शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी........
शेती........शेती आमची माऊली आहे. तिला आपल्या आईगत जपायला हवं. परंतु आपण तिला तसं जप्त नाही व तिला त्रास देत असतो.
शेती आपली माऊली. आपण तिला त्रास देतो. असं म्हटल्यास कोणी म्हणेल की लेखक महाशय असं का बोलतात? आपण खरंच शेतीला त्रास तरी देतो काय? तर याचं उत्तर होय असंच आहे आणि ते खरंही आहे. आपण त्रासच देत असतो शेतीला.
शेतीला गृहीत धरुन आपण कोणता बरे त्रास देतोय? याचं उत्तर देतांना मी एवढंच म्हणेल की आपण आपल्याला भरघोस उत्पादन यावं म्हणून शेतीत रोपांवर किटकनाशक फवारतो. त्यातच रासायनिक सल्फेटांची मात्रा टाकतो. ते रासायनिक सल्फेट, ज्यानं आपली शेतीमाऊली वांझ होते. तिची प्रतिकारशक्ती घसरते. ती प्रतिकारशक्ती एवढी घसरते की ती आपल्याला त्यानंतर उत्पादन देत नाही. अर्थातच मग आपण आपल्या शेतीत कितीही रासायनिक सल्फेट टाकलं, तरीही पीकपाणी होत नाही. हीच पद्धत शेतीला दुखदायक ठरते. कारण या पद्धतीनं शेतीच्या कोशिका मृत पावतात एखाद्या स्रीच्या अभ्रक जन्माला घालणाऱ्या प्रक्रियेसारखी.
*शेती ही देखील वांझ होते?*
शेती ही देखील वांझ होते. याबाबत उदाहरण द्यायचं झाल्यास एखाद्या स्रीचं उदाहरण देता येईल. काही काही स्रियांना मुलं नसतात. त्याचं कारण म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या. त्यांचं सेवन करणे वा त्याचा वापर करणे. ज्याप्रमाणे एखादी स्री तिला मुल नको म्हणून गर्भनिरोधक गोळ्या घेते. त्यानंतर जेव्हा तिला मुल हवं असतं. तेव्हा तिला ते होत नाही. याचं कारण म्हणजे त्या गर्भनिरोधक गोळ्या. त्या गोळ्यांचा भरणा शरीरात जास्त प्रमाणात झाल्यास तिला मुल होत नाही. आता लोकं म्हणतील की हेही खोटं आहे. सर्वच स्रिया काही गर्भनिरोधक गोळ्या खात नाहीत. तरीही त्यांना मुल होत नाही. त्याचं कारण काय? याचंही उत्तर म्हणजे त्या स्रिया जरी गर्भनिरोधक गोळ्या खात नसतील कदाचीत. तरी त्या असे अन्नपदार्थ खात असतात की जे सल्फेटयुक्त असतात. जे शेतीतून मिळत असतं. यातही कोणी म्हणतील की ठीक आहे. आता स्रिया सल्फेटयुक्त अन्न खातात. म्हणूनच आपण असं म्हणू शकता. परंतु पुर्वी तर सल्फेटयुक्त अन्न नव्हतं. मग पुर्वीही स्रिया वांझ असायच्या. त्या का बरं वांझ असायच्या? त्याचं कारण हेच आहे. त्या स्रियांना जरी सल्फेटयुक्त अन्न जमिनीतून मिळत नव्हतं. तरी त्यांच्या शरीरात सल्फेटयुक्त क्षार पाण्यातून व हवेतून वा एकंदरीत वातावरणातून मिळायचं. त्यामुळंच त्या वांझ असायच्या नव्हे तर त्यांचं शरीर वांझ बनायचं. यावरही कोणी म्हणतील की असं होवूच शकत नाही. तर त्यावरही सांगता येईल की असं होवू शकतं. याबाबत आणखी एक उदाहरण देता येईल.
वातावरण विविध रोगाचे जंतू असतात. परंतु सर्वांनाच तो आजार होत नाही किंवा एखाद्या कार्यक्रमात सगळेच लोकं जेवन करतात. परंतु फुटायला हे एखाद्यालाच होतं. प्रत्येकाला होत नाही. याचं कारण काय? याचं कारण आहे प्रत्येकाच्या शरीराची रचना. प्रत्येक व्यक्ती हा जसा पाहायला वेगवेगळा आहे. तशीच त्याच्या शरीराची रचनाही वेगवेगळी आहे. त्या शरीर रचनेनुसार प्रत्येक जीवाच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वेगवेगळी आहे. काहींना आजार लवकर शिवतो. काहींना वेळ लागतो तर काहींना अजिबात शिवत नाही. त्यानुसार प्रत्येक व्यक्ती कमी अधिक प्रमाणात आजारी पडतो. काही पडत नाहीत. तीच गोष्ट वांझपणामध्येही येते. वातावरणातील किंवा पाण्यातील असलेले सल्फेट हे प्रत्येकांच्या शरीरात जातात. परंतु त्याचा परिणाम काहींवर होतो तर काहींवर होत नाही. त्यानुसार मुल जन्माची प्रक्रिया घडत असते. अगदी तीच स्थिती शेतीमाऊलीबद्दलही आहे. तीच पद्धत शेतीमाऊलीलाही लागू आहे. काही ठिकाणची शेतजमीन ही पिकाऊ आहे. काही ठिकाणची पिकाऊ नाही. ती बंजर अर्थातच कमीअधिक प्रमाणात वांझ आहे. त्यातच आपण घातक असे रसायनं त्या जमीनीवर फवारा असतो. ज्यामुळं त्या रसायनाचा त्या जमीनीच्या पोटावर परिणाम होतो व ती पुर्ण स्वरुपात वांझ बनते. त्यामुळंच अशा जमीनीवर कितीही प्रयोग केले तरी तिचा पोत सुधारत नाही.याचाच अर्थ कितीही पैसा शेतकऱ्यांनी अशा जमीनीवर खर्च केला तरी उत्पादन पाहिजे त्या प्रमाणात येत नाही व शेतकरी राजाला वाटते की आपली जमीन पीकत नाही. मग शेतजमीन पीकत नसल्यानं कधीकाळी आत्महत्येची वेळ येते व आत्महत्या घडतेच. असे होवू नये म्हणून आधी आपली शेतजमीन सुधारण्याची प्रक्रिया राबविण्याची गरज आहे.
*शेतजमीन सुधारणे म्हणजे नेमके काय?*
शेतजमीन सुधारणे म्हणजे त्या जमीनीत रोपे लावली असता त्यात सल्फेट टाकणे नाही तर त्यात शेणखत वा कंपोस्ट खत टाकणे होय. तसंच त्यात गांडूळखत टाकणे होय. तसंच जमीनीत रोपे लावण्यापुर्वी जमीनीला शेतकऱ्यांनी आधी तयार करायला हवं.
शेतजमीन आधी तयार करायला हवी. परंतु आता ते शक्य तरी आहे का? कारण आता शेतजमीनीत टाकायला आम्हाला शेणखत मिळत नाही. लेंडीखत मिळत नाही. याचं कारण आम्ही ट्रॅक्टरने शेती करतो. आम्ही आमच्या शेताला शेणखत देणारी गाईबैलं कसायांना विकली. ती परवडत नाही म्हणून. तशाच आम्ही आमच्या घरच्या बकऱ्याही कसायाला विकल्या. आम्हाला त्यांचं मांस खाता यावं म्हणून. त्यांच्या मांसावर आम्ही आमची होती व पोळा साजरा केला. आता आम्हाला बहाल स्वरुपात पोटा साजरा करायला जीवंत बैलं दिसत नाहीत. लाकडाचे नंदीबैल वापरुन आम्हाला आमचा पोटा साजरा करावा लागतो. तुरळक स्वरुपात काही ठिकाणी जीवंत बैलं दिसतात. पुढं तेही दिसणार नाहीत. ही सत्य गोष्ट आहे. त्यावरुन सांगता येईल की आज शेती करणं घाट्याचा व्यवसाय झाला आहे.
शेतीबद्दल सांगतांना शेतीची अवस्था आज अतिशय दयनीय झाली आहे. शेतीच्या आजच्या अवस्था पाहता आज कोणीही शेती करायला पाहात नाही. कारण ती परवडत नाही. त्यामुळंच शेतीचा सन्मान घसरला आहे आणि शेती करणाऱ्या लोकांचाही. आज शेतीला सन्मान मिळत नाही व शेती करणाऱ्या लोकांनाही सन्मान मिळत नाही. शेती पीकत नसल्यानं शेती करणाऱ्या मुलांना अडाणी समजलं जातं. त्यांच्याशी विवाह करायला कोणत्याच मुली पुढं येत नाही व कोणतीच मुलगी विवाह करीत नाही हे खरं आहे व हीच वस्तुस्थितीही आहे. याच अवस्थेमुळं शेतीवर आज भुमाफियांचे भुखंड थाटले गेले आहेत. शेती कमी होत आहे व भुखंड वाढत आहेत. याचाच अर्थ असा की सुपीक पिकणारी जमीन कमी होत आहे व ओसाड जमीन वाढत आहे. ही स्थिती अशीच सुरु राहिली तर उद्या देशातील शेती करणारी मंडळी निर्माणच होणार नाही व देशातील या शेतकरी मुलांना विवाहासाठी मुली न मिळत असल्यानं देशात बलात्कार वाढतील. शेती करणारी मंडळी नसल्यानं व कित्येक एकराच्या शेत्या ओसाड पडल्यानं अन्नधान्य पीकणार नाही. त्यातच देशात अन्नधान्याचा तुटवडा भाषेल. परिणामी चोऱ्याही वाढतील. एकंदरीत सांगायचं झाल्यास देशात साऱ्याच समस्यांना तोंड फुटेल. साऱ्याच समस्या देशवासीयांना सतावतील. त्यामुळं यावर उपाय एकच. शेतीलाही सरकारनं सन्मान द्यावा.
विशेष सांगायचं म्हणजे शेती आपली आई आहे. तिला आपल्या स्वआईगत जपावं. सरकारी नोकऱ्या त्याच क्षेत्रात निर्माण कराव्यात. जो शेती करेल, त्याला सरकारनंच वेतन द्यावं. एसीच्या हवेत बंद कमऱ्यात बसणाऱ्यांना वेतन देण्यापेक्षा ती गोष्ट कितीतरी चांगली होईल येत शंका नाही. तसेच तिचा पोत सुधारण्यासाठी तिच्यात सेंद्रिय खतांची निर्मीती करावी. जो गाईबैलं वा शेळ्या, मेंढ्या पाळेल, त्याला बक्षीस द्यावी. त्यांच्या हत्येवर प्रतिबंध लावावा. जो हत्या करेल, त्यांना कडक शिक्षा द्याव्यात. म्हणजेच शेणखत वा लेंडीखताची आपोआप निर्मीती होईल. याचा फायदा शेतीला निश्चीतच होईल. शेती भरपूर पीकेल. शेतीलाही भाव येईल. शेती करायला लोकं पुढं येतील. शेतकऱ्यांच्या समस्या चुटकीसरशी सुटतील. शेतकऱ्यांच्या मुलांनाही विवाहासाठी मुली मिळतील. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही. तसंच शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी प्रत्येक माणसानं झाडं लावावीत. जेणेकरुन शेतीसाठी लागणारा पाऊस पडेल आणि ज्या भागात झाडं असूनही पाऊस पडणार नाही. अशाठिकाणी नदीजोड वा कालवेजोड प्रकल्प राबवावा. म्हणजे निश्चीतच शेतीचेही महत्व वाढेल व जो तो शेती करायला धजेल. पुढं येईल व शेती करेल. यातूनच देशाचा विकास होईल. त्याचबरोबर आपलाही विकास होईल हे तेवढंच खरं आहे.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०