result books and stories free download online pdf in Marathi

परीणाम

मनोगत

परीणाम ही माझी साहित्यसंपदेतील बासष्टवी पुस्तक असून तिसावी कादंबरी आहे. मी कादंब-यांवर जास्त लक्ष केंद्रीत केलं. त्याचं कारण मला कादंब-या लिहिणं आवडतं.
या कादंबरीला मी परीणाम जरी नाव दिलं असलं. तरी ही कादंबरी नवीन शैक्षणिक धोरणावर आधारीत आहे. कदाचित नवीन शैक्षणिक धोरण जर नसतं आलं तर या कादंबरीतील चुन्नी नावाचं पात्र शिकू शकलं नसतं. हे या कादंबरीचं विशेष रुप आहे. ते पात्र पुढं काय बनतं? यात कोणकोणती पात्र आहेत. त्यांनी काय काम केलं आहे. तसेच या कादंबरीला परीणामच नाव का? हे जाणून घेण्यासाठी माझी ही कादंबरी अवश्य वाचा. तसेच आपण जशी माझी इतर पुस्तकं वाचून मला दाद दिली. तशीच दाद या पुस्तकावरही द्या. कारण तुमच्या एका प्रसंशेने माझ्या हातून अनेक पुस्तकं तयार होतील. जी आपणाला वाचक म्हणून वाचायला मिळतील यात शंका नाही.
ही देखील पुस्तक इतर पुस्तकासारखीच कसदार बनविलेली असून तेवढीच सरस आहे. त्यात बोधंही आहे. आपण ती वाचावी व बोध घ्यावा. तसेच बोध घ्यायचा नसेल तर मनोरंजन म्हणून वाचावी एवढीच विनंती आहे. मात्र वाचून झाल्यावर एक फोन अवश्य करावा म्हणजे झालं.
आपला नम्र
अंकुश शिंगाडे ९३७३३५९४५०

परीणाम (कादंबरी)
नवीन शैक्षणिक धोरणांवर आधारीत

ते पावसाळ्याचे दिवस होते. रोहिणी नुकत्याच निघून आता मृग लागला होता. पाऊस धो धो कोसळत होता. अद्याप लोकांनी आपल्या शेतात या पावसाच्या कहरानं पीक पेरलं नव्हतं. कोणी परेही टाकले नव्हते वा कोणी मिरच्या वांग्याची रोपंही.
सुनिल असाच एक लहान मुलगा. त्याच्या घरी वडीलोपार्जीत शेत होतं. शेत राबायला गडी माणसं नव्हतीच. कारण शेत अल्पशः होतं. त्याच्या वडीलाचं नाव होतं रामप्रसाद.
रामप्रसादचा सुनिल हा दुसरा मुलगा होता. त्याला दोन मुलं व एक मुलगी होती. मोठा मुलगा शिकलाच नाही. तो केव्हाचाच शाळाबाह्य झाला होता. ऐन उमेदीच्या काळात शिकायची वेळ असतांना व मुलाची शिकायची इच्छा असतांना वडीलांनी त्याला शिकवलं नाही. त्याला कारण होतं नोकरी.
नोक-यामध्ये भयंकर स्पर्धा होती. त्यातच अलिकडे नोक-या पैसे दान म्हणून भरल्या शिवाय मिळत नव्हत्या. लोकं सरकारी नोक-यांच्याच पाठीमागं होती. खाजगी नोकरीमागचा विचार वेगळा होता. खाजगी नोक-या कोणीही करु शकतात असं लोकांचं मानणं होतं. उद्योगधंद्याच्या बाबीतही तोच विचार होता. उद्योगधंदेही चार दोन शिकलेली माणसं करु शकतात. त्याला जास्त शिकायची गरज नाही अशी लोकांची धारणा. त्यातच लोक जास्त प्रमाणात शिकत असत. परंतू जास्त प्रमाणात शिकलेली मुलं असं खालच्या दर्जाचं काम करायला धजत नव्हते. त्यांना नोकरी एके नोकरी हवी होती. तिही सरकारी नोकरी. याचमुळं देशात बेरोजगाराची फळी तयार झाली होती.
रामप्रसादला सुधीर व सुनिल अशी दोन मुलं. तशी चुन्नी नावाची मुलगी. रामप्रसाद निरक्षर होता. त्याला शिक्षणाचं तेवढं महत्व कळत नव्हतं. त्यातच शेती पाहायला कोणी नाही म्हणून मोठा मुलगा शिकलाच नाही. त्यामुुळं साहजीकच शेतीत राबता झाला.
देशात शाळाबाह्यतेची अशीच समस्या. देश विकासाच्या क्षेत्रात आघाडीवर होता. परंतू देशातील काही लोकांचे विचार शिक्षणाबाबत दुरावस्था निर्माण करणारे. त्यातच दर्जेदार शिक्षण म्हणजे त्यांना जीवनातील कलंकच वाटत होता.
रामप्रसादची ती दोन्ही मुलं. मोठा मुलगा हा शिकलाच नाही. त्याला न शिकविण्याचं महत्वपूर्ण कारण होतं, ते म्हणजे त्याची आई. त्याची आई बालपणातच मृत्यू पावली होती. त्यामुळं त्याची आबाळ झाली होती. ते शिक्षकही त्या काळचे आळशी की त्यांनी कोण शाळाबाह्य आहे याचा साधा सर्वे देखील केला नाही.
सुधीरला पण त्याच्या वडीलानं सुरुवातीला शाळेत टाकलं. परंतू शिक्षक मोठे कडक होते. ते फार मारायचे. एका एका हातावर इतक्या छड्या की जीव वैतागून जायचा. काय करावं सुचायचं नाही. वडीलांना सांगीतलं तर वडील रागावणार. त्यातच मारणारही. असाच विचार करता करता सुधीर घरातून दप्तर घेवून तर निघायचा. परंतू तो शाळेत जायचा नाही. तो कुठंतरी पायलीमध्ये काही काही मुलांसोबत लपून बिडी सिगारेट पित बसायचा. तसेच सायंकाळी शाळा सुटण्याची वेळ झाली की तोही पायलीतून बाहेर निघायचा व घरी यायचा. असे रोजच घडायचे. रोजच सुधीर असाच शाळेसाठी निघत असे व रोजच त्याला शाळेत जाण्याची इच्छा नसल्यानं रोजच तो त्या पायलीत लपून बसायचा.
असेच दिवसामागून दिवस जात होते. सुधीर शाळेत जातच नव्हता. अशातच परीक्षा झाली व त्याचा निकाल लागला. सुधीर चक्क नापास झाला होता.
सुधीरचं नापास होणं. त्यातच शिक्षकांनी त्याच्या बापाला भेटायला बोलावलं. परंतू रामप्रसाद साधा भेटायला गेला नाही. अशातच सुधीर एकाच वर्गात तीन वेळा नापास झाला.
सुधीर एकाच वर्गात तीन वेळा नापास झालेला पाहून या वर्षी त्याचे शिक्षक स्वतः सुधीरच्या घरी आले. त्यांनी सत्य सांगीतलं की सुधीर शाळेतच येत नाही. तेव्हा रामप्रसादनं सुधीरला बद बद मारलं.
शिक्षकांनी सुधीरला बदबद झोडपलं. बापानंही झोडपलं, परंतू सुधीर काही केल्या सुधरला नाही. त्यामुुळं की काय, त्याच्या बापानं सुधीरचं शाळेत जाणं बंद केलं व त्याला शेतीच्या मागं लावलं.
सुधीर शाळाबाह्य ठरला असला तरी रामप्रसादला काही घेणं देणं नव्हतं. तो आपल्या दिवंगत पत्नीचे उपकार विसरला होता.
रामप्रसादची दिवंगत पत्नी........जी शेती रामप्रसाद जवळ होती, ती शेती त्याच्या दिवंगत पत्नीच्या बापाची देण होती. तिचं नाव पार्वती होतं. जी तिच्या बापानं आपल्या लेकीला पोटाची भाकर होईल या उद्देशानं दिली होती. परंतू आश्चर्य असं की ती पत्नी कसल्यातरी आजारात मरण पावली होती. त्यामुळं रामप्रसादनं दुसरी पत्नी केली. जिला दोन मुलं झाली.
संपत्ती खरी तर सुधीरचीच. परंतू सुधीरला त्या नव्या आईसमोर ब्र काढायचीही मनाई होती. तोही तसा काही बोलत नव्हताच.
रामप्रसादला जी दुसरी मुलगी होती. तिलाही रामप्रसादनं शिकवलं नाही. कारण त्याला वाटत होतं की मुलगी ही दुस-याच्याच घरी जात असून तिला आजच्या डीजीटल काळात व स्पर्धेच्या काळात नोकरी लागणार नाही. म्हणूनच तिला शिकून काय उपयोग म्हणत रामप्रसादनं आपल्या मुलीला चुन्नीला शिकवलं नाही. तसं पाहता देशात डिजीटल साक्षरतेचे वारे वाहात असले तरी हा ग्रामीण भाग डिजीटलतेपासून बराच दूर होता. त्यामुळं मुलगा मुलगी असाच भेदभावही होता.
लहान मुलगा सुनिल. या मुलावर रामप्रसादचं निरतिशय प्रेम होतं. तोच वंशाचा वारस आहे अशी मानसिकता बनवून रामप्रसाद जगत होता. तो त्याचाच जास्त लाड करीत होता. आपल्या जीवापरसही जास्त जपत होता त्याला.
***************************************

ते पावसाळ्याचे दिवस. सुधीर ओलेचिंब होत गुरांमागे फिरत असे. त्याला त्या बालपणीच्या पावसाची चीडही येत नव्हती. तसं पाहता बालपणी या रानात फिरतांना त्याला फारच मजा येत असे. आनंद वाटत असे. ती जनावरं व त्या पावसात पावसाचा त्रास व्हायला नको व पावसात जास्त प्रमाणात अन्न खायला मिळावं असा दुहेरी उद्देश बाळगणारी ती पाखरं, यांचा जुुळलेला ताळमेळ पाहून अगदी आनंद वाटत असे. त्यातच याच आनंदात ती पाखरं त्या जनावरांशी मित्रता करीत अगदी गोष्टी करण्यात रममाण व्हायची. वाटायचं की या पाखरांना त्या जनावरांचं कितीसं हित आहे एवढी ती पाखरं त्या पशूंमध्ये रमायची. खरं तर ती पाखरं त्या जनावरांच्या अंगावर बसून त्या जनावरांच्या अंगावर असलेले किडे खायची तसेच त्या जनावरांच्या गवतात वावरण्यातून गवतावरुन हिंडणारे नाकतोडे ती पाखरं टिपत असत.
तो पाऊस मनााला सुखवून जात होता. पाऊस तसा रिमझीमच येत होता. त्यामुुळं त्या पावसात त्या बालपणीच्या काळात फिरण्याची मजा काही औरच होती.
लहानपणापासूनच सुधीरची भीती जनावरांच्या मागं फिरता फिरता कायमची दूर निघून गेली होती.
ती विकृत मानसिकता. त्या विकृत मानसिकतेनं रामप्रसादनं आपल्या मुलांना जन्म दिला खरा. परंतू शिक्षण शिकवलं नाही. त्याला स्वतःला शिकविण्याची लाज वाटत होती. तशी ती आता मोठी झाली होती.
सुनिलही आता सात वर्षाचा झाला होता. त्याला शिक्षण म्हणजे काय असतं ते कळत नव्हतं. तसं त्याचं शाळेत नाव टाकण्याचं वय निघून गेलं होतं.
सुनिल सात वर्षाचा झाला खरा. परंतू त्याची काळजी चुन्नीला लागली होती. ती आता मोठी झाल्यानं तिला शिक्षण म्हणजे काय ते कळत होतं. तसं तिला शिकावसं वाटत होतं. परंतू शिकणार कशी? तिला वाटत होतं की आपलं वय वाढलं. आपण आता कमीतकमी सातव्या वर्गाला पाहिजे होतो. परंतू आता शिकायचं कसं? आपण आता नावही टाकलं तरी पहिल्या वर्गात बसवणार. मग आपल्याला मुलं चिडवणार.
चुन्नीला वाटत होतं की जरी तिचं वय झालं आणि तिला शिकता नाही आलं तरी ती आपल्या भावाचं शिक्षणापासून नुकसान करणार नाही. आपल्या बाबांच्या अज्ञानानं आपण शिकू शकलो नाही. परंतू आपण आपल्या भावाला शिकवावं.
चुन्नीचं ते वाढतं वय...... आता ते वय विचार करण्यालायक झालं होतं. तसा तिनं निर्णय घेतला आणि एक दिवस ती रामप्रसादला म्हणाली,
"बाबा, आपल्याला मला एक गोष्ट इचारायची हाय. इचारु का? "
रामप्रसाद आश्चर्यचकीत झाला. कारण आजपर्यंत तसा प्रश्न तोही ठमक्या आवाजात त्याला कोणीही विचारला नव्हता. तसा तो म्हणाला,
"इचार इचार, काय इचारते ते. "
"बाबा, आपण सुनिलले शिकवावं. बोला शाळेत टाकावं का नाय. "
रामप्रसादच्या पुढील तो प्रश्न. तसं पाहता शिक्षणाबाबत त्याचे विचार बुरसटलेले. त्यातच अख्ख्या गावाची परंपरा की कोणीही शिकायचं नाही. त्यामुुळं त्या गावात शिक्षण कोणीही शिकत नव्हतं. चार दोन शिकलेले काही लोकं. फक्त तेवढेच लोकं शिकवत होते आपल्या लेकरांना. बाकीच्यांना पाहिजे त्या प्रमाणात शिक्षणाच्या बाबतीत अनास्थाच होती. अशातच चुन्नीचा प्रश्न. चुन्नीनं विचारलेल्या प्रश्नावर रामप्रसाद निपचीत होता.
ती दुपारची वेळ होती. तसे ते तप्त उन्हाळ्याचे दिवस. त्या उन्हाळ्याच्या दिवसात उन लाही लाही म्हणायचं. तसे संबंध गावातील शेतकरी बैलं लाहाकतात म्हणून बैलाला घरी आणून तर कधी शेतात सावलीच्या कडेला वा कधी झाडात बांधून त्यांना चारा टाकून सांजस्याला पुन्हा शेतीत जावून वखर जुंपायचे नव्हे तर दुपारी आराम करायचे. रामप्रसाद व सुधीर नुकतेच शेतीतून ते उन्हाळ्याचे दिवस असल्यानं दुपारी आराम करण्याच्या उद्देशानं आले होते. पार्वतीनं त्यांना नुकतंच जेवन दिलं होतं. ते आता जेवणाचा घास पोटात कोंबणार, तोच चुन्नीचा बापाला प्रश्न. 'बाबा, आपण सुनिलले शिकवावं. बोला शाळेत टाकावं का नाय.'
काळजाचा ठाव घेणारा प्रश्न. रामप्रसादला क्षणभर बरं वाटलं नाही. तसा तो हातात घेतलेला घास पोटात कोंबत तो म्हणाला,
"का बोलून रायलीस पोरी, तुले अक्कल बिक्कल हाये का नाय. "
"बाबा, मी खरंच बोलतेय. आपण सुनिलले शिकवावं म्हणजे झालं. "
"मंग शिकून का नौकरीले लागन का? "
"बाबा, तो नौकरीले लागो का न लागो. आपण त्याले शाळेत टाकावं म्हंजे झालं. बाकी समदं मी पाहून घेईन. "
रामप्रसादनं जेवणाचा घास पोटात कोंबला. तसा तो म्हणाला,
"पोरी, बयी हायेस तू. अवो, आतं दोनचार वर्षानं तुहा लगन होईन अन् तू सासरी जाशीन. मंग याले शिकवण कोण?
"बाबा, त्याची चिंता तुमी कायले करता. मी नेईन सासरी त्याले. "
"जवाई आयकन का तुह्यं. "
"बाबा, तेवळी चिंता कायले करता. तुमी आताची चिंता करा. आपण सुनिलले शिकवाचं म्हंजे शिकवाचंं. "
चुन्नी बोलत होती. तशी मधातच पार्वती बोलली.
"शिकवा नं वं आपल्या सुनिलले. बाजूच्या शाम्यानं तं शिकोलं. त्याचा पोरगा म्हणे शयरात उच्च पदावर हाये. आपला पोरगा बी शिकून असाच मोठा होईन. अन् नशिबात असन तं लागन शयरात कोणाच्या नोकरीले नायतं नाय लागन. तुमी आतंपासूनच तारे नोको तोडा. अन् इचार करा नं बाप्पा. आपली दोनबी लेकरं नोको शिकू मनल्यावर नाय शिकली नं. आतं पोरीची याले शिकवाची इच्छा हाये तं शिकवू द्या पोरीले. तुमी फक्त हो मणा."
आईचं बोलणं संपलं होतं. तसं आईचं बोलणं संपत नाही, तोच सुधीरही बोलला.
"बाबा, शिकवून नं आपल्या सुनिलले."
"आरं, पण पैसा लागते लय शिकवाले. आपून कोठून आणून एवळा पैसा."
"बाबा, चिंता करु नोका. ते मायावर सोडा. मी कमवीन. थोडी जास्त मेहनत करीन अन् शिक्षणाले पैसा देईन."
"अन् मी बी बायेर कामाले जावून पैसा आणीन." पार्वती म्हणाली.
"अन् बाबा मी बी कामाले जात जाईन. "
"तुमाले गी कामाले जाची गरज नाय. आमच्या खानदानीत बाया मंडळीयले कधीच कोणं बायेर कामाले पाठवलं नाय. आमी हाओत, दोघंबी बाप लेकं. आमी मेहनत करुन अन् सुनिलले शिकवून. खूप शिकवून. आतं तर झालं."
रामप्रसाद विचार करु लागला. त्याला वाटलं की आपलं या दोन्ही लेकरांनी ऐकलं. ते शिकले नाही. आता माझ्या मुलीची इच्छा आहे याला शिकवायची. कमीतकमी एक तरी शिकलेला असावा. जेणेकरुन आपल्याला त्याचा उपयोग तर होईल काही ना काही. नाही नोकरी लागेल तर कमीतकमी धंदा तर चांगला करु शकेल.
जेवता जेवता रामप्रसादचे शिक्षणाबाबतचे बदललेले विचार. रामप्रसादलाही शिक्षणाचं महत्व माहित झालं होतं. कारण बाजूच्या शाम्यानं आपला पोरगा असाच शिकवला होता. तो आता शहरात उच्च पदावर नोकरी करीत होता. तसा तो म्हणाला,
"ठीक हाये मंग. "
रामप्रसाद पुन्हा म्हणाला.
जेवन पुरतं संपलं होतं. तसा रामप्रसादनं होकार देताच घरात आनंदी आनंद झाला. तो दिवसच मुळात सणासुदीचा वाटला. तसं सायंकाळी आईनं घरात तोच आनंद साजरा करण्यासाठी गोडधोड बनवलं.

****************************************
*******************

काही दिवस असेच निघून गेले. तसा पावसाळा लागला होता. तशी शाळा सुरुही झाली व शाळा सुरु होताक्षणी चुन्नी आपल्या बाच्या पाठीमागं लागून शाळेत सुनिलला नाव टाकायला घेवून गेली.
ती प्रशस्त शाळा. तसे ते तिघंही आतमध्ये गेले. सर्व शिक्षक बसलेले होते. तशी चुन्नी म्हणाली,
"नाव टाकाचं हाय. "
"कोणत्या वर्गात?" एक शिक्षीका म्हणाली.
"पहिलीत."
त्या शिक्षीकेनं इशा-यानंच दिशानिर्देश केलं व ती त्या शिक्षीकेजवळ गेली. तसं त्या शिक्षीकेनं विचारलं,
"काय नाव."
चुन्नीनं नाव सांगीतलं. तसं एक एक विचारत चुन्नीनं सर्व माहिती त्या शिक्षीकेला सांगीतली. तशी सर्व माहिती भरुन पुर्ण होताच ती शिक्षीका म्हणाली,
"तुझं नाव?"
"चुन्नी. "
"तू कोणत्या वर्गात शिकते? "
"नाय शिकत."
"का बरं? कोणत्या वर्गापासून सोडली?"
"मी शिकलीच नाही."
"का बरं?"
"बाबानं नाय घातलं शाळेत." ती ओशाळत म्हणाली. तशी ती शिक्षीका तिच्या बापाला म्हणजे रामप्रसादला म्हणाली,
"का नाही शिकवलं मुलीला?"
रामप्रसादची मानसिकता. रामप्रसाद अगदी गप्प होता. तसं त्याला तिला न शिकविल्याबद्दल वाईट वाटत होतं. परंतू आता उपाय नाही, म्हणून तो गप्प होता. तशी ती शिक्षीका म्हणाली,
"शिकायचं आहे काय तुला. आम्ही शिकवतो. छान छान शिकविणार. फक्त तुझी तयारी पाहिजे. बोल शिकणार का?"
"आता या वयात. अन् तेबी पहिल्या वर्गात."
"नाही गं, आता सरकारनं एक प्रावधान काढलं आहे."
"म्हंजे? कोणत्याबी वयात शिकवायचं."
"हो, फक्त तयारी पाहिजे आपली म्हणजे झालं."
"मग मले कोणत्या वर्गात घ्याल?"
"तुला तुझ्या वयानुसार सातवीत घेवू. चालेल. दोघंही भाऊबहिण यायचं शाळेला."
"नाय जी."
"का बरं?"
"मले लय लाज वाटते."
"लाज. कशाची लाज?"
"लोकं का मनतीन. वर्गातले पोरं?"
"काय म्हणणार. त्यांना कुठं माहीत आहे की तू शिकलेली नाही म्हणून. आपण सांगायचं कशाला?"
चुन्नीमध्ये शाळेच्या शिक्षीकेनं तसं म्हणताच शिक्षणाची आवड निर्माण झाली. तशी ती म्हणाली,
"बाबांना इचारा."
तशी ती शिक्षीका रामप्रसादला विचारु लागली.
"बोला, टाकता का पोरीचं नाव. अन् हं, पोरगी पोरगा असा भेदभाव करु नका. तुमची पोरगीच तुमचा आधार होईल."
रामप्रसाद काय समजायचं ते समजला व त्यानं होकार दिला चुन्नीच्या शिक्षणाला. तशी चुन्नीही शाळेत जाण्यास तयार झाली.
नवीन शैक्षणिक धोरण आलं होतं. शाळेत या धोरणानुसार कोणालाही कोणत्याही वयात नाव घेत होते. तसं चुन्नीला घेतलं गेलं व चुन्नी पहिला दुसरा वर्ग न शिकता थेट सातवीत प्रवेश घेवून सातवीपासून शाळेत जावू लागली. कधीही शाळेत न गेलेली चुन्नी....... सुरुवातीला तिला लाज वाटत होती. परंतू कालांतरानं तिची शरम कमी झाली व ती सातव्या वर्गात शिकती झाली.
तो सातवा वर्ग तिच्यासाठी नवीनच होता. तिला साधं अ आ इ येत नव्हतं. परंतू ती खुप मेहनत घेवू लागली. तशी तिला शिकविणारी शिक्षीकाही. लवकरच चुन्नी या वर्गात लिहायला वाचायला शिकली होती.

******************************************

हल्ली आपण पाहतो की आपली मुलं हे आपलं ऐकतच नाही. तरीही लहानपणापासूनच आपण त्यांना सांगत असतो. त्यांनी हे करावं, ते करु नये. त्यांनी अमकं करावं, ढमकं करु नये. वैगेरे वैगेरे गोष्टी. त्यातच त्या मुलांची इच्छा नसतांना त्यांनी इंजीनियरच करावं वा त्यांनी डॉक्टरच बनावं. ही आपली महत्वाकांक्षा असते. परंतू त्यांच्या बुद्धीमध्ये तसा गुण नसतोच. त्यामुळं शक्यतोवर त्यांचं मन त्यामध्ये रमत नाही. त्यातच काही काही लोकं आपण डॉक्टर बनवायला जातो, तेव्हा ती डॉक्टर बनत नाही आणि आत्महत्या करतात.
या डॉक्टर, इंजिनीयर बनविण्याच्या प्रक्रियेत काही काही अंशी मायबापाचं बरोबर असतं. कारण ते मुलांचं भवितव्य विचारात घेतात. त्यांना सुखाचे दिवस यावेत. त्यांना समाजात मान सन्मान प्रतिष्ठा मिळावी हा त्यांचा उद्देश. कारण तो जर हमाल बनला तर त्याला समाजात कोणीही विचारणार नाही असं प्रत्येक मायबापाला वाटत असतं. परंतू तो मुलगा तसा बनेल तेव्हा ना. शेवटी नशिबात असेल तर मिळेल नाहीतर नाही. हिच गत विद्यार्थी मनाची असते.
विद्यार्थी मन त्यात लागत नसल्यानं विद्यार्थी मायबापाच्या या रास्त विचारांना आपल्या मनावरील ताण समजून आत्महत्या करतात. हे काही अंशी बरोबर वाटत नाही. तो ताण नसतोच. परंतू मुलांना तो ताण वाटतो. मुलांना वाटते की आपल्याला स्वातंत्र्य असावं. मन मानेल तसं विहार करु द्यावं. जे मनाला वाटेल, ते खावू द्यावं आणि शिकण्याच्याही बाबतीत जे शिकावं वाटेल, ते शिकू द्यावं. अन् जर शिकायची इच्छा नसेल तर अज्ञानी राहू द्यावं उद्या मायबापांनाच कोसण्यासाठी.
महत्वाकांक्षा ही महत्वपूर्ण गोष्ट आहे. ती कधीकधी आपलं जीवन बनवू शकते तर कधीकधी ती आपलं जीवन उध्वस्तही करु शकते. तसेच नशिब....... नशिबही अशी गोष्ट आहे की ती आपलं जीवन बनवू शकते तर कधी तेच जीवन उध्वस्त करु शकते. याबाबतीत एक प्रसंग सांगतो.
मी वसतीगृहात राहात असतांना माझा एक सहपाठी होता. तो दहावीला गुणवत्ता यादीत असल्यानं त्याची चांगल्या नामांकीत महाविद्यालयात वर्णी लागली की ज्या महाविद्यालयात भल्याभल्याची वर्णी लागत नाही. मुलगा अति हूशार होता. चांगला अभ्यासही करीत होता. परंतू दुर्दैव असं की अभ्यास झाला असतांनाही त्याला गणित विषयात नापास व्हावे लागले. रिटोटल तपासली तरी गुण वाढले नाही. याला काय म्हणावे. याबाबतीत अजून दुसरा प्रसंग सांगतो. घरामध्ये माझी बहिण दहावीला होती. ती फारच हुशार होती. तिनं लहानपणापासूनच ठरवलं होतं की ती नापास होताच शिक्षण सोडेल. यावर्षी ती दहावीला होती. तेव्हा तीन पेपर झाल्यावर तिचा हातच मोडला व त्यानंतरचे ती पेपर देवू शकली नाही. ती चक्क नापास झाली व तिनं आपलं शिक्षण सोडलं. याला काय म्हणावं. हिच घटना माझ्याबाबतीतही घडली. मी वकीलकीचा अभ्यास करीत असतांना माझे वडील त्याच काळात मरण पावले. ज्यावेळी रक्षा विसर्जन होतं, त्याही दिवशी दुपारी पेपर होता. मी पेपरला गेलोही. परंतू पेपर लिहू शकलो नाही वा त्या दुखद धक्क्यानं बाकीचेही पेपर लिहू शकलो नाही. याला काय समजावं. नशिबच समजावं लागेल ना. असे प्रसंग प्रत्येकांच्या जीवनात येत असतात. त्याला नशिबच समजावं लागेल. हं, प्रयत्न करणं आपलं काम असावं. कारण प्रयत्नांती परमेश्वर हे आपण ऐकलं आहे. प्रयत्न केल्याशिवाय काहीच मिळत नाही. तेव्हा प्रयत्न करायला हवा. सगळेच मोठमोठे थोर शास्रज्ञ वा विचारवंत बनत नाहीत.
आज विद्यार्थ्यांच्या मनात महत्वाकांक्षा भरण्याची गरज आहे, त्यांचा धीर खचू नये म्हणून. परंतू ती आपली महत्वाकांक्षा कधीकधी त्याचा जीव घेण्यास कारणीभूत ठरु शकते. ही रास्त बाब नाही. अशा महत्वाकांक्षेनं जीवन ख-या अर्थानं उध्वस्तही होवू शकतं ही शक्यता नाकारता येत नाही. मुलांनं डॉक्टर बनावं, इंजिनीयर बनावं, अजून कोणी बनावं. सारं बरोबर आहे. परंतू ते जर तुमच्या पाल्यांना आवडत नसेल तर........ तर विचार करण्यासारखी ती बाब आहे. त्याची परीयंती आत्महत्येतच होते. आपल्याच मुलांना आपण परावलंबी होवू शकतो. आपलंच मुल आपल्या नजरेआड होवू शकतं.
मुलांना आज स्वातंत्र्य हवं आहे. असं स्वातंत्र्य की ज्या स्वातंत्र्याने ते मुक्तपणे विहार करु शकतील. त्यांना प्रेम करणं आवडतं. ते त्याला सांगावंच लागत नाही. त्यांना प्रेम नको करु म्हटलं किंवा त्यात धोका होतो म्हटलं तर ते कदाचित ऐकणार नाहीत. त्यांना विवाह करतांना मायबापाच्या आवडीची मुलगी नको असते. एवढंच नाही तर ब-याचशा मुलांना आपल्या पत्नीचंच ऐकायची सवय असते. त्याच्या पत्नीनं सांगीतलं की मायबापांना वृद्धावस्थेत वृद्धाश्रमात टाक तर मुले पटकन ऐकतात. परंतू डॉक्टर, इंजिनीयर बन म्हटलं किंवा अभ्यास कर म्हटलं तर ते बिलकुल ऐकणार नाहीत. कदाचित अभ्यास करा म्हटलं तर ते आत्महत्याही करतील. त्यामुळं ते सर्व नशिबावर सोडून आजच्या तरुणाईच्या काळात आपल्या महत्वाकांक्षा त्यांच्यावर थोपवू नये म्हणजे झालं. कारण याच महत्वाकांक्षेतून आपल्या मुलांचाच बळी जावू शकतो. त्याबरोबर आपलाही. कारण मुलंच आपल्या जीवनात नसतील तर आपलं जीवन कोणत्या कामाचं हे मुलं नसतांना समजतं. तेव्हा ह्या आपल्या महत्वाकांक्षा आपल्या आपल्या जवळंच ठेवाव्यात. कोणीही मोदी वा अनिल अंबानी वा कोणीही सचिन तेंदूलकर वा लता मंगेशकर बनू शकत नाही. प्रत्येकांच्या नशिबात काही वेगळं असतं. प्रत्येकाचंच नशिब वेगळं लिहिलेलं असतं. ते कोणी बदलवू शकत नाही हे लक्षात घ्यावे. कारण सर्वच लोकं चंद्रावर जावू शकत नाहीत. कोणाला ना कोणाला पृथ्वीवर राहावेच लागेल हेही तेवढंच लक्षात घेण्यासारखं आहे. हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल. तेव्हाच आपल्याला खरं जीवन समजेल. जगणंही समजेल आणि विशेष म्हणजे महत्वाकांक्षाही........हेही लक्षात घेण्यासारखं आहे.


******************************************

तो सातवीचा वर्ग. त्या वर्गात चुन्नी आज रमली होती. तिला अगदी हायसं वाटत होतं. त्याचं कारणही तसंच होतं. ते म्हणजे तिला त्या शिक्षीकेमुळं शिकायला मिळालं होतं नव्हे तर या नवीन शैक्षणिक धोरणातून हे शक्य झालंं होतं.
आज नवीन शिक्षण धोरण आलं म्हणून ठीक होतं, नाहीतर कधीच चुन्नी शिकू शकली नसती.
चुन्नीची शिकायची इच्छा होती. परंतू तिच्या वडीलांच्या मानसिकतेनं तिला शिकता येत नव्हतं. कारण मुलांना शिकवून काही फायदा होणार नाही ही त्यांची मानसिकताच होती. परंतू घडलं चुकीचं. बिचा-या त्या शिक्षीकेमुळं चुन्नीला शिकायला मिळालं होतं त्या वाढलेल्या वयातही. तसं पाहता चुन्नीची शिकायची इच्छा होतीच.
चुन्नीचं शाळेत सातव्या इय्यतेत नाव टाकलं गेलं. त्यात तिला फार आनंद झाला. परंतू हा आनंद फार काळ टिकला नाही. ती जेव्हा दहावीला गेली. तेव्हाच तिला शहरातील एक मुलगा पाहायला आला आणि अगदी बालवयात तिचा विवाह त्या मुलाशी लावण्यात आला.
चुन्नीची शिकायची इच्छा. त्यातच अगदी मनातील इच्छा मोडली असतांना तिचं नाव सातव्या वर्गात दाखल झालं. त्यातच तिला आपल्याला शिकता आलं म्हणून आनंद झाला. परंतू पुढं काय? अगदी बालवयात तिचा विवाह म्हणजे पुन्हा तिच्या इच्छेवर पाणी फेरण्यात आलं. शेवटी वडीलांची इच्छा मोडता येईना, म्हणून तिनं होकार देत त्या बालवयातच विवाह केला.
चुन्नीचा विवाह झाला होता. तशी ती सासरी नांदायला आली. सासरी तिच्या मोठं कुटूंब होतं. त्यातच त्या कुटूंबात दिवसभर कामं करता करता त्रेधातिरपीट उडत असे. मात्र पतीचा स्वभाव चांगला होता. तो तिची काळजी घेत असे.
चुन्नीचा पती दिवसभर कामानिमित्य बाहेरच असे. त्यामुळं त्याला दिवसभर आपल्या पत्नीशी बोलताही येत नव्हतं. परंतू रात्री घरी आल्यावर बेडरुममध्ये तो चुन्नीशी निवांत बोलत असे. अशाच संधीचा फायदा घेत एक दिवस ती म्हणाली,
"माधव, मले शिकायचं आहे. जरा शिकवान का?"
तिच्या पतीचं नाव माधव होतं. त्यानं ते ऐकलं. त्याबद्दल त्याला सुरुवातीला आश्चर्य वाटलं. तसा तो जोरात म्हणाला,
"काय म्हटलं.?
पतीचा वाढलेला आवाज ऐकताच एखादं कुत्र आपल्या अंगावर धावून येत जसा खेकसतो. तसंच तिला वाटलं. थोडी भीतीही तिला वाटली. पती रागावला असंही तिला वाटलं. त्याच उद्वेगात ती उत्तरार्थ म्हणाली,
"काय नाय जी."
"नाही. तू काहीतरी नक्कीच म्हटलं. सांग काय म्हटलं ते?"
"काय नाय जी. सहजच म्हटलं. "
"तू आता सांगणार आहेस की नाही."
"नाय जी. सहजच. "
"तुला माझी शपथ आहे. आता तरी सांग."
पतीदेवच तो. तोही प्रेम करणारा. तेही त्यानं तिला शपथ दिलेली. ब-या बोलानं सांगीतलं तर ठीक. नाहीतर समस्या उद्भवणार. आपण बोलावं. आपली इच्छा सांगून टाकावी. मग काहीही होवो परीणाम. ते शिकवतील नाहीतर नाही. परंतू एकदा तर कळेल की शिकवत आहे की नाही ते.
असाच तिचा विचार. तो विचार करता करता तिनं त्याला सांगून टाकलं की तिला शिकायचं आहे. त्यावर तो म्हणाला,
"एवढंच ना. मग ठीक आहे. तुला शिकायचं आहे तर शिक. परंतू एक लक्षात ठेव की घरी कामात हयगय व्हायला नको. कुणाचीही कुरकूर ऐकू येवू नये. "
तो पती...... त्या पतीनं दिलेला होकार चुन्नीला अतिशय आनंददायी वाटला. तसं तिनं अकरावीला नाव दाखल केलं.
चुन्नी खुश होती. कारण तिनं जो विचार केला होता की पती तिला शिकवणार नाही. ते अगदी चूक ठरलं होतं. पतीनं तिला शिकायची परवानगी दिली होती. परंतू सासरची मंडळी ही शिकवायला परवानगी देणारी नव्हती. ती त्या वर्तनाला दोषच देत होती. ती मंडळी चुन्नीच्या शिक्षणाला सहकार्य करीत नव्हती. उलट टाँगटिंग करीत होती. परंतू चुन्नीनं त्या गोष्टीचा विचारच केला नाही. ती शिकत होती घरची सर्व कामं करुन. कारण तिला नवीन शैक्षणिक धोरणातून झालेल्या प्रवेशाचा पुरेपूर फायदा उचलायचा होता तेही उच्च शिक्षण शिकून.
सुनिल आता पाचवीत गेला होता. तशी चुन्नीही बारावीत होती. सुनिलला त्याचा बाप रामप्रसाद आणि भाऊ सुधीर पैसा लावत होता तर चुन्नीला तिचा पती. दोघंही शिकत होते. तशी चुन्नी बारावी पास झाली. तसा तिनं उच्च शिक्षणाचा फार्म महाविद्यालयात भरला व तिनं लागलीच प्रवेश घेतला. परंतू सुनिलचं काय?
सुनिलला तिनं आपल्या पतीच्या मागे लागून शहरात शिक्षणासाठी आणलं व वसतीगृहात टाकून ती त्याला शिकवू लागली. अशातच त्याची ओळख संगीतासोबत झाली. जी संगीता त्याच्या शाळेतील त्याची मैत्रीण होती.


********************************************

तो खुप परेशान होता. सारखी तिचीच आठवण येत होती त्याला. तो तिच्याशिवाय एक क्षण ही राहू शकत नव्हता. त्याला काय वाटत होतं कुणास ठाऊक. ती आता जगात नव्हती. परंतू तिची आठवण त्याच्या ह्रृदयात घर करुन होती. कालच तिची चौदावीही पार पडली होती.
चौदावी........ त्यानं ती चौदावी अगदी थाटामाटात पार पाडली. कारण तो तिचा घरवाला होता. त्यानं चौदावी पार पाडली की कारण तो तिचा पती म्हणजे अगदी जवळचा नातेवाईक होता. तो तिचा एक प्रेमाचा व्यक्ती होता की ज्याच्या ह्रृदयात ती घर करुन होती. तिनं त्याच्या मनावर राज्य केलं. तिचं नाव होतं संगीता.
संगीता लहानपणापासूनच हुशार स्वभावाची होती. पाहायलाही सुंदर होती.,अगदी बारीक बारीक हातापायाची होती. त्यातच सडपातळ. ती सडपातळ असल्यानं सर्वांना खुप आवडायची.
लहानपणी मुलांसोबत अल्लड खेळणं अल्लड बोलणं. त्यातच मुलांसोबत खेळतांना काही अमंगल गोष्टी घडल्याच तर त्याची जाणीव त्या वयात नसायची. परंतू जसजसं तिचं वय वाढत गेलं. तसतसे तिचे संदर्भ बदलले.
सुनिल....... वसतीगृहात राहणारा एक मुलगा होता. त्याचे वडील शेतकरी होते. शेतात राबता राबता त्यांची जिंदगी निघून गेली होती. तसं पाहता सुनिलही अगदी लहानपणापासून शेतात जात असे व शेतात राबत असे. लहानशा त्या वयातच सुनिल वखरण व नांगरण करण्याचं कसब शिकला होता. त्यातच जर शेतात वखरण नांगरणाचं काम नसेल तर तो रानात जनावरंही चारायचं काम करीत असे. सोबत त्याचा मोठा भाऊ सुधीरही असे. त्याला त्या वयात भावासोबत रानावनात फिरतांना फार मजा येत असे.
ती जनावरं रानात चारतांना छान मजा येत असे. परंतू या रानवळ व खेडवळ जीवनात जगण्यात कोणतंच सारस्य नाही असा विचार करुन सुनिलच्या बहिणीनं त्याला शहरात वसतीगृहात टाकलं होतं. सुनिल आता वसतीगृहात शिकत होता त्या बाल्यावस्थेपासूनच.
ती बाल्यावस्था नव्हे तर तो सहावा वर्ग. सुनिलचे दुधाचे ओठंही नीट सुकले नव्हते असं ते वय. सुनिल रामप्रसादचा एकुलता एक मुलगा. परंतू शिक्षणाचं महत्व समजून रामप्रसादनं सुनिलला शहरात टाकलं. त्याचं कारण होतं शहरातील शिक्षण. रामप्रसादला वाटत होतं की गावच्या शाळेत सुनिलचं मन लागणार नाही. तो अनाडीच राहिल. यामुळं की काय, सुनिलला रामप्रसादनं वसतीगृहात टाकलं.
ते वसतीगृह म्हणजे सुनिलसाठी एक कैदच होती. त्याला सतत त्याच्या मायबापाची आठवण येत होती. तशीच त्याच्या मायबापालाही त्याची आठवण यायची. त्यातच या वसतीगृहात विद्यार्थी हे अगदी लहानच असल्यानं कोणीही वार्डनच्या विरोधात जात नसत. त्यामुळं फारसं जेवन खावण पोटभर मिळत नव्हतं. त्यातच सुनिल कमालीचा उपाशी राहायचा व त्याला गाव आठवायचं. त्याचबरोबर गावाला आईनं बनविलेला सुग्रास स्वयंपाक.
आईच्या हाताला विशेष चव होती. ती चव अजुनही सुनिलच्या जीभेवर रेंगाळत राहायची. त्याचं कारणही तसंच होतं.
सर्व जगानं आधुनिक तंत्रज्ञानाचा स्विकार केला होता. परंतू सुनिलच्या मायबापानं ते तंत्रज्ञान अजुनही स्विकारले नव्हते. ते स्वयंपाक अल्युमिनीअमच्या भांड्यात वा कल्हईच्या भांड्यात करीत नव्हते तर मातीच्या भांड्यात करीत असत. आज बाकी लोकांजवळ अल्युनिनीअम भांडी असली तरी मातीचे तावे व मातग्या सुनिलच्या घरी होत्या. त्यामुळं त्यात शिजविलेलं अन्न अगदी छान वाटत असे.
सुनिल वसतीगृहात राहता राहता शाळेतही जात होता. त्याची शाळा वसतीगृहापाासून काही अंतरावर होती. ती शाळा वसतीगृहाच्या लागून नव्हती. तसा सुनिल जरी शाळेत जात असला तरी तो कुठे राहतोय? काय खातोय? हे सर्व शाळेतील मुलांना माहित होतं. त्यातच एक दिवस त्याची संगीताची ओळख झाली. संगीता त्याच्यासोबत राहात असे नव्हे तर तो वसतीगृहात राहतो म्हणून त्याला मदत करीत असे. तिला त्याची दया येत असे. एकंदर सांगायचं झाल्यास ती त्याचेवर प्रेम करीत होती.
हळूहळू ते प्रेम वाढत चाललं होतं. अशातच त्याला वसतीगृहात जेवन बरोबर मिळत नसावं म्हणून ती घरुन त्याचेसाठी जेवनाचा डबाही आणत होती.
त्यांचं प्रेम वाढत चाललं होतं. तशी त्याची जवळीकही. त्यातच त्यांची शिकण्याची आसही. संगीताला वाटत होतं की सुनिल गरीब आहे, ग्रामीण भागातील आहे. म्हणून त्यानं शिकावं. त्यामुळं ती त्याला मार्गदर्शन करीत असे. मात्र यामध्ये तिनं आपल्या स्वतःच्या शिक्षणाची काळजी घेतली नाही.
संगीता ही शिकत होती खरी. परंतू तिचं मन त्या अभ्यासात रमत नव्हतं. परंतू सुनिलचं मन मात्र अभ्यासात रमत होतं. अशातच दोघंही दहावी पास झाले. ती अकरावीला गेली. त्याचबरोबर तोही. मात्र शाळेच्या शेवटच्या दिवशी दोघांनीही ठरवलं की आपण एकाच महाविद्यालयात शिकावं. म्हणून की काय, ते एकाच महाविद्यालयात शिकू लागले.


****************************************

चुन्नीचं शिक्षण पूर्ण झालं होतं. ती आता स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होती. शिक्षणाचा तिला बराच फायदा झाला होता.
तिचं नाव उशिरा शाळेत प्रवेशलं गेलं असलं तरी तिनं अतिशय कठीण परीस्थितीत आपलं मनोबल न ढळू देता स्पर्धा परीक्षेपर्यंतचा टप्पा पार केला होता. सुनिल मात्र अजून बराच लहान होता.
अशीच चुन्नीनं एक स्पर्धा परीक्षा दिली व चुन्नी त्या परीक्षेत पास झाली नव्हे तर एक अधिकारी म्हणून लवकरच चांगल्या हुद्द्याच्या ठिकाणी लागली. तिनं भावाचंही जीवन असंच करायचं ठरवलं.
सुनिल शिकत होता. त्याचबरोबर त्याचं प्रेम वृद्धींगत होत चाललं होतं. तो संगीतावर निरतिशय प्रेम करीत होता. तिही त्याचेवर प्रेम करायला लागली होती. ती त्याचेशी विवाह करु पाहात होती. परंतू तिला त्याच्या करीअरची चिंता होती. त्यामुळं की काय, ती त्याचेशी विवाहाबद्दल बोलू शकत नव्हती. कारण तिला वाटत होतं की कदाचित सुनिलनं विवाह केला तर तो आपलं अर्धवट शिक्षण सोडून देईल.
सुनिल अशातच बारावी चांगल्या गुणानं पास झाला. तिही पास झाली. तसं तिनं त्याला विचारलं.
"आता काय करणार?"
"बी ए करणार. दुसरं काय?"
"नको करुस."
"का?"
"अरे, तुझ्यासारखा मुलगा लवकर नोकरीवर लागायला हवा."
"म्हणजे?"
"तुला लवकर नोकरी लागायला हवी."
"म्हणजे?"
"अरे तू लवकर नोकरीवर लागायला हवा."
"मग काय करु?"
"डी एड कर. सध्या नोकरीला जास्त महत्व आहे त्या. शिवाय मास्तर झाला की तुझा मानसन्मान वाढेल."
"हो का."
"होय."
"ठीक आहे. तू म्हणतेस तर करतो डी एड."
संगीताचं ते बोलणं. त्यानं डी एडला प्रवेश घेतला. तसा त्याचा नंबर डी एडला लागला व तो डी एड प्रशिक्षण करण्यासाठी सज्ज झाला. संगीताला कमी टक्केवारी असल्यानं संगीता बी ए करीत होती.
मध्यंतरीचा काळ दोघांचाही बरोबर गेला नाही. ती बीए मध्ये रममाण झाली. तो डी एड मध्ये. दोघांनाही वेळ मिळायचा नाही. त्यामुुळं साहजीकच संभाषण वा संवाद व्हायचे नाहीत. अशातच दोघांनाही एकमेकांची आठवण यायची. परंतू भेट न होत असल्यानं त्यांनी एकमेकांशी संवाद साधला नाही. अशातच संगीता त्याला विसरली. तोही तिला विसरला.
मुलीचं वाढतं वय तिला विवाहाला आमंत्रण देत असते. संगीताच्या बाबतीतही तसंच झालं. संगीता आज वीस वर्षाची झाली होती. तसं तिच्या मायबापानं तिच्यासाठी विवाहयोग्य वर शोधणं सुरु केलं होतं.
कधीकधी तिला सुनिल आठवायचा. परंतू सुनिल आज मास्तर बनत चालला होता. ती विचार करायची की जर ती सुनिलसाठी थांबली आणि सुनिलनं तिच्याशी विवाह नाही केला तर...... अशातच एक मुलगा तिला पाहायला आला. त्यानं तिला पाहिलं. तसा त्यानं होकार दिला. तिनंही मनावर ताबा ठेवून हो म्हटलं. तसं संगीतानं मनावर ताबा ठेवून त्या मुलाशी विवाह केला.
संगीतानं मनावर ताबा ठेवून विवाह केला खरा. परंतू तो मुलगा काही चांगला निघाला नाही. तो तिला सतत मारहाण करीत असे. सतत त्रास देत असे. नेहमी तिच्या माहेरचे शुल्लक कारणावरुन टोमणे मारत असे. अशावेळी अशा प्रकारच्या टोमण्यानं ती त्रस्त झाली. त्यातच तिला कधीकधी वाटायचं की आपण याला सोडून द्यावं. त्यासाठी ती आपल्या आईवडीलांशी बोलायची. परंतू आईवडील तिला समजंवायचे. म्हणायचे की सोडू नको.
संगीताला ते टोमणे ऐकावेसे वाटत नव्हते. त्यातच त्याची मारहाण तिला सहन होत नव्हती. काय करावं सुचत नव्हतं. अशातच आज एका शुल्लक कारणावरुन भांडण झालं. भांडण एवढं मोठं होतं की तिनं निर्णय घेतला त्याला सोडण्याचा. ती त्याला सोडून माहेरी आली.
संगीता माहेरी आली. परंतू तिला सारखी पतीची आठवण येत होती. जीव कासावीस होत होता. परंतू उपाय नव्हता. मायबापाचाही दबाव होता. तिला वाटत होतं की जर आपण आपल्या मायबापाच्या इच्छेविरुद्ध आपल्या पतीच्या घरी गेलो आणि उद्या जर कमीजास्त झालं तर मायबाप आपल्याला ठेवणार नाही. शेवटी काय करणार. तशी ती चिंतीत व्हायची व गप्प राहायची.
ती लाचार संगीता. त्यातच तिची भावजय खट्याळ होती. तिला संगीताचं माहेरी असणं सुहावत नव्हतं. ती संगीता वरुन नेहमीच भांडण करायची. उकारे पाकारे काढायची. अशातच संगीताला वाटायचं. आपण वेगळं राहायला हवं.
संगीताचं ते जगणं एखाद्या चित्रपटाला शोभेल असंच होतं. तिला काय करावं ते सुचत नव्हतं. पती पाहिला तर तो तसा होता आणि मायबाप पाहिले तर तेही लाचारच होते. ते सुनेवर अवलंबून होते आणि सुनेचा तर त्या घरी वरदहस्तच होता. तिची सततची कुरकूर. शेवटी संगीतानं निर्णय घेतला. आपण वेगळं राहायचं.
संगीताचा तो विचार. संगीता वेगळी राहायला गेली. आता तिला समाधान वाटत होतं. परंतू त्यात एक अडचण होती.. ती म्हणजे एकाकीपण. तरीही ती कामं करीत असतांना तिला एकाकीपण जाणवत नव्हतं. कधीकधी जेव्हा ते जाणवायचं. तेव्हा तिला सुनिलची आठवण यायची. वाटायचं की आपण त्या सुनिलशी विवाह केला असता तर बरं झालं असतं.
संगीता एकटी राहात होती. परंतू एकट्या पणाचा फायदा कोण नाही घेणार! काही काही अशीच मंडळी आजुबाजूला होती की जी तिच्या एकाकीपणाचा फायदा घेवू पाहात होती. तिच्यावर वासनामय नजर टाकू पाहात होती. परंतू संगीताला ते आवडत नव्हतं. ती मात्र अशा माणसाांपासून फटकून राहात असे.
संगीता एकटीच राहात होती. तिला एकटेपण जाणवत होतं. तिला करमत नव्हतं. कधीमधी आई येई, कधी बापही. पण ते क्षणाचे सोबती होते. हा एकटेपणा संपविण्यासाठी संगीतानं काही मैत्रीणी पकडल्या होत्या. ती मैत्रीणीशी बोलत होती. त्यातच तिचा थोडाफार विरंगुळा होत होता. ती त्या मैत्रीणीसोबत कधी फिरायला जात असे. कधी बाजारात जात असे तर कधी चित्रपटगृहात. कधी बागेतही फेरफटका मारत असे. आज ती अशीच आपल्या एका मैत्रीणीसोबत तिच्या मुलांचा शाळेत प्रवेश करायला गेली होती.
संगीता आपल्या मैत्रीणीसोबत तिच्या मुलाचा शाळेत प्रवेश करायला गेली असता तिनं पाहिलं की तेथे तिचा बालपणीचा मित्र सुनिल दिसतोय. परंतू बोलायचं कसं, आपण तर नवीन आहोत.

तो सुनिलच होता. तिनं पक्क ओळखलं होतं. परंतू बोलायची हिंमत होत नव्हती. काय करावं सुचत नव्हतं. तशी काही वेळ ती चूप राहिली. शेवटी तिच्यानं गप्प राहिणं होईना, तशी ती त्या शख्स जवळ गेली. म्हणाली,
"आपल्याला ओळखल्यासारखं वाटतेय. कदाचित तुम्ही अमूक अमूक शाळेत शिकल्या काय?"
"होय."
"आपण सुनिल आहात का?"
"होय."
ती महिला........ त्या तरुण वयात ती महिला तरुण दिसण्याऐवजी तिच्या गालावर सुरकृत्या पडल्या होत्या. तिचे गाल हाडाला चिकटलेले होते. तशी ती फारच बारीक झाली होती. त्यामुळं तिचा चेेहरा पार बदलून गेला होता. शेवटी चिंता होती तिला त्या.. त्या चिंतेनं तिला काय करावं ते तिला सुुचत नव्हतं. शेवटी बारीक ती बारीकच. तिची कांती बनत नव्हती.
'आपण सुनिल आहात का' असं त्या महिलेनं विचारताच सुनिलच्या चेह-यावर आश्चर्याचे भाव निर्माण झाले. ती महिला कोण असेल याचा तो क्षणभर विचार करु लागला. त्याने तिला ओळखायचा बराच प्रयत्न केला. परंतू ती कोण आहे हे काही त्याला आठवत नव्हतं. तसा तो म्हणाला,
"होय, मी सुनिलच. तुम्ही कोण?"
"ओळखा आधी. मग सांंगते."
तिनं म्हटलेलं ते वाक्य. त्याला त्या वाक्यानं विचार करायला भाग पाडलं. तो डोक्याला ताण देत देत विचार करु लागला. परंतू ती त्याला आठवत नव्हती. शेवटी न राहवून तो कुतूहलानंं म्हणाला,
"आता अंंत पाहू नका. सांगा आपली ओळख आधी."
"नाही ओळखलं तर..... "
"कसा ओळखणार. मी कधी तुम्हाला पाहिलंच नाही."
"हो का, नीट आठवा. "
तो थोडा वेळ गप्प राहिला. तसं त्यानं डोक्याला ताण देवून पाहिलं. परंतू ती त्याला काही आठवत नव्हती. शेवटी तो म्हणाला,
"नाही आठवत काहीच. सांग ओळख."
शेवटी त्याला न आठवलेलं पाहून ती म्हणाली,
"मी....... मी संगीता नाही का? तुझ्या शाळेमधली. तुझी बालपणाची मैत्रीण. "
"तू संगीता....... संगीता होय! किती बदलली तू. अन् बारीकही झालीया. काय काही खात पीत नाही का? "
"खाते. परंतू...... "
"परंतू........ परंतू काय?"
"जावू दे. मोठी लांब कहाणी आहे. "
"असं कसं? तू सांग आधी. तू माझी जिवलग मैत्रीण नाही का. सांग आधी. "
"पुन्हा कधी. आता वेळ नाही. मी त्या ताईसोबत आली. मग पुन्हा कधी भेट झाल्यावर सांगेन. "
"बरं. मग तुझा पत्ता आणि फोन नंबर दे. मी येईल भेटायला तुला. भेटशिल ना. "
"हो. पण घरी नको येवूस. "
"का?"
"अरे मी एकटीच राहाते. उगाच चर्चेला वाव का? " "बरं. ठीक आहे मग. "
त्यांचं बोलणं झालं होतं. तसा तिनं त्याला फोन नंबर दिला व ती रवाना झाली.
दोन चार दिवस झाले होते. तशी त्याला संगीताची आठवण आली. तसं त्याला तिनं मोबाइल नंबर दिलेला आठवला. तसा त्यानं तिला फोन लावला.
"हैलो, संगीता बोलतेय नं? "
"होय, आपण? "
"मी.... मी सुनिल."
"सुनिल. तुझा बालपणीचा मित्र. "
"अं हं, बोल. कशी काय आठवण केली?"
"सहज. म्हटलं की, मोबाइल नंबर दिलाय. फोन करावा. "
"हो का?"
"होय."
"बोल. कसा आहेस? "
"ठीक आहे. तू? "
"मीही ठीक. "
"बोल कसा काय फोन केला? "
"तुला भेटायचं होतं. भेटशिल. "
"कशाला? "
"बोलायचं होतं काहीतरी."
"काय बोलायचं आहे?"
"काहीही. ते का तुला सांगू सांगू बोलू का?"
"बरं. "
"मग भेटशिल का?"
"ठीक आहे. भेटील. "
"केव्हा? "
"परवा भेटूया तर. "
"ठीक आहे. कुठे भेटशिल? "
"तू म्हणशिल तिथे. "
"बरं. "
सुनिलनं फोन बंद केला होता. तसं भेटायचं ठरलं व भेटायचा दिवसही उजळला.
आज तो भेटण्याचा दिवस होता. मनात उत्तूंग आशा पल्लवीत झाल्या होत्या. तसे ते आज मनसोक्त गप्पा मारण्यासाठी पहिल्यांदा भेटणार होते. त्यामुळं मनात उत्तूंग तरंग होते.
ठरल्याप्रमाणे संगीता आज त्याला भेटायला जाणार होती. तिनं त्यासाठी चेह-यावर मेकअप सजवला. ओठाला लाली लावली. साजश्रृंगार केला. जशी एखादी नववधू विवाहासाठी सजत आहे. मग सोळा श्रृंगार झाल्यावर ती त्याला भेटायला निघाली. त्यानं मात्र कोणताच साजश्रृंगार केला नव्हता.
ठरल्याप्रमाणे त्यांची भेट झाली. ते एका बागेत गेले. तेथे निवांत गप्पा मारण्यासाठी जागा शोधली. ते तेथे बसले. परंतू सुरुवातीला ती गप्प होती. तसं तिचं मौन तोडत तो म्हणाला,
"अगं बोल नं. "
तशी ती म्हणाली, "काय बोलू. "
"अं काहीही. "
"बरं बरं. सांग कसा आहेस?"
"हे काय, हे बोलणं झालं की काय? "
"मग काय बोलू? "
"दुसरं काहीतरी नवीन."
"मला नाही सुचत. तूच विचार प्रश्न. मी उत्तर देते, ओके."
"बरं. " तो म्हणाला. तसा त्यानं एक आवंढा गिळला. तसा तो परत म्हणाला,
"अगं, तू लग्न वैगेरे केलं की नाही? काय करतोय मित्र?"
त्याचा प्रश्न. ती मात्र चूप होती. तसा तो परत म्हणाला,
"आता बोलणं. आणखी काय झालं गप्प राहायला?"
"तुझं झालं का? "
तो क्षणभर चूप राहिला. तशी ती म्हणाली,
"तुझं झालं का लग्न?"
"नाही. "
"का नाही केलं? "
"अं, वेळच नाही मिळाला विवाह करायला. परंतू तू केलं का लग्न? "
ती थोडी गप्प राहिली. तसा तो म्हणाला,
"काय झालं? तू या विषयावर बोलत का नाहीस आणि अशा गोष्टी मित्राला नाही सांगायच्या तर कुणाला? मी मित्र आहे ना तुझा? तू मला मित्र मानते ना. बोल, मानते की नाही? "
"मानते."
"मग सांगच की. सांगून टाक. मन हलकं होतं. "
त्यानं तसं म्हणताच ती सांगू लागली आपल्या मनातल्या गोष्टी. ती सांगत असतांना तिच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. ती सांगत होती तसं तसं तिचं मन हलकं होत होतं. तसं पूर्ण सांगून झाल्यावर तिनं दोन्ही डोळ्यांचे अश्रू पुसले. तसा तो म्हणाला,
"हं तर असं घडलं तुझ्या आयुष्यात. परंतू आता चिंता करु नको. मी आहे आता. तुला वेळोवेळी सांभाळायला. जेव्हा जेव्हा असं वाटेल, तेव्हा तेव्हा फोन करायचा आणि जेव्हा जेव्हा भेटावं वाटेल, तेव्हा तेव्हा भेटायचं. ठीक आहे. "
"हो." ती म्हणाली. तशी त्यानं खिशातून रुमाल काढली आणि हळूवार तिच्या डोळ्याला लावली आणि तिचे सुकलेले अश्रू तो पुसू लागला. तद्वतच तिला बरं वाटत होतं. तो पहिला स्पर्श तिला रोमांचकारी वाटत होता. तसा तिला भुतकाळ आठवला.
ती लहान असतांना एकदा पाऊस सुरु झाला. त्या पावसात भिजण्याच्या भीतीनं ते दोघेही एका कौलारु घराच्या आडोशाला उभे होते. तेव्हा अचानक मेघानं आपला नाच दाखवणं सुरु केलं. त्यावेळी अचानक अंधार पडला. तेव्हा ती अंतर्मनात घाबरली होती. परंतू त्यावेळी याच सुनिलनं तिला धीर देत म्हटलं होतं की घाबरु नको. मी आहे तुझ्यासोबत. त्यावेळी त्यानं काहीही केलं नव्हतं. साधा बोटंही लावला नव्हता. परंतू जी हिंमत दिली होती, ती लाखमोलाची होती. ती हिंमतच तर महत्वाची होती. तिच हिंमत आज सुनिलनं तिला दिली होती. परंतू तिचे आपल्या हातानं अश्रू पुसून.
तो प्रसंग आठवताच तिला वाटत होतं की कदाचित आपण या सुनिलशीच विवाह केला असता तर......
तिचं बरोबर होतं. कारण सुनिल हा चांगल्या स्वभावाचा होता. दारु, खर्रा आणि सिगारेटच्या कोसो दूर होता. सुनिलसोबत इतरही गोष्टी बोलता येत होत्या. मनात काहीही न ठेवता अगदी मनमोकळेपणानं. परंतू आज ते शक्य नव्हतं. कारण आता सुनिल तिचा पती नव्हता आणि तो आता तिच्याशी विवाह देखील करु शकणार नव्हता. कारण त्याचं लग्न झालं नव्हतं. तो मात्र विवाहीत होता. तशी ती विचार करायला लागली. प्रथा परंपरा फक्त स्रीयांसाठीच का? ती विचार करीत होती त्याबद्दल. पतीनं तिला सोडल्यानंतर तिला दुसरा विवाह करता न येणे किंवा पती निधनानंतर तिचा पाटच होणे. विवाह न करता येणे. जर अशा परंपरा, प्रथा नसत्या तर ती आजही त्याचेशी विवाह करु शकली असती. परंतू त्या प्रथा आड येतात. एक स्री आपल्या पतीसाठी वर्षभराचे व्रतवैकल्ये करते. ती उपवास करते. सा-या परंपरा प्रथा पाळते. तरीही ती सुखी राहात नाही. सुखी वाटत नाही.
पुर्वीही स्रिया ह्या अशाच प्रकारे व्रतवैकल्ये करायच्या. पतीसाठी लांब आयुष्याची प्रार्थना करायच्या. परंतू बदल्यात काय मिळायचं त्यांना क्लेश, दुःख, सतीप्रथा.......खरंच जीवंतपणी त्यांना पतीच्या शरणावर जीवंत जाळलं जायचं आणि मोठ्या तो-यानं सांगीतलं जायचं की ती अमूक व्यक्तीची आदर्श पत्नी. ती त्याचेसाठी सती गेली.
महत्वपूर्ण गोष्ट ही की ती सती जात नव्हती स्वतः होवून. परंतू आमचा समाज स्वतः आदर्श नसला तरी स्वतःला आदर्श मानणारा हा समाज तिला पर्यायानं जगू देत नव्हता. तिला पदोपदी त्रास देत होता. तिला बंधनात बांधत होता.
तिच्या पतीच्या निधनानंतर लगेच तिची इच्छा असो वा नसो, तिचा साजश्रृंगार उतरवला जायचा. तिला पांढरी साडी दिली जायची. तिचं कुंकू पुसलं जायचं. पायातील जोडवे काढले जायचे. हातातील बांगड्या फोडल्या जायच्या आणि जर तिला पती शय्येवर सती जायचं असेल तर तिचं साजश्रृंगार उतरवलं जायचं नाही तर सोळा श्रृंगारांनी तिला नटवलं जायचं. चांगला भरजरी शालू परीधान करुन दिला जायचा. त्यातच नाकात मोत्यांची माळ आणि त्या पतीच्या शरणासोबत तिचीही मिरवणूक काढली जायची. त्यातच पतीच्या चितेसह तिचा अग्नीप्रवेश.
या अग्नीप्रवेशाची आपण कल्पनाही करु शकत नाही की किती तिला परेशानी होत असेल जीवंत जळतांना. तिच्या वेदना ह्या तिलाच माहित असासच्या. त्यातच ती बाहेर येवू नये म्हणून काही काही ठिकाणी त्यांचे हातपायही बांधले जात पती शय्येवर टाकतांना. किती अघोरी प्रथा होती ती. त्यानंतर जी सती जात नसे. तिचा छळ केला जात असे. तिला राजसी सुख मिळत नव्हतं. तिला टोमणे मारले जात होते. समाज तिला बरोबर जगू देत नव्हता. काही काही घरी तर घराच्या चार भिंतीत तिला डांबून ठेवलं जायचं आणि परीवारातील लोक तिची इच्छा नसतांनाही सामुहीक बलत्कार करायचे. हे असं वैधव्य असायचं. म्हणूनच स्रिया आपल्या पतीच्या लांब आयुष्यासाठी कामना करीत की पती हा जास्त दिवस जगायला हवा. कारण पती जर जीवंत असेल तर कोणी तिला विधवा म्हणणार नाही. कोणीही तिच्यावर लांच्छन लावणार नाही वा कोणीही घरातील व्यक्ती तिच्यावर बळजबरी करुन सामुहिकपणे बलत्कार करणार नाही.
आता तो काळ गेला. सतीप्रथा बंद झाली. लोकं आज सतीप्रथा पाळत नाहीत. परंतू प्रथा परंपरा आजही पाळतात. कारण पतीनं सुख द्यावं. परंतू आजचेही पती त्यांना खरंच सुख देतात का? तर याचं उत्तर नाही असंच आहे आजचेही काही काही पती आपल्या पत्नीला जुवारामध्ये हारतात व तिचा दारुसाठी वा इतर शौकासाठी सौदा करतात. आजचेही काही काही पती मरण पावताच त्या स्रियांना विधवेचा पोशाख परीधान करायला भाग पाडलं जातं. तिच ती पांढरी साडी, त्या बांगड्या फोडणे, ते जोडवे काढणे आणि कुंकू पुसणे आणि मग घरच्याच मंडळींचे बलत्कार. खरंच या प्रथा परंपरा पाळण्याचा एवढा जर फायदा होत आहे. तर ज्या पतीच्या लांब आयुष्याच्या कामनेसाठी एवढ्या प्रमाणात त्या पाळल्या जातात, तो पती अल्पावधीत का मरावा किंवा पतीनिधनानंतर तिला विधवेचं जीवन का जगावं लागावं आणि महत्वाचं म्हणजे एवढी व्रतवैकल्ये पाळून सुद्धा पतीनं पत्नीला का घरातून हाकलून द्यावं? ह्याच प्रथा परंपरा पाळतात ना स्रिया साधारणपणे ज्या पतीसाठी. त्या पतीनं दारु, जुगार, गांज्याच्या आहारी जावे काय? त्यानं त्या स्रीला मारझोड करावी काय? वैगेरे प्रश्न अनुत्तरीतच आहेत.
महत्वाचं म्हणजे प्रथा, परंपरा चांगल्यासाठीच आहेत. पुर्वजांनी पाडलेल्या आहेत. त्या त्यांनी अगदी विचार करुनच पाडल्या असतील, त्याला वाईट म्हणू नये. परंतू त्या प्रथा परंपरा पाळण्यातून जर ती स्री संतुष्ट नसेल तर तिला त्या प्रथा परंपरा पाळण्याची बळजबरी का करावी? ती करु नये. कारण जी गोष्ट करण्यापासून किंचीतही फायदा होत नसेल तर ती गोष्ट करता कामा नये. त्याची बळजबरीही करता कामा नये. प्रथा परंपरेबाबत हेच आहे आणि मुख्य म्हणजे प्रथा परंपरा पाळायच्या पुरुषांसाठी. परंतू ज्या पुरुषांसाठी ती व्रतवैकल्ये करते, त्या पुरुषांनी एक पत्नी म्हणून स्विकारलेल्या स्रीला अचानक विवाहानंतरच्या जीवनात वितुष्ट आल्यास एकाएकी सोडू नये. त्याचा थोडा तरी विचार करावा आणि तिला हाकलूनच द्यायचं असेल तर त्या पाळण्यासाठी बळजबरी करु नये.
संगीताचा विचार रास्त होता. कारण ज्या प्रथा परंपरा होत्या. व्रतवैकल्ये होती. त्या गोष्टी फक्त पतीसाठीच पाळायच्या होत्या. त्या प्रथा पाळणे वा परंपरा जोपासणे हे काम स्रीयांचेच होते असे नाही तर ते पुरुषांचेही होते. ती व्रतवैकल्ये फक्त स्रीयांसाठीच नव्हती तर ती पुरुषांसाठीही होती. परंतू समाज जर असा स्रीयांच्या विरोधात वागत असेल तर त्या स्रीनं काय करावं असं संगीताला वाटत होतं. म्हणूनच ती विचार करीत होती.
बराच वेळ झाला होता. रात्र होत चालली होती. तसा तो म्हणाला,
" आपण जावूया का?"
तशी ती भानावर येत म्हणाली,
"हो जाऊया. "
ती महाविद्यालयातून सुटल्यानंतर मुक्तपणे भेटण्याची वा मिलनाची पहिलीच वेळ. ती त्या भेटीत हरवून गेली होती. तसं त्यानं विचारलं,
"आज काय बनवणार? "
"सकाळचंच आहे "
"का बरं? जेवन का बनवलं नाही?"
"अं एकटा जीव सदाशिव. लय त्रास येतो एकटेपणात."
"बरं. मग एक बोलू. "
"बोल. "
"आजचं जेवन माझ्याकडून. "
"म्हणजे? "
"अगं आपण आज हॉटेलात जेवू. बोल तुझं काय म्हणणं?"
"नगं नगं. "
"का? मी चारलेलं चालत नाही का? "
"तसं नाही. "
"मग कसं? "
"बरं चल. तू म्हणतोस तसा. चल लवकर, अंधार पडतोय. "
"चल चल. मलाही जायचं आहे." तो म्हणाला. तसे ते उठले. बागेतून बाहेर आले. त्यानं आपली बाईक काढली व चांगलंसं रेस्टारेन्ट पाहून तिथं थांबवली. सुनिलनं वेटरकरवी जेवनाची यथेच्छ आर्डर दिली. तसं जेवन आलं व ते जेवनावर ताव मारत खमंग जेवनाचा आश्वाद घेवू लागले. सोबतच वेगवेगळ्या गोष्टीही करु लागले. काही वेळातच जेवन झालं. तसे ते त्या रेस्टारेन्टमधून बाहेर पडले. तशी ती त्याच्या बाईकवर बसली व त्यानं तिच्या घराच्या थोडं लांब सोडून दिलं. ती बाईकवरुन उतरली व जायला लागली. परंतू आज जातांना तिचे पाय पुढे पडत नव्हते. तिला वाटत होतं की आजपासूनच त्याचेजवळ राहावं, त्याला सोडू नये. परंतू आजतरी तिच्याजवळ काही उपाय नव्हता. ती मजबूर होती. त्यामुळं तिला जावं लागत होतं. तो मात्र तिच्याकडे एकटक पाहात होता. कदाचित ती मागे वळून पाहिल या उद्देशानं.
संगीता काही अंतर चालत जाताच तिनं मागं वळून पाहिलं. तसा तो पाहातच होता. तिनं मागं वळून पाहताच त्याला हाय हल्लो केलं. तसं त्यानंही हात हालवला. क्षणातच त्यानं बाईक वळवली व ती सुरु करुन तो तिच्या ओझल झाला. परंतू तो ओझल होईपर्यंत संगीता त्याच्याकडे एकटक पाहातच होती. त्याच्या परत येण्याची वाट पाहात. परंतू तो बरेच लांब निघून गेला होता. आजतरी न परतण्यासाठी. ती विचार करीत होती तसाच. थोड्या वेळानं ती भानावर आली आणि भानावर येताच ती घरी निघून गेली.
संगीता आता त्याला आवडायला लागली होती. तोही तिला आवडायला लागला होता. त्यातच ते एकमेकांशी भेट घेत होते. त्यांना आता एकमेकांची भेट घेतल्याशिवाय करमत नव्हतं. फोनवर तर रोजच बोलणं होत होतं.
संगीताशी रोजच बोलणं होत असल्यानं त्यांचं एकमेकांसोबत प्रेम निर्माण झालं होतं.
रोजच त्यांचं फोनवर बोलणं व नेहमी भेटणं. यातच निर्माण झालेलं प्रेम त्यांच्यात त्या प्रेमाचे संबंध बदलले व एक दिवस संधी पाहून सुनिल संगीताला म्हणाला,
"संगीता, तू मला फार आवडायला लागली. "
".........." संगीता त्यावर गप्प होती. ते पाहून तो परत म्हणाला,
"संगीता, मी काय म्हटलं. जरा लक्ष आहे का? "
"काय म्हटलं? "
"मी तुझ्यावर प्रेम करतो म्हटलं. परंतू तू उत्तर दिलं नाहीस. "
"हो का, परंतू मी तुझ्या लायक नाही. आपण मित्र आहोत ना. मग ही मैत्रीच राहू दे. याचं प्रेमात रुपांतर नको करुस. "
"म्हणजे? "
"अरे, मी तुझ्या लायक नाही म्हटलं. "
"का लायक नाही माझ्या? जरा सांगशिल का?"
"अरे, माझा विवाह झाला आहे आणि तूझा नाही. "
"मग त्यात काय एवढं. मला तू पसंत आहे ना. तुला प्रेम स्विकार असेल तर सारं निपटलं. "
"हो का? परंतू यात तुझे आईबाबा, तुझे बहिण भाटवे खरंच माझा स्विकार करतील का? अन् हा समाज! तुझा समाज....... खरंच मला स्विकारेल का? "
"न स्विकारु दे. मी त्या सर्व गोष्टीला त्याज्र मानतो."
"ते सर्व ठीक आहे रे. परंतू काही दिवस जाताच माणसाचा स्वभाव बदलतो. समाज जेव्हा दुषणे देतं. तुझा स्वभाव नाही बदलणार हे कशावरुन?"
"माझ्यावर तुझा विश्वास नाही का? "
"विश्वास आहे रे. परंतू समाजाच्या तोंडाला झाकण कोण लावणार! "
"मीच लावणार. जर तू तयार असशिल मला साथ द्यायला तर....... "
"खरंच. "
"होय. परीक्षा पाहायची आहे का तुला? "
"नको. विश्वास आहे तुझ्यावर माझा. "
"मग सांग. तू माझ्यावर प्रेम करते काय? "
"हो करतेय. परंतू भीती वाटतेय. "
"कशाची? "
"कदाचित तू मला सोडून तर जाणार नाहीस. "
"नाही जाणार. मी मनाचा पक्का आहे आणि वचनाचाही. मी तुझ्यासाठी सर्व सोडीन. भाऊ बहिण आणि आईवडील. "
"वेडा आहेस तू. ज्या आईनं तुला दूध पाजून लहानाचा मोठा केला. त्या आईला माझ्यासाठी विसरुन सोडून देशिल. ज्या बहिणीनं तुला शिक्षणासाठी शहरात आणला. त्या बहिणीला सोडून देशिल माझ्यासाठी अन् ज्या बापानं आणि भावानं तुला मेहनत करुन शिकवलं, त्यांना सोडून देशिल माझ्यासाठी. अन् तू जर असं करणार असशिल तर आजपासूनच तुझे माझे संबंध समाप्त म्हणून समज. "
"संगीता, रागावलीस. अगं, मी तुझी परीक्षा घेत होतो. मलाही माझे मायबाप आवडतात. बिचा-यांनी अतीव कष्ट केले माझ्यासाठी. तशी माझी बहिणही आवडते मला. कारण तिच्याचमुळं मी शिकायला शहरात आलो आणि माझा भाऊ......... तो तर लय आवडतो मला. कारण त्यानं खुप मेहनत केली. मी कधीच त्यांना अंतर देणार नाही आणि तुझ्याही परीवाराला कधी अंतर देणार नाही. आता तरी सांग की तू माझ्यावर प्रेम करणार नाही का ते? "
"अरे, मी काय सांगू तुझ्यावर प्रेम नाही करत. तू स्वतःच समजून घे की मी तुझ्यावर प्रेम प्रेम करते की नाही ते."
"म्हणजे? "
"अरे, मी तुझ्यावर प्रेम करीत होती. करीत आहे आणि करीत राहणार. जरी तू मला नाही भेटला तरी."
"संगीता, मला माफ कर. तू खुप चांगली आहेस. मी तुला ओळखू शकलो नाही. अगं, खरं सांगू. तू जर मला मिळाली नसती तर आज मी शिक्षक झालो नसतो आणि आज पगार कमवता झालो नसतो. मला माहित आहे की तू नाही शिकली माझ्या एवढी. परंतू तू मार्ग दाखवलाय मला यशाचा. त्यामुळंच मी इथंवर येवून पोहोचलोय. मला माफ कर. तू मला माझ्या आयुष्यात फार मदत केलीय. "
"सुनिल, आता पुरे झालं. आता पुन्हा माझी प्रशंसा करु नकोस. नाहीतर मी तुझ्याशी कधी बोलणारच नाही."
"खरंच. "
"होय. "
"तर मग ठीक आहे, मी विषय बंद करतो. आपण दुस-या गोष्टी करु." सुनिलनं म्हटलं. तसं त्यानं त्या विषयावर बोलणं बंद केलं. तशा त्यानं दुस-या गोष्टी काढल्या.
आज सुनिलचं वृद्धींगत होत जाणारं प्रेम...... ते संपायचं नावच घेत नव्हतं. अशातच एक दिवस सुनिल म्हणाला,
"संगीता, आता मला राहावत नाही. मला आता लग्न करावंसं वाटतं तुझ्याशी. बोल लग्न करशिल! "
"नको रे असा निर्णय घेवू उतावीळपणानं. "
"का? मी तुला पसंत नाही का ?"
"आहे रे. पण....... "
"पण काय? "
"तुझा परीवार. परीवार काय म्हणेल तुझा?"
"काहीही म्हणो, मी तुला पसंत करतो ना. मग तुही कर. "
"अन् परीवारानं म्हटलं कशाला केलं हे लग्न तर काय उत्तर देशिल?"
"म्हणेल की मला पसंत होती म्हणून केला विवाह हिच्याशी. "
"हो आणि सोडून दे म्हटल्यावर सोडून देशिल नाही का? "
"कशाला सोडणार."
"सगळी माणसं अशीच बोलतात. "
"संगीता असं बोलू नको. मी नाही त्यातला बरं का."
"ठीक आहे. "
"मग तू करशिल ना माझ्यासोबत विवाह? "
"..........." ती मौन होती. तसा तो पुन्हा म्हणाला,
"बोल, करशिल ना माझ्याशी विवाह? "
"होय." ती ओशाळत म्हणाली व गप्प झाली.

************************************************

चुन्नीनं शिक्षणाधिकारी पदाची परीक्षा दिली होती. त्याचा निकाल यायचा होता. तिला त्या निकालाची प्रतिक्षा होती. कारण त्या निकालानं तिचं पूर्ण जीवन बदवणार होतं. ती कोण्यातरी शहरात शिक्षणाधिकारी बनणार होती. अशातच त्या पदाचा निकाल लागला.
चुन्नीच्या शिक्षणाधिकारी पदाचा निकाल लागला. परंतू अद्याप तिला ते शहर मिळालं नव्हतं. तशी ती प्रतिक्षा करीत होती त्या शहराची. ज्या शहरात तिचं जीवन सुरु होणार होतं.
आज ती खुश होती नवीन शैक्षणिक धोरणावर. कारण त्याच धोरणानुसार ती शिकली होती नव्हे तर आज अधिकारी झाली होती. जर तिला त्या वाढलेल्या वयात शिक्षणाची परवानगी मिळाली नसती आणि तिचं वाढत्या वयानुसार सातव्या वर्गात नाव दाखल करता जर आलं नसतं, तर आज ती शिक्षणाधिकारी बनली नसती.
चुन्नी शिक्षणाधिकारी बनली. त्याचबरोबर गावात आनंदीआनंद झाला. सुधीरनं बहिण कोणी अधिकारी बनली, म्हणून मिठाई वाटली. त्याचबरोबर तिच्या बापालाही आनंद झाला. तो आनंद अख्ख्या गावानं साजरा केला.
चुन्नीनं शिक्षणाधिकारी वर्गाची परीक्षा दिली. त्यातच ती पास झाली चांगल्या गुणानं. तसे वर्तमानपत्रवाले व चैनलवाले तिचा इंटरव्ह्यू घ्यायला आले. तेव्हा इंटरव्ह्यूत तिनं सांगीतलं की तिला तिच्या पतीनंच मोठं केलं. जर त्यांनी तिला विवाहानंतर शिकवलं नसतं तर ती कदाचित शिकलीही नसती आणि आज शिक्षणाधिकारी देखील बनली नसती.
सुनिलनं प्रेमविवाह केला होता. त्यानं संगीतालाच जोडीदार बनवलं होता. कारण ती त्याला आवडली होती नव्हे तर तिनं त्याला फार मदत केली होती. ती जर त्याला नसती भेटली तर कदाचित तो आज नोकरीवर चढला नसता. हे सत्य होतं.
संगीताशी त्यानं विवाह केला खरा. परंतू त्याला त्याची जात आडवी आली होती. संगीता स्वभावानं जरी चांगली असली तरी ती त्याच्या जातीची नसल्यानं त्याच्या परीवाराला पसंत नव्हती. त्यामुळं ते त्याला विरोध करीत होते. त्याला तिला सोडून द्यायला सांगत होते. त्यातच आपण तिचा विवाह करुन देवू असंही म्हणत होते.
संगीताही त्याला सोडून जायला तयारही होती. परंतू तो जबर होता. त्याच्या म्हणण्यानुसार तिनं त्याला सोडून जावू नये असं तो मानत होता. तिनं त्याला बरीच मदत केली आहे असंही तो मानत होता.
एकदाची अशीच गोष्ट. घरच्यांचा तिला होणारा विरोध पाहून ती म्हणाली होती,
"अहो, घरचे मला स्विकारत नाहीत, मग मला तुम्ही का बंधन घालता. मला तुम्ही सोडून द्या. " या बोलण्यावर तो म्हणाला होता.
"ज्या दिवशी तू मला सोडून जाशिल. त्या दिवशी माझं मेलेलं शरीर पाहशील."
सुनिलचं असं बोलणं. संगीता त्याला सोडून जावू शकली नाही. ती त्याच्या प्रेमातच गुरफटली व पाहता पाहता ही गोष्ट चुन्नीला माहित झाली.
चुन्नी आज शिक्षणाधिकारी बनली होती. त्यातच तिला एक शहरंही मिळालं होतं. त्या शहरात ती थेट शिक्षणाधिकारी म्हणून रुजू झाली.
जेव्हा चुन्नी शिक्षणाधिकारी बनली, केव्हा तिच्याकडे बरीच लोकं भेटायला येत होती. त्यातच तिच्याकडे पैशाच्या पिशव्याही येत होत्या. हळूहळू तिच्याजवळचा पैसा वाढत चालला होता. तसतसे तिचे भावही वाढत चालले होते. त्यातच ती कालांतरानं गरीबी विसरली आणि महत्वाचं म्हणजे भाऊ, बहिण आणि मायबापही विसरली. आज तिच्यासमोर गरीबांची इज्जत उरली नव्हती.
सुनिल व संगीताचा विवाह. ही काही लपणारी गोष्ट नव्हती. ती गोष्ट जशी त्याच्या मायबापाला माहित झाली. तशी चुन्नीलाही माहित झाली. ती शिक्षणाधिकारी होती. परंतू ती शिक्षणाधिकारी असली तरी ती जातीभेद मानणारी होती. तिला सुनिलचं संगीताशी विवाह करणं खटकलं. तसं पाहता संगीता ही उच्च जातीचीच होती. तरीही तिची जात तिला खटकत होती.
विवाहाचं ऐकता बरोबर तिच्या मनाचा तिळपापड झाला. त्यातच तिला वाटलं की सुनिलनं विवाह करतांना मला विचारायला हवं होतं. कारण तो तिच्याचमुळं शिक्षक बनला आहे. तशी तिच्या मनात त्याच्याबद्दल नकाराची भावना निर्माण झाली व ती त्याला जाब विचारण्याची संधी शोधू लागली.
संगीतासोबच सुनिलचा विवाह झाला. ही गोष्ट चुन्नीलाही माहित झाली. तशी संधी शोधत असतांना तिची बदली त्याच शहरात झाली. ज्या शहरात सुनिल नोकरी करीत होता. त्याची नियुक्ती एका संस्थेच्या शाळेत होवून तोही आज त्याच संस्थेत संस्थाचालकाच्या कृपेनं मुख्याध्यापक बनला होता.
सुनिल आज एका संस्थेच्या शाळेत मुख्याध्यापक बनला खरा. परंतू तो ज्या जिल्ह्यात मुख्याध्यापक बनला होता. त्याच जिल्ह्यात चुन्नीही शिक्षणाधिकारी होती. त्यातच तिला सुनिलला त्रास देण्याची नामी संधी चालून आली. त्यातच त्या संस्थेच्या संस्थाचालकाकरवी ती सुनिलला भयंकर त्रास देवू लागली. जो त्रास त्याला असह्य होवू लागला होता.
सुनिल एका संस्थेच्या शाळेत मुख्याध्यापक बनला होता. परंतू संस्था ही त्याच्या विरोधात होती.
संस्थाचालक हा वाईट स्वभावाचा असून तो त्याला कागदपत्र न वाचता त्यावर सही कर अशी दमदाटी त्याला देत असे. परंतू मुख्याध्यापक बनलेला सुनिल हूशार होता. तो कसा काय त्यावर सही करणार? प्रश्न होता त्याचेसमोर उभा. त्यातच अशाच प्रकारच्या भांडणानं तो संस्थाचालकाला नकोसा झाला होता. त्यातच त्यांची रोज रोज संस्थाचालकासोबत भांडणं होत असायची.
संस्थाचालकाची ती भांडणं...... सुनिल त्रस्त झाला होता. त्याला पद सोडावंसंही वाटत होतं. परंतू आता उखळात मुंडकं टाकल्यागत त्याची परिस्थिती होती. त्याला वाटत होतं की आपण जर पद सोडलं तर उद्या संस्थाचालक आपल्या मागं लागून आपल्याला शाळेतून काढून टाकेल. मग मिळणारे वेतनही मिळणार नाही. त्यातच त्याच्यापेक्षा ज्युनिअर असलेली एक स्री शिक्षीका, जिला मुख्याध्यापक पद मिळणार होते. ती त्याच्या विरोधात होती. शिवाय ती संस्थाचालकाच्या जवळच्या नात्यातील होती.
सुनिलचा असा संस्थाचालकाशी वाद........ संस्थाचालक त्याची तक्रार विद्यमान शिक्षणाधिकारी म्हणून पदावर बसलेल्या चुन्नीला करीत होता आणि ती तर त्याच संधीची वाट पाहात होती. त्यातच ती परस्पर त्याला त्रास देण्यासाठी पत्र पाठवीत होती. त्यातच तो त्रस्त व्हायचा. परंतू संगीता त्याच्या सोबत असल्यानं ती धीर द्यायची. तो धीर त्याला फार महत्वपूर्ण वाटायचा.
संस्थाचालक व शिक्षणाधिकारी यांचा ताळमेळ. चुन्नी नातं पाळत नव्हती. तिचा नातेवाईक म्हणजे पैसा होता. संस्थाचालक तिला पैसे द्यायचा. जो पैसा भ्रष्टाचार होता. त्याच पैशाच्या मोबदल्यात ती सुनिलचं बरंवाईट करण्याचा मार्ग शोधत होती.
एकदा असंच झालं. संंस्थाचालक व शिक्षणाधिकारी यांच्या ताळमेळीनं सुनिलचं वेतन काही कारणास्तव बंद करण्यात आलं. आता सुनिलसमोर मोठा बिकट प्रश्न उभा राहिला. वेतनच नाही तर घर चालवावं कसं? तो शाळेत जात होता नियमीतपणे. परंतू विद्यावेतन नसल्यानं तो हताश होत असे. तो दरमहिण्याला बाकी शिक्षकांचे वेतन काढत होता. परंतू अधिकार असूनही त्याला स्वतःचे वेतन काढता येत नसे. त्यातच शासनाची दररोजची पत्र. त्याला नाकी नव येत होतं. कधीकधी आत्महत्याही कराविशी वाटत होती. परंतू आत्महत्या जर केली तर आपलाच परीवार दुःखसागरात कोसळेल. संस्थाचालक व शिक्षणाधिकारी साहेबांचं अर्थातच चुन्नीचं काहीच बिघडणार नाही. तसा तो विचार करायचा. तो तसे विचार संगीतासमोर बोलूनही दाखवायचा. तेव्हा संगीता म्हणायची, 'तुम्ही वेडे झाला की काय, हेही दिवसं निघून जातील.' संगीताच्या त्या बोलण्यानं सुनिलला धीर यायचा व तो आत्महत्येचे विचार त्यागून पुढील जीवनाला सुरुवात करायचा.
आज अगदी असह्य वाटत होतं. सुनिल शिक्षणाधिकारी साहेबानं त्याचे वेतन काढावे म्हणून वारंवार पत्रव्यवहार करीत होता. परंतू बदल्याच्या भावनेनं प्रेरीत असलेल्या चुन्नीला आपल्या भावाची किंचीतही दया येत नव्हती. कारण तिला वाटत होतं की त्यानं तिला न विचारता दुस-या जातीची मुलगी आणली. ती तिला नको होती. तिनं तिला सोड म्हणून बरेचदा सांगीतलं होतं. त्यामुळंच जाणूनबुजून जाणीवपुर्वक तिनं सुनिलचं वेतन बंद केलं होतं. तिला वाटत होतं की एखाद्या दिवशी सुनिल येईल. तिची माफी मागेल व त्यानंतर मी तिला सोडण्याविषयी बोलल्यास तो तिला सोडून देईल. तशी ऑफर तिनं बरेचदा इतरांच्या माध्यमातून दिली होती. परंतू सुनिल हा मुर्ख नव्हता की तो तिला सोडून देईल.
त्याचं वेतन बंद होतं. काय करावं सुचेनासं झालं होतं. अशातच त्यानं ती गोष्ट आपली पत्नी संगीतालाही बोलून दाखवली. तेव्हा संगीता म्हणाली,
"आपण संस्थाचालक आणि शिक्षणाधिकारी यांच्यावर खटला टाकावा काय? "
"तू मुर्ख आहेस का? अगं जवळची रसद संपत आली. केसलाही पैसा लागतो. मग आपण कुठून आणून एवढा पैसा. केस लढणं सोपं काम आहे का? लावली जीभ टाळूला. "
"हो बरोबर आहे. असा कितीसा लागणार पैसा? "
"लाखो रुपये लागतात. देशिल तू?" सुनिल चिडूनच म्हणाला.
"असे चिडू नका. संकट हे येतंच. कोणीही या संंकटापासून सुटलेला नाही. परंतू अशा संकटात संयम बाळगणं अति आवश्यक असतं. हेही दिवसं निघून जातील. परंतू असं हातावर हात धरुन बसणं योग्य राहिल का? आपण विचार करावा. आज एक वर्ष झाला. ती मंडळी मजेत आहेत. त्यांना वाटत असेल की त्याची जिरत आहे. "
"हो, मग काय करु? "
"काही नको. खटला टाका तुम्ही त्यांच्या विरोधात म्हणजे झालं. "
"परंतू एक गोष्ट लक्षात घे. कोर्टात वाळलंही जळतं आणि ओलंही. ते पैसेवाले आहेत. निकाल त्यांच्यात बाजूने लागेल. समजलं. "
"हो समजलं. चांगलं समजलं. निदान देव तर नाही ना ते. अन् देवाचे बापही नाही. तसा तुम्ही काही गैरव्यवहार केला आहे का? नाही ना. मग देवावर विश्वास ठेवा. निघेलच केस. "
"अन् या केसला लागणारा पैसा. तो कोठून आणायचा? माझी तर दुपारची शाळा आहे. मी शाळा सोडूून कामावरही जावू शकत नाही."
"तुम्ही त्याची चिंता करु नका. मी आहे. मी फाटले कपडे घालीन. एका साडीनं राहिन. आपण काही पार्टीगत जेवन करणार नाही. वाटल्यास मी बाहेर कपडे धुवायला जाईल. भांडे घाशीन लोकांचे आणि केसला पैसा देईल. आपण केस लढू. अन्यायाविरोधात केस लढू. यांना शिक्षा व्हायलाच हवी."
"केसला पैसा! मग मुलाचं कसंं? त्यांच्या शिक्षणाचं कसं?"
"ते समदं माझ्यावर सोडा. पोरं चांगली आहेत. बिचारे समजून घेतात. त्यांनाही कळतं. एक वर्ष झालं. बिचा-यांनी सतावलं नाही."
संगीता बोलून गेली खरी.. तसा त्याला हुरुप आला तिच्या बोलण्यानं.......नवा उत्साह संचारला त्याच्या अंगात. तसा तो म्हणाला,
"संगीता, तू कामावर जायची गरज नाही. मीच सायंकाळी सुटी झाल्यावर काहीतरी करणार."
"ठीक आहे." संगीता म्हणाली व चूप बसली.
तो दिवस. सुनिल खटला टाकण्यासाठी कागदपत्राची जुळवाजुळव करु लागला. कागदापत्राची जुळवाजुळव होताच त्यानं शिक्षणक्षेत्रातील नामांकीत वकीलाची भेट घेतली. त्यांना आपली परिस्थिती सांगीतली. दोन चार वकील पैसे मागणारेच निघाले. परंतू एक असाही होता की ज्यानं पैसे मागीतले नाही. फक्त एवढं सांगीतलं होतं की न्यायीक प्रक्रियेत जो काही पैसा लागेल. तो द्यावा.
सुनिलनं त्या कागदपत्राची जुळवाजुळव होताच ती कागदपत्र वकीलाला दिली व अशाप्रकारे केस कोर्टात उभी राहिली.
कोर्टाची न्यायीक प्रक्रिया........ वकील पैसा मागत नव्हता. परंतू न्यायीक प्रक्रियेलाही पैसा लागत होता. कोर्टाची केस लढणं गरीबाचं काम नव्हतं. पदोपदी पैसा लागत होता.
कोर्टाची केस न्यायालयात उभी राहिली खरी. परंतू त्याला लागणारा पैसा कसा उभा करायचा? हा प्रश्न संगीता आणि सुनिलसमोर उभा होता. त्यातच संंगीता दुपारी सुनिल कामावर जाताच व मुलं शाळेत गेल्यावर लोकांची उष्टी खरकटी भांडे घासायला जात असे व कपडे धुवायलाही जात असे. त्यानंतर तो घरी परत येण्यापुर्वी ती घरी परत येत असे. तोही सायंकाळी घरी येताच चौकात गुपचूपचा ठेला लावत असे आणि रात्री बरेच उशिरा येवून जेवायला बसत असे. ती मात्र तो घरी येईपर्यंत जेवत नव्हती.
लोकांची खरकटी भांडी. कधी जन्मातही कल्पना केली नव्हती तिनं की तिला ती धुवावी लागेल. एका मुख्याध्यापकाची पत्नी आणि ही भांडी धुणे तिला सुरुवातीला शरम वाटायची. ती शरम हळूहळू कमी झाली. तिनं स्वप्नातही विचार केला नव्हता की तिला ते काम करावे लागेल. परंतू परिस्थिती वाईट होती. ती परिस्थिती तिला ते काम करायला भाग पाडत होती. तसं तिनं कामासाठी काही काही कार्यालयातही संपर्क केला. परंतू तिला तिथे काम मिळाले नाही. काही काही कपड्याचे दुकानही छानून पाहिले. परंतू तिथेही जागा नव्हती. म्हणून नाईलाजानं तिनं भांडे धुण्याचा व्यवसाय निवडला.

****************************************

संगीता आपल्या मायबापाच्या घरात विवाहापुर्वी फारच सुखी होती. तिचा बाप सरकारी नोकरीवर होता. बालपण तिचं अतिशय लाडात गेलं होतं. कारण ती सर्वात लहान मुलगी होती. संगीताला घरी सर्व प्रकारच्या गोष्टी वेळोवेळी मिळत असल्यानं ती अगदी लाडावूून गेली होती. त्यामुळं तिचं मन अभ्यासात लागत नव्हतं. रमतही नव्हतं. मात्र तिनंं एक चांगलं काम केलं होतं, ते म्हणजे तिला सुनिलला प्रेरणा देणे. ते काम तिला छान जमलं होतंं.
संगीता भांडे धुवायची कामं करायची. त्याचबरोबर कपडेही. परंतू कामाची सवय नसल्यानं तिचे पाय दुखायचे. परंतू ती घरी सांगायची नाही. तिला वाटायचं की मी जर घरी सांगीतलं तर यांना कळेल.
त्यामुुळं ती तो झोपल्यानंतर आपल्या दुखणा-या पायाला तेल लावून मालिश करायची. परंतू तिचं लपवणं हे फार काळ चाललं नाही.
एक दिवस तो झोपल्यानंतर ती आपल्या पायाला मालिश करीत होती. तसे तिचे पाय सतत कपडे धुण्याच्या सोड्याच्या पाण्यात राहिल्यानं फारच दुखत होते. तेव्हा अचानक तो उठला. त्यानं पाहिलं की संगीता आपल्या पायाची मालिश करीत आहे. तिचे तळपाय फाटलेले असून त्याला भेेगा पडलेल्या आहेत नव्हे तर घावंच. त्यामुळं तिला ते फार दुखत आहेत. तेव्हा तो म्हणाला,
"काय झालं? काय करतेय? "
"काही नाही. " ती बोलली. तसं त्यानं तिच्या तळपायाचे निरीक्षण केले. तसा तो परत म्हणाला,
"आणि हे काय? कशानं झालं हे?"
"असंच. मला पाणी सहन होत नाही ना. सतत पाण्यात राहावं लागतं."
"म्हणजे? "
"अहो, घरची भांडी धुणी करावी लागतात ना. त्यानं झालं. "
"हो का." तो म्हणाला.
"होय. तुम्ही झोपा. तुम्ही फार थकलेले आहात." ती म्हणाली. तसा तोही फार थकलेलाच होता. तसा तोही झोपी गेला.
ते उन्हाळ्याचे दिवस होेते. घरात गर्मी व्हायची. कुलर किंवा पंखा लावलाही असता. परंतू विजेचं बिल भरायलाही पाहिजे तेवढे पैसे नव्हते. आज कामावर जायचा कंटाळा आला होता नव्हे तर त्याला बरंही वाटत नव्हतं. म्हणून सुनिल असाच अंगणात बसलेला होता. एकदा बाहेर अंगणात बसलेला असतांना त्याची मुलगी त्याचेशी बोलत होती. तिला अगदी लहान वयात काही समजत नव्हतं. तशी बोलता बोलता ती म्हणाली,
"पप्पा पप्पा, तुम्हाला माहित आहे का मम्मी कोणतं काम करते? "
सुनिलनं मुलीचं ऐकलं. तसा तो म्हणाला.
"कोणतं? "
"ती भांडे घासायला जाते."
"हो का? परंतू तुला कसं माहित?"
"मला तिनंच सांगीतलं. "
"हो का? "
"हो. "
मुलगी सांगत होती. अगदी खरं खरं सांगत होती. तसा तिनं सांंगायचा अवकाश. संगीता बाहेर आली. तिनं ते समदं ऐकलं. तशी ती म्हणाली,
"पोरी गप्प राहा. हे काय, वात्रट बोलणं. " तसा तो म्हणाला,
"ही जे काही बोलत आहे. ते खरं आहे का? "
"तिचं बोलणं मनावर घेवू नका. तिला काहीही बोलायची सवयच आहे."
"हेच बोलणं तू माझी शपथ घेवून व माझ्या नजरेला नजर मिळवून बोल. " तो म्हणाला. तशी ती म्हणाली,
"होय जाते मी भांडे घासायला आणि कपडे धुवायलाही. त्यात कोणती लाज आहे? मेहनतच करतोय ना. "
तिचं बोलणं संपलं होतं. तसा तो म्हणाला,
"परंतू हे असलं घाणेरडं काम?"
"हे बघा, काम कोणतंही घाणेरडं नसतं. घाणेरडे असतात लोकं. आता तुमचंच क्षेत्र पाहा, तिथे भ्रष्टाचार चालतोच ना. ते सर्वात घाणेरडं काम. भांडे किंवा कपडे धुण्याचं काम घाणेरडं नाही. एखादा भंगी जरी मो-या साफ करायचं काम करीत असेल तरी ते घाणेरडं नाही. परंतू एवढा गलेलठ्ठ पगार असतांना ते ऑफिसातील लोकं सर्रासपणे भ्रष्ट मार्गानं पैसा कमवितात. ते घाणेरडं काम आहे. "
"अगं पण, तुला काम करायची का गरज होती? मी होतो ना मेहनत करायला. "
"हो बरोबरच की. परंतू मी तुम्हाला थोडी मदत करीत आहे. त्यात काही वाईट आहे का?"
"वाईट काही नाही. परंतू हे असलं काम? "
"आता तुम्ही गप्प राहा. मी बरोबर करते आहे. " ती म्हणाली. तसा तो गप्प झाला. परत काहीच बोलला नाही.
संगीता आत गेली. तसा तो विचार करु लागला संगीताबाबत. ती संगीता....... आदर्श पत्नी भेटली तिच्या रुपानं. कोणती शिकायत नाही. उलट मला ती काम करुन मदतच करतेय. काम करायचीही लाज नाही. भांडे घासायला अन् कपडेही धुवायला जाते. मला संसारात मदत करण्यासाठी. परंतू तिनं कुठलीही कुरकूर केली नाही.
तिचा तसा विचार करताच त्याला गहिवरुन आल्यासारखं वाटत होतं. वाटत होतं की चुन्नी बहिण असून दया माया न घेता ती त्यांच्या लेकरासह त्याला उपाशी मारायला लागली आणि ही परायाघरची मुलगी असून देखील माझी पत्नी बनताच मला मदत करायला लागली. दुसरी असती तर ती केव्हाचीच सोडून गेली असती. तसा त्याला त्याचाच एक ओळखीचा असलेल्या शिक्षकांचा प्रसंग आठवला. त्याचाही पगार बंद होताच तो कोमामध्ये गेला होता. तेव्हा त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती. त्या प्रसंगावरुन त्याला त्याची पत्नी चांगली वाटताच त्याला अभिमान वाटायला लागला.


****************************************

जेवन झालं होतं. तसा तो बाहेरच अंगणात अंथरुणावर पहूडला होता. त्याला आता बरं वाटत होतं. तसं त्याचं लक्ष वर आकाशाकडे गेलं. चांदण्या निघाल्या होत्या. त्या अगदी स्पष्ट दिसत होत्या. तसा तो त्या चांदण्याचं निरीक्षण करीत होता. तसा विचार येत होता मनात. ह्या चंद्रालाही कोणी सोडलेलं नाही. त्यालाही ग्रहण लागतं. तसाच तो ध्रृवंतारा. ज्याला आता अढळपद आहे. त्यालाही किती संकटं झेलावी लागली. अन् ते सप्तर्षी. त्यांनाही किती संकटं होती. तरीही ते जगले आणि आज अढळपद मिळवलं. त्यांचंही संकट निघून गेलं त्यांच्या अढळपदानं. आपलंही राहणार नाही. निघून जाईल लवकरच. कारण अंधारानंतर उजेड येतोच आणि रात्रीनंतर दिवसही. मलाही लवकरच राहत मिळेल. असाच विचार करीत असतांना त्याला झोप केव्हा लागली ते कळलंच नाही. सकाळी जेव्हा संगीतानं त्याला आवाज दिला होता. तेव्हा चांगलंच उजाळून आलं होतं.
सकाळ झाली होती. तसा संगीतानं आवाज दिल्याबरोबर तो उठला. तसं त्याला शाळेत जायचं होतं. त्याची फार घाई होती त्याला. त्यामुळं त्यानं लवकरच प्रातःविधी आटोपवला व जेवनखावण करुन तो नोकरीवर निघून गेला.
दिवसामागून दिवस जात होते. न्यायालयातही संबंधीत तारखेला वेळ लागत होता. बरोबर तारखाही लागत नव्हत्या. त्यातच एखाद्या वेळी तारीख लागलीच तर उत्तर निघत नव्हतं. अशातच दोन वर्ष निघून गेले होते.
ते दोन वर्ष.......भांडणाभांडणात दोन वर्ष कसे निघून गेले. ते सुनिलला आणि परीवारातील लोकांना कळलेच नाही. त्यातच कोणताही आशेचा किरण निघत नव्हता. काय करावं सुचत नव्हतं.
सुनिलला अतिव दुःख होत होतं की आपल्याचमुळं आपल्या पत्नी आणि मुलांना त्रास भोगावा लागत आहे. आपण जर त्या संस्थाचालकाच्या को-या कागदपत्रावर सह्या दिल्या असत्या तर आज ही वेळ आली नसती. तो तसा विचार करीत होता. तसा विचार करता करता दुसरं मन सांगत होतं की असं जर केलं असतं तर आणखी जास्त प्रमाणात फसला असता. त्यामुळं निसर्गानं त्यालाच नाही तर अख्ख्या परीवाराला शिक्षा दिली असती.
अशीच ती तारीख सुरु असतांना आज अचानक एक आशेचा किरण निघाला. तारीख लागली. तसं त्या तारखेवर सुनिलला वकीलानं हजर राहायला लावलं. त्यामुळं आज सुनिल तारखेवर हजर होता. तसे वकीलसाहेबाचे बोलणे सुरु झाले. सुनिलचा वकील युक्तीवाद करीत होता.
सुनिलच्या वकीलानं युक्तीवाद असा जोरकस केला की आज न्यायाधीश महोदयानं सरळ आदेेशच देवून टाकला. संबंधीत शिक्षणाधिकारी महोदयानं मुख्याध्यापक असलेल्या सुनिलचं वेतन मंजूर करावं.
तो आदेशच...... न्यायाधीश महोदयाचा आदेश होता. तो काढता बरोबर तो आदेश संस्थाचालकाला मिळाला. तसा शिक्षणाधिकारी साहेबालाही. त्यातच ते थोडे थंड झाले होते.

********************************************

जात..... जात व्यक्तीच्या जन्मापासून चिकटलेलं बांडगुळ. या जातीप्रथेनं आजपर्यंत कित्येक लोकांचे बळी घेतले. परंतू जातीप्रथा नष्ट झाली नाही. त्यामुुळं एक प्रकारचे धर्म परवडले. परंतू जाती परवडल्या नाहीत असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.
जात मुळात शाश्वत असणारी गोष्ट. ती बदलता येत नाही वा बदलविताही येत नाही. हं, एकप्रकारे धर्माचं ठीक आहे. एका धर्मातून दुस-या धर्मात अवश्य जाता येते. याचाच वापर करुन सातव्या शतकात भारतात आलेल्या मुस्लिम शासकांनी तद्नंतरच्या काळात येथील हिंदू तसेच बौद्ध आणि इतर धर्मीयांना मुस्लिम केलेले होते. याचे अनेक उदाहरणं आहेत. हे धर्मांतरण जबरन केले होते. ज्यांनी ज्यांनी असे धर्मांतरण करण्यास नकार दिला. त्यांना अनन्वीत यातना दिल्या नव्हे तर हत्याही केल्या. त्यातून मोठमोठे महाराजेही सुटलेले नाहीत. उदाहरण द्यायचं झाल्यास छत्रपती संभाजी वा पृथ्वीराज चौहानचं देता येईल. धर्मांतरण करा नाहीतर डोळे फोडू म्हणणारे हे मुस्लिम शासक....... त्यांनी धर्मांतरण करण्यास नकार देणा-या या दोन्ही राजांचे डोळे फोडले होते नव्हे तर त्यानंतर त्यांच्यावर अनन्वीत अत्याचार करीत त्यांची हत्याही केली होती. याला इतिहास साक्षी आहे. परंतू ज्यांनी ज्यांनी धर्मांतराला विरोध केला नाही. त्यांनी सहखुशीनं धर्मांतरण केलं. ते वाचले. जातीबद्दल सांगायचं झाल्यास जात बदलताच आली नाही वा कोणत्याच शासकानं जाती बदलविण्याचा प्रयत्न केला नाही. मग ते मुस्लिम शासक असोत की इतर कोणी. असे जर घडले असते तर आदिवासी व अस्पृश्य लोकांवर अत्याचारच झाले नसते वा करता आले नसते. जातीप्रथेला पुर्वीपासूनच सर्वांचं समर्थन होतं. कारण या जाती न बदलण्यातून उच्च जातींना फुकटचे मजूर व गुलाम मिळवता आले. राजे रजवाड्यांनाही आपले बस्तान बसविण्यासाठी नव्हे तर राज्यकारभार चालविण्यासाठी अशा जातीच्याच माणसाची गरज होती. हे राजे आपल्या राज्यातील मैला (घाण) साफ करण्याचे काम त्यांना देत असत. तसेच जनानखाण्यात जेव्हा राजांच्या राण्या मुलांना जन्म देत. तेव्हाही याच जातीच्या लोकांची मदत होई. व्यतिरीक्त राज्यातील कित्येक कामाला मजूर म्हणून याच लोकांचा वापर केला जाई. त्यामुळं ह्या जातींची लोकं फासद्याची असल्यानं राजेरजवाड्यांनी तसेच शासकांनी आपल्या जाती बदलविण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. त्यामुुळं जात कधीच बदलता आली नाही. एखादी गोष्ट बदलविण्यासाठी जनमत हवं असतं किंवा सरकारी पाठबळ. ते जातींना मिळालं नसल्यानं जाती बदलविता आल्या नाहीत.
जातीबद्दल अाणखी सांगायचं एक महत्वपूर्ण कारण म्हणजे प्रेमविवाह. ज्या कोणी इतर जातीच्या मुलांशी प्रेमविवाह केल्यास त्याला सर्रास कापून टाकले जात असे वा त्या परीवाराला वाळीत टाकले जाई. सर्वच बाबतीत विशेषता जातीबाबत कठोर नियम होते. त्यामुळं कोणीच इतर जातीच्या मुलांशी वा मुलींशी विवाह करीत नसत. समजा एखाद्यानं असा विवाह केल्यास समाज वाळीत टाकतो, हत्याही करतो, म्हणून परीवारातीलच लोकं अशा विवाहाला मान्यता देत नव्हते. पुर्वीपासूनच जातीतील विवाहाला मान्यता होती.
सर्वात पुर्वी ज्यावेळी जाती अस्तित्वात आल्या तेव्हाही स्रिया ह्या स्वयंवर करीत. त्यात असे स्वयंवर करतांंना स्रीची जात विचारात घेत नव्हते. कोणत्याही जातीचे राजे रजवाडे स्वयंवराला उपस्थिती लावत व अापल्या सामर्थ्यावर त्या स्रीला जिंकून घेत. परंतू एकदा का तिचा विवाह झाला तर त्या स्रीच्या जातीला महत्व उरत नसे. तिची जातच नष्ट होत असे नव्हे तर तिचा पती ज्या जातीचा असेल, ती जात तिची मानण्यात येत असे. हाच फक्त एक जातीबदल होता जात बदलविण्यासाठी.बाकीच्यांना मुभाच नव्हती. नंतर जसजसा काळ बदलला. अशा स्वयंवरालाही बंधन आलं. जातीजातीत मतलबासाठी भेदभाव शिरला. जातीजातीतील विवाहावर बंधन आलं. मुलगी विवाहासाठी पाहायचीच असेल तर जातीतीलच पाहावी असं ठरलं. पोटजातीवरही बंधन आलं. त्यामुळं स्वयंवर, आंतरजातीय विवाह हे कालांतरानं त्याज्र ठरलेत. असे असतांना तद्नंंतरच्या काळातही काही लोकांनी जबरदस्तीनं आंतरजातीय विवाह केलेत. त्यात संत हराळे होवून गेले. त्यांनी तर आपला मुलगा शिलवंतचा विवाह मधुवय्याची मुलगी मधुवंतीशी केलं. हे सर्व महात्मा बसवेश्वराच्या माध्यमातून. महात्मा बसवेश्वर हे राजा ब्रिज्वलाच्या दरबारी प्रधानमंत्री असतांना त्यांनी अनुभव मंटपाची स्थापना केली होती. तिथे आंतरजातीय विवाह केले जात असत.
जाती बदलविण्याची प्रथा पुर्वीपासूनच नव्हती. हं, मुलीनं जर आंतरजातीय विवाह केल्यास तिची जात बदलते. ही जात बदल होवू नये म्हणून प्रेमविवाहावरही व आंतरजातीवरही बंधन घालण्यात आलं. त्यामुळं फुकटची कटकट मागं का लावायची म्हणून लोकांनी प्रेमविवाह केले नाही. आंतरजातीय विवाह तर नाहीच नाही. दोनचार अपवाद वगळता.
हळूहळू काळ बदलला. इंग्रज आले. परंतू त्यांनीही अशा जातीप्रथेवर बंधन घातले नाही. त्यांनीही जातीप्रथा सुरुच ठेवली. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं. त्यातूनही जातीप्रथा नष्ट केली गेली नाही. त्यामुुळं आजही ती कायमच आहे. हं, त्यांनी धर्म अवश्य बदलवला. तो म्हणजे त्यांना वाटत होतं की जोपर्यंत अस्पृश्यांचा धर्म बदलणार नाही. तोपर्यंत या अस्पृश्यांना इतर जातीच्या वा लोकांच्या बरोबरीनं बसता येणार नाही आणि तसेच घडले. तरी बरेच दिवस असा त्रास झालाच. बरेच दिवस उच्च जातीतील लोकांनी अस्पृश्यांना आपल्या बरोबरीनं बसण्याची परवानगी दिली नाही. आजही काही काही ठिकाणी असाच भेदभाव आहे. अस्पृश्य उच्चवर्गीय लोकांच्या बरोबरीने बसल्यास वा त्यांची बरोबरी करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला मारहाण केली जाते. परंंतू असे जर घडले तर कायद्यात अनुसूचीत जातीअंतर्गत अैक्ट्रासीटी कायदा लावता येतो. परंतू आता त्याही कायद्याला उलटा चोर कोतवाल को दाटे अंतर्गत केराची टोपली दाखवत आव्हान दिले गेले आहे.
पुर्वी आंतरजातीय विवाह करुन जी जात स्रीला बदलवता येत होती. तिही अलिकडे बाद झाली. लोकांनी स्वार्थासाठी तिही पद्धत नष्ट केली. कारण स्रीया जेव्हा असा फायदा घेवून निवडणूकीला उभ्या राहात आणि निवडून येत. त्यावेळी तिला लोकं किती चाहतात. तिच्यामध्ये कोणता चांगला गुण आहे हे लक्षात न घेता, तिच्या जातीला आव्हान दिलं. त्यातच त्या त्या स्रीयांचं प्रतिनिधित्व गेलं व त्यांची जातही ठरली की स्रीयांनी जरी आंतरजातीय विवाह केला असेल, तरी तिला जात बदलवता येत नाही. कारण जात ही जन्मापासून मिळालेली देणगी आहे. न्यायालयही त्याच गोष्टीवर विश्वास ठेवते.
महत्वाचं सांगायचं म्हणजे जातीही बदलविण्याची परवानगी असावी. कारण जात न बदलवता येणं ही कुठंतरी माणसाच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर बंधन आहे. मुल जेव्हा जन्माला येतं. तेव्हा त्याला कळतं का की तो अमूक जाती धर्माचा आहे. नाही ना. तसेच माणसं स्वतंत्र्यपणे विहार करीत असतांना त्याच्या कपाळावर लिहिलं असतं का की तो अमूक जाती आणि धर्माचा आहे. नाही ना. मग धर्म एवढा महान असतांना तो बदलवता येतो. मग जातीतील माणसांवर एवढा अत्याचार होत असूनही ती का बदलवता येत नाही. हे असले अत्याचार होणे बरे आहे का? आज अशी बरीच प्रकरणे न्यायालयात आहेत की लोकं जातीचा आधार घेवून चिडवतात. परंतू तरीही ती अस्पृश्य माणसं काहीही बोलू शकत नाही. कारण न्यायालयात न्याय न मिळणं. ब-याचशा प्रकरणात अस्पृश्यांना न्याय मिळालेले नाहीत असले अत्याचार होवूनही. काही काही खटले प्रलंबीतच आहेत. अलिकडे लोकं सक्षम असूनही निवडणूकीला उभे राहण्यासाठी जातीचा आधार घ्यावा लागतो. अलिकडे सवलती मिळविण्यासाठी जातीचा आधार घ्यावा लागतो. शाळेतही नाव दाखल करण्यासाठी जात बंधन आहे. त्यामुळं कशाला हव्या जाती? ह्या जाती बदलवणं योग्य नाही का? कारण ह्या जातीप्रथाही काही अंशी गुन्हे घडवून आणतात.
मुलतः कशाला हव्या जाती? जात जर नसेल तर विवाह होणार नाही का? जात जर नसेल तर मुलं शिकणार नाही का? अन् जात जर नसेल तर निवडणूकीत उभे राहता येणार नाही का? जात जरी नसेल तरी गुणांचा वापर करुन माणसे उच्च पदावर बसू शकतात. त्यासाठी जात असणेच महत्वाचे नाही.
जाती मुळातच नसाव्यात आणि ठेवायच्याच आहेत तर माणसाला एका जातीतून दुस-या जातीत जाण्याची परवानगी असावी. केवळ मतलबासाठी व राजकारण करण्यासाठी जात असू नये. जातीप्रथेचा सुयोग्य वापर होत असेल तरच जात असावी. अन्यथा जात नष्ट केलेली बरी. ती अस्तित्वात असणं धोक्याचं लक्षण आहे.
संगीता आणि सुनिल यांना त्रास खरं तर त्यांच्या आंंतरजातीय विवाह केल्यामुळंच होत होता. तसेच सुनिलला त्रास त्याच्या जातीमुळं होत होता.
सुनिल हा जातीनं चांभार होता आणि संगीता जातीनं उच्चवर्णीय. संगीता जरी जातीनं उच्चवर्णीय असली तरी चुन्नीच्या भावानं आंतरजातीय विवाह करणं चुन्नीला पसंत नव्हतं. तसेच शाळेतही सुनिल चांभार जातीचा असल्यानं ती जात हलकी आहे असे समजूून संस्थाचालक त्याला भाव देत नव्हता. नियमानुसार तो मुख्याध्यापक बनला खरा. कारण कायद्यानुसार त्याला बनवणे भाग होते. परंतू संस्थाचालकाला त्याची जात चालत नव्हती. त्याचा को-या कागदपत्रावर सह्या घेणे हा केवळ बहाणा होता.
आंतरजातीय विवाह........सुनिलचा आंतरजातीय विवाह. तो विवाह जसा. चुन्नीला मंजूूर नव्हता. तसाच तो विवाह त्याच्या मोठ्या भावालाही पसंत नव्हता. मोठा भाऊ शेेती करीत होता. त्याचे मायबाप म्हातारे झालेे होते. त्यांच्यानं काम जमत नव्हतं. त्यांनाही तो विवाह पसंत नव्हता.
सुनिलला जसं माहित झालं की लहानशी ती बाळं. ताटकळत आईची वाट पाहात उभी राहतात. तेव्हा त्यानं आपल्या मायबापाला त्यांना सांभाळण्यासाठी आपल्या माययबापाला विनवणी केली की त्यांनी त्याच्या घरी चालावं. परंतू त्यांनी नकार दिला. ते त्या मोठ्या पोरातच राहात होते. त्यांनी त्याला डिवचत म्हटलं की तू बिनजातीची पोरगी बघितली. तिच्याशी. लग्न लावलं. आम्ही कसे येणार तुझ्या घरी. ते ऐकताच अंगाची लाहीलाही झाल्यागत सुनिलची अवस्था झाली होती.
चुन्नी गावाकडं ढुंकूनही पाहात नव्हती. एरवी तिला वेळच मिळत नव्हता. आज चुन्नीला त्या मोठ्या भावानंही माध्यमिक शिक्षणाला पैसा लावला असला तरी ती त्याला आपल्या स्तराचा समजत नव्हती. ती जमीन विसरली होती.
जसजसा व्यक्ती मोठा होतो. त्याचा मान वाढतो. मग पैसाही यायला लागतो. त्याचबरोबर अहंकारही. तो अहंकारातच जगत असतो. तशी चुन्नीची अवस्था. चुन्नीही अहंकारातच जगत होती. तिला काय वाटत होतं कुणास ठाऊक. पण चुन्नी दोघाही भावाला विसरली होती नव्हे तर कोणत्याही स्वरुपाची मदत करीत नव्हती.
सुनिलला आपल्या पत्नीचा गर्व वाटणे साहजीकच होते. कारण ती ऐन दुःखात मदत केली होती नव्हे तर करीत होती.
ते नवीन शैक्षणिक धोरण. त्याला ते धोरण छळत होतं. कारण तो खटला जिंकला होता. त्या खटल्यातून सुनिलला त्याचं वेतन मिळालं होतं नव्हे तर तो आज सर्वेसर्वा म्हणून काम पाहात होता.
तो खटला जिंकला होता. त्यामुळं चुन्नीला ती गोष्ट बरी वाटली नाही. त्यातच तिला न्यायालयाचा संताप आला. त्याचबरोबर त्याचाही. संस्थाचालकानं एकप्रकारे माफ केलं. परंतू चुन्नीला सांगेल कोण? ती तर शिक्षणाधिकारी होती.
शासनाकडून आज वेगवेगळी पत्र निघत. त्या पत्रात माहिती मागायची असे. काही काही माहिती ही विविध प्रपत्रात ताबडतोब भरावी लागायची. त्यातच चुन्नीची सारखी नजर सुनिलकडंच होती. ती प्रसंगी बाकी शाळेनं माहिती त्या प्रपत्रात नाही भरली तरी त्यांना काहीही म्हणत नसे. परंतू सुनिलनं माहिती न भरल्यास संबंधीत अधिका-यामार्फत सरळ त्याच्या नावानं पत्र काढत असे व त्याला बदनाम करीत असे. व्यतिरीक्त त्याला शोकासची नोटिसही देत असे.
ते नवीन शैक्षणिक धोरण.........त्याच धोरणातून चुन्नीनं शिकून फायदा घेतला होता. अन् आज तिनं त्याच शैक्षणिक धोरणातून आपला बदलाही काढू पाहात होती.
चुन्नी तसं पाहता रागच करीत होती सुनिलचा. त्याला फसविण्याची संधी शोधत होती. अशातच तिला एक नामी संधी चालून आली. ती म्हणजे तांदूळ प्रकरणाची.
प्रत्येक विद्यार्थ्यांना तांदूळ वाटप करण्याची योजना सरकारनं आणली होती. यात काहीकाही मुख्याध्यापक हे विद्यार्थ्यांना तांदूळ वाटप न करता तो तांदूळ बाजारपेठेत विकत असत. त्यातून अतिरिक्त पैसाही कमवीत असत.
हेच तांदळाच्या वाटपाचं प्रकरण. चुन्नीनं सुनिलला बदनाम करण्यासाठी वापरलं. तिनं दोनचार जणांची समीती स्थापन केली व ती समिती सुनिलच्या शाळेत तांदळाची चौकशी करण्यासाठी पाठवली.
ही समिती सुनिलच्या शाळेत आली. त्या समितीनं त्याचे शाळेत येवून फक्त तांदळाची चौकशी करायला हवी होती. परंतू ह्या समितीनं शाळेत येताच शिक्षणाधिकारी चुन्नीच्या निर्देशानुसार सर्वच बाबींची चौकशी केली. त्यातच मुख्याध्यापक असलेला सुनिल दोषी आढळून आला. त्यातच चुन्नीला त्याला हटविण्यासाठी चांगलाच बहाणा मिळाला व तिनं त्याला शोकास नोटिस देवून पदावरुन हटवलं.
सुनिल पदावरुन हटला खरा. परंतू यावेळी तो मागील काळापेक्षा जास्त सबळ होता. त्याच्याजवळ आता भरपूर पैसा होता. त्याला माहित होते की केव्हा संकट येईल आणि केव्हा पदभार जाईल. तसा त्याचा तो धंदा सुरुच होता. त्याची पत्नी संगीता आताभांडे घासायला वा कपडे धुवायला जात नसे. तर ती घरीच त्याच्या धंद्यासाठी काम करीत असे. आता सुनिलला आपल्या धंद्याची लाजही वाटत नव्हती.
सुनिल सायंकाळी शाळेतून घरी यायचा. त्यानंतर तो आपला ठेला घेवून धंद्यावर जात असे. जेव्हा शिक्षणाधिकारी असलेल्या चुन्नीनं त्याला हटवलं. तेव्हा त्यानं आव ताव न पाहता थेट न्यायालयात खटला दाखल केला. त्यानंतर न्यायालयात फैरीवर फैरी झडल्या. तिनंही पार्टीकडून युक्तीवाद केले गेले.
ती केस आज न्यायालयाचा वेळ खात होती. तसा तिचा निकाल लवकरच लागला. न्यायालयानं निकाल दिला की सुनिल यात दोषी नसून त्यानं तांदूळ प्रकरणात कोणताही अपहार केलेला नाही. तसेच शाळेत शौचालय बांधणे, चांगलं प्रशस्त बांधकाम करणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे हे मुख्याध्यापकाचे काम नाही. तर ते व्यवस्थापनाचे काम आहे. त्यानंतर न्यायालयानं शिक्षणाधिकारी विभागाला खडसावलं की उठून सुटून कोणाचीही बरोबर चौकशी न करता त्याला पदावरुन पदच्यूत करु नये. संबंधीत प्रकरणात सुनिलने अपहार केलेल्या तांदळाचा फक्त आरोप सुनिलवर आहे. परंतू त्याबाबतीत कोणताच पुरावा सुनिलविरोधात आढळला नाही. त्यातच सुनिलचा संबंध शाळा व्यवस्थापनात येत नसूनही शिक्षण विभागानं त्याचेवर तसा आरोप ठेवला. ही कृती योग्य कृती नाही. त्यामुळे शिक्षणविभागाला यापुढे सांगणं आहे की यापुढे असं कोणतंही प्रकरण न्यायालयात आणून न्यायालयाचा वेळ दवडू नये. नाहीतर न्यायालय दंड करेल व शिक्षेचं प्रावधानही ठेवेल.
त्यानंतर न्यायालयानं संस्थाचालकाला म्हटलं की शाळेत मिळणा-या अनुदानानुसार शाळा संस्थाचालकानं शाळेत पुरेशा सर्व व्यवस्था कराव्यात. जसे पिण्याचे पाणी, स्वच्छ शौचालय व्यवस्था, दिव्यांग व अपंगासाठी रँम्प व्यवस्था कराव्यात. जेणेकरुन विद्यार्थ्यांना शाळेत रमेल व आनंदानं शिकता येईल. यापुढे हा माझा व हा तुझा करीत कोणत्याही शिक्षकाला त्रास देवू नये.
सुनिलबाबत आणखी न्यायालयानं म्हटलं की शाळेत ज्या ज्या सुविधा नाहीत. त्या सुविधा एक मुख्याध्यापक या नात्यानं शिक्षणाधिकारी व शाळा संस्थालकाला मागाव्यात. त्याची नोंद ठेवावी. तसेच शाळा व्यवस्थापनानं ह्या सोयी शाळेत मिळणा-या अनुदानानुसार कराव्यात. हेच न्यायालयाचं म्हणणं आहे.
**********************************************

अलिकडे प्रेमविवाह व आंतरजातीय विवाह होतात. तेही अगदी सर्रासपणे. त्यातील काही टिकतात तर काही टिकत नाहीत. काही काही प्रेमविवाहात प्रेमीयुगलांची कत्तलही केली जाते. कारण ते प्रेमविवाह पसंत नसतात. परंतू प्रेमविवाह केल्यास त्याचे फायदे अनेक आहेत. ते पाहून अलिकडे लोकं प्रेमविवाहाकडे जास्त वळलेले दिसत आहेत.
१) प्रेमविवाहाच्या फायद्याचा विचार केल्यास पहिलं कारण नक्कीच पुढं येतं ते म्हणजे यामध्ये हुंड्याला अजिबात किंमत नसते. कोणत्याही प्रकारची देवाणघेवाण होत नाही. मग ती वस्तू असो, वास्तू असो की पैसा असो.
अलिकडे रितीरीवाजानं विवाह करतांना लोकांना भरमसाठ पैसा मोजावा लागतो. अर्थात हुंडा म्हणून वर पक्षाला पैसा द्यावा लागतो. हा पैसा काही ठिकाणी वधूला दिला जातो. काही ठिकाणी वराला. त्यासाठी प्रसंगी कर्जही काढावं लागतं.
२) असा हुंडा स्वरुपात पैसा दिल्यानंतर त्या संबंधीत जोडप्याच्या जीवाची शाश्वती नसते. कारण काहीकाही वरपक्ष चांगले निघतात. काही काही दारु पियक्कड निघतात. अशावेळी हुंडा स्वरुपात दिलेल्या पैशाची धुळधानी होते.
३) समजा तो व्यक्ती जर दारु पियक्कड निघाला तर त्याला काही मुली सोडून देतात. सोडून दिल्यानंतर तो पैसा कधीच परत मिळत नाही. मात्र कर्जाचं डोंगर वाढत चाललेलं असतं.
४) काही काही मुलं अगदी बोहल्यावर तर चढतात. परंतू रिसेप्शनच्या दिवशीच पळून जातात कुणासोबत. त्यामुळं विवाहाला लागलेला पैसा हा नष्ट होतो. त्यामुळं हेही कारण प्रेमविवाह वाढण्याला कारणीभूत ठरले आहे.
५)अलिकडे महागाई वाढली आहे. विवाहाच्या सर्व देवाणघेवाणीवर खर्च होणारा पैसा हा लाखोच्या घरात आहे. त्यामुळं असा खर्च वाचवता यावा. म्हणून काही मंडळी प्रेमविवाहाचा निर्णय घेतात. कारण प्रेमविवाहाला एवढा पैसा लागत नाही. ते न्यायालयात जातात. रितसर नोंदणी करतात व विवाह करतात. या प्रोसीजरला जास्त पैसा लागत नाही.
६)विवाहखर्च हा सुद्धा प्रेमविवाह करण्याला कारणीभूत ठरला आहे. कारण अलिकडे विवाह करतो म्हटल्यास बँडबाजा, घोडा करणे, गाड्या करणे, मंडपडेकोरेशन करणे, बिछायत जेवणखावण देणे इत्यादी सर्व गोष्टीत पैसाच ओतावा लागतो. त्यातूनही असंच लग्न केलं. तसंच लग्न केलं. असे टोमणे मारले जातात. त्यामुळं काही मंडळी नक्कीच प्रेमविवाहाकडे झुकतात.
७)अलिकडे लोकसंख्या अफाट वाढत आहे. लोकं अल्लाची देन म्हणत लोकसंख्या अफाट वाढवीत आहेत. त्यातच कुटूंबनियोजन होत असलं तरी काही ठिकाणी एकाएका घरी तीनच्या वर मुलं पाहायला मिळतात. त्यामुळं एवढ्या मुलाचं रितीरिवाजानं लग्न करणं कठीण जातं. अशावेळी प्रेमविवाह केल्यास सर्व कटकटच दूर होत असते. असा समज लोकांचा वाढत आहे. त्यातूनच प्रेमविवाहाला पसंती मिळत आहे.
८) शिक्षण ही आजची काळाची गरज ठरली आहे. मुलंमुली शिकतात आहे. उच्च शिक्षण घेतात आहे. त्यातच असं उच्च शिक्षण घेतांना वय वाढत आहे. त्यातच त्यांच्यावर पाश्चात्य विचारसरणीचा परिणामही झाला आहे. मुलं जेव्हा महाविद्यालयात जातात. तेव्हा ते विचार करीत असतांना त्यांना वाटते की मला माझ्याच एवढा शिकलेला मुलगा हवी. त्यामुळं ती मुलं आपल्याच महाविद्यालयातील मुलांवर प्रेम करु लागतात. साहजीकच प्रेमविवाह करतात.
९) हाच समवयस्क जोडीदाराचा इश्यू मनात ठेवून मुलं विवाह करतात. त्यातच महत्वाचं कारण म्हणजे त्यांना वाटते की आईवडीलाच्या मनानुसार विवाह केल्यास मनालायक जोडीदार मिळणार नाही.
१०) त्यांचंही मानणं बरोबर असतं. कारण अलिकडे असे रितीरिवाजानं विवाह केल्यानंतरही मुली मुलं आपला संसार व्यवस्थीत टिकवत नाहीत. त्यातच रोजच भांडणं होतात. या भांडणाचा परिणाम एवढा तीव्र असतो की त्यापैकी एकजण क्षणाचाही विचार न करता दोष देत देत निघून जातो. त्यामुळं चांगली सुशिल स्वभावाची मुलगी मिळावी. म्हणून असे महाविद्यालयातील मुलं प्रेमविवाह करतात. कारण हे जगाचा किंचीतही अनुभव न घेतलेले कॉलेजकुमार त्या मुलींना मोठमोठे आश्वासन देवून जाळ्यात ओढतात.
११) गरीबी अर्थात दारिद्रता हे अगदी महत्वाचं कारण आहे प्रेमविवाहाचं. कारण विवाह करायला पैसाच नसल्यानं गरीब माता पिता काय करतील. अशावेळी ते आपल्या मुलांचे विवाह करु शकत नाहीत. अशांची मुले प्रेमविवाहाला पसंती देवून प्रेमविवाह करीत असतात.
१२)अलिकडे प्रेमविवाह वाढण्याला मंगलदोष कुंडल्या ग्रहतारेही कारणीभूत आहेत. लोकं मंगलदोष आहे म्हणून मुली मागत नाहीत. त्यातच मुली पडून राहतात. त्यांचं वय वाढतं. कधीकधी कुंडल्या जुळत नाही. मुली पडून राहतात. अशा प्रकारच्या अंधश्रद्धा समाजात असल्यानं आज प्रेमविवाहाचे प्रमाण वाढलेले आहे व हे लोण आज शहरी भागाकडून ग्रामीण भागातही पसरत आहे. ज्या ग्रामीण भागात संस्काराला पवित्र असे स्थान होते.
महत्वाचं सांगायचं म्हणजे प्रेमविवाह अलिकडे वाढलेले आहेत. याचा अर्थ असा नाही की पुर्वी प्रेमविवाह होत नव्हते की झाले नाही. पुर्वीही प्रेमविवाह व्हायचेच. परंतू त्याची संख्या कमी असायची. कारण असा कोणी प्रेमविवाह केल्यास लोकं त्या घराला वाळीत टाकायचे. बोलायचे नाहीत. व्यवहारही करायचे नाहीत. व्यतिरीक्त खुनही करुन टाकायचे. परंतू अलिकडे कायदे एवढे सक्षम आहेत की कोणी कोणाचा सरासरी खुन करीत नाहीत. प्रेमविवाहाचे काही तोटेही आहेत.
१) प्रेमविवाह केल्यानंतर त्याला जीवनभर समाज स्विकारत नाही. कारण त्या समाजावर जातीचा बडगा उभा आहे. मग तो मुलगा कसाही निघो. ती मुलगी कशीही निघो, लोकांना जातीतच विवाह करणं आवडत.
२) जातीत विवाह केल्यानंतर साहजीकच मानसन्मान सारं काही मिळतं. प्रसंगी पैसा जातो. परंतू ते सर्व मिळत असल्यानं परीवारवाले रितीरीवाजाच्या विवाहाला जास्त पसंती देतात.
३) प्रेमविवाहाचा मुलगा चांगला निघेल वा मुलगी चांगली निघेल याची काही शाश्वती नसते. त्याची चौकशीही करता येत नाही वा केली जात नाही. परंतू जातीतील मुलं ही पाहिली देखली असतात. त्याची नातेवाईकामार्फत चौकशीही केली जाते. त्यामुळं ती चांगली निघेलच याची शाश्वती असते. अपवाद म्हणजे अशी चौकशी करुनही पळसाला पानं तीनच म्हटल्यागत काही ठिकाणी मुलं मुली चांगली निघत नाहीत. ते प्रेमविवाहातही घडतं.
४) जातीत विवाह केल्यास पुढील काळात मुलगी खपवितांना कोणताच धोका नसतो. त्यांना होणा-या मुलांचे सर्रास विवाह जुळतात. तारेवरची कसरत करावी लागत नाही.
५) प्रेमविवाह केल्यास होणा-या संततीत त्यांच्या आईवडीलांच्या शल्याचा त्रास जीवनभर भोगावा लागतो. त्यांच्यावर त्या विवाहाचा परिणामही होतो. तसा परिणाम जातीतील मुलांवर होत नाही.
वरीलप्रकारच्या या व इतर कारणानं प्रेमविवाह होत असतात. त्यातच अशा प्रेमविवाहातून मुलामुलींना त्यांच्या आवडीचे जोडीदार मिळतात. परंतू हे जरी खरं असलं आणि प्रेमविवाहाचे अनेक फायदे असले तरी प्रेमविवाह कोणी करु नये. कारण आजच्या समाजात जो जातीबंधनाचा बगड्या उभा आहे ना. तो कधीच जाणार नाही. प्रेमविवाह झाल्यानंतर जीवनभर ज्या यातना जोडप्यांना भोगाव्या लागतात. त्या यातना किळसवाण्या असतात. नेमकी वाळीत टाकल्यासारखी अवस्था होते त्या प्रेमीयुगलांच्या संसाराची. ते पाहिलं की वाटतं प्रेमविवाह न केलेला बरा. बरं, ह्या प्रेमविवाहाच्या यातनांचं लोण केवळ त्याच पिढीत राहातं असं नाही तर ते पुढच्या अनेक पिढ्यांनाही भोगावं लागतं. कारण इतिहास नेहमी उद्धार करीत राहातं की अमुक व्यक्तीनं प्रेमविवाह केला होता. जसे नल दमयंती विवाह. रुख्मीनी क्रिष्ण विवाह आणि अर्जून शुभद्रा विवाह. हिच पुनरावृत्ती आणि बदनामी टाळायची असेल तर प्रेमविवाह न करता रितीरीवाजानं विवाह केलेला बरा अन्यथा प्रेमविवाह. तसा विचार करणं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
रितीरीवाजाचं आणखी एक महत्वाचं कारण पुढे येत आहे.ते म्हणजे अलिकडे आंतरजातीय विवाह वाढत चाललेले आहेत. मुलगी वा मुलगा त्याच जातीतील राहिल असं सांगता येत नाही. कारण प्रेमविवाह करतांना ती मुलगी वा तो मुलगा जातीतील नसतो. त्यामुळं साहजीकच जातीची मजबूत बंधनं पाळणारा समाज, त्यांना जात तुटेल अशीही भीती वाटते. त्यामुळंही आजच्या काळात रितीरीवीजाच्या विवाहावर जास्त भर दिला जात आहे. परंतू ही जात जात जात केव्हापर्यंत? हाही प्रश्न विचार करण्यालायक आहे. ह, विवाहाला जातीची बंधनं नकोत. तसा विचार करणं विचारस्वातंत्र्यावर बंधनं घालण्यासारखं आहे. जातीत विवाह केल्यास मान सन्मान राहतो, इथंपर्यंत बरोबर आहे. परंतू एखाद्यानं तसा विवाह न केल्यास त्याला कोणीही वाळीत टाकू नये म्हणजे झालं. अन् ज्यांनी टाकलं असं आढळल्यास त्याच्यावर दंडात्मक कार्यवाही व्हावी असं वाटतं. कारण प्रेमविवाह करणा-यालाही जगण्याचा अधिकार असावा. मग तो आंतरजातीय विवाह का असेना. हं, विवाहाला बंधनच घालायची असतील तर व्यवहाराचं घाला. वरवधू समव्यवसायीक व समव्यवहारीकअसावेत. तसेच पैशाचं घाला. वरवधू मालमत्तेच्या बाबतीत सममालमत्ताधारक असावेत. म्हणजेच दोन्ही पक्षांमध्ये किंतू परंतू राहणार नाही व ते विवाह टिकू शकतील.

************************************************

सुनिल आणि संगीताचा आंतरजातीय विवाह. याच जातीबंधनात फसलेला होता. चुन्नीला वाटत होतं की हा विवाह टिकू नये. संगीतानं त्याला सोडून जावं किंवा सुनिलनं तिला सोडून द्यावं. परंतू तसं होत नव्हतं. ना संगीता सुनिलला सोडून जात होती. ना सुनिल तिला सोडून देत होता. दोघांचही एकमेकांवर निरतिशय प्रेम होतं.
आजही सुनिल त्या प्रेमविवाहाच्या झळा शोषतच होता. वाळीत टाकल्यागत त्याची अवस्था होती. ते शल्य त्याच्या परीवारालाही शोषावं लागत होतं. परंतू सुनिल वा संगीताला त्याचा पश्चाताप नव्हता. ते अगदी आनंदानं ते दिवस कंठत होते. त्रास चुन्नीलाच जास्त होत होता.
चुन्नीनं त्याला त्रास देण्याच्या हेतूनं आणखी एक नवीन शैक्षणिक धोरणातील हत्यार उपसलं. ते म्हणजे विद्यार्थ्यांना मारता न येणे वा अपमानकारक न बोलणे.
एकदा त्याच्या शाळेतील एका शिक्षीकेनं एक विद्यार्थी सतत अभ्यास करुन येत नसल्यानं एक दिवस छडीनं मारलं. ती छडी त्या विद्यार्थ्यांना मारता मारता त्या मुलानं ती हुकवली व ती छडी त्याच्या मनगटातील हाडाली लागली. लागलीच हाड सुजलं. आता काय करावं विचार आला. सुज काही केल्या उतरली नाही.
सायंकाळी तो मुलगा घरी गेला. त्यानंतर पालकानं ते पाहिलं. त्यांनी आपल्या पाल्याची विचारपुस केली. परंतू त्या मुलानही खरं कारण न सांगता खोटंच सांगीतलं. शेवटी त्या पालकानं शाळेत येवून चौकशी न करता पोलिस स्टेशनला तक्रार केली.
ती पोलिस स्टेशनची तक्रार. दुस-याच दिवशी पोलिसं आले. त्यांनी चौकशी केली. खरं कारण माहित झालं. परंतू पालकांची जबरदस्ती. बहुतेक तो पैसे उकळण्याचा डाव होता. पोलिसांवर कोणताच काही परिणाम झाला नाही. शेवटी केस बनली. ती कोर्टातही गेली.
ती केस.......चुन्नीला हायसं वाटलं. चुन्नीनं मुख्याध्यापक असलेल्या सुनिलला पत्र पाठवलं की त्याला व सदर शिक्षीकेला निलंबीत का करण्यात येवू नये.
ते पत्र.......ते पत्र पाहताच सुनिल थोडा घाबरला. मग त्यानं तिला उलटजबाबी पत्र लिहिलं. त्या पत्रात लिहिलं की सदर खटला न्यायालयात सुरु असून सदर शिक्षीकेवरील आरोप सिद्ध व्हायचा आहे. त्यामुळं सदर शिक्षीकेला निलंबीत करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसा मलाही निलंबीत करण्याचा प्रश्नच येत नाही. असं त्याचं उत्तर. ते उत्तर पाहताच चुन्नी काही दिवसासाठी चूप बसली.
काही दिवस ती केस चालली. युक्तीवाद व साक्षपुरावे तपासले गेले व शेवटी या खटल्यात न्यायालयानं निकाल दिला की सदर शिक्षीकेनं जाणूनबुजून विद्यार्थ्याला मारलं नाही. त्याला अभ्यास यावा म्हणून ती केलेली कृती आहे. तेव्हा अशा किरकोळ मारण्याला ग्राह्य धरु नये. ते मारणं म्हणजे संस्काराला वळण लावणं होय. विद्यार्थ्यांना शिक्षक थोडासा मारणारच नाही आणि रागावणारच नाही तर तो मुलगा शिकणार कसा? परंतू हे रागावणं मर्यादेत असावं. सदर शिक्षीकेनं आपला गुन्हा कबूल केलेला आहे. ती शिक्षेस पात्र आहे. परंतू याचा अर्थ असा नाही की न्यायालयानं तिला शिक्षा द्यावी. सदर शिक्षीकेनं केलेली कृती न्यायसंगत असून ती कृती विद्यार्थ्यांवर संस्कार करण्यासाठी उचललेलं पाऊल आहे. म्हणून तिची कृती गैरकृती जरी असली तरी त्या कृतीला न्यायालय माफ करीत आहे. परंतू अशी कृती भविष्यात कोणीही करु नये म्हणून वा तिच्या हातून घडू नये म्हणून सदर शिक्षीकेवर दंडात्मक कारवाई करीत आहे. हा दंड किरकोळ असून ती सदर शिक्षीकेने शिक्षा म्हणून स्विकारु नये. सदर शिक्षीकेने दोन हजार रुपये न्यायालयात भरावे. तसेच संस्थेने वा शिक्षणविभागाने तिला निलंबीत करु नये. तसेच पालक असलेले आपणही आपल्या मुलांना मारतोच ना संस्कारासाठी कधी कधी. परंतू तसे न समजता पालकानं अशा किरकोळ मारहानीला वादाचा मुद्दा बनवला व ही केस न्यायालयात आणून न्यायालयाचा बहुमुल्य वेळ व्यर्थ घालवला. तेव्हा त्यांनाही आदेश आहे की त्यांनीही दोनहजार रुपये रक्कम न्यायालयात भरावी. जेणेकरुन अशा किरकोळ मारहाणीसाठी कोणताही पालक न्यायालयात येणार नाही व न्यायालयाचा वेळ वाया जाणार नाही. हाच न्यायालयाचा अंतरिम आदेश आहे.
सुनिलच्या शाळेतील त्या शिक्षीकेनं हसतहसत दोन हजार रुपये भरले व शपथ घेतली की कधीच मुलांना मारणार नाही. मुलांना अगदी प्रेमानं वागवेल. त्यानुसार ती त्या दिवसापासून विद्यार्थ्यांशी अगदी प्रेमाने वागत होती. तसेच देशातील पालक आणि शिक्षकही सुधारले होते. पालक विद्यार्थ्यांच्या किरकोळ लागण्यातून कोर्टात जात नव्हते आणि शिक्षकही मारत नव्हते. एखादा शिक्षक संस्कार लावण्यासाठी मारत असे.परंतू काळजी घेत घेत. कधी लागून जात असे एखादी छडी. परंतू पालक त्यांच्यावर विरंजण घालून ती कृती संस्कारासाठी असेल असे मनात घोळवत असत व चूप बसत असत.
जेव्हा न्यायालयाचा हा निकाल आला. तेव्हा सुनिलला थोडं हायसं वाटलं. तसं चुन्नीचंही तोंड काही दिवसासाठी बंद झालं होतं.
चुन्नीच्या नेहमीच्या केसेस. नेहमी कोणत्या ना कोणत्या चौकशीचं पत्र. अगदी तंग येवून गेला होता सुनिल. कारण त्यानं प्रेमविवाह केला होता.
त्याला आता जाणीव होत होती प्रेमविवाहाची. परंतू पश्चाताप मुळीच नव्हता. कारण त्याला मिळालेली संगीता ही चांगल्या स्वभावाची निघाली होती.
दिवसामागून दिवस जात राहिले. तसं चुन्नीच्या मनात आणखी खुळ शिरलं. त्यातच नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिकवणंही सुरु होतं. शाळा डिजीटल बनवायची होती. त्यातच पत्र आलं.
पत्रानुसार सुनिलनं शाळाही डिजीटल बनवली होती. आज सुनिलनं सर्व गोष्टीतून शाळा प्रगतीपथावर आणली होती.
सुनिलनं शाळा डिजीटल बनवली खरी आणि प्रगतीपथावर आणली खरी. परंतू आजही चुन्नी त्याला सुखानं जगू देत नव्हती.अशातच विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आली.
विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आली खरी. त्या शिष्यवृत्तीचे चेक विद्यार्थ्यांना वाटायचे होते. परंतू विद्यार्थ्यांना तो पैसा पालकांची दयामाया पाहून सुनिलनं हातानं दिला. त्यातच सुनिलचं चुकलं. ती नामी संधी चुन्नीला सापडली व पुन्हा सुनिलला त्रास देण्यासाठी तिनं सरकारी पथक पाठवलं. त्यातच सरकारी कर्मचा-यांनी सुनिलनं शिष्यवृत्तीत भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवत पुन्हा त्याचं पद काढलं व सुनिल पुन्हा आपलं पद आणण्यासाठी पुन्हा न्यायालयात गेला.
सुनिल सीधासाधा माणूस होता. त्याचेवर कोणत्या ना कोणत्या माध्यमातून ठपका ठेवून त्याची बदनामी करणं, त्यातच त्याची चौकशी करुन करुन त्याचं पद काढणं व ते पद मिळविण्यासाठी पुन्हा सुनिलचं न्यायालयात जाणं. हा पाठशिवणीचा खेळ त्याच्या मागं सुरु होता. अशातच तो परेशान झाला होता. परंतू लढत होता अजुनही. या न्यायालयात खटले लढतांना अगदी मनापासून कंटाळा आला होता. चुन्नी जाणूनबुजून त्याच्या वाट्याला जात होती. त्यातच ते न्यायालय लढण्यासाठी तिच्याजवळ भरपूर पैसा होता. तोही फुकटाचा. परंतू सुनिलजवळ मेहनतीचा पैसा होता. न्यायालयात लढतांना हा मेहनतीचा पैसा खर्च होत होता.
आज सुनिल तो मुख्याध्यापक असूनही मोठं घर बांधू शकला नाही. कारण त्याला सतत वेतन बंदची व पद जाण्याची भीती असायची.चुन्नीनं बरेच वेळा त्याचेवर ताशेरे ओढत त्याचं वेतन बंद केलं होतं.
आज तो सुखी होता. परंतू चुन्नी........चुन्नी आज अमाप पैसा असूनही सुखी नव्हती. तिला असाध्य रोगानं जखडलं होतं. तिला तेवढा पैसा असूनही ती त्या असाध्य रोगाचा इलाज करु शकत नव्हती. परंतू त्या गोष्टी सुनिलला माहिती नव्हत्या. मात्र सुनिलजवळ तेवढा पैसा नव्हता. परंतू सुनिल आणि त्याचा परीवार पाहिजे त्या प्रमाणात आजारी राहात नव्हता. अगदी तो परीवार स्वस्थ वाटत असे.
आज पाऊस येत होता धोधो. तसं सुनिलला गाव आठवत होतं. परंतू तो गावाकडंही जावू शकत नव्हता. कारण गावाकडं येण्यासाठी त्याच्या मायबापानं मनाई केली होती. तसा तो धो धो पाऊस येत असूनही सुनिल ती वाट चालत होता. नुकतंच त्याचं पद गेल्यानं तो कोर्टात आला होता.
आज कोर्टाची तारीख होती. त्यामुळं तो जातीनं हजर होता. तशी आजची कोर्टाची तारीख संपताच तो कोर्टातून अगदी हताश मनानं घरी निघाला होता. तसं त्याला वाटत होतं की हे असे नशीबाचे भोग त्याच्याच नशीबी का?
सुनिल चुन्नीच्या वात्रटपणानं नोकरी सोडू पाहात होता. कारण आता त्याला चुन्नीची कटकट सहन होत नव्हती.
तो धो धो पाऊस....... त्या पावसात ओला होत होत जाणारा सुनिल विचार करीत चालला होता. 'मी बेकारच हा प्रेमविवाह केला. परंतू यात माझं काय चुकलं. अन् यात संगीताचा कोणता दोष? तरीही चुन्नी मला त्रास देतेय. मलाच का? इतरांना का नाही. वैगेरे विचार त्याच्या मनात होते. अशातच त्याचा पाय एका बेडकावर पडला व तो बेडूक तो पायाचा स्पर्श होताच टुणकन उडी मारुन डराव डराव करीत पळत गेला. तसा त्याला विचार आला की आपण हताश अन् निराश होतो. ही बेडकं.........पाऊस आला की बाहेर येतात अन् बाकी काळ दिसत नाहीत. कारण ती अज्ञातवासात असतात. कारण त्रास देणा-या इतर वातावरणापासून दूर. ज्यावेळी पाऊस पडतो. तेव्हा अगदी सुगीचे दिवस आल्यागत हे त्या अज्ञातवासातून बाहेर पडतात. अगदी जमीनीवर येतात आणि चार महिने राज करतात. आपल्यालाही असेच सुगीचे दिवस येतील आणि आपलंही राज्य येईल. असा विचार करीत तो चालला होता. अंतर्मनातून विचार करीत. अशातच बस्टाप आलं. परंतू ज्यावेळी बस्टाप आलं, त्यावेळी तो फारच ओलेचिंब झाला होता.

**********************************************

आज कृषी क्षेत्रात क्रांती होण्याची गरज आहे. कारण ब-याचशा भागात आज आत्महत्या होतांना दिसत असून आज शेतकरी पाहिजे त्या प्रमाणात सुखी नाही.
आज कोकणचा शेतकरी पाहिला तर तो सुखी आहे. कारण तिथे बारमाही नद्या वाहतात. तिथे असलेल्या डोंगररांगांमुळे व सह्यांद्री सातपुडासारख्या पर्वतरांगांमुळे या भागात पीक उत्पादनाला फारशी समस्या उद्भवत नाही. तेथे जास्त पाणी लागणारी पीकं होतात. ती म्हणजे ज्वारी, बाजरी आणि तांदूळ. मात्र तरीही शेतकरी सुखी नाहीत. ते आत्महत्या करतांना दिसतात. असं म्हटल्यास आतिशयोक्तीच होईल.कोकणात आत्महत्या करायला वातावरणच नाही. तिथे भात पीकाव्यतिरीक्त नारळ, पोफळी, फणस, सुपारी, काजू, इत्यादी जासस्त पाऊस शोषणारी झाडं आहेत. मात्र विदर्भात बहुतेक ठिकाणी अशा आत्महत्या झालेल्या आहेत. अशा आत्महत्येत विदर्भ आणि मराठवाडा अग्रेसर आहेत.
आज विदर्भातील काही जिल्हे सोडले तर भरपूर जिल्ह्यात दुष्काळच आहे. त्याचं कारण म्हणजे नदी प्रकल्प आणि पाझर तलाव. विदर्भातील भंडारा, गोंदिया जिल्ह्याचं निरीक्षण केल्यास असं आढळून येते की या जिल्ह्यात बहुतःश आत्महत्या झालेल्या नाहीत. त्याचं कारण काय असावं तर त्याची कारणं दोन आहेत.
१) बारमाही नद्या
या जिल्ह्यात वैनगंगा नदीचं वरदान आहे. एवढंच नाही तर आम, शोण, याही नद्या या भागात वाहतात. येथील नद्यांना बारमाही पाणी असतं. ते शेतीला पुरविण्यात येतं.
२)पाझर तलाव
भंडारा, गोंदिया या भागात पाझर तलावाची संख्या जास्त असून प्रत्येक गाव तेथे तलाव आहेत. काही काही गावात तर दोन दोन तलाव आहेत. ज्यावेळी पावसाळ्यात पाऊस पडतो. त्यावेळी या तलावात पाणी येतं. ते पाणी उन्हाळा लागेपर्यंत असतं. या तलावात लोकांनी मोटारपंप बसवून ते शेतीला पाणी घेतात. त्यामुळं अवर्षण निर्माण होत नाही. येथील लोकं जास्त पाणी लागणारे पीक आपल्या शेतात पिकवतात. त्यात मुख्यतः भात पिकाचा समावेश आहे. ज्यावेळी पावसाळ्यात पाऊस जास्त पडतो. त्यावेळी या भात पिकाला तो पाऊस जास्त लागत असल्यानं काही समस्याच उद्भवत नाही. तसेच ज्यावेळी पाऊस निघून जातो. त्यावेळी येथे असलेल्या तलावाच्या सोईमुळं ते पीक वाचतं. काही काही ठिकाणी तर विंधन विहिरीही आहेत.
मुख्यतः तलावाचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा हा भाग. या भागात सालई, मोहई, बीबा, पांजरा, साग इत्यादी प्रकारची पानझडी वृक्षसंपदा आहे. त्यातच गाव तिथं वड, याप्रमाणे पाणी शोषून ठेवणारी वड, पिंपळाचीही जास्त झाडं आहेत. जी झाडं हवेतील ऑक्सीजन जास्त प्रमाणात वातावरणात प्रवाहित करतात. हा वातावरणात गेलेला ऑक्सीजन हवेतील हायड्रोजनशी संयोग पावून त्याचं पावसात रुपांतर होते व पाऊस पडतो. ही किंवा अशाप्रकारची झाडं ज्या भागात जास्त आहेत. त्या भागात जास्त पाऊस पडतो. अलिकडं लोकांनी जंगलतोड ब-याच प्रमाणात केलेली आहे. त्यात वड, पिंपळासारखीही ऑक्सीजन प्रवाहित करणारी वृक्षही तोडली असल्यानं हवेत ऑक्सीजन कमी प्रमाणात मिसळतो. अशावेळी त्याची संयोग प्रक्रिया ही कमी प्रमाणात होते. परिणामी अवर्षण अर्थात कोरडा दुष्काळ पडतो. याचाच अर्थ असा की लोकांनी पाऊस यावा यासाठी झाडं लावावीत. त्यातच वड आणि पिंपळासारखी जी झाडं जास्त प्रमाणात ऑक्सीजन प्रवाहित करतात. ती झाडं लावलेली बरी. विदर्भातील गोंदिया आणि भंडारा तसेच गडचिरोली सारख्या जंगलाच्या भागात मुख्यतः वड पिंपळासारखी झाडं जास्त प्रमाणात असल्यानं तसेच कोकणातही जास्त प्रमाणात असल्यानं तसेच कोकणचा भाग हा डोंगर आणि पर्वतमय असल्यानं पश्चिमेकडील अरबी समुद्रातून येणारे खारे व मतलई वारे ज्यात बाष्प असतं ते अडतात व पाऊस पडतो. कारण या वा-यात असणा-या हायड्रोजन नावाच्या वायूशी येथील झाडातून प्रवाहित होणा-या ऑक्सीजनचा संयोग होतो.
मुख्य आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे शेतक-यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी खालील उपाय करता येतील.
१) नदीजोड प्रकल्प राबविणे.
ज्या भागात अशा आत्महत्या होतात. त्या भागातील नाल्यांना नद्यातून कालवे काढून पाणी प्रवाहित करायला हवं. अशा नदीजोड प्रकल्पातून ज्या भागातील लहान नद्यांना पाणी नाही. त्या नद्यांना मोठ्या नद्यातून पाणी पुरवता येईल. ज्याचा फायदा शेतक-यांना त्याच्या शेतात पिकांना पाणी पुरवतांना करता येवू शकेल.
२) तलाव निर्मीती
पुर्वी आणि आताही भंडारा, गोंदियात गाव तसा तलाव व्यवस्था आहे. तशी व्यवस्था इतरही गावात करावी. अर्थात तलाव खोदावेत. विशेषकरुन अशी व्यवस्था त्या गावात करावी. ज्या गावात आत्महत्या होतात. त्या गावात ते तलावातील पाणी शेतीला पुरविण्याचीही व्यवस्था सरकारनं करावी. ही व्यवस्था उपसासिंचनाद्वारे करावी. जेणेकरुन सर्व शेतक-यांना पाणी मिळेल व त्यांना आपल्या शेतात पीक पिकविता येईल. भरघोष उत्पन्न घेता येईल. आत्महत्येचा प्रश्न मिटेल व कोणाच्या आत्महत्या होणार नाही.
३) कृषी प्रश्न सोडवता यावा यासाठी तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे झाडं लावणे. कारण झाडं ही जास्त ऑक्सीजन प्रवाहित करीत असून त्या ऑक्सीजनचा हवेतील हायड्रोजनशी संयोग होवून पाणी निर्माण होतं. जेवढी ती झाडं जास्त, तेवढी जास्त ऑक्सीजन निर्मीती व तेवढा जास्त पाऊस. जेणेकरुन या पावसाचा उपयोग शेतक-यांना शेतात धान्य निर्माण करण्यासाठी होवू शकेल.
४) कृषी प्रश्न सोडविण्यासाठी विंधन विहिरी हाही एक पर्याय आहे. या विहिरीतून पाणी काढून ते शेतीला पुरवता येवू शकते. परंतू ते सरकारच्याच माध्यमातून होवू शकते.
५) खड्डे खणणे.
पावसाळ्यात पाऊस येतो. ते पाणी उतारावरुन निघून जावून नाल्यांना मिळतं. म्हणजे जमीनीत मुरत नाही, निघून जातं. त्यामुळं ते पाणी जमीनीत नसल्यानं विहिरी खोदल्यास त्याला पाणी लागत नाही. अशावेळी तो भाग पुर्णतः कोरड्या दुष्काळी स्वरुपाचा बनतो. असं होवू नये म्हणून जागोजागी खाली जमीनीत मोठमोठे खड्डे खोदावेत. ज्याला लहान तलाव म्हणता येईल. तिथे पाणी साठवून ते पाणी विहिरीमार्फत शेतीला पुरविता येईल. विहिरीलाही लवकर पाणी लागेल. पाण्याची पातळी खुप खाली जाणार नाही.
महत्वाचं म्हणजे कृषी प्रश्न सोडवता येईल यात शंका नाही. त्यासाठी वर दिलेले उपायही आहेत.याला पैसा लागतो. तो पैसा लोकांजवळ नाही. तो सरकारजवळ आहे. सरकारच सर्व करु शकते. परंतू सरकार हे सर्व करीत नसल्यानं आज दुष्काळ आहे व शेतक-यांना आत्महत्येला सामोरं जावं लागत आहे.
सरकारनं कृषी प्रश्न सोडवावा. त्यासाठी वरील उपाय करावेत. नदीजोड प्रकल्प नाही. परंतू झाडं तर आपण लावू शकतो ना. ती झाडं लावण्याचा उपक्रम घरोघरी घ्यावा. प्रत्येकाला झाड लावायला सांगावं. ज्यांनी ज्यांनी झाड लावलं. त्यांनाच सुविधा पुरवाव्यात. ज्यांनी ज्यांनी झाड लावलं नाही. त्याला कोणत्याच सुविधा पुरवू नयेत. तसेच प्रत्येक गावात गाव पाहून एक किंवा दोन झाडं वडाची पिंपळाचीही लावायला लावावीत. याचाच अर्थ असा की यातून झाड निर्मीती होवून भरपूर प्रमाणात पाऊस पडेल व जिथे पाऊस तिथे उत्पादनक्षमताही वाढेल व आत्महत्याही रोखता येईल.
आज कृषी व्यवस्थेत आत्महत्येचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेती आहे परंतू ती दुष्काळानं पिकवता येत नसल्यानं कोणीही शेती करायला पाहात नाहीत. त्यातूनच बेरोजगारीही निर्मीण होत असून शेती ओस पडत चालली आहे. तेव्हा ही शेती ओस पडू नये. उत्पादनक्षमता वाढावी व आत्महत्या होवू नये. म्हणून सरकारलाच लवकर पावले उचलावी लागेल. जेणेकरुन आत्महत्या रोखता येईल व उत्पादनक्षमता वाढवता येईल नव्हे तर निर्माण झालेला कृषी प्रश्नही सोडवता येईल हे तेवढंच खरं आहे.

*********************************************

सुधीरनं आत्महत्या केली होती. त्याचं कारणही तसंच होतं. सतत काही वर्ष कोरडा दुष्काळ पडला होता. त्यातच पीक पेरण्यासाठी कर्ज घ्यावं लागलं होतं.
ते कर्ज........त्यातच त्या व्याजावर व्याज वाढत चाललं होतं. ते व्याज एवढं झालं होतं की ते खंडवतांना त्रास होत होता. बँकवाले त्याच्या घरी येत होते. ते धमक्या देत होते. त्यातच परेशान होवून त्यानं आत्महत्या केली होती.
सुधीरनं आत्महत्या केली तेही कर्जाला कंटाळून. परंतू बँकवाल्यांनी त्याला सोडलं नाही. त्यांनी शेतीवर ताबा मिळवला होता. शेतीची निलामी झाली होती. त्यातच सुधीरचा परीवार आता रस्त्यावर आला होता. त्यातच मायबाप जीवंत होते.
सुधीरची पत्नी सीमा. तिच्यासमोर आज पुर्ण परीवाराचा विचार आला होता. त्यातच तिचे सासू सासरे म्हातारे झाले होते. त्यांच्यानं कामधंदा करणं जमत नव्हतं. अशातच मुलांचं शिक्षण त्यांचं जेवनखावण कपडेलत्ते सारेच प्रश्न होते. काय करावं सुचत नव्हतं. अशातच तिला आठवलं की शहरात तिची ननद कोणीतरी अधिकारी असून आपण तिला मदत मागावी. तशी तिनं चुन्नीला मदत मागीतली. परंतू चुन्नीनं तिचा सन्मान तर केला नाही. उलट तिनं तिला हाकलून लावलं. शेवटी निराश सीमा विचार करीत करीत घरी परत आली.
सीमासमोर अनेक विचार होते. त्यातच तिला काय करावं सुचत नव्हतं. शेवटी तिला आठवलं की तिचा दिर शहरात शिक्षक असून त्यानं दुस-या जातीची अर्थात प्रेमविवाह केल्यानं आपले सासरे आणि आपला परीवार बोलत नाही. आपण त्यांना मदत मागावी. त्यांना जोडावं.
विचारांचा अवकाश........सीमा सुनिलकडं आली. तिनं आपली कथनी सांगीतली आणि सांगीतलं की सुधीर मरण पावलेला असून त्यानं कर्जापायी आत्महत्या केलेली आहे. बँकेनं शेतीवर ताबा मिळविलेला असून सध्या तो परीवार अनंत यातना भोगतो आहे. आता सासू सासरेही म्हातारे झाले असून त्यांच्यानं काम करणं जमत नाही. त्यातच मुलाबाळाचं शिक्षण आहे. पोटाचा प्रश्न सोडवितांना मुलाबाळाच्या शिक्षणाकडं दुर्लक्ष होत आहे. त्यामुळं काय करावं सुचत नाही. आपण जर काही मदत केली तर बरं होईल.
सुनिलनं ते बोलणं ऐकलं. त्याला फार वाईट वाटलं. तसं त्याला भावाच्या मरणालाही न बोलावल्याचं वाईटच वाटलं. तसा सुनिल म्हणाला,
"वहिणी चिंता करु नका. मी समर्थ आहे सगळं सांभाळायला. मी सर्व मदत करील."
सुनिलनं बोललेल्या बोलण्यातून सीमाला बरं वाटलं व ती हूंदका देवून रडू लागली. तशी संगीता म्हणाली,
"रडू नका. आम्ही आहोत आपल्याला सांभाळायला."
संगीताच्याही बोलण्यानं सीमाला धीर आला. तशी ती संगीताबाबत विचार करु लागली की कशीही का असेना, ती संगीता दुस-या जातीची का असेना, तिचे विचार चांगले आहेत. नाहीतर ती चुन्नी चांगली लखपती असूनही तिनं आम्हाला हाकलून दिलं.
तो दिवस सीमासाठी अतिशय चांगला निघाला होता. तिला अगदी हायसं वाटत होतं. त्या दिवशी तिला झोपही चांगली लागली होती. त्यातच दुसरा दिवस उजळला. दुस-या दिवशी सीमा जेव्हा जायला निघाली. तेव्हा संगीतानं काही पैसे तिच्या हातात ठेवले. म्हणाली,
"लागले तर आणखी माग. संकोच करु नकोस. हे आपलंच घर समज."
संगीताच्या बोलण्यानं सीमा भारावून गेली होती. तसे तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळत होते.

****************************************

सीमा घरी निघून गेली होती. त्यातच सुनिलनं आपल्या म्हाता-या मायबापाला घरी आणलं. त्यांची काळजी घेवू लागला. त्यातच संगीताही त्यांची विशेष काळजी घेवू लागली. त्यांचं दुखणं खुपणं पाहू लागली. तसेच सुनिलनं सीमाच्या मुलांंना शिक्षणासाठी शहरातील वसतीगृहात आणलं व तो त्यांच्या शिक्षणावर खर्च करु लागला होता. तसंच त्यांच्या शिक्षणावर बारकाईनं लक्ष देवू लागला होता. आज सुधीर आणि चुन्नी त्याच्यासोबत वाईट वागले होते. परंतू सुनिलनं सुधीरला माफच केलं होतं नव्हे तर त्यांच्या मृत्यूनंतर तो त्यांचा परीवारही सांभाळत होता.
चुन्नीही आज शांत झाली होती. त्याचं कारण तसंच होतं. तिला एका प्रकरणात गोवलं होतं. अगदी त्या प्रकरणात तिला पैसे खातांना रंगेहाथ पकडलं होतं. ज्यातून तिनं जमविलेली माया जप्त झाली होती. त्याची न्यायालयात केस सुरु होती. त्यातच चौकशीही सुरु होती. तसा तो एक दिवस उजळला.
तो एक दिवस......चुन्नीनं दरवाजा ठोकला. तसं सुनिलनं दार उघडलं. पाहतो काय चुन्नी दारातच उभी होती. हताश निराश होती ती. तसं तिला सुनिलनं पाहिलं. म्हणाला,
"ये घरात."
सुनिलनं तिला आत घेतलं. तशी त्यानं तिची सरबराईही केली. संगीतानंही तिची आवभगतच केली. तशी चुन्नी म्हणाली,
"सुनिल मला माफ कर. मी तुला फारच त्रास दिला. त्या पापाची शिक्षा भोगत आहे मी. माहित आहे, एका प्रकरणात मी लाच घेता घेता सापडवे. कोर्टात त्याची केस सुरु आहे. माझा परीवार बरबाद झाला. माझी मालमत्ता सील झाली. मला माहित आहे की मी निर्दोष सुटणार नाहीच. मला शिक्षा होणारच. तेव्हा ती शिक्षा होईल तेव्हा होईल. परंतू मला तुला त्रास दिल्यानंतर मी जे पाप केले आहे. त्या पापाची परमेशानं जी मला शिक्षा दिली आहे. त्या शिक्षेचं प्रायश्चित म्हणून मी तुझ्याकडे आली आहे. मला माफ कर. तसं पाहता मी माफी मागण्याच्या लायकही नाही."
चुन्नीच्या बोलण्यानं सुनिल भारावून गेला होता. तसा तो म्हणाला,
"ताई, तू मोठी आहेस. तू दिलाही असेल त्रास मला. तरी मी तुला माफ केलं आहे. माहित आहे. माझं आयुष्य हे तुच घडवलं. जर तू मला शिक्षणासाठी शहरात आलो नसतो. तर मी शिकलो नसतो व मास्तरही बनलो नसतो आणि मुख्याध्यापकही. ताई तुझे अनंत उपकारच आहेत माझ्यावर."
सुनिलच्या बोलण्यातून नवचैतन्य आलं होतं चुन्नीच्या चेह-यावर. तिचा तो चेहरा आज प्रफुल्लीत झाला होता. तिनं भोगलं होतं बरंच काही. जे कर्म केले होते तिनं. त्या कर्माची कर्मफळं तिला केसच्या रुपानं मिळाली होती.
आज सुनिलनं चुन्नीसाठी निष्णांत वकील उभा केला होता. तसं त्याला जीवनभर कोर्टाचे खटले लढावे लागल्याने पुष्कळ सारे वकील त्याच्या ओळखीचे झाले होते. त्यातच कोणता खटला कसा लढावा यात तो तरबेजच झाला होता.
ती चुन्नीची केस सुनिलनं चुटकीसरशी काढून दिली. चुन्नी जिंकली होती. तिची मालमत्ताही तिला मिळाली होती.
चुन्नीनं सुनिलला त्रास दिला असला तरी मनात किंतू परंतू न ठेवता सुनिलनं तिला अखेर मदतच केली. तशी तिची मालमत्ताही तिला परत मिळाली. परंतू आज ती समाधानी नव्हती. तिला एकच प्रश्न सारखा सतावत होता. तो म्हणजे मालमत्तेचा. तिनं मिळविलेली मालमत्ता ही गैरकानूनी होती. त्यातच त्या मालमत्तेचा प्रश्न आला की तिला रात्रंरात्र झोप येत नसे. शेवटी तिनं निर्णय घेतला. आपली मालमत्ता दान करण्याचा. त्यानुसार चुन्नीनं आपली मालमत्ता गोरगरीबांना ट्रस्टच्या माध्यमातून दान केली होती. ज्या गोष्टीला तिच्या परीवारानंही सहमती दर्शवली. ज्या मालमत्तेतून आता वृद्ध माणसे अनाथ मुलं सुखानं जगत होती.
आज चुन्नीजवळ स्वतःच्या पेन्शनशिवाय काहीही नव्हतं. तिची दोन्ही मुलं विदेशात होती. परंतू तरीही ती सुखानं झोपत होती. कुणाचीही काळजी न करता.
सुनिलही निवृत्त झाला होता. त्याचीही मुलं मोठी झाली होती. ती सुनिलजवळच होती. ती त्याची सेवा करीत असत. त्यांना देळातच सरकारी नोकरी लागली होती. तोही आता म्हातारा झाला होता.
सीमाचीही मुलं मोठी झाली होती. ती मात्र नोकरी करीत नव्हती. परंतू चांगला उद्योगधंदा करीत होती.
सर्व परीवार आज एकत्र आला होता. सर्वजण हेवेदावे विसरुन एकमेकांच्या घरी जात होते. तसेच एकमेकांच्या कार्यक्रमात सहभागी होत होते. आता मात्र त्या प्रेमविवाहाचे वैर नव्हते ना आंतरजातीय विवाहाचं लेनदेन. सुनिलच्या त्या बहिणीनं जसं त्याला स्विकारलं होतं. तसंच त्याच्या भावजनंही त्याला जवळ केलं होतं. सुनिलनंही त्यांना अगदी भरभरुन मदत केली होती.
आज सुनिल सुखी होता आपल्या लेकरासमवेत. परंतू त्याला जेव्हा इतिहास आठवायचा. तेव्हा गहिवरुन यायचं. तो कधी रडतही असे. परंतू जेव्हा डोळ्यासमोर त्याचा परीवार येई. तेव्हा मात्र तो आपलं रडणं मनातल्या मनात दाबत असे. तसंच चुन्नीचंही होतं.
चुन्नीची मुलं विदेशात होती. ती जेव्हा जेव्हा विदेशात जात असे. तेव्हा तिला मायदेशाची आठवण येत असे. तिचं मन त्या विदेशी मातीत रमत नव्हतं. कधी कधी तिला तिचं बालपण आठवे. तेव्हा ती नवीन शैक्षणिक धोरणाचं आभार मानत असे. ते जर नसतं. तर चुन्नी कधीच शिकली नसती आणि ती शिक्षणाधिकारीही झाली नसती. आजही ती शाळाबाह्यच राहिली असती व कदाचित तिनं मुलांनाही शाळाबाह्यच ठेवलं असतं.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED