मल्ल प्रेमयुद्ध - भाग 56 Bhagyashali Raut द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 56

मल्ल प्रेम युद्ध








क्रांती सेमी फायनलला जिंकली होती. आता सगळ्यांचे लक्ष फायनलकडे लागलं होतं. धकधक वाढली होती. सगळेजण सामना बघत बसले होते. साठे सर वेळोवेळी क्रांतीला गाईड करत होते.
क्रांतीला आयुष्यात केलेल्या चुकीच्या पश्चाताप होत होता. वीरला भेटल्यापासून एक एक आठवण तिच्या नजरेसमोरून जात होती. तिच्यासमोर असणारा खेळाडू खूप सिनिअर होती. आत्तापर्यंत ती मुलगी कधीच हरली नव्हती. तशी क्रांती नवीन होती. या मुलीला कशी हरवेल?? याची सगळे मजा बघत होते.

समोरचा खेळाडू स्ट्रॉंग आहे. साठे सर म्हणाले,
"तुझी पद्धत जे तुला शिकवले, ते डोळ्यासमोर आण आणि तसंच खेळ, विचार करू नकोस, की खेळाडू किती मोठा आहे, आपल्या आधी किती वर्ष खेळतोय, तू हे लक्षात ठेव की तुला जिंकायचय,, तुझं ध्येय तू गाठायच आहे."

शेवटचा सामना सुरू झाला. क्रांती नजर रोखून त्या मुलीला बघत होती. ती सतत हेच आठवत होती. खेळाडू किती मोठा असला तरी, खेळात आपण मोठे आहोत याचाच विचार करून तिने तिच्या अपोजिटला खाली पाडले आणि क्रांतीचे पॉईंट्स वाढले. क्रांती जिंकली. जिकडे तिकडे जल्लोषाचे वातावरण होते. क्रांतीला गोल्ड मेडल मिळालं. क्रांती तिथेच बसून जोरजोरात रडत होती. तिच्या सरसर सरसर डोळ्यासमोरून सगळी चित्र गेली. पहिला चेहरा आला वीरचा... आई,दादा , चिनू सगळे सगळे सरसर चेहऱ्यासमोर सरकून गेले. बाहेर आली तर समोरून चिनू आली आणि तिला घट्ट मिठी मारली. तेजू, संग्राम, भूषण, ऋषी, स्वप्ना सगळे तिच्यासोबत होते फक्त नव्हता तो वीर...




महाराष्ट्रात आल्यानंतर ढोल ताशाच्या गजरात मुंबईमधून तिची मिरवणूक निघाली. आई दादा तिथे पोहोचले होते. लेकीचं कौतुक बघून डोळ्यात पाणी जमा झाल होत. पण एकीकडे हा पण प्रश्न होता की, जावईबापू का दिसत नाइत? पण एवढ्या गोंधळात आई आणि दादांना हे विचारता आलं नाही. बाकी सगळे दिसत होते. संग्राम, तेजू तिच्याकडचे सगळे सगळे दिसत होते, पण जावईबापू दिसत नव्हते. क्रांतीचे लक्ष किती गोंधळात असलं, तिचा कितीही जयघोष होत असला तरी... दादा आणि आईंची नजर काय विचारती हे तिला कळत होतं. आता हीच वेळ होती जे तिला सांगायचं होतं. ग्राउंडवर आल्यानंतर सगळ्या बाकीच्या खेळाडूंनी तिचं स्वागत केलं. औपचारिक पद्धतीने तिला ओवाळण झालं. हार घातले. तिच्याविषयी दोन शब्द बोलले. सगळ्या गोष्टी झाल्या. सगळे खुश होते. क्रांतीची नजर अजूनही त्याला शोधत होती. पण तो कुठेच नव्हता. भूषणला तिच्या भावना समजल्या. भूषण त्याला शोधायला निघाला. रूमवर पोहचला. वीर शांत बेडवर पडला होता. त्याने वीरला हाक मारली.
" वीर काय चाललंय र??? वहिनी तुझी अजूनपण वाट बघत्यात... हीच वेळ, हीच संधी चल..." वीर रागाने लाल झाला आणि म्हणाला,
"इथ माझा अपमान करायला आलास का तू? चालता हो इथन परत तुझं तोंड दाखवू नकोस मला..." भूषणच्या काळजात चरचर झाल.
" आज माझा मित्र माझ्याशी ह्या भाषेत बोलतोय.." त्याला सहन झालं नाय. आल्या पावली तो माघारी गेला. त्याच्या डोळ्यात पाणी जमा झाल होत. परत तिथ गेला. संग्राम ने त्याचा चेहरा बघितला आणि ओळखलं.
"नको बोलू त्याला ऐकण्याच्या पलीकड गेलाय तो. तू कशाला गेलास?..."
" वहिनींची नजर त्याला शोधत व्हती र... मला वाटलं हे यश बघून तरी तो ईल इथपर्यंत वहिनींचा कौतुक बघायला पण त्यांनी आज मित्राला सुद्धा हकलाल दरवाजातन, दादा आता मला वाटतंय मैत्रीचा इथ शेवट व्हता..आमचा नातं तुटलं... संपलं..."

क्रांतीची गावात थाटात मिरवणूक चालू होती . ढोल- ताशा अख्या तालुक्यातनं गावापर्यंत जोरदार मिरवणूक काढली व्हती. "होय, ही मिरवणूक आई दादांच्या गावाला होती. तिच्या माहेरी होती. प्रश्न खूप होते.पण ते लेकीच्या आनंदात होते. आता तिला काहीच विचारू शकत नव्हते. लोक तिचे कौतुक करत होती. आपल्या मातीत अशी मुलगी जन्माला आली. याचा सगळ्यांना गर्व वाटत होता. वस्ताद तर आनंदाने नुसते नाचतच होते. त्यांना काय करावं काय सुचत नव्हतं. पेढे, गुलाल , ढोल - ताशा या गजरात क्रांतीचा उदो उदो चालला होता. शेवटपर्यंत सगळे थांबले होते. शेवटपर्यंत सगळे तिचं कौतुक डोळे भरून बघत होते. क्रांती घरी आली. सगळं आवरलं आई दादांना नमस्कार केला. देवाला नमस्कार केला.
"आई लय भूक लागली. मला ना घेवड्याची आमटी अन भाकरी दे पहिली.."
" क्रांती एवढा मोठा दिस आणि घेवड्याची आमटीनं भाकर काय मागतीस, गोडाधोडाचं करणारे मी आज.."
"नाय आई आज मी मातीत जिंकली. माझ्या मातीने माझं कौतुक केल. मला आज माझ्या मातीतलं जेवण जेवायचय. मला भाकरी आणि घेवड्याची आमटी पाहिजे.
दादा म्हणाले, "आशा लेकरू मागत त्याच्या आवडीचं तर दे की."
आशाने तिच्या गळ्याकडे डोकावून पाहिलं आणि तिला समाधान वाटलं.
"काय काय बघतीस?
" नाय गळ्यातलं मंगळसूत्र लईच नाजूक झाल म्हणून बघितल." क्रांतीच्या डोळ्यात पाणी आलं. आता आई आणि दादांना सांगावं की नंतर सांगावं हा प्रश्न पडला. तिची घालमेल दादांनी ओळखली.
"क्रांती आत्ता हा प्रश्न इचारायचा का नाय? मला नाय कळत पण राहावं ना बया काय झालय? जावईबापू का नव्हतं बरं? तिने दादांचाकडे बघितलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं.
आई तिच्याजवळ गेली.
"दादा एवढ्या दिवस सांगितलं नाय. मला माफ करा पण मला तुमाला दुःखात नव्हत बघायचं. तिने घडलेला सगळा प्रकार दादांनी आईला सांगितला. सगळं ऐकून दादांचे अंगात त्राण उरला नव्हता. दादा मटकन खाली बसले.
"जावईबापू अस करत्याल याचा विश्वास बसना बाबा... तरच तुझ्या सासरच्या लोकांचा काही फोन नाय. फोन केला तर दोन शब्द बोलायच आणि ठेवून द्यायच. पण पुढ काय?" क्रांतीला तिचा निर्णय सांगायला जड जात व्हतं, पण तिने शेवटी हिंमत केली आणि सांगितलं.
" दादा मी घटस्फोट घेती. पेपर सगळे तयार हायत." आशा एकदम खडकन उभी राहिली,
"घटस्फोट अग तोडगा काढू, मार्ग काढू, घटस्फोट काय? घटस्फोट नाय घ्यायचा..."
"मग काय पोरींना आयुष्यभर असच राहायचं एकटीनं..." दादा आशावर खवळले. ही अशी कुठ वागायची पद्धत असती व्हय ? बदला बदला .... आयुष्य म्हणजर गम्मत वाटली व्हय? दादा चिडले.

"आव पण बोलून बघू" आशा शांतपणे म्हणाली.
" हे एवढं ऐकल्यानंतर शांतपणे बोलू? तुला वाटतं जावईबापू एवढ्यावर थांबत्याल? ऐकून घेत्याल... जर त्यांना तिच्याविषय काय वाटत असतं तर त्यांनी ह्या आधीच तिच्याशी बोलायचं तिच्यासोबत राहायचा विचार केला असता."
" आई काही म्हण जे मी सहन केलय त्यावर एकच उपाय घटस्फोट ..."
"अग मग तू काय आयुष्यभर अशीच राहणार व्हय?"
तुझ्याशी लग्न कोण करणार ?
"आई तुला वाटतय आता माझी लग्न करायची इच्छा राहिली म्हणून...? आई दादा मला थोडासा वेळ द्या. मला या सगळ्यांतन भायर पडायचय." क्रांती उठली आणि आत मध्ये गेली.
आशाला काय बोलावं ते कळत नव्हतं.
" आव आपण जाऊया का उद्या दोघं तिच्या सासरी? दादा म्हणाले,
"थोडा वेळ जाऊ देत मग बघू काय करायच ते तिला आता काही विचारू नकस परत, तिला शांत राहू दे, तिच्या डोक्यावर बसू नकस." आशा काहीही न बोलता स्वयंपाक करायला गेली.


क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत