Fighting over religion is not good books and stories free download online pdf in Marathi

धर्मावरून भांडण बरं नाही

धर्मावरुन भांडणे बरे नाही?

धर्म.......देशात असे बरेच धर्म आहेत की बऱ्याचशा सर्व धर्माची तत्वं मिळती जुळती आहेत. फरक पाहता थोडासाच फरक आहे परंतु माणसागणिक आज धर्म आहे व ज्यांचा ज्यांचा जसा धर्म आहे. ती ती माणसं आपल्या आपल्या धर्माची महकता सांगत असतात.
*धर्म का प्रसवला जातो?*
धर्म यासाठी प्रसवला जातो की काही लोकांना ते ज्या धर्मात असतात. त्या धर्माचे विचार पटत नाहीत. त्यांना आपल्याच विचारांचा धर्म हवा असतो. त्यामुळंच ते आपलाच धर्म प्रसवत असतात.
*सर्व धर्म सारखे असतात का?*
होय, सर्वच धर्म सारखेच असतात किंवा सर्व धर्मातील तत्व वा सार मिळतेजुळते असतात. जसे. चोरी करु नये. दारु पिवू नये. व्याभीचार करु नये. हिंसा करु नये. स्रीयांचा सन्मान करावा वा राखावा. वैगेरे वैगेरे.
कोणताही धर्म हा चोरी करायला सांगत नाही वा कोणताही धर्म हा दारु प्यायला सांगत नाही. तसाच कोणताही धर्म हा प्राणीमात्राची हिंसा वा कोणत्याही प्रकारची हिंसा करायला सांगत नाही वा कोणताही धर्म हा कोणत्याही स्रीची अब्रू लुटायलाही सांगत नाही. असा असतांना आज संबंधीत सर्व लोकांना पाहिलं तर ते पछाडलेलेच दिसतात. कोणी दारुनं पछाडलेले असतात तर कोणी व्याभीचारानं. कोणी हिंसावृत्तीनं पछाडलेले असतात तर कोणी निंदेनं. अन् हे जेव्हा बाकी लोकांना सहन होत नाही, तेव्हा ते आपला आपला धर्म इथं मांडतात. परंतु तो मांडल्यावर ज्या व्यक्तीनं तो धर्म मांडला वा अंगीकारला. तो तरी सत्धर्मानं तो धर्म ज्यासाठी मांडला, त्याची तत्व पाळतात का? तर याचं उत्तर नाही असंच देता येईल.
एक उदाहरण देतो. अशाच एका व्यक्तीचं उदाहरण. त्या व्यक्तीची दुसऱ्या एका व्यक्तीसोबत चर्चा चालली होती. तो म्हणत होता.
"मी बुद्धिस्ट."
त्यानं ज्याला तसं सांगीतलं. त्याला ते समजलं नसल्यानं त्यानं पुन्हा प्रश्न केला.
"बुद्धिस्ट म्हणजे?"
"बुद्धिस्ट म्हणजे बौद्ध."
"केव्हापासून झालात?"
"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्विकारला, तेव्हापासूनच आम्ही बौद्ध झालोय आणि सर्वांनी बौद्ध व्हायला हवं."
आता ते ऐकणारा व्यक्ती बौद्ध नसेल कदाचीत. त्याला त्या व्यक्तीच्या बोलण्याचा राग आला. कारण त्याला प्रत्येकांनी बौद्ध व्हावं असं म्हटलं होतं व ते त्याला कदाचीत पटलं नसेलच. ते त्याच्या चेहर्‍यावरुन स्पष्ट जाणवत होतं. तसा तो म्हणाला,
"का बनलात बौद्ध? अर्थात बौद्ध धर्म का स्विकारला?"
"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्विकारला म्हणून."
"त्यांनी का स्विकारला धम्म? जरा सांगाल का?"
"समाजावर सनातन्यांचे अत्याचार होत होते म्हणून."
"मग संपले काय अत्याचार? आता नाही होत काय?"
"होतात."
"मग आता बदलवाल काय धम्म?"
तो व्यक्ती गडबडला. काय उत्तर द्यावं ते कळत नसेल त्याला. तसा तो म्हणाला,
"तुम्हाला माहीत नसेल की मनुस्मृतीनं किती अत्याचार केले अस्पृश्यांवर. त्याचा अभ्यास नसेल तुमचा. त्यात कलमा किती वाईट वाईट लिहिल्या आहेत."
"का लिहिल्या आहेत याचा विचार केला काय?"
या प्रश्नांवरही तो गडबडला व तो चूप बसून शांतपणे निघून गेला. कारण अपुर्ण अभ्यास. अभ्यास जर असता तर तो व्यक्ती चूप बसून शांतपणे निघूनच गेला नसता.
मनुस्मृती लिहिली गेली व त्यात कलमा टाकल्या गेल्या. त्यानुसार प्रत्येक स्री व प्रत्येक अस्पृश्यांना निर्वाणीचं जगणं जगावं लागलं. मनुस्मृती त्यासाठीच लिहिल्या गेली असेल अन् लागूही केली असेल की हा त्या काळातील शूरवीर असलेला अस्पृश्य समाज तशीच त्या काळातील शूरवीर असलेला स्री वर्ग चूप बसायला हवा. कारण त्यावेळेस अस्तीत्वात असलेला अस्पृश्य समाज हा राजा होता. राजपरीवारातील होता. काटक होता व शुरवीर होता. अशा लोकांवर सहज विजय मिळवता येणं शक्य नव्हतं. युद्धात तर त्यांना जिंकणं शक्यच नव्हतं. त्यामुळंच त्यांच्यावर सहजपणं विजय मिळविण्यासाठी व त्यांना मांडलीक वा गुलाम बनविण्यासाठी मनुस्मृती लिहिली गेली असावी ही सत्य बाब आहे. तसाच त्या काळातील स्री वर्गही शुरवीर होता. तो शास्त्रार्थात पुरुषांना हारत नव्हता. अशाच स्रियांनाही गुलाम बनविण्यासाठी मनुस्मृतीची आखणी केली गेली. आज हाच अस्पृश्य समाज आपलं अस्तित्व विसरला आहे. आपलं राजेपण विसरला आहे. तशीच ती स्रिही आपलं अस्तित्व विसरली आहे. आपला शास्त्रार्थ विसरली आहे. आपलं अस्तित्व विसरली आहे की मी पुरुषांसोबत शास्त्रार्थ करुन त्यांचा पराभव करीत होती.
मनुस्मृती वाईट असो की नसो. परंतु आज आपण स्वतंत्र भारतात राहतो. स्वतंत्रपणे गोष्टी करतो. आपली वेगळी अशी स्वतंत्र नियमावली आहे. जी नियमावली संविधान म्हणून लिहिल्या गेली आहे. असं म्हणता येईल. मग असं असतांना आजही अस्पृश्यच नाही तर स्रीवरही अत्याचार का होतात? कारण आजही देशात संविधान जरी असलं आणि ते सक्षम जरी असलं तरी दळभद्री लोकंही आज देशात आहेत. त्यामुळंच अत्याचार होत असतात आणि अत्याचार होतच राहणार. कारण कितीही संविधान लिहिले गेले आणि कितीही त्या संविधानांना सक्षम केलं गेलं तरी जेव्हापर्यंत हे दळभद्री लोकं समाजात आहेत. तेव्हापर्यंत हे चालतच राहणार. मग धर्म कितीही बदलवला वा कितीतरी वेळा संविधान लिहिलं वा कितीतरी वेळेस संविधानाला सक्षम बनवलं, तरी हे असले अत्याचार चालतच राहतील.
महत्वपुर्ण गोष्ट ही की अशाच दळभद्री लोकांमुळेच, ते विचार न पटल्यानं त्या त्या काळात धर्माची स्थापना केली गेली व धर्म प्रसवला गेला. त्यानंतर काही काही लोकांनी त्यांच्या धर्मात हिंसा सांगीतली नसतांनाही हिंसा आणली. बकरे खा. कोंबडे खा. देवाला नवस म्हणून कोंबडे, बकरे कापा. थोडं थोडं नैवेद्य म्हणून द्या. दारु पिणंही आणलं. थोडी थोडी दारु प्रसाद म्हणून द्या. बुरखाही आणला.
हे का आणलं? त्याचं कारण होतं तेथील वातावरण व तापमान. त्या तापमानानुसार उष्णतामानापासून बचाव करण्यासाठी बुरखा आणला. तसंच बर्फाळ प्रदेशात शरीरातील अवयव या बर्फात राखता यावं, म्हणून हिंसा आणली. तशीच दारुही आणली.
विशेष सांगायचं म्हणजे दारु प्रसाद म्हणून पिणे, वा बकरा, कोंबडा देवासाठी नवश म्हणून कापणे वा बुरखापद्धती हे कोणत्याही धर्मात सांगीतले नसेलच. परंतु समाजात जे दळभद्री लोकं आहेत. त्यांच्याकडून धर्म अशा रितीनं प्रसवल्या गेला. त्या धर्मात तद्नंतर तशी कलमं टाकण्यात आली. जशी कलमं मनुस्मृतीत लिहिली गेली.
आज समाजात असे अनेक धर्म आहेत. हिंदू, मुस्लिम, शिख, ईसाई, बौद्ध व जैन हे प्रमुख धर्म आहेत. त्यानंतर वारकरी, परमात्मा, नाथजोगी, यहुदी असे इतरही बरेच धर्म आहेत की जे माणसांनाच नाही तर प्राणीमात्रांनाही जगायला लावतात. जगण्याचे विचार प्रसवतात. जे स्रियांना उपभोग्य वस्तू मानत नाहीत. जे दारु प्यायला सांगत नाहीत आणि जो धर्म असे करायला सांगतात वा तसे विचार प्रसवतात. त्याला आपण धर्मही मानू नये. खरं सुख धर्म निर्माण करण्यात वा दुसऱ्या धर्मात जाण्यात नसून आपली विचार शक्ती सुधरविण्यात आहे. आपली विचारशक्ती जर चांगली असेल तर आपल्याला प्रत्येक धर्मात चांगलेच दिसणार. जर ती विचार शक्ती चांगली नसेल तर आपण कोणत्याही धर्माचा स्विकार केला तरी आपल्याला चांगले गवसणार नाही. कारण प्रत्येकच धर्मात दळभद्री लोकं असतातच हे शंभर प्रतिशत खरं आहे.
महत्वाचं सांगायचं झाल्यास प्रत्येकच धर्म हे चांगलेच असतात. वाईट कोणतेच धर्म नसतात आणि कोणीही कोणत्याही धर्माला वाईट म्हणू नये व कोणीही धर्माच्या नावावर भांडणं करु नये वा धर्मावर टिका करु नये. कोणी जर धर्मावरुन टिका केली तर त्यातूनच भांडणं वाढतात. ते भांडणं एवढे विकोपाला जातात की त्यातून आपलंच नाही तर देशाचंही नुकसान होतं. जे नुकसान कधीच भरुन निघणारं नसतं. म्हणूनच धर्मावर टिका करण्यापुर्वी सावधान राहायला हवं व हे लक्षात ठेवायला हवं की आपण जर एक बोट दुसऱ्यांना दाखवलं तरी चार बोटं आपल्याकडेच असतात.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

इतर रसदार पर्याय