मल्ल प्रेमयुद्ध - भाग 50 Bhagyashali Raut द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • आर्या... ( भाग ५ )

         श्वेता पहाटे सहा ला उठते . आर्या आणि अनुराग छान गाढ झोप...

  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

श्रेणी
शेयर करा

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 50

मल्ल- प्रेमयुद्ध







" थांबा सुनबाई तुमी ह्या घरच्या सुनबाई हाय... आता हा उंबरा आम्ही सांगितल्याशिवाय तुम्ही ओलांडायचा नाय..." आबांच्या चेहऱ्यावर राग होता आणि क्रांतीच्या डोळ्यात अश्रू....


क्रांतीने पुढे टाकलेले पाऊल मागे घेतले.
"थांब क्रांती अजिबात पाऊल माग घीवु नगस... म्या हाय तुझ्या संग" सुलोचनाबाई आबांच्या नजरेला नजर देत म्हणाल्या. तरीसुद्धा क्रांती मागे आली आणि आबांच्या पाय पडली.
"आबा या सगळ्यासाठी तुमचं आशीर्वाद लागणार हायत ना... आबा जाऊबाई आत्याबाईंनी तुमचं ऐकलं कारण..."
"कारण त्या अमास्नी अन देत्यात म्हण..." आबा रागानं म्हणाल
"न्हाई आबासाहेब हा तुमचा गैरसमज हाय... त्या तुमास्नी घाबरत्यात... किती गोष्टीत त्यांनी जीव मारून घेतलाय स्वतःचा पण आबा मी हे सगळं सहन करणारी मुलगी न्हाय... नी आता तर आत्याबाई हायत माझ्याबर मी ह्यांना त्यांचा नको तो अधिकार माझ्यावर गाजवू देणार नाय... येते मी." क्रांती ताडकन भायर पडली. त्यामाग संग्राम, तेजश्री, चिनू, स्वप्ना, भूषण, ऋषी सगळेच भायर आले.
"दादा आम्हीपण वहिनीसोबत आहोत आम्ही पण येतो." सगळेच गाडीत बसले. तेजश्री थांबली. तिला आत्याबाईंची काळजी वाटत होती.


गार वारा झोंबत होता. क्रांती गाडीच्या खिडकीतून बाहेर बघत होती. कोणी कोणासोबत बोलत नव्हते. सगळ्यांना या आव्हाणक आलेल्या वादळाचा धक्का बसला होता. क्रांतीने तिच्या हातावरच्या मेहेंदीकडे बघितले.मेहेंदीचा रंग अजून जसाच्या तसा होता. चिनू तुच्या शेजारी बसली होती. तिने तायडीचा हात हातात घेतला. आणि तिला धीर दिला.

क्रांतीने हातात गच्च भरलेला हिरव्या चुड्याकडे पाहिले आणि त्यातली एक एक बांगडी काढू लागली. तिने सगळ्या बांगड्या एकत्र केल्या आणि एका रुमालाने घट्ट बांधून बॅगमध्ये ठेवल्या.
तिचे हे वागणं सगळ्यांना कळत होतं पण आटा कोणीही बोलण्याच्या मानसिकतेत नव्हतें.


पोहचेपर्यंत दोन वाजले होते. तिने संग्रामला हॉस्टेलजवळ सोडायला सांगितले. सगळ्यांनी तिला धीर दिला.
"वहिनी आम्हाला कळना की वीरला नक्की काय झालंय? तडकाफडकी काय बी निर्णय घीवु नका मला एकदा त्याच्याबर बोलुदे मग ठरवू." भूषण म्हणाला

"क्रांती काय सुद्धा लागूदेत एक फोन कर... आम्ही सगळे येऊ..." स्वप्ना म्हणाली.
"भाऊजी फक्त एक कराल... चिनूला जाताना सोडायला जा आणि फक्त आई दादांना यातलं काहीएक सांगू नका... त्यांना हा धक्का सहन न्हाय व्हनार...वेळ आली की मी सगळं सांगीन. आत्ता फक्त सांगा की अर्जेंट बोलावलं म्हणून जावं लागलं." संग्रामने मान डोलावली.
""तायडे काळजी घे..." चिनू क्रांतीच्या गळ्यात पडली.
"मी रडणार न्हय अन तू सुद्धा आता येईल त्या परिस्थितीला तोंड द्यायच आणि जिंकायचं आम्ही आहोत..." सगळे जायला निघाले. क्रांती होस्टेलच्या दिशेने निघाली. तेवढ्यात आर्या आणि वीर येताना दिसले. वीरला आर्याबरोबर बघीन सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. वीर गडबडला. क्रांती त्याला न बघितल्यासारखी निघून गेली. बाकी सगळे गाडीत बसलेले उतरले. आर्या बाजूला थांबली.
"वीर तुला काय विचारावं वाटत न्हाय... इच्छा न्हाय बोलायची." संग्राम रागात म्हणाला.
""दादा आर बोलायचं काय न्हाय चांगल्या दोन कानाखाली लागावं ह्याच्या..." भूषण रागात म्हणाला.
"अरे आपला कुठ अधिकार एवढा अन असता तर समजला नसता का हा आपल्याला... काय बोलण्यात अर्थ न्हाय चला..." संग्राम म्हणाला तसे सगळे गाडीत बसले.
"व्हय जा... मला कुणाची गरज न्हाय... माझा बदला मी घेतला आता माझा तिच्याशी काय सुद्धा सबंध न्हाय..." संग्रामने गाडी सुरू केली आणि कोणी काहीही न बोलता निघून गेले.



आर्या त्याच्या जवळ गेली.
"तू पुढे गेलास ना की सगळे आपोआप परत येतील नको टेन्शन घेऊ...चल बाय मी न निघते आता.." आर्या होस्टेलमध्ये गेली.

क्रांती रूममध्ये अली तेंव्हा रत्ना आवराआवर करत होती. क्रांतीला बघून एकदम धक्का बसला.
"काय ग?? तू अशी अचानक? सकाळी वीरला बघितला त्याच्याशी बोलायला बघितलं तर तो एकूण न एकल्यासारखं करत होता नि आता टाळत पण व्हता...सगळं ठीक हाय ना...?"रत्नाने पटापट प्रश्नांची सरबत्ती लावली. क्रांती तिच्याजवळ गेली आणि गळ्यात पडून रडायला लागली
"क्रांती अग काय झालंय?" तिला शांत करत रत्ना बोलत होती.
पण क्रांती काहीच बोलत नव्हती आत्तापर्यंत थोपवून ठेवलेले अश्रू नुसते वाहत होते.
"क्रांती शांत हो... काहीही होऊदेत आपण मार्ग काढू पण सांग तर अस लग्नाच्या तिसऱ्यादिवशी नक्की काय एवढं झालाय?"
"काय सुद्धा मार्ग न्हाय निघणार... सगळं संपलय... सगळं... वीरने मला लग्न करून फसवलय... सगळं संपलय...."
रत्नाने तिला स्वतःपासून बाजूला केले.
"म्हणजे..." रत्ना म्हणाली. क्रांतीने तिला सगळं घडलेले सांगितले आणि पुन्हा रडायला लागली.
"वीर अस कस करू शकतात... न्हाय ग थांब मी बोलून येते त्यांच्याशी..."
"न्हाय नको... आता बोलायचं न्हाय करून दाखवायचं... आता मी त्याच्या चेहऱ्याकडसुद्धा बघणार न्हाय.. पार मनातन उतरले माझ्या आता न्हाय..."
"अग लग्न म्हंजी खेळ वाटला का ग ह्या बाप लेकाना.. आयुष्य बरबाद केलं ग तुझं... दादा आईला..."
"न्हाय न्हाय रत्ना आता त्यांना काय पण समजायला नको...आता राहिलेच किती दिवस ओलॉम्पिक सिलेक्ट व्हायच. आता फक्त लक्ष ओलॉम्पिक...बस... बाकी माझं लग्न झालय हे विसरून जायला पाहिजे. वीर नाही त्याने केलेलं घात न्हाय इसरणार त्यावर तर मला जिद्दीन अलोम्पिकपर्यंत पोचायचं हाय..."
"व्हय हाच उपाय हाय त्याच्यासारख्या माणसाला सरळ करायला आता काय डोक्यात घ्याच न्हाय फक्त खेळायचं बस... मी तुझ्या बरोबर हाय..." रत्नाने पुन्हा क्रांतीला जवळ घेतलं.




आशा दादांना जेवायला वाढत होती.
"आर वा घुट अन भाकरी..." दादांनी हाताच्या तळव्यान कांडा फोडला.
"व्हय..."
"माझ्या क्रांतीला लय आवडत घुट्याचा रस्सा अन भाकर..." दादा हातात भाकरीचा घास घेत म्हणाले.
"व्हय पर आज पोरीचा फोन न्हाय आला. अस व्हत न्हाय..." आशा
"अग तू रोज वाट बघू नकस आता तुझी पोर् संसारात रमली" दादा
"व्हय ती रमली पण चिनूला यायला पाहिजे आता अस पाहुण्यांच्या घरी किती दिस राहायचं हे बर न्हाय वाटत ना..."
आशा डोक्यावरून पदर नीट करत म्हणाली.
"व्हय की... आबासाहेबांच्या बहीण काय म्हणाल्या लक्षात हाय नव्ह." दादा
"व्हय पण आपल्या चिनूला लय येळ हाय कशाला उग घाई करायची. सगळं चांगलं असलं तरी त्यांची पोर शिकलेली हायत... त्यांचं स्वभाव अन संस्कार आपल्याला म्हायती सुदीक न्हाईत... तवा लगीच हा इशय नका काढू... चिनुच्या मनात दिसतंय तसं... बघू आपण तिच्याबर एकदा बोलू..."
"तू बोल बघ काय म्हणणं हाय पण लगीन मात्र आपण 2 वर्षानंतर करायचं... आता परत पैसा उभा करायला येळ लागलं." दादांचे बोलताबोलता जेवण झालं त्यावेळी हात धुतला.
"पर मला वाटतंय ती मानस चांगली हायती. ओळखीत हायती. पोर पण एकुलताएक हाय घरचं चांगलं हाय फकस्त पोरग म्हायती न्हय कस हाय?" दादा म्हणाले.
"व्हय भायर कुठं बघण्यापेक्षा घरातल्या घरात झालं तर आपल्याला पण काळजी न्हाय..." आशा म्हणाली अन गाडीचा हॉर्न वाजला. आशा भायर जायच्या आत सगळे घरात आले.
"आग चिनू फोन न करताच आलीस?" दादा म्हणाले.
"चिनूला राहा म्हंटल पण तिला राहायचं नव्हतं मग आलो सोडायला." संग्राम म्हणाला.
"व्हय... बसा बसा..." दादा
"न्हाय उशीर झालाय दादा क्रांतीला मुंबईला सोडून आलो त्यांची ओलॉम्पिक जवळ आली म्हण लगीच बोलवून घेतलं तिला टाइम न्हय मिळाला फोन करायला उद्या करल तुमास्नी फोन... आज न्हाय करायची तिची गडबड सुरू हाय..."
संग्राम अडखळत खोट बोलत होता.
" बर बर मग पाहुण अन ती एकत्र राहत्याल ना आता..." हा प्रश्न संग्रामला अनपेक्षित होता. तो जरा गडबडला. मग स्वप्ना मध्ये बोलली.
"दादा अहो नाही क्रांती होस्टेलवर राहती कारण वीरजवळ राहिली तर स्वयंपाक आणि बाकी सगळं काम तिलाच इराण लागलं आणि खेळावर लक्ष नाही राहणार म्हणून मग वीरने तिला होस्टेलवर फहायला लावलं.
"बघा पाहुण किती काळजी करतायत क्रांतीची तिच्या खेळाची..." सगळे पटकन उठले आणि निरोप घेऊन निघाले. चिनुच्या डोळ्यात मात्र पाणी होत.




क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत