पुनर्विवाह - भाग ४ Shalaka Bhojane द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

पुनर्विवाह - भाग ४

स्वाती ने ही गोष्ट अश्विनी घ्या कानावर घातली. अश्विनी ने स्वाती ला सल्ला दिला कि,तिने एक छोटेसे मंगळसूत्र तरी घाल, नाहीतर हे लोक तुला कावळ्या सारखे टोचे मारत राहतील. पण ...... स्वाती एकट्या बाईला जगणं फार कठीण आहे . हयाचं आपण काय तरी करूच पण बाहेरच्या जगात तुला अशी भरपूर लोक भेटतील म्हणून सांगते छोटं मंगळसूत्र तरी घाल.दोन चार दिवस मध्ये गेले असतील. तिच्या ऑफिस मधला तो कलिग माने तिच्या जवळ येताना दिसला. तसे तिने व्हॉईस रेकॉर्डर चालू केला. अश्विनी ने पण त्याला स्वाती जवळ जाताना बघितले. अश्विनी ‌तिच्या पाठी मागच्या टेबल वरच बसली होती तिने पण आपल्या मोबाईल चे विडिओ रेकॉर्डर चालू केले.
माने," हॅलो स्वाती ,कशी आहेस?"
स्वाती," मला तुमच्या शी बोलायला ‌आवडत नाही ‌प्लीज जा तुम्ही इथून."
माने," मी कुठे बोललो माझ्याशी बोल म्हणून. एकदा माझ्या बरोबर फिरायला चल. मग बघ तुला कसे बोलते करतो ते. अगं नवऱ्याशिवाय कशी ‌राहशील तू?कोणाच्या तरी आधाराची गरज लागेल च ना तुला.‌मी आहे ना तुला आधार द्यायला. एकदा जवळ येऊन तर बघ. परत परत येशील."
स्वाती," शी ,तुम्हाला लाज कशी वाटत नाही माझ्याशी असे बोलताना."
माने," त्यात कसली लाज .जे आहे ते प्रॅक्टिकल आहे. तुला पण आता जोडीदाराची गरज लागेलच ना. अशी किती दिवस राहणार तू.मी आहे ना . मला कधीपण कॉल करु‌ शकतेस.‌कोणाला‌काही कळणार नाही.
स्वाती," तुम्ही. प्लीज जा इथुन माने. मला माझं काम करू दे. "
तो निघून गेला. अश्विनी तिला निघताना भेटली.
स्वाती," मला खूप भिती वाटते गं‌ ताई. "
अश्विनी,"घाबरू नको स स्वाती. आपले बॉस खूप चांगले आहेत. आपण त्यांना सगळे सांगू उद्या. चल टेन्शन नको घेऊन. उद्या भेटू.
सुदेश ला घ्यायला ती सावंत काकूंच्या घरी गेली. तीचा उतरलेला चेहरा बघून सावंत काकूंनी तिला विचारले,काय गं स्वाती तब्येत ठीक नाहीये का?
स्वाती ला मग आपले अश्रू लपवता आले नाही. ती त्यांना सगळे सांगत होती. त्यांनी तिला धीर दिला. अजय चा आत्मा घ्या जवळ च घुटमळत होता तो पण हे सगळे ऐकत होता. पण आता ऐकण्या पलिकडे तो काही च करू‌ शकत नव्हता.
कुठे ना कुठे मी ह्या सर्वांला जबाबदार आहे .
दुसऱ्या दिवशी स्वाती ऑफिस ला गेली आणि तिने बॉस च्या कानावर हे प्रकरण घातले. तिच्या कडे असलेली रेकॉर्डींग बॉसला ऐकवली. बॉस ने पण योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. महिना पण संपत आला होता . बॉस नी माने ला बोलावलं.
बॉस," माने , हे सगळं काय आहे. ?"
माने,"तुम्ही कशाबद्दल बोलत आहात सर."
बॉस," माने ,मी मिसेस सरदेसाई बद्दल बोलत आहे."
माने," सर तुम्हाला तर माहीतच आहे ती विधवा आहे. माझ्या मागे पडली आहे.
सारखी माझ्या मागे लागली आहे . मला कोणाचा आधार नाही. असं सारखं बोलते. पण मी अजिबात तीला दाद दिली नाही सर . मी तिला म्हणालो मी संसारी माणूस आहे."
बॉस , "हो का मिस्टर माने मग जरा हे ऐका."
बॉस ने मानेला स्वाती ने केलेली रेकॉर्डिंग ऐकवली.
बॉस," माने थोडी तरी लाज ठेवायची. त्या विधवा बाई ला का अस सतवल तुम्ही ,ती बिचारी आपल दुःख बाजूला ठेवून सावरायला बघते आहे . तिला आधारच द्यायचा आहे तर बहीण म्हणून पण तुम्ही आधार द्यायचा होता. तिच्या जागी तुमची बहीण असती तर . असो तुमची बदली मी दुसऱ्या ब्रांच ला केली आहे. "
माने," पण सर."
बॉस," तुम्ही येवू शकता माने. "
माने निघून गेले पण जाताजाता स्वाती ची माफी मागून गेले."
मानेची स्वाती च्या मागे असलेली कटकट गेली.
आज स्वाती ला अजय ची खूप आठवण येत होती. अजय असता तर ही वेळ च आली असती.अधुन मधुन नितिन आणि विजय स्वाती ला आणि सुदेश ला भेटून जात.
दोन वर्षांनंतर
स्वाती पण आता चांगलीच रुळली होती. सुदेश पण थोडा मोठा झाला होता. आज नितिन ने विजय ला भेटायला बोलावले होते. दोघे घाटकोपर स्टेशन ला भेटले. स्टेशन च्या जवळ असणाऱ्या हॉटेलमध्ये ते बसले.वेटर ऑर्डर घ्यायला आला त्याला कॉफी आणि सॅन्डविच ची ऑर्डर दिली.
नितिन," कसे आहात तुम्ही विजय झाला."
विजय,"मी मस्त आहे. तुझं असं चाललं आहे."
नितीन,"माझं सगळं मस्त चाललं आहे. मी या साठी तुम्हाला इथे बोलावलं आहे . मला थोडं स्वाती बद्दल बोलायचं होतं."
विजय," स्वाती च सगळं व्यवस्थित आहे ना?"
नितीन,"हो ,तिचे सगळं व्यवस्थित चालू आहे.‌तिच्याबद्दल च बोलायचं होतं. "
विजय," नितीन जे काय बोलायचं ते मोकळेपणाने बोल."
नितीन," अजय ल जावून आता दोन वर्ष झाली आहेत. अजय ची आठवण तिच्या मनातून कधीच जाणार नाही पण आता अस एकटीने ती किती दिवस राहणार. उभ आयुष्य तिने अस एकटीने काढावं अस मला वाटत नाही . आपण तिच्या पुनर्विवाहाचा विचार करावा अस मला वाटतं. तुमचे काय मत आहे यावर. "
विजय," मला पण हेच वाटत होत. तिने पुन्हा एकदा आपल आयुष्य नव्याने सुरू करावं अस मला वाटतं. तुझ्या नजरेत कोणी आहे का?"
नितीन,"हो, माझा एक मित्र आहे. त्याची वाइफ प्रेगनेन्सी मध्ये कॉम्पलीकेशन झाल्यामुळे वारली.मी त्यांच्याशी बोलून बघतो. त्याआधी मला स्वाती शी‌ बोलावं‌ लागेल.‌"
विजय,"तू स्वाती शी बोलून घे.‌ बघं तिचं काय मत आहे यावर आणि मला पण कळलं."
नितीन," मी काय म्हणत होतो, आपण दोघे मिळून बोललो तर बरं होईल.‌असे मला वाटते."
विजय," ठिक आहे, मग कधी बोलूया . "
नितीन," येत्या रविवारी संध्याकाळी ७वाजता स्वाती च्या घरी जमेल का तुम्हाला?"
विजय,"जमेल, निघू का? पुढच्या रविवारी भेटूया. ओके , बाय."
नितीन ," बाय."

स्वाती ‌लग्नाला तयार‌ होईल का ? बघुया पुढच्या भागात.
हा भाग तुम्हाला कसा वाटला . तुमच्या प्रतिक्रियेमधून नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया माझ्या साठी खूप महत्वाच्या आहेत.