पुनर्विवाह - भाग ६ Shalaka Bhojane द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

पुनर्विवाह - भाग ६

भाग ६
स्वाती अश्विनी ला म्हणाली उद्या जरा मला तुझ्याशी बोलायचे आहे, ऑफिस सुटल्यावर वेळ काढशील का
अश्विनी, " हो ठिक आहे.
स्वाती ने सावंत काकूंच पण मत ऐकायच ठरवले. संध्याकाळी जेव्हा ती सुदेशला घ्यायला सावंत काकूंच्या घरी गेली. तेव्हा तीने त्यांना नितीन चे म्हणणे सागितले. त्यावर त्या म्हणाल्या की, स्वाती तो तुझा भाऊ आहे. त्याला तुझी काळजी वाटणे सहाजिकच आहे. तो तुझा
भाऊ आहे त्याला तुझी काळजी वाटणे सहाजिकच आहे. मला तरी त्याचं म्हणणं बरोबर च वाटतयं. अख्खं आयुष्य पडलं आहे तुझ्यापुढे. आर्थिक दृष्ट्या पण आधाराची गरज लागतेच गं बाई. तु खूप नशिबवान आहेस जो तुला असा भाऊ आणि दिर भेटला आहे. जे तुझा विचार करत आहे. मला तरी त्याचं म्हणणं पटतंय.
स्वाती सावंत काकूंना म्हणाली, पण लोक काय म्हणतील काकू. त्यावर सावंत काकू म्हणाल्या, " अगं, लोकं फक्त नावं ठेवायला असतात. तु उद्या उपाशी राहिली तर कोणी तुझं घरं चालवायला येणार नाही. मला वाटतं तु हे लग्न करावसं.
स्वाती, " ठिक आहे. "
स्वाती सुदेशला घेऊन घरी आली. रोजची कामे पटापट आवरू लागली. सुदेश तिला शाळेत झालेल्या गमतीजमती सांगत होता. स्वाती पण खूप आनंदाने त्या ऐकत होती. आता ते दोघेच तर होते एकमेकांना. उद्या अश्विनी शी बोलल्यावर काय ते ती ठरवणार होती. दुसऱ्या दिवशी सगळे आवरून सुदेशला शाळेत सोडून स्वाती कामावर आली. कामावर तिचा हात बसला होता. रोजची कामे ती पटापट आवरू लागली. संध्याकाळी त्या दोघीही निघाल्या आणि ऑफिस जवळ च्या एका हॉटेल मध्ये गेल्या. हॉटेल मध्ये तशी फारशी गर्दी नव्हती. हॉटेल तसे मोठेच होते. दोघी कोपऱ्यातल्या एका टेबलावर बसल्या. कॉफी आणि वडा सांबार ची ऑर्डर दिली. स्वाती ने बोलायला सुरूवात केली. रविवारी नितीन दादा आणि विजय आले होते. ते मला परत लग्न कर म्हणून बोलत होते. नितीन आणि विजय चे म्हणणे स्वाती ने थोडक्यात सांगितले.
अश्विनी ते ऐकून स्वाती ला म्हणाली, " स्वाती मला पण त्यांचं म्हणणं बरोबर वाटत आहे. तू अशी किती दिवस राहणार आयुष्य जर तुला दुसरी संधी देत असेल तर मग ती संधी तू घ्यायला हवी स असे मला वाटते. बायको मेली की पुरुष दुसरं लग्न करतातच ना. सगळ्यांना अशी संधी नाही मिळत. तू नशीबवान आहेस तुझ्या घरचे तुझा इतका विचार करत आहेत.
स्वाती, " अगं पण लोकांच काय ❓ .
अश्विनी, " अगं, लोकांच काय घेऊन बसलीस स्वाती. तू तूझा विचार कर. सुदेशच पण मत जाणून घेण्याचा प्रयत्न कर. "
स्वाती, "ठिक आहे. मी सुदेश चे पण मत जाणून घेण्याचा प्रयत्न करते. "
अश्विनी चा निरोप घेऊन स्वाती निघते. सुदेश ला घेऊन ती घरी येते. येताना ती सुदेश च्या आवडीचा पिझ्झा घेऊन आली होती.
म्हणून जेवणाची तिची गडबड नव्हती. बाकी ची तिची कामे आवरून ती सुदेश जवळ येऊन बसली. सुदेश टिव्ही बघत बघत पिझ्झा खात होता. स्वाती सुदेश च्या डोक्यावर मायेने हात फिरवते. आई तू लग्न करणार आहेस का.? सुदेश चा तो प्रश्न ऐकून स्वाती त्याच्या कडे बघतच राहीली. मला नवीन बाबा मिळणार. ते माझे खूप लाड करतील ना? आपण परत पहिल्या सारखे राहू. ते आपल्याला फिरायला नेतील का?
बाबा होते तेव्हा आपण किती दा फिरायला जायचो. बाबा गेल्यापासून आपण फिरायलाच गेलो नाही. सुदेश चे बोलणे ऐकून स्वाती च्या पण मनात आले की, अरे खरचं आपण कुठे च गेलो नाही या दोन वर्षांत. काय निर्णय घ्यावा तिला कळत नव्हतं. अजय चा आत्मा हे सगळं पाहत होता. सुदेश चे प्रश्न ऐकून त्याला वाईट वाटत होते. आपल्या एका चुकीमुळे आपल्या बरोबर दोघांच्या पण आयुष्याची वाट लागली. त्याचा आत्मा तिथेच घुटमळत होता. रडण्या पलीकडे तो आता काही च करू शकत नव्हता.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी स्वाती ला नितीन चा फोन आला.
नितीन, " हॅलो स्वाती, कशी आहेस? सुदेश कसा आहे?
स्वाती, " आम्ही दोघेही छान आहोत. तु कसा आहेस. दादा?
नितीन, " मी पण छान आहे स्वाती. मग तू काय ठरवलं आहे सं?
स्वाती, " काय करु काही कळत नाही दादा?
नितीन, " माझा एक मित्र आहे ? रोहन नाव आहे त्याचं.
त्याची बायको प्रेग्नन्सी मध्ये ऑफ झाली. मला वाटतं तू एकदा त्याला आणि त्याच्या आईला भेटून घ्यावं मग तू तुझा डिसीजन घे. "
स्वाती, " ठिक आहे दादा. "
नितीन, " मग आपण पुढच्या रविवारी रोहन च्या घरी जाऊ चालेल ना?
स्वाती, " ठिक आहे दादा. पण सावंत काकू आणि अश्विनी पण येईल माझ्या बरोबर.
नितीन, " ठिक आहे."
असे म्हणून नितीन फोन ठेवतो. स्वाती पण विचारात पडते आपण करतो आहोत ते योग्य आहे का ?
स्वाती ने सावंत काकू आणि अश्विनी ला पण तिच्याबरोबर यायला सांगितले. कारण अजय गेल्यानंतर त्या दोघीही तिच्या मागे ठामपणे उभ्या राहिल्या होत्या. त्यामुळे त्यांचा सल्ला तिला मोलाचा वाटत होता. पुढच्या रविवारी सगळे रोहन च्या घरी जाणार होते.

पुढच्या भागात बघूया आता रोहन च्या घरी गेल्यावर काय होते.?