Geet Ramayana Varil Vivechan - 3 books and stories free download online pdf in Marathi

गीत रामायणा वरील विवेचन - 3 - उगा का काळीज माझे उले?

सर्वथा संपन्न समृद्ध अश्या संसारात राजा दशरथ व त्यांच्या भार्यांना एकच शल्य खुपत होतं ते म्हणजे पुत्र नसणे.

त्याच व्यथेत विचार करीत कौसल्या देवी आपल्या राजवाड्यातील उपवनात बसलेल्या असतात. सहज त्यांचं लक्ष फुलांनी लगडलेल्या लतिकेवर जाते आणि त्यांना विषाद वाटतो. त्यांचं मन व्याकुळ होते.

त्या विचार करतात:

'पहा ह्या वेलीला सुद्धा भरभरून फुले आहेत पण माझ्या संसारवेलीवर एकही पुत्ररूपी फुल नसावं हे किती दुर्दैव आहे. आजपर्यंत कधी मनात वाईट विचार आला नव्हता,कधी कोणाचा हेवा वाटला नव्हता. एवढंच कशाला कधी दोन सवती असून त्यांच्या प्रति कधी मत्सर मला वाटला नाही पण आज ह्या फुलांनी समृद्ध अश्या वेली बघून मला खूप हेवा वाटतो आहे.

मनाला आज काय झालं कळत नाही! मन असं विचित्र का वागतेय काही कळत नाही! हरिणी आणि तिचे गोजिरवाणे पाडस बघून आज कौतुक वाटण्याऐवजी मत्सर का वाटतोय? का सारखे डोळे भरून येतात? गाय आणि वासरू बघितलं तरी मन व्याकुळ होते. मन आतल्या आत चरफडतेय. बघा त्या फांदीवर एक पक्षिणी तिच्या पिलांना दाणे भरविते आहे ते बघून सुद्धा मला अस्वस्थ वाटावे असे मला हे विपरीत काय होतेय? कुठेच मनाला शांती का वाटत नाही?

स्वतः जवळच स्वतः च्या भावना लपवून काय फायदा? मला कळतेय स्त्री ही वात्सल्यविना अपूर्ण आहे. देवाने स्त्रीला जीवनिर्मिती चे वरदान दिले आहे. जोपर्यंत स्त्री मूल निर्माण करत नाही तोपर्यंत तिला तिचे आयुष्य सार्थकी लागल्या सारखे वाटत नाही. पाषाणापासूनही मूर्ती निर्माण होते मग ही कौसल्या पाषाणापेक्षाही कमी आहे का? तिच्यातून एखादा सजीव पुत्र का निर्माण होत नाही? हेच विचार करून डोकं व्यापून गेलंय आज.

जर मी वृद्ध झाली म्हणावी म्हणून मला मूल होत नाही असं म्हणावं तर मग हे आकाश ! हे तर किती वृद्ध आहे तरी सुद्धा त्यातून असंख्य तारका जन्म घेतात मग मला एकही पुत्र न व्हावा असे का? असे पुत्रा विना जीवन जगणे व्यर्थ वाटते आहे.'
अश्या विचारांमध्येच त्यांचे दिवस आणि रात्र व्यतीत होत असतात. कौसल्या देवींना पुत्रप्राप्ती ची आस आणि ध्यास लागला होता.

(त्रेता युगातील हा काळ आहे त्या काळात पुत्राला अनन्यसाधारण महत्व होतं. त्यामुळे स्त्रियांना सुद्धा मग ती सामान्य स्त्री असो की असामान्य राणी पुत्रप्राप्ती हेच स्त्री जन्माचे सार्थक असे वाटायचे. त्याव्यतिरिक्त राज्य सांभाळण्यासाठी पुत्र असावाच असं त्यांना वाटत होते.)

(रामायणात पुढे काय घडते ते पाहू उद्याच्या भागात. जय श्रीराम🙏)

उगा का काळीज माझे उले?
पाहुनी वेलीवरची फुले।।धृ।।

कधी नव्हे ते मळले अंतर
कधी न शिवला सवतीमत्सर
आज का लतिका वैभव सले
पाहुनी वेली वरची फुले।।१।।

काय मना हे भलते धाडस?
तुला नावडे हरिणी-पाडस
पापणी वृथा भिजे का जले?
पाहुनी वेली वरची फुले।।२।।

गोवत्सातील पाहुनी भावां
काय वाटतो तुझसी हेवा?
चिडे का मौन तरी आतले?
पाहुनी वेली वरची फुले।।३।।

कुणी पक्षिणी पिलां भरविते
दृश्य तुला ते व्याकुळ करते
काय रे विपरीत हे जाहले?
पाहुनी वेली वरची फुले।।४।।

स्वतः स्वतःशी कशास चोरी?
वात्सल्यविण अपूर्ण नारी
कळाले सार्थक जन्मांतले
पाहुनी वेली वरची फुले।।५।।

मूर्त जन्मते पाषाणातून
कौसल्या का हीन शिळेहुन?
विचारे मस्तक या व्यापिले
पाहुनी वेली वरची फुले।।६।।

गगन आम्हाहुनी वृद्ध नाही का?
त्यात जन्मति किती तारका
अकारण जीवन हे वाटले
पाहुनी वेली वरची फुले।।७।।
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★

उगा का काळीज माझे उले?
पाहुनी वेलीवरची फुले।।धृ।।

कधी नव्हे ते मळले अंतर
कधी न शिवला सवतीमत्सर
आज का लतिका वैभव सले
पाहुनी वेली वरची फुले।।१।।

काय मना हे भलते धाडस?
तुला नावडे हरिणी-पाडस
पापणी वृथा भिजे का जले?
पाहुनी वेली वरची फुले।।२।।

गोवत्सातील पाहुनी भावां
काय वाटतो तुझसी हेवा?
चिडे का मौन तरी आतले?
पाहुनी वेली वरची फुले।।३।।

कुणी पक्षिणी पिलां भरविते
दृश्य तुला ते व्याकुळ करते
काय रे विपरीत हे जाहले?
पाहुनी वेली वरची फुले।।४।।

स्वतः स्वतःशी कशास चोरी?
वात्सल्यविण अपूर्ण नारी
कळाले सार्थक जन्मांतले
पाहुनी वेली वरची फुले।।५।।

मूर्त जन्मते पाषाणातून
कौसल्या का हीन शिळेहुन?
विचारे मस्तक या व्यापिले
पाहुनी वेली वरची फुले।।६।।

गगन आम्हाहुनी वृद्ध नाही का?
त्यात जन्मति किती तारका
अकारण जीवन हे वाटले
पाहुनी वेली वरची फुले।।७।।
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED