dresscode? books and stories free download online pdf in Marathi

ड्रेशकोड?

शाळेसाठी वेगवेगळा ड्रेशकोड, संस्कार रुजण्यास अडसर?

अलिकडे शाळा बंदचा फतवा जाहीर केला व सर्वांना आश्चर्यात टाकत सरकारनं वीस किमीच्या अंतरावर एक शाळा अशी स्थिती निर्माण केली. त्यानुसार यानंतर गरीबांना शिकायला मिळेलच की नाही ही शंका उत्पन्न होते. आता तर देशात एवढ्या कॉन्व्हेंटच्या शाळा निघाल्या की सांगताच येत नाही. त्या आता बोटावर मोजण्याइतक्या राहिलेल्या नाहीत. गल्लोगल्ली कॉन्व्हेंटच्या शाळा आहेत हे त्या त्या कॉन्व्हेंटच्या ड्रेशकोडवरुन लक्षात येतं.
ड्रेशकोड.........ड्रेशकोड हा आधीपासूनच अस्तीत्वात आहे. ड्रेशकोड हे गुलामगीरीचं प्रतिक होतं. पुर्वी युद्ध होत. त्या युद्धात इतर टोळींना गुलाम केलं जाई. असे गुलाम ओळखू यावे यासाठी त्या गुलामांनी विशिष्ट असाच पोशाख घालावा ही संकल्पना रुजली व तेथूनच ड्रेशकोड अस्तीत्वात आलं असं म्हणता येईल.
युरोपात तर इसवी सनाच्या नवव्या शताब्दीत युरोपातील राजपरीवार व गुलाम अर्थात कुलीनवर्ग ओळखू यावा म्हणून ड्रेशकोड आला. यात राजपरीवार हिरेजडीत वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान करीत. परंतु कुलीनवर्ग ओळखू यावा म्हणून त्यांना विशिष्ट ड्रेश परिधान करायला लावला जात होता.
अरब देशामध्ये ड्रेशकोडचं बंधन फक्त गरोदर स्रियांनाच होतं. त्यात त्यांचा हेतू गुलामीकरण नव्हता तर सुर्याच्या अतिनील किरणांचा परिणाम गर्भार होवू नये म्हणून काळ्या रंगाचा बुरखायुक्त ड्रेशकोड त्यांनी आणला. कारण हे काळ्या रंगाचे वस्र सुर्याच्या उष्णतेला शोषून घेतात असं त्याचं म्हणणं व मानणंही होतं.
हिंदुस्थानात ड्रेशकोड सुरु होण्यापुर्वी सन १८६७ मध्ये गोव्यात ड्रेशकोड सुरु झाला. त्यावेळेस गोव्यात पोर्तुगीज सरकार होतं. त्यावेळेस पोर्तुगीज सरकारनं १८६७ ला जरी ड्रेशकोड आणला असला तरी ड्रेशकोडची प्रथा तिथं १८६९ नंतर सुरु झाली.
हिंदुस्थानात ड्रेसकोड संकल्पना ब्रिटीशांनीच आणली. त्यावेळेस त्यांचे सैन्य एका वेगळ्या ड्रेसमध्ये राहायचे. पुढं भारत स्वतंत्र्य झाल्यावर हाच युनिफॉर्म देशानं लागू केला. त्यात बदलाव केला नाही.
ड्रेशकोडबाबत सांगायचं झाल्यास त्याची सुरुवातच एका गुलामाचं प्रतिक म्हणून करण्यात आली. परंतु ती तशी सुरुवात करण्यात आली असली तरी हिंदुस्थानात तो ड्रेशकोड आधीपासूनच होता. कारण येथील बहुतेक सर्वच लोकं कापूस जास्त पिकत असल्यानं कापसापासून हातमागावर तयार केलेले श्वेत वस्रच परिधान करायचे. वर अंगात घालायला साधा पांढरा अंगरखा किंवा बंडी व खाली धोतर असा माणसांचा पोशाख व स्रिया रंगीबेरंगी लुगडे वापरत असत. शाळेतही ब्रिटिश शासनानं एक ड्रेशकोड सांगीतला होता. तसं पाहता आपण गुलाम असल्यानं ते जसे सांगायचे, तसं आपण करीत गेलो. जो ऐकत नव्हता. त्यांच्या वेदनांचा अंतर नव्हता ब्रिटिश काळात. त्याला ऐन प्रकारेन एवढात्रास दिला जायचा की त्या हालअपेष्टा सहन करु करु मृत्यू यायचा. परंतु हालअपेष्टा संपलेल्या नसायच्या. त्यानंतर भारत स्वतंत्र्य झाला व हा गुलामीच्या काळात असलेलाच ड्रेशकोड लागू झाला. शाळेत अन् बाहेरही. असा हा ड्रेशकोड कारखान्यात काम करणाऱ्या मंजुरांनीही वापरला. कारण ते कारखाना मालकांचे गुलाम होते. असा ड्रेशकोड एस टीम कर्मचाऱ्यांनीही वापरला. कारण ते शासनाचे गुलाम होते आणि असा ड्रेशकोड सरकारमध्ये निवडून येणाऱ्या प्रतिनिधींनीही वापरला. कारण तेही शासनाचे गुलाम होते. शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी वापरला. कारण तो निसर्गाचा गुलाम होता. एवढंच नाही तर तो ड्रेशकोड विद्यार्थ्यांनाही वापरायला लावला. कारण त्यांनाही गुलामीची सवय लागावी म्हणून. तसं पाहता अलिकडचं शिक्षणच मुळात गुलामी निर्माण करणारंच आहे. लोकं शिकतात आणि नोकरीला लागतात. परंतु दोन वर्ग शिकलेल्या कारखानदाराच्या जबाबाला जबाब देत नाहीत. जिथं विद्यार्थ्यांचे भवितव्य बनवणाऱ्या शाळेतील शिक्षकच दोन वर्ग शिकलेल्या संस्थाचालकाला जबाब देत नाही. तिथं मान खाली घालून राहतो. तिथं बाकीच्यांचं काय?
भारत स्वतंत्र झाल्यावर ड्रेशकोड तसाच राहिला. कारण त्या ड्रेशकोडकडं आता सन्मानानं पाहिलं जाई. त्याला गुलामाचं प्रतिक म्हणून पाहिलं जात नव्हतं. तसंच विद्यार्थ्यांनाही ड्रेशकोड ठेवला. कारण एकाच वर्गात शिकणाऱ्या मुलांमध्ये भेदभाव निर्माण होवू नये. कोणताही श्रीमंत बापाचा मुलगा राजसी कपडे घालून शाळेत येवू नये वा कोणताही गरीबांचा मुलगा गरीब वाटू नये. त्यांच्यात हीन भावना निर्माण होवू नये. यासाठी ड्रेशकोड अस्तीत्वात ठेवला. काही दिवसानं उच्च जातीला पांढरा शर्ट व खाकी पँट आणि कनिष्ठ जातींना पांढरा शर्ट व निळा पँट वापरण्याचे प्रयत्न झाले. परंतु ते प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. कारण तसा भेदभाव निर्माण होतो असं मानलं गेलं व माहीत होताच विरोध झाला.
आजही ड्रेशकोड आहे. अन् ड्रेशकोड असायलाच हवा. तो जरी गुलामीचं प्रतिक असला तरी. कारण अलिकडे सन्मान म्हणून ड्रेशकोडला महत्व प्राप्त झालं आहे. मात्र बाकी लोकांच्या ड्रेशकोडचं काही करायचं नाही. विद्यार्थ्यांचं सांगतो. विद्यार्थ्यांनाही ड्रेशकोड आहे आणि तो त्यांची जात जर एकच आहे तर तो ड्रेशकोडही एकच असायला हवा. प्रत्येक शाळेतील ड्रेशकोड वेगवेगळे नसावेच. असं व्हायलाच नको. कारण यावरुनही प्रत्येक विद्यार्थ्यात गरीब श्रीमंत असा भेदभाव निर्माण होतो. तो जर एकच असेल तर तो विद्यार्थी गरीबांच्या शाळेतील की श्रीमंतांच्या शाळेतील हे ओळखू येणारच नाही. तसंच विद्यार्थ्यात लहानपणापासून मी गरीब व तो श्रीमंत असा न्युनगंड निर्माण होणार नाही. हे तेवढंच खरं. व्यतिरिक्त आणखी सांगायचं झाल्यास पुर्वी गुलाम ओळखू यावा म्हणून गुलामाच्या शरीरावर लोखंडाला गरम करुन त्याचा ठसा उमटवला जायचा. तशीच ओळख म्हणून ठस्यास्वरुपातील शाळेच्या नावाचं ओळखपत्र विद्यार्थ्यांच्या ड्रेशवर नको आणि विद्यार्थी ओळखू यावे म्हणून ते गळ्यातील ओळखपत्रही नको. कारण हे सर्व प्रकार न्युनगंडाची जाणीव करुन देणारे प्रकार असून ते वेळीच हद्दपार झालेले बरे. निदान विद्यार्थी हुशार होण्यापुर्वी. नाहीतर उद्या चालून ज्या वयात संस्कार फुलवायचे होते, ते न फुलता विद्यार्थ्यात न्युनगंड फुलतील व त्याच न्युनगंडाच्या आधारे त्यांच्यातच वाद सुरु होतील. जे अंतर्गत वाद आपल्याच देशातील विनाशाला कारणीभूत ठरतील यात शंका नाही.
महत्वपुर्ण गोष्ट अशी की विद्यार्थी हा ड्रेशकोडनं विद्यार्थी आहे हे ओळखू यावा. परंतु तो त्याच एकाच रंगाच्या ड्रेशकोडनं कोणत्या शाळेतील आहे हे ओळखू यायला नको. जेणेकरुन विद्यार्थ्यात न्युनगंड, भेदभाव, मद, मत्सर, तीव्र राग, लोभ, पाप, पुण्य, खुन, बदला, संताप या सर्व गोष्टी वाढणार नाहीत. त्याला खतपाणी मिळणार नाही व हाच विद्यार्थी पुढं जावून आपल्याच भावंडाना संपवणार नाही. म्हणूनच वेळीच काळजी घेतलेली बरी व वेळीच सावधही झालेलं बरं हे तेवढंच खरं आहे.
महत्वाचं म्हणजे शाळेसाठी वेगवेगळा ड्रेशकोड ठेवणे म्हणजे शाळेत संस्कार रुजविण्यास घातक ठरु शकते वा अडचणीची बाब ठरु शकते. कारण त्यामधून षडरिपूच जास्त वाढतात यात शंका नाही. शाळा शिकवणे म्हणजे शाळेच्या वर्गखोल्यातून व विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मनातून षडरिपू काढून त्यांच्यात प्रेमाचे अंकुर रुजविणे व त्यांच्यात चांगले सुसंस्कार भरणे होय. ज्याची सुरुवात संपुर्ण देशातील संपुर्ण विद्यार्थ्यांसाठी एकच ड्रेशकोड नियम लागू करुन करता येईल. वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थ्यांना वेगवेगळा ड्रेशकोड ठेवून नाही. जर भविष्यात देशातील एकता व अखंडता टिकवायची असेल तर आणि देशाला महाशक्ती बनवायचे असेल तर........

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

इतर रसदार पर्याय