जातीवरुन भेदभाव का? Ankush Shingade द्वारा तत्त्वज्ञान मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जातीवरुन भेदभाव का?

जातीवरुन भेदभाव का?

जात ......जात नाही तिला जात समजावं. असे काही वडीलधारी मंडळी म्हणतात. आज तसा विचार केल्यास त्यांचं गर्दी बरोबर आहे असं म्हणता येईल व मानताही येईल. कारण जात ही माणूस जन्म घेताच अंगाला चिकटून बसते. असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.
जात.......जातीच्या आधारावर पुर्वी विटाळ होता. लहान जात व मोठी जात. याचाच अर्थ जातीवरून कनिष्ठ जात व उच्च जात तयार झाली. मग भेदभाव आला. तो एवढ्या तीव्र स्वरुपाचा होता की लोकांचं जगणं असह्य करुन टाकलं होतं त्या भेदभावानं. ज्या कनिष्ठ जाती होत्या, त्या जातीवर उच्च जातीतील माणसं अत्याचार करीत होती. त्यांच्यात विटाळ शिरवला होता. त्यांना मंदिर प्रवेश नव्हता, ना सकाळी दहा वाजेपुर्वी गावात प्रवेश होता. ना रात्री सात नंतर गावात प्रवेश. समजा एखाद्यानं तसं धाडस केलंच तर त्याला आपल्या प्राणाला मुकावे लागत असे. एवढ्या तीव्र स्वरुपाचा भेदभाव होता.
काळ असाच सरकत राहिला व समाज थोडासा सुधारला. कारण तो नवीन पाश्चात्य लोकांच्या संपर्कात आला. मग संविधान बनलं व जातीचा हा भेदभाव संपुष्टात आला. परंतु तो संपुष्टात आला असला तरी आजही भेदभाव थोड्याफार प्रमाणात अस्तित्वात आहेच. त्याचं कारण आहे ही जात. संविधान बनलं तरी आजही काळ्या विचारांची माणसं जाती आधारावर भेदभाव करतांना आढळतात व जातीच्या आधारावर मिळत असलेल्या सवलतीचा विरोध करतात व लाभ मिळूच देत नाहीत. तेव्हा त्यांना जात हवी असते. ती आडवीही येते. परंतु त्यांना जेव्हा अशा सवलती हव्या असतात. तेव्हा मात्र त्यांना जात आडवी येत नाही. उदाहरण द्यायचं झाल्यास रक्ताचं देवू. जेव्हा एखाद्या उच्च जातीच्या माणसांना गंभीर स्वरुपाची दुखापत झाली की रक्ताची आवश्यकता भासते. तेव्हा ते रक्त कोणत्याही जातीचं चालतं. तेव्हा त्यांना जात हवी वाटत नाही. ते त्यावेळेस असा विचार करीत नाहीत की मला माझा जीव वाचवायला अमूकच माझ्या उच्च जातीचं रक्त हवं. या कनिष्ठ वा नीच जातीच्या रक्ताची मला गरज नाही. तेव्हा ते कनिष्ठ जातीचा रक्त बरोबर चालतं. कारण जीव वाचवायचा असतो आणि जेव्हा तो जीव वाचतो व त्या रक्ताचं काम संपलं की पुन्हा जात आणि जातीचा उच्च नीचपणा वाढीला लागतो.
जात. कधी रक्त आपल्याला आशश्यकता असतांना विचारतो का की तू अमूक अमूक जातीचा आहे. मी तुझ्या कामात येणार नाही. कारण मला अस्पृश्य माणसानं दान केलंय. कधी ते विचारतं का की मी गरीबाचं रक्त आहे. कधी भाजीपाला व अन्नधान्य विचारतं की मला अमूक अमूक माणसानं निर्माण केलंय. कधी कारखान्यात उत्पादीत झालेल्या वस्तू विचारतात का की मला अमूक अमूक माणसाचा स्पर्श झाला व मला विटाळ शिवला. त्या वस्तू ते अन्नधान्य आणि ते रक्त आपल्याला कधीच विचारत नाही की मला अमूक अमूक माणसानं शिवलंय. मी तुमच्या कामात येत नाही. आपण त्या वस्तूचा उपयोग आपल्याला ते माहीत असूनही घेतो. याचं कारण म्हणजे आपल्याला असलेली निकड. पुर्वीही असंच होतं. शेतात काम करणारी माणसं ही अस्पृश्य असायची. ती उत्पादन करायची त्यांच्याहातून उत्पादीतझालेल्याचपला वाजिन्स लोकांनाचालायचं. परंतुते चालत नव्हते. असाच भेदभाव होता आणि तो भेदभाव वाढत गेला. याचं कारण होतं त्यांच्यातील शुरवीर पणा. कित्येक युद्ध त्यावेळेसच्या राजांनी याच अस्पृश्य माणसांच्या शुरवीरपणानं लढली गेली व जिंकले गेले. बदल्यात काहीही मिळालं नाही. आजही तसंच आहे. आजही बरीचशी कष्टाची कामं हाच अस्पृश्य माणूस करीत असतो. बदल्यात काहीही त्यांना आपण देत नाही. उलट त्यांचं आरक्षण आपण नाकारतो. त्यांची पदोन्नती नाकारतो. त्या पदोन्नतीवर व त्यांच्या सवलतीवर आपण ताशेरे ओढतो. त्यांचा हेवा करतो. हे कितपत बरोबर आहे.
आज संविधान आहे. देश संविधानानुसार चालत आहे. सक्षम नेतृत्वाला संधी मिळत आहे. अस्पृश्यही चांगली चांगली कामं पुर्वीसारखीच आजही हिरीरीनं पार पाडत आहेत. असे असतांना आपण असा भेदभाव का करतो? आपल्याच जातीचा व्यक्ती मानाच्या जागेवर बसावा. आपल्याच जातीचा व्यक्ती मुख्याध्यापक बनावा. आपल्याच जातीचा व्यक्ती संस्थेचा अध्यक्ष बनावा. सर्व मानाच्या जागा त्यालाच मिळत जाव्या व अस्पृश्यांना त्या मिळू नये. असा आपल्यातील अहंपणा. यावरुन हे लक्षात येतं की आज जर आरक्षण नसतं वा सवलती नसत्या तर काल जशी अवस्था अस्पृश्य जातीची होती. तीच अवस्था आजही अस्पृश्याची असती. हे नाकारता येत नाही.
मुळात आपण असा भेदभाव सोडावा. आरक्षण त्यांना मिळत आहे तर मिळू द्यावे. त्यांना पदोन्नती मिळत आहे तर मिळू द्यावे. तो काही तुमचं कधीच वाकडं करणार नाही व करु शकणार नाही. कारण आरक्षण आहे, म्हणून त्यांना सगळेच मानवतेची वागणूक देतात. मंदिरप्रवेशाबाबत वा इतर कोणत्याच स्वरुपाचा भेदभाव करीत नाहीत. तसंच त्यांचा उपयोग करुन घेवून देशाला उच्च पातळीवर नेत असतात हे तेवढंच सत्य आहे.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०