Mall Premyuddh - 43 books and stories free download online pdf in Marathi

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 43













मल्ल प्रेम युद्ध


सुलोचनाबाई दरवाजा मध्येच ओवाळण्याचे ताट घेऊन वीरची वाट बघत थांबले होत्या. बाबा हॉल मध्ये येरझाऱ्या घालत होते.

"सुलोचनाबाई अहो आत्या वीर आले की मग बाहेर या ओवाळायला उगा कशाला खोळंबताय दरवाज्यात?"

एक नजर सुलोचना बाईंनी बाबांकडे बघितले आणि परत दरवाज्याकड बघितल. तेजश्री गालातल्या गालात हसायला लागली.
"आबा आत्याबाई काही ऐकणार नाय... त्या भाऊजी आल्याशिवाय काय आत येणार नायत... तुम्ही त्यांना आता काय सांगू नका" आबा आणि तेजश्री हसायला लागले.
" हसा बाई हसा काय आता तुमाला काय कळनारे आईची माया..." सुलोचनाबाई रागाने म्हणाल्या.
"अहो तुमचं गुडघे दुखतात म्हणून म्हणतोय आत येऊन बसा आल्यावर मग घ्या करून औक्षण..." तेवढ्यात आबांचा फोन वाजला वीर चा होता.
" हॅलो आबा यायला उशीर व्हईल थोडी खरेदी करतो, क्रांतीला सोडतो आणि मग येतो. आईला सांगा वाट बघू नको. दादा हाय माझ्याबर... निघताना फोन करतो. वीरन एवढ बोलून फोन ठेवून दिला.
" ऐकलं का ??? वीर चा फोन आला व्हता यायला उशीर होणार हाय त्याला."
"का काय झालं?" आबांनी फोनवरचं संभाषण सगळं सुलोचनाबाई आणि तेजश्री ला सांगितल.
सुलोचनाबाई चेहरा बारीक करून सोफ्यावर बसल्या.
"हे असं असतं व्हय घरी येऊन जेवून खाऊन मग जायचं ना..." आमचं डोळ वाटेकड लागल्यात अहो."
"तालुक्याला परत जाणं काही सोप्प हाय का? येता-येता जात्यात तर जाऊ द्यात की आणि यायच्या आधी फोन करतो म्हणत्यात मग कशाला रागवता."
तेवढ्यात लाइटिंगवाला आला.
" येऊ का आबासाहेब?" सुलोचनाबाई उठून आत गेल्या.
" व्हय या...या.."
" अजून आठ दिवसावर आणि म्हणे आतापासूनच अख्या गावाला लायटिंग करायची. संग्राम दादा म्हणाल मला..."
"व्हय आठ दिवस आधीच करायची आमच्या वीरच लग्न ये.. संग्रामच्या वेळ जशी लायटिंग केली होती तशी नाय यंदा अख्या गावाला कळलं पाहिजे वीरच लग्न हाय. आमच्या घरातलं शेवटचं लग्न... समद गाव लाखकल पाहिजे."
"व्हय आबा पहिलं आख्या वाड्याला लायटिंग करून घेतो आज आणि मग गावाकडे पळतो. गावाचा उरकायला येळ लागलं."
" व्हय पण अगदी खालच्या प्रवेशद्वारापासून ते वरच्या रस्त्यापर्यंत अगदी संपूपर्यंत गावाचा शिव तिथपर्यंत लायटिंग करायची एक घर बी सोडता कामा नाय..."
"ठीक हाय.."
लायटिंग वाल्याने लायटिंग करायला सुरुवात केली तेवढ्यात गाडीचा हॉर्न आला. आता कोण आलं आबांनी डोकावून बाहेर पाहिलं...
" एक-सुंदर-मुलगी गाडीतून खाली उतरली. वाड्यात आत आली.
"नमस्कार आबासाहेब..." आबांचे एकंदरीत व्यक्तिमत्व बघून आर्यांनी ओळखले की हे आबासाहेब असतील. तिने वाकुन नमस्कार केला आश्चर्य वाटलं. ना ओळख ना पाळख ही मुलगी कोण हाय?
"आबा तुम्हाला प्रश्न पडणं साहजिक आहे, मी आर्या मुंबईवरून आले.
"म्हणजे आर्या...." होय आर्या माझे पप्पा तुम्हाला येऊन भेटून गेले.
" बस पोरी..." तेजश्री आबांनी तेजश्रीला पाणी आणायला सांगितल.
" एवढ्या लांबचा प्रवास करून आलाय मग बोलू आपण "आबासाहेब बसायला वेळ नाही मला खूप महत्त्वाचं बोलायचे तुमच्यासोबत..."
" पोरी आम्हाला माहितीये तुला काय बोलायचे ते हे बघ आलीस ये पाहुणचार घे आणि काहीही न बोलता जा... कारण तुझ्या मनात जे आहे ते शक्य नाय."
" पण असं का? माझं प्रेम हे वीरवर..."
" हो हाय की पण एकतर्फी...वीरचा तुझ्यावर प्रेम नाय त्याच फक्त क्रांती वर प्रेम हाय हे मी तुझ्या वडिलांना आधीच सांगितलं व्हतं."
" पण आबा एकदा माझा ऐका मी एकुलती एक, श्रीमंत गडगंज बापाची मुलगी आणि क्रांती गरीब घरातली साधी पोरगी विचार करा आज माझ्या सारखी पोरगी वीरच्या प्रेमात पडली का तो फक्त दिसायला सुंदर आहे म्हणून बाकी काय आहे त्याच्याकडे..."
" पोरी तोंड सांभाळून बोल, त्याच्याकडे काय नाही मग तु तु देणार आहेस का त्याला सगळं?"
" होय आमचं लग्न झालं ना मी त्याला हवे ते देईन... पण माझा तो झाला पाहिजे तुम्हाला किती पैसे पाहिजेत बोला मी तेवढे द्यायला तयार आहे पण मला वीर हवाय..."
"पोरी लई हुशार हायस ग तू आयुष्यात सगळ्याच गोष्टी पैशाने घेता येत नायत माझा मुलगा काय विकायचा नाय मला?"
" मी कुठे म्हटलं विका म्हणून ? फक्त मला वीर हवाय आबा माझं जिवापाड प्रेम आहे त्याच्यावर." आर्या उठली तिने आबांचे पाय पकडले.
"अग पोरी हे काय करती." आबांचा आवाज ऐकून तेजश्री आणि सुलोचनाबाई उठून बाहेर आल्या.
" कोण हाय ही आव?"
"ही... आर्या..."
"उठ पोरी... अग अशी काय करतीयास..." सुलोचनाबाई आर्याजवळ गेल्या.
"आई मला फक्त वीर पाहिजे... बघा तो ऐकत नाही.."
"हे बघ पोरी ने शक्य नाय त्याच्या मग कशाला लागायचं. दोन घास खा अन परतीच्या प्रवासाला निघ..."
"मी इथून कुठेही जाणार नाही... जोपर्यंत वीर मला हो म्हणत नाही तोपर्यंत मी इथंच बसणार बघू कस लाग होतंय?" आता मात्र घरात सगळ्यांना टेन्शन आले. आर्या उठुन सोफ्यावर बसली.
आता काय करायचे कोणाला सुचत नव्हते. तेवढ्यात दुउसरी गाडी येऊन दरवाजात थांबली.
"वीर आला वाटत???" सुलोचनाबाई म्हणाल्या.
"नाय हे दुसरं कुणीतरी आलय..." सुलोचनाबाईनी पाहिलं आणि पाय मागे घेतला.

"कोण???" आबासाहेब म्हणाले.
"मी आर्याचा मोठा भाऊ...." आलोकचा आवाज ऐकून आर्या जागेवर उभी राहिली.
"आर वा आता तुम्हीपण आलात व्हय बहिणीच्या माग आम्हाला पैशाच अमिश दाखवायला..." सुलोचनाबाई बोलल्या.
"आव शहराच्या माणसाचं स्वभाव अमास्नी न्हाय कळत पण आमच्या पोरांची मन कळत्यात... तुम्ही पण ह्याच व्हायचं ना... का पोरांच्या आयुष्याची वाट लावलाय... बास झालं व लई समजावलं तुमच्या बहिणीला अन वडलांना पण हे ऐकायच्या मनस्थितीत न्हाईत अन आता तुम्ही आलाय..." आबा
"माफ करा आबासाहेब आम्हाला यातलं काहीच माहीत नव्हतं पण प्रकरण हाताबाहेर जायला लागलं अन आम्हाला समजलं तुम्ही काहीही काळजी करू नका ... मी घेऊन जातो हिला..."
आलोकने आर्याच्या हात पकडला.
"दादा प्लिज मला नाही यायचं मी वीरला भेटल्याशिवाय नाही येणार...दादा माझं प्रेम आहे वीर वर..." आर्याने जोरात आलोकचा हात झटकला.
"आर्या..." आलोक जोरात ओरडायला आणि आर्याच्या कानाखाली दिली.
"हो दादा मार मला अजून.... पण मी नाही येणार ..."
"आर्या वेड लागलंय तुला समजत नाही का तुला? तुला यालाच लागेल... माने मला सांगितलं म्हणून मला सगळं वेळेत समजले."
"दादा तू काहीही कर पण मी येणार नाही... माझं खूप प्रेम आहे वीरवर अन मी त्यालाही माझ्यावर प्रेम करायला भाग पाडेन मला हवा आहे दादा... दादा तू माझ्यासाठी काहीही करतोस वेगवेगळ्या देशातून हव्या त्या वस्तू मला आणून देतोस अगदी हव्या त्या... मग वीरतर एक छोट्या खेड्यातला मुलगा आहे. काय फरक पडतो तुला शक्य आहे दादा... तुला सहज शक्य आहे. तू काहीही करू शकतोस... दादा प्लिज दादा...." आर्या गयावया करत होती ते बघून आलोकचे मन कळवलं.
"आर्या का वेड्यासारखं वागतीयेस...? अग तुझं एकतर्फी प्रेम आहे. त्याचं लग्न ठरलंय का आयुष्य उध्वस्त करतेस तुमच्या सगळ्यांच..."
"दादा माझ्यासोबत लग्न झालं न की टतो आपोआप माझ्यावर। प्रेम करायला लागेल. आणि करेल तो... पण त्या मुलीचं लग्न माझ्या वीरसोबत होता कामा नये. दादा तुझ्या या लाडक्या बहिणीचं एवढं सुध्दा ऐकणार नाहीस का तू... तू नेहमी म्हणतोस ना की तुला हवं ते देईन मग आता का नाही..."

"कारण तू चुकीची मागणी करतीस बाळा... हे सोडून जे काही मागशील ते देईन पण आत्ता निघुया..."

"नाही दादा मी नाही येणार... " आर्या पुन्हा तिथेच बसली. आलोकला काय करावे समजत नव्हते.
"आर्या तुला आजीची शपथ आहे... चल.."
आर्या सैरभैर झाली. तिला काहीच सुचत नव्हते. तिची आजी म्हणजे तिचा जीव होता. काहीही न बोलता ती उठली आणि आलोक पाठोपाठ चालू लागली. आबा, सुलोचनाबाई आणि तेजश्रीने सुटकेचा निःश्वास सोडला.



क्रांतीला बघून आशा आणि दादांचे डोळे पाण्याने भरून आले होते. सोबत वीर होता म्हणून फक्त अश्रू ओघळले नाहीत.

दोघांचे औक्षण आशाने केले. सगळे घरात आले.
"आई केवढं चकचकीत केलाय घर...दादांना कशाला त्रास द्यायचा आता मी आली न मी केलं असत की..." क्रांतीला भानच नव्हते की वीर आणि संग्राम बरोबर हायत...
"तायडे काय म्हणालीस...?" चिनू कमरेवर हात ठेवुन बोलली.
"काय आई हीन केलं... बापरे..." क्रांती हसायला लागली.
"क्रांती आग हसू नको माझ्या पोरीवर खरचं आग लै काम केलं तीन अजिबात आमच्या अंगावर पडु दिल न्हाय..." दादा

"मग त्यांना माहीत हाय की तायडी नंतर आपलाच नंबर हाय मग काय दाखवल त्यांनी की मला पण सगळी काम येत्यात आता माझं बी लग्न लावून द्या..." संग्राम म्हणाला.
"दाजी...?" चिनू चिडून आत गेली.
"बसा जेवायला पान घेते." आशा आत जायला निघाली.

"अहो नको मामी... आई वाट बघून दमली असल... एवढ्यादिवस तिला भेटलो न्हाय ती जेवली सुद्धा नसलं आम्ही निघतो." वीर उठला.
"पण अहो आम्ही स्वयंपाक बनवला होता." आशा
"तुमच्या लेकीला खाऊ घाला आता आम्ही जेवू थेट लग्नात..." संग्रामने आशा दादांना हात जोडून नमस्कार केला. वीर ने दोघांनाही नमस्कार केला आणि निघाले. आता थेट लग्नात भेट होणार हे दोघांनाही माहीत होते. एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून दोघे हरवले होते. चिनूने क्रांतीला हलवले. वीरने पटकन गाडी स्टार्ट केली.

"आई एवढं काय डोळ पाण्यानं भरायची गरज हाय व्हय आता 8 दिवसात तिकडं जायचंच हाय की आपल्यासाठी भरत्याल का बाई कोणाचं डोळ पाण्यानं...?" चिनू उगाचच क्रांतीला चिडवायला लागली. क्रांती आशाच्या गळ्यात पडली. आणि रडायला लागली.
"आई...." क्रांती
"बाळा सुखास जाणार हायस अस रडायचं न्हाय... आमचा काळजाचा तुकडा देताना आम्हालासुदा रडायला येतच हाय की पण मला वाटत सगळ्याच पोरीच्या आयुष्यात ही वेळ येती. तुझं नशीब थोर म्हण तू एवढ्या मोठ्या घरात जाती हायस...अजिबात रडायचं न्हाय हसतमुख जायचं अन हसतहसत त्यांच्या घरचं माप ओलांडायच..." दादांनी क्रांतीच्या पाठीवरून हात फिरवलातशी क्रांती मागे फिरून दादांच्या गळ्यात पडली. दादांनी तिला शांत केले.
"तायडे तुझ्या साड्या बघ आल्यात." चिनूने एवढ्या मोठ्या पिशव्या बाहेर आणल्या.
"बापरे एवढं???" क्रांती
"आग तुझ्या जावेने आणून दिलंय सगळं आणि एवढं पण म्हणाली क्रांतीला नाय आवडल्या तर बदलून आणू." आशा म्हणाली.
"तायडे हा शालू बघ!" क्रांतीने आश्चर्याने त्या शालूकडे पाहिले.
"एवढा भारी..."



"आत्या भाऊजी आले..." तेजश्रीने जोरात आवाज दिला.
सुलोचनाबाई लगबगीने खाली आल्या ओवळणीचे ताट आणले आणि वीरला ओवाळले. वीर आबा, आई दोघांच्या पाया पडला. तेजश्रीने वीरला ओवाळले. भाकरीचा घास उतरून टाकला.
वीर खूप दिवसांनी वाद बघतोय अस त्याला वाटत होतं संध्याकाळ होत आली होती. वीरने वाड्यात पाऊल ठेवले तोच आबांनी लाईटचे बटन दाबले. अख्या वाड्याला केलेली लाईट बघून सगळ्यांचे डोळे मोठे झाले. हा वाडा वाटतच नव्हता.

"आबा अशी लायटिंग केली की असवाटतच नाय की वाड्यात उभं हाय वाटतय कुठं स्वर्गात आलो की काय" संग्राम सगळ्या वाड्याभर नजर भिरवत म्हणाला.


"अहो आबा अजून लग्नाला आठ दिवस हायत मग आत्तापसन कशाला हे ??"वीर म्हणाला
"आव उद्या तुमची आत्या सगळ्यांना घिऊन येणारे म्हंटल्यावर लगीनघर झालच की अन लगीनघर म्हंटल्यावर सजवाय नको..." आबा
तेजश्रीने पाण्याचा तांब्या आणि संग्राम आणि वीरच्या हातात ठेवला.
"वीर ते...."सुलोचनाबाई
"काय आई काय झालं?"वीर
"आव त्यांना बसुद्या मग सांगू... की निवांत.." आबा
"आबा नक्की काय गंभीर झालाय व्हय आताच सांगा." वीर
आबांनी एकदा सुलोचनाबाईनकडे बघितले आणि वीर आणि संग्रामला सगळ सांगून टाकले.
"बट्या पोरीची ही हिम्मत अशी कशी घरापर्यंत आली." संग्राम रागात बोलला.
"पण आता न्हाय येणार..." वीर
"कशावरून??? तीन लग्नात काय तमाशा केला तर?" तेजश्रीने शंका काढली.
"वहिनी ती अशी काय बी करणार नाय करण इथं यायच्याआधी मी तिच्या भावाला भेटून आलो म्हणूनच तो इथपर्यंत आला अनु तिला घेऊन गेलाफयाने माझी माफी सुद्धा मागितली."
"अरे देवा बर झालं आता तुझ्या लग्नात कोणताही विघ्न यायला नको." सुलोचनाबाई म्हणाल्या

"अग आपली पोर असताना कस संकट येईल काळजी करायची काय बी जण न्हाय चला लागा तयारीला..."

सुलोचनाबाईंनी मनोमन देवाला नमस्कार केला. तेवढ्यात परत गाडीचा आवाज आला.
"आर देवा आता कोण???" सुलोचनाबाई
"भूषण्या असलं..." वीर उठून बाहेर आला तर ऋषीची गाडी होती उद्या येणारी पाहुणे आजच आले होते. घरात नुसता जल्लोष झाला. स्वप्ना वीरच्या गळ्यात पडली. ऋषि तिच्या मागून गळ्यात पडला.
"अरे हो ही माझा जीव घेता की काय???" वीर म्हणाला तसे सगळे हसायला लागले.
"आता वाटतय लग्नघर..." तेजश्री म्हणाली.
तेवढ्यात पुन्हा गाडीचा आवाज आला.
"आता नक्कीच भूषण्या असणार.... "तोच स्वप्ना लाजली. सगळे पुन्हा हसायला लागले.




क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत


(पुढच्या भागात क्रांतीवीरची हळद आहे. नक्की मजा मस्ती अन धमाल येणार नक्की वाचा... आणि अभिप्राय द्या मी वाट बघत . तुमचीच भाग्या....)


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED