Mall Premyuddh - 40 books and stories free download online pdf in Marathi

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 40

मल्ल प्रेमयुद्ध


आर्या घामाने डबडबली होती. क्रांती सुद्धा दमून बसली होती. सगळं चुकीच खेळले जातंय हे सगळ्यांना कळत होतं पण का? हे मात्र माहीत नव्हते.
साठेसर सुद्धा आज वेगळ्याच प्रयत्नांमध्ये होते.
वीर रत्नाला म्हणाला, "रत्ना मी साठे सरांना भेटून येतो, हे नक्की काय चालू हाय हे समजलं पाहिजे."
रत्ना म्हणाली, " दादा मला एक कायतरी वेगळं प्रकरण वाटतय, आता ही मॅच होऊद्यात मग आपण मग बोलू साठे सरांबर..."
" तोपर्यंत उशीर व्हईल..."
" नाय व्हणार मला माहितीये... क्रांती अशी हार मानणारी पोरगी नाये तीसुद्धा नक्कीच काही ना काही तरी शक्कल लढवल." रत्नाने वीरला शांत केले.
घाबरलेल्या क्रांतीकडे बघून वीरचा जीव तुटत होता. त्याला तिच्याजवळ जाऊन बोलायचं होतं पण बोलता येत नव्हतं वीर ने तिला इशाऱ्याने सांगितलं आता तुला पाहिजेल ते कर आता नियम मोडून खेळलीस तरी चालल. क्रांतीला समजलं. शेवटचा राउंड होता. क्रांती उठली,तिकडून आर्या उठली, दोघींची लढत सुरू झाली. चुकीच्या पद्धतीने तर चुकीच्या पद्धतीने क्रांतीला तिला आता हरवायच होत. आणि शेवटी उचलून तिला फेकले. आर्याला उठायला जमत नव्हतं. शीट्टी वाजेपर्यंत तशीच पडून होती आणि क्रांतीचा विजय झाला. क्रांती मोठ्याने ओरडली. तेवढ्यात साठे सर आले आणि म्हणाले क्रांती तुम्ही चुकीच्या पद्धतीने खेळला ताव क्रांतीच डोकं फिरलं. क्रांती म्हणाली, "आतापर्यंत चुकीच्या पद्धतीन आर्या खेळली तवा तुम्ही काय बोलला नाय आणि आता मी एकदा खेळल आणि आर्या हरली तर तुम्ही बोलला. माफ करा सर मला तुम्हाला बोलायचं नव्हतं पण तुम्ही मला बोलायला भाग पाडलं मग ठरवलं आता मी नियम मोडून खेळणार आणि मोडला नियम.... सगळे बघत होते असं दिसत होतं की नियम मोडतायेत आणि आज सर एक नियम मोडून मी जिंकली व विचार करा सगळे नियम मोडले असते मी तर काय केलं असतं? काय झालं असत? आर्या कोर्टवर तशीच पडलेली होती. तिच्या सगळ्या मैत्रिणी तिच्या भोवती जमा झाल्या तिला उठवले आणि घेऊन गेल्या वीर, रत्ना क्रांतीच्या जवळ आले.
" हो सर आम्ही तुम्हाला विचारायला येणार व्हतो की हा काय प्रकारे? चुकीची खेळती तुम्ही बघून हसत होता, म्हणजे ठरवून केलं व्हतं का? मला त्यावेळी रत्नांनी आडवलं पण आता मला बोलायचं हाय,सर उत्तर द्या...
साठे जर काहीच बोलले नाहीत, सरांनी मान खाली घातली आणि निघून गेले.
"म्हणजे हे सगळं ठरवून केलं होतं?" रत्ना म्हणाली.
"वाटतंय तर असंच? पण का? साठेसर असे न्हाईत त्यांना जबरदस्तीने हे करायला लावल व्हत." वीर म्हणाला.
"कोणी अन का???" क्रांती.


"आ आ आ sssssss..." आर्या एवढ्या जोरात किंचाळली की तिच्या मैत्रिणी तिच्यापासून लांब झाल्या.
"आर्या काय झालं?? आग एवढा त्रास नको करून घेऊ... आपल्याला हे माहीत होत की आपला प्लॅन सक्सेस होऊ शकतो किंवा नाहीसुद्धा मग एवढा त्रास का करून घेतेस?" प्रियांका म्हणाली.
"मला वाटतय आर्यांच्या डॅड ला फोन करायला पाहिजे." सायली म्हणाली.
"पहिल्यांदा शहाणपणाचं बोलली." रीमा म्हणाली अन लगेचच तिने आर्यांच्या डॅडला फोन करून सगळी माहिती सांगितली. डॉक्टरांनी येणाऱ्याला चेक केले. तिला औषध वगैरे दिले. आर्या शांत झाली होती. तिची झोप लागली. तेवढ्यात तिचे डॅड आले. त्यांनी आर्याच्या डोक्यावरून हळुवारपणे हात फिरवला. आर्याला जागा आली. आर्या जोरात पुन्हा रडायला लागली. " डॅड मी पुन्हा हरले,माझा प्लॅन फसला."
" तो आता विचार नको करू त्यावर आपण नंतर बोलू. चल आपण आता घरी जाऊ." आर्या उठली. प्रियंकाने आणि रिमाने तिला गाडी पर्यंत हळुवार धरून सोडले. तिने त्यांच्या हात झटकले. कारण मी हरले असले तरी अजून तरी माघार घेणार नाही.असं तिचं म्हणणं होतं.


रत्ना क्रांतीजवळ बसलेली होती. दोघीसुद्धा हाच विचार करत होत्या की काय झालं असेल अचानक...

वीरने क्रांतीला फोन केला.
"बऱ्या हाय ना???"
"हो... पण राहून राहून हाच विचार की काय नक्की असलं का केलं असेल साठे सरांनी हे सगळं?"
"आता त्याचा विचार नको... तुम्ही अराम करा... चुकीच्या पद्धतीन खेळल्यामुळं लई मार बसलाय तुमास्नी तवा काळजी घ्या अन उद्या न्हाय आला तरी चाललं..." वीर काळजीनं म्हणाला.
"अस कस हरळी न्हाय मी पाळायला अन हे काय एवढं न्हाय मी असा किती मार खाल्लाय काय न्हाय... आता झोपते कवकर म्हंजी लवकर उठीन..." क्रांती म्हणाली तसा वीर हसला.
"का हस्ताय...?"
"काय न्हाय कमाल वाटती तुमची एवढं लागुणपन हार न्हाय मानायची..."
"मग हार मानायला मी कुठं हरली... ह्यांनी न प्लॅनिंग केलंय कायतरी त्यांना वाटतय की गावाकडच्या पोरींच्यात दम नसतोय.. त्यांना काय खेळातले छक्के पंजे कळत न्हाईत.. अन ह्यांना साथ द्यायला कोण ज्यांना आपण मनापासन गुरू मानतो असे..पैसे घेवून किंवा कोणाच्या दबावाखाली येऊन अशी काम शोभातात का हो ह्यांना... कधी सुधारणार हा समाज....?"
क्रांती रागानं बोलत होती.
"आता नका तुम्ही काळजी करू लवकर कळलं आपल्याला की काय होत हे नक्की..." वीरने एवढं बोलून फोन ठेवला.


आर्या तिच्या प्रशस्त अश्या रूममध्ये आरामात झोपली होती. तिच्या बाजूला तिची ममा तिच्या डोक्यावरून हात फिरवत बसली होती.

"विजय काय ह्या मुलीचं खेळणं केलंय तुम्ही??? काय डोक्यात घातलंय आर्याच्या... तुम्ही मुलीला खेळात उतरवलं माझं काही म्हणणं नाही पण तिला स्वतःच्या हिमतीवर खेळायची टाकत हवी अस कोणाच्या वरचढ करून, कोणाचा द्वेष करून काहीही होत नाही. अहो त्या मुलीला तरी कमी लागलं असेल का? कोणाच्या जीवाशी खेळायचा काय अधिकार आहे आपल्याला...? श्रीमंत आहे म्हणून का फक्त की हातात सत्ता आहे म्हणून.. विजय चुकताय तुम्ही मुलीला वाट दाखवताना... सत्य स्वीकारायची तयारी असायला हवी त्याविरुद्ध तुम्ही तिला भरकटलेल्या स्थितीत सोडून देताय..." पद्मा पोटतिडकीने बोलत होती तेवढ्यात आर्याला जाग आली.
"ममा तू डॅडला नको बोलू काही चूक माझी आहे. अग तुझी आर्या प्रेमात पडली न म्हणून अशी वागली." आर्या खोल आवाजात बोलत होती.
"काय??" पद्मा एकदम दचकली.
"हो अन त्याच लग्न ठरलंय..." विजय म्हणाले.
"अहो मग विषयसोडून द्यायचा ना..." पद्मा
"माझी लेक पहिल्यांदा प्रेमात पडली मग विषय कसा सोडून द्यायचा..." विजय
"कोण आहे तो मुलगा...?" पद्मा
"राजवीर... जो आता आर्याबरोबर साठेसरांकडे ट्रेनिंग घेतोय. आणि त्याच्याच तालुक्यातील मुलगी क्रांती तिच्याबरोबर लग्न ठरलंय ती सुद्धा त्यांच्यासोबत आहे." विजय
"आणि आज तिच्याबरोबर हिची फाईट झाली?" पद्मा
"हो ममा आणि मी हरले..." आर्या ममाच्या कुशीत जाऊन रडायला लागली.
"ओग बाळा रडू नको..." विजय लांबूनच म्हणाले.
"विजय समजवताय काय त्यांचं जर लग्न ठरलं आहे तर त्याच्यासारखे छप्पन्न मूल आर्यांच्या मागे पडलेत... त्याच्यासारखे कुठचे त्याच्यापेक्षा भारी. मग कशाला नको त्या मागे पडायचं... अन तिला समजवायचा सोडून तिला साथ कसली देता." पद्मा रागात बोलत होती.
"ममा त्याच्यापेक्षा भारी असतील माझ्या मागे वेडे पण मी त्याच्या मागे वेडी आहे त्याच काय करायचं... मला तोच हवा आहे काहीही करून... डॅड उद्या तुम्ही जाताय" आर्या

"हो आर्या मी जातो.... पण तुझ्या दादाला यातलं काहीही समजले नाही पाहिजे." विजय
"विजय कशाला कोणाचं आयुष्य उध्वस्त करताय... आर्या बाळा तुला खूप भारी मुलगा मिळेल ...तू कॉन्व्हेंटने शिकलेली तो धड शिकलेला नाही, आणि तूला गावढी मुलगा कसा काय आवडला?अग दादाला जर समजले तुमचे उद्योग तर तुझं सगळं बंद होईल. समजलं आधीच तुझ्या ह्या खेळाच्या विरोधात आहे तू समजावलं म्हणून तो तुझ्या हट्टामुळे तयार झाला आणि आता हे सगळं समजलं तर..." पद्मा
" कस समजेल सांगितलं नाही तर... पद्मा काहीही सांगायचं नाही. माझ्या मुलीला तो मुलगा आवडला आहे मी तिच्यासाठी काहीही करेन..." विजय
"तुमच्या दोघांचं डोकं फिरलंय... त्यांचं एकमेकांवर प्रेम असेल न तर ते कधीच तिसऱ्या व्यक्तीला मध्ये येऊ देणार नाहीत याचा त्रास तुला होईल आर्या... त्यापेक्षा आत्ताच सोड सगळं.. मला माहित नाही हे प्रेम आहे का ती मुलगी तुझ्यापेक्षा वरचढ आहे म्हणून तुला तिच्या होणाऱ्या नवऱ्यावर प्रेम जडलंय?" पद्मा

"ममा तू माझी ममा आहेस की...?" आर्या
"आर्या तोंड सांभाळून बोल अग आई आहे मी तुझी, तुझं कशात भलं आहे हे मला कळत ते तुझ्या डॅडला का नाही कळतं...? आर्या विचार कर हे सगळं चूक आहे आणि तुम्ही दोघांनाही माझं नाही ऐकलं तर मी दादाला सगळं सांगेन." पद्मा रागाने उठून निघून गेली.

"बेटा तू ममाच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस... मी बोलेन तिच्याशी." विजय
"पण बाबा तिने दादाला सांगितले तर दादा कधीच तयार होणार नाही या सगळ्याला."
"तू आहेस की लाडाने त्याला तयार करून घ्यायला पण परत विचार कर नक्की तुला वीर आवडतो का? मी उद्या निघताना येईन तेंव्हा मला सांग तुझा फायनल निर्णय तर पुढे जाऊ..." विजय तिच्या रूममधून बाहेर पडला.

"हो डॅड मला वीर आवडतो. मी त्याच्याशी बोलले नसले तरी मला त्याचे बोलणे आवडते, मला त्याचे कुरळे केस आवडतात, त्याचे पाणीदार डोळे आवडतात, मला त्याची बॉडी आवडते, मला त्याची एक एक गोष्ट आवडते जी आतापर्यंत कोणत्याच मुलामध्ये मला दिसली नाही. मला आतापर्यंत एकही मुलगा एवढा आवडला नाही. मला तो खूप आवडतो , मला वीर खूप आवडतो. त्याला मिळवण्यासाठी काहीही करेन. मी त्या क्रांतीला त्याच्यापासून वेगळ करेन..." आर्याने शेजारचा काचेचा ग्लास घेतला आणि जोरात फरशीवर आपटला.


क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत.


इतर रसदार पर्याय