Moksh - 17 books and stories free download online pdf in Marathi

मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 17

पैका पाहिजे !"
प्रथमच त्या आकृतीच्या तोंडून आवाज आला, तो आवाज ऐकून मंजूलालच्या पायाखालची जमिनीच फाटली, कानांचे पडदे फाटले ,छातीत कस धस्स झाल.

एका म्हाता- या मांणसाच जस खोंकताना घशातून खस,खस खर्र , खर्र आवाज बाहेर पड़तो - तसा तो आवाज होता.

घोगरा , खर्जातला - खसखसता , आवाज.

त्या आज्ञाधारक आवाजासरशी ,गुलाम असल्यासारखा मंजूलालने होकारार्थी मान हळवली आणि हळकेच

" हो !" असा हुंकार भरला.

" पैका भेटल , पन त्या बदल्यात काय देशील !"

" त..त्या बदल्यात !"
मंजूलालच्या स्वरात भीति होती.

आणि ही भीती ? हे आपल्याला काय होत आहे ? आपण असे घाबरत का आहोत ? हे ..काय होत आहे आपल्याला? आपण आपल्या उभ्या आयुष्यात अश्या कित्येकतरी मांणसांची बोलती ब्ंद केली आहे , हे आपण विसरलो का ? मग आपण आज ह्या मांणसाला का घाबरत आहोत - आपल्या डोक्यात न जाणे का, व कसली एक अनामिक भीति तैयार झाली आहे ? जे आपण ह्या मांणसाला घाबरत आहोत ? पन समोर उभ ते मांणूसच आहे ना ? मंजूलालच्या मनात आलेल्या ह्या एकापाठोपाठ प्रश्नांच्या गर्दीत जस हा प्रश्णमय विचार आला - तस त्याच्या अंगावरून एक भीतिची शहार चालून गेली, सर्व अंग कस घामाने ओळ झाल होत.

मनात असणारी एक विशिष्ट प्रकारची शक्ति- जी आजुबाजुला असलेली नकारत्मकता ओळखते -ती ह्या क्षणाला ह्या वडाच्या झाडाच्या क्षेत्रात येताच एकदम उत्तेजित झाली होती-

काहीतरी भयंकर , आपल्या समोर येऊण ठेपल आहे हे मंजूलालला कळल होत , तिथे पसरलेल्या नेगेटीव एनर्जीच्या आस्तित्वाने , भीती, भय, उदासीनता, चिंता, काळजी, ह्या सर्व वाईट भावनांचा उद्रेक कसा उफाळून वर आला होता -अगदी एका गरम लाव्ह्या च्याज्वालूमुखीतून उद्रेक व्हावा तसा .

मंजूलालच्या मनात पसरलेली भीति त्या नकात्मक
शक्तिने ओळखली होती- आणि भीतिपोटी त्याच्याकडून नकारच येणार हे सुद्धा तिला ठावूक होत म्हंणूनच जाळ फेकण गरजेच होत.

आपल्या हातातली ती लाल रंगाची पिशवी , त्या आक्रुतीने हळकेच हातातून खाली सोडली-

' छन ,छन ,छन !" चिल्लर वाजल्यासारखा आवाज झाला .

त्या आवाजाने मंजूलालच लक्ष वेधल, त्याची घाबरीगूबरी नजर त्या लालसर पिशवीवर पडली-
त्या पिशवीची गाठ सुटली होती आणि त्या सुटलेल्या गाठीतून काहीतरी सोनेरी रंगाच चकाकतांना दिसत होत .

आजुबाजूला पसरलेल्या कालोखाने निट दिसत नव्हत- नाहीतर मंजूलालला त्या सोन्याच्या मोहरा दिसल्या असत्या.

मंजूलाल च्या खांद्यामागून वडाच्या झाडाच जाड़जुड खोड दिसत होत- त्याच खोडावर एक पाच बोटांचा मानवी पंज्या आला-मग हळूच डोक आल.. तो मण्या होता -

खुप वेळ झाल मंजूलाल ला झाडामागून बाहेर आला नव्हता ,- तस त्याच्या मनात मंजूलाल पैसे घेऊन पळाला की काय? असा प्रश्ण निर्माण झाला होता - त्याचीच खात्री म्हंणून तो पुन्हा एकदा चोरा सारखा मंजूलालच्या मागावर आला - वडाच्या खोडामागे लपून तो मंजूलालच्या पाठमो-या आकृतीला पाहत होता , मंजूलाल पूढे पाठमोरा उभा असलेला तो सहा फुट उंच माणुस सुद्धा त्या दिसला होता.- त्याने फेकलेली ती रंगाची कापडी पिशवी , सुद्धा त्याने पाहिली होती.

शोर्ट सर्किट झाल्यासारखी पुन्हा आकाशात वीज कडाडली- सर्वकाही ऊजळून निघा- वडाच झाड, आजुबाजुला असलेली झाडे, खालचा -पाळापाचोळा
मंजूलालच शरीर , वडाच्या झाडामागे लपलेला मण्या, आणि त्या दोघांपूढे असलेल ते ध्यान , त्या ध्यानाच्या अंगावर विजेचा प्रकाश पडताच ते जागेवर नाहीस झाल होत -वीजेचा प्रकाश जस चमकून ब्ंद झाल तस ते पुन्हा जागेवर आल होत.

परंतु सेकंदाच्या काट्यासहित घडलेल्या ह्या अविश्वानिय दृष्याला त्या दोघांनीही पाहिल नव्हत!

कारण त्या दोन्ही कमनशिबी मांणसांच लक्ष
त्या लाल रंगाच्या कापडी पिशवीत असलेल्या त्या सोन्याच्या गोळ मोहरांवर पडला होत..

मंजूलालचा भीतिने वासलेला जबडा आता हळु-हळु पैश्याच्या वासनेने फुलू लागला - ती भीति फुंकर मारल्यासारखी उडून गेली होती.

मागे झाडा आड लपलेला मण्या त्याचीही हिच अवस्था होती.

मंजूलालची पावले नकळत पैश्याच्या हावेने
पुढे पुढे जाऊ लागली.

इकडे झाडाआड लपलेल्या मन्या गपचूप हे सर्व पाहत होता - त्याची पाठमोरी आकृती दिसत होती- तोच एक अमानवीय हवेची झुळूल हळु हळु त्याच्या दिशेने निघाली- 'व्हो,व्हो,व्हो' ' जशी जशी ती हवा पुढे सरकत होती तसा हा आवाज वाढत होता ..

झटकन ती हवा मण्याच्या पाठणावर आदळली, मण्याच्या डोक्यात एक कळ उठली, डोळे झटकन ब्ंद झाले - शरीर कस थंड पडल, अगदी सैल जणू हलकं झाल्या सारख.

मग लागलीच पाच सेकंदांनी डोळे उघडले तर
शरीर जड वाटत होत - जणु कोणितरी खांद्यांवर बसल्यासारख.



ती अमानवीय हवा मण्याच्या देहात घुसली , त्या हवेत असलेल्या नकारात्मक शक्तिचा अंश जसा त्या शुद्ध देहात घुसला तसे मण्याच्या डोक्यात एक कळ उठली, डोळे झटकन ब्ंद झाले - शरीर थंड पडल, अगदी सैल प्राण सारख्या हलक झाल.

मग लागलीच पाच सेकंदांनी डोळे उघडले तर
शरीर जड वाटत होत - जणु कोणितरी खांद्यांवर बसल्यासारख.


" नाय नाय , हे संमद पैक मला भेटाला हव ,
माझ हाई हे ..माझ हाई ..हे संमद माझ हाई !'

हे सर्व मण्या स्वत:हा बोलत होता - की आणखी कोणि त्यांच्या तोंडून वधवून घेत होत? मण्याला एकक्षण अस वाटल ,की आपण- म्हंणून शरीरात आपली आत्मा फक्त आस्तित्वात आहे , पन नियंत्रण? नियंत्रक? कोणितरी दूसरच आहे !

मण्याच्या देहाची आपोआप हालचाल सुरु झाली..

.उजवा हात हल्ला गेला , वडाच्या झाडाखाली जिथे ती अभद्र पीठाची बाहुली होती- तीच्या पुढ्यातच एक काळ्या रंगाचा दगड होता - नारळ वगेरे फोडण्यासाठी ठेवला होता - तोच मण्याने उचल्ला .

हाताच्या मुठीत गच्च धरला.

मण्याच्या डोळ्यांना आपल्या शरीराची हालचाल होताना दिसत होती, पन हाता पायाला कसलीc संवेदना जाणवत nव्हती- नियंत्रण आवाक्या बाहेर गेल होत -

त्या दोन डोळ्यांच्या खोबण्यांतून त्याला, आपण पुढे पूढे जातांना दिसत होतो- मग एक कटाक्ष हातात असलेल्या काळसर रंगाच्या दगडावर गेला ..

तेवढ्यात विज कडाडली सर्व परिसर ऊजळून निघाला -

मंजूलाल त्या मोहरा पाहून लालसेने वेडा झाला होता - स्वत :शीच वेड्यासारखा खुळ्यासारखा हसत होता -

एक एक मोहरा पिशवीतून बाहेर काढ़ुन उलटी पालटी करून पुन्हा पुन्हा पाहत होता.

अचानक ' फट ' आवाजा झाला - मंजूलालच्या डोक्यात तीव्र वेदना झाली- एक जबरदस्त सणक मेंदूत शिरली.

आनंद वेदनेत बदल्ला, हातातली लाल पिशवी खाली पडली -

पिशवी धरलेला तोच हात डोक्यामागे गेला, हात केसांवरून, मग डोक्याच्या कवटीला हात लागताच एक तीव्र वेदना झाली - व हाताला काहीतरी चिपचिपीत- गरम-लागल, तोच हात मंजूलालने डोळ्यासमोर हाणला -

पुन्हा आकाशात वीज कडाडली, त्या वीजेच्या प्रकाशात पूर्णत हात रक्ताने माखलेला दिसला.

मंजूलालच्या पायांतून त्राण निघुन गेले- दोन्ही ढोप्यांवर तो धप्प आवाज करत खाली बसला -

" आह्हह्ह्ह्ह्ह!" एक वेदनादायक ऊसासा तोंडातून बाहेर पडला .

मंजूलालच्या पाठणात एक लाथ बसली,
तसा तो कपाळावर खाली पडला -खाली असलेल्या दगड गोट्यांवर कपाळ आदळताच ..
कपालाची कवटी फुटून हलकीशी रक्ताची धार बाहेर पडली- लगातार एकापाठोपाठ विजांचा बार आकाशात फुटत होता- विचीत्र चंदेरी प्रकाशाने परिसर भेसूरपणे उजळून निघाला होता.


मण्याने मंजूलालला सरळ केल- त्याचा चेहरा रक्ताने माखला होता -त्याच रक्ताला खालच मूरूम चिकटल होत - ज्याने तो चेहरा आगीने भाजल्यासारख दिसत होता.

जराशीही दया न दाखवता मण्या मंजूलालच्या छाताडावर बसला.

" माझ पैसा हाई हा, माझा पैसा हाई , म्या घेऊन जाणार , घेऊन जाणार .म्या ..!"

मण्या असंच काहीतरी बरळत होता - दगड असलेला हात हळकेच वर गेला - आणि तिप्पट वेगाने खाली आला जात थोबाडावर बसला -- नाकाच रबरासारख हाड कस अलगद फुटल- एका पाठोपाठ हात वर जात होता , तिप्पट वेगाने खाली येत होता..

" फट, फट, फट !" आवाज होत , मंजूलालच्या चेह-यावर आपटत होता.

नाक , गाल, दात, जीभ, मेंदू,आतल्या, निळ्या, पिवळ्या, नसा , सर्वच्या सर्व चेचल गेल होत- आतली सिस्टीम बाहेर आली होती- विजांच्या प्रकाशात सर्वकाही दिसत होत.

हा असला भयाण थरार माजला होता - रक्त , मांस मिश्रित शोरमा जमिनिवर पडला होता .

मण्याच्या हातून सैतानाने हे असल कांड़ करवून घेतल होत - नाहीतर हे अस कसाया सारख कोंबडी कापाव तस माणुसच माणसांकडून थोडीना ठार केला जाईल- ?

हा प्रकार तर हलाल पेक्षाही भयानक होता- हे सर्व द्रुष्य पाहण्यासाठी ते घडवण्यासाठी फ्क्त सैतानाच काळिजच लागू शकत !

मण्याच्या सर्व शरीराला एक झटका बसला ,एक धुरासारखी वाफ देहातून बाहेर पडली- मन , मेंदू, डोळे सर्वकाही अगदी शांत , शितील, हवेसारख हलक झाल होत.

मग काहीसेक्ंदातc मण्याचे डोळे मिटले , तो जमिनीवर पडला,बेशुद्ध झाला...

ती पाठमोरी आकृती सैतानी आकृती केव्हाचीच गायब झाली होती-

इकडे

....आकाशातून एक पांढरट धुरासारखा नागमोडी सर्पासारखा आकार वेगाने पुढे पुढे जात होता..

काहीवेळातच तो एका हवेलीपाशी पोहचला -

हवेलीच्या तिस-या मजल्यावरची एक खिडकी उघडी दिसत होती- त्याच खिडकी मधून तो धुर आत घुसला..
.
.
खोलीत
समोर एक मोठा बेड होता ! पूढे एक काचेचा आरसा होता...आणि

बेड डाव्या बाजुलाच एक चौकलेटी रंगाची झुळणारी घोडाखुर्ची होती. आणि त्या खुर्ची मागे भिंतीवर एक उभी साडे चार फुट उंचीची मोठी पेंटिंग लावलेली होती.

नरहर पंतांची पेंटींग !

ती पेंटिंग साकारणारा चित्रकार सुद्धा भीतच तो चित्र कोरून गेला असावा अस साफ साफ दिसत होत.

कारण त्या पेंटिंग मधले नरहरपंत जणू जिवंत भासत होते.

उभट राकीट चेहरा , जाड भुवया आणि बारीकसे घारे चिंचोळे डोळे,
टोकदार नाक , आणी त्यांखाली काळ्याशार मिश्या..

डोक्यावर चौकलेटी रंगाची गांधी टोपी होती.

अंगात सिल्कचा पांढरा सदरा ..आणी त्यावर चौकलेटी कोट , आणी खाली पांढरट धोतर होत...पायांत चामड्याच्या चपली होत्या -चालतांना त्यांचा भयाण 'चट, चट,!" आवाज व्हायचा.

चेह-यावर राकिट भाव होते , गर्व अहंकारी, गरिबांना तुच्छ नजरेने पाहणारी ती नजर जणु जिवंत वाटत होती , आणि ती पेंटिंग सुद्धा....जणु पाहणा-याला वाटेल आताच पेंटिंग मधून ते नरहरपंत बाहेर येतील.. मृत्युची झडप घालतील.

तो पांढरट रंगाचा धुर हळकेच पेंटिंमध्ये घुसला-

पेंटींगच्या आत एक गुप्त मार्ग होत -एक माणुस सरल पुढे चालt जाईल एवढी मोठि फट होती - फट मधोमध दोन्ही बाजुंना काळ्याश्यार पाषाणाच्या भिंतीं होत्या -आणि आंतिम टोकाला एक दोन झापांचा दरवाजा होता..

एक विशिष्ट प्रकारचा भय ध्व्नी निर्माण करत तो पांढरा धुर त्या दरवाज्याच्या दिशेने जाऊ लागला -दोन पावल राखून तो धूर जस त्या दरवाज्यापर्यंत पोहचला तसे त्या दरवाज्याच्या दोन्ही झापा धाडकन आतल्या बाजुने उघडल्या ...


ही तीच ती पुर्णत लाल रंगाची खोली होती- जिथे सर्व अघोरी - क्रिया कर्म विधी चालत होते .
दहा x दहाची ती खोली होती- मधोमध एक लाल रक्ताळलेल्या आगीचा हवनकूंड नेहमीप्रमाणे जळत होता आणि हवन कुंडा समोर तीच ती म्हातारलेली काल्या साडीतली आकृती बसली होती.

खाली शेणाने सारवलेली भुवई होती ! आजुबाजुहून घाणेरडा- अमळी, मुत्र- कुबट ,मानवी विष्टा पडलेला असाओकारी युक्त घाणेरडा वास येत होता.

इतक वेळ हवेतच वळवळणारा तो पांढरट धुर , आता त्याला एक आकार आला - स्थायू रुप प्राप्त झाल- जे त्याला त्याच्या कर्माने मिळाल होत .

चेह-याची त्वचा पीठासारखी पांढरी पडली होती- डोळे गोळसर गोटी एवढे मोठे-पिवळेजर्द होते -
डोक्यावर तुळ्तूलीत टक्कल होत तोंडात काटेरी दात होते.

सहा फुट उंची आणि अंगावर एक काळ्या रंगाचा फुल बाह्यांचा जब्बा घातला होता.

" झालं काम !"

"हा आये झाळ, कवटीच फोरून टाकले रांxxxच्या ची, हिहिही, मसाला काढल मी संमध बाहेर , मसालाच मसाला..! हिहिहिहिह,खीखी,"

" शाबाश एडका ,शाबाश ! आता कोणताच पुरावा मागे राहिला नाही आणि ठेवायचं पन नाही ! मंग तो आपली मदत करत असो किंवा ना करत असो ! " त्या म्हातारीचा किन्नरी स्वर .

अचानक एडकाच्या बाजुला हिरवट रंगाच्या धुराचा स्फोट झाला - आणि तिथे नरहरपंतांचा आत्मा
अवतरला -

" बाबा , बाबा , मी मारला त्या पोलिसाला बाबा
मसाला , मसाला काढला..मी, हिहिहिहिही!"
नरहर पंतांकडे पाहून एडका एका लहान मुलासारखा म्हंणाला.

" गपप्प...ग्प्प्प..ग्प्प्प! डोळे बघ, डोळे बघ, " नरहर पंत आपले घारे चिंचोळे डोळे एडकाला दाखवत घाबरू लागले..तसा तो घाबरून नजर चोरू लागला..

"जा ..इथून...चल....निघ..निघ..इथून.निघ! "
नरहरपंतांंनी आपले घारे चिंचोळे डोळे एडकाला दाखले , तसा तो सैतान घाबरू लागला ..आणी पुढच्याक्षणाला त्याच्या देहाच पुन्हा धुरात रुपांतर झाल, व तो धूर खोलीबाहेर निघून गेला..

" वापस येऊ नको इथ, नाहीतर फटके देईन, फटके , पळ-पळ पळ कार्ट्या..!"

नरहरपंतांचा आत्मा कितीतरी उशीर तसंच
एडका गेला का ते पाहत होता.

मग तो गेला हे पाहून त्यांनी आपली तीच ती घारी चिंचोळी नजर , समोर त्या काळ्या साडीतल्या आकृतीवर टाकली..


क्रमश :

पुढील भाग लवकरच मित्रहो !









इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED