मल्ल प्रेमयुद्ध - भाग 36 Bhagyashali Raut द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 36

मल्ल प्रेम युद्ध


संध्याकाळचे सात वाजले होते. रत्ना आणि क्रांतीने त्यांची रूम व्यवस्थित आवरून ठेवली. कपाटामध्ये दोघींच्या बॅग लावून ठेवल्या. आवरून दोघी बसल्या होत्या तेवढ्यात वीरचा क्रांतीला फोन आला.

"सगळं व्यवस्थित झालं ना?" क्रांतीला काळजीने विचारत होता. तेवढीच काळजी क्रांती वीरची जरात होती. वीरचीसुद्धा व्यवस्थित रूम लावून झाली होती, अर्थातच सगळ्यांनी मदत केली म्हणूनच वीरची रूम लवकर आवरून झाली होती. सकाळी लवकर उठायचे असे सांगून वीरने फोन ठेवून दिला. क्रांती आणि रत्नाच्या रूमच्या दरवाज्यावर नॉक झाले. जेवायची वेळ झाली होती. जेवढ्या मुली होस्टेलवर राहायला होत्या. तेवढ्या सगळ्या दरवाजात उभ्या होत्या. सगळ्यांची तोंड ओळख झाली होती पण सायलीने परत सगळ्यांची ओळख करून दिली.
"मी सायली, ही रीमा, वसुधा, नेहा, प्रियंका आणि ही आर्या सध्या टोपर आहे. ह्या अकॅडमीचे ट्रस्टी तिचे वडीलच आहेत तरी सुद्धा गर्व नाही अजिबात, इथेच राहते होस्टेलवर, सगळ्या मुलींसोबत, अजून बऱ्याच मुली आहेत. पण आमचा ग्रुप हा आहे.
तिने सगळ्यांना हसून "हाय" केले. रत्नाने सुद्धा हाय केले. सगळे एकमेकांशी छान बोलायला लागल्या, पण आर्या जास्त बोलत नव्हती. तिच्या चेहऱ्यावर गर्विष्ठपणा होता. नाजूक, गोरी पण तरी टॉपर होती. सगळे सोबत जेवायला गेले. जाता जाता प्रियंकाने त्यांना सांगितले उद्या दोन वाजता ग्राऊंडवर बोलवले सरांनी... सर सांगतीलच...
क्रांती आणि रत्नाने एकमेकींकडे बघितले.
"दोन वाजता...?" त्यांना प्रश्न पडला.
" हो कधीकधी घेतात दोन वाजता" हवं तर सरांना विचारा. रत्ना म्हणाली,"ठीक हाय आम्ही येऊ दोन वाजता.."

कॅन्टीनमध्ये सगळे टेबल लावलेले होते. त्या दोघी जाऊन बसल्या. जेवण पोटभरून झालं. सात्विक आणि व्यवस्थित खुराक होता. जेवण झाल्यानंतर रूमकडे जायला निघाला तेवढ्यात सरांनी त्यांना हाक मारली आणि म्हणाले,
" उद्या पहाटे लवकर यायचं ग्राउंडवर तेव्हाच प्रियंका आली आणि म्हणाली.
" सर मी सांगितले त्या दोघींना..."
" ओके..." सर म्हणाले अनिनिघून गेले. या लवकर... प्रियंका म्हणाली. दोघी लवकर उठायचं म्हणून निघून गेल्या आणि झोपल्या. तिने वीर ला मेसेज करून ठेवला पण वीरला झोप लागली होती.


चिनुने क्रांतीला फोन केला तायडे आमी व्यवस्थित पोहोचलो. भूषण दादांनी आधी आम्हाला सोडलं आणि मग ते गेले.
दादा आण आई काळजीत हायत पण त्यांना मी व्यवस्थित समजावून सांगितलय, तू पण काळजी घे..." चिनूने फोन ठेवला.
रत्नाला झोप लागली होती. नवीन जागा असल्यामुळे क्रांतीला झोप येत नव्हती. तिला ट्रेनिंगचा टेन्शन नव्हतं. पण नवीन जागा, नवीन माणसं, नवीन कोच या सगळ्याचं दडपण आलं होतं. विचार करत करत झोप लागली आणि दीडचा अलार्म वाचला. अगदीच आता झोप लागल्यासारखी झाली होती.तरीही ती उठली. रत्नाला उठवलं, तिला जाग येत नव्हती. दोघीही उठल्या, आवरलं आणि ग्राउंड वर गेल्या, ग्राउंड वर साधी लाईट सुद्धा लागलेले नव्हती.
दोघी घाबरल्या होत्या.
" क्रांती दोन वाजत आले, अजून कोणच नाय आलं... सर सुद्धा नाय."
क्रांती सुद्धा विचारात पडली. सरांचा नंबर होता. पण फोन कसा करणार ...मग तिच्या लक्षात आलं की वीरला फोन करावा. तिने वीरला फोन केला. वीरने पहिल्यांदा फोन उचलला नाही. नंतर परत कॉल केला तेव्हा विरने झोपेतच फोन उचलला. क्रांती त्याला म्हणाली, "उठला नाय अजून...? दोन वाजता बोलावलं होतं ना... वीरने घड्याळ बघितलं आणि क्रांतीला म्हणाला,
"कुठे तुम्ही?
"ग्राउंड वर..." क्रांती म्हणाली.
"एवढ्या लवकर कुणी सांगितलं तुमाला...?"
क्रांती म्हणाली, " इथल्या मुलींना सांगितलं. दोन वाजता सकाळी प्रॅक्टिसला बोलावलय म्हणून..."
" तुम्ही सरांना इचारलं का?"
"हो सर म्हणले लवकर या."
"क्रांती त्या पोरीने तुम्हाला फसवलं, खोटं सांगितलं एवढ्या लवकर नाय ग्राउंडवर बोलावलं ... चाडेचार वाजता बोलवलंय.

दोघींच्या लक्षात आला की ह्या पोरींनी आपल्याला त्रास व्हावा म्हणून खोटं सांगितलं. दोघांनी एकमेकांकडे बघितलं आणि पुन्हा झोपायला निघून गेल्या. साडेचार वाजता उठून ग्राउंडवर आल्या क्रांतीला राग आला होता.
प्रियांकाकडे गेली आणि म्हणाली,
" का खोट सांगितला आमाला..मी आता सरांना सांगणार हाय.."
प्रियंका हसायला लागली. आणि म्हणाली,
"बावळट मुलींनो दोन वाजता कोणी ग्राउंडवर येतं का? सर तुम्हाला ओरडतील, तुम्ही नीट का नाही विचारलं म्हणून मी सांगेन मी चार वाजता सांगितलं होतं म्हणून... गावठी कुठच्या..." सगळ्याजणी हसायला लागल्या. सायलीला जरी हे पटलं नसलं तरी, त्यांच्या टीम मध्ये होते सगळ्या पोरी हळूहळू हसत होत्या. तेवढ्यात सर आले
सगळी मूळ मुलं पण गोळा झाली. ट्रेनिंग सुरू झाल. सर व्यवस्थित समजावून सांगत होते. रनिंग ला सुरुवात झाली. मुलांना एक बाजूचे ग्राऊंड आणि मुलींना एक ग्राउंड असे ग्राउंड असे दोन भाग केले होते. क्रांतीला वीरशी बोलायचं होतं, पण बोलता येत नव्हतं. सर सलग एक्ससाइज घेत होते. पहिल्याच दिवशी एवढा एक्ससाइज घेत होते. क्रांती आणि रत्ना जोमाने करत होत्या. थकल्याचे त्यांच्या चेहर्‍यावर लवलेशही नव्हता. साठे सरांना हे बघून आनंद होत होता. पहिल्या दिवशी नवीन आलेल्या मुलांना हे सांगितलं तर मुलं कंटाळतात, पण या दोघी आणि वीर मनापासून प्रॅक्टिस करत आहेत हे बघून साठे सरांना बरं वाटलं आर्या आणि इतर मुली मात्र त्यांच्यावर चिडून होत्या.


सकाळ झाली होती. स्वप्नाली ला जाग आली. पय बर्‍यापैकी ठणकायचा राहिला होता. ती व्यवस्थित चालता येत होत. तिच्या बाजूला आई बसली होती. आईने तिला विचारलं काय झालं? रात्री उशीर झाला म्हणून काय विचारलं नाही. स्वप्नाली सांगितले की, पाय घसरला आणि लागले. वीर बद्दल भरभरून बोलत होती. रूम चांगली आहे सगळे घर आवरायला सगळ्यांनी मदत केली, अकॅडमी मस्त आहे.आईच्या लक्षात येत होतं. तो तिच्यापासून लांब गेला आहे म्हणून स्वप्नालीला सारखी त्याची आठवण येते. आज निघन गरजेचं होतं. आईने तस स्वप्नाली ला सांगितलं. पण स्वप्नाली तयार होत नव्हती. तिला तिथेच राहायचं होतं. तेवढ्यात खालून भूषणने ऋषीला आवाज दिला. स्वप्नाली म्हणाली, "आई भूषणला मी प्रॉमिस केलय आज मी त्यांच्या शेतात जाणार आहे, त्यांनी आधुनिक पद्धतीने शेती केली, मला बघायची, उद्या जाऊयात आपण.." आईला कळेचना वीर शिवाय इतर दुसऱ्या मुलांशी न बोलणारी पोरगी आज भूषण बरोबर शेतात जायला तयार झाली.
स्वप्नाली म्हणाली, " आई भूषणला सांग मी एक पंधरा मिनिटात येते आवरून, ऋषी मी आणि भूषण त्यांच्या शेतावर जाऊन येतो." आई खाली आली.
तिने भूषणला सांगितलं." भूषण स्वप्नाली पंधरा मिनिटात आवरून येते.
भूषण म्हणाला, )" ठीक हाय काकु, त्यांना शेती बघायची माझी म्हटलं घेऊन जाव नाय तर तुमी कधी जाल सांगता येत नाय." भूषणचा साधा भोळा स्वभाव स्वप्नालीच्या आईला आवडला.
भूषण बसला. स्वप्नाली ची आई त्याच्याकडे एकटक बघत होती. भूषण लाजल्यासारखं होत होत. तेव्हा मग स्वप्नालीच्या आईने त्याची चौकशी केली. कुठे राहता? काय करता? याची माहिती घेतली. स्वप्नाली कशी तुमच्या बरोबर यायला तयार झाली? हा प्रश्न विचारल्यावर मात्र भूषण घडलेली घटना जशीच्या तशी स्वप्नालीच्या आईला सांगितली.
स्वप्नालीच्या आईला बरं वाटलं. तिने भूषण चे आभार मानले. तेवढ्यात स्वप्नाली ऋषी आला. तिघेही शेतावर जायला निघाले.

ऋषी भूषणच्या शेजारी बसला आणि स्वप्नाली मागे बसली. ती वीरच्या आठवणीत ती शांत बसली होती. हे कळायला ऋषीला वेळ लागला नाही.
" कसलं भारी वाटतय ना भूषणदादा इकडे! कसला भारी निसर्ग..."
भूषण म्हणाला, "मग तुमी जर निसर्गाच्या सान्निध्यात येळ घालवला, तर लईच भारी... भूषण हसला. तरीही स्वप्नालीचे लक्ष नव्हते. स्वप्नाली खिडकीतून बाहेर बघितलं. खरंच किती अप्रतिम निसर्ग होता. पुढच्या रस्त्याला तर झाडांच्या गुहेत जातोय असं वाटत होतं. इतका हिरवागार परिसर होता. मन शांत होत होत. गाडीमध्ये गाणी लावली होती. तिने भूषणला सांगितले, "गाणी बंद करता का?" भूषणने लगेच
गाणी बंद केली. ती डोळे झाकून शांत बसलेली. पक्ष्यांची किलबिल तिच्या कानावर पडत होती. मधूनच मोराचा आवाज आला.
" अरे बापरे इथे मोरे आहेत..." स्वप्नाली मोठ्याने ओरडली. "व्हय तर बघायचय तुमाला?" भूषण म्हणाला.
ऋषींनी तर जागेवर उडीच मारली. गाडी एका बाजूला घेतली "शांतपणे बाहेर या..." भूषण म्हणाला. दोघेही बाहेर आले. मोरांची टोळी होती. लांब होते पण स्पष्ट दिसत होते. इकडे तिकडे बघून ओरडत होते, स्वप्नाली पुटपुटली, " स्वर्गच जणू हा..." मी कधी एवढ्या जवळून मोरांना पाहिलेच नव्हते. डोळे दिपवणारा प्रसंग बघून स्वप्नाली आणि ऋषी मनापासून खुश झाले. इतके मोर त्यांनी कधीच बघितले नव्हते.
" भूषण म्हणाला, हे आमाला रोजचंच... आम्ही रोज बघतो."
स्वप्नाली आणि ऋषी बराच वेळ त्या मोरंकडे बघत बसले होते. त्यांचा आवाज, त्यांचं थुईथुयन त्यांचा पिसारा सगळे डोळ्यात साठवून ठेवत होते . गाडी पुढे निघाली बांधाच्या एका कडेला आणून थांबवली.


क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत