Punha Vivah - 2 books and stories free download online pdf in Marathi

पुनर्विवाह - भाग २

भाग २
साव़ंत काकू स्वाती च्या चेहऱ्यावर पाणी मारून तिला उठवायचा प्रयत्न करु लागल्या , थोड्यावेळाने स्वाती शुद्धीवर आली. त्या तिला म्हणाल्या ," स्वाती प्रसंग कठीण आहे पण आता हिम्मत हरून कसे चालेल ." स्वाती सतत रडत होती तिला रडताना बघून त्यांचा पाच वर्षांचा मुलगा सूदेश पण रडायला लागला. त्याला तिने आपल्या छातीशी घट्ट कवटाळून धरले. सावंत काकीना ती म्हणाली , " काकी तो आपला अजय तर नसेल ना."
सावंत काकी, " नसेल असे काही. "
अजय चा भाऊ विजय आणि त्याची बायको सरीता पण तिथे आली." साहेब मी विजय आहे अजय चा भाऊ काय झालं आहे" ."रात्री हायवे वर एक बाईक ॲक्सिडेंट झाला आहे . बाईकस्वार जागेवर च मेला . त्याच्या खिश्यात हे आधार कार्ड मिळाले त्यावर इथला पत्ता होता . तुम्हाला बॉडी आयडेंटिफाय
करायला राजावाडी हॉस्पिटलमध्ये यावे लागेल."हवालदार विजय ला म्हणाला.
"स्वाती हे बघ सावर स्वःताला .मी जाऊन येतो हॉस्पिटलमध्ये ." विजय म्हणाला.
स्वाती," दादा मी पण येते तूमच्या बरोबर . "
विजय," ठिक आहे स्वाती. "
स्वाती आणि विजय दोघेही बॉडी आयडेंटिफाय करण्यासाठी निघाले. सरीता म्हणाली मी सुदेश बरोबर थांबते. त्याच्या बरोबर राहणे गरजेचे होते. कारण आपल्या आईला असं रडताना बघून तो पण कावरा बावरा झाला होता. आईला जाताना बघून तो फार रडू लागला. पण स्वाती ने त्याला कसेबसे समजावून सांगितले. ती आणि विजय दोघे जायला निघाले. तसे त्यांच्या शेजारचे सावंत काका आणि काकी पण त्यांच्या बरोबर निघाले.
अजय च्या बॉडी चे पोस्टमॉर्टेम चालू होते. अजय चा आत्मा हे सर्व पाहत होता. पोस्टमॉर्टेम झाल्यावर बॉडीला मॉर्ग मध्ये ठेवण्यात आले होते. अजय चा आत्मा आपल्या बॉडी बरोबर तिथे पोहोचला. तिथे त्याला एक आजोबा दिसले. आजोबांनी पण त्याच्या कडे बघितले. त्याला आश्चर्य वाटले की, आजोबांना मी दिसतो आहे. तो त्या आजोबांन जवळ गेला.
अजय, "आजोबा तुम्ही मला बघु शकता?
आजोबा, " हो बेटा, मी तुला बघू शकतो. कारण मी पण तुझ्या सारखा एक आत्मा च आहे. तुझा मृत्यू कसा झाला?
अजय, " बाईक ॲक्सिडेंट मध्ये झाला. काल रात्री मी पार्टी ला गेलो होतो. तिथून परत येताना झाल. "
आजोबा, " माझी मुलगी येईपर्यंत माझी बॉडी इथे ठेवली आहे. "
अजय, "माझ्या घरी कळले आहे की, नाही काही माहिती नाही. " अजय रडायला लागतो.
आजोबा त्याला धीर देण्याचा प्रयत्न करतात. पण तो खूप रडत असतो.
अजय, " माझं चुकल मी असं रात्री अपरात्री पार्टी ला जायला नको होते. स्वाती माझी बायको मला नेहमी हेल्मेट घाल म्हणून सांगायची पण मी नेहमी तिला नाही बोलायचे. " अजय खूप रडत होता.
इतक्या त दरवाजा उघडला आणि स्वाती आणि विजय आत आले एक पोलीस कर्मचारी पण होता बरोबर. स्वाती चे डोळे रडुन रडून सुजले होते. भावा चा चेहरा चिंताग्रस्त दिसत होता. त्याला आतून खूप रडायला येत होते पण पुरुष च तो कुठल्याही परिस्थितीत त्याला खंबीर च रहायचे होते. डोळ्यात येऊ पाहणार पाणी तो मोठ्या मुश्किलीने परतवत चेहरा आणि आवाज शक्य होईल तितका नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करत होता. पोलीस कर्मचाऱ्यांच्या मागून गुपचूप चालत होता. आता ते मुडदा घरात आले होते. विलक्षण गारवा होता तिथे.
तिथल्या कर्मचाऱ्याने अजय ची बॉडी असलेले ड्राॅवर उघडले. विजय ने ती बॉडी बघितली. स्वाती ने पण ती बॉडी बघितली. अजय ला असे बघताच तिच्या हातापायातील त्राण च गेले. ती तिथेच धाय मोकलून रडू लागली. विजयचा पण आतापर्यंत थोपवून धरलेला अश्रूंचा बांध फुटला. सावंत काकांनी विजय ला सावरले. सावंत काकीनी स्वाती ला सावरले. अजय चा आत्मा पण हे सर्व बघत होता. तो पण रडत होता . विजय सगळ्या फाॅर्मॅलिटीज पुर्ण करत होता. फाॅर्मॅलिटीज पुर्ण व्हायला वेळ लागणार होता. सावंत काकू स्वाती ला घेऊन घरी गेल्या.
अजय ला आता खूप रडायला येत होत.
आजोबा ,"त्याला म्हणाले आता रडून काही पहिल्या सारखे होणार नाही बाळा. आयुष्य किती मोलाचे आहे ते जीवन संपल्यावर च जाणवत.
विजय ने फाॅर्मॅलिटीज पुर्ण करून अजय ची बॉडी ताब्यात घेतली. अजय आजोबांचा निरोप घेऊन निघाला.
अजय च्या अशा अचानक जाण्यामुळे तो राहत असलेला परिसरात सर्वजण हळहळत होते. बॉडी घरी आली. छोट्या सुदेश ला तर काही समजेचना आपला बाबा असा का झोपला आहे. आपल्या आईला रडताना बघून तो पण रडू लागला. स्वाती चे आई वडील भाऊ आणि वहिनी पण आले होते. स्वाती ला धीर देण्याचा प्रयत्न करत होते. आपल्या पोरीच्या नशीबी हे का आल हा विचार करून ते ही रडत होते. अजय ची अंतिम यात्रा निघाली. अजय चा आत्मा हे सगळे बघत होता. अजय चे अंतिम संस्कार झाले.
दुसऱ्या दिवसा पासुन सगळी लोक हाक मारायला येऊ लागले. पण स्वाती ची दुनिया च उध्वस्त झाली होती. आठ दहा दिवसानंतर ती थोडीशी सावरली. आता तिला भविष्याची चिंता सतावू लागली. घरात कमावणारा अजय च होता. आता तिला नोकरी च बघायला हवं होतं. ती शिकलेली होती पण नोकरी चा तिला अनुभव नव्हता. जमेची बाजू फक्त एवढी होती की, घर स्वत चे होते.
तिने तिच्या भावाला आणि दिराला तिच्या साठी नोकरी बघण्याचे सांगितले. तिचा भाऊ म्हणाला की, तु नोकरी चे टेन्शन घेऊ नकोस मी आहे ना मी बघेन तुला.
किती दिवस बघणार तु दादा मला.? आता मला खंबीर बनावच लागेल.

स्वाती ला नोकरी मिळेल का? बघुया पुढच्या भागात.
हा भाग तुम्हाला कसा वाटला? हे तुमच्या प्रतिक्रियेतून नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.
ला


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED