कोण? - 11 Gajendra Kudmate द्वारा थरारक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कोण? - 11

भाग – ११

मी तूला गाडीखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न केला परंतु तुझे नशीब प्रबळ आणि तुझ्या बहिणीचे कमकुवत होते. म्हणून तू बचावलीस आणि अकारणच तुझी बहिण मेली नाही परंतु अपंग होऊन बसली आहे बिचारी. तुला मी माझ्या शक्तीची आणि सामर्थ्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न पुष्कळदा केला परंतु तू काही ऐकायला तयार नव्हतीस. आज तुला मी माझ्या चरणात झुकवले आहे. याचे प्रमाण म्हणून आता तुझ्या रसरसीत आणि मादक देहाचे मी मनसोक्त रसपान केले आहे. त्यासाठी तू माझे काहीच वाकडे करू शकत नाहीस. शिवाय तुला कधी मला खुश करण्यासाठी जर मी बोलाविले तर तुला माझ्याकडे कसलाही विरोध केल्याविण यावेच लागेल. एक आणखी पर्याय आहे माझ्याकडे तुझी बहिण ती सुद्धा तुझ्याच प्रमाणे...” असे बोलत असतांना सावली जोरात ओरडली, “ बास आता एक शब्दही पुढे बोलू नकोस अन्यथा फारच वाईट होउन जाईल.” आणि ती आणखीनच रागात येऊन तेथून बाहेर निघाली. तिने पलटून हि बघितले नाही नीलेशकडे आणि ती तशीच बाहेर निघून गेली. बाहेर आल्यावर ती तिचा गाडीजवळ गेली तर तिला आठवले कि गाडीची चावी तेथेच राहून गेली. ती चावी घेण्यासाठी ती आत मध्ये गेली तर काय बघते निलेशचा कंठातून रक्ताची धार निघू लागली. बघता बघता निलेशचे प्राण पाखरू उडून गेले. ते बघून सावली बेशुद्ध झाली आणि काही वेळ तशीच पडून राहिली. काही वेळेने ती शुद्धीवर आली आणि बघते तर निलेश तेथे मृत होऊन पडलेला आहे, परंतु काय आणि कसे झाले ते तिला कळतच नव्हते. सावली ते रक्त बघून किंचाळू लागली आणि इकडे तिकडे घाबरून बघू लागली.

थोड्या वेळाने ती सामान्य झाली आणि आकारणच त्या प्रकरणात अडकण्याच भीतीने ती तेथून गुपचूप निघून गेली. तिला स्मरण झाले कि तिला इस्पितळात जायचे आहे म्हणून ती थेट लपून छपून इस्पितळात सगळ्यांचा नजरेतून लपून तिचा बेडवर पोहोचली. बेडवर ती डोळे बंद करून झोपी गेल्याचा बहाणा करून लेटून राहिली. डोळे बंद करून सावली फक्त त्याच बाबतीत विचार करू लागली होती कि निलेशला कोणी मारले. आमचा दोघांचा शिवाय तेथे तिसरे कोण होते. या विचाराने सावली आता खूपच चिंताग्रस्त झालेली होती. तिचा डोक्यात आता तो तिसरा व्यक्ती कोण आहे ज्याने निलेशला मारले त्याचावर तिची सुई येऊन अटकली होती. दोन दिवसांनी सावंत साहेब इस्पितळात सावलीला भेटण्यासाठी आले. तेथे येऊन सावंत साहेबांनी सावलीला निलेशचा खून झाल्याचा बद्दल सांगितले. तेव्हा सावली आधी थोडी घाबरली आणि मग स्वतःला सावरून सावंत साहेबांना तिने विचारले, “ साहेब कोणी मारले असेल त्याला काही माहित झाले काय?” तेव्हा सावंत साहेब उत्तरले, “ आमचा तपास सुरु आहे. तो एका निर्जन अशा ठिकाणी गेलेला होता. मला वाटत तो कुणाला तरी तेथे भेटण्यास गेलेला होता. नक्कीच त्या दुसऱ्या व्यक्तीने त्याचा वध केलेला असेल. परंतु मला एक गोष्ट कळत नाही आहे, कि त्याची हत्या कशाने केलेली असेल तेथे आम्हाला कसलेच हत्यार भेटले नाही. अशी कुठलीच वस्तू तेथे नव्हती ज्याने एखाद्या मनुष्याचा गळा कापला जाईल.”

सावंत साहेबांचे बोलने सावली लक्ष पूर्वक ऐकत होती परंतु तिची हिम्मत काहीच बोलण्याची होत नव्हती. मग सावलीची आई तेथे आली आणि म्हणाली, “ साहेब काही करा ना मी म्हातारी आणि दुसरी अपंग मुलगी आम्हा दोघींना दररोज इस्पितळात येण्या जाण्याचा त्रास होतो. तर सावलीला घरी नेऊ देण्याची परवानगी द्या ना.” तेव्हा सावंत साहेब म्हणाले, “ हो आता मला वाटते कि तुम्ही लवकरच घरी जाणार कारण कि सावलीवर आरोप करणारा व्यक्तीच मरून गेला आहे. आता आम्ही तपासणी करतोय एखाद आठवड्याने आमचा निर्णय न्यायालयाला सांगून सावलीला येथून सुटका मिळवून देऊ.” तेव्हा सावलीची आई बोलली, “ तुमचे फारच मोठे उपकार होतील आमचावर साहेब.” मग सावंत साहेब बोलले, “ अहो यात कसले आलेत उपकार हे आमचे कर्तव्य आहे. अपराध्याला शिक्षा करने आणि निरपराध्याचा बचाव करने हीच तर आमची ड्युटी आणि कर्तव्य आहे. तुम्ही काही काळजी करू नका मी त्याबद्दल चौकशी करतो आणि लवकरात लवकर तुमचा समस्येचे निराकरण करतो.” सावंत साहेब फारच निष्ठावान आणि कर्तव्यदक्ष असे व्यक्ती होते. ते कुठलेही काम खूपच संयम आणि चौकशीने करत होते. तरीही त्यांना कसलाच सुगावा मिळत नव्हता. त्यांनी घटना स्थळापासून एका श्वान पथकाची मदत घेतली अपराध्याचा शोध लावण्यासाठी. परंतु तो श्वान इस्पितळाचा मार्गात काही अंतर आल्यानंतर तेथेच थांबला. त्या स्थानाचा पुढे त्याला सुद्धा कसलाच सुगावा लागत नव्हता.

एक वेळेस तर सावंत साहेबांना इस्पितळातील कोणातरी एकावर संशय होऊ लागला. त्याबद्दल ते कसलीच चर्चा कुणाशीही करणार नव्हते फक्त आणि फक्त गुप्तपणे याची चौकशी करून या प्रकरणाचा छळा लावणार होते. तर सावंत साहेबांनी म्हटल्या प्रमाणे त्यांचा तपासाची रिपोर्ट न्यायालयात उपस्थित केली. त्याचावर सरकारी वकील आणि सावलीचा वकिलांमध्ये वादविवाद झाला. परंतु निकाल हा सावलीचा बाजूने लागला आणि न्यायालयाने सावलीला सगळ्या आरोपातून मुक्त करून घरी जाण्याची परवानगी दिली.

शेष पुढील भागात........