महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्वकाही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी
फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत🙏
ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह मेसेज आणि वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल!
देवपाडा गाव -
वेळ दुपारी 4 ....
चार वाजेच्या सुमारास आकाशात जऊळ जमा झाला होता - सुर्याचा शुभ प्रकाश त्या जऊळाने पृथ्वीवर पडण्यापासून रोखून धरला होता .
काळ्या ढगांकडे पाहता , पावसाची चाहुल जाणवत होती, निसर्गाचा रौद्र अवतार सुरु होणार होता.
देवपाडा गाव एन दुपारच्या सुमारासच स्मशान शांततेत तबदील झाल होत.
त्या आकाशातल्या काळ्या ढगांमुळे घरांवर - खालच्या तपकिरी मातीवर , उदास , दुखी भावनाप्रदान करणारा काळसर अंधार पडला होता...
ह्या अशुभ अंधाराला जोड म्हंणून आज एका दिवसातच हातावर न मोजता येण्याएवढ्या भयानक घटना घडल्या होत्या -
ज्या अनुभवता गावकरी कमालीचे भ्यायले होते.
रात्री झालेले सरपंच - आणी उपसरपंच दोघांचे भयानक खून ! सामान्य मानवाने ते खून नक्कीच केले नव्हते, हे गावक-यांना ठावूक होत , निच ,कप्टी,धुर्त, दया -माया , किव नसलेला सैतानच अस घात करू शकतो हे सुद्धा गावकरी जाणून होते.
दोन्ही मय्यत(प्रेत) सकाळी स्मशानात जाळून आल्यावर , गावातली काही मोजकी लोक आणी पुजारी बाबा अशी सर्व मिळुन वाड्यावर गेले होते...
आणी तिथे गेल्यावर भलतंच काहीतरी घडल होत ! ज्याची कोणीच अपेक्षा केली नव्हती! काळ पडलेल्या म्हढ़ां मध्ये अजुन एक मईताचा (मूडदा) पडला होता , तो म्हंणजे पुजारी बाबांचा .
जो पर्यंत ते देवाच्या देऊळात होते तो पर्यंत त्यांच्या केसालाही कोणी धक्का लावू शकत नव्हता पन जस देवाच देऊळ सोडल , घात झाला , मईत पडला , देऊळरूपी कवच सोडून त्यांनी मोठी चुक केली होती, हे ह्यावरून कळत होत !
पुजारी बाबांच प्रेत ( मय्यत) एम्बूलेंस मार्फत तालूक्याच्या हॉस्पिटल मध्ये नेहल गेल होत !
पंचनामा करून प्रेत शवागारात ठेवल जाणार होत - कारण पुजारी बाबांना वारस नव्हता ना!
गावातल्या घटना पाहता , लोकांची ही पळता भुई थोडी झाली होती- स्वत: चा जिव अनमोल ह्या विचाराने गावकरी घरात स्वत:च्या मर्जीने लपून बसले होते.
ईकडे देवपाडा गावातल्या स्मशानात..
ह्या अश्या अभद्र वातावरण समई ...
मृत्युचा खेळ सुरु झाला होता.
थ्री- स्टार पोलिस ऑफिसर मंजुलाल पैश्यासाठी हावरटलेला होता .
स्मशानात आतल्या बाजूला एक मोठ वडाच झाड होत , तिथे त्याला ..त्याच्या कामाचा मोबदला मिळणार होता.
पन ह्या पैशाच्या चटके पुढे, त्याच्या जिवाची किंमत लागली होती ,हे त्याला ठावूक नव्हत , त्या सैतानाच्या कचाट्यात सापडल्यावर काय हाळत होणार होती ? ही जशी जशी वेळ पुढे सरकेल तस कळणार होती.
नियतीने रचलेल्या हस्तलिखीत घटनेला
भले कोण बदलू शकत होता - जे होणार आहे ते होण भाग्य आहे , आणी आपण सर्व ते गपगुमान पाहत बसायचं बस्स!
या मुळ कथेकडे वळूयात.
स्मशानाचा आतमधला भाग होता -आत मोठ मोठी झाड होत , झाडांना विशाल खोड , आणी फांद्या लांब होत्या , त्या फांद्याना फुटलेल्या पानांनी प्रकाश अडवला होता.
मंजुलालच फोनवर झालेल बोलण मण्याने चोरून ऐकल होत , पैश्याच्या लालसेने त्याच्याही मनात पाप उतपन्न झाल होत , त्याने मंजूलालच पाठलाग करायला सुरुवात केली होती.
मंजूलाल पुढे चालत होता - आणी त्याच्या मागून चोरासारखा मन्या दबक्या पावलांनी पिच्छा करत पुढे येत होता .
जराशी चाहूल लागली की मंजूलाल गर्रकन वळून मागे पाहायचा , परंतु नजरेस मानवी हाळचाली सारख काहीही दिसत नव्हत !
मंजूलाल जस मागे पाहायचा तस मण्या कोणत्यातरी झाडामागे लपायचा -नाहीतर झुडपांमध्ये , असंच एकदा मंजुलालने गर्रकन वळुन मागे पाहिल , तसा मण्या पुन्हा लपला, पाच- दहा सेकंद होताच त्याने पुढे पाहिल , तर त्याच्या नजरेस ..मंजूलाल दिसला नाही!
" कुठ गेला हा ? "मण्या स्वत:शीच म्हंणाला.
मग त्याने चेह-यावर असलेली दोन महिन्याची वाढलेली दाढी खांजळली.
तेव्हा त्याचवेळेस त्याच्या पाठणात एक चौकलेटी बुटांची लाथ येऊन बसली.
" आये !" मण्या विव्हळत खाली तोंडावर पडला.
" माझ पाठलाग करतो काय रे हरामखोर !"
मंजूलालने एका हाताने मण्याचा फाटलेला शर्ट धरला आणि त्याला उभ केल!
मण्याच्या तोंडाला खालची माती लागली होती ,
नाक वेगाने जमिनीवर आपटल्याने फुटल होत, त्यातून रक्ताची धार वाहत होती.
" साल्या पैसे देऊन पोट भरल नाही का तुझ?
आणी माझा पाठलाग का करतोयेस , सांग ? "
मंजूलाल खेकसला , त्याने हातातली बंदूक मण्याच्या कपाळावर धरली..तसा मण्या लटलट काफू लागला...
" स...स्स...स...स..!"
" ए झाकणझुल्या !" मंजुलालने मण्याच्या कपाळावरशी बंदूक काढून घेतली, आणी त्याच्या बेंबीखालच्या भागातून लुंगीत घुसवली.
" फटाफट बोल कासवासारखा !"
" स..स...सा....साहेब !"
" काय बोल?" मंजुलाल मोठ्याने ओरडला.
" क..क...कासव हळु चालतो , म्हंजे तो बोलत बी हळू असल ना ! " मण्या म्हंणाला.
तस मंजूलालने दात चावले व म्हंणाला.
" मंग सश्यासारखा बोल , नाहीतर तुझ्या खाली असलेला हा घोडा कासव - आणी सश्यापेक्षा जास्त जोरात धावतो , दाखवू तुला ? दाखवू ?"
" नाय नाय नाय ..नाय..नाय..नाय साहेब, अस नका करू !" मण्या रडकूंडीला येत विनवणी करू लागला.
" मंग बोल लवकर ? अस पाठलाग का करतोय माझ , कोणी पाठवलाय तुला ?"
" साहेब कोणी नाय पाठवल मला !"
" मग?" मंजूलाने पटकन विचारल.
" ते..ते..ते..मी ऐकल..!"
" काय ? काय..ऐकल तू, बोल?"
" तु..तू..तुमच फोनवरच बोलण ऐकल ..मी..!"
मण्याने अस म्हंणतच मंजूलालच फोनवरच सर्व बोलण मंजूलाल समोर जसच्या तस कथन केल.
" प..प..पन मला मारू नका साहेब , मी तुमच्या पाया पडतो" मण्याने उभ राहतच दोन्ही हात मंजूलालच्या पायांच्या दिशेने वाढवले , पन मंजूलालने घुसवलेल्या त्याच्या लुंगीतल्या बंदुकीमुळे त्याला वाकता काही येईना .
" ए गप्प!"
"मी गप्प बसतो ना साहेब पन मला मारू नका ना साहेब, मी जाम गरीब आहे हो , गरिबी मुळ लगीन पन नाय झाल साहेब, दोन टेम खायचे वांदे आहेत माझे साहेब !"
" अरे मग मरशील तर स्वर्गात जाशील ! हिहिहिहिही!" अस म्हंणतच मंजूलालने मण्याच्या लुंगीतून बंदूक काढुन घेतली, व तो हसू लागला..
" साहेब नका ना मारू मला ! पाहिजे तर तुम्ही म्हंणाल ते करतो मी!" मण्याने मंजूलालचे पाय पकडले..
मंजूलाल कुत्सिक हसत त्याच्याकडे पाहत होता.
" काहीही करशील ? "
" हो हो साहेब !"
" चल ठीके मग , सोडल तुला ? " मंजुलालने
बंदूक कमरेच्या पाकिटात ठेवली .
" साहेब , मला बी थोड भेटल तर बर होइल की !" मण्याने चुना मळाव तस हात मळले .. पिवळसर दात दाखवत तो कसतरीच हसला.
त्याच्या ह्या वाक्यावर मंजूलालने एक रागिट कटाक्षसहित त्याच्याकडे पाहिल..
तसा मंजूलालने खाली मान घातली...मग पुन्हा वर पाहिल..
" हा हा चल ठीके, शंभर प्रतिशिंत मधुन एक " मंजूलाल मध्येच थांबला,
" नाही नाही एक नाही, दिड प्रतिशींत तुझ !"
" दिड , फक्सत दिड रुपये !"
मण्या कसतरीच पाहत म्हंणाला.
" अरे ए अडाण चोxxया , दिड रूपये नाही ! दिड प्रतिशींत , म्हंणजे पन्नास लाख भेटतील तुला !"
" ब..ब...ब... पन्नास लाक !" इतकी रक्कम नुस्ती कानाने ऐकूनच मण्याच तोंड वासल... होत..तर ते पैसे भेटल्यावर काय होणार होत.
आनंदाच्या भरात मण्याने मंजुलालचे दोन्ही पाय पकडले ..
" अरे ए काय करतो , अरे ए सोड , सोड मला..सोड , गच्छाल वाटतय , सोड ..सोड मला..!"
.मंजूलालने एका लाथेत मण्याला बाजुला केल.
" जास्त अंगलट करू नको, नाहीतरी पन्नास लाख काय, एक पै बी भेटनार नाही , समजल !"
मंजूलाल जरासा वैतागत म्हंणाला.
" नाय नाय ,मी काय बी बोलत नाही साहेब ! गप्प बसतो " आपल्या पिवळ्या पडलेल्या हीरड्या दाखवत मण्या कसतरीच हसला..
" बर ,बर ठिक चला आता ? साहेब वाट बघत असतील.."
मंजुलाल म्हंणाला
तसे दोघेही सोबतच पुढे पुढे जाऊ लागले.
" काय रे ए ,काय नाव काय म्हंणाला तुझ .?"
...
" जी , जी मण्या साहेब !" मण्या दात विचकत हसला - त्याचे पिवळसर दात हसतांना दिसत होते.
" हा तर मण्या, ह्या स्मशानात वडाच झाड कुठे आहे ?" मंजूलालने विचारल.
" जी साहेब , वडाच झाड टोकाला आहे , जाम मोठ झाड आहे ते , फांद्या भुतासारख्या लोंबल्या आहेत , उंची ही अशी राकीसा सारखा आहे , !"
मण्या सांगत होता.
" गावकरी म्हंत्यात रातच्याला चेष्टा होते त्या झाडाला खाली !"
" ह हाहाहाहाहा , काय चुतियापा आहे , ह्या कलियुगात सुद्धा चेष्टा, भुत खेतांवर विश्वास ठेवतात ही लोक !" मंजूलाल कुत्सिक हसत म्हंणाला.
त्याच्या वाक्यावर मण्या काहीही म्हंनाला नाही..
खरतर त्याची भीतिने गाळण जी उडाली होती
क्रमशः