भाग – १०
तेव्हा निलेश चीढून म्हणाला, “ बास कर तू स्वतःचे सामर्थ्य पुराण बोल कशासाठी तू मला भेटण्यास आतुर होतीस.” तेव्हा सावली बोलली, “ मला तुझ्या तोंडातून सत्य ऐकायचे आहे जे तू नाही बोललास आजवर.” मग निलेश थोडा सावध झाला आणि जोरात हसत म्हणाला, “ ओ हो तर तू माझ्या तोंडून मी काय केले आणि काय नाही हे बाहेर काढून पुरावे शोधण्यासाठी आलेली आहेस.” तेव्हा सावली म्हणाली, “ नाही मी ते नाही करायला आलेली आहे.” तेव्हा मध्येच निलेश बोलला, “ मला शिकवू नकोस तू एकटी तर आली आहेस परंतु सोबत काहीतरी घेऊन आलेली आहेस ज्याचा सहाय्याने तू माझे बोलने रेकोर्ड करशील आणि पुरावा म्हणून तू तो न्यायालयात वापरशील.” तेव्हा सावली बोलली, “ नाही असे काही नाही मी सत्य बोलतेय.” तेव्हा निलेश बोलला, “ नाही मला तुझ्यावर विश्वास नाही आहे. मला तुझी तपासणी करावी लागेल.” तेव्हा सावली विचार करून बोलली, “ ठीक आहे तू मला तपासू शकतो तुझी शंका दूर झाल्यावर तू मला सत्य सांगायचे,” मग निलेश सुद्धा मर्दानगीचा भारात बोलला, “ ठीक आहे मी सत्य सांगणार तुला १०१%.” मग सावली उत्तरली, “ तर कर माझी तपासणी मी प्रत्येक परीक्षेसाठी तयार आहे .”
मग निलेशने सावलीचा अंगाला स्पर्श मरून तपास करण्यास सुरुवात केली. आधी तो सावध होऊन सावलीचा कापडांचा एक एक भाग तपासू लागला. परंतु काही वेळाने त्याला जाणवले कि त्याला एका तरून सुंदर मुलीचा सर्वांगाला कुठलल्याही नकाराशिवाय स्पर्श करायला मिळत आहे. तर तो आता आपले ध्येय विसरून फक्त आणि फक्त सावलीचा मादक देहासोबत खेळू लागला होता. तो तपास करण्याचा बहाण्याने सावलीचा नको त्या अंगाला स्पर्श करून, नको त्या कापडात हात घालून तिचा मादक शरीराला स्पर्श करण्याचा आनंद भोगू लागला होता. त्याचा नादात तो हे विसरून गेला होता कि त्याला काही शोधायचे आहे. इकडे पण सावलीला संपूर्ण कळत होते तपासणीचा बहाण्याने निलेश तिचा अंग अंग स्पर्श कोणत्या भावनेने आणि नियतीने स्पर्श करतोय कि काय करतोय याची तिला संपूर्णपणे जाणीव होती. तशी सावली कराटे शिकून त्यात ब्ल्याक बेल्ट होती. अशा लोकांना ती तर तिचा शरीराला एक बोट सुद्धा लावू देऊ शकत नव्हती. परंतु कशासाठी ती हे सगळ सहन करत होती ते तिलाच माहित होते. निलेश आता सर्रास सावलीचा विनयभंग करत राहिला आणि मग सावलीने त्याला स्वतःपासून लांब सारून म्हणाली, “ झाली तुझी शंका दूर, सापडली कुठली वस्तू.”
तेव्हा निलेश त्याचा उन्मादातून जागा झाला आणि म्हणाला, “ नाही काहीच नव्हत तू खर बोलत होतीस.” मग सावली ताडकन बोलली, “ तर मग मला सत्य काय ते सांग.” मग नाईलाजाने निलेश बोलू लागला. त्याने सांगितले, “ तू मला कॉलेजमधून बाहेर काढून लावलेस तेव्हापासून माझ्या मनात तुझ्याबद्दल चीढ निर्माण झाली होती. मला माहित होते तू त्यापेक्षा आणखी काही करू शकत नव्हती. म्हणून मी तुला फक्त आणि फक्त फोन करून धमकावण्याचा प्रयत्न करणार होतो. जेणेकरून तू घाबरून माझ्यापासून आणि माझ्या कार्यापासून लांब राहशील. तर तुने त्यावेळेस माझ्या धमकीला न जोमानता उलट मलाच धमकी देण्याचा प्रयत्न केलास तर ते माझ्या मार्दानगिला जचले नाही. माझे अंतर्मन मज स्वतःला धिक्कारु लागले होते. म्हणून मी तुला फक्त आणि फक्त पाण्याने भरलेल्या फुग्याने घाबरवण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून तू पोलीस स्टेशनला जाऊन माझ्याबाद्ल तक्रार नाही करू शकली पाहिजे. परंतु तू आणखीनच जिद्द केलीस आणि शेवटी तू नाही करायचे ते केलेच. म्हणून आता माझा राग आणखीनच अनावर झाला होता आणि मीच माझ्या नजरेत पडलो होतो. तर मी फारच मोठा निर्णय घेतला आणि तुला मारण्यास....” निलेश त्याचा पैशांचा आणि तरुणाईचा उन्मादात गर्वात उंच आकाशात उडून बोलत होता.
इकडे सावली त्याचे बोलने स्वतःवर नियंत्र ठेवून ऐकत होती. तिचा मानसिक स्थितीमुळे तिलाही आता राग येणे सुरु झाले होते. तिचाही छातीत आता रागाचा लावा उफाडत होता. तर निलेश मग पुनः पुढे सांगू लागला, “ त्या दिवशी माझ्या डोळ्यांत फक्त आणि फक्त रक्त दिसत होते. कारण कि तुझ्यामुळे मी एकदा पोलीस कोठडी अनुभवली होती ती मला पुनः अनुभवायची नव्हती. म्हणून मी निर्णय घेतला होता कि या वेळेस या समस्येचा अंत एकदम फुल एंड फायनल करायचा. त्याकरिता मी पुष्कळ प्रतीक्षा केली आणि नेमका त्याचा दिवशी ती संधी मला मिळाली. तू रस्तावर गाडीवर बसली होती आणि तुझी बहिण तुझ्या शेजारी उभी होती. तेव्हा मी तुला बघितले होते कि तू गाडीवर बसली आहेस. आता मी तुझ्यावर गाडी चढवण्याची प्रतीक्षा करत होतो कारण मला तुला मारायचे होते आणि तुझी बहीण तेथे उभी होती. म्हणून तुझी बहिण तेथून जाण्याची मी वाट बघत होतो. तेवढ्यात मला माझ्या बापाचा फोन आला आणि मी त्यांचा सोबत बोलण्यास नजर वळवली तेवढ्यात तुझी बहिण गाडीवर बसली आणि तू आत घरात निघून गेलीस. जेव्हा मी नजर वळून तुझ्याकडे बघितले तर मला तू एकटी दिसलीस. त्यानंतर मी गाडी सरळ तुझ्या गाडीवर आणून चढवली आणि निघून गेलो. ”
शेष पुढील भागात...........