पुनर्विवाह - भाग ५ Shalaka Bhojane द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पुनर्विवाह - भाग ५

स्वाती स्वयंपाक घरात काम करत होती. सुदेश स्वाती ला म्हणाला, "आई मामा आला आहे."सुदेश मामाला बघून खूप खुश होतो. स्वाती ला‌ पण खूप आनंद झाला.
नितीन," अगं , असचं आलो गं तुम्हाला भेटायला. हे घे सुदेश. "
नितीन सुदेश ला चॉकलेट देतो आणि त्याने त्याच्या साठी आणलेला खूप सारा खाऊ पण देतो. इतक्यात विजय झाला पण तिथे येतो.
स्वाती," अरे, विजय दादा तुम्ही पण आलात. आज सुदेश खूपच खूश होणार आहे. विजय दादा पण खूप खाऊ घेऊन येतात. मी तुम्हा दोघांसाठी काही तरी खायला करते. अगं स्वाती काही नको करुस. इतक्यात सुदेश चे मित्र त्याला बोलवायला येतात. सुदेश स्वाती ला विचारून खेळायला बाहेर जातो.
नितीन,"स्वाती तुझ्याशी जरा बोलायचे होते."
स्वाती, " बोल ना दादा. "
नितीन, " स्वाती मी आता जे बोलणार आहे ते कदाचित तुला आवडणार नाही. पण प्रॅक्टिकली विचार करून तू तूझा निर्णय घ्यावास असे मला वाटते. "
स्वाती, " काय झाले दादा. काय बोलतोय स तू नीट मला समजेल असं बोल. "
नितीन, " स्वाती मला असे वाटते की, तु लग्नाचा विचार करावास."
स्वाती, " दादा, काय बोलतो आहेस तू? "
विजय," स्वाती , नितीन बरोबरच बोलतोय . मी त्याच्याशी सहमत आहे."
नितीन," स्वाती, अजय ल जावून आता दोन वर्ष झाली आहेत. पण आता काही तो परत येणार नाही आहे. तू अशी एकटी किती दिवस राहणार आहेस. तू पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करावं असे मला वाटते."
स्वाती ," मी माझ्या सुदेश ला सोडून कुठेही जाणार नाही आहे."
नितीन," स्वाती सुदेश सह जो तुला स्वीकारेल अशाच व्यक्तीशी तुझं लग्न लावू. माझा एक मित्र आहे . त्याची बायको प्रेगनेन्सी मध्ये कॉमप्लिकेशन झाल्यामुळे वारली.
विजय," स्वाती, नितीन म्हणतो ते बरोबर आहे . अजय काही आता परत येणार नाही आहे. तुझ्यापुढे उभे आयुष्य पडलं आहे. " विजय दादा पण स्वातीला समजावतात.
स्वाती ," पण दादा, मी सगळे मॅनेज करते आहे. मी समर्थ आहे एकटी जगायला."
विजय," हो, तू नक्कीच समर्थ आहेस एकटी जगायला. पण आयुष्याला पुन्हा एक संधी देऊन बघ. सगळे जण आपापल्या लाईफ मध्ये बिझी असतात. तुझी नेहमीच मला काळजी वाटते."
स्वाती," दादा,मला थोडा वेळ हवा आहे विचार करायला.इतक्या लगेच मी हा डिसीजन नाही घेऊ शकत. सुदेश शी पण एकदा बोलावे लागेल."
नितीन," ठिक आहे , तू तूझ्या वेळ घे. मी ५-६ दिवसांनी तुला कॉल करतो. येऊ मी. "
स्वाती," अरे दादा, जेऊन जा ना मी पटकन बनवते जेवण."
नितीन," नको अगं स्वाती उशीर होईल परत चल येतो मी विचार करत बोलण्याचा. "
नितीन आणि विजय एकत्र च जायला निघतात. सुदेश च्या डोक्यावर हात फिरवून ते दोघे जायला निघतात.‌

•••••••••••••••••••
नितीन त्याच्या मित्राला रोहन ला भेटायला त्याच्या घरी जातो. नितीन त्याच्या घराची बेल वाजवतो. " अरे नितीन खूप दिवसांनी आलास. ये ये. " रोहन ची आई‌ सीमाताई नितीन ला म्हणाल्या .
नितीन आत येतो आणि सोफ्यावर बसतो.
सीमा ताई,"असा आहेस तू?"
नितीन ," मी बरा आहे. तुम्ही कश्या आहात? रोहन कसा आहे? आणि आहे कुठे तो."
सीमाताई," मी बरी आहे . रोहन पण ठिक आहे. त्यांचे काहीतरी काम होते म्हणून बाहेर गेला आहे. येईल अर्ध्या तासात. थांब मी तुझ्यासाठी चहा बनवून आणते. "
नितीन ," आता नको, रोहन आला की मग घेईन. "
सीमाताई,"ठिक आहे.‌खरं सांगू का नितीन, काही उत्साहच राहिला नाही रे. रोहन तर पार कोमेजून गेला आहे दिशा गेल्यापासून. फक्त जगायचं म्हणून जगतो आहे . हसणे च विसरला आहे तो. मी मरायच्या आधी त्याचं लग्न झालं असतं तर बरं झालं असतं. दोन चार मुली बघितल्या होत्या. पण त्यांच्या खूप अटी होत्या. "
नितीन ," काकू , मी खरं तर त्याचसाठी आलो होतो. माझी सख्खी बहिण आहे. स्वाती . तिचे मिस्टर दोन वर्षांपूर्वी बाईक ॲक्सिडेंट मध्ये वारले. तिला एक मुलगा आहे सात वर्षांचा.रोहनसाठी तिचे स्थळ मी घेऊन आलो होतो. दोघेपण समदुःखी आहे त . दोघांची पण आयुष्ये मार्गी लागतील.असं मला वाटते. सीमाताई ," तु रोहन शी बोलून बघ तो काय म्हणतो? "
इतक्यात रोहन येतो. नितीन आणि रोहन कॉम्प्युटर क्लास मध्ये एकत्र होते तेव्हापासून चे मित्र होते.
रोहन," अरे नितीन कसा आहेस?"
नितीन," मी छान आहे . तु कसा आहेस. "
रोहन,"मी पण ठिक आहे. "
सीमाताई," मी तुमच्या साठी चहा बनवून आणते. तुम्ही दोघे गप्पा मारत बसा.
असे म्हणून सीमाताई आत जातात. आता हॉलमध्ये ते दोघेच असतात. नितिन रोहन शी स्पष्ट च बोलतो.
नितीन ," खरं तरं मी एका कामासाठी आलो होतो. "
रोहन," काय काम आहे?"
नितीन," रोहन तुला तर माहीत आहे ना माझी बहिण स्वाती .‌तिचे मिस्टर दोन वर्षांपूर्वी वारले . एक ७ वर्षांचा मुलगा आहे तीला."
रोहन," हो रे झालं होतं मी. खूप वाईट झाले रे. "
नितीन," अरे रोहन, तु मागे लग्नासाठी मुलगी बघत होतास ना . म्हणून मी स्वाती चे स्थळ घेऊन आलो होतो. "
रोहन, " अरे नितीन, हे काय बोलतो आहेस. ? "
नितीन, " स्वाती च्या मुलाचा सांभाळ मी करेन. "
रोहन, " पण स्वाती आपल्या मुलाला सोडून नाही राहू शकणार. तिने त्याला सोडू पण नये. असे मला वाटते.
नितीन, "रोहन, तू नीट विचार कर. इतकी वर्षे तू एकट्याने काढलीस.ह्या विवाहामुळे तुम्हा दोघांची आयुष्ये मार्गी लागतील. स्वाती साठी मी तुझा विचार केला कारण तुझ्या बरोबर ती सुखी राहिल याची मला खात्री आहे. "
रोहन, " नितीन आई मागे लागली म्हणून मी दोन तीन मुली बघितल्या दिशा गेल्यावर. पण त्यांच्या अटी एक लग्न करायचे नाही असे ठरवले होते. पण एकट्याने आयुष्य काढणे खूप कठीण आहे रे. मला वाटते तु आधी स्वाती शी बोलून घ्यावे. ती तयार झाली तर मला तिला भेटावे लागेल. पण माझी एक अट आहे. मी तिला असे च नाही स्वीकारणार तयार तिच्या मुला सह स्विकारेन. तिचे तरी मन लागेल का रे या संसारात जर तिच्या मुलाला तिच्या पासून दूर केले तर. "
इतक्यात रोहनची आई तीथे येते. रोहन आईला नितीन च्या लग्नाच्या प्रस्तावा बाबत सांगतो. रोहनची आई म्हणते की, तुझा निर्णय तो माझा निर्णय.
रोहन, " मला वाटतं स्वाती चा निर्णय झाला की, आपण या विषयावर बोलू. आधीच त्या मुलाच्या नशिबात बापाचे प्रेम नाही. आई पण त्याच्या पासुन लांब गेली तर तो कोलमडून जाईल.
कुटुंब किती महत्त्वाचे आहे हे आता आता मला खूप जाणवते. एकटे पडल्या सारखे वाटते.
नितीन, " ठिक आहे स्वाती चा निर्णय झाला की, मी तुला फोन करतो. आता मी निघतो. "
रोहन च्या घरून निघाल्यावर नितीन विजय ला फोन करतो.
नितीन, " हेलो विजय दादा रोहन लग्नासाठी तयार होईल असे मला वाटते. नितीन विजय ला सांगतो. आता दोघे स्वाती च्या निर्णयाची वाट बघतात.

बघुया पुढील भागात.