मल्ल प्रेमयुद्ध - भाग 34 Bhagyashali Raut द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 34

मल्ल प्रेमयुद्ध


वीर क्रांतीबरोबर बोलून आत आला. आबा आणि आई बाहेर वीर ची वाट बघत सोफ्यावर बसले होते.खरं तर सुलोचनाबाई यांची धावपळ सुरू होती. तेजस्वी त्यांना मदत करत होती. फक्त एक बॅग खाण्यापिण्याचे भरली होती. हे सगळं बघून आईला विचारलं, "आई एवढं संपणार हाय का? कशाला उगच भरलीस? खराब होईल एवढं सगळं... मग सुलोचनाबाई ) म्हणाल्या, "तू एकटाच आहेस व्हय, रत्ना क्रांती हाय म्हंटल्यावर लागलं, जाताना पण प्रवासात लागलं की, एवढं असू देत काही फरक पडत नाय, नाश्ता पाण्याला सुद्धा लागल. सुलोचनाबाई प्रेमाने म्हणाला खरं तर त्याला आश्चर्य वाटल त्यांनी क्रांतीचं नाव घेतलं. आबासाहेब नुसतेच ऐकत होते. शेवटी न राहवून तेजश्री म्हणाली, "भाऊजी आता त्यांनी रात्रंदिवस जागून एवढ पदार्थ बनवल्यात मग तुम्ही नाय कशाला म्हणताय? असुद्यात सगळं व्यवस्थित भरलय. काई खराब व्हणार नाय तेजश्री बॅगमध्ये आणखीन डबे भरत म्हणाली. वीर वरती जायचे तयारीतच होता. तेवढ्यात आबांनी त्याला हाक मारली.

" वीर मला तुमच्याशी बोलायचं, वीर खाली आला.
"तुम्ही शेवटी निर्णय घेतलाच जायचा क्रांती बरोबर, हे बघा म्या तुमच्यासाठी ठरवलं होतं लगीन माझा इरोध फक्त एवढाच व्हता की त्यांनी खेळावं न्हाय, शेवटी आयुष्य तुमचं हाय तुम्ही ठरवा काय करायचं ते मी फक्त म्हणलं सांगितलं त्यांनी जर चांगल सांभाळल तर माझं म्हणणं कायच नाय शेवटी गावात येताना डोक्यावरचा पदर पडला नाय पाहिजे. आता तुम्ही ठरवा आणि आमाला सांगा. त्यांना डोक्यावर पदर घ्यायचं नसलं तर मी तुमच्या लग्नात उभा सुधा राहणार नाय..."

" आबा क्रांतीच म्हनन सुद्धा तेच व्हत, गावात तुमचं नाव खराब व्हणार नाय तिच्यामुळ, पण गावाबायर तीच आयुष्य ती जगल, तिथं आपण तिला इरोध नाय करू शकत त्यांचं स्वप्न पुर्ण होऊ देत आबा... जस तुमच्या माझ्याकडन अपेक्षा हायत तसंच तिच्या वडिलांच्या अपेक्षा तिच्याकडन हायत, आपण कोण मोडता घालणार, आज मी नाय तीझ्याशी लग्न केलं, तर दुसरा कोणीतरी करल, कदाचित माझ्यापेक्षा जास्त पाठिंबा देणारा असल, पण माझं मन तिच्यावर जडलंय मी नाय सोडू शकत आता, मी तुमच्यावर बिलकुल नाय रागावलो, तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर हाय, क्रांती क्रांतीच्या जागेवर बरोबर हाय मी माझ्या जागेवर बरोबर हाय पण तोडगा काढला पाहिजेत न आबा... मी शब्द देतो तुमास्नी क्रांती तुमच्या नावाला काळिमा फासनार असं कायच करणार नाय, कारण माझा इश्वास हाय तीझ्यावर , तिच्यावर संस्कार चांगलं झालं ती कधी चुकीचं नाय वागणार..."


वीरच्या शब्दांनी बरं वाटलं. आबांनी विषय बदलला.
" किती वाजता निघायचं सकाळी आणि कसं जाणार हाय? कुठे राहणारे ?आम्हाला काय बी सांगितलं नाय तुम्ही.
आबा म्हणाले.

वीर म्हणाला, "आबा मी रूम घेतली आणि क्रांती, रत्ना होस्टेलमध्ये राहणार हायत... फायटर पॉईंट अकॅडमी मुंबईमध्ये मालाडला हाय. लय नावाजलेली संस्था हाय त्याच्यातली बरीच मुलं इंटरनॅशनल लेवलला खेळलेत.

" उद्या कोण कोण येणार हायत? आबांनी विचारल.
"भूषण येणारे, बाकी ऋषी म्हणतोय मी येणार हाय म्हणून संग्राम दादाला मीच नको म्हणून सांगितलं. तिकडून संतु येणार हाय आणि आली तर बरोबर चिनू असलं."

"बरं झोपा जाऊन." आता खरंतर वीरला आबांशी बोलून बर वाटत होतं त्याचा डोकं शांत झालं होतं .तो गेला आणि शांत झोपला.



सकाळी सगळ्यांना नमस्कार करून वीर बाहेर पडला. पुढ भूषण बसला होता आणि त्याच्या बाजूलाच ऋषी बसला होता. सगळे त्याला सोडवायला बाहेर आले होते.स्वप्नाली आवरून बाहेर होती. तिने आत्याला सांगितलं वीरला सोडवायला जाते आत्या बराच वेळ नाही म्हणाल्या पण स्वप्नाली ऐकायला तयार नव्हती. वीरने सगळ्यांना डोळ्यांनी खुणावले आणि तिला म्हणाला, "बसा गाडीत." सगळे गाडीत बसले.

क्रांतीने सगळ्या बॅग्स बाहेर ठेवल्या.आशा तिला काळजीने सगळ्या गोष्टी समजावत होती. रत्ना सुद्धा सोबत होती. रत्नाचे वडील तिथे आले होते. रत्नाची त्यांना फार काळजी वाटत होती. संतू त्यांना आधार देत होता." दाजी असल्यावर काळजी करू नका." असेच सांगत होता. रत्नांनी क्रांती तयार होऊन सगळ्यांना नमस्कार करून वीरची वाट बघत होत्या. चिनू आवरून तयार होती. परत परत तेच सतत आरश्यात बघत होती. आणि स्वतःकडेच बघून ती गालातल्या गालात हसत होती. गाडीचा हॉर्न ऐकला सगळे गाडीतून उतरले आणि वीरने सगळ्यांना नमस्कार केला. रत्नाचे वडील म्हणाले, वीरराव तुम्ही तुमची रत्नाची आणि क्रांतीची काळजी घ्या. तुम्ही चांगलं खेळा आमच्या आशीर्वाद सतत तुमच्या बरोबर हायत."
" अण्णा तुम्ही काळजी करू नका, जरी मी लांब राहिलो असलो, तरी त्यांची काळजी मी घेत राहील स्वप्ना गाडीतून खाली उतरली नव्हती.

ऋषी गाडीतुन खाली उतरला. तिला डोळ्यांनी त्याने कॉम्प्लिमेंट दिली. वीर भूषण शेजारी जाऊन बसला. क्रांती स्वप्नाकड बघून हसायचं म्हणून बघून हसली. संतू,रत्‍ना, ऋषी चिनू मागे बसले. स्वप्नां नी क्रांती मध्ये बसल्या वीर पुढे जाऊन बसला. क्रांतीला कसं झालं पण आपल्यालाच वाईट वाटू नये म्हणून वीर पुढे बसायला गेला आहे हे तिच्या लक्षात आले.


भूषण वीरची चलबिचल समजत होती. त्याला क्रांती शेजारी बसायचं होतं हे त्याला समजलं होतं कारण त्याला सगळं माहीत होतं स्वप्नाविषयी... उगीच बोलायचं म्हणून भूषण बोलू लागला,

"पैलवान आम्हाला सोडून जाणार हाय गावात नाय म्हणून हाका मारायला नाय पण म्हणून विसरायचं नाय मी रोज सकाळ संध्याकाळ तुला दोन टाईम फोन करनार, वहिनी बरोबर असत्यात तुझ्या म्हणून मित्राला नाय विसरायचं बरं... वहिनी तुम्ही सुद्धा काळजी घ्या आबन आमच्या मित्राची सुधा काळजी घ्या. क्रांती हसली. तितकाच स्वप्नाला तिचा राग येत होता. एका शब्दानेही क्रांती सोबत बोलत नव्हती.

" भूषण लेका तुला विसरतो होय अन तु विसरू देशील बर मला, एक लक्षात ठेव मी तिथं नाय, दादा हाय पण तरीपण सकाळ-संध्याकाळ घरी जायचं आई-आबा कड लक्ष द्यायचं काय वाटलं तर फोन करायचा." काळजीने त्याला सगळं सांगत होता.

"व्हय हे तू मला सांगण्याची गरज नाय." इकडे संतू माग बसल्यामुळे ऋषीला चिनूबर बोलता येत व्हत न चिनुला ऋषी बोलता येत होतं. क्रांती चिनुकडे बघून सतत तिला पुढे येण्यासाठी खुणवत होती चिनुला काही समजत नव्हतं काय कराव? तिने संतुला सांगितलं. दोघांना एकत्र बसायचं होतं हे सगळ्यांनाच कळत होतं अगदी स्वप्नाला सुद्धा पण स्वप्नांनी मुद्दाम केलेले हे सुद्धा सगळ्यांना माहीत होत.

"दाजी चहा घ्यायला थांबून चहा नाश्ता करू आणि मग पुढ निघू." संतु म्हणाला.
वीर भूषणला म्हणाला.
" एखादं चांगलं हॉटेल दिसलं तर थांबून नाश्ता करू. आम्हाला सोडून तुम्हाला परत माघारी यायचय. त्यामुळ जास्त कुठ थांबायला नको पटपट खाऊ आणि निघू ."
भूषण ने थोडा वेळ पुढे गेल्यानंतर त्याला हॉटेल दिसले त्याने गाडी बाजूला घेतली. सगळे उतरले थोडीफार थंडी होती.

चहा नाश्ता झाला. संतुने भूषणला खुणावले. भूषणच्या लक्षात आल. तो वीरला म्हणाला, "वीर संतु आता गाडी चालवल आण मी माग बसतो. स्वप्नाला त्यांचं काय म्हणणं आहे हे समजलं. तिने दगडावरून पाय घसरण्याचा नाटक केल. आणि ओरडली वीर.... वीर तिच्याकडे धावला,ऋषी गेला, सगळे तिच्याकडे धावत गेले. खरं तर तीने नाटक केलं पण तिच्या पायाला दगड लागला पायातून रक्त यायला लागलं. वीरने खिशातून रुमाल काढला आणि तिच्या पायाला बांधला. स्वप्नाली उठायचा प्रयत्न करायला लागली पण तिला काही नीट उठता येत नव्हतं.
वीरने तिला आधार दिला कमरेतून हात घातला आणि तिला अलगद उचलल. तिला उचलले बघून क्रांतीला वाईट वाटलं. क्रांती शांतपणे जाऊन गाडीत बसली. संतू रत्ना पुढ बसले. वीर स्वप्नाली शेजारी बसला आणि वीर शेजारी क्रांती बसली.
वीर सतत तिच्या पायाकडे बघत होता.
"दुखतय का लय आपण दवाखान्यात जायचं का? त्याची काळजी होती. म्हणून तो विचारत होता. पण स्वप्नाली काहीतरी वेगळं समजून क्रांतीकडे कुचकट पण बघून हसत होती. उगाच दुखतंय म्हणून वीरचा हात दाबत होती.

" दुखतय तर खूप पण दवाखान्यात नको जायला तिथे वेळ गेला तर तुम्हाला पोहोचायला उशीर होईल, माझ्यामुळे उगाच कोणाला त्रास नको.. "
" त्रास कसला त्याच्यात आपण जाऊ म्हणजी तुम्हाला जाऊ पर्यंत बरं वाटल."
स्वप्नाली नाही म्हणाली," त्यापेक्षा आपण एखादी मेडिकल मधून पेनकिलर घेऊ, बरं वाटेल मला संतुन मेडिकल बघून गाडी थांबवली रत्ना खाली उतरली आणि मेडिकल मधून पेन किलर घेऊन आली वीरने तिला गोळी पाणी दिलं आणि तिला म्हणाला, "स्वप्ना आता शांतपणे झोप, बरं वाटल." स्वप्नाली उगाचच त्याच्या खांद्यावर डोके ठेवल आणि झोपली. विरने क्रांतीकड बघितल क्रांतीचे डोळे पाण्याने भरले होते. वीरने तिचा हात हातात घट्ट धरला आणि मानेनेच नका रडून म्हणाला.

क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत