मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 10 jay zom द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 10

10


,दिवसाच्या स्वच्छ प्रकाशात सुप्त पावलेल्या त्या अघटित शक्तिंचा रात्रीच्या काळोखात अभद्र मृत्यूंजय खेळाचा नंगानाच सुरु झाला होता.

तिस-या मजल्यावर नरहर पंतांच्या खोलीत
फरशीवर बहादूरच सताड उघड्या डोळयांच प्रेत पडल होत.

तोंडाचा आ - वासला होता. डोळे मरण्या अगोदर काहीतरी भ्याव द्रुष्य पाहील्यासारखे विस्फारले होते.
आपल्या सर्वाँकडेच पाहत होते..

जसच्या तस ते प्रेत खोलीत खाली पडल होत.

बहादूरची निर्जीव नजर त्या पेंटिंगवर खिळली होती..
ज्यात नरहरपंतांच कोरलेल फोटो होत. आणि खालची ती घोडाखुर्ची आपोआप मागे पुढे होत मंद गतीने झुळत होती.

जणु त्या खुर्चीवर कोणितरी बसल असाव!

सुर्यांंशला राहायला दिलेल्या खोलीत .

तो पलंगावर झोपला होता. पन डोळे मात्र उघडे होते...
त्याला झोप लागेल तर ना ? त्याच्या डोळयांसमोर
राहून राहून आनिषाचा तो हसरा चेहरा येत होता.
ज्याने त्याच्या गालावर एक हसू फुलल होत.
आनिषाकडे तो आकर्षीत होत होता.

पन हे आकर्षण वासनेच नव्हत , त्यात प्रेम होत !
ही भावना वासनेची नव्हती , ही भावना काळजी,हूरहर, मनातली धकधक, तिला पाहण्याची उत्सुकता - हे सर्व प्रेमाचे विकार होते ना ? आनिषाच ते हात मिळवण, त्याच्याकडे पाहून हसण- सर्वकाही पुन्हा पुन्हा आठवून
तो एकटाच वेड्यासारखा गालात हसत होता.

नेहमीच शांत , शुन्यात राहून बोलणारा हा आर्यंश ..दोन दिवसांत त्याच्या मध्ये अस अचानक बदल घडला होता ? ते म्हंणतात ना ? प्रेमाची ताकद ब्रम्हास्त्रापेक्षा जास्त आहे, तेच खर !

सुर्यांश एकटक वर छताकडे पाहत होता..
आणी त्या छतावर एक चौकोणी गुलाबी रंगाचा
पडदा उमटलेला ज्यावर आनिषा दिसत होती.

तो तिकडे पाहण्यात गर्क झाला होता .. तोच

एक आवाज आला..

" धप, धप, धप !" जस की कोणीतरी दुस-या मजल्यावर धावतच आहे !
त्या आवाजाने सुर्यांशची तंद्री भंग पावली ..
पलंगावरून उठून तो दरवाज्यापाशी आला..
दरवाज्याच्या की-होल मधुन त्याने बाहेर पाहिल..

त्या बारीकश्या छिद्रातून समोरची ब्ंद दरवाज्याची रूम दिसत होती.. पाच सहा सेकंद काहीच झाल नाही ! ना तो आवाज नाही काही हालचाल.

तस आर्यंशने त्या छिद्रावरून नजर काढून घ्यायचं ठरवलं ..तोच समोरच्या बंद दरवाज्यासमोर एक पाठमोरी आकृती आर्यंशला उभी दिसली..

त्याच्या कपड्यांवरून आर्यंशने त्याला ओळखल..
तो जखोबा होता.

त्याला पाहताच आर्यंश जागेवरून उठला.
त्याला त्या म्हाता-या जखोबाशी काडी इतकही घेणदेण नव्हत.

की तो इतक्या रात्री कुठे गेला असावा ?काय करत असावा ? हे प्रश्ण त्याच्या मनात येतील.

तसा तो पुन्हा बेडवर पडला..


XXXXXXX

आबांचा वाडा!


" शूशश्श्श... आवाज नका करू आबा ! "

सुर्यकांतराव - नामदेव आबा , दोघेही पलंगाखाली लपले होते. सुर्यकांतरावांचा चेहरा भीतिने पांढरा पडला होता.

कपाळावर घामाचे बिंदू जमा झाले होते.
सुर्यकांतरावांना काहीतरी संशयास्पद दिसल होत खास , विहीरी पुढे असलेल्या कंपाउंडच्या भिंतीखाली एक काठी जमिनीत रोवुन त्यावर कलिंगडा सारख शंकरच धड त्यांनी अटकले पाहिल होत.

जे पाहून त्यांची नशा खाडकन उतरली होती.

काहीदिवसांपासून देवपाड गावात घडणा-या विचीत्र घटनांना पाहून त्यांनी जी तक्रार ललिताबाईंकडे करायच ठरवल होत ! त्याचेच हे पडसाद तर नव्हते ना ?

त्यांनी पिसाळलेल्या सापाच्या बिळात हात घातला..होता. पन तो डसेल ? त्याच्या दंशाने घडणार पुढील मृत्युयोग ह्या सर्वाँच विचार करायचं ते विसरले होते ! आणि हाच विसरभोळ पणा त्यांच्या जिवावर बेतला होता..

पंतांच्या हवेलीत असलेल ते ध्यान मालकाच्या हुकूमावरून दोघांच जिव घ्यायला आल होत.

" माती खाल्ली आबा माती खाल्ली !"
सुर्यकांतरावांनी कपाळावर हात मारल..

नामदेव आबांनी सुर्यकांतरावांकडे पाहिल..


" आबा आपण चुक केली , बेजबाबदारपणा नडला आपल्याला ..!आपण त्या हवेलीबद्दल आवाज उठवणार होतो , ज्या हवेलीत एक सैतान आहे , ज्याने त्याच्या काळ्या मायावी शक्तिने कित्येक तरी प्राण घेतले आहेत . "

आबांनी होकारार्थी मान हळवली.

" आण आपण एक सामान्य माणूस आहोत..ज्याच त्या सैताना समोर काडीचही निभाव लागणार नाही ! आबा ..आपण कसलीच उपाययोजना न करता , असंच बिनधास्त पित बसलो ..आणी तिकड ते आपल्याला मारायच खेळ रचून मोकळ बी झाल आबा! त्यान तर डाव बी टाकल आहे ...! , माती खाल्ली आबा आपण माती खाल्ली."

सुर्यकांतराव नामदेव आबा दोघांनाही आपली चुक लक्षात आली होती.

पन आता काही फायदा नव्हता ! मुळीच नव्हता..कारण यमाच्या रुपात साक्षात सैतान आला होता.
जो आता त्या दोघांच जिव घेतल्याशिवाय राहणार नव्हता.

" सू-या अगदी बरोबर बोलतोय रे तू ! पन आता काय करायचं!"

" शूशश्श्शssssss!" सुर्यकांतरावांनी आबांकडे पाहत एक बोट तोंडावर ठेवत त्यांना शूश्कारल .

आणी तोच पुढील सेकंदाला खोलिचा ब्ंद दरवाजा धाडकन उघडला..

ह्या दोघांच्याही घाब-या नजरा दरवाज्यात वळल्या..
दाराच्या चौकटीत दोन पाय उभे होते.

नग्न स्त्रीची पावल, पायाच्या बोटांवर लाल रंगाची लाली लावली होती. तर दोन्ही पावलांच्या मध्यमावर चांदीची पेरवी घातली होती. आणि वर चांदीचे पैंजण, आणी त्या पैंजणां वर हिरव्या रंगाच लुगडा दिसत होता.

" अरे ए सू-या? ही तर माझी बायको आहे ! आणि तू काय वंगाळ वंगाळ सांगून घाबरवीत बसतो रे !"

आबा अस म्हंणतच पलंगाखालून बाहेर निघू लागले.
तोच सुर्यकांतरावांनी त्यांना थांबवल..

" थांबा आबा ! वहिनी तिर्थयात्रेला लेय लांब गेली आहे ती इतक्यात कशी येइल.., आणि देवधर्म मानणारी बाई ती अस अमुश्याच्या रातच्याला येणार हाई व्हय ?"

सुर्यकांतरावांच म्हंणन आबांना पटत होत.

" आर मग , ती दारात उभी आहे ती कोण आहे . आण तस्ंबी भिंग-या शंकर असंच कोणत्या बी बाईस्नी इतक्या रातच्याला वाड्यात सोडतील व्हय!"

" दारात उभी वहिना न्हाई आबा ! ते काहीतरी येगळच हाई , आण शंकर भिंग-याच म्हंणाल..तर "

सुर्यकांतरावांनी आवंढ़ा गिळला..

" तर त्या दोघांच बी म्हड पडल असल अताला!"
हे वाक्य म्हंणताना सुर्यकांत रावांच सर्व शरीर थरथरत होत. आणि ते ऐकणारे आबा .. गारठले होते.

" अहो sssss!" मध्येच एक ओळखीची प्रेमळ हाक आली. तो आवाज ऐकून आबांच्या चेह-यावर जरासा आनंद झळकला..

" बघ , बघितलस तू ? ही आमची मालकीण ...आनि तुझी वाहिनीच आहे ! काय भैताड येऊन उभ राहिल न्हाय बघ .. ! चल बाहेर ये !" आबा पलंगाखालून बाहेर निघले..

एक कटाक्ष दरवाज्यात टाकला..

समोर चौकटीत भिमाक्का उभी होती.

शरीर यष्टीने जाडी असल्याने तिची उंची साडे चार फुटच होती.

अंगावर हिरवा लुगडा होता , त्याच लुगड्याने डोक झाकल्याने चेहरा काही दिसत नव्हता .

पन साडीतून दिसणारे हात -पाय ?

समजा एका जिवंत माणसाच मृत्यु झाल आणि प्रेत चौवीस घंटे होऊन ही आग्नित विलीन झाल नसेल ..

तर तेव्हा त्या कलेवराची त्वचा हळू हळू फिकट पांढरा रंग धारण करते . पुर्णत त्वचा थंडगार राखाडी , दुधाळ होते..

तसंच , भिमाक्काची त्वचा पांढरी राखाडी पडली होती..

पदराने झाकलेला अर्धा चेहरा , उर्वरीत उघडा भाग ते काळसर रक्त शोषून गेलेले ओठ दाखवून देत होते , नाक चेटकीणीसारख लांब झालेल होत.

दोन अगडबंब सैल सोडलेले हात , ज्यांत हिरव्या बांगड्या होत्या. त्याच हातांची नख कालपट पडली होती..

कोठुनतरी घाणेरडा कुजकट वास येत होता..
की भिमाक्कांच्या अंगातून येत होता?

" काय हो मालकीण बाई कधी आलात ?"
आबा चालत दरवाज्यापाशी आले..

त्यांच्या पुढ्यात दाराच्या चौकटी बाहेर हिरव्या लुगड्यात भिमक्का उभी होती.

सूर्यकांतराव सुद्धा पलंगाखालून बाहेर आले..
ते जरा भीतच भिमक्काकडे पाहत होते.

" व..व...वहिनी ? तू ..तु..अशी अचानक कशी आलीस !"

डोक्यावर असलेल्या पदरासहित भिमक्काची मान डाव्या बाजुला वळली..वळतांना हळकाच एक हाड वाजल्याचा आवाज झाला..

'कट '

" आताच आले !" थंड हळूवारपणे बोलता स्वर.

" ए सू-या तू एक काम कर ? आता घरी नको जाऊ आजची रात्री वाड्यातच काढ़ झोपायला खाली एक खोली आहेच !"

आबा म्हंणाले.

( कट सीन - त्यांच्या पत्नीची ती दुधाळ कांती पाहून त्यांची वासना उफाळून वर आली होती. त्या वासनेला क्षमवण्यासाठी सुर्यकांतरावांची उपस्थीती त्यांना नको होती.)


" हो हो !" खर तर अइच्छेनेच त्यांनी होकार दर्शवला.
कारण दारात उभ्या त्या भिमक्काना ओलांडून बाहेर जायला त्यांच्या शरीरातून अर्धा प्राण निघून गेल्यासारखा त्यांना भासत होता.

हिम्मतच होत नव्हती.

मनात राहून राहून धोक्याची घंटा खणखणत होती.
त्या घंटीचा आवाज म्हंणजे ढोलसारखा होता.

" आर जा की लेका ! झोपू दे आम्हाला बी !"

" हो ..हो..!" सुर्यकांतरावांनी धीर करत पाच पावल चालून दाराची वेस ओलांडली..एक पाऊल दार बाहेर टाकल..

" स्स्स्स्स्स्स्स्स्स!" त्याचक्षणाला भिमक्कांनी एक मोठा श्वास घेतला..

सुर्यकांतरावांची पावले भीतीने जागीच गोठली..

' टिंग.. टिंग टिंग...तोँग तोँग.तिन्ग..टिंग..'

त्याचवेळेस नामदेवआबांचा फोन वाजला..

खिशातून फोन काढून त्यांनी रिसिव्हर ऑन केल आणि फोन नेहमीप्रमाणे स्पीकवर ठेवत बोलू लागले.

" हा हाल्लो, कोण बोलतंयं?" अद्यात कॉल असल्याने ते म्हंणाले.

" अं हेल्लो! तुम्ही मिस्टर नामदेव का ? "

" होय मीच बोला की !"

" मिस्टर नामदेव मी इन्स्पेक्टर निलकंठ कालपाडा हॉस्पिटल मधून बोलतोय हे पाहा तुम्ही स्वत:ला सांभाळा , तुम्ही स्वत:चा धीर खचू देऊ नका ! कारण आता मी जे काही सांगणार आहे त्याने तुम्हाला नक्कीच त्रास होइल..हे पाहा सहा तासांअगोदरच घाटात एका ट्रेव्हल बसच अपघात झालंय आणि त्यात तुमच्या मिसेस मय्यत पावल्या आहेत ."

नामदेव आबांच्या हातून फोन गळून 'टक ' आवाज करत खाली फरशीवर पड़ला.

ह्याक्षणाला त्यांनी आक्रोश करायला हव होत ..
हंबरडा फोडायला हवा होता , दुखी भावनांचा उद्रेक व्हायला हवा होता.

पन त्यांच्या चेह-यावर दुख,आक्रोश, ह्या भावनांमधली एक किंचीत्शी पुसट रेषा सूद्धा उमटली नव्हती..

तर त्या उलट त्यांच्या चेह-यावर आश्चर्य, भय, नवल , भीती , ह्या सर्वाँच स्फोट झाला होता..

खाली फरशीवर पडलेला , फोन अद्याप स्पीकरवर असून कॉलिंग सह सुरु होता ..

" मिस्टर नामदेव तुम्ही स्वत:ला सांभाळा , आणि हो तुमच्या मिसेसची प्रेत हॉस्पिटलच्या मॉर्ग आई मीन शवागारात ठेवल आहे , ते तुम्ही उद्या सकाळी घेऊन जा !"

" हिहिही..हिहिहि.हिह!" दरवाज्यात डोक्यावर पदर घेऊन उभ्या असलेल्या त्या प्रेताचे काळसर ओठ फाकले..आणि एक हसू घुमल..

डाव्या बाजूचा बलदंड हात हळला..आणि त्या हाताने सुर्यकांतरावांची मान पकडली..

" आ..आ..अहा..हाहा..! सोड ....सोड मला, " सुर्यकांतराव त्या निर्जीव प्रेताच्या हातावर आपला हात मारू लागले...

पन प्रयत्न असफळ होत होते.
मानेवरची पकड गच्च गच्च होत चाल्ली होती.

हातांची कालपट नख , नरड़ फाडून आत घुसत होती.
रक्ताची हलकीशी धार , गळ्यावरून खाली येत फरशीवर पडत होती.

" आ..अब..आबा..वाच..वाच्वा..!"

सुर्यकांतरावांनी एक हात आबांकडे उंचावून मदत मागितली.. ..

तस ते एक पाऊल पुढे सरसावले तोच ..त्या प्रेताने आबांकडे पाहील..

न जाणे कोठून एक हवेचा झोत आला..
आणी भिमक्काच्या डोक्यावरच पदर उडाल..

भयाण! काळजाच ठाव घ्याव , अस भयप्रदरूप होत ते ..

डोक्यावर मधोमध टाळूवरची कवटी फुटली होती ,
त्यातून पुरासारख रक्त बाहेर पडल होत..केस लाल रक्ताने भिजले होते.. तर त्याच रक्ताने कपाळावर रुपयाएवढ़ा मळवट भरला होता..

जास्त वेळ निघुन गेल्याने लाल रंगाच रक्त काल होऊन तोंडाला चिकटल होत.

केस सुद्धा चेह-यावर चिकटून बसले होते.

दोन्ही डोळ्यांमधले बुभळ निळ्सर कचकड्याचे बाहुलीसारखे दिसत होते.

त्वचा प्रेताड दुधाळ रंगाची होती.

हसतांना फाटलेला जबडा बत्तीसच्या बत्तीस दात दिसत होते.

" वाचव वाचव ह्याला म्हाता-या ,!"
घोगरा खोळ गेलेला आवाज , धारधाद पुरुषी स्वराची जोड असलेला.

भिमक्काच्या प्रेताने सुर्यकांतरावांना एका हताने अलगद ऊचल्ल .

त्यांचे दोन्ही पाय जमिनीपासून एक फुट वर होते..

आता मात्र श्वास कोंडला होता.

काळे बुभळ थेट वर जाऊन पांढरट बुभळ दिसत होते..

जिभ सरड्यासारखी बाहेर आली होती.

पाय मागे पुढे हळत होते..

" हा हा हा हा हा , नाम्या बघ कसा बाहुल्यासारखा हळतोय बघ हा , नाम्या..बघ ? मजा येते ना मजा येते ना ?हिहिहिहिहिहीही!"

शरीर स्त्रीच आणि आवाज मात्र पुरुषी !
नामदेव आबाच्या हाडांतून प्राण निघुन गेला होता , नजर मेली होती, मेंदू बधीर झाला होता ! हात पाय दगडाचे झाले.. होते आणि हूशारी नाहीशी झाली होती.

एकदम निर्जीव पुतळया सारखे ते समोर घडणार अमनविय शक्तिचा तमाशा पाहत होते.

त्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे दुसरा काय पर्याय होता ?
तसंही ते साधारण मानव होते ! दैवी शक्ति मंत्र, तंत्र शिकलेले अभ्यासू कोणी पुजारी असते तर त्यांनी त्या शक्तिशी लढ़ा नसता दिला का ?

सुर्यकांतरावांच्या शरीराची हाळचाल थांबली,
हात पाय खाली जमिनीच्या दिशेने स्थिरावले..

तोंडातून जीभ बाहेर लोंबत होती, कान नाक ह्या भागांतून लालसर रक्ताची हलकीशी धार बाहेर येत होती.

" मेला ..मेला .. तो.. खिखिखिखी!" जिन्याच्या पायथ्याशी तीन चार अतृप्त आसुती आनंदाच्या भुकेलय काळ्या सावल्या उभ्या होत्या.

हा मृत्युचा तमाशा पाहत होत्या..
टाळ्या पिटत तर कधी लहान मुलासारख्या हसत खिदळत उड्या मारत , टाळ्या वाजवत होत्या.

त्यांच्यातलाच एक जण म्हंणाला होता.
त्याचा तो किन्नरी आवाज नामदेव आबांनी ऐकला होता.

" ए ह्या म्हाता-याला पकड , हाडांची माळ बनवून गल्यात घालू ! हिहिही!" पहिला आवाज..

भिमक्काचा प्रेताने फ़क्त मान हलवली.

" नको रे ह्या म्हाता-याला मारून पंख्याला लटकवू! मस्त भिंगरी सारख भिंगल हा रात्रभर , हिहिहिही ,खिखिखी..!"

" न्हाई ...! मालकाणी फ़क्त मसाला खायला सांगितलाय ..! बाकी म्हढ चांगला ठेवायचं ? समजल ना ?"

तो तिसरा आवाज आज्ञाधारक होता.

भिमक्काचे कचकड्याचे डोळे नामदेवआबांवर स्थिरावले..! तिच्या ओठांवर आसुरी हास्य उमटल..

ते निळसर कचड्याचे डोळे हळुच चकाकले..
आणी तिने जागेवरून एक झेप नामदेव आबांच्या अंगावर घेतलो..

" आ..आ...आ......"

नामदेव आबांच जुनाट दोन मजली वाडा बाहेरून अगदी दिमाखात उभा दिसत होता...तोच एक किंकाळी बंगल्यातून बाहेर पडली...आणि काही सेकंदातच हवेत विरून ही गेली..

पुन्हा एकदा सर्वकाही शांत झाल ! जस की काही घडलच नाही.

XXXXXXXXXXXX

तीच ती खोली , शेणाने सारवलेली - त्यावर एक हवन एक कुंड पेटलेल, हवनकूंडातून लाल रंगाची आग वाकडीतिकडी दिड उंचांपर्य्ंत येत पेटत होती.


आणि त्याच लाल रंगाच्या आगीचा प्रकाश संपूर्णत खोलीत विषासारखा पसरला होता.

हवनकूंडासमोर तीच ती काळी साडी घातलेली म्हातारी बसली होती.

डोक्यावरून काल पदर , हातात आणि गल्यात चांदीचे दागिने - आणी तीन चांदण्यांच हिरव गोंदन सुद्धा होत..

" हवनकूंडासमोर मांडलेल्या , त्या तीन काळ्या बाहुल्या ! ज्या बाहुल्यांवर प्रथम सूर्यकांतरावांच पासपॉर्ट साईज फोटो लावला होता ...दुसरा नामदेव आबांचा होता..आणि शेवटला तुकडो पुजारी बाबांचा अशा ह्या तीन बाहूल्यांमधल्या दोन बाहुल्या हिरवट रंगाच धुर सोडत जागेवरच जळू लागल्या..

हिरवट रंगाच खवखवत धुर खोलीत पसरल..

" ही एक बाहूली?" तो किंन्नरी खर्जातला आवाज..

त्या म्हातारीने आपला डावा हात वर हवेत धरला...
त्याची मुठ ब्ंद केला

" ... ! ए...ड...का...! ...." ती हळूवारपणे म्हंणाली.
तीचा खर्जातला आवाज भयप्रद होता..

" ये......ये.....ए.....ड.....का मसणातल्या मातीचा पितरांचा...नैवद दावते तुला...! ये...एडका...ये...!"

त्या खोलीतल वातावरण बदलू लागल..
आति उष्ण धग जाणवू लागली, हवनकूडातल्या लालसर आगीचा तीन फुट उंच हवेत भडका उडाला.. !

वाकड्यातिकड्या हिरव्या रंगाच्या धुळीकणांचा फेसाळता धुर पुर्णत खोलीत फिरू लागल.. आणी तो आला..

एडका...आला..

हवनकूंडाच्या एका बाजुला ती हिरवट धुळीकण फिरत होती..

तर दुस-या बाजुला ती म्हातारी बसली होती.


" एडका ? ह्या भटाची बाहुली का जळत नाहीये ?
त्याच म्हढ पाडल नाहीस व्हय तू ?" त्या म्हातारीच्या तोंडून किन्नरी स्वर बाहेर पडल...

" त्या रांxxच्याने कायतरी शिंपडल माझ्यावर ,
माझ वस्त्र जळल , माझ देह भाजल ...भाजल..माझ देह ! "

" काय ?" अविश्वस्नीय स्वर .

" त्या साधारणश्या थेरड्याकडे कुठून आली रे सिद्धी ! ह.ह.ह.ह..ह.! " ती जोरजोरात हसत होती.

" तो म्हाद्या आला..म्हाद्याने ..वाचवल त्याला..! "

एडकाच हे वाक्य ऐकून अचानक ती हसायची ...थांबली..

" हम्म , बरोबर आहे तुझ ! तो दगडच आल अशणार , नाहीतरी त्या थेरड्याची अर्धी लाकड मसणात गेल्यात तो काय सिद्धी मिळवणार ! पन उद्याचा दिवस आपल्याला सावध रहायला लागल, चार म्हढ पाडलेत आज ! पुर्णत दिवसभर मसाण पेटणार आहे. आणी तो वाचलेल्या थेरडा काय गप्प बसणार नाही , " त्या म्हातारीने दात चावले..

" उद्या ती हवेलीत येतील...! तो ठेंगण्या घेऊन येईल गाववाल्यांना , संमधी हवेली गवसतील.. ती .

आणि ती इथ आल्यावर तू एक काम करायचं ! त्यांना बिल्कुल संशय येऊन द्यायचं नाही , काय ?"

त्या शेवटच्या श्बदांवर जोर दिला होता.

" ठीके! मी काय नाय करणार , पन बाबा ? बाबाने तर एकाच( बहादूरच ) काटा काढलंय ना तेव्हा तर समजेलच ना .. हिहिहिहिहिह"

" नाही समजणार !" ..एवढ वाक्य बोलून होताच..

अचानक ' धाड ' आवाज होत..खोलिचा दरवाजा उघडला..

त्या म्हातारीने फक्त आपली मान हळकेच तिरकसपणे वळवली... तिच्या काळसर ओठांवर छद्मी हास्य पसरल..

उघड्या दरवाज्यातुन बाहेरचा प्रकाश आणि धुक आत मिश्रित होऊन आत येत होत..

त्याच धुक्यातून एक आकृती चालत आत आली..
अंगात फुल बाह्यांचा सदरा , खाली पांढरी शिवलेली पँट..

आणी डाव्या हातात एक विझलेला...कंदील..होता.

तोच कंदील ती आकृती हळू हळू.. आपल्या चेह-यावर घेऊन आली..

तसा त्याचक्षणी तो कंदील निळ्सर रंगाचा प्रकाश फ़ेकत पेटला..!

चेहरा बहादूरचा होता ! - पन त्याच आत्मा कधीच त्याच देह सोडून मुक्तीच्या मार्गावर निघुन गेल होत.

त्याच्या ऊरलेल्या बाहुलीसारख्या निर्जीव देहात आता
नरहरपंतांच्या मलिन आत्म्याने कब्जा केला होता..

म्हंणूनच तर चेहरा चुना पोतल्यासारखा आणि डोळे बेडकासारखे हिरवे झाले होते. ओठांना काळसर रंग प्राप्त झाल होत. आणी दात - हिरड्या नासले होते..मुखातुन कफ ,कित्येक वर्ष दात न घासल्यासारखा घाणेरडा वास बाहेर येत होता.

" मी आलो नरहरपंत उर्फ बहादूर.. हिहिहिहिही,खिखिखी..खी..! "


क्रमश :....

..प्रकाश विझता..

... काळ माजला.. !

तयात ... नाचू

अंधार.. लागला.....!

चित्ता पेटून...

आस्थी उरल्या.....!

..
......