळवून आणून जबरदस्तीनं यातही एका मुलीला वेश्या बनवलं जातं आणि देवदासीतही तसंच वेश्या बनविण्याचं षडयंत्र रचलं जातं. परंतू या वेश्येप्रथेत मायबापांचा दोष नसतो. कारण त्यांना माहीतही नसतं की माझ्या मुलीला वेश्याव्यवसायाला लावलंय. परंतू या देवदासी प्रथेमध्ये तिला मायबापच देेवाच्या नावानं झोकून देतात. म्हणतात की तिचा देवाशी विवाह करायचा.
देवदासीबद्दलच्या गोष्टी तिनं बरेचदा वर्तमानपत्रात वाचल्या होत्या. तशाच पुस्तकातही. परंतू त्या गोष्टी तिला वेश्या बनण्यापासून रोखू शकत नव्हत्या.
अंजली तेेथून निघून गेली होती. तिनं सुशिला अगदी स्वस्थ झाल्याची माहिती त्या वेश्यालय चालविणा-या मोरक्याला दिली. तसा तो परत तिलाच घेवून सुशिलाच्या कम-यामध्ये आला. ज्या कम-यात ती होती. तो मोरक्या उंच धिप्पाड होता. त्याचा चेहराही फुगवट होता. तसंच त्याला पाहतांना तो शैतानच वाटत होता.
तो शैतानच होता. कारण त्यानं कित्येक मुलींना त्यांच्या भावना विचारात न घेता वेश्या बनवले होते. त्याला पाहताच अतीशय भिती वाटत होती.
तो मोरक्या सुशिलाच्या कम-याजवळ आला. तसा आतमध्येही. त्यानं सुशिलाला डोळे भरुन पाहिलं. तसे त्याच्या तोंडून शब्द निघाले. 'क्या माल है.' ते शब्द ऐकताच सुशिलाला सुन्न वाटलं. तिनं आपली नजर खाली टाकली. तसा तो म्हणाला,
"अंजली, इसे आजही और अभी तयार करो, ये माल उपरवालेने मेरे लिए ही बनाया है, मै थोडी देर में आता हूँ"
त्याचे ते शब्द. तो गेला व त्यानं अंजलीला तिथेच थांबून तिला तयार करायला लावलं.
अंजली थांंबली होती. ती तिला वेश्या बनविण्यासाठी तयार करीत होती. तिचं मन तर तिनं केव्हाच तयार केलं होतं. आता उरला होता पोशाख. तोही ती तयार करणार होती. त्यासाठी तिनं आपल्यासोबत श्रृंगारपेटी व साडी आणली होती. तशी ती तिला तयार करायला लागली.
अंजलीनं तिला साडी नेसवली. तशी सुशिला म्हणाली,
"ताई, पहिल्या वेळी माझा सौदा अशा माणसाशी केला जाईल का जो मला पसंत नसेल."
"होय. या वेश्यापणाच्या धंद्यात आपल्याला पसंत असो वा नसो. आपल्याला नाईलाजानं त्याचेशी सौदा करावाच लागतो आणि हं, एक सांगायचं विसरले मी. पहिल्याच वेळी या वेश्यालयात येणा-या प्रत्येकीला हा आता आला होता ना. त्याचेशीच सौदा करावा लागतो."
"हा असा. अक्राळ विक्राळ. कोणालाही न आवडणारा. याचेशी संबंध बनवावे लागतात तर. छी! अगं ताई, तो तर असा वाटत होता की ज्यानं बरेच दिवस आंघोळ केलेली नसेल."
"आपल्याला काय करायचं त्याचं. आपल्याला कुठं घर बसवायचं असतं कुणाशी. आपल्यासाठी हा सौदा असतो आणि आपल्याला फक्त एका तासासाठीच हा सौदा करावा लागतो."
"परंतू ताई, मी त्या अक्राळ विक्राळ दिसणा-या माणसाला पेलवू शकेल का?"
"होय. अगदी सहज. हळूहळू त्याचा सराव होईल तुला."
सुशिला चूप बसली. तशी तिला अंजलीनं पुर्ण साडी घालून दिली होती. आता ती तिचा मेकअप करुन देत होती. थोड्या वेळानं ती सजली व ती एखाद्या नववधूसारखी दिसू लागली होती.
अंजलीनं तिला पाहिलं. तशी ती म्हणाली,
"सुशिला, तू अगदी नववधूसारखी दिसतेस. थांब मी तुला काजळ लावून देते. कदाचीत तुला कुुणाची दृष्ट लागू नये म्हणून."
असं म्हणत तिनं तिला काजळाची एक तीट लावून दिली, त्याचबरोबर ती म्हणाली,
"हे मी आज सजवून दिलं तुला. दररोज तूलाच सजावं लागेल स्वतः असंच नववधूसारखं. कारण आजचेे या वेश्यालयात येणारे गि-हाईक चवणेबाज असून इथे मेकअपला जास्त महत्व आहे."
अंजलीचं बोलणं होताच सुशिलानं होकारार्थी मान हलवली व ती चूप बसली विचार करीत. 'तो नराधम. धिप्पाड देहाचा. अगदी अफजलखान वाटावा तसा आणि मी लहानशी. जशी हत्तीसमोर मुंगी. कशी सामना करु शकेल त्या धिप्पाड देहाच्या माणसाचा. परंतू जावू दे. आपले भोगच. नशिबाचे भोगच समजून चालायचं आता. आता यातून सुटका नाही.'
आज सुशिलाचे हातपाय सोडले होते. तिला साडीत तयार केलं होतं. सुशिला ही बारीक बांध्याची होती. साडी घालताच ती नववधूसारखी दिसत होती. तशीच ती अधीक सुंदरही दिसत होती. तिचा मेकअप असा केला होता की तिला पाहतांना कोणाचंही मन फिसलून जाईल. तसं तिला पाहताच अंजली म्हणाली,
"सुशिला, तूला मी तयार केले आहे. आता तू परिपुर्ण तयार झाली आहेस."
सुशिलाला अंजली म्हणाली. तशी सुशिला काय बोलायचं ती न बोलता चूप बसली. त्यानंतर अंजली तेथून चालती झाली.
अंजली गेली होती. तशी सुशिला पलंगावर नववधूसारखी बसली होती. तसा थोड्याच वेळाचा अवकाश. तो नराधम धिप्पाड देहाचा त्या वेश्यालयाचा मोरक्या त्या कम-यात आला. त्यानं कम-याचा दरवाजा लावला. तशी सुशिला घाबरली. परंतू तिला अंजली आठवली. ती म्हणाली होती की घाबरायचं नाही कोणत्याही प्रसंगाला. त्यानुसार ती दाखवणार नव्हती तो प्रसंग की ती घाबरलेेली आहे.
तो मोरक्या आतमध्ये आला. तसा तो तिच्याजवळ गेला. ती पदर घेवून एखाद्या नववधूसारखी बसली होती. त्यानं तिचा पल्लू उचलला. तशी ती आणखीनच घाबरली. त्याचा धिप्पाड देह पाहून. त्यानं तिचा पल्लू उचलताच तिला त्याची दुर्गंधी जाणवायला लागली. परंतू तिला परत अंजली आठवली आणि त्या अंजलीचे ते शब्द. ती म्हणाली होती की हे नशिबाचे भोग आहेत. जे भोगावेच लागतील. तुला वेगवेगळ्या त-हेची माणसं पाहायला मिळतील या जीवनात. सगळं सहन करावं लागेल तुला.
ते अंजलीचे बोल तिला भरपूर हिंमत देवून गेले. ते बोल तिला बळ देवून गेले त्या वेश्यापणाच्या जीवनात पदार्पण करण्यासाठी. ते वेश्यापण तिला झिडकारत होते. परंतू आज तिच्यासमोर काहीही उपाय नसल्यानं सगळं सहन करावं लागणार होतं.
तो मोरक्या जवळ आला. त्यानं डोक्यावरील पडदा दूर सारला. त्याचबरोबर तिच्या शरीराचे लचके तोडण्यासाठी तो सज्ज झाला. ती अख्खी रात्र त्याची लचके तोडण्यातच गेली होती. त्याला तिचे लचके तोडतांना मजा येत होती. परंतू तिचा मात्र जीव जात होता तीळ तीळ. भयंकर वेदना होेत होत्या. ती तडपत होती वेदनेने. तिला वाटत होतं की केव्हा रात्र संपते आणि केव्हा नाही. तसा पक्षांचा किलबील आवाज कानी आला व थोडं हायसं वाटलं. तशी सकाळ झाली व सकाळ होताच त्यानं तिला आपल्या बाहूपाशातून सोडलं. त्यानंतर तो निघून गेला. त्यानंं तिला त्याच्या बाहूपाशातून सोडताच तिला स्वतंत्र्य झाल्यासारखं वाटत होतं.
तो निघून गेला होता. तशी रात्रही संपली होती. त्यातच ती रात्र संपताच तिला हायसंही वाटत होतं. त्याचबरोबर स्वतंत्र्य झाल्यासारखंही. परंतू अंंग सारखं दुखत होतं. त्या नराधमानं काहीही विचार न करता त्या कोवळ्या कळीला कुस्करलं होतं. आता ती खरीखुरी वेश्या बनली होती.
तो निघून गेल्यानंतर ती त्याच अंथरुणात काही वेळ रडत बसली. आपल्या प्रारब्धावर रडत होती ती. तशी तिथं अंजली आली. तिनं तिचा अवतार पाहिला. तिला तिनं रडत असलेलं पाहिलं. तो अवतार पाहताच तिही व्यथीत झाली. परंतू तिला हिंमत देणं भाग होतं. नाहीतर ही सुशिला खचून जाईल असं तिला वाटत होतं. तशी ती म्हणाली,
"काय झालं सुशिला? कशी राहिली रात्र? मजा आली ना?"
अंजली बोलली खरी. परंतू तिनं तसं बोलताच सुशिला जास्त रडायला लागली. तसं अंजलीनं तिला जवळ घेतलं. म्हणाली,
"सुशिला, असंच होतं. थोड्याफार वेदना होणारच. त्यासाठी एवढं रडावं लागतं का? मला माहीत आहे. मिही जेव्हा पहिल्यांदा या वेश्यालयात आली होती ना. तेव्हा मलाही असंंच वाटलं होतं. परंतू मी ते सगळं सहन केलं. आज बघ मी कशी खंबीरपणे उभी आहे. सुशिला, आपलं प्रारब्धच असं. सगळं सहन करावं लागेल. मी मगाशीही सांगीतलं ना आणि आताही सांगते. तू समजून घे. पुस, डोळे पूस. उठ लवकर आणि हलक्या फुलक्या कामाला लाग. कारण तुला सायंकाळपर्यंत आणखी तयार व्हायचं आहे दुस-या नवीन गि-हाईकासाठी. कारण आता तू व्यावसायीक वेश्या बनलेली आहेस." असं म्हणत अंंजली तिचे डोळे पुसू लागली.
अंजलीनं डोळे पुसताच व तसं म्हणताच ती उठली. तिनं हातपाय धुुतले. तोंड धुतलं. तशी ती म्हणाली,
"ताई, हे रात्रीसारखंं मला नेहमीच करावं लागणार काय?"
"होय, नेहमीच करावंं लागणार रात्रीसारखं. परंतू घाबरु नकोस. तुलाही सवय होईल त्याची. माझ्यासारखीच. बघ मला आता काही वाटतेे का त्याचं. नाही ना. बघ कशी फिट आहे मी."
अंंजलीचं ते बोलणंं. ती चूप होती. तिच्या बोलण्यापुढं सुशिला काहीच बोलली नाही. परंतू ती एक शिकली होती की आता मुकाट्यानं सगळं सहन करायचं. कोणाला कोणतीही शिकायत करायची नाही. अंजलीलाही नाही.
तो दिवस गेला. रात्र झाली. तसा त्याच दिवशी त्याच रात्री सुशिलाचा त्या मोरक्यानं तिचा एका प्रसिद्ध उद्योगपत्यांशी सौदा केला. तोही जास्त किंमतीत. प्रचंड पैसा कमवला त्यानं. तसा तो मोरक्या तिच्या देहाचा दररोजच सौदा करीत होता आणि दररोजच तिची लक्तरं तोडली जात होती.
अंजली येत होती तिथं कधीकधी. दोघीही एकमेकांना आपआपले अनुभव सांगत होेते. एकमेकांच्या भावना व्यक्त करीत होत्या त्या दोघीही. त्या दोघीही त्या वेश्यालयात काम करीत होत्या. बदल्यात फक्त त्यांना दोन वेळचं जेवन मिळत होतं. ते जेवन चांगलं मिळायचं. जेवनात मांस, मटन व वाईनही मिळायची. त्या दोघींना कपडेही चांगले चांगले घालायला मिळायचे. परंतू पैसे........पैसे एक छदामही मिळत नव्हता त्यांना.
त्या दोघींना पैैसा मिळत नसला तरी त्या दोघीही आनंदात होत्या आज. एकमेकांच्या गोष्टी ऐकूून. परंतू त्यांच्या त्या आयुष्यात त्यांच्या आनंदाला कोणाची नजर लागली कुणास ठाऊक. आज सकाळची वेळ होती. अचानक एक व्यक्ती तिथं आला. म्हणाला,
"उद्या सुशिलाला तिच्या देशात पाठवायचं आहे. तिथं एका वेश्यालयात एक वेश्या अचानक मरण पावल्यानं तिची जागा खाली झाली आहे. तेव्हा तिथं जायचं असल्यानं अंजलीनं तयार राहायचं उद्या."
तो व्यक्ती असं म्हणून चालला गेला. त्यानंतर पुन्हा समस्या निर्माण झाली. कशीही सुशिला अंजलीसोबत खुश होती. त्यातच आता तिला बोलावणं आलं होतं दुस-या देशात. ती जोडी तुटणार होती.
सुशिलानं ते ऐकताच तिला अतिशय वाईट वाटलं. जी एक जोडीदार होती. तिही त्या लोकांनी तोडून टाकली होती. आता परत तिला पुन्हा दुःखाचे जीवन कापावे लागणार होते. तिला वाटत होतं की कशीही एक होती अंजली की ती आपल्याशी बोलत होती. मोठ्या बहिणीसारखी आधार देत होेती. परंतू आपण उद्या जाणार आपल्या देेशात. तिच्यापासून दूर होणार. याच चिंतेनं ती निराश झाली होती. ती रात्र त्या दोघींचीही निराशेतच गेली होती. रात्रभर झोप आली नाही. तसा दुसरा दिवस उजळला.
दुसरा दिवस उजळला. तसं ठरल्याप्रमाणंं सुशिलानं तयारी केली होती तिच्या देशात जाण्यासाठी. तिला आपल्या देशाची भुमी आता दिसेल, याचा आनंद होता मनात. तसेच अंजलीपासून दूर जाण्याचं दुःखंही होतं. तशी ती वेळ आली. तसा तो व्यक्ती आला. म्हणाला,
"हुकूम आहे की त्या देशात सुशिलाला नाही तर अंजलीला पाठवायचं आहे. तेव्हा अंजलीनं ताबडतोब तयार व्हावं."
तो व्यक्ती शब्द बोलून गेला होता. निर्णय एका क्षणात बदलला होता. जी खुशी होती, ती एका क्षणात पाणी पाणी झाली होती. पुर्ण आनंदावर विरजण पडलं होतं. आपल्या देशाला एवढ्या काळानंतर पाहायला मिळेल असं वाटलंं होतं तिला. तसं स्वप्न पाहिलं होतं तिनं . परंतू त्या स्वप्नावर आता पाणी फेरलं गेलं होतं.
ती निराश झाली होती पुन्हा एकदा. ती आता आपल्या प्रारब्धावर चिडली होती. असंही प्रारब्ध की ज्या प्रारब्धात उजेडच नाही. आपली इच्छा नसतांनाही आपल्याला वेश्या बनावं लागलं अन् आपली इच्छा नसतांनाही आपल्याला इथं राहावं लागत आहे. तिनं अंजलीचं नाव ऐकताच ती आपल्या कम-यात गेली व आपल्याच प्रारब्धावर विचार करता करता ती रडू लागली. आता मात्र तिथं तिचे अश्रू पुसणारे कोणीही नव्हते. अंजलीही नव्हती तिथं.
अंजलीनं तिचं नाव ऐकताच ती लगबगीनं आतमध्ये गेली. लगबगीनं तिनं तयारी केली. ती लगबगीनं तयार झाली. तशी ती तयार होताच सुशिलाच्या कम-यात गेली. तिनं पाहीलं की सुशिला रडत आहे आपल्या कम-यात. तशी ती म्हणाली,
"सुशिला, का रडत आहेस तू? अगं मी जात आहे म्हणून रडतेस का? मला आपला देश पाहायला मिळणार. तुला नाही म्हणून रडत आहेस का? का मला आनंद व्हायला नको, तुलाच आनंद व्हावा असं तुला वाटतंय का? का मी जावू नये, तूच जावे असं तुला वाटतंय का?"
सुशिलानं अंजलीचं ते बोलणं ऐकलं. तशी ती म्हणाली,
"ताई, तसं काही नाही माझ्या मनात. माझ्या मनात तुझ्याबद्दल तसं काही नाही. मला आनंदच आहे. तुला देश पाहायला मिळणार याचा. हं, दुःख याचं आहे की मलाही जर आपला देश पाहायला मिळाला असता तर बरे झाले असते. म्हणूनच मी रडत आहे."
"उठ रडू नकोस. मी निरोप घ्यायला आली आहे. मला अतीशय आनंदानं निरोप दे. घाबरु नकोस. काळजी करु नकोस. मी गेल्यावरही आनंदात राहा आणि मला आनंदानं निरोप दे."
सुशिला उठली. तसं पुन्हा एकदा अंजलीनं तिचे डोळे पुसले. तशी ती म्हणाली,
"सुशिला, आतातरी प्रौढ हो. आता मी तुझे शेवटचे डोळे पुसते. आता मी येणार नाही कधीच डोळे पुुसायला. आता यापुढे कधीच रडायचं नाही. मला वचन दे आणि मला निरोप दे आनंदानं."
अंजलीचे ते शब्द. सुशिलानं तिला आनंदानं निरोप दिला. तसं कधीही न रडण्याचं तिला वचनही दिलंं. तसं वचन मिळताच अंजली तिच्या कम-यातून बाहेर पडली. ती त्या माणसासोबत आपल्या देशात जात होती. तशी मागे वळूनही पाहात होती आणि ती सुशीलाही तिला डोळ्याच्या ओझल होईपर्यंत पाहात होती. तिला जुने दिवस आठवत होते अंजलीसोबत घालवलेले. ते क्षणही आठवत होते. जे क्षण कधीही परत येणार नव्हते. तिच्या आयुष्यात आणि प्रारब्धात. याचीच खंत तिच्या मनात होती. परंतू आता ती रडत नव्हती. तिच्या अंतर्मनात दुःख होतं तरी. कारण ती वचननबद्ध झाली होती. तिनं अंजलीला न रडण्याचंं वचन दिलं होतं.
अंजलीला विमानतळावर नेलंं गेलंं. ती विमानात बसली. तसं विमानानं उड्डाण भरली व ते विमान तिच्या मायदेशात पोहोचलं. ती विमानातून उतरली.
अंजलीला तिच्या देशात आणलं गेलं. तिला ब-याच दिवसानं मायदेेशाचं दर्शन झालं. त्यातच तिनंं जमीनीवर पाय ठेवताच ती नतमस्तक झाली त्या धरणीवर. तसं नतमस्तक होताच ती गदगद झाली. तिला बरं वाटलं. तशी तिला सुशिला आठवली. बिचारी सुशिला. काश! सुशिलालाही आपल्या मायदेशात परतता आलं असतं तर........तिचा तो विचार. त्या विचारानं ती मायदेशात येवूनही दुःखी झाली होती.
अंजलीला त्या वेश्यालयात पाठवलं गेलं. जे वेश्यालय सुशिला राहात असलेल्या जिल्ह्यात होतं. ज्या ठिकाणी प्रतिभा पोलीस महासंचालक म्हणून नियुक्त झाली होती. तिथं ती अगदी आनंदानं राहात होती नव्हेे तर वेश्याव्यवसाय करीत होती. तशी कधीकधी तिला सुशिलाची आठवण येत असे व ती व्यथीत होत असे.

****************************************

प्रतिभा आज स्पर्धा परिक्षा पास झाली होती. त्यातच तिचा इंटरव्ह्यू देखील झाला होता. आज तिनं इंटरव्ह्यूदेखील निपटवला होता व ती पोलिस महासंचालक म्हणून नियुक्त झाली होती. आता तिला क्वार्टर मिळाला होता राहायला. ती आता क्वार्टरमध्ये राहू लागली होती. आता तिनं फुटपाथवर राहाणं बंद केलं होतं. इंटरव्ह्यूमध्ये तिला आपणाला कोणता जिल्हा हवाय असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा तिनं आपलाच जिल्हा सांगीतला होता व नियमानुसार तिलाही आपलाच जिल्हा मिळाला होता.
प्रतिभा पोलीस महासंचालक म्हणून नियुक्त होताच व आपला जिल्हा तिनं मागताच व तिला तिचा जिल्हा मिळताच ती त्या पोलीस स्टेशनला गेली. ज्या पोलीसस्टेशनमध्ये सुशिला गायब झाल्याची तक्रार नोंदवली गेली होती. सुशिला न मिळाल्यानं पोलिसांनी ती फाईल बंद केली होती. ती त्या पोलीसस्टेशनला जाताच तिनं ती फाईल शोधायला लावली व ती फाईल मिळताच तिनं त्या फाईलचा अभ्यास करणं सुरु केलं.
फाईलचा प्रतिभा अभ्यास करीत होती. अभ्यास करता करता तिला काही बारकावे गवसले. त्यानुसार तिनं तपास करणे सुरु केले. त्यानुसार तिनं अर्शदचा शोध लावण्याचा प्रयत्न केला. परंतू अर्शदचा शोध लागला नाही. शेवटी ती हताश झाली.
प्रतिभा हताश झाली खरी. परंतू तिनं ती केस सोडली नाही. तिला ती केस सोडून द्यावीशी वाटत असे. परंतू तिला तिचं अतीत आठवत होतं. तिला वाटत होतं की या सुशिलाबाबत भांडतांना मला रस्त्यावर यावं लागलं. तसंच या सुुशिलाचं ध्येय डोळ्यासमोर असल्यामुळंच आपण आज अधिकारी बनलो. तेेव्हा आपण त्या सुशिलाला विसरुन चालणार नाही. ती जर डोळ्यासमोर नसती तर आज आपण अधिकारी बनून या पोष्टवर आरुढ झालो नसतो. आपण आज या पदावर तिच्याचमुळं चढलेलो असून आपण जर आज आपलं काम झाल्यावर ती केस सोडली तर कदाचीत आपली अंंतर्रात्मा आपल्याला माफ करणार नाही. कदाचीत विधाताही आपल्याला माफ करणार नाही. आपण आज त्या केसचा शोध लावलाच पाहिजे. शोधलंच पाहिजे सुशिलाला. सुशिला सापडल्याशिवाय आपण चैन भोगू नये.
सुशिलाचा तो तिच्या मनातील विचार. तो विचार काही तिला स्वस्थ बसू देत नव्हता. तिला काय करावं सुचत नव्हतं. शेवटी तिनं तिच्या प्रकरणाचा शोध लावण्याचा विचार करताच ती तसा प्रयत्नही करु लागली. तिच्यासमोर सारखा तोच प्रश्न होता. सारखी तीच दिसत होती तिला. तिला झोपही येत नव्हती. कुठे शोधावे ते कळत नव्हते. कदाचीत ती वेश्यावस्तीत तर नाही. तिला विचार आला. तसं तिचं मनही म्हणू लागलं. शेवटी विचाराचा अवकाश. धाड टाकायला काय हरकत आहे. कदाचीत सूर गवसलाच तर.......
प्रतिभा चिंताग्रस्त होती. त्या केसचा अभ्यास करता करता तिची चिंता आणखीनच वाढत होती. ती चिंता वाढतच चालली होती दिवसेंदिवस. कारण कोणताच धागा तिला सुशिलाबद्दलचा सापडत नव्हता. ती विचार करीत होती. तसं तिला आज अचानक आठवलं की जर आपण या शहरात असलेल्या वेश्यावस्तीत धाड टाकून विचारणा केली तर.........तर कदाचीत काही सूर गवसू शकतो आपल्याला. शेवटी तिनं निर्णय घेतला की आपण त्या वेश्यावस्तीवर धाड टाकायची व सर्व वेश्यांना पकडून आणायचं पोलीस स्टेशनला. विचारणा करायची. सापडेल धागा नाहीतर नाही सापडेल. परंतू पडताळून वा तपासून पाहायला काय हरकत आहे. शेवटी तिनं निर्णय घेतला व तिनं काही निवडक पोलीस दल घेवून त्या कुंटणखाण्यावर धाड टाकली. त्यात सर्व वेश्यांना पकडून आणलं गेलं पोलीसस्टेशनला. कसून विचारणा केली गेली. एकएका वेश्येला सुशिलाबाबत विचारलं गेलं. तसा अंजलीचा क्रमांक आला. तिलाही विचारलं गेलं सुशिलाबाबत. तिला फोटोही दाखवण्यात आला सुशिलाचा. तसं म्हटलं गेलं भावनेनं की तुम्ही कोणाचं जीवन वाचवू शकता. सांगा प्लीज. आपणही एक महिला आहात. महिलांच्या भावना समजून घ्या.
प्रतिभानं सुशिलाचा फोटो पाहिला. तिनं तिला ओळखलं. कारण सुशिला जेव्हा सुरुवातीला आली होती वेश्यालयात. तेव्हा तशीच दिसत होती. तिला तिची माहिती सांगीतल्यावरुन तीच सुशिला असेल असंही तिला वाटलं. तशी ती तिची माहिती सांगायला तयार झाली.
प्रतिभानं खेळलेला तो भावनेचा खेळ. त्यातच नाव न जाहीर करण्याच्या अटीवर अंजली म्हणाली,
"मैम, मी सांगते सुशिलाबद्दल. परंतू माझे नाव जाहीर व्हायला नको. नाहीतर ते नराधम माझा अंत करुन टाकतील."
तिलाही माहिती सांगतांना वाटत होतं की सुशिलाला न्याय मिळावा. तसा विचार ती करीत होतीच.
प्रतिभानं ते ऐकलं. तशी ती म्हणाली,
"ठीक आहे. मी तुझं नाव गुप्त ठेवणार. सांग मला ती कुुठे आहे ते. मला तिचा छडाच लावायचा आहे."
तशी ग्वाही देताच अंजली पोपटासारखी सांगायला लागली. कारण तिलाही वाटत होतं की सुशिलाला न्याय मिळावा.
अंजली सांगत होती सुशिलाची माहिती. सुशिला ही अमूूक ठिकाणी असून तिला बंदीस्त केलेलं आहे. त्या ठिकाणी सहजपणे जाता येत नाही.
प्रतिभाला अंजलीनं पुरेपूर माहिती दिली होती. परंतू त्या माहितीनुसार सुशिला अशा ठिकाणी होती की तिथं सहज जाणं सोपं नव्हतं. प्रतिभा आपल्या देशात पोलीस महासंचालक असली तरी तिचा पावर आपल्या देशात आपल्याच भागापुरता सिमीत होता. त्यातच तिला व्हिसाही मिळणार नव्हता तिला आणायला. सुशिला काही व्हि आय पी नव्हती की तिला सहजपणे आणता येईल. तशीच ती आंतरराष्ट्रीय गुन्हेगारही नव्हती की तिच्याजवळ सहजपणानं पोहचता येईल. तसं पाहता जर तिच्याकडे पोहोचायचंं असेल, तर तिचा शोध लावणे गरजेचे आहे असं तिला वाटत होतं. त्यानुसार तिनं तिचा शोध लावण्यासाठी सरकारला पत्र लिहिणं आवश्यक होतं.
तिच्या मनात सुशिलाला परत आणणं, तेही तिला सुखरुप परत आणणं हा विचार होता. त्यातच तिला सुखरुप परत आणण्यासाठी सरकारी कामकाज बरोबर करणं. दस्ताऐवज मिळवणं आवश्यक होतं. तसा विचार तिनं केला व तशी फाईलही तिनं तयार केली.
प्रतिभानं सुशिलाची फाईल तयार केली. त्यानुसार ती फाईल तिनं सरकारला पाठविण्यापुर्वी तिनं विदेशमंत्र्याची भेट घेतली. त्यावेळी विदेशमंत्री पदावर एक महिला आरुढ झाली होती.
प्रतिभानं आपल्या देशातील विदेशमंत्री महोदयाची भेट घेतली. तिची भेट घेवून तिला सांगीतलं की आम्हाला मिळालेल्या माहीतीनुसार सुशिला नावाची एक तरुणी विदेशात आहे. ती त्रासात आहे. तिच्यावर अत्याचार होत आहे. महत्वाचं म्हणजे ती विदेशात असलेली आपल्या देशातील महिला आहे. नागरीकही आहे ती. आज त्या देशानं आपली नागरीक असलेल्या सुशिलाला वेश्या बनवून तिचा व्यापार करणे सुरु केले आहे. यात आपली अब्रूू जात असून आपल्या देशाची इज्जत धुळीला मिळत आहे. कसेही करुन तिला परत आणणे गरजेचे आहे. नाहीतर उद्या आपण अशी कोणतीच कारवाई न केल्यास त्याच देशातील लोकं अशाच आपल्या देशातील मुली नेतील व त्यांच्या देशात त्यांना वेश्याव्यवसाय करायला लावतील. जेणेकरुन त्या वेश्याव्यवसायातून त्यांना अतिरीक्त पैसा कमवता येईल. यात आपल्या देशाची धुळधानी होईल व ते आपल्या देशाला हासतील. त्यांना जर धडा शिकवायचा असेल तर आपल्याला सुशिलाला परत आणावंच लागेल. ती आपली गरज आहे.
ती विदेशमंत्री. तिनं सुरुवातीला आढेवेढे घेतले. परंतू नंतर तिला गरज लक्षात आली व ती सुशिलाला परत आणण्यासाठी तयार झाली.
विदेशमंत्री असलेली ती सीता. तिनं रामायणातील सीतेचीच भुमिका अदा केली होती. प्रतिभाकडून तिला सुशिलाची माहिती मिळताच ती स्वतः तेथील आपल्या देशाची राजदूत असलेल्या सीमाशी बोलणं केलं. त्या सीमानं ते बोलणं तेथील परराष्ट्र मंत्र्याला ऐकवलं. तसा तो देशही वेश्यावस्तीच्या विरोधातच होता. त्यांनी कंबर कसली. तसं त्यांनी सांंगीतलं की आम्ही तिला शोधून आपल्या सुपूर्द करतो.
देशातील विदेशमंत्र्यानं बोलणं केलेल्या गोष्टीला एक वर्ष झाला होता. परंतू अद्यापही कोणतीही हालचाल घडून आली नव्हती. तशी पुन्हा स्वस्थ न बसलेल्या प्रतिभानं आपल्या विदेश मंत्री असलेल्या मैडमची भेट घेतली. तिला पुन्हा विनंती केली व सांगीतलं की आपण स्वतः तिचा तपास करायला जात असून आपल्याला तिथे तपास करायला परवानगी मिळवून देण्यात यावी.
अख्खा एक वर्ष झाला होता. तसा तपास न झालेला पाहून प्रतिभानं मागीतलेली परवानगी विदेशमंत्री असलेल्या सीता मैडमनं मिळवून दिली. त्यातच त्या मैडमच्या विनंतीवरुन तेथील प्रशासनानंही तिला तपास करायची व सहकार्य करायची परवानगी दिली. त्याचबरोबर एक दिवस संधी साधून प्रतिभा विदेशात गेली.
प्रतिभा विदेशात गेली होती. ती तिथं तपास करु लागली होती. त्यातच ती अंजलीनं दिलेल्या पत्त्यानुसार त्या वेश्यालयात गेली. तिनं तेथील पोलीस प्रशासनाला हाताशी धरुन व त्या वेश्यालयात धाड टाकून त्या सर्व वेश्यालयातील वेश्यांना ताब्यात घेतले. परंतू काहीच निष्पन्न झालं नाही. मात्र तेथील काही वेश्यांच्या बयाणावरुन तिला तेथून हलवलं असल्याचं कळलं. मात्र तिला कुठं पाठवलं. हे कळलं नाही. शेवटी प्रतिभा निराश झाली व ती आपल्या मायदेशात माघारी फिरली.
प्रतिभा निराश झाली. तशी ती माघारी फिरली. ती एवढी निराश झाली की तिनं तिची फाईलच बंद करुन टाकली. तसं त्या फाईल बंदच्या रुपानं सुशिलाचं प्रकरण कायमचं संपलं होतं.

****************************************

सुशिलाचा शोध लागला नव्हता. परंतू ती तिच्या मायदेशात परत आली होती. त्या नराधमांनी तिला तिच्या मायदेशात परत आणलं होतं. आता ती एक निष्णांत वेश्या बनली होती. तिला बराच अनुभव आला होता. ती एक निष्णांत वेश्या म्हणून काम करीत होती. तिला पुरेसा वेळ मिळत नव्हता. तसा एखाद्या दिवशी तिला वेळ मिळाला की ती विचार करायची त्या प्रसंगाचा. ज्या प्रसंगानुसार ती वेश्या बनली होती. तिला वाटत होतं की जे काही माझ्यासोबत घडलं, ते इतरांसोबत घडू नये. त्या नराधम अर्शदला शिक्षा व्हायला हवी. त्याचबरोबर हे वेश्यालयही बंद व्हायला हवं. जेणेकरुन कोणीही माझ्यासारख्या मुलींना फसवू नये. कोण्याही पुरुषानं कोणत्याही मुलीला वेश्या बनवू नये. परंतू कसं करावं. हे वेश्यालय कसं बंद करावं.
सुशिला याचा विचार करीत असतांना तिला वाटलं की त्याची तक्रार दिली पोलीसस्टेशनला तर कदाचीत ह्या समस्येवर लढता येवू शकेल.
विचारांचा अवकाश...... सुुशिला पोलीस स्टेशनला गेली. तिला त्या अर्शदची तक्रार करायची होती पोलीस स्टेशनला.
ती पोलीसस्टेशनला गेली. तिथं एक अधिकारी बसला होता. तशी ती त्याचेजवळ गेली. म्हणाली,
"मला तक्रार करायची आहे."
"कशाची?"
"ते मी नंतर सांगतेय. आधी कोणाबद्दल ते विचारा."
"कोणाबद्दल?" अधिकारी विचारु लागला.
"अर्शद.......अर्शदबद्दल."
"अर्शद.......कोण अर्शद? कुठे राहतो?"
"ते मला काय माहीत? तुम्हाला त्यालाच शोधायचा आहे."
"काय केलं त्यानं?"
"माझ्यावर अत्याचार केला."
"म्हणजे?"
"विकलं त्यानंं मला."
"विकलं! म्हणजे मी समजलो नाही."
"मला त्यानं वेश्यालयात विकलं. मला वेश्या बनवलं त्यानंं."
"वेश्या! वेश्या बनवलंं म्हणता. तेही या वयात. मैडम, तुम्ही वेड्या वैगेरे झाल्या तर नाही ना?" त्यानं चष्मा वर केला व तिच्याकडं निरखून पाहात म्हटलं. तसा तो अधिकारी पुन्हा म्हणाला,
"केव्हा बनवलं वेश्या?"
"वीस वर्षापुर्वी."
"वीस वर्षापुर्वी आणि तुम्ही आता सांगताय. मैडम, मला आता खरंच वाटायला लागलंय की आपण आज खरंच वेड्याच झाला आहात. तसंच वाटायला लागलं मला. अहो मैडम, आतापर्यंत झोपल्या होत्या का? तेव्हाच का नाही तक्रार केली?"
"कशी करणार. माझं अपहरण करुन नेेलं होतं त्यांनी. मला सवडच मिळू दिली नाही त्यांंनी. अन् माहीत आहे आपणाला. मला कोंडून ठेवलंं होतं त्यांनी आतापर्यंत. आता कशीतरी आली आहे इथे. आपण माझी तक्रार नोंदवा. मला त्याला शिक्षा द्यायचीच आहे. व्यतिरीक्त हे वेश्यालयही कायम स्वरुपी बंद करायचं आहे."
"नाही. आता तुमची तक्रार घेणं शक्य नाही. ती नोंदवता येणंही शक्य नाही."
"का? काय कारण आहे?"
"कारण मोठं गंभीर आहे. तुमच्या या गोष्टीला बराच वेळ धालाय. तब्बल वीस वर्ष झाले त्या केसला. त्यामुळं तुमची तक्रार नोंदवता येणार नाही."
तो अधिकारी तिला सांगत होता. तशी ती सुशिलाही जिद्द करीत होती. तसं पाहता तिथं भांडणच सुरु झालं होतं. ते पाहून आतमध्ये बसून असलेल्या प्रतिभानं आपल्याजवळची घंटा वाजवली. त्याचबरोबर एक पोलीस शिपाही आतमध्ये गेला. तसं त्याला ती म्हणाली,
"काय भानगड आहे?"
प्रतिभानं तसा प्रश्न विचारताच तो पोलीस शिपाही तिला सुशिलाबाबत सांगू लागला. तशी ती म्हणाली,,
"पाठवून द्या इकडे."
पोलीस शिपाही तिच्या कम-यातून बाहेर आला. तसा त्यानं प्रतिभाचा निरोप आपल्या अधिका-याला सांगीतला. त्यानुसार त्या अधिका-यानं सुशिलाला प्रतिभाच्या कम-यात पाठवून दिलं.
प्रतिभाच्या बोलावण्यानुसार सुशिला प्रतिभाला भेटायला आतमध्ये गेली. प्रतिभानं तिला पाहिलं. म्हणाली,
"बसा."
प्रतिभानं बस म्हणताच सुशिला तिच्या पुढ्यात असलेल्या खुर्चीवर बसली. तशी प्रतिभा म्हणाली,
"बोला आता, काय प्राॅब्लेम आहे?"
"मैम, मी सुशिला. वीस वर्षापुर्वी माझ्यावर एका अर्शद नावाच्या माणसानं अत्याचार केला. त्यानं विकलं मला वेश्यालयात. मैडम, मला माझी तक्रार नोंदवायची आहे आणि मला माझ्यावर अत्याचार करणा-या अर्शदला धडा शिकवायचा आहे. शिवाय मला हे वेश्यालयही बंद करायचं आहे."
"का बरंं वेश्यालय बंद करायचं आहे तुम्हाला?"
"मैडम, हे वेश्यालय सुरु असल्यास अर्शदसारखी कित्येक माणसं माझ्यासारख्या कित्येक मुलींवर प्रेमाचं जाळं टाकतात. खोटी खोटी आश्वासनं देतात आणि फसवतात. वेश्यालय सुरु असलं आणि माझ्यासारख्या मुली अशा प्रेमात पडल्या तर ही मुलं मुलींचं अपहरण करतात आणि विकून टाकतात मुठभर पैशासाठी. दलाल असल्याचं सांगून. परंतू त्यात त्या मुलींचा दोष नसतांना त्यांना भोेगावं लागतं माझ्यासारखं."
"काय भोगलं तू?"
"मैडम, त्यांचे आदेश पाळावेच लागतात आपल्याला. नाही पाळल्यास चाकूचे घाव देतात तेे. चाकू गरम करुन डाग देतात. एवढंच नाही तर ते शरीराचे अवयवही कापतात. हे भोग इतर मुलींना येवू नये म्हणून वेश्यालय बंद होणं गरजेचं." ती म्हणत होती. तसं तिनंं आपल्या डोळ्यातून पाणी काढलं. त्याचबरोबर तिनं तिच्या शरीरावरचे व्रणही प्रतिभाला दाखवले. तसंच तिला तिचे कापलेले अवयवही दाखवले. म्हणाली,
"मैडम, मला त्यांनी छोट्या छोट्या कारणावरुन भयंकर वेदना दिलेल्या आहेत. ते मी काही सांगू शकत नाही."
सुशिला म्हणाली व चूप झाली. मात्र प्रतिभाला आनंद झाला होता. तिला थुंकीवाचून खोकला गेल्यासारखं वाटत होतं. कारण जिची ती एवढ्या दिवसापासूून वाट पाहात होती. जिचा एवढा शोध घेतला होता, जिचा शोध घ्यायला ती विदेशातही गेली होती. तरीही जी तिला शोधूनही सापडली नव्हती. ती आज स्वतःच पोलीस स्टेशनला चालून आली होती.
"तू सुशिला आहे का? तीच सुशिला ना?"
प्रतिभानं सुशिलाला विचारलं. तसं तिनं वसतीगृहाचं नावही सांगीतलं आणि पुर्वीच्या दोनचार गोष्टी सांगीतल्या. तशी सुशिला विचार करु लागली की हिला सांगावं की नाही सांगावं. तसं प्रतिभाला आपण अर्शद नाव सांगीतलंच आहे. जर ही अर्शदला ओळखत असेल तर........आपला खोटेपणा पकडला जाईल. नाही खरं खरंच बोलावं. तशी ती विचार करीत असतांना तिला प्रतिभा म्हणाली,
"सुशिला, काय विचार करतेय. मी विचारलं की तू तीच सुशिला आहे ना. वसतीगृहात राहणारी?"
प्रतिभानं विचारलेला प्रश्न. तशी सुशिला म्हणाली,
"होय. मी तीच सुशिला."
"माहीत आहे सुशिला, मी तुला किती शोधण्याचा प्रयत्न केला ते?"
"का बरं?"
"अगं, तू माझं जीवन बनवलं?"
"म्हणजे?"
"तू मला ओळखलं नाही."
"ओळख सांगाल तर ओळखेल ना आणि सांगूही नका मला ओळख. कारण मी तुमच्या ओळखीच्या लायक नाही."
"म्हणजे?"
"मैडम, मी एक वेश्या आहे."
"तू फक्त माझ्यासाठी माझी एक मैत्रीण आहेस. मग तू एक वेश्या का असेना." तेे बोलणं प्रतिभाचं. त्यानंतर सुशिला म्हणाली,
"ठीक आहेे. सांगा तर आपली ओळखं."
"मी प्रतिभा. तूझी रुम पार्टनर."
"मैडम, तुम्ही प्रतिभा आहात."
"होय प्रतिभा. तुझी रुम पार्टनर आणि मला तू अहो जावो म्हणू नको. प्रतिभा म्हण साधं."
"मैडम नाही. आता आपण मोठ्या पदावर बसल्या आहात. तुमचा मान तुम्हाला मिळायलाच हवा."
"नाही नाही. असं कसं."
"तुम्ही समजून घ्या. मी जर तसं बोलली तर येथील कर्मचारी काय म्हणतील. म्हणतील की एका वेश्येसोबत मैत्री. एक वेश्या मैत्रीण. बदनामी करतील तुझी."
"करु दे. इथं तर राजालाही शिव्या हासडतात राज्यातील लोकं."
"परंतू ते त्यांचं बोलणं......!"
"काही म्हणणार नाही. तू माझी मैत्रीण आहेस आणि अशी बोलू नको सुशिला. तुला माहीत नाही, माझ्यासाठी तू वेश्या नाहीस. एक व्यक्ती आहेस. माणूसकी असलेली. खरं तर आता मी ज्या पदावर बसलेली दिसतेय ना. हे पद तुझीच कृपा आहे."
सुशिलानं ते ऐकलं. तशी ती विचार करु लागली की मी हिला केव्हा मदत केली. मला तर त्या अर्शदनंं पळवून नेलं होतं आणि विकून टाकलं होतं त्या वेश्यालयात. मग मी हिला मदत करायला केव्हा आले.
ती विचार करीत होती. तशी प्रतिभाच बोलली.
"कुठे हरवलीय सुशिला?"
सुशिलाला तिचा इतिहास माहीत नव्हता. म्हणून तिचे विचार करणे साहजीक होते. तसा पुन्हा प्रतिभाचा प्रश्न सुशिलानं ऐकला. तशी ती म्हणाली,
"मैडम, मला तर त्या अर्शदनं पळवून नेलं होतं आणि विकूून टाकलं होतं त्या वेश्यालयात. मग मी आपणाला मदत करायला केव्हा आली?"
"त्याची मोठी कहाणी आहे सुशिला."
"कहाणी! मी समजले नाही."
"हो कहाणी. मोठा इतिहास आहे त्याचा."
"मला कळेल का तो इतिहास."
"सांगतेय. जरा धीर धर."
असे म्हणत प्रतिभा तिला आपली कर्मकहाणी सांगू लागली.
"तुला पळवून नेताच व तू बेपत्ता होताच वसतीगृहात हालचाल झाली. वसतीगृह प्रशासनानं तुझी तक्रार केली पोलीसस्टेशनला. त्यानंतर तुझा शोध न लागल्यानं ती केस दाबली गेली. त्यानंतर एक दिवस मी मैडमला म्हटलं की मैडम, मी सुशिलाबद्दल काही गोष्टी सांगू शकते. परंतू मैडम मला म्हणाली की आता ती केस दबली आहे ना. मग आता ती केस दबूनच राहू दे. नसती उठाठेव करु नको. मैडमनं तसं म्हटलंं होतं . परंतू माझं मन काही स्वस्थ बसू देत नव्हतं. शेवटी माझ्या मनानं ठरवलं की आपण सुशिलाला न्याय मिळवून द्यावा. म्हटलं की आपण जर ही गोष्ट करत नसाल तर मी पोलीसस्टेशनला जाईल व सुशिलाची माहिती देईल. परंतू त्यावर मैडम म्हणाली की तू जर असं करशील तर मी तुला वसतीगृहातून काढून टाकणार. हीच ती गोष्ट. मी मैडमला सांगीतली. परंतू मैडमनं माझी गोष्ट ऐकून न घेता मला धमकावलं व पोलीसस्टेशनला जाण्याची मनाई केली. परंतू माझं मन स्वस्थ बसू देत नव्हतं.
एकदाचा तो दिवस मी पोलीसस्टेशनला गेले. त्यानंतर ते मैडमला माहीत होताच मैडमनं मला वसतीगृहातून काढून टाकलं. शेवटी मी निराश झाले. परंतू हारले नाही. मी राहले फुटपाथवर. भीक मागत मागत शिकले. त्यावेळी रस्त्यावरचे गुंड मला त्रास देत. पोलीसही देत कधीकधी त्रास. त्यावर मात करीत शिकले. ध्येय होतं आणि ठरवलं होतं मी मनात की कधीतरी मी सुशिलाला शोधणार. त्यासाठी मला कोण्यातरी शोधपथकाचा अधिकारी बनणं आवश्यक होतं. मला माहीत होतं की कोणाचाही शोध पोलीसच लावू शकतात. चोराचा, अपहरण झालेल्या माणसांचा, खुन्यांचा. म्हणून मी डिपार्टमेंट पोलीस बनण्याचंच निवडलं. विचार केला. निर्धार केला नि आज बनले अधिकारी. आज मी पोलीस महासंचालक बनली आहे सुशिला. सर्व तुझीच कृपा. तू जर नसती बेपत्ता झाली तर आज मी तुला न्याय मिळवून द्यायला धजली नसती, ना मला त्या मैमनं वसतीगृहातून काढलं असतं मला. ना मी कोणते कष्ट शोषले असतेे. ना मला फुटपाथवर राहावं लागलं असतं. ना भीक मागावी लागली असती शिक्षणासाठी आणि जेवनासाठी. तू बेपत्ता झाल्यानं मला जो सूर सापडला. हे तुझेच उपकार म्हटलं तरी चालेल."
"पण तुम्हाला त्रासही झाला ना माझ्यामुळे."
"होय. त्रास झाला. परंतू ध्येय तर साकार झालं तुझ्या निमित्याने."
तिचं बोलणंं मधातच थांबवत सुुशिला म्हणाली,
"प्रतिभा मैडम, हे माझे उपकार नाहीत. हे तुमचे प्रयत्न आहेत. तूम्ही जर प्रयत्नच केेला नसता तर तूम्ही शिकल्या नसत्या. म्हणून प्रयत्न करणं गरजेचं आणि दुसरं म्हणजे आपलं नशीब. आपल्या नशीबात कोणत्याही गोष्टी असल्याशिवाय मिळत नाही. तुमच्या नशिबात पोलीस अधिकारी बनणं होतं तर तूम्ही बनलात आणि माझ्या नशिबात एक वारांगना. परंतू एक सांगते की व्यक्ती काहीही बनो, त्यानं आपली पायरी विसरु नये आणि समाधानी असावे म्हणजे झालं. आपण समाधानी आहात यातच मला आनंद आहे."
"बरं माझं जावू दे. तुझं सांग. तुझ्याबाबतीत असंं हे विपरीत कसं घडलं?"
"मी माझंही सांगते तुम्हाला." असं म्हणत ती सांगू लागली आपली कर्मकहाणी. जी तिच्या आयुष्यात घडली होती.
"प्रतिभा, मैडम,, तुम्हाला माहीतच आहेे की मी ग्रामीण भागात शिकणारी मुलगी. मी हुशार होते म्हणून दहावी पास झाले. पुढचं शिक्षण शिकायचं होतं म्हणून मी शहरात आले. माझ्या मायबापानं मुलींनी शिकूू नये म्हटलं होतं. तरीही मला शिकायची इच्छा होती, म्हणून मी शहरात शिकायला आले. तिथं वसतीगृहात राहू लागले. ज्या आपल्या वसतीगृहात रॅगिंग व्हायची. या रॅगींगमध्ये मुली म्हणत की एखादा मुलगा पटवावा. तो आपल्या जीवनातील जोडीदार व्हावा. त्यानं निरतिशय प्रेम करावं आपल्यावर. आपणही त्याचेवर. तशा त्या मुली त्यांच्या प्रियकरांना वसतीगृहातही आणत होत्या. ते तर तुम्हाला माहीतच आहे.
ते त्यांचं बोलणं आणि त्यांचं वागणं पाहून मलाही वाटलं की आपणही कोणावर प्रेम करावं. जीव लावावा कोणावर. शेवटी मिही प्रेम करायचं ठरवताच मला माझ्याच महाविद्यालयातील एक मुलगा गवसला. पहिल्याच दिवशी त्यानं मला टक्कर दिली व मी बेशुद्ध झाले. तेव्हा त्यानंच मला भरती केलं होतं रुग्णालयात. त्यानं माझी फार काळजी घेतली होती. परंतू तो त्याचा दिखावा होता.
मी स्वस्थ झाले होेते. तसं त्यानं त्या बेशुद्धपणात माझी काळजी घेतल्यानं मी त्याचेवर भाळले. त्याचेवर निरतिशय प्रेम करु लागले. त्याचेवर विश्वास ठेवून फिरायला जावू लागले कुठेही. कुठेही म्हणजे बागेत आणि रेस्टॉरेंटमध्येही. शेेवटी त्यानं घात केला."
अचानक आजही तिच्या डोळ्यातून अश्रूधारा टपकल्या. तशी प्रतिभा म्हणाली,
"रडू नकोस. वेडी कुठली. अशी रडत बसशील तर आताच संपशील. तुला पुढचं सांगताच येणार नाही."
"त्यानं विकलं मला वेेश्यालयात. तिथं अंजली नावाची एक मैत्रीण भेटली. तिनं मला खुुप आधार दिलाा. मला जपलं. ती नेहमी म्हणत असे की हे वेश्यालय आहे. या ठिकाणी रडायचं नसतं. हिंमत बांधायची असते. हिंमतीनं सगळं इच्छा नसतांनाही सहन करायचं असतं. दुःख पचवायचं असते मनात. ते दाखवायचं नसतं मुळीच.
एक दिवस त्यानं म्हटलं की आपण बाहेरगावी फिरायला जाणार आहोत. तू तयारी करुन खाली ये. मी आडोशाला उभा राहतो. कोणाच्या लक्षात यायला नको की मी तुला रोजरोज फिरायला नेतोय. नाहीतर आपली तक्रार करतील या मुली. मग हे प्रशासन तुझ्या आईवडीलांनाही सांगतील. मग आपलं भेटणंच बंद होईल.
मलाही त्याच्या बोलण्यात सत्यता दिसली. मिही विश्वास केला त्याचेवर व निघाली फिरायला त्याचेसोबत. परंतू त्यानं मला मुर्ख बनवलं. मी विचारलं मध्येच त्याला. तेव्हा तो म्हणत होता की तो तिला त्याच्या गावला नेत आहे. शेवटी जंगल लागलं. त्या जंगलानंतर एक चांगला मोकळा रस्ता. परंतू त्या रस्त्यानं कोणीही येणारं जाणारं दिसलं नाही. एक गाडी उभी असलेली दिसली तिथं. तशी त्यानं त्या गाडीजवळ आपली गाडी थांबवली. त्या गाडीतून चार जण धष्टपुष्ठ मुुस्तंडे उतरले. तिघांनी मला आवळून पकडलं व एकानं पैसे दिले त्या अर्शदला. त्यावेळी मी त्याला जाब विचारताच अर्शद म्हणाला की मी वेश्यांचा दलाल आहे. एवढंच त्याचं नि माझं शेवटचं बोलणं. त्यानंतर मला जबरदस्तीनं गाडीत कोंबलं व माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली गेली व काही वेळानं मला काहीतरी टोचलं गेलं. बहुतेक ते इंजेक्शनच असावं. कारण त्यानंतर मला चक्कर यायला लाागली हळूहळू. मी बेहोश झाले होते. जेव्हा होशात आले, तेव्हा कळलं की आपल्यासोबत काय झालं."
सुुशिलानं तिचं पुर्ण ऐकलं. तशी ती म्हणाली,
"बापरेे! म्हणजे प्रेम करणं वाईटच. तसा विचार करणेही वाईटच. कोणावर अलीकडे विश्वास ठेवावा तेच कळत नाही. विचारच आहे सर्व. तिकडे मायबापही चिंंतेत होते तुझे."
"हो ना प्रतिभा. परंतू तेव्हा त्यावर काय उपाय होता. काहीच नाही ना."
"हो ना सुशिला, तुझ्याकडे काहीच उपाय नव्हता तेव्हा. देशात असतीस कदाचीत तर पळूनही जावू शकली असतीस. परंतू तिथं शक्य नव्हतं पळून जाणं. मला तुझ्याआधी अंजलीनं सगळंं सांगीतलं होतंं. तू कुठे होती? कशी होती? ते सर्व. तिच्यामुळेच तर मी तुला शोधायला विदेशातही आलेे होते. परंतू तू सापडली नाही मला."
"हो खरंं आहे तुझं. तिथं ते शक्य नव्हतं. परंतू आता मला सांग तू अंजलीला कशी ओळखते."
"होय. मी ओळखते अंजलीला."
"ती कुठे भेटली?"
"तुला भेटायचंय का?"
"होय."
ठीक आहे. भेटायला नेईल तुला. परंतू पुढचं सांग."
"प्रतिभा, आता तुझ्या म्हणण्यानुसार का लपवायचं. मलाही सर्व विचार करुन सगळं सहन करावं लागलं. एक वेश्या बनावं लागलं. जिला आपल्याकडे वारांगना म्हणतात. मग रोजचे रोज पुरुष पती म्हणून चढवावे लागले आपल्या उरावर. आता तर असं वाटायला लागलं की आपला जन्मच मुळात याच गोष्टीसाठी झाला असावा."
"हं, अगदी तसंच समज तू. तुझ्या नशिबातच होतं हे सारंं. समज की तुझे प्रारब्धच विधात्यानं असंच लिहिलेलं असावं."
"प्रतिभा मैडम, तुमचं बरोबर आहे."
"सुशिला, तूझ्याबाबतीत सांगायचं झाल्यास तू स्वतः वेश्या बनली नाहीस. तुला बनावं लागलं. मात्र हे जीवन बदलवता येते तुला."
"हो, मलाही बदलवायचं आहे हे जीवन. मला सोडायचा आहे हा धंदा आणि ह्या जगातील वेश्याव्यवसायच बंद करायचा मला. वाटतं की कोणीही वेश्या बनू नयेत. कारण वेश्या बनवतांना मुलींची निकड भासते. त्यासाठी लोकं कुणाच्या मुली पळवून नेतात तर कुणी आपल्या पत्नीला कुंटणखाण्यात विकतात."
"हो, मलाही कळतं. मी तुला यात मदत करेन."
"प्रतिभा मैडम, एक विनंती आहे. मला अंजलीला भेटायचं आहे. केव्हा भेटवशील?"
"आताच....... चालायचं आहे भेटायला तिला. मी नेहमीच जात असते तिकडं."
"हो चल तर. मी अगदी उतावीळ झालीय भेटायला."
"ठीक आहे. परंतू एक अट आहे."
"कोणती? कोणती अट आहे?"
"मला प्रतिभा मैडम नाही. प्रतिभाच म्हणावं लागेल."
सुशिला चूप होती. तशी प्रतिभा म्हणाली,
"काय झालं."
"काही नाही गं."
"वेडी आहे तू. मी मैत्रीण आहे तुझी. बालमैत्रीण आणि बालमैत्रीणीला अहो जावो म्हणायचं नसतं. तू मी असंच म्हणायचं असतं. हे आधी लक्षात घे."
"हो महासाहेब. पण आता आपण पोलीस महासंचालक आहात. मोठ्या पदावर आहात अन् मी वेश्या."
"आता परत लाजवू नको मला. अहो जावो म्हणशील तर जावू दे. अंजलीकडं जाणं रद्द."
" नाही प्रतिभा, आजपासून मी तुम्हाला तूच म्हणणार. झालं ना तुझ्या मनासारखं प्रतिभा. प्रतिभा तू मला आताच भेटव अंजलीला."
सुशिला बोलली. तसं बोलणं प्रतिभानं ऐकलं. तशी ती म्हणाली,
"सुशिला, मी ड्युटीवर आहे. सुटी घ्यावी लागेल मला. मी सुटी टाकते. चल आपण जावू अंजलीला भेटायला. तिथं वर्दीमध्ये जावं लागेल मला."
"का?"
"असं जर गेलं तर लोकं काहीबाही बोलतात. समजतात की याही वेश्या असतील म्हणून."
"ठीक आहे. जशी तुझी इच्छा."
प्रतिभानं सुटीचा अर्ज टाकला. तशी तिनं गाडी काढली व ती अंजलीला भेटायला गेली. अंजली तिला भेटताच त्या दोघीही गहिवरुन आल्या होत्या. त्या दोघींनी एकमेकींना आलींगण दिलं होतं. त्याचबरोबर त्यांच्या डोळ्यातून अश्रूधारा उभ्या राहिल्या होत्या. ते पाहताच प्रतिभाच्या डोळ्यातूनही अश्रूधारा वाहू लागल्या होत्या. तिला तर अतीव आनंद झाला होता. कारण तिनं दोन जीवांचं मीलन करुन दिलं होतं. जणू ते दोन्ही आत्म्ये एकमेकांना भेटत होते.

************************************************

"केव्हा आली." अंजली म्हणाली.
"आजच."
"देशात म्हटलं मी."
"एक वर्ष झालं असेल."
"कशी आहेस?"
"ठीक आहे."
"विचारुन आली की नाही."
"आता विचारावं लागत नाही. मी मनाची मालक आहे."
ती आपली वस्तुस्थिती लपवत म्हणाली.
"हो का?"
"हो."
"कशी का?"
"अगं वय झालं ना आपलं. आताही गुलाम राहायचं त्यांचं. केले त्यांचे छळ याआधी सहन. आताही करायचे का?"
"बरोबर."
"ताई, तू कशी आहेस?"
"ठीकच समज."
"म्हणजे?"
"मला त्रास आहे. परंतू तेवढा नाही. हं, थोडाफार आहे. तसा वाटून घेतला तर वाटतो. परंतू मला सवय झाली आहे त्याची."
"बरं एक विचारु का अंजली."
"विचार."
"आताही जावं लागते का तुला जागोजागी."
"नाही. मला फक्त आता मुली पाठवाव्या लागतात. परंतू मला कीळस येते त्यांची. त्या मुलींना पाठवावंसं नाही वाटत. नव्या मुली असतात. बिचा-या रडतात तुझ्यासारख्या. दया येते त्यांची. कीवही येते तेवढीच. परंतू काय करु. माझ्याकडे उपाय नसतो ना."
"माझ्याकडेही तेच काम आहे. मी तर ठरवलं."
"काय ठरवलंय तू?"
"काही नाही."
"सांग तर. मी काय करणार आहे."
"नाही. मी वेळ येईल तेव्हा सांगणार."
"बरं ठीक आहे. येईल पुन्हा कधी भेटायला. आता जायचं आहे मला. वेळ भरपूर आहे आणि सवडही. तशी मीच माझ्या मनाची मालकही आहे. परंतू माझ्यावर त्या मुली अवलंबून आहेत. त्यांचं पोट आहे. त्यासाठी जावं लागेल मला."
"ठीक आहे. परंतू नंतर येशील तेव्हा मुक्कामानं यायचं बरं का?"
"ठीक आहे. येते मी."
सुशिलानं पुरता निरोप घेतला. तशी ती निघाली. त्याचबरोबर प्रतिभाही. मात्र सुशिलाच्या मनात अंजलीसोबतच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या होत्या.
प्रतिभाच्या म्हणण्यानुसार सुशिलानं खटला दाखल केला होता न्यायालयात. न्यायालयानं त्यावर तारीखवर तारीख लावत आज तो खटला बोर्डावर आणला होता. सुनावण्या सुरु होत्या. तिचं म्हणणं होतं की वेश्यालय बंद व्हावं.
प्रतिभानं अर्शदला खुप शोधलं होतं. परंतू अर्शदचा अजूनही पत्ता लागला नव्हता. मात्र वेश्यालय बंद करण्यासाठी प्रतिभा मदत करीत होती. तिच्या त्या खटल्याचं प्रकरण वर्तमानपत्रातही छापून येत होतं. तसं ते प्रकरण छापून येताच वेश्यांच्या ह्रृदयाचे ठोके वाढत होते.
एकदा ते प्रकरण छापून आलं होतं. तसंं एक वर्तमानपत्र अंजलीच्या हातात पडलं. तशी ती विचार करायला लागली होती त्या वेश्यांचा. ज्या वेश्यांच्या उदरनिर्वाहाचं साधनच वेश्यालय होतं. तसंच त्या वर्तमानपत्रात सुशिलाचंही नाव छापून आलं होतं.
अंजलीनं ती बातमी वाचली. तसं तिला फार वाईट वाटलं. वाटायला लागलं की या वेश्या......... कधी कोणाच्या वाट्याला जात नाहीत. हवस भागवतात त्या नराधमांची. त्या वेश्या जर नसत्या तर ती माणसं पिसाळली असती. बलात्कार करीत सुटली असती. आम्ही आहोत. म्हणून आज तरुण मुली सुुरक्षीत आहेत. अपहरणाची प्रकरणं कमी आहेत. गुंडगीरी कमी आहे. जर आम्ही नसतो तर अपहरणं वाढली असती. कोणीही कोणाच्या बायका आणि कोणीही कोणाच्या मुली, केव्हाही पळवून नेल्या असत्या. स्री जात मुळातच सुरक्षीत नसती. परंतू कोण सांगेल तिला. तिनंं विचारपूस न करता उगाचंच खटला दाखल केला.
तिनं ठरवलं होतं की आपण सुशिलाला समजवावं. तिला खटला परत घ्यायला लावावा. कारण वेश्यांचं पोट आहे त्यावर.
तशी ती विचार करताच तिनं सुशिलाची भेट घ्यायचं ठरवलं. त्यानुुसार तिची एके दिवशी सुशिलाशी भेट झाली होती. तिची भेट होताच तिनं तिला बरंच समजावलं. म्हटलं की या वेश्या......... कधी कोणाच्या वाट्याला जात नाहीत. वासना भागवत असतात त्या नराधमांची. त्या वेश्या जर नाही असणार तर ती माणसं पिसाळतील. बलात्कार करीत सुटतील. आपण आहोत म्हणून आज तरुण मुली सुुरक्षीत आहेत. अपहरणाची प्रकरणं कमी आहेत. गुंडगीरी कमी आहे. जर आपण नसतो तर अपहरणं वाढली असती. कोणीही कोणाच्या बायका आणि कोणीही कोणाच्या मुली, केव्हाही पळवून नेल्या असत्या. स्री जात मुळातच सुरक्षीत नसती. परंतू कोण सांगेल तुला. तू विचारपूस न करता उगाचंच खटला दाखल केला.
अगं महत्वाची गोष्ट म्हणजे या वेश्यालयाच्या रुपानं स्रिया वेश्या व्यवसायच करीत नाहीत. तर या माध्यमातून पैसाही कमवता येतो. पोटालाही अन्न मिळवता येतं.
अंजली बोलून गेली खरी. त्यावर सुशिला काहीही बोलली नाही. परंतू ती अंजलीचं ऐकायला तयार नव्हती. ती आपल्याच मतावर ठाम होती. तिला वाटत होतं की स्रियांना यातून रोजगार मीळत नाही. पोटंही भरता येत नाही. उलट त्या अनेक रोगांनी ग्रासीत होतात. जेवढा पैसा त्या कमवतात. त्याचेपेक्षा कितीतरी जास्त पैसा त्यांना तो रोग सुधारायला लागतो.
सुशिलाचं गप्प असलेलं पाहून अंजली काहीच बोलली नाही. तशी तिही गप्प झाली. त्यातच सुशिलाही तेथून निघून गेली.
तारीखवर तारीख सुरुच होती. तसा एक दिवस कोर्टाचा निकाल आला. कोर्टानं निकाल दिला होता की वेश्यालय बंद करावं.
न्यायालयानं निकाल दिल्यानंतर वेश्याव्यवसाय बंद झाला होता. सुशिलाला आनंद झाला होता. त्याचबरोबर प्रतिभालाही. परंतू त्याचे दुरगामी परिणाम होत चालले होते.
आता वेश्यांना राजरोषपणानं आपला व्यवसाय करता येत नव्हता. सर्व वेश्या रस्त्यावर आल्या होत्या. त्यांंचं काम करता येत नव्हतं. त्याची त्यांना सवयही नव्हती. त्यातच त्यांचं पोट भरणं कठीण झालं होतं. कोणीही त्यांना काम देत नव्हतं. त्यांच्याकडे हीनतेच्या दृष्टीनं पाहिलं जात होतं.
वेश्याव्यवसाय बंद झाल्यामुळं मुली सुरक्षीत नव्हत्या. अपहरणाची संख्या वाढली होती. त्यातच बलात्काराचेही प्रमाण वाढले होते. तशीच खुनांचीही संख्या वाढली होती. आता कुठेही आणि केव्हाही सर्रासपणे रस्त्यारस्त्यावर तरुण मुली मारुन टाकल्या जात होत्या. काही मुलींचे चेहरे ओळखू येवू नये म्हणून विद्रूप केले जात होते. काही मुलींना तर सर्रासपणे जाळले जात होते.
ॲसीड हल्ल्याचे प्रमाण वाढले होते. एवढंच नाही तर घरादारातही स्री सुरक्षीत नव्हती. मग ती चार वर्षाची बालिका का असेना.
पारिवारीक बाबतीत सांगायचं झाल्यास सांसरीक स्रियाही सुरक्षीत नव्हत्या. बरेचसे पती आपल्या पत्नीसमोरच दुस-या स्रिला घरात आणत. त्यावर त्यांची स्वतःची पत्नीही काही बोलू शकत नव्हती. बोलल्यास तिलाही घरातून हाकलून देण्याचे प्रमाण वाढले होते.
सासरे स्नुषेवर अत्याचार व बलात्कार करु लागले होते. बापही स्व मुलीवर अत्याचार आणि बलात्कार करु पाहात होता. यात भाऊबंधही मागे नव्हते. तेही स्व बहिणीवरच बलात्कार करु पाहात होते. एकंदरीत सांगायचे झाल्यास गुन्ह्याचे प्रमाण वाढले होते.
दररोज वर्तमानपत्रात स्रियांवरील अत्याचाराच्या व बलात्काराच्या बातम्या जास्तीत जास्त छापून येत. त्या बातम्या सुशिला वाचत असे. त्या बातम्या वाचून व ते होत असलेले अत्याचार वाचून तिला विचार येत होता की आपण फालतूच वेश्याव्यवसाय बंद करण्यासाठी खटला लढलो. वेश्याव्यवसाय बेकारच बंद केला. वाटत होतं की वेश्याव्यवसाय बंद होताच स्रिया सुखी होतील. परंतू उलट झालं. मला वाटलं की समस्या समाप्त होतील. परंतू समस्या उलट जास्त वाढलेल्या आहेत.
ती त्या वाढलेल्या समस्या वाचून व ऐकून स्वतःच पश्चाताप करीत होती. परंतू आता त्यावर काहीच उपाय नव्हता. वाटत होतं की वेश्याव्यवसाय पुन्हा सुरु व्हावा. परंतू तो होईल कसा? आपण जर तो व्यवसाय पुन्हा सुरु केला तर पोलीस आपल्यावरच कारवाई करतील. तसेच जर याचा खटला आपण पुन्हा कोर्टात दाखल केला तर आपल्याला न्यायालय वेड्यात काढेल.
ती याचाच विचार करीत होती. शेवटी उपाय न निघाल्यानं तिनंं ठरवलं की आपण अंजलीची भेट घ्यावी.
सुशिलानं विचार करताच तिनं अंजलीची भेट घेतली. तिनं केलेल्या न्यायालयातील प्रकाराची तिनं माफी मागीतली. तसा उपाय विचारला. परंतू अंजलीनं तिला उपाय सांगीतला नाही. उलट दोनचार गोष्टी जास्तीच्या ऐकवल्या.
सुशिलाला गप्प राहाणं भाग होतं. कारण चूक तिचीच होती. तिच्या तसं वागण्यानं वेश्या समाधानी नव्हत्या. त्यांना आजारानं मरणं पसंत होतं. परंतू असं कुढत कुढत जगणं पसंत नव्हतं. त्यांना वाटत होतं की मरण हे एक दिवस येणारच आहे. त्यात आपण जर मरण पावलो एखाद्या आजारानं तर त्यात एवढं नवल काय?
सुशिला अंजलीला म्हणाली,
"ताई, माझी फार मोठी चूक झाली. मी क्षमेच्या लायकही नाही. परंतू तरीही मी क्षमा मागते. हवं तर यात काही उपाय असेल तर सांग."
त्यावर ती म्हणाली,
"सुशिला, मी तुला कोणता उपाय सांगू आता. चूक तर झाली. आता जगू दे या वेश्यांना त्यांच्या परिस्थितीवर. आता यावर उपाय नाही. परंतू मी तुला यापुर्वीच वेश्याव्यवसाय बंद करु नको म्हणून सांगीतलं होतं. ते का सांगीतलं होतं ते आता सांगतोय. जरा नीट लक्ष देवून ऐक.
एक रुख्मा नावाची वेश्या होती. तिची जीवनी सांगतोय. रुख्मा अस्पृश्य समाजातील. ती जेव्हा लहान होती. तेव्हा ती गावात तेल घ्यायला वाण्याच्या दुकानात गेली. त्यावेळी तिची लहान बहीणही तिच्यासोबत गेली. गावात भेदभाव होता. त्यामुळंं त्या वाण्यानं तिच्या बहिणीला मारलं. ते सहन न झाल्यानं त्या लहानग्या मुलीनं त्या वाण्याची हत्या केली. त्यातच भितीनं ती पळून गेली. ती शहरात गेली व तिथं एका रिक्षाचालकानं तिला वेश्यालयात विकलं. परंतू त्या वेश्यालयातील मुख्य बाईनं तिला वेश्या बनविण्याऐवजी तिची कनव लक्षात घेवून तिला जमीनदाराला विकलं. त्यानंतर रुख्माला मुलबाळ झाली नसल्यानं त्या जमीनदारानं रत्ना नावाची दुसरी पत्नी केली. त्याला परवानगीही रुख्मानंच दिली.
जमीनदारानं दुसरी पत्नी करुन आणताच त्याचे भाव बदलले. त्यानंतर तिला त्यानं घरातून हाकलून दिलं. उपाशी ठेवलं. जेवन दिलं नाही. शेवटी भूकच ती. ती भूक सहन न झाल्यानं रुख्मा ऐन मध्यरात्री मुख्य रस्त्यावर आली. तिनं रस्त्यावर चालणा-या ट्रकचालकांना पहिल्यांदा आपला देह विकला. सौदा केला तिनं तेवढ्या रात्री. त्यातच त्या ट्रकचालकांनी तेवढ्याच रात्री तिच्यावर पाशवी बलात्कार केले. बदल्यात तिला त्या ट्रकचालकांनी एक शहरात जागा घेवून दिली. तिथं तिनंं वेश्याव्यवसाय उभा केला होता. तिनं अतिशय चांगलं ठेवलं होतं प्रशासन. तिनंच न्यायालयात खटला दाखल करुन वेश्याव्यवसायाला समाजमान्यता मिळवून दिली होती. ज्या समाजमान्यतेनं वेश्या राजरोषपणााचं जीवन जगत होत्या. परंतू तू तर हे वेश्याव्यवसायच संपवलं. आज बघ तू, या वेश्याव्यवसाय बंद होण्याचे किती दूरगामी परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपलं सोड. माहीत आहे मला की आपल्या संपुर्ण वेश्याजातीवर संकट आलं आहे. परंतू तो समाज पाहा. जो समाज आपल्याला वाईट म्हणत होता. तो समाज कसा वागत आहे. आज तर तोच समाज बलात्कार करीत सुटला. स्रियांवर अत्याचार करीत सुटला नव्हे तर तो आज स्वतःच्या पत्नीला, आईला, मुलीला व स्वतःच्या बहिणीलाही ओळखत नाही. जो समाज काल आपल्याला शिव्या देत होता. तोच समाज आज काय करीत आहे. हे दिसत आहे आज. ही स्थिती पाहून आज सरकारलाही वाटत असेल की वेश्यालय सुरु करावं. परंतू आज सरकार हे वेश्यालय सुरु करु शकत नाही."
"ताई, यावर काहीच उपाय नाही का गं. काहीच उपाय निघणार नाही का गं?"
"आहे एक उपाय."
"कोणता उपाय? लवकर सांग."
"आपल्यालाच धोका पत्करुन हा वेेश्याव्यवसाय चालवावा लागेल. ज्याला अनधिकृत वेश्याव्यवसाय म्हणता येईल. जसे एखाद्या जिल्ह्यात दारुबंदी झाल्यानंतरही त्याच जिल्ह्यात जास्त दारु विकल्या जाते तसे. आपल्यालाही तसाच वेश्याव्यवसाय सुरु करावा लागेल. तेव्हाच आपलेही पोट भरेल. तसेच बाकी लाचार मुलींचं पोट भरता येईल. संपुर्ण स्री जातीला सुरक्षीत करता येईल. देशातील बलात्काराचे व स्रीजातीवरील अत्याचाराचे प्रमाण कमी करता येईल. एवढंच नाही तर देशातील गुन्हेगारी कमी करता येईल. मग ना कोणी स्रियांंवर बलात्कार करतील. ना कोणी महिलांना जाळतील. ना कोणी महिलांचे चेहरे विद्रूप करतील. महत्वाचं सांंगायचं म्हणजे या अनौरस गोष्टीचे प्रमाण आपोआपच कमी होतील."
सुशिलाला पटल्या होत्या अंजलीनं सांगीतलेल्या गोष्टी. आज अंजलीच्याच प्रेरणेनं तिनं परत वेश्याव्यवसाय सुरु करायला लावला होता सर्व वेश्यांना सरकारची पर्वा न करता.
आज त्या वेश्याकुलातील स्रियांनी वेश्याव्यवसाय पुन्हा एकदा सुरु केला होता. सरकारची पर्वा न करता. सरकार मात्र धाडी टाकत होतं या वेश्यालयावर. कारण त्याला सरकारची परवानगी नव्हती. तसेच त्यांच्याही धंद्यात भ्रष्टाचार वाढला होता. कारण जेेव्हा कधी पोलीस या वेश्यालयावर धाड टाकत आणि वेश्यांना पकडत, तेव्हा काही काही पोलीस हे काही लेनदेन करुन त्या वेश्यांना सोडून देत.
आज अनधिकृत का असेना, पण वेश्याव्यवसाय सुरु झाल्यानं संपुर्ण वेश्या सुखी झाल्या होत्या. त्यासोबत तो दांभीक समाजही. जो समाज स्वतःला मोठा थोर समजत होता.
****************************************

सुशिला म्हातारी झाली होती. तिच्या हयातीतच तिनं वेश्याव्यवसाय बंदही केला होता आणि सुरुही. वेश्याव्यवसाय सुरु झाला होता, अनधिकृतपणाने का होईना, परंतू ती आज समाधानी नव्हती. कारण त्या वेश्याव्यवसायाला आज समाजमान्यता नव्हती आणि राजमान्यताही. मात्र राजघराण्यातील लोकं लपून छपून इथेे येत. आपली कामवासनाही पुर्ण करीत. वरुन आम्ही नाही त्या गावचे म्हणत स्वतःला श्रेेष्ठतेचं आभुषण लावत.
ती समाधानी नव्हती. कारण तिला तिचं अंंतर्मन डिवचत होतंं. ती जेव्हा पोलिसांंच्या वेश्याव्यवसायावर पडणा-या धाडी पाहात असे. तेव्हा तिचं मन म्हणत होतं की हा व्यवसाय आपण बेकारच बंद केला.
ती म्हातारी झाली होती. त्याचबरोबर अंजली आणि प्रतिभाही. प्रतिभाही आज निवृत्त झाली होती. अंजली आणि प्रतिभा समाधानी होत्या. अनधिकृतपणे का होईना, एक वेश्याव्यवसाय सुरु झाल्यानंं समाधानी होती तर दुसरी न्यायालयातून वेश्याव्यवसाय बंंद झाल्यानं समाधानी होती. मात्र सुशिला समाधानी नव्हती. तिला तोच प्रश्न सारखा सतावत होता समाजमान्यतेचा. जी समाजमान्यता तिच्याच उपद्वव्यापानं न्यायालयानं कायमची बंद केली होती.
अर्शदचा अजूनही शोध लागला नव्हता. तिच्या नजरा शोधत होत्या त्याला. परंतू अद्यापही त्याचा शोध लागला नव्हता. तो शोध लागला नसल्यानं ती आजही
चिंताग्रस्त होत होती. अजूनही बदल्याची भावना रुजत होती तिच्यात नव्हे तर आज त्या बदल्याचं भावनेचं वृक्षात रुपांतर झालं होतं.
तिच्या समाधानी नसण्याचं कारण होतं. त्या वर्तमानपत्रात छापून येणा-या गोष्टी. त्या वर्तमानपत्रात कधी कधी अशाही बातम्या छापून येत. अमूक अमूक मुलींचं महाविद्यालयातून अपहरण झालं वा महाविद्यालयात जातांना अपहरण झालं. आज तिनंच अनधिकृतपणे वेश्याव्यवसाय सुरु केला असला तरी त्याच मुलींच्या अपहरणाच्या बातम्या ऐकल्या की तिच्या मनाची चीडचीड होत असे. वाटत असे की हा वेश्याव्यवसायच बंद व्हावा. परंतू त्याचवेळी तिच्या मनात दुसरा प्रश्न उभा राहायचा. तो म्हणजे समाजाचा आणि त्या वेश्यांचा. वेश्यांना पोट कसं भरता येईल याचा आणि समाजातील गुन्हेगारी वाढू नये याचा. त्याचसाठी ती विचार करुन आपला विचार मनातल्या मनात दाबत असे आणि दुसरे विचार मनात आणत असेे. वसंतात झाडाला पालवी फुटल्यागत. तिचे वाईट विचार शिशिरात वृक्षांची पाने गळल्यागत गळूून पडायचे. तेेव्हाच ख-या अर्थानं तिला समाधान वाटायचं व ती निश्चींत व्हायची अंंतर्मनातून. तोच आनंंद तिला मिळायचा. मात्र त्या जुन्या गोष्टी आठवल्या की तिच्या डोळ्यातून अजूनही अश्रुधारा वाहात. त्या अश्रुधारा बंद होत नसत. जणू त्या अश्रुधारांची नदी होते की काय अशीच भिती वाटायची पदोपदी.
आज सुशिला जगात नव्हती. कारण तिला एड्स झाला होता. ती एड्स नावाच्या महाभयंकर आजारानं मरण पावली होती. परंतू ती वेश्यांची धात्री बनली होती. कारण तिच्याचमुळं काही काळ दुःखी झालेल्या स्रिया, आज काही काळानं का होईना, तसेच अनधिकृतपणे तिनं वेश्याव्यवसाय सुरु केल्यानं त्यांना काम मिळालं असल्यानं सुखी झाल्या होत्या. त्यामुळं तिच्या जाण्यानंही तो वेश्यासमाज आज तिचं आभारच मानत होता. जणू ती पुढील काळात त्यांच्यासाठी बोध ठरली होती.
आजही अपहरणं बंंद झाली नव्हती. आजही महाविद्यालयातील मुली बेपत्ता होतच होत्या. कोणी अर्शदसारखी मुलं आजही प्रेमाचं जाळं टाकतच होते. तसेच त्या महाविद्यालयात कोवळ्या मुलींना फूस लावून पळवत होते. जणू अपहरण करीत होते त्यांचे. तसेच आजही काही काही पती नवरेेपणाचा आव आणून आपल्या पत्नींना विकत होते वेश्यालयात. अन् आजही काही नवरेे हाकलून देत होते आपल्या बायकांना. शेवटी त्या स्रियाही पतीनंं हाकलून दिल्यास पोट भरण्यासाठी वेश्यालयाचा मार्ग पत्करत होते. इतकच नाहीतर या बायका वेश्या बनून का होईना, आपल्या पायावर उभ्या होत होत्या.
अपवाद काही महाविद्यालय तरुणी आज हुशार झाल्या होत्या. त्या अर्शदसाारख्या मुलांच्या प्रेमजाळात फसत नव्हत्या. तशाच काही पत्न्याही हुशार झाल्या होत्या. त्याही अंजलीसारख्या पतीच्या गुलामीत वावरत नव्हत्या. तसेच त्या रुख्मासारख्या जमीनदाराला दुसरी पत्नी करण्याला मंजूरी देत नव्हत्या. तर त्या मुली पत्नी बनल्यानंतर आपल्या पतीला आपल्या बोटाच्या करंगळीवर नाचवत होत्या. ज्याला समाज पतीला त्याच्या पत्नीनं गुलाम बनवलं असं म्हणत होतं. परंंतू त्या पतीला गुलाम बनवत नव्हत्या, तर त्यांनी रुख्मा, अंजली आणि विशेषतः सुशिलापासून बोध घेतला होता. आपलं जीवन सुखकारक बनविण्यासाठी. वेश्या म्हणून जीवन जगण्यासाठी नाही. त्यांना रुख्मा, अंजली आणि सुशिलाचा इतिहास माहीत होता. ज्या इतिहासातून बरंच शिकण्यासारखं होतं.
फोनचा शोध लागला होता. त्या फोननं नवी क्रांती झाली होती. आज याच वेश्यांना अगदी इज्जतीनं फोनवर बोलावलं जात होतं. कुणीही कुणाला वेश्या म्हणून हिनवत नव्हतं. तिलाही आज चांगले दिवस आले होते. वेेश्या संपली होती. तिला नवीन स्वरुप प्राप्त झाले होते. नवं नावही मिळालं होतं. तिला कालगर्ल म्हणत होतेे.
आज फोनचा शोध लागला. त्या फोनच्या युगात नवी क्रांती झाली होती. नवं स्वरुपही प्राप्त झालं होतं. इज्जत अब्रू सारंच मिळत होतं. नवं नाव मिळालं होतं. वेश्यांच्या झोपड्याऐवजी तिथं महाल तयार झाले होते. परंतू तरीही काही लोकं त्यांना वारांगनाच समजत होते. म्हणत होते आणि मानतही होते. फरक एवढाच होता की हे बोलतांना त्यांच्या तोंडावर बोलत नव्हते. लपूनछपून ते शब्द वापरावे लागत असत. कारण कायद्यासमोर त्याही समान होत्या. त्यांनाही जीवन जगण्याचा अधिकार आहे असे कायदाच सांंगत होता. जसे राजालाही मागं दुषणं देतात तशासारखे.......

*************************************************************************समाप्त*****************

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED