Moksh - 16 books and stories free download online pdf in Marathi

मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 16



महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्व काही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी


फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत🙏


ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह मेसेज आणि वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल!



पोहचलो बघा साहेब !"

मण्या जागीच थांबला - समोर वीस मीटर अंतरावर एक भलमोठ्ठ वडाच झाड होत.

वडाच्या झाडाच खाली काळ पडलेल खोड अगदी एका अक्राळविक्राळ दैत्याच्या गर्भासारखा जाडजूड दिसत होत - आणि वर हव्या तश्या पसरलेल्या मनमौजीसारख्या वाकड्या तिक्ड्या जाड जुड फांद्या दिसत होत्या -

आकाशात पडलेल्या जऊळाने , वडाची हिरवी पाने जराशी तपकिरी पिकल्यासारखी वाटत होती.

वडाच्या पुढे आणि मागे , चारही बाजुंनी सुकलेल्या पानांचा खच पडलेला दिसत होता.

मसणातून जळणा-या प्रेताच मांस खाणा-या अघोरीच्या जटांसारख्या खाली लोंबणा-या पातळसर शहारा त्या वडाच्या झाडाच रुप अभद्र बनवत होत्या.

कोठूनतरी पांढरट रंगाच धुर येऊन खोडाजवळून वाहत पुढे जात होत.

" हेच का ते वडाच झाड?" मंजूलालने जरास बिचकत विचारल .

तसंही समोरचा देखावा मनात धडकी भरवणारा होता - काळिज ते पाहून धडधड करत घंटेसारख वाजत होत.

मंजूलालने ह्या अगोदर सुद्धा वाईट कामांचे पैसे अश्या अद्यात स्थळी घेतले होते.

पन त्या जागेंमध्ये आणि ह्या अभद्र जागेमध्ये किती जमिनी आसमानाचा फरक होता !

ईथे मनाला एक वेगळीच असुरक्षीततेची भावना जाणवत होती-

एका अद्यात -अनोळखी क्षेत्रात प्रवेश केल्यासारखी , जिथे त्या वावरणा-या अद्यात - अनोळखी , शक्तिच फक्त वास जाणवत आहे - त्याच आस्तित्व जाणवत आहे , पन ते दिसू शकत नाही.

" स..स..साहेब!" मण्याचा काफरा आवाज आला तसे मंजूलालची तंद्री भंग पावली.

" काय.!" तो नरमीत म्हंणाला.

की भीतिने त्याचा आवाज बसला होता ? देवच जाणो!

" जाताय ना ?"

" अरे पन तिथ कोण दिसत का नाहिये ?"

" मला वाटत झाडाच्या मांग असतील, तुम्ही जाऊन तर बघा की!" मण्याच्या वाक्यावर मंजूलालने फ्क्त होकारार्थी मान हळवली.

सुकलेल्या घशात आवंढा गिळून त्याने खाकी चौकलेटी रंगाच्या बुटांचा पाय पुढे टाकला.

वडाच्या झाडाजवळ पोहचताच - खाली सुकलेल्या पानांवर बुटांचा पाय पडताच पानांचा
चरचर आवाज होत होता.

अवतीभवती हलकीशी रातकिड्यांची किरकिर मृत्युच्या भजनासारखी एका सुरात वाजत होती.
मध्येच वडाच्या झाडांची हवेने होणारी पानांची सळसल छातित कळ उठवत होती..

काळ्याशार अंधार पडलेल्या
श्रापीत वातावरणात जशी आकाशात चंदेरी रंगाची विज चकाकायची तसा तो वडाचा झाड, खालून वर पर्य्ंत चंदेरी प्रकाशाने दोन सेकंदांसाठी चमकून उठायचा , तेवढ्यावेळेत डोळ्यांना जर काही तसल दिसल तर? हा विचार करून मनाला कशी भीति वाटत होती..

जागेवरच उभ राहून मंजूलालने एक कटाक्ष मागे मण्यावर टाकला.

त्याच्या असण्याने न जाणे का,पन मंजूलालला ह्याक्षणाला जरासा धीर आला - काहीवेळा अगोदर ज्याचा जिव तो घेणार होता ! आता त्याच्याच असण्याने त्याला किती धीर येत होता

वेळेची माया अजुन काय!

मंजूलालने आवंढ़ा गिळत पुढे वळून पाहिल- वडाच्या झाडाला पाहत तो पुढे पुढे जाऊ लागला.

चालतांना प्रथम नजरेला दिसल ते वडाच जाडजुड दैत्यासारख खोड, मग नजर त्या खोडाखाली गेली- खोडाखाली टाचण्यांनी भरलेले तीन लिंबू होते.. -त्यांवर लाल कुंकू, पिवळी हळद , गुलाबी गुलाल टाकलेला होता , बाजुलाच एक दोन अर्धवट शेवटची घटका मोजत बसलेल्या अगरबत्त्या पेटलेल्या दिसत होत्या -

तर मधोमध एक नाचणीच्या पिठाची एक फुट उंचीची बाहुली उभी करून ठेवलेली दिसत होती- बाहुलीच गोलसर टक्कल पडलेल डोक- डोळ्यांन जागी दोन हातांनी खड्डे पाडलेले दिसत होते - हात - पाय जाडजुड होते - पोट ढेरी वाढल्यासारख मोठ होत - कपाळावर लाल रंगाने मळवट भरला होता.

बाहुलीच्या जाडजुड पोटावर बेंबीमधोमध एका अज्ञात अनोळखी माणसाच फोटो चिटकवल होत.

एका दोन वर्षाच्या लहान मुलासारखी ती बाहूली होती -पन ते रूप किती अभद्र होत- तामसी , वाम -मार्ग बुद्धी असलेल्या , काळ्या जादूई टोटक्याचा तो एक क्लिष्ट, साधनामय प्रकार होता-

कोणावर तरी भानामती करणी केली गेली होती.

मंजूलालने हे दृष्य पाहून पुन्हा एकदा आवंढ़ा गिळला -पुढे जाऊ लागला -

तसही त्याला काय घेण देण होत त्या बाहुलीशी किंवा त्या जादू टोण्याशी?

त्याला फक्त पैसा घेऊन इथून आल्या पावले निघुन जायच होत!.

मंजूलाल चालत वडाच्या झाडामागे आला.. आजुबाजुला पाहू लागला.

वीस पावळांवर तारेच कंपाउंड दिसत होत -कंपाउंड आत खाली जमिनीवर मुरूमासारखी माती पसरलेली दिस होती-

त्या मातीतून कुठे कुठे एक फुट उंचीच बिनकामाच रानटी गवत उगवल होत.

त्याच गवतावर कोणितरी पाठमोर उभ होत.
अंगात काळ्या रंगाची मळकटसर बाह्यांची बाराबंदी होती , खाली भडक लाल रंगाच धोतर होत -- डोक्यावर काहीच केस नव्हते - फक्त मागच्या बाजूला शेंडी दिसत होती.

ते जे कोणि पाठमोर उभ होत , ते अगदीच ताठ जस की थंडीने प्रेत गारठाव तस ताठ उभ होत. उंची जेमतेम सहा फुट होती, घा- या चिंचोळ्या डोळ्यांनी पुतळ्यासारख एकटक समोर पाहत होत -

त्या दोन चिंचोळ्या घा-या डोळ्यांत जणू प्राणच शिल्लक नव्हते अस दिसत होते ,

ती शुन्यातली नजर - समोरून कोणी पाहिली तर अगदी छातीत कळ भरून येईल अशी होती.
चेह-यावर असलेली त्वचा गडद पिठासारखी पांढरट होती- मगाशी पाहिलेल्या त्या बाहुलीसारखी.

मंजूलाल त्या आकृतीच्या मागे उभा होता - नाहीतर त्याला हे असल रूप पाहायला लागल असत !

" स..स ..साहेब !"
समोर उभ्या असलेल्या मांणसाला आपण ईथे आलो आहोत ह्याची कल्पना अद्याप मिळाली नसावी - म्हंणूनच ते पुढे पाहत आहेत , म्हंणूनच मंजूलालने आवाज दिला- तरी सुद्धा तो माणूस? की आणखी काही - पाठमोरा तो पाठमोराच राहिला.

" स.स..साहेब , तू..तूमचा काम झाला आहे ! आता मला माझ्या कामाचे तेवढे पैसे द्या बस्स !"
मंजूलाल जरा घाबरतगूबरत म्हंणाला.

त्याच्या वाक्यावर त्या मांणसाच्या हाताची हालचाल झाली .

हालचाल होतांना एक हलकेच हाड वाजल्यासारखा 'कट ' आवाज झाला होता.

हाताचा पंज्या , अगदी काटकूळा होता - काठ्यांसारखा मांस जणू नावालाच शिल्लक होत- त्याच काटकूळ्या हातांत एक लाल रंगाची कापडी पिशवी धरलेली होती

क्रमशः


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED