मल्ल प्रेमयुद्ध - भाग 42 Bhagyashali Raut द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 42

मल्ल प्रेमयुद्ध

साठेसरांबरोबर सगळे स्टुडन्ट इंटरनॅशनलच्या तयारी जोमाने लागले होते. काही करून वीरचा नंबर मिळवायचा होता कारण आबांना भेटून आल्यानंतरच घडलेला प्रकार विजयने सांगितला तेव्हापासून तिला थोडी तरी आशा होती की, वीर आपला होईल. म्हणून खेळावर कमी आणि तीच वीरकडे जास्त लक्ष होतं.
साठे सरांनी दोन-तीन वेळा बजावल.
"आर्या खेळावर लक्ष दे..."
पण नाही प्रेमात इतकी वेडी झाली होती की तिला वीर शिवाय काहीच दिसत नव्हतं. चुकून वीरची नजर आर्यकडे गेली. त्याच्या लक्षात येत होतं की आपल्याकडे बघती. तिच्या डोळ्यात प्रेमाशिवाय काही दिसत नव्हतं. तो स्वतःहून आर्याकडे गेला.
" आर्या मला तुमच्याशी बोलायचय."
क्रांती आणि रत्ना तिरक्या नजरेने त्या दोघांकडे बघत होत्या. वीर काय बोलतोय याची उत्सुकता क्रांतीला लागली होती. क्रांतीची प्रॅक्टिस करून झाली होती. ती लाकडी बाकड्यावर जाऊन बसली बागेतली बॉटल काढली आणि घटाघट पाणी प्यायले. तिच्याजवळ साठे सर आले.
" क्रांती आणि रत्ना तुमची तयारी एकदम भारी चालू आहे. मला आनंद होतोय की मला या महिन्यात तुम्हाला जास्त शिकवावे लागलं नाही. ज्या गोष्टी तुम्हाला सुरुवातीला अवघड गेल्या त्यात खूपच सोप्या जातात."
साठेसर जरी बोलत होते तरी क्रांतीच सगळं लक्ष वीर आणि आर्याकडे लागलं होतं. क्रांतीने परत एकदा ओठांना पाण्याची बॉटल लावली आणि संपवली. साठेसर तिच्याकडे बघत होते. "क्रांती तुमचं लक्ष नाहीये का?"
"नाय सर नाही सर असं काय नाय माझं लक्ष होत तुमच्या बोलण्याकडं."
" नाही तुमचं लक्ष सगळं वीरकडे म्हणून म्हटलं."
"सर लग्नाला फक्त महिनाच राहिला, आठ दिवस आधी तरी मला जाव लागल."
" काही हरकत नाही त्या आठ दिवसाची प्रॅक्टिस जर तुम्ही आधी केलीत आताच्या दिवसात भरून काढली तर मला तुम्हाला पाठवायला काहीच प्रॉब्लेम नाही फक्त सकाळ-संध्याकाळ जे काय आपण प्रॅक्टिस करतो ती वेळ काढून तिकडे करा म्हणजे झाल."
साठे सरांकडून परमिशन मिळाल्यावर क्रांतीला आनंद झाला. तेवढ्यात रत्ना म्हणाली "सर मला पण जाव लागल पण मी नंतर जाईन चार दिवस आधी.. " साठे सर हसले. साठे सरांचा बदललेला स्वभाव बघून क्रांतीला बरं वाटल.ती म्हणाली,
" रत्ना साठे सर फाईट पासून बरेच बदलले."
" क्रांती त्यांचे डोळे पुर्ण उघडल तूझा खेळ बघून... पण हीच कधी उघडायचं काय माहित आणि वीर दादा पण गेलाय तिच्याशी बोलायला काय बोलतोय काय माहिती."

"मला माहिती हाय गेले दोन दिवस झालं आर्या टक लावून त्यांच्याकडे बघती, मी बऱ्याच वेळा बघितल तिच्याकडे माझ्या लक्षात आल आणि वीरच्या पण ते लक्षात आलं असणारे आणि मला माहितीये ते काय समजवायला गेले.
दुपार होऊन चढणीला लागलं होतं पण बाहेर येऊन बोलल्याशिवाय वीरला पर्याय नव्हता. त्याने सूर्याकडे बघितले आणि त्याचे डोळे दिपले. त्याचे डोळे बघून आर्या परत त्याच्याकडे बघतच बसली. तिने पटकन त्याचा हात घट्ट पकडला आणि लगेच म्हणाली,
" तुझ्या छोट्या छोट्या गोष्टींच्या प्रेमात मी पडायला लागलीये." त्याला दोन मिनिटं काहीच सुचलं नाही त्याने तिचा हात पटकन सोडवून घेतला.
" आर्या दोन दिवस झाल मी बघतोय आणि माझ्या वडिलांचा पण फोन आला मला आबांनी मला सांगितलं तुमच वडील गेल होत माझ्या घरी , आणि हे चुकीचे हाय माझं ज्या पोरीवर प्रेम नाय तिच्याबरोबर मी लग्न करायचं शक्यच नाय, माझं पहिलं प्रेम क्रांती आणि तिच्याशीच लग्न करणार... दोन दिवस झालं तुमचं सगळं बघतोय तुम्ही एकटक बघता. भऊ साठे सरांना पण समजल असल सगळ, आजूबाजूची आपल्या बरोबरची जी पोर पोरी बघत्यात आपल्याकड... हे योग्य नाय, थांबवा हे ... मी कधीच तुमच होऊ शकणार नाय."
आर्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. तिने डोळे वर करून वीरच्या नजरेत बघितला तिला स्पष्ट दिसत होत, त्याचं प्रेम नाही आपल्यावर पण तरीही गयावया करायला लागली. तिने त्याच्या दोन्ही दंडांना पकडले.

" वीर पण माझं प्रेम आहे तुमच्यावर खुप प्रेम आहे तुझ्यावर.. आयुष्यात मागं-पुढं इतकी मुलं फिरली पण मी कोणाला भाव सुद्धा दिला नाही पण तुझ्यासारखा गावंढळ पोरगा मात्र माझ्या मनात भरला. तुझी छोटी छोटी गोष्ट आवडते रे मला आणि मला तूच पाहिजे. वीरने पटकन दोन्ही हात झटकले आणि म्हणाला, "अरे तुम्हाला किती वेळा सांगायचं माझं तुमच्यावर प्रेम नाय आणि मी तुमचा होऊ शकणार नाय, माझं फक्त क्रांतीवर प्रेम हाय आणि महिनाभरात आमचं लग्न सुद्धा व्हणारे."
आर्या मटकन खाली बसली आणि म्हणाली,
" तू माझ्याकडे ये तुला हवं ते कर, हवं तसं राहा, राजासारखा राहशील, त्या मुलीबरोबर लग्न करून काय होणार आहे." वीरला राग येत होता तरी तो शांत बसला होता. आर्याने दोन्ही हाताच्या मुठी घट्ट आवळला होत्या आणि ओरडून ओरडून बोलत होती. वीर तिला शांत करायचा प्रयत्न करत होता.
"अहो मोठ्यान बोलू नका सगळे भायर येत्याल."
" येऊ देत मी कोणालाच घाबरत नाही हे माझ्या वडिलांचं कोर्ट आहे, हे माझं आहे, तू कोठे उभा राहिलास , तुझी लायकी तरी आहे इथे उभी राहायची."
आर्या आता वीरच्या डोक्यात गेली होती.
" म्हणजे पैसे भरून आलोय का इथं तुझ्या प्रेमासाठी, का माझी लायकी काढतीस ? का तुझ्याशी टुकार पोरीवर प्रेम करायला उभा नाही इथं..." आर्य मोठ-मोठ्याने ओरडत होती.
" वीर माझं प्रेम आहे तुझ्यावर वीर मी तुला मिळवणारच काही करून ...काहीही करेन, आकाश पाताळ एक करेन पण मी तुला मिळविणारच..."आर्या ओरडून ओरडून बोलत होती. वीर निघून गेला. तिच्या सगळ्या मैत्रिणी पळत बाहेर आल्या आणि तिला पकडले. " काय झालं?" प्रियांका म्हणाली. तिने हात झिडकारला आणि म्हणाली,
" वीर फक्त माझा आहे आणि त्याला माझ्यापासून कोणीच वेगळं करु शकणार नाही त्यासाठी मला जे काही करावे लागेल ते मी करेल. गावंढळ पोरीच्या प्रेमात पडतोय मला सोडून मला लाथाडून... वीर भोग तुझे परिणाम बघ मी काय करते..." आर्याच्या डोळ्यात पाणी होते... आणि त्याबरोबर डोळे आग आणि राग ओकत होते. तिचा हा हट्टीपणा सगळ्या मैत्रिणींना माहीत होता. त्यावेळी कोणी काहीच बोलले नाही.

जवळजवळ 2 फुलस्केपची पानभर सुलोचना बाई आणि तेजश्रने यादी काढली होती.
"आत्याबाई एवढ्या बायकांना साड्या घ्याव्या लागणार हायत अजून कोण राहिल असल तर आठवतय का बघा? गावातल्या जवळजवळ सगळ्या बायकांना पण साड्या देणारे.."
" व्हय तुमच्या लग्नात पण केलं व्हत सगळ्यांना... लोक पाटलाच्या पोराचं लग्न म्हटल्यावर अपेक्षान येत्यात ग... रिकाम्या हातान कसं पाठवायचं, म्हणून घिवू सगळ्यांना साड्या... आता मला सांग पाहुणेरावळ्याची यादी काढली का? " ती यादी काढून झाली फक्त एकदा वाचून घ्या म्हणजे झालं म्हणजे आम्ही जायला मोकळ..."
सुलोचनाबाईंनी दुसरी पाहुण्यांची यादी डोळ्याखालून घातली. जवळजवळ दीडशे ते दोनशे साड्या द्यायला आणायच्या होत्या. आबा तेवढ्यात आले. " झाली का सुनबाई यादी काढून?"


2000 च्या नोटीची दोन-तीन बंडल त्यांनी तेजस्वी हातात दिले. "आबा एवढा पैस?"
"संग्राम कड द्या ठेवायला लागतील, लागत्याल तस काढून घ्या म्हणजे परत परत मागायला नको बर..."
तेजश्रीला एवढे पैसे बघून डोळे मोठे झाले होते. एवढे पैसे बघितल होत तिने तिच्या घरी पण तिच्या हातात कधी असे पैसे मिळाले नव्हत. आज आबासाहेबांनी पहिल्यांदा इतकी मोठी जबाबदारी टाकली होती तिच्यावर आणि तिला ती सार्थ करून दाखवायची होती. संग्राम आवरुन खाली आला.
" तेजश्री आवरलं का दहाच्या आत निघून म्हणजे पटपट खरेदी करून यायला उशीर होईल नायतर आपल्याला."
आबा म्हणाले, "संग्राम आणि तेजश्री आता पोटभर नाश्ता करा आण तालुक्याला गेल्यावर पोटभर जेवा... उपाशी बसू नका... पैसे भरपूर दिलेत तेजश्रीने पैशाचे बंडल संग्रामच्या हातात समोर धरले. संग्रामने एवढे पैसे आबांच्या तिजोरीत पाहिले होते. पण आपल्या हातात एवढे पैसे तेजश्री देते और म्हटल्यावर आ वासला."एकदम एवढे पैसे नको... हे एकच बंडल या बाकी तुमच्याकडे ठेवा लागलं तर मी घेतो."
" तुला लागत्याल तस तुझ्याकड ठेव परत परत नको मागायला म्हणून..."
" बर बर ठीक हाय पण मी सगळं झाल्यावर बाकीच पैस तुमच माघारी करणार." आबा हसले संग्राम आणि तेजश्री बाहेर पडले.
" पाटलांची थोरली सून शोभून दिसते ना...पोर पदर खोचून लग्न ठरल्यापासून कामाला लागली उनातानाची पर्वा करत नाही आवडती की पळते सगळ निर्विघ्न पार पडू देत म्हणजे झाल." सुलोचनाबाई.
" व्हय पडल निर्विघ्नपण कार्य पार, काळजी करू नका."
"तुमी हाय म्हटल्यावर कशाला मी काळजी करती..." सगळं ठीक व्हईल. दादाना फोन करा आणि त्यांना काय मदत पाहिज असल तर बघा." सुलोचना म्हणाले.
" व्हय बरं झालं आठवण केली आजच दादांना फोन करतो कारण दोन दिवसातच वीर आणि क्रांती घरला येणार हायत त्यांची तयारी पण व्हायची नाय का दादा साहेबांशी बोलून घेतो मी बाकी सगळ्या गोष्टी ...." आबासाहेबांनी हातात फोन घेतला.