पुनर्विवाह - भाग ३ Shalaka Bhojane द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पुनर्विवाह - भाग ३

स्वाती ला आता खंबीर बनणे गरजेचे होते. अजय ला जाऊन बारा ‌दिवस झाले होते. आज त्याचे बारावे होते. स्वाती ‌ला‌ खूप एकटे वाटत होते ‌. सगळेजण तिच्या दुःखा च्या प्रसंगात तिच्या सोबत होते तरीसुद्धा ती एकटीच होती. कारण जोडीदारा ची साथ ही वेगळी च असते.आपलं सारं दुःख तिला आता मनाच्या तळाशी गाडून टाकायचे होते. आठवणी आयुष्य भर येणारचं होत्या.‌पण छोट्या सुदेश साठी तिला आता खंबीर बनावच लागणार होतं.तिचं जाॅब करण्याचा निर्णय तिच्या भावाला फारसं आवडले नव्हते. तिच्या दिराला पण आवडले नव्हते. ते दोघे मिळून दर महिन्याला एक ठराविक रक्कम तिला देणार होते. पण तिने त्या दोघांना ही समजावलं की, तुम्हा दोघांना ही तुमचे संसार आहेत. माझं दुःख हे आयुष्यभराच आहे. सुदेश च्या भविष्या साठी मला जॉब करणे योग्य वाटतं.

"ठिक आहे. मी तुझ्या साठी जॉब बघतो," दादा म्हणाला. अजय चा आत्मा आज मुक्त व्हायला हवा होता. पण कदाचित त्याचे भोग अजून संपले नसावेत.अजय घ्या एका चुकीमुळे दोन जीवांची फरफट चालू होती. चार पाच दिवसांनी स्वाती च्या भावाने तिच्या साठी एक जॉब शोधला. पण तो पुढच्या महिन्यापासून चालू होणार होता. चालू महिन्यात साठी लागणारे सामान तिच्या भावाने भरले होते आणि हातखर्चाला तिच्या दिलाने पैसे दिले.दोघे ही खूप चांगले होते. बघता बघता पुढचा महिना आला. स्वाती ला‌ ऑफिस जॉईन करण्याचा दिवस उजाडला.सुदेशला तीने नर्सरी मध्ये सोडलं.सुदैवाने सुदेशची टिचभर पण त्यांच्याच एरीयात राहणारी होती. ती शाळा सुटल्यावर घरी जाताजाता सुरेशला सावंत काकूंकडे सोडणार होती.सावंत काकूंनी स्वतः हून स्वाती येईपर्यंत सुदेश ला सांभाळण्याची जबाबदारी घेतली होती.सावंत काकूंना जेव्हा ती सुदेश साठी जेवणाचा डबा द्यायला गेली तेव्हा त्या तिला रागातच म्हणाल्या,"स्वाती काय हे ? सुदेश काय आम्हाला परका आहे का?

स्वाती,"काकू असं नाही पण आता तो नेहमी च येणार आहे तुमच्याकडे. मला खरं तर खूप वाईट वाटतयं त्याला असं सोडून जाताना पण माझा नाईलाज आहे.." स्वाती च्या डोळ्यात पाणी तरळले .

सावंत काकू," स्वाती नको काळजी करून.मी आहे ना. जा तू आज पहिलाच दिवस आहे ना उशीर होईल नाहीतर.

स्वाती कामाला निघाली, कामाचा तिला काहीच ऐक्सपिरियन्स नव्हता म्हणून तिला थोडं टेन्शन आले होते. तिच्या भावाने तिला कामाची थोडीफार माहिती दिली होती. ऑफिस मध्ये ती आली आणि बॉस ला जाऊन भेटली.

स्वाती, "नमस्कार सर , मी स्वाती सरदेसाई."
बॉस,"हो,या या बसा. नितीन (स्वाती चा भाऊ) शी माझं बोलणं झालं आहे. खूप वाईट वाटलं तुमच्या मिस्टरां बद्दल ऐकून.
बॉसने एक कॉल केला. बॉस ," अश्विनी आत ये."
अश्विनी लगेचच आली.
बॉस," अश्विनी , या स्वाती सरदेसाई आहेत. आजपासून या आपल्या ऑफिस मध्ये जॉईन करणार आहे. तिला काय शिकवायची जबाबदारी तुझी आहे.‌
अश्विनी,"ठिक आहे सर.
बाॅस," तुम्ही अश्विनी बरोबर जा. ती तुम्हाला काय काम करायचे ते शिकवेल.अश्विनी मग तिला आपल्या बरोबर घेऊन गेली.‌काय काम करायचे ते अश्विनी तिला शिकवू लागली. अशाप्रकारे स्वाती चा पहिला दिवस गेला.

पाच दहा दिवसांत च ती तिचे काम शिकली. मन लावून काम करू लागली. स्वाती पण कामावर रुळू लागली. बघता बघता महिना कधी संपला कळलंच नाही. तिचा पहिला पगार झाला . तिने सावंत काकूंसाठी साडी घेतली. पेढ्यांचा पुडा घेतला.ती घरी आली . देवासमोर दिवा लावला पेढ्यांचा पुडा तिने देवासमोर ठेवले .देवाला नमस्कार केला.थोडेशे पेढे तिने अजय च्या फोटो समोर ठेवले. तिचे डोळे अश्रूंनी भरले. अजय ची आठवण तिला सतत यायची. तिने सावंत काकू ना साडी दिली.
स्वाती ," काकू माझ्या पहिल्या पगारातून घेतली आहे तुमच्यासाठी."
सावंत काकू ," अगं मला कशाला घेतलीस. तुझ्या साठी घ्यायची स ना.
स्वाती.माझ्यासाठी तुम्ही किती करता काकू. तुमच्या उपकारांची परतफेड मी कधीच करू शकत नाही.
सावंत काकू," अगं,असं काय बोलतेस स्वाती . मी तुझ्या काही उपयोगी पडले तर हे माझेच भाग्य समजेन मी. सोन्यासारखी पोर तू काय तुझ्या नशीबी आलं. तरीपण त्यातून तू सावरायला प्रयत्न करते आहेस. माझी थोडीशी तुला मदत झाली तर कुठे बिघडले.
स्वाती सुदेश ला घेऊन तिच्या घरी आली. सुदेश साठी पण तिने त्याचे आवडते चॉकलेट आणले होते . त्यांचे आवडते छोट्या भीम चे कार्टून ड्राईंग डबुअ आणले होते.तो पण हल्ली खुप शांत झाला होता. त्याचं बालपण चांगले जावे म्हणून ती जीवनाचं रान करत होती. सुदेश च्या बालमनाला पण किती प्रश्न पडायचे.पण आपण प्रश्न विचारल्यावर आईला रडू येते म्हणून त्याने तिला
प्रश्न विचारणे बंद केले.आधी आपली आईपण आपल्याला न्यायला यायची पण आता येत नाही. तिच्या बरोबर जाताना किती मजा यायची. पण आता सगळे गेल्यावर टिचर बरोबर जायला लागते. संध्याकाळी आई आल्यावर मला खूप बरे वाटते. बाबा गेला म्हणजे नक्की काय झालं ?तो असा का झोपला होता. मम्मा का रडत होती एवढी . सगळे बाबा ला कुठे घेऊन गेले? तेव्हापासून बाबा परत का आला नाही. ? बाबा गेल्यापासून सगळे कसं बदललं आहे. असे अनेक विचार आणि प्रश्न सुदेश च्या बालमनाला पडले होते.

स्वाती पण ऑफिस मध्ये चांगली रुळली होती. पण ऑफिस मधील‌ एक कलिग सारखा तिची वाट अडवत असे.त्यामुळे ती थोडिशी टेन्शन मध्ये आली होती. एकट्या दुकट्या बाईने आयुष्य काढणे किती कठिण आहे हे तिला आता जाणवत होते. अजय ची तिला आठवण येई. तो असता तर असं वागायची कुणाची हिंमत च झाली नसती. किती छान चालू होतं सगळं . कुणाची नजर लागली देव जाणे. कितीदा अजय ला बोलले होते रात्री च पार्टी ला जाऊ नकोस पण ऐकला नाही कधीच. अजय चा आत्मा हे सगळं बघत होता पण काही च करू शकत नव्हता.

काय करेल आता स्वाती ?कसा त्या माणसा पासून पिच्छा सोडवेल बघू पुढच्या भागात.
हा भाग कसा वाटला. तुमच्या प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाच्या आहेत.