मल्ल प्रेमयुद्ध - भाग 61 Bhagyashali Raut द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 61

मल्ल प्रेमयुध्द


भूषणने लगीच स्वप्नाच्या आईला फोन केला. सविस्तर सगळं सांगितलं. स्वप्नाच्या आईला ते पटलं.
"पण मामी झालं लवकर तर यिन मी..."
एवढं बोलून फोन ठेवला.

भूषणन गाडी सुरू केली
त्याच्या माग वीर तयेवुन बसला. भूषणला माहीत होतं आता त्याला नेहमीच्या जागेवर जाऊन बसायचं आहे. त्याने गाडी त्या दिशेने वळवली.
दोघेही निवांत त्यांच्या जागेवर बसले.

"वीर लेका बोल कायतरी असा शांत नक बसू.."
" काय बोलू भूषण्या तू समजून घेतलं म्हणून ठीक सगळीच अशी असत्यात अस न्हाय ना..आय तर आजूनपण नीट न्हाय बोलत.."
"वीर आई लय दुखावली माझ्याजवळ रडली माऊली...ती जर बोलत नसलं तर तू बोल जे झालंय ते सांग तिला..."
"तिला मी काय सांगू तिला सगळं म्हायीत हाय म्हणूनच बोलत न्हाय न... माणस वळकायला चुकलो म्या..."
"मी बोलू का वैनीबर एकदा..."
"नको... असल्या माणसाबर का आयुष्य काढावं तीन नक बोलू आता हे व्हतंय ते हु देत..."
"अस नको व्हायला की कोणीच माघार घेतली न्हाय बघ एकदा बोलून..."
"माझी हिम्मत न्हाय बोलयची न्हाय न्हाय नजर सुदा मिळवू शकणार न्हय मी लै दुःख दिल बाबा म्या त्यांना."
"मग आता घटस्फोट???"
"हु दे मग काय आता जे हाय ते व्हणारे..."
तेवढयात भूषणला क्रांतीचा फोन आला. भूषणने वीर कडे बघितले नी फोन उचलला.
"वैनी बोला की.."
"भाऊजी... तुमी याल ना उद्या.."
"व्हय वैनी यिन ना.. मला सांगा तुमी कश्या हायत?"
"मी बरी हाय... उद्या कोर्टातन तशीच मुंबईला जाणार हाय... भाऊजी आत्याबाईंना भेटायची इच्छा व्हती पण त्या उद्या येणार न्हाईत मला माहित हाय.."
"वैनी एक ईचारु.."
"तुमचा निर्णय पक्का हाय ना..."
"व्हय भाऊजी माझा निर्णय झालाय... मी नाय बदलणार आता... वैनी एकदा वीरशी बोलू का?
"नको भाऊजी आयुष्यात एवढं काय झालंय आता की त्यांना नि मला एक छताखाली रहायला जमलं का ? त्यापेक्षा नको भाऊजी जे होतंय ते होऊ द्या. माझं प्रेम होतं नि राहील माझ्या आयुष्यात त्यांच्याशिवाय इतर कोणता पुरुष माझ्या आयुष्यात येणार नाही.
" वैनी पण एकदा बोलू की तो गावाला आलाय..."
वीर मानेने त्याला काही सांगू नको म्हणाला.
"हो उद्यासाठी आलं असत्याल.."

"वैनी एकदा..."
"भाऊजी उद्या या मी वाट बघती..."
"बर ठेवू का?"
"हो.."
क्रांतीने फोन ठेवला. चिनू तिच्या मागे येऊन थांबली होती.
क्रांतीच्या डोळ्यात पाणी आलं होतं.
चिनूने तिच्या खांद्यावर हात ठेवला.
"तायडे... का रडतीस?"
"ह्यासाठी केलं व्हत का सगळं?"
"तायडे मला वाटत तुमच्या दोघांच्या मनात न्हाय अस काय व्हावं म्हणून मग का तुम्ही एकदा बोलत न्हाय... अस हु नाय की अहंकारापायी एकजनाने पण पुढाकार घेतला नाय अन घटस्फोट झाला."
"माझी इच्छा नाय समोरून बोलायची किंवा त्यांच्याबर राहायची, त्यांनी फसवलंय मला चिनू...मी अपेक्षा केली न्हवती की त्यांच्या डोक्यात एवढी विचित्र कल्पना येत होत्या. प्रेम नाय किंवा संपलं अस न्हाय पण मी दुखावली गेली लई... मनातन सगळ्या गोष्टी परत जुळून न्हाय येणार... आता वेळ पण गेली."
"तायडे मग रडतीस का? तू तुझ्या निर्णयावर ठाम हायस ना?"
"व्हय मी ठाम हाय आता मला न्हय माघारी फिरायचं... "
"मग रडू नकोस..."
चिनूने मोठ्या बहिणीसारखं तिला जवळ घेतलं अन क्रांती मात्र तिच्या कुशीत हमसून रडत होती.


"हॅलो..."
"बोल चिनू..."
"दाजी तुमी जाग.."
"झोप लागल व्हय आज..."
"दाजी तुमाला पण न्हाय न वाटत घटस्फोट व्हावा मग का न्हाय माघार घेत."
"माघार मीच घ्यायला पाहिजे पण काय व्हतंय ना तुमच्या बहिणीला मी इतला तरास दिलात की माही मलाच आता लाज वाटायला लागली."

"दाजी तुम्ही एकमेंकासाठी बनलाय तुमी एकदा बोला तायडीशी.."
"नको चिनू मला कोणाला तरास न्हाय द्यायचा ना अडकवून ठेवायचं हाय.."
एवढं बोलुन वीरने फोन ठेवला.
"काय करावं दोघांचा एकमेकांवर एवढा जीव हाय पण मान्य कोण करल तवा खर ना."

संतु चिनुजवळ आला.
"एवढ्या रात्री कुणाशी बोलत व्हतीस?"
"दादा रागावशील तू?"
"न्हाय सांग?"
"दाजींना फोन केला व्हता. मला वाटत की त्यांचा घटस्फोट ""
"व्हायला नको व्हय ना..."
"व्हय पण दोघपन बोलायला तयार न्हाईत."
"दादा अन आईला हेच वाटतंय पण जर क्रांतीला घटस्फोट पाहिजे असल तर आपण न्हाय ना म्हणू शकत की घटस्फोट नको घिव म्हणून... त्या बिचारीची का फरपड..."
"दादा तुला अस वाटतय का की तायडीला वाटतय घटस्फोट व्हावा?"
"नसलं पण मन मानत नसलं तर आपण का जबरदस्ती करायची. जे होईल ते होऊदे क्रांतीच्या मनासारखं"



दुसऱ्यादिवशी कोर्टात क्रांती आणि तिच्याबरोबर सगळे घरातले व्हते.
वीर बर आबा, भूषण तेजश्री आणि संग्राम व्हता.
दादादा अन आईला वीरने वाकून नमस्कार केला. दादा आईने त्याला आशिर्वाद दिला.
वीर काही बोलयला जाणार तेवढ्यात ह्या दोघांना आतमध्ये बोलावलं.
भूषण संग्रामला म्हणाला.
"दादा एकदा बोल तू दादा आई बर व्हईल कायतरी."
"नको...बोलायला याआधी पाहिजे व्हत आता काय उपयोग?"
"मोठं दाजी बोलना तुमी..." चिनू म्हणाली.

दादा आबाच्या जवळ गेले.
"आबासाहेब हि यळ यायला नको व्हती. काय चुकलं व्हत आमचं की एवढं मोठं दुःख यावं आमच्या लेकीवर... आबा मी अडाणी असन, गरीब हाय पण कपटी अन वाईट भावना कधी मनाला शिवली सुद्धा न्हाय, सगळ्यांच सगळं चांगलं व्हावं हीच भावना हाय आमची प्रत्येकाची. मी तुमास्नी दोष देणार न्हय त्यांच्या नशीबात लिहिलं व्हत ये घडतंय पण या सगळ्याचा बरोबर तुम्ही नको व्हता तवा कायतरी मार्ग काढायचा इचार केला असता. आबा तुम्हाला लेक न्हाय म्हण तुम्हाला पोरांचं यश मोठं वाटत पोरीचं न्हाय मला पोरगा असुन सुध्दा मी तिघांवर तेवढंच प्रेम करतो अन तिघांना सारखाच प्रोत्साहन देतो. आबा लई मोठ्या गावात राहत न्हाय पण माझं इचार चांगलं हायत, पोरगी म्हणजे भांडी अन धून करल अस नसत ना! त्यांना त्याच्याशिवाय आपण बघायला शिकायला पाहिजे. कारण त्यांना सुद्धा मन असतं आणि त्यांची सुद्धा स्वप्न असत्यात. जे व्हणारे ते थांबवू शकत न्हय आपण पण आबा तुमी लई मोठी आसामी.. मला तुमचं इचार सुद्धा मोठं असणार अस वाटलं व्हत पण माझा गैरसमज व्हता तो दूर झाला बघा.


दोघेही एकमेकांच्या नजरेला नजर देत नव्हते.
"तुमी सहा महिन्यात काही निर्णय बदलला आहे का?" दोघांनी आता एकमेकांकडे पाहिलं.
"नाही." क्रांती
"ही सहा महिन्यांची वेळ कोर्ट तुम्हाला देत की तुमच्या मधले मतभेद मिटत असतील तर डीओर्स होणार नाही आणि संसार वाचेल.पण काहीच होत नसेल तर आपण प्रोसेस करू."
वकिलांनी वीरसमोर फाईल धरली.
"इथे खाली सही करा." वीरने सही केली आणि क्रांतीकडे फाईल दिली. क्रांती सगळे कागदपत्र नीट बघत होती. ती कोणास ठाऊक विचार करत होती कसलातरी.
"बाळा काय झालं?" दादा म्हणाले. क्रांतीने खाली बघून सही केली.
शांततेत सगळे उठले कोणी कोणासोबत एक शब्द बोलले नाहीत आणि आपापल्या दिशेने गेले.

क्रांतीला सोडायला बस स्टँड वर सगळे आले.
वीर आणि आबा सोडून...
"क्रांते काय बी काळजी करू नको आता परत फक्त खेळावर लक्ष दे..." दादा म्हणाले. आशा ने क्रांतीला जवळ घेतलं.
"बाय माझी मला वाटत व्हत काय तरी तोडगा निघल पण न्हाय निघाला असुदेत... नीट राहा अन रोज फोन कर.."
क्रांती एसटीत बसली. सगळ्यांना हात करून गाडी लांब गेली.
डोळ्यात फक्त आसवं व्हती. तेवढ्यात शेजारी कोणीतरी येऊन बसलंय अस वाटलं म्हणून डोळे उघडले.

तर...?


क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत

कोण असेल शेजारी?? बघून क्रांतीला एवढा धक्का बसला.

१) वीर...?
२) समीर...?

कमेंट करून नक्की सांगा. 😊