Moksh - 14 books and stories free download online pdf in Marathi

मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 14

समर्थ कृणाल आणी सैतान येहूधी.


भाग 37
सीजन 3

पंतांचा झपाटलेला वाडा... ep 16


महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्वकाही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी

फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत🙏

ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह मेसेज आणि वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल!



" ... चला ...चला ...!"

दहा बारा गावक-यांचा ताफा ... पंतांच्या वाड्याच्या गेटसमोर उभा होता. सर्वात पुढे गेटसमोर अंगावर भगवे वस्त्र परिधान केलेले तुकड़ो पुजारी उभे होते.





काळ्या लोखंडी सळ्यां च्या गेट आत , दोन पहारेकरी हातात काठ्या घेऊन उभे राहिलेले.

" काय ओ बाबा ? इतकी सगळी मांणस घेऊन कशाला आला आहात इथ?"

गेटसमोर उभा राहीलेला तो रांगड्या देहाचा पहारेकरी जरा नापसंतीच्या सुरातच म्हंणाला.

जणु तुकडो पुजारींची आणि गावक-यांची उपस्थिती त्याला आदवडली नव्हती.

" बाईसाहेबांशी जरा महत्वाचं बोलायचं आहे ! तू जरा एवढ निरोप पोहचवतोस का?" तुकड़ो पुजारी शांत स्वरात म्हंणाले.

त्यांच्या त्या वाक्यावर त्या पहारेक-याने आपल्या दुस-या साथीदाराकडे पाहिल.

डोके होकारार्थी हलवून एकमेकांशी त्यांनी न जाणे काय ईशारे केले ते त्यांनाच ठावूक !

"हो थांबा जरा ! मी निरोप देऊन आलो ? ए तू लक्ष ठेव .." तो पहारेकरी हातात काठी घेऊन तसाच वाड्याच्या दिशेने गेला....

बागेच मार्ग संपवून , वाड्याच्या दारात पोहचला..आणी दारातच उभ राहून ...आत जे कोणि होत त्याच्याशी मान हळवून बोलू लागला..



गेटबाहेर उभे असलेले सर्वगावकरी... पुजारी बाबा त्या पहारेक-याला दरवाज्या पल्याड उभ्या कोणीतरी उभ होत त्याच्याशी बोलतांना पाहत होते...

पन दरवाज्या आत नक्की कोण उभ होत? हे मात्र तुकड़ो पूजारीँना दिसत नव्हत.

काहीवेळ असंच निघुन गेल ...

आणि मग तो पहारेकरी दरवाज्यात उभ्या त्या अनोळखी इसमाशी संवाद चर्चा ब्ंद करून पुन्हा ह्या सर्वाँच्या दिशेने चालत आला..



तुकड़ो पुजारी गावकरी त्या पहारेक-याची वाटच पाहत होते.

" काय झाल ? काय म्हंणाल्या बाईसाहेब !"
तुकड़ो पुजारींनी विचारल.

" नाय भेटणार बोलल्या..मालकीणबाई ! कामात आहेत त्या, वेळ नाही त्यांना .. ! चला या तुम्ही आता .."

उद्धट कडवट स्वरात तो पहारेकरी म्हंणाला.

त्याच्या त्या उद्धट बोलण्याचा गावक-यांना राग आला होता..

तस एक गावकरी जरा चिडत म्हंणाला.

" ए तू गेट खोल रे , आम्हाला बाईसाहेबांशी लेय महत्वाच बोलायचं आहे ! "


तो गावकरी म्हंणाला.


" हो ..हो...हो . बरोबर आहे...!"
बाकीच्या गावक-यांनी सुद्धा दुजोरा दिला..

" ए लायकीत रहा साल्या , बाईसाहेबांनीच सांगितल आहे मला ! त्याच म्हंणाल्या ..की माझ्या कड कोणाला बी भेटायला टाईम नाय ..!"

" काय ?"

गावक-यांचा त्या पहारेक-याच्या बोलण्यावर विश्वासच बसला नव्हता.

गावक-यांच्यात एकमेकांमध्ये कुजबुज सुरु झाली.

" हा पन आम्हाला लेय महत्वाच बोलायचं आहे त्यांच्याशी, दोन मिनिट जरी बोलायली भेटली तरी चालल..!"

गावक-यांमधला एक जन म्हंणाला.



" ए तूम्हाला एकदा सांगितलेल समजत नाही का ! "

तो पहारेकरी रागामे भडकला.

" निघा म्हंटला ना , निघा इथून... नाहीतर!"

" नाहीतर काय रे ?"

दोन झापांच्या त्या गेटवर गावक-यांनी आप-आपले हात ठेवले ..जणू गावकरी ते गेट तोडणार होते.





" थांबा गावक-यांनो !" इतकवेळ गप्प बसलेले तुकड़ो पुजारी मध्येच म्हणाले ....

त्यांच्या आवाजात जराशी धार होती.

तो आवाज ऐकून सर्व गावक-यांनी मागे पाहिल..

मागे तुकड़ो पुजारी उभे होते..
शांत चेह-याने त्या सर्वाँकडे पाहत होते..
" भांडण मारामारी करून काही उपयोग होणार आहे का? "


तुकडो पुजारी शांत स्वरात म्हंणाले.

त्यांच्या प्रश्नावर गावक-यांकडे उत्तरच नव्हत..म्हंणूनच ते शांत उभे होते .


तो पर्य्ंत तुकड़ो पुजारी गावक-यांच्या चेह-यावर एक एक कटाक्ष टाकत पाहत होते.

त्या सर्वाँचे चेहरे जमिनिकडे पाहत होते.
माना खाली झुकल्या होत्या..

काहीवेळ थांबून पुजारी बाबा पुढे बोलू लागले..




" गावक-यांनो , अस भांडण - हाणामा-य करून काहीही साध्य होणार नाहीये ! जर हा पहारेकरी म्हणतच आहे , की बाईसाहेब त्यांच्या कामात व्यस्त आहेत , तर आपन नंतर कधीतरी येऊ , चला !"

पुजारीबाबांच्या वाक्यावर सर्व गावकरी मुकाट्याने गेटपासून बाजुला झाले ...आणि एक एक करत जाऊ लागले.

पुजारी बाबांच्या जवळून चाळत सर्व गावकरी पुढे निघुन जातांना दिसत होते.

गेटआत उभा असलेला तो आडदांड यष्टीचा पहारेकरी मोठ्या गर्वाने मान ताठ करून त्या सर्वाँना पुढे जातांना पाहत होता.

हवेलीतल्या दुस-या मजल्यावरच्या एका
उघड्या खिडकीत आर्यंश उभा होता.

दुपारच्या रणरण त्या पिवळ्याजर्द उन्हाचा प्रकाश सर्व दिशेने पडलेला...तोच प्रकाश त्याच्या चेह-वर ही पडला होता.

मगाचपासून सुरु असलेल हे नाटक त्याने ही

खिडकीच्या चौकटीवर हात ठेवून पाहिल होत - आणी अद्याप पाहत होता !

तुकड़ो पुजारी परत जाण्यासाठी वळले होते..परंतू वळताना ते मध्येच थांबले .

त्यांना अस जाणवल की कोणीतरी आपल्याकडे पाहत आहे .

पुजारी बाबांनी एक कटाक्ष पुन्हा हवेलीवर
टाकला ,तस त्यांना दुस-या मजल्यावर ची ती उघडी खिडकी दिसली..आणि त्या खिडकीत उभा एक तरूण दिसला ...

जो की त्यांच्याकडेच पाहत होता.


तुकड़ो पुजारी आणि आर्यंश दोघांचिही नजरा नजर झाली.

तुकड़ो पुजारींना त्या खिडकीच्या चौकटीवर हात ठेवून उभा आर्यंश दिसत होता.

सुर्याचा पिवळसर प्रकाश त्याच्या चेह-यावर पडलेल.. आणि त्याच्या मागे खोलीतला अंधार दिसत होता..

सुर्याची शुभ किरणे जणू त्या खोलीत पोहचतच नव्हती की काय? खोलीतल्या भिंती काळ्या कोळश्याने रंगवल्या सारख्या दिसत होत्या...

जे पाहून तुकडो पुजारी एकक्षण आर्यंशच्या मागे असलेल्या त्या काळ्या अंधारात एकटक पाहू लागले..

आर्यंशने डोळे बारीक केले ..
त्याला तुकड़ो पुजारी एकटक आपल्याकडेच पाहत असंच जाणवल..

तो जरासा गोंधळला..

तुकडो पुजारींना आर्यंशच्या मागे त्या अंधारात काहीतरी उभ आहे अस जाणवल ...

अगदी ताठ उभ , अंगाणे जेमतेम साडे पाच फुट उंच , जे आर्यंशकडेच पाहत होत...

त्याच्या मनात आर्यंशबद्दल काही वाईट विचार असतील तर ? घातपातासारख काही ?

गंभीर गुढ नजरेने एकटक त्या अंधारात पाहणा-या तुकड़ो पुजारींच्या चेह-यावरचे भाव आता भीतित परावर्तित झाले..

त्या काळ्याश्यार अंधारात जे काही ध्यान उभ होत..

त्याने आता समोर यायला सुरुवात केली होती..
त्याच आगमान महाभयंकर होत.

त्या काळ्याश्यार शाहीच्या अंधारात हळकेच ..
लालसर प्रकाश उमटू लागला..

त्या ध्यानाच्या अंगावर प्रथम एक काळसर फुल बाह्यांचा खाकी कोट , आत पांढरट सदरा होता..

हळुच तो लालसर रंगाचा प्रकाश वर आला..
चेहरा दिसला...

उभट खप्पड चेहरा , वाढलेल्या भुवया , टोकदार नाक, चेह-यावरची त्वचा प्रेताड पांढरीफट्ट, असा नरहरपंतांचा मानवी देहाचा भोग घेण्यासाठी आत्मा तिथे अवतरला होता..

दात विचकत ते ध्यान आर्यंशच्या पाठमो-या आकृतीकडे पाहून मान होकारार्थी हळवत हसत होत , डोक खाली वर करत हळवणारा तो जाडसर भुवयांचा , दात विचकत हसणारा चेहरा ....
सर्वच्या सर्व तुकड़ो पुजारींनी पाहिल होत..

त्यांच्या उभ्या अवस्थेतच अंगातून त्राण निघुन गेले.

नरहर पंतांची अंतयात्रेची तैयारी खुद्द पुजारी बाबांच्या डोळ्यांसमोरच तर झाली होती ना?

उभ्या दिवसा दोनच्या सुमारास कडक उन्हात त्यांच्या प्रेताला मसनात जलतांना त्यांनी पाहिल नव्हत का ?

मग हे काय होत हे ? डोळ्यांना भास तर मुळीच होत नव्हत? छे हा भास मुळीच नव्हता ! हे काहीतरी भयंकर ,तामसी , अकल्पित, मानवी कल्पनेची मज्जा थेर उडवणा-यांमधल होत..

ही पायरी सामान्य नव्हती, ही सीमा मानवी दुनियेतली नव्हती हा दैवी कल्पनेचा चमत्कार नव्हता , मुळीच नव्हता !

मृत्यु झाल्यावर आत्मा मुक्त होते ..दुसर जन्म घेते..मग ती योनी कोणतीही का नाही असो , स्त्री-पुरुष, प्राणी,पक्षी, जमिनिवर रेंगाळणारे सर्प इत्यादी..!

पन इतकी वर्ष हा आत्मा अस मुक्ति न मिळता कस थांबू शकला ? आणी का ? कशासाठी? काही इच्छा आकांशा होता का ?

की काही आसुरी इच्छा जी पुर्ण करण्यासाठी हा आत्मा अस थांबला होता.

तुकड़ो पुजारींच्या छातीत श्वास अडकला..
क्षणार्धात डोळे विस्फारले, कपाळावरून घामाचे ओघळ खाली येऊ लागले..

छातीत धडधडणा-या ठोक्यांसमवेत , ह्दयात एक तीव्र कळ उमटली...डोळयांसमोर अंधारी आली..

मग एक हात हळुच छातीवर गेला...
ओठ त्या वेदनेने दातांमार्फत चावले गेले..


आर्यंशने तुकड़ो पुजारींच्यात झालेला तो बदल पाहिला.

इकडे तुकड़ो पुजारी धाडकन जागेवरच खाली कोसळले..

त्यांना अस कोसळलेल पाहून पहारेक-याने पटकन गेटच्या झडपा उघडल्या..

" अरे ह्याला बघ काय झाल? मेला का काय हा?" एक पहारेकरी..

आर्यंशच्या मागे उभ असलेला नरहरपंतांच मलिन आत्मा , त्यांच्या चेह-यावर लालसर अमानवीय प्रकाश पडलेला..त्याच प्रकाशाच आवरण सोबत घेऊन दात विचकत हसत ते

पुढे पुढे येऊ लागले..

आर्यंशला झपाटायला , पछाडण्यासाठी ते आसुसले होते...त्यांच्या मनात आर्यंशच तरून देह मिळवण्यासाठी हावरटपणा उतपन्न झाली होती..


जिला अंत नव्हता !

" औह शट!" म्हंणत आर्यंशने गर्रकन गिरकी घेतली ..आणि जस तो वळला..

त्याला आपल्या समोर तो दिसला..
आर्यंश त्याला पाहून जागीच थबकला..

" बहादूर !" आर्यंश पटकन म्हंणाला.

हो समोर बहादूर उभा होता..

" जी शाबजी...मीच , ते मालकीण बाईंन चाला( चहाला) बोलावला तुम्हाला !"

बहादूर कसतरी हसत म्हंणाला.

त्याच्या चेह-यावरचे भाव पाहण्या जोग्य होते..

" बहादूर लवकर पाणि घेऊन गेटजवळ ये ..!"
आर्यंश वेगाने खोलितून बाहेर पडला...

जसा तो बाहेर निघुन गेला..

तसा इकडे खिडकीच्या चौकटीत नरहरपंत उभे होते..




तोच खप्पड उभट चेहरा ,जाड भुवया आणि घारे डोळे, टोकदार नाक , आणी त्यांखाली काळ्याशार मिश्या.. ..अंगात सिल्कचा पांढरा सदरा होता..आणी त्यावर चौकलेटी कोट , आणी खाली पांढरट धोतर ..पायांत चामड्याच्या चपली...होत्या

आणी डोक्यावर चौकलेटी रंगाची गांधी टोपी होतू.


एकटक ते डोळे वटारून शुन्य नजरेने,
गेटच्या दिशेने पाहत होते..

तेवढ्यात आर्यंश तिथे पोहचला...

त्याने पटकन तुकडो पुजारीं च डोक आपल्या मांडीवर ठेवल



" एक्सक्यूज मी ! ठिक आहात का तुम्ही ..?"
तुकड़ो पुजारींच्या चेह-यावर वेदना स्पष्ट दिसत होत्या..

त्यांचा चेहरा कोणीतरी गळा आवळल्या प्रमाने लालसर झाला होता.

गाळांवर काळे निळे चट्टे पडले होते...
कपाळावरची हिरवी नस उठून दिसत होती..
डोळ्यांत लालसर रंगाच्या लहान नसा उमटल्या होत्या..


ओठ साप डसल्याप्रमाणे काळसर झाले होते..त्यांना होणारी वेदना भयाण होती..

कारण वेदनेमुळे त्यांनी आपले ओठ दातांमध्ये असे काही जोरात पकडले होते..की ओठांतून लालसर रक्त बाहेर आल होत..

" माय गॉड, मला वाटत तुम्हाला हॉस्पिटल मध्ये एडमिट करायला हव !" आर्यंशने पटकन खिशातून फोन बाहेर काढला..

" न..न्न...ना..नाही!" पुजारी बाबांच्या तोंडून एक एक शब्द मोठ्या कष्टाने बाहेर पडत होता.

" म..म्म....मा...वे...वेळ.आली आहे..माझी.! "
तुकडो पुजारी कण्हत , थांबत मोठ्या कष्टाने उच्चारल्या ..

पन त्या शब्दांचा अर्थ , ह्या सर्व घटनेपासूनच अजाण असलेल्या आर्यंशला कसा लागणार होता. तो गोंधळून गेला होता..

त्याला काहीच कळल नाही..की म्हातारा माणुस काय बोलत आहे !

तुकड़ो पुजारींनी थरथरत्या ओठांनी एकवेळ पुन्हा हवेलीकडे पाहील...

ह्यावेळेस त्यांची नजर तिस-या मजल्यावर गेली..

तस तिस-या मजल्यावरच्या एका उघड्या खिडकीत त्यांना तीन आकृत्या उभय दिसल्या..

प्रथम मधोमध एक काळी साडी घातलेली स्त्री,
डाव्या बाजूला नरहरपंत उभे होते , तर उजव्या बाजुला तोच तो रात्री जिव घ्यायला आलेला एडका सैतान ...

तिघेही दात विचकत हसत , मरण यातना भोगणा-या त्या पुजारी बाबांकडे पाहत होते.

त्या दोघांन मधोमध उभ्या असलेल्या म्हातारीने हळुच दोन्ही हात जरासे वर आणले आणि पुजारी बाबांना तिच्या हातात एक काळ्या रंगाची बाहूली दिसली..

तीने दुसरा हात पूढे आणला, त्या हातात एक टोकदार काट्यासारख हाड होत..


काळ्या बाहुलीला कसला तरी भगवा कपडा गुंडाळलेला दिसत होता.

पुजारी बाबांना लागलीच कळून चुकल होत की त्या काळ्या करणी युक्त बाहूलीवर आपल्याच वस्त्राला गुंडाळलय आणी आपल्यावर जादू टोणा केल गेल आहे .

आणी तो जादूटोणा काहीसाधारण मुळीच नव्हत..जिवावर बेतणार होत.

जिव घेणार होत.

त्या म्हातारीने हातातला तो पांढरट हाडासारखा काटा , त्या बाहूलीच्या छातीवर टेकवला..

जस त्या काट्याचा स्पर्श बाहूलीपा झाला..

ती काळ्या रंगाची बाहुली तांबडसर प्रकाश किरण फेकत चकाकली.

आणी इकडे पुजारी बाबांच्या छातीत असलेल्या ह्दयात एक तीव्र कळ उमटू लागली....

" अह्ह्ह आ..आ..!" पुजारी बाबांच सर्व शरीर थरथरू लागल..

त्यांचा एक हात छातीवर गेला ..पाचही बोटांनी त्यांनी छाती दाबून धरली..

" औह शट, तुम्ही थांबा , मी एम्बूलेंसला कॉल करतो ! " आर्यंशने हातात असलेल्या फोनवर नंबर दाबायला सुरुवात केली..

" न्न..न्..न्न.ना..ही.!" पुजारी बाबांच्यास तोंडून लालसर रक्ताची धार बाहेर आली..

आर्यंश नुसत डोळे फाडून ते पाहत होता.

" मी आता वाचणार नाही , आ.आ..आ..!
ए...एक काम कर मुला..! म..म..मंदिरात..म..मा.महादेवाच्या..मुर्ती खाली एक कागद आहे..आ...आ...आ..! उहू..उहू..ऊहू..!"

पुजारी बाबांच्या तोंडून खोकल्या सहित लालसर रक्ताची गुळणी बाहेर पडली.. !

आणी त्यांच सर्व शरीर एकदमच आखडल...
डोळे मोठे झाले, त्या मोठ्या झालेल्या डोळ्यांमधल्या लालसर नसा स्पष्ट दिसत होत्या..

तोंडाचा आ वासला होता..त्यातून लालसर रक्ताने दात हिरड्या माखल्या होत्या...

" अहो बाबा , अहो बाबा ! काय होतंय तुम्हाला..अहो!"

आर्यंश पुढे बोलणार तोच पुजारी बाबांच सर्व शरीर सैल पडल.

" मेला म्हातारा ! मेला म्हातारा..!"
नरहरपंतांचा खर्जातला आवाज.






क्रमश :


नेक्सट भाग

मसणातले पैसे ...

" पैसे पाहिजेत ?
मंजूलाल ने फ्क्त होकारार्थी मान हळवली...

त्याच्या पुढ्यातच काळ्या झग्यात उभा एक माणुस उभा होता..त्याच्या हातात लाल रंगाची बैग होती.


" घे ! पन लक्षात ठेव , चांगल्या कामासाठी हा पैका वापरायचा नाही..! हा अशुद्ध पैसा आहे, मारून लुटून खून करून कमावलेली काळी धन आहे ही ...
अय्याशी कर...भोग घे ...बायकांचा ...जा ..निघ इथुन ..पैसे घे आणि निघू इथुन .निघ...अर्रर्र...र...आ..र..र..!"

त्या काळ्या झग्यातला तो उंचपूरा माणुस
एकदम वेड्यासारखा वागू लागला...म्हाता-या सारखा खेकसू लागला...

मंजूलालने पटकन लाल रंगाची बैग उचल्ली...आणि..























इतर रसदार पर्याय