मल्ल प्रेमयुद्ध - भाग 48 Bhagyashali Raut द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 48

मल्ल प्रेम युद्ध

वीरने इकडेतिकडे शोधला. उशीखाली पुन्हा फोन सापडला.
"चिनूचा फोन राहिला." ऋषि म्हणाला.
"एक काम करा सगळे इथंच बसा कशाला फोनच निमित्त करून येताय सारख..." वीर चिडला. सगळे खो खो करून हसत होत.
" बघितलं का तुमची चांगली माणस..." वीर क्रांतीला म्हणाला.
स्वप्ना भूषणकडे बघटसुद्धा नव्हती. तिने वीरच्या हातात एक बॅग दिली. वीरने ती बाजूला ठेवली.
"वीर..." स्वप्ना
"I love you..." स्वप्ना म्हणाली. सगळे तिच्याकडे बघायला लागले. भूषणला काही सुचत नव्हते. वीरसुद्धा अवाक होऊन तिच्याकडं बघत होता.




स्वप्नाने भूषणला डोळा मारला आणि ती लाजून निघून गेली. भूषण हसला, सकाळपासन आपण याच तीन शब्दांची वाट बघत व्हतो आणि असा सगळ्यांना धक्का देऊन ती तीन शब्द बोलून सुद्धा निघून गेली. सगळेजण हसायला लागले. वीर हसता हसता थांबला आणि म्हणाला,
" आता रात्रभर इथच हसत बसणार हाय का जाणार पण हाय आमची यळ आम्हाला जगू द्यात..." जवळजवळ वीरने सगळ्यांना हाकलून बाहेर लावल... विरने दरवाजा लावून घेतला.
क्रांतीने शालूच्या पदराचे एक टोक हातात धरले आणि त्याच्यासोबत घाबरून चाळा करायला लागली. वीरचे लक्ष तिच्याकडे होते तो तिच्या जवळ गेला आणि दोन्ही खांद्यांना हळुवारपणे पकडले.
" अहो पहिल्यांदाच एकत्र आलोय का आपण या आधी कितीतरी वेळा बोललोय, भेटलोय पण ही वेळ नाजूक हाय हे मलाही माहिती हाय... तुम्ही घाबरून जाऊ नका. इथं शांतपणाने बसा. वीरने तिला पाणी प्यायला दिल. क्रांती थोडी शांत झाली आणि म्हणाली,
" सगळ्याच मुलींना या रात्रीची थोडीशी हुरहुर अन भीती असती मला पण भीती वाटती. याआधी आपण बऱ्याच येळा भेटलोय की बोललो, जवळ आलो पण ही रात्र... वीर तिच्या शेजारी जाऊन बसला. मंद परफ्युमचा सुगंध तिला आला. त्याच्या शेरवानीवर लावलेलं गुलाबाचे फुल त्याने काढले आणि तिच्या हातात दिले. तिने मान खाली घातली गुलाबाचे फुलाचा सुगंध तिने घेतला आणि डोळे अलगद मिटून घेतले.
"क्रांती एक सांगू तुमच्या इच्छेविरुद्ध काय पण व्हणार नाय." क्रांतीने डोळे उघडले. त्याचा हात तिच्या हातात घेतला आणि म्हणाली,

"लग्न झालं त्या क्षणापासन तुम्ही माझ सर्वस्व होऊन बसलाय तुम्हाला मी कसं नाय म्हणू.." क्रांतीने वीरच्या डोळ्यात पाहिल. वीर अधीर नजरेने तिच्याकडे बघत होता. तो उठला आणि म्हणाला, "क्रांती तुमच्यासाठी गिफ्ट आणलया यादिवशी गिफ्ट देतातच बायकोला पण माझ्याकडून काहीतरी यगळे गिफ्ट हाय." तो पटकन उठला आणि स्वप्नाने दिलेली बॅग आणली. पहिल गिफ्ट काढल अगदी नाजूक गळ्यातलं मंगळसूत्र त्याने तिला दिल.
" अहो ही इतकी मंगळसूत्र कशाला?" मला लग्नात दोन आणि आता तुम्ही दिलेल एक..." तर वीर म्हणाला,
" तू काय खेळायला जाताना एवढीच एवढी मोठीच्या मोठी मंगळसूत्र घालणार हायस का? इथं गावात घाल आणि हे आपल्याबरोबर घेऊन चल, मला माहितीय आपल्या संस्काराप्रमाणे तू मंगळसूत्र न घालता कधीच राहणार नायस. म्हणून हे मंगळसूत्र..." क्रांतीला ते मंगळसूत्र इतक आवडलं तिने ते बॉक्स मधन काढलं आणि लगेचच गळ्यात घालायला सांगितल. वीरने त्याच्या हाताने तिच्या गळ्यात ते मंगळसूत्र घातलं. त्याच्या बोटांचा स्पर्श तिला हवाहवासा वाटत होता. तिच्या अंगावर सरसरून काटा येत होता. त्याच्या लक्षात या गोष्टी येत होत्या.
"आता दुसरं गिफ्ट..."
" अजून..."
" हो अजून... पण हे फार असं तुमाला आवडल असं मला वाटत नाय पण हा स्वप्नाचा हट्ट व्हता." त्याने तिला दिलं आणि म्हणाला, "जर हे आवडलं तर घालून या नायतर नको."
तिने पटकन बॉक्स उघडायचा प्रयत्न केला तर वीर मानेनेच नाही म्हणाला, " इथे नाय.. आत जा बघा अन आवडलं तरच घाला. ती हसली आणि आत गेली. बॉक्स उघडून पाहिला तर त्याच्यामध्ये लालबुंद कलरचा नाईट ड्रेस होता. तिने हातात रेशमी तोकडा गाऊन घेतला आणि त्याने चेहरा झाकून घेतला. तिला लाज वाटली.
" असं कसं घालून जाऊ मी वीर समोर... तरी दुसरं मन ऐकायला तयार होत नव्हतं.
" नवरा हाय नवऱ्याचा अधिकार असतो, माझापण त्यांच्यावर हाय त्यांचाही माझ्यावर हाय, मी हे घालणार.."तिने साडी बाजूला काढून ठेवली.
बाहेर विरची तळमळ सुरू होती.
क्रांती नक्की काय करत्याल? चिडत्याल ? रागवत्याल का आणखी काय? त्याला कळत नव्हतं. पहिल्याच रात्री त्याला भांडण नको व्हतं तो गडबडला... नका घालू म्हणायला जावं का? त्यांना राग आला असेल का? नको घालू म्हणू का? अशा हा एक ना हजारो गोष्टी मनात येऊन गेल्या आणि तेवढ्यात दरवाज्याचा आवाज आला आणि त्याची मान तिकडे वळली.

क्रांतीला असं बघून तो बेभान झाला . त्याला काही समजेना. क्रांती या ड्रेसमधी किती छान दिसतायत. त्याचे डोळे भरून पावले. तो तृप्त झाला तो तिच्या जवळ गेला आणि पटकन तिला आपल्या दोन्ही बाहुपाशात उचलून घेतले. तिने तिचा चेहरा दोन्ही हाताने झाकला त्याला आता दुरावा नको होता आणि तिला सुद्धा त्यांनी तिला अलगद बेडवर ठेवलं आणि तिच्या नाजूक ओठांवर त्याचे ओठ टेकवले ते दोघं एकमेकांच्यात गुंतत गुंतत गेले.




"ऋषी आपण वरती टेरेसवर आलोय, पण कोणाला समजलं तर? कुणी येणार तर नाय ना इथ?"
" चिनू गप्प बस आवाज करू नकोस, लग्न झाल्यानंतर सगळे दमून झोपलेत कोणी येणार नाही. आपल्याला ही रात्र आज एकमेकांच्या सोबतीने एकमेकांसोबत घालवायची आहे. यानंतर आपली कधी भेट होईल हे मलाही सांगता येत नाही.
" व्हय का र? असं नको न... तू नको ना एवढ्या लांब शिकायला जाऊ..." चिनूने तोंड बारीक केले.
"चिनू आपल्या आयुष्यासाठी भवितव्यासाठी मला हे करावंच लागणार आहे. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही ही गोष्ट तुला माहितीये."
" पण..."
" पण काय?" ऋषी म्हणाला.
" तिथं.... तुला दुसरी कोणी आवडली तर...?"
ऋषी एका चटईवर तिला घेऊन बसला आणि म्हणाला,
" तू माझं पहिलं प्रेम आहेस किती सुंदर मुली तिथे असल्या तरी मी इतर कोणाचाही होऊ शकणार नाही कारण माझं तुझ्या इतकं प्रेम कोणावरही नसणार आहे." चिनूच्या डोळ्यात पाणी होतं.
"असं नसतं ना ऋषी असं व्हत, तुला दुसरी कोणीतरी आवडली तर?"
" हाच विश्वास आणि प्रेम आहे का तुझं माझ्यावर ? असं कधीच होणार नाही आणि झालं तर मी तुला तसंच स्पष्ट सांगेन ना...?" चिनूने त्याच्या हातावर फटका मारला ऋषी हसायला लागला.
आणि म्हणाला,
" किती वेळा सांगतोय तुला तरी तू परत तेच तेच घेऊन बसतीस. असं नाही होणार मी तुला कधीच अंतर नाही देणार चिनू."
चिनूने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं.
"चिनू मला वाटतं तू सुद्धा तुझं शिक्षण व्यवस्थित पूर्ण कर अर्धवट कोणतीच गोष्ट करू नकोस. तुझ्या डोक्यात जे काही शिक्षणाबद्दल असेल त्यासाठी माझं पूर्ण पाठिंबा असेल तू अजिबात कोणतीही काळजी करू नकोस आणि मधून मधून मी तुला भेटायला येत जाईल आणि तू पण मला भेटायला यायचं बरं..."
" मी..." चिनू मोठ्याने ओरडली.
"हो का मी तुला भेटायला येऊ शकतो मग तू का नाही येऊ शकत? येशील ना?"
" मी नक्की ईल पण आई दादांशी खोटं बोलून नाय येणार ..मी त्यांना सांगीन की मी ऋषीला भेटायला चालली हाय म्हणून, आज बघितलस ना आत्या डायरेक्ट म्हणाल्या दादा आणि आई आता काय बोलले नसले तरीपण त्यांच्या घरी गेल्यावर विषय झाला असणारे नक्कीच... काय झाल मला माहित नाय कारण आई मला काय बोलली नाय. आता मला समजल गेल्यानंतर की त्यांच्या मनात तुझ्याविषयी काय हाय ते..."
"हे बघ चिनू सगळं चांगलंच असणार आहे आणि सगळं चांगलं होईल आपण सकारात्मक विचार करायचा म्हणजे तसंच घडतं अजिबात काळजी करू नकोस तू तुझ्या अभ्यासावर लक्ष दे. बाकी चार-पाच वर्षे काहीही विचार करायचा नाही. वेळ आली की मी दादा आणि आईंना माझ्या आई-वडिलांना घेऊन विचारायला येईल आणि हेच महत्त्वाचं कारण होतं हेच तुला सांगायचं होतं म्हणून मी तुला घेऊन आलो."
" ऋषी माझं तुझ्यावर लय प्रेम हायआणि मी तुझ्याशिवाय कोणत्याच मुलाचा विचार नाय करू शकणार..." मला माहिती नाय आई दादा काय म्हणत्याल पण त्यांचा विरोध असला तरी मी त्यांना स्पष्ट सांगीन केलं तर ऋषी बर लग्न करीन नायतर मीअशीच राहीन." ऋषीने चीनूकडे डोळे भरून पाहिले आणि तिच्या कपाळावर हलकेसे ओठ टेकवले. चीनूने खाली बघितले आणि हसली.
" याच्यापुढे मी नाही जाणार..." ऋषी हसला.



" अहो भूषण मला एवढ्या अंधारात कुठे आणले... ते ही माझे डोळे बांधून सांगा ना"
"अहो थोडंच राहिलय... जरा थांबा...
" पण मी कोणालाच सांगितले नाही आणि वाड्याचा दरवाजा बंद केला तर मी कसं जाणार आत मध्ये?"
" मी यडा असून तुमी माझ्यावर प्रेम कसं केलं बरं? "भूषण म्हणाला.
"काय???" स्वप्ना
"हो तर काय? मी चीनूला सांगून ठेवलंय... मी फोन करतो मग दरवाजा लावला असला तरी चिनू दरवाजा उघडल आणि तुमाला आतमध्ये घेइल."
" अरे बापरे हे कधी झालं ? मला कसं नाही कळलं ?"
"कारण तुमाला सरप्राईज द्यायचं व्हतं. आमच्यासारख्या खेडेगावातल्या मुलांना सुद्धा येत बरं सरप्राईज देता." स्वप्ना हसायला लागली. आणि एके ठिकाणी येऊन दोघेही उभे राहिले. आजूबाजूला खूप थंड हवा होती. भूषण ने त्याचीपण सोय करून ठेवली होती. समोर शेकोटी पेटवली होती आणि अलगद तिच्या खांद्यावर शाल टाकली. डोळ्यांवरची पट्टी काढली. समोरच दृश्य बघून ती हैराण झाली.
" बापरे भूषण मी इतक्या वेळा इकडे आले पण मला हे कधी दिसलं नाही. समोर एक मोठा पाण्याचा तलाव भरलेला होता. त्याच्यामध्ये लाल रंगाची कमळ आली होती. आजूबाजूला गर्द झाडी होती. झाडी होत असली तरी चंद्राचा प्रकाश त्या पाण्यावर पडत होता आणि चंद्राचं प्रतिबिंब त्या पाण्यात दिसत होतं. शेकोटीने गरम उब तिला लागत होती आणि अंगावर शाल बघितल्यावर ती भूषण च्या हळुवार कुशीत शिरली आणि म्हणाली, " भूषण आज एक गोष्ट सांगू मी विरच्या मागे लागले होते. ते माझं प्रेम होतं. मी त्याच्यावर प्रेम करायचे अगदी लहानपणापासून... पण तरीसुद्धा माझ्या आयुष्यात तुमच्या इतका चांगला मुलगा येईल याची मी कधी कल्पनाच केली नव्हती कारण माझं मन आणि डोकं एकाच माणसाभोवती फिरत होत तो म्हणजे वीर आणि आता तुम्ही आयुष्यात आल्यावर वीर कधी मागे पडला हे माझं मलाच कळलं नाही भूषण माझं तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे. मला माहिती मगाशी वीरला मी आय लव यू म्हटले तेव्हा तुमच्या अंगावर काटा आला होता. हो ना? पण तुम्हाला इतकं नाही कळलं की हे फक्त तुमच्यासाठी होतं..." तलावाच्या बाजूला एक दगड होता त्या दगडावर दोघेजण बसले. दोघेही एका शॉलमध्ये आयुष्याची स्वप्न बघत होते.
"स्वप्ना पण मला नाय वाटत तुमच्या घरचे माझ्यासारख्या अडाणी आणि शेतकरी माणसाला तुमचा हात देत्याल म्हणून.."

"भूषण माझ्या शब्दात बाहेर कोणी जाणार नाही आणि त्यांना माझी पसंती माहिती आहे. मी तुम्हाला कधीच पडताळून प्रेम केलं नाही तुमच्यातला रांगडेपणा मला आवडला आणि म्हणूनच मी तुमच्या प्रेमात पडले. भूषण आपण लवकरच लग्न करूयात तुम्ही तुमच्या घरच्यांना सुद्धा सांगा की मी आता तुमच्या पासून जास्त वेळ लांब नाही राहू शकत. भूषणने तिच्या डोळ्यात पाहिले ते घारे डोळे विलोभनीय होते. तो तसाच तिच्याकडे बघत होता कुरळ्या केसांची बोट कपाळावर गालावर खेळत होती. स्वप्ना त्याच्या ओठांच्या जवळ गेली आणि हलकीशी किस केली
तो पटकन बाजूला झाला.
" स्वप्ना हे आत्ताच योग्य नव्हे थोडं थांबूया की..." ती त्याच्या कुशीत शिरली आणि त्याला घट्ट बीलगली. याशिवाय का दुसरे सुख असते तलावाच्या ठिकाणी मध्यरात्री दोघेच... सोबत चंद्र साक्षीला होता आणि कमल पुष्प...



क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत.