मल्ल प्रेमयुध्द
वीर प्रॅक्टिस करत होता. त्याच्या बरोबर आज समीर होता. त्याचा सगळा राग वीर बाहेर काढत होता. साठे सर वीरकडे बघत त्याच्याजवळ आले.
"वीर कंट्रोल करा. तू चुकीचं खेळतोयस..." वीर ऐकत नव्हता. समीर नवीन होता त्याला अजून खेळातले डावपेच नीट माहीत नव्हते. समीर दमला होता त्याच्या तोंडातून रक्त बाहेर येत होतं. सगळेजण आजूबाजूला जमले होते. सगळेजण ओरडून वीरला हेच सांगत होते.
" वीर चुकीचा खेळतोय साठे सर तुम्ही थांबवा हे..." क्रांतीचा राग राग झाला होता. तीला काय करावे सुचत नव्हते. त्याला कोण कंट्रोल करणार?
साठेसर वर गेले. वीरला मागे खेचले. क्रांती आणि रत्ना धावत वर गेली आणि समीरला पकडले आणि एक बाजूला बेंचवर बसवले. वीर अजून समीरकडे रागाने बघत होता.
"वीर ऑफिस मध्ये या..." समीरला तातडीने हॉस्पिटलमध्ये न्यायला लावले आणि साठेसर चिडून ऑफिसमध्ये गेले. समीरसोबत रत्ना आणि क्रांती गेली. त्याला बँडेज करून रूमवर पाठवले. समीर अजून ग्लानीत होता.दोघीही बाहेर आल्या समीरची काळजी घ्यायला त्याचे रुममेट होते. आणि तसेही मुलांच्या होस्टेलवर तीन जास्तवेळ थांबता येणार नव्हते.
क्रांतीला समीरसाठी वाईट वाटत होते.
" माझा राग माझ्यावर काढायचा व्हता, त्यात समीरची काय चूक व्हती."
"तुझी तरी काय चूक व्हती? तुला त्याचा राग यायला पाहिजे... आधी स्वतः माती खायची अन दुसऱ्याला त्रास द्यायचा हा कोणता न्याय?" रत्ना रागाने बोलत होती.
"हो माझी काय चूक? त्यांनी मला फसवल हाय मी न्हाय... अन परत माझ्यामुळं समीरला का त्रास? न्हाय ह्या वेळी मी गप न्हय बसणार त्यांना जाब ईचारणार."
"क्रांती थांब साठेसर काय म्हणत्यात ते बघू मग ठरवू काय करायचं आपल्या सिलेक्शन मधी त्यामुळं अडचण नको यायला."
क्रांतीला रत्नांच म्हणणं पटलं. तेवढ्यात भूषणचा फोन आला.
"वहिनी मी इथं कोर्टवर आलो व्हतो पण कोणाचं दिसना महान फोन केला. तुमच्या काय वस्तू आणायच्या वाहत्या त्या पाठवल्यात तेजश्री वहिनीन.."
"व्हय भाऊजी थांबा आले मी.." रत्ना आणि क्रांती पुन्हा जायला निघाल्या.
भूषण एकटाच क्रांतीला भेटायला आला व्हता.
"भाऊजी... मला रात्री केला व्हता जाऊबाईंनी फोन... संग्रामभाऊजी ना टाइम न्हय म्हणून तुमाला..."
"न्हय वहिनी मला तुमाला भेयव्ह व्हत म्हणून मीच संग्रामदादाला म्हणालो मी जातो." भूषणने हातातील जड बॅग क्रांतीच्या हातात दिली.
" बापरे ह्यात एवढं काय हाय..?"
"काकी न वहिनीन खायला पाठवलंय..."
"भाऊजी चला आपण भायर जाऊ.." बाहेर ग्राउंडच्या इथे झाडांच्या सावलीत तिघेजण बसले.
"वहिनी वीरला समजत न्हाय तो काय करतोय? त्याचा राग शांत झाला की तो नक्की तुमची माफी मागल बघा..डोक्यात कसला राग घालून बसलाय त्याच त्याला कळत न्हाय..."
"भाऊजी ही गोष्ट तुमच्या कशी लक्षात आली न्हाय... तुम्हाला तुमच्या मित्राच्या सगळ्या गोष्टींची माहिती असती न? मग? त्यांच्या डोक्यात इतकं सुरू असताना तुमाला समजलं न्हाय?"
"वहिनी लै दा ईचारल पण त्यांन कधी त्याच्या मनाचा सुगावा लागू दिला न्हाय. तो त्यावेळी लई हताश झाला व्हता. त्याला समजावलं त्यानं ऐकलं पण मला वाटलं की तो तुमच्या खेळाच्या प्रेमात पडलाय सगळं इसरून पण हे इतकं मोठं
कारस्थान त्याच्या डोक्यात सुरू असलं अस न्हवत वाटलं."
" भाऊजी कोणाला दोष दिवून आता उपयोग न्हाय आता सांगा तुमच्या मित्राला माझ्या वकिलकडून डीओर्सची नोटीस यील के पण आडवं न घालता सही करा."
." वहिनी एवढा मोठा निर्णग नको थांबा थोडं एक संधी द्या त्याला मला एकदा बोलु द्या त्याच्याशी..."
"न्हाय भाऊजी माझा निर्णय झालाय आता ह्यात काय बदल व्हानार न्हाय फकस्त त्याआधी एकदा आई दादांशी बोलणार हाय त्यांना सगळं खरं सांगून टाकणार हाय..."
"वहिनी मी आज त्याला भेटणार नव्हतो माझी इच्छा नव्हती त्याच्याशी बोलयची पण आता बोलव लागलं..."
"भाऊजी त्यांनी आज काय केलं न्हाईत हाय का? त्यांनी राग म्हणून माझ्याबरोबर बोलतो म्हणून समीरला एवढा बेदम मारला आता हॉस्पिटलमधन आणला. त्या पोराला काही झालं असत तर काय केलं असतं."
"काय??? येडा झालाय हा आता मला बोललच पाहिजे." तेवढ्यात त्यांना वीर येताना दिसला भूषणला बघून त्याने तोंड फिरवले आणि तसाच चालू लागला.
"वहिनी बघितलं हाय का ह्याला काय? मला बघून तसाच पुढं चाललाय आता मी काय जाणार नन्हाय मला न्हय का मान.." तेवढ्यात वीर परत माघारी आला.
"आर वा सगळ्यांनाच हीचा पुळका आलाय वाटतं."
"व्हय कारण माती तू खालीस त्यांनी न्हाय.." भूषण रागात बोलला.
"व्हय तर मी जाणूनबुजून चूक केली आर भूषण्या... न्हायतर हिच्याशी कोण लगीन करल..."
"व्हय ना मग एवढा राग कशाला काढला समीरवर जर तुमाला काय वाटत न्हय तर का जळता आमच्या मैत्रीवर.."
"मी राग नाय काढला... खेळात येत न्हवत त्याला..."
"सगळी एडी तुमी फक्त हुशार.."
"वीर चल आपण रूमवर जाऊन बोलू.." भूषणने जवळजवळ त्याला ओढत नेला.
"बापरे क्रांती वेळेत ह्याचा खरा चेहरा समजला बाई न्हायतर तू आंधळं प्रेम करत राहिली असतीस अन तुला कळलं पण नसत ह्याच्या नक्की मनात काय सुरू हाय..."
"वीर काय चालू हाय लेका... इतका राग डोक्यात व्हता तुझ्या? मला समजलं नाय मला???"
"भूषण्या अपमान तुज झाला असता ना मग तुला समजलं असत. आता न्हाय काय उपयोग झाला माझा बदला घिऊन...
फकस्त आता ती सिलेक्ट झाली न्हय पाहिजे अन तशी सेटिंग मी लावली सुद्धा..."
"वीर तू माझा मित्र असूच शकत नाय." वीर मोठ्यानं हसायला लागला.
"मला न तुझं वाईट वाटतय... आता क्रांतीसारख्या चांगल्या पोरीच्या आयुष्यशाशी खेळालास तू... अर्थ नाय तुझ्या वागण्याला.नको असं वागूस तीच तिला पुढं जाऊदे..."
"मी तीच करियर संपवणार... तिला भाकरी थापायला लावणार माझ्याशी चॅलेंज करून माळ हरवलं तीन..."
"वीर कधीच डोक्यात ठिवून करतोयस रे... वीर डोकं फिरलंय तुझं..."
"तसं समज..."
"वहिनी तुला डीओर्स देणार हायत..."
"वा का त्या समीरबर लग्न करायचं असलं..."
त"त्याच्याशी तुला काय करायचं हाय..एकदा तुझ्याशी डीओर्स झाला की तुणच त्या बघत्याल काय करायचं. येतो मी लाज वाटती वीर तुझी" भूषण ताडकन निघून गेला. वीर मोठ्याने विकृत हसत होता.
क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत