ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 18 - अंतिम भाग Abhay Bapat द्वारा गुप्तचर कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 18 - अंतिम भाग

प्रकरण १८
न्यायाधीश नारवेकरआपल्या आसनावर बसले. “ दोन्ही बाजूचे वकील हजर आहेत? ” त्यांनी विचारले.
“ पटवर्धनआज येणार नाहीत त्यांनी मला त्यांचे कामकाज पुढे चालवण्याची सूचना दिली आहे. ”सुकृतम्हणाला.
“ मी आधीच एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो, भरती ओहोटीच्या अधिकृत वेळापत्रकाचा विचार कोर्ट करेलच पण प्रत्येक ठिकाणी अगदी त्याचं वेळेनुसार भरती ओहोटी येत नाही, एखाद्या विशिष्ट जागी पाण्याची खोली किती आहे , खाडीचे मुख किती रुंद आहे इत्यादी बाबींचा परिणाम अचूक वेळ काढण्यासाठी विचारात घ्यावा लागतो.प्रजापतिची बोट ज्या विशिष्ट ठिकाणी नांगरली होती त्या ठिकाणी भरती-ओहोटी च्या वेळ आणि अधिकृत वेळापत्रका प्रमाणे असणारी वेळ यात किती तफावत आहे याचा पुरावा समोर आणणे सरकारी वकिलांना शक्य आहे का? तुमच्या मूळ नियोजनात काही अडथळा न आणता?” न्यायाधीश म्हणाले.
खांडेकरआपला अजस्र देह सावरत उभे राहिले. “ आपल्याला अपेक्षित अशी माहिती देणे या घडीला शक्य नाही.काळ रात्री आशा काही घटना घडल्या आहेत की आम्हाला पुढची तारीख मिळावी अशी विनंती आहे.प्रजापतियांची बोट काल रात्री टाईम बॉम्ब च्या स्फोटात नष्ट झाली आहे. ”
“ सरकारी वकिलांनी त्यापूर्वी बोटीवर जाऊन काही माहिती घेतली का?” न्या.नारवेकर नी विचारलं
“ सांगायला लाज वाटते पण आम्ही नाही केले असे प्रयोग.पटवर्धनने केले आहेत असे कळते.”खांडेकरम्हणाले.
“ आणि नेमके पाणिनीपटवर्धन इथे नाहीयेत?” न्या.नारवेकरनी विचारले.
“ नाहीयेत .”सुकृतम्हणाला.
“ या भरती –ओहोटी च्या वेळेबाबत मला खूप रस निर्माण झालाय आणि ही संपूर्ण केस त्यावरच अवलंबून आहे.” न्यायाधीश म्हणाले. “सुकृत, तुमचे काय म्हणणे आहे पुढची तारीख देण्या बाबत? ”
“ मला सूचना आहे पाणिनीपटवर्धन यांची की पुढची तारीख द्यायला विरोध करावा,”सुकृतम्हणाला.
“ एका वेळेला दोन दिवसांपेक्षा जास्त दिवसांची तारीख देऊ नये अशी तरतूद आहे.आणि एकूण सहा दिवसापेक्षा जास्त दिवस पुढे ढकलू नये.आणि ही विनंती सुद्धा वकिलांनी प्रतिज्ञ पत्र देऊन करायला हवी.खांडेकर तुम्ही प्रतिज्ञ पत्र द्यायला तयार आहात?”
“ नाही युवर ऑनर.” खांडेकरम्हणाले. “ खर म्हणजे पुढची तारीख द्यायला मान्यता दिली बचाव पक्षाने तर त्यात काहीही अपाय कारक नाहीये.”
“ पण मला मिळालेल्या आदेशानुसार मी पुढची तारीख घ्यायला विरोध करायचा आहे.”सुकृत मक्खपणे म्हणाला.
“ किमान आज दुपार पर्यंत तरी मुदत द्यावी.मी वैयक्तिक पटवर्धन शी बोलतो हवं तर.” खांडेकरनिराश होऊन म्हणाले.
“ तुम्ही बोला सुकृत.” न्यायाधीश म्हणाले.
“ कोणत्याही कालावधीसाठी मुदत देऊ नये असे मला आदेश आहेत.”सुकृत पुन्हा मक्खपणे म्हणाला.
“ ठीक आहे खांडेकर, खटल्याचे कामकाज चालू करा.” न्यायाधीश म्हणाले.
“ माझा नाईलाज झालाय. मी या पार्श्वभूमीवर विनंती करतो की आरोपी विरुद्धचा खटला रद्द करावा ! त्यांना मुक्त करावं ”
“ का sssय ” न्यायाधीश दचकलेच ! शेवटी त्यांनी आदेश दिला, “ अत्ता जरीपटवर्धनहजर नसले तरी त्यांनी उद्या कोर्टात हजर राहावे.त्यांची स्वत:ची काहीतरी ठाम अशी मते असतील, कल्पना असतील त्या त्यांनी सांगाव्यात, त्यांना त्यांच्या बाजूने काही साक्षीदार उभे करायचे असतील तर आणावेत.सरकारी वकील जरी म्हणत असले की आरोपीला मुक्त करावे तरी कोर्ट हे जाणून घेण्यात उत्सुक आहे की खरा खुनी कोण आहे या बद्दल पटवर्धन यांनी काही तर्क केलाय का? उद्या सकाळी कोर्ट कामकाज पुन्हा सुरु होईल.”
दुसऱ्या दिवशी सकाळी कोर्टात प्रचंड गर्दी झाली.स्वतःखांडेकर सुद्धा खूप उत्सुक होते पटवर्धन चं म्हणणं ऐकायला.पटवर्धनने कोणी साक्षीदार आणले तरी त्यांची साक्ष स्टीप्युलेट करायची म्हणजे त्याची साक्ष काय असेल या बाबत पटवर्धन चं म्हणणं मान्य करायचं असंच त्यांनी ठरवलं होत फक्त उलट तपासणीचे अधिकार मात्र ते राखून ठेवणार होते.
पटवर्धनकोर्टात आला तेव्हा कोणतही प्रास्ताविक न करता न्यायाधीश नारवेकरम्हणाले, “ मिस्टर पटवर्धन, आरोपी विरुद्धचा खटला काढून घ्यावा अशी विनंती सरकारी वकिलांनी केली आहे.तुमच्या दृष्टीने खटला संपल्यात जमा आहे परंतू खुनी कोण असावा असा तुमचा कयास आहे आणि त्यामागचा तुमचा तर्क सांगा.”
“ खुनी कोण हे ठरवण्यासाठी आधी खून किती वाजता झाला हे ठरवावे लागेल.”पटवर्धनम्हणाला. “ परिस्थितीजन्य पुरावा हा मी नेहेमीच सर्वोत्कृष्ट पुरावा समजत आलोय.या प्रकरणात दोन परिस्थितीजन्य पुरावे एकमेकांविरुद्ध आहेत. कायाचे म्हणणे खरे समजले तर ती संध्याकाळी सात ते आठ च्या सुमाराला बोटीवर गेली तेव्हाच तिथे रक्ताचे थारोळे साचले होते तिच्या पायातल्या बुटाला रक्त लागले आणि त्याचे ठसे जिन्यावरील पायऱ्या वर मधोमध उमटले या वरून लक्षात येते की बोट डगमगायला लागण्यापूर्वीच तिथे खून झाला होता.म्हणजे खुनाची वेळ ही सात ते आठ च्या मधली किंवा त्या आधीची होती.ती म्हणते की तिला प्रेत दिसले ते केबिन च्या उंबऱ्या जवळ म्हणजे स्थिती-१ मधे.रक्ताचे थारोळे स्थिती -१ आणि स्थिती -२ या दोन्ही ठिकाणी होते.तिचे बूट रक्तात भरले तर ते स्थिती-१ च्या ठिकाणी असायला पाहिजेत.कारण तिला प्रेत स्थिती -१ या ठिकाणी दिसले असे ती म्हणते. आणि ती वेळ संध्याकाळची ७ ते ८ पूर्वीची होती. पण तेव्हा बोट हलतच नव्हती.”
“ या उलट भरती ओहोटीचा अभ्यास सांगतो की स्थिती -२ ला प्रेत घरंगळत आले म्हणजे बोट तिरकी झाली म्हणून.डॉक्टरांच्या म्हणण्या नुसार मृत्यू नंतर अर्ध्या तासापेक्षा जास्त रक्त स्त्राव चालू राहण्याची शक्यता नाही.आपल्याला स्थिती –एक आणि स्थिती –दोन या दोन्ही ठिकाणी रक्त दिसतंय याचा अर्थ स्थिती-१ वरून स्थिती -२ ला प्रेत अर्ध्या तासाच्या आत घरंगळत गेलं असल पाहिजे. याचा अर्थ खून शुक्रवारी रात्री ९.१५ च्या सुमारास झाला असला पाहिजे, ज्यावेळी बोट हलायला सुरुवात झाली होती. म्हणजेच रात्री ९.१५ ला प्रेत स्थिती -१ वर आणि ९.४५ ला स्थिती २ वर असले पाहिजे. ”
“ थोडक्यात काया चे जिन्यावर मध्यावर उमटलेले बुटाचे रक्त रंजित ठसे दाखवतात की खून संध्याकाळी ७ पूर्वी म्हणजे बोट हलायला लागण्यापूर्वी झाला आणि भरती ओहोटी वेळापत्रकानुसार बोटीचे हलणे,तिरकी होणे आणि प्रेत घरंगळत जाणे याचा विचार केला तर खुनाची वेळ रात्री ९.१५ येते . हे दोन्ही परस्पर विरोधी परिस्थितीजन्य पुरावे आहेत. ”
“ कायाखोटे बोलते असे मानायचे कारण नाही कारण बुटाच्या ठशाचा पुरावा तिच्या म्हणण्याला पुष्टी देतो शिवाय मला समजल्या नुसार दिव्व्यापुंडबेलवलकरला घेऊन संध्याकाळी ७ च्या सुमाराला बोटीवर गेली.बेलवलकर बोटीत न येता होडीतच बसून राहिला होता ती म्हणते की तिला ही तिचा नवरा मारून पडलेला दिसला आणि तो स्थिती-१ या ठिकाणी उंबऱ्या जवळ होता. आता वेळेच्या बाबतीत तिचे म्हणणे सुद्धा काया च्या म्हणण्याशी जुळते. ”
“ मग या दोन परस्पर विरोधी परिस्थितीजन्य पुराव्यावरून नेमकं काय समजायचं?” न्यायाधीशांनी विचारलं. “ खून नक्की कधी झाला?”
“ वस्तुस्थिती बदलत नाही , जर काया आणि दिव्व्या पुंड खरे बोलत असतील तर त्याचा अर्थ असा होतो की आपण परिस्थितीजन्य पुराव्या चा अर्थ काढताना गृहीत धरलेल्या गोष्टी चुकल्या आहेत. ”
“ कोणत्या गोष्टी? ” खांडेकरनी न राहवून विचारलं.
“ डोक्याला फटका बसून डोके उंबरठ्यावर आपटले आणि स्थिती-१ मधे त्याला मृत्यू आला हे गृहीतक च चुकीचे आहे.कारण ते गृहीत धरल्यामुळे आपण खून ९.१५ ला झाला असे मानतोय.”
न्यायाधीश काहीतरी विचारायला गेले पण पाणिनी पटवर्धन च्या बोलण्याचा ओघ थांबवावा असे त्यांना वाटले नाही आणि ते थांबले.
“ खुन्या ने पुंड वर हल्ला केला आणि त्याला प्रथम स्थिती-२ वर टाकले आणि त्या ठिकाणी प्रथम रक्ताचे थारोळे साचले.” पाणिनी म्हणाला.
“ पण पुंड चे डोके तर स्थिती-१ जवळच्या उंबऱ्याला आपटून फुटले आणि रक्त स्त्राव झाला ना? स्थिती-२ च्या ठिकाणी उंबराच नव्हता मग डोके कसे फुटले?” खांडेकरयांनी शंका व्यक्त केली.”
“ रेयांश प्रजापति ने पुंड ला ठोसा मारून खाली पाडले आणि तो निघून गेला परंतू तेव्हा पुंड मेला नाही . काया आणि तिच्या नंतर दिव्व्या पुंड येण्या पूर्वी खुनी तिथे आला असावा आणि त्याच्यात आणिपद्मनाभ पुंड मधे कशावरून तरी मोठे वाद झाले असावेत त्यातून खुनी माणसाने कोणत्यातरी जड वस्तूने त्याच्या डोक्यात मागून आघात केला.तो होताच पद्मनाभ पुंड चे डोके फुटले आणि तो स्थिती-२ या ठिकाणी मरून पडला.त्याच्या डोक्यातून रक्त स्त्राव झाला, म्हणजे प्रथम रक्त स्त्राव झाला तो स्थिती-२ या ठिकाणी. त्या नंतर अत्यंत चतुराई दाखवत खुनी माणसाने त्याचा मृत देह स्थिती-१ या ठिकाणी आणून उंबऱ्या जवळ ठेवला.प्रेत लगेच हलवल्यामुळे उंबऱ्या च्या ठिकाणी म्हणजे स्थिती -१ चे ठिकाणी पण रक्त स्त्राव झाला.प्रेत या स्थिती -१ ला हलवले कारण की त्याला भासवायचे होते की रेयांश प्रजापति च्या ठोशा मुळे पुंडचे डोके उंबऱ्यावर आपटून फुटले. कारण खुनाच्या आधी पुंड शी बोलताना खुनी माणसाला पुंड ने सांगितलेच असणार की रेयांश प्रजापतिआणि त्याच्यात झटापट झाली आणि रेयांश ने मारलेल्या ठोशा मुळे पुंड धडपडला.याचा फायदा घेऊन खुनी माणसाने पुंड चे डोके स्थिती -१ वर आणून उम्बऱ्या जवळ ठेऊन रेयांश नेच त्याचा खून केल्याचा बनाव रचला..यात त्याचा दुहेरी फायदा होता.पहिला फायदा म्हणजे जमीन खरेदीच्या व्यवहारात पुंड चा साथीदार म्हणून पालकरला हाताशी धरून त्याने फ्रॉड करून रेयांश प्रजापति कडून घेतलेले पैसे रेयांश चव्हाट्यावर आणू शकणार नव्हता कारण त्याला खुनाच्या आरोपाखाली शिक्षा झाली असती आणि दुसरा फायदा असा की त्याला माहीत होते की बोट हलायला सुरवात झाली की साधारण ९.४० च्या सुमारास प्रेत गडगडत स्थिती-२ ला येईल आणि त्यावरून खुनाची वेळ शोधायचा प्रयत्न केला गेला तर ९.१५ ला प्रेत स्थिती-१ ला होते असा अर्थ काढला जाईल आणि त्यावेळी खुनी दुसरी कडे होता असे त्याला सिद्ध करता येईल.रेयांश प्रजापति शुक्रवारी रात्रभर बोटीवर असतो त्यामुळे त्यानेच पुंड ला आधी ठोसा मारून पाडले आणि उंबऱ्यावर डोके आपटून पुंड मेला असे सिद्ध होईल. ”
“ बोटीवर अशी कोणती जड वस्तू होती जी खुनी व्यक्तीने पुंड ला मारली असावी?”न्यायाधीशांनी विचारले.
“ लोखंडी सळई किंवा गज.” पाणिनीम्हणाला. “ बोटीवर चूल पेटवताना जळकी लाकडे आत-बाहेर हलवण्यासाठी ती चुली जवळ ठेवली होती.”
“ तुला काय माहिती ते?” खांडेकरनी विचारले.
“ मी आणि सौम्या काल रात्री बोटीवर गेलो होतो तेव्हा खुनी माणूस तिथे अंधारात अचानक आला तेव्हा सौम्या ने तीच सळई माझ्या हातात संरक्षणासाठी म्हणून सरकवली होती ! ” पाणिनीने गौप्य स्फोट केला.
“ एवढ्या जड गजाने प्रहार केला असेल तर खुनी व्यक्ती ताकदवान असायची गरज नाही ? म्हणजे एखादी अशक्त व्यक्ती किंवा स्त्री सुद्धा त्या गजाने प्रहार करून पुंडचे डोके फोडू शकते?” न्यायाधीशांनी विचारले.
“ बरोबर आहे तुमचे म्हणणे पण त्या नंतर पुंड चे अवजड शरीर स्थिती -२ वरून स्थिती-१ पर्यंत म्हणजे केबिन च्या उंबऱ्या पर्यंत आणणे हे ताकद वान गड्याचे काम आहे. स्त्री चे नाही. ”पाणिनी म्हणाला.
“ पटवर्धन तुम्ही बोटीवर गेला होतात तिथे खुनी का आला असावा आणि त्याने टाईम बॉम्ब ने बोट का उडवून दिली असावी?” न्या.नारवेकरनी विचारलं.
“ तिथे राहिलेला एकमेव पुरावा , खुना चे हत्यार , म्हणजे ती सळई किंवा गज नेण्यासाठी तो आला असावा आणि ते मिळाले नाही तर बोटच उडवून देऊन पुरावा पोलिसांना मिळणार नाही या तयारीने तो आला होता. शेवटी त्याने तसेच केले. मी आणि सौम्या,चित्रांगद पागनीस च्या केबिन मधे परत आलो तेव्हा मला पोलीस स्टेशन वर न्यायला जो पोलीस आला होता त्याने माझं ऐकल असतं आणि किनारपट्टी कडकपणे तपासली असती आणि किनाऱ्यावरून जाणाऱ्या सर्व गाड्या तपासल्या असत्या तर आज हा खुनी पकडला जाऊन कोर्टात हजर करता आला असता. परंतू त्याला जास्त रस मला पकडण्यात होता.” पाणिनी म्हणाला.
“ फार तर्कशास्त्रीय दृष्ट्या अचूक निदान केलत मिस्टर पाणिनी पटवर्धन.” न्यायाधीश खुष होऊन म्हणाले. “ तुमच्या अंदाजाने कोण आहे खुनी?”
“ तो पुंड चा भागीदार होता , त्याला मिसेस दिव्व्या ने रेयांश प्रजापति चा भूतकाळ सांगितला होता आणि ज्या आधारे त्या दोघांनी रेयांशला ब्लॅक मेल करून जमीन व्यवहारात पैसे उकळले, जो पूर्वी त्या बोटीवर आला होता , ज्याला भरती ओहोटी आणि त्याचा बोटीवर होणाऱ्या परिणामांची चांगली जाण आहे तोच खुनी आहे. ”पाणिनी म्हणाला.
“ कोण आहे तो? ” खांडेकर आणि नारवेकर एकच वेळी उद्गारले.!
“सम्यक गर्ग शिवाय दुसरा कोणीच असू शकत नाही. त्याला संधी आणि कारण दोन्ही होत.” पाणिनी म्हणाला. “ दाखवायला कुक्कुट पालनाचा धंदा, पण खरा धंदा, भविष्यात धरण क्षेत्रात जाणारी जागा मुद्दाम कुक्कुट पालनासाठी खरेदी करायची आणि ती, सरकार धरण क्षेत्र म्हणून ताब्यात घेईल तेव्हा मोठया रकमेला विकायची.या धंद्यात तो पुंड चा भागीदार होता.कशावरून तरी त्यांच्यात पैशावरून दुरावा निर्माण झाला.आणि त्याने पुंड ला मारलं.
“ केवळ तर्क आणि अंदाज ! ” खांडेकरम्हणाले. “ या संदर्भातला एकाही पुरावा पटवर्धन कडे नाही.”
“ पटवर्धनच्या अशिलाला सोडायला तुम्हीच सांगितलंय, त्याच्या विरोधात काहीच सिद्ध न झाल्यामुळे.” न्यायाधीश म्हणाले. “ पटवर्धनने अत्ता सांगितलेली प्रत्येक गोष्ट तर्काच्या कसोटीवर बरोबर आहे. परिस्थितीजन्य पुराव्यात चपखल बसणारी आहे.पटवर्धनने सांगितलेल्या माहिती वरून सम्यक गर्गला अटक करायची आणि पुरावे गोळा करून खटला चालवायचा ही जबाबदारी तुमची आणि पोलिसांची आहे;पटवर्धन ची नाही. तुम्ही तुमची जबाबदारी पार पडणार आहात का हे मला बघायचंय. ” न्यायाधीशांनी खडसावले.खांडेकर काहीतरी बोलणार होते पण तेवढ्यात त्यांना इन्स्पे.तारकर तिरासारखा उठून कोर्टातून बाहेर पडताना दिसला.
सम्यक गर्ग ला तातडीने अटक करायची खांडेकर नी दिलेली आज्ञा ऐकायला ही तो थांबला नाही.
(प्रकरण १८ आणि संपूर्ण कादंबरी
समाप्त)